म्युच्युअल फंडचे मुख्यत: तीन प्रकार असतात.
१. लिक्वीड फंड
२. डेट फंड
३. इक्विटी फंड
तीनही प्रकारच्या म्युच्युअल फंड्सची सरमिसळ असू शकते. म्हणजे उदा. डेट फंड व इव्किटी फंड यांचा मिळून एक बँलन्स फंड तयार होतो. ज्यात जमलेले पैसे इक्विटी फंड मॅनेजर ६५% शेअर्समधे व ३५% सरकारी पेपर्समधे किंवा कंपन्यांच्या दिर्घ मुदतीच्या डेट पेपर्समधे गुंतवतात. ( या बद्दल मी नंतर सविस्तर सांगेन )
यापैकी पहिल्या प्रकारच्या फंडमधे म्हणजे लिक्वीड फंड मधे गुंतवणूक केलेले पैसे (अर्थात या प्रकारच्या म्युच्युअल फंडमधे पैसे ठेवण्यास गुंतवणूक म्हणता येणार नाही.)
हे फक्त तात्पुरत्या मुदतीसाठी असतील. उदा. १ आठवडा, १५ दिवस, १ महिना किंवा जास्तीत जास्त दोन महिने.
तरीही या प्रकारचे म्युच्युअल फंड्स खूपच उपयोगी आहेत. यामधून पैसे काढायचे असतील तर एक दिवसात पैसे परत मिळतात. तसेच यातून होणार्या फायद्यावर टी डी एस कापला जात नाही . बँकेत जर मुदतीचे पैसे ठेवलेत तर मिळणार्या व्याजावर टी डी एस कापला जातो. तसेच याला मुदतीची अट नाही
अगदी थोड्या दिवसातही पैसे काढता येतात. म्हणून या प्रकारच्या म्युच्युअल फंड्सचा उपयोग अक्षरशः एखाद्या सेव्हींग बँक अकाउंटसारखा करता येईल. (आहे की नाही बरी सोय!)
शिवाय या म्युच्युअल फंडमधे ठेवलेले पैसे काढून घेण्याच्या ऐवजी त्याच म्युच्युअल फंड हाउसमधल्या दुसर्या म्युच्युअल फंडमधे त्याच दिवशी सरकवता येतात. उदा. जर पैसे एच डी एफ सी लिक्वीड फंडमधे असतील तर पाहिजे त्यावेळी एच डी एफ सी इक्वीटी फंडमधे सरकवा त्याच दिवशी.
या फंड्सचा फायदा असाही आहे की बँकेत पैसे वर्षभर ठेवले तरच ६.५०% दराने व्याज मिळते व मुदतीच्या अगोदर पैसे काढले तर २% साधारणपणे व्याजाचा दर कमी होतो. पण म्युच्युअल फंडमधे जर पैसे ठेवले तर सर्वसाधारणपणे तेवढ्याच दराने थोड्या काळाच्या मुदतीसाठी पैसे मिळतील्.(अर्थात ठेवलेल्या दिवसांच्या प्रमाणाच्या दरात पण दर तोच)
या फंडची आणखी एक विचारात घेण्याची गोष्ट अशी की या फंड्सची नेट असेट व्हल्यु कधीही कमी होत नाही. (म्हणजे यात पैसे टाकलेत आणि विसरून गेलात तर नुकसान तर नक्की होणार नाही!)
पण या म्युच्युअल फंड्स मधील फायदा फक्त ४.५% ते ५.५% वर्षाला एवढाच असणार आहे. पैसे दुप्पटव्हायला ७२/५ = १४.४ वर्षे साधारणपणे लागतील.(म्हणजे यात फार काळ फार पैसे ठेवता येणार नाहीत नाही का?) या फंडचा उपयोग चक्क पार्किंग लॉट म्हणूनच करायला लागेल.
त्यानंतर आले डेट फंड्स यातही दोन प्रकार आहेत.
एक, गव्हर्नमेंट सेक्युरिटीज फंड यात जमलेले पैसे फंड मॅनेजर सरकारी सेक्युरिटीज मधे गुंतवतो. या प्रकारच्या म्युच्युअल फंडचा उपयोग ज्यावेळी व्याज दर कमी होत असतील तेव्हा होतो. व्याज दर वाढत असतील त्यावेळी यात अगदीच कमी नफा होण्याची शक्यता असते.
मला आठवते आहे की ज्यावेळी व्याज दर कमी होत होते म्हणजे साधारण २००३ ते २००५ च्या काळात त्यावेळी या प्रकारच्या फंडने साधारण वार्षिक नफा अगदी २०% सुध्दा दिलेला आहे.
पण सध्या व्याज दर वाढण्याच्या मार्गावर असल्याने या प्रकारच्या म्युच्युअल फंडमधे अगदीच कमी नफा होत आहे म्हणजे वार्षिक १.५% ते ४.५%. शिवाय जरी काही जणांचे म्हणणे असले की याची किमत(व्ह्ल्यु) कधीही कमी होत नाही तरी माझा अनुभव तसे सांगत नाही.
क्रमशः
प्रतिक्रिया
23 Apr 2010 - 9:05 pm | पर्नल नेने मराठे
सुरेख माहिति... मी बिर्ला , रिलायन्स इन्फ्रा, एचडिएफ्सी एसआयपी चालु केलय.
चुचु
13 May 2010 - 6:08 pm | शेखर जोग
एस आय पी करणे सर्वात उत्तम. चालू ठेवा
23 Apr 2010 - 10:41 pm | chintamani1969
मला वाटते कि मुखतः २ प्रकार असतात
१ओपेन एंडेड
२ क्लोज एंडेड
चूक भूल द्यावी घ्यावी
23 Apr 2010 - 10:46 pm | मदनबाण
जोग साहेब्... हे कट ऑफ टाईम काय असतं ते जरा समजवाल का ?माझ्या लय गोंधळ उडतो...म्हणजे नक्की कधी रिडीम करायचं ते ठरवण सोप जाईल.
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
24 Apr 2010 - 7:16 pm | रवीन्द्र कर्वे
पे आउत (out) व ग्रोथ असेहि २ प्रकार आहेत.
माझ्या रिलायन्स व कोतकच्या SIPs complete झाल्या आहेत.
Tata व सुन्दरम्च्या complete व्हायच्या आहेत.
redamtion बद्दल मला फारशी महिती नाही.
24 Apr 2010 - 8:09 pm | मीनल
उत्तम आ णि उपयुक्त माहिती .
वाचते आहे. लिहित रहा.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
25 Apr 2010 - 3:30 pm | मितभाषी
----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\
13 May 2010 - 6:19 pm | नील_गंधार
चांगली माहिती.
एक शंका विचारतो,
कि सिप चांगले की म्युफंडात वन टाईम इन्वेस्टमेंट चांगली?
मी जेंव्हा आयसीआयसीआय प्रुडेंशिअल ला सिप केले होते तेंव्हा हळुहळु मार्केट चढत गेले होते.शेवटी शेवटी एनएव्ही जास्त झाल्याने कमी युनिटसच पदरात पडली. नंतर मार्केट पडल्याने विकताना फारच कमी फायदा झाला.या उलट माझ्या मित्राने मार्केट खाली असताना एकरकमीच म्युफ मध्ये गुंतवणुक केली होती व त्याला ह्याचा बराच फायदा झाला.
नील.
13 May 2010 - 7:59 pm | स्वाती२
>>सिप चांगले की म्युफंडात वन टाईम इन्वेस्टमेंट चांगली?>>
तुम्ही जर का आधीचे a/c roll over करत असाल तर सिप किती काळ करत राहाणार अशावेळी बरेचदा २-३ भागात इन्वेस्ट करणे बरे पडते. पण नेहमी साठी सिप चांगले. कारण buy low sell high. पण त्याच वेळी you cannot time the market. जेव्हा तुम्ही दर महिन्याला एक ठरविक रक्कम इन्वेस्ट करता तेव्हा आपोआप किम्मत कमी तेव्हा जास्त युनिट आणि किम्मत जास्त तेव्हा कमी युनिट घेतली जातात. तेव्हा buy low हे तरी आपोआप होते.
बाकी माहिती तज्ञ मंडळी देतिलच.
13 May 2010 - 7:46 pm | स्वाती२
सोप्या भाषेतील माहिती आवडली.