एक नितांत हादरवणारा अनुभव

झुम्बर's picture
झुम्बर in जनातलं, मनातलं
17 Apr 2010 - 11:16 am

एखादा चित्रपट आयुष्यावर काय परिणाम ठेवून जातो हे कधी कधी न समजण्या इतक आपण त्यात वाहवत जातो, असाच काहीसा अनुभव मला दोन दिवसान पूर्वी आला... खर तर या चित्रपटाचा खूप गाजावाजा झाला होताच ... पण तो मी पाहीला आणि खरच आपण २१ व्या शतकात आहोत का? हा प्रश्न पुन्हा माझ्या मनाच्या ऐरणीवर आला ....
चित्रपट होता जोगवा ....
तशी आई बाबां बरोबर जेजुरीला मुरल्या पहिल्या होत्या पण त्यांच्या त्या बेधुंध नाच्ण्यामागे इतकी दाहकता असेल असा त्यावेळी मला वाटलाही नव्हत ...
ज्या वयात मी माझ्या मित्र मैत्रिणी बरोबर आयुष्याचा मनमुराद आनंद लुटत होते त्यावयात सुली(नायिका) ही जोगतीण बनली होती ..
सगळ्यात भयंकर आयुष्य होत ते तायप्पा च सुली स्त्री आहे हा तिचा मुलभूत अधिकार तरी शाबूत होता पण तायप्पा ला त्याचा पुरुष असण्याचा अधिकारही नवता ....
सतत अवहेलना आणि शाररीक आणि मानसिक शोषण ....
देवतेच्या नावाखाली चालणारे अनन्वित अत्याचार आणि माणसाला माणूस म्हणून जगणे नाकारणे ...
त्यांनी जर मनासारख राहील तर यल्लू आई त्यांच्या वर कोप करणार पण त्यांना खासगी मालमत्ता म्हणून वापरणाऱ्या (पुरुषानाही) त्यांना सुरळीत जगण्याचा ची हक्क नाकारणाऱ्या ना यल्लू आई कधी शिक्षा देणार? सुन्न करणारा अनुभव होता चित्रपट म्हणजे ...
वर्षानु वर्ष चा पघडा समाज मनावरून उतरवणे अवघड आहे नुसत त्यावर चित्रपट काढून त्यांना पुरस्कार देयून जबाबदारी संपत नाही. आपल्या कुवती नुसार आपणही हातभार लावायला हवा ... प्रबोधन ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे पण पाऊल आता उचलायला हवे ....

चित्रपटप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

17 Apr 2010 - 4:47 pm | अमोल केळकर

बघायचाय हा सिनेमा. थोडक्यात वर्णन आवडले

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

झुम्बर's picture

17 Apr 2010 - 6:05 pm | झुम्बर

असाच अजुन एक "मान्जा"राहि अनिल बर्वे याचा त्यबद्दल पुन्हा केव्हतरि ............. :B

भानस's picture

17 Apr 2010 - 6:15 pm | भानस

परिणामकारक चित्रपट. कुठेही भडकपणा न येऊ देता वास्तव दाखवलेले आहे. कथेचा ओघही उत्तम. अशा दुर्दैवी जीवांची होणारी परवड, समाजाने चालवलेले शोषण व घरच्यांच्या अंधश्रध्देतून गेलेला यांचा बळी.... खरेच लहानपणी नेहमी दारावर जोगवा मागायला बाया-बापेबाया येत... बरेचदा भीतीच वाटे त्यांची. केवळ अस्वच्छता-कंटाळ्यातून चार केस एकमेकांना चिकटतात काय आणि जट निघाली म्हणून बोंब होते काय.... दुर्दैवच....