खट खट, खट खट, खटक!!

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
12 Apr 2010 - 8:03 am

काल एक बातमी वाचली. मुंबापुरीची.

एका मध्यमवर्गीय वस्तीत घडलेली.

झाल काय; एका घरा समोर पत्रे येऊन पडू लागली. मजकूर घरच्या स्त्री चा चारित्र्य हनन करणारा.
जोडप पहिला थोड अस्वस्थ, मग मात्र तिसरया पत्रानंतर त्यांनी कॅमेरा बसवला.
फिरून तीनदा पत्र टाकताना त्यांना त्यांची शेजारीण दिसली.
एका बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या घरा घरातून दिसणाऱ्या चढ ओढी चा हा थोडा अतिरेकी नमुना.
पोलीस केस झाली, आपल्या घरात नवऱ्यावर शेअर बाजारात पैसे घालवल्या बद्दल नाराज असणाऱ्या त्या शेजारणीला, यांची समृद्धी खुपू लागली.
असूया, द्वेष या भावनेतून वरील कृत्य घडले.

गोष्ट इथेपर्यंत वाचून पान पालटायला हरकत नव्हती.

पण मला खटकला तो त्यानंतरचा नाट्य पूर्ण भाग.

जिने हा गुन्हा (की आगळीक?) केली, ती जामिनावर घरी परतली. (जामीन कोणी भरला त्याचा उल्लेख नव्हता)
घर बंद. पेपर मध्ये बातमी अशी की तिच्या घरच्यांनी तिला lock out केल.
means they have shunned her. इथ मला खटकायला सुरुवात झाली.
आपल्या आजूबाजूला गुन्हे घडताना आपण लहानपणा पासून पाहतो. आपल्या परिसरात पोलीस येतात, आपल्यातीलच एखादा रोजच्या पाहण्यातला काका अथवा दादा बेड्या घालून नेला जातो.अर्थात हे रोजच नसत. कधीतरी घडत आणि आपण खळबळून जातो.
गुन्हा अर्थातच साधारण असतो. घरची माणसं सुरवातीला गप्प, मग हळू हळू आपल्यात मिसळतात. वाईट संगतीला लागला, अथवा थोडा वाहावला
अस बोललं जात. सहा महिने वर्षभरान तो परत येतो, या मधल्या काळात त्याची पत्नी अथवा त्याचे जिवलग तो परत येण्याची वाट पाहतात.

मग हिच्या बाबतीत का अस? नाही मी स्त्री मुक्ती वगैरे नाही खेचत आहे.
मला खटकल ते नवरा जेंव्हा एखादी आगळीक करतो ,तेंव्हा अश्रु भरल्या नजरेन " का?" अस विचारणारी पण तो अपमान त्याच्याबरोबर साहणारी पत्नी, आणि तिन केलेल्या चुकीबद्दल तिच्या कडे पाठ फिरवणारा तो.

काय होत स्त्री अपराध्यांच? नाही खून वगैरे ची गोष्ट वेगळी. पण हे अस छोट मोठ चुकलेल कुणी माफ नाही का करत?
आज डोळ्यासमोर येते माझ्या शालेय जीवनातली एक घटना.
हातात पिस्तुल घेवून आपल्या मेव्हण्याला उडवणारा तो. भावाचा खून झाल्यावर पोटची दोन लहानगी (जी आमच्या शाळेत होती) घेवून ती. अन तिथून पुढे त्याला नियमित तुरुंगात भेटायला जाणारी अन त्याचा संसार सांभाळणारी ती! किती द्विधा मनस्थिती असेल तिची? माहेर, भावाची विधवा, आई वडील!
की लग्नान फक्त स्त्रीच जोडली जाते? पुरुष नाही?
तिन केलेलं कर्म तिला परत त्या घरातून बाहेर फेकू शकत? इतक सहज?

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

12 Apr 2010 - 8:29 am | अरुण मनोहर

असे चित्र (थोड्या कमी प्रमाणात, पण) ईतर संस्कृतीत देखील दिसते. अगदि पुरोगामी समजल्या जाणार्.या अमेरिकेत देखील समाजात स्त्रीकडून वेगळ्या अपेक्षा केल्या जातात.
हे चांगले की वाईट ह्या वादात न पडता मला एक वेगळा विचार मांडायचा आहे. अनादीकाळा पासून समाजात स्त्रीकडे घर सांभाळण्याचे व पुरुषाकडे अर्थार्जनाचे कर्तव्य अशी वाटणी केल्या गेली होती. आजकाल जरी स्त्रिया आणि पुरुष हे दोन्ही भार समसमान उचलण्याचा प्रयत्न करत असतात, तरी हजारो वर्षांपासून चालत आलेली (व जीन्समधे कोरल्या गेलेली?) अपेक्षा अशा वेळी डोके वर काढत असावी. त्यामुळे कुटुंबाची मानहानी होणारे कृत्य स्त्रीकडून केल्या गेले, तर कदाचित (पुरुषप्रधान कुटुंब) तिला अवाजवी शिक्षा देत असेल.
हा केवळ कारणीमिमांसा समजाऊन घेण्याचा प्रयत्न आहे. कोणाच्याही वागणुकीचे समर्थन अथवा टीका करण्याचा हेतु नाही.

युयुत्सु's picture

12 Apr 2010 - 12:51 pm | युयुत्सु

तरी हजारो वर्षांपासून चालत आलेली (व जीन्समधे कोरल्या गेलेली?) अपेक्षा अशा वेळी डोके वर काढत असावी.

हे एक स्पष्टीकरण होऊ शकते. पण याशिवाय याला दूसरी एक बाजू आहे. ती आहे एखाद्या कळपाच्या किंवा समूहाच्या मानसिकतेची. आपल्या कळपात कुणाला प्रवेश द्यायचा किंवा नाकारायचा हा अधिकार त्या समूहाचा असतो. तो समूहात प्रवेश करू इच्छिणा-या व्यक्तीचा नसतो. स्त्री ही कुटुम्बात बाहेरुन येते. पुरुषाच्या बाबतीत तसे नसते. त्यामूळे वर उल्लेख केलेल्या घटनेत त्या कुटुम्बाने त्या स्त्रीला नाकारणे किंवा पुरुषाला स्वीकारणे यात मला नैतिक पातळीवर गैर वाटत नाही. फक्त Law of the land अशा घटने कडे कसे बघतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

मूळ लेखिकेने जे generalization केले आहे ते मात्र मला मान्य नाही. मुलगा किंवा मुलगी गैर मार्गाला लागली म्हणुन त्यांच्याशी संबंध तोडणारी कुटुम्बे भरपूर बघायला मिळतात. माझ्या माहितीत एक उदाहरण असे आहे की मृत्युशय्येवरील सासूने इस्टेट नावावर करावी म्हणून तीला पोलिसचौकीत खेचणा-या बायकोला माफ करून नवर्‍याने तिला स्वीकारले आहे. पुण्यात सकाळ ने मात्र अलिकडे स्त्रीयाकडून होणार्‍या पुरुषांच्या छळाच्या बातम्या हळु हळु द्यायला सुरुवात केली आहे. हे ही नसे थोडके...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

II विकास II's picture

12 Apr 2010 - 1:39 pm | II विकास II

>>पुण्यात सकाळ ने मात्र अलिकडे स्त्रीयाकडून होणार्‍या पुरुषांच्या छळाच्या बातम्या हळु हळु द्यायला सुरुवात केली आहे. हे ही नसे थोडके...

== अगदी बरोबर
सकाळचे अभिनंदन चा धागा टाकावा काय?

प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

रेवती's picture

12 Apr 2010 - 6:14 pm | रेवती

युयुत्सु सर,
स्त्रीयाकडून होणार्‍या पुरुषांच्या छळाच्या बातम्या हळु हळु द्यायला सुरुवात केली आहे
स्त्रियांवर होणार्‍या अन्याय व अत्याचारांच्या बातम्यांनी वर्तमानपत्र भरून गेल्यामुळे कदाचित जागा नसेल राहीली पुरुषांच्या बातम्या देण्यासाठी.........असो सकाळने आता ही चूक सुधारलेली आहे.:)
आपल्याला एक पुरुष म्हणून आनंद होणे स्वाभाविक आहे.
पुरुषांच्या होणार्‍या छळाचे प्रमाण हे स्त्रियांच्या होणार्‍या छळाच्या प्रमाणाच्या कितीतरी पट कमी आहे हे तरी मान्य कराल? आता असले अन्याय सहन करण्यापलिकडे गेल्यावर अनेक जणींनी 'अरे' ला 'कारे' करायला सुरुवात केल्यामुळे पुरुषांना त्यांची जुनी मानसिकता बलणे भाग आहे नाहीतर हे त्रासाचे प्रमाण वाढते राहणार, ही वस्तुस्थिती आहे.

रेवती

टारझन's picture

12 Apr 2010 - 1:00 pm | टारझन

अरेरे !! वाईट घडलं !!

अवांतर : शेजारिन बैंनी जर अश्लिल पत्रांऐवजी ... अमेरिकन टाईम्स मधले काही कार्टुन्स समोरच्या घरात टाकले असते तर ते अफलातुन कार्टुन्स पाहुन ते जोडपे हसुन हसुन वेडे झाले असते .. आणि म्हैलेलाही कोणतीच शिक्षा झाली नसती :)

अपर्णा तै .. जास्त विचार नका करु जगाचा :) आपल्या घरची परिस्थिती तशी नाही ना ? ह्याची जास्त काळजी करा :)

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 4:18 pm | अरुंधती

अपर्णा, अगं, अनेकदा अजून बदनामी नको म्हणून अशी कुटुंबे आपल्या गावी/ वेगळ्या ठिकाणी काही काळासाठी जातात....तिथं तसं तर नाही ना झालं? की फक्त तिलाच गृहप्रवेश बंद? कारण घराला कुलूप होतं की तिच्यासाठी घरच्यांनी दार बंद केलं?

गुन्हेगार पुरुष असला तर त्याला ''आपला तो बाब्या'' करत घरी पुन्हा परतीची वाट खुली असते. पण स्त्री गुन्हेगारांचे तसे नाही. ज्यांना ज्यांना गुन्ह्याची शिक्षा भोगायला लागते त्या स्त्रियांना घरी परतीचे मार्ग जवळ जवळ बंद होतात. विश्वास नसेल तर येरवडा स्त्री कारागृहाच्या अधिक्षकांना विचारून बघा.... ह्या स्त्रियांना मग वेगळा आसरा तरी शोधावा लागतो किंवा चुकून घरी/ माहेरी परत घेतले तरी अपमानित जीणे पत्करावे लागते.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्पंदना's picture

12 Apr 2010 - 4:39 pm | स्पंदना

येथे लग्नाच्या बन्धनाचा विचार करते. एकमेकावरच्या अन्यायाचा नव्हे.
जे घर तिने आपल म्हणुन फुलवल तेच तिच्यासाठी पारख?
घर कशासाठी असत? बाहेरच्या जगामधुन परत आल्यावर डोक टेकायला ना? मला कायम एक पेपरधला फोटो आठवतो,
हर्षद मेहता मेलेला.हॉस्पिटलच्या खाटेवर कर्माची फळे भोगुन पडलेला तो अन गद्गदलेलि त्याचि बायको.
त्यान कमावलेल्या अनिर्बन्ध पैशावर मजा मारुन नन्तर त्याच्या बरोबर होरपळलेलि. खुप मोठी चुक, अतिशय मोठा फ्रॉड.... पण मी कधिच नवरा गुन्हेगार ठरला म्हणुन बायको सोडुन गेलेली ऐकल नाहि आहे. अगदी परवा प्रमोद महाजनान्चा खुन केलेला त्यान्चा भावाच्या बातमी बरोबरचा फोटो पहा. हेच दिसेल.

मी आधिच उल्लेख केल्या प्रमाणे मी स्त्री मुक्ती मध्ये वगैरे विश्वास ठेवत नाहि.
ना ही बायका सत्गुणी असतातच या वर माझा विश्वास आहे. माझ म्हणन एव्हढच आहे, चुक झाल्यावर परत येण्यासाठी घर असाव. तिच.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 5:19 pm | अरुंधती

अगं, तिचं घर हे खर्‍या अर्थानं तिचं कधी होतं? जेव्हा तिला तिच्यामधल्या बर्‍यावाईटासकट स्वीकारलेलं असतं तेव्हा....
पण तिच्यातल्या वाईटाला न स्वीकारता जेव्हा फक्त तिने चांगलंच असायचा आग्रह केला जातो तिथं संपलंच....

मुळात जिथे तिनं फुलवलेल्या घरावर स्त्रीला हक्कही सांगू दिला जात नाही तिथं वेगळं काय दृश्य दिसणार? समाजात अशीच दृश्ये वारंवार दिसतात. अपवाद क्वचित पाहावयास मिळतात. इथे ती स्त्री जामिनावर सुटून आली आहे, शिक्षा भोगली नाही. पण ज्यांना आपल्या दुष्कृत्याची शिक्षा तुरुंगवासात मिळाली आहे अशा स्त्रियांनाही घर पारखे होते.... मग हिचे तर काय??!!!

वाईट ह्याचं वाटतं की ह्या चित्रात काही बदल दिसत नाही!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

रेवती's picture

12 Apr 2010 - 6:20 pm | रेवती

अपर्णा, तुझे म्हणणे समजले. स्त्री कडून फक्त चांगल्या गोष्टींची अपेक्षा केली जाते. तिच्या चुकांना कोर्टात होते त्यापेक्षाही जास्त शिक्षा केली जाते ती घरीच! नवरे कितीही 'दिवटे' असले तरी चालतील पण बायकोने हे असं करावं म्हणजे मोठ्ठा कलंक समजला जातो. बदलत्या 'जमान्यात' ही जुन्या विचारांप्रमाणे वागून त्रास देणारे अनेक लोक आहेत. आपण त्यांच्यापैकी एक नाही यामध्ये आपले कुटुंबीय व 'नशिब' यांचा मोठा वाटा आहे.

रेवती

मदनबाण's picture

13 Apr 2010 - 10:51 am | मदनबाण

त्या रात्री पाऊस होता,हा चित्रपट आठवला.

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama