वेड

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
8 Apr 2010 - 7:40 am

तुझी न माझी जोड न जमली
तुला न त्याची फिकीर कधी ।
तरी मनाची गुप्त कवाडे
परस्परांवर सतत खुली ॥

जागेपणीच्या स्वप्नी म्हण वां
स्वप्नातल्या जागेपणी ।
सतत चाहूल नजरेची त्या
स्पर्श गंध हृदयी ॥

रूप आठवे, आठवते स्मित
अजुनी उघडती नेत्र एकदम ।
जणू धडकला हनुवटीस या
तो खांदा फिरून ॥

धर्म जाणते मी माझा
मनास माझ्या उंबरठा ।

पण,

दोन तपांच्या राखेखाली
अजुनी निखारा धगधगता ॥

करुणप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

8 Apr 2010 - 11:34 am | Dhananjay Borgaonkar

क्या बात है अपर्णातै...झक्कास कविता.

धर्म जाणते मी माझा
मनास माझ्या उंबरठा ।

पण,

दोन तपांच्या राखेखाली
अजुनी निखारा धगधगता ॥

एक नंबर.. =D> =D>

अरुंधती's picture

8 Apr 2010 - 8:15 pm | अरुंधती

दोन तपांच्या राखेखाली
अजुनी निखारा धगधगता ......

व्वा!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

बेसनलाडू's picture

8 Apr 2010 - 10:43 pm | बेसनलाडू

प्रामाणिक, भावपूर्ण कविता आहे. सुंदर! गेयतेच्या दृष्टीने किरकोळ बदल केल्यास आणखी छान वाटेल.
(आस्वादक)बेसनलाडू

प्राजु's picture

8 Apr 2010 - 11:05 pm | प्राजु

दोन तपांच्या राखेखाली
अजुनी निखारा धगधगता ॥

अप्रतिम!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

टारझन's picture

8 Apr 2010 - 11:21 pm | टारझन

फारंच "करूण""प्रेमकाव्य" ! व्वा !

-कविवर्य यकृतनाथ नाकशिकर

फ्रॅक्चर बंड्या's picture

9 Apr 2010 - 2:45 pm | फ्रॅक्चर बंड्या

धर्म जाणते मी माझा
मनास माझ्या उंबरठा ।

पण,

दोन तपांच्या राखेखाली
अजुनी निखारा धगधगता ॥

फारच छान

binarybandya™

शानबा५१२'s picture

9 Apr 2010 - 2:48 pm | शानबा५१२

~X(

-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!

Dipa Patil's picture

16 Apr 2010 - 5:04 pm | Dipa Patil

अप्रतिम