सोनसाजिरी पौणिमा..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
30 Mar 2010 - 5:46 am

पुनवेवरती राग धरूनी, आवस धुसफ़ुसली
काळोखाला घेत साथीला, चंद्रकळा लपविली..

भरात आला खेळ मोडला, अवनी थरथरली
अवकाशाला रिक्त पाहूनी, मूकपणे रडली

उदास झाल्या अवनीसाठी, 'प्रथमा' मग धावली
चंद्रकोर ती नाजूक रेखीव, आकाशी सजली

रोज नव्याने पुन्हा पुन्हा ती, कोर नटू लागली
संध्याराणी तिच्या दर्शने, गोड हसू लागली

नव्या यौवनी चंदाराणी, मोहरूनिया गेली
तिला रिझविण्या सागरलाटही, उचंबळू लागली

लाटांनी मग शुभ्र फ़ुलांची रांगोळी रेखिली
क्षितिजावरती सोनसाजिरी, पौणिमा झळकली

- प्राजु

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मीनल's picture

30 Mar 2010 - 6:03 am | मीनल

पंधरवडा छान रंगवला आहे.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

आपली कविता वाचून पटले की " जे न देखे रवी ते देखे कवी" हे अगदी सार्थ आहे
भुंगा

विसोबा खेचर's picture

30 Mar 2010 - 8:52 am | विसोबा खेचर

सु..रे..ख..!

तात्या.

अविनाशकुलकर्णी's picture

30 Mar 2010 - 11:59 am | अविनाशकुलकर्णी

कल्पना व मांडणी दोनिहि अप्रतिम....

पक्या's picture

30 Mar 2010 - 12:24 pm | पक्या

सुंदर कल्पना. कविता आवडली.
फक्त एक समजले नाही - आवस म्हणजेच काळोख असणे ..त्या दोन एकच गोष्टी आहेत ....तर अवसेने काळोखाला कसे साथीला घेतले...इथे ही कल्पना तेवढी पटली नाही. बाकी सर्व कल्पना सु रे ख.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

मनीषा's picture

30 Mar 2010 - 12:36 pm | मनीषा

लाटांनी मग शुभ्र फ़ुलांची रांगोळी रेखिली
क्षितिजावरती सोनसाजिरी, पौणिमा झळकली
छान आहे कविता ...

जयवी's picture

30 Mar 2010 - 1:31 pm | जयवी

सुरेख कल्पना आहे गं प्राजु :)
पक्या शी सहमत.
"आवस" हा शब्द बरोबर आहे की "अवस" ?

अरुंधती's picture

30 Mar 2010 - 2:10 pm | अरुंधती

<< लाटांनी मग शुभ्र फ़ुलांची रांगोळी रेखिली
क्षितिजावरती सोनसाजिरी, पौणिमा झळकली >>

छान! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्राजु's picture

30 Mar 2010 - 7:10 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार.
:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

शुचि's picture

30 Mar 2010 - 8:36 pm | शुचि

सुंदर कविता
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

sur_nair's picture

31 Mar 2010 - 12:25 am | sur_nair

Technically चंद्राला सूर्याच्या किरणांपासून लपविते आणि अवस घडवते ती आपली 'अवनीच' नाही का? पण poetic license कि काय असतं ते ध्यानात घेता चांगलीच आहे कविता.

बेसनलाडू's picture

31 Mar 2010 - 8:35 am | बेसनलाडू

(कल्पक)बेसनलाडू