भेंडके / फुंडके खास खानदेशी पदार्थ

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
24 Mar 2010 - 9:00 pm

भेंडके किंवा फुंडके किंवा वड्या खानदेशात खास प्रिय आहेत...मी मात्र भेंडकेच म्हणणार...पूर्वी घरी जात्यावर तुरींपासून डाळ पाडत असत, तेव्हा जो डाळीचा चूर पडे त्याचा वापर कसा करावा म्हणून हे भेंडके बनवण्यास सुरुवात झाली...तसे भेंडके बर्‍याच तर्‍हेतर्‍हेने बनतात... साधे कांदा घालून, चिवळीची भाजी (जीला स्थानिक भाषेत चिव्वयी किंवा चिव्वि ची भाजी म्हणतात.) आणि घोळीची भाजी...फॉर अ चेंज माझी आई मेथीची भाजी घालूनही बनवायची...आणि हेल्थ कॉन्शस लोकांसाठी हा वाफवलेला प्रकार आहे म्हणजे अब्सोल्युटली नो ऑइल... :)

तर या भेंडक्यांसाठी काय काय लागते...अंदाजे प्रत्येकी ३-४ पुरतील असे ४ लोकांसाठीचे साहित्य...

२ वाट्या तुरीची डाळीत प्रत्येकी पाव-पाव वाटी चण्याची डाळ, उडीद डाळ आणि मुगाची डाळ घ्यावी किंवा नुसतीच तुरीची डाळ घेतली तरी चालेल. या डाळींना ३-४ तास भिजत घालावे. नंतर नीट निथळून घ्यावे आणि भरड वाटून घ्यावे. वाटताना पाणी घालू नये.
मग जी भाजी घालायची असेल ती २ वाट्या बारीक चिरून घ्यावी...घोळीची भाजी घ्यायची असेल तर १ वाटी घ्यावी, ती जरा बुळचट असते म्हणून...
आता या भेंडक्यांना चटकदार बनवण्यासाठी मिक्सरमध्ये ६-७ हिरव्या किंवा हिरवट-लाल ओल्या मिरच्या, तश्या तिखटपणाप्रमाणे घ्या, कमी झाल्यास वरून ठेचून घालता येतील...तसा थोडा तिखटच छान लागतो + ५-६ लसूण पाकळ्या + १ इंच आले वाटून घ्यावे. यालाही पाण्याशिवायच वाटावे.
१ मध्यम कांदा उभा चिरून...
एका भांड्यात हे मसाला वाटण + वाटलेली डाळ + धणे-जिरे पावडर + मीठ + बारीक चिरलेली भाजी + हळद + उभा चिरलेला कांदा नीट मिक्स करून घ्यावे...मिश्रण खालीलप्रमाणे दिसेल...

मग या पिठाचे हलक्या हाताने गोळे बनवून एका ओलसर कापडावर वाफवण्यासाठी ठेवावे, मी खालीलप्रमाणे एका पातेल्यावर चाळण ठेवून वाफवले होते...वरून झाकण ठेवावे..

अंदाजे २०-२५ मिनीटे वाफवल्यावर ताटात काढून घ्यावे.

आणि कढीसोबत सर्व्ह करावे...खाताना भेंडक्यांना थोडे मोडून त्यांवरून तेल घेतल्यास अजून छान लागते...

जर काही भेंडके उरलेच तर त्यांना दुसर्‍या दिवशी हाताने मोडून घ्यावे आणि मोहरी-हिंगाची फोडणी मारून मस्त कुरकुरीत करून खावे...मस्त म्हणजे मस्तच लागतात.

प्रतिक्रिया

भान's picture

24 Mar 2010 - 9:08 pm | भान

वाफवताना झाकण वरुन लावायचे ना? कि नाहि लावले तरी चालते.
बाकि मस्त दिसतायत भेंडके.नक्कि करुन बघणार.

दिपाली पाटिल's picture

24 Mar 2010 - 9:18 pm | दिपाली पाटिल

अर्रे विसरलेच...झाकण लावावे लागते ना...

दिपाली :)

रेवती's picture

24 Mar 2010 - 9:20 pm | रेवती

मस्त, पौष्टिक पाकृ आहे गं!
या प्रकाराच्या जवळ जाणारा एक प्रकार गुजराथी मैत्रिणीने नुकताच खिलवला होता. त्याला ती मेथी मुठिया म्हणत होती असं वाटतय, नक्की नाव आठवत नाही. मात्र ते गव्हाच्या पिठापासून बनवलेले होते.

रेवती

स्वाती दिनेश's picture

24 Mar 2010 - 9:25 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसताहेत, करुन पहायला हवे.
वाफवल्यावर जर पॅनमध्ये शॅलो फ्राय केले तर मस्त चटकमटक स्टार्टर म्हणून पण होतील ना ?
स्वाती

दिपाली पाटिल's picture

24 Mar 2010 - 9:31 pm | दिपाली पाटिल

हो हो स्वातीताई, थोडया तेलावर शॅलोफ्राय करून थोडे क्रिस्पी मस्तच लागतात...आई उरलेल्या भेंडक्यांना दुसर्‍या दिवशी हाताने मोडून त्यांना मोहरी-हिंगाची फोडणी मारून मस्त कुरकुरीत करून द्यायची...मस्तच लागतात..यासोबत एक वाफवलेली गोडसर पोळीही करतात, तीचं नाव विसरले मी..पण अगदी छान लागतं...

दिपाली :)

चतुरंग's picture

24 Mar 2010 - 10:03 pm | चतुरंग

=P~ पावसाळी हवेत गरमागरम, आलंयुक्त चहाबरोबर सुद्धा तुफान लागतील!! =P~

(आत्ता जेवायच्या वेळी धागा उघडला आणि फसलो! भूक इतकी सपाटून लागली की जेवतंच प्रतिक्रिया देतोय!)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

24 Mar 2010 - 11:29 pm | विसोबा खेचर

खल्लास.. !

पिंगू's picture

25 Mar 2010 - 12:48 am | पिंगू

मलाही आवडतात भेंडोळी खायला. त्यात अळुची पाने घालूनसुद्धा करतात......

प्राजु's picture

25 Mar 2010 - 1:07 am | प्राजु

जबरदस्त!!!
करेन आता घरी.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

खादाड_बोका's picture

25 Mar 2010 - 3:01 am | खादाड_बोका

छान दिसतोय ....आजच करतो :D

मला तर स्वप्नातही भुक लागते....

धनंजय's picture

25 Mar 2010 - 4:21 am | धनंजय

मस्त आणि पौष्टिक.

एक नेहमीचा प्रश्न - (कैरीची डाळ वगैरे करताना येणारा नेहमीचा आडथळा)

भिजवलेली डाळ मिक्समध्ये बिनपाण्याची वाटायला घेतली तर जमत नाही. (मिक्सरचे चक्र खालच्याखाली फिरत राहाते, पण वरची डाळ ढिम्म हलत नाही आणि मुळीच वाटली जात नाही.) पण पाणी टाकले तर वाटण थलथलीत होते.

लहानपणी घरी होता तसा पाटा-वरवंटा किंवा रगडा माझ्यापाशी नाही. खलबत्त्यात वाटण कुटायचे तर तेसुद्धा सोपे नाही.

हल्लीच्या स्वयंपाकघरामध्ये असे ओले-सुके वाटण करण्यासाठी काही विशेष युक्ती?

प्राजु's picture

25 Mar 2010 - 5:59 am | प्राजु

हेच..!
मलाही हाच प्रॉब्लेम येत होता. मी ऑयस्टर कंपनीचा छोटा चॉपर आणला आहे. दाण्याचं कूट, वाटल्या डाळीसाठी लागणारी भरड डाळ, कोबी/फ्लॉवर च्या पराठ्यासाठी लागणारा कोबी/फ्लॉवर, हे जिन्नस तरी छान वाटले जातात..भरड्सर असे. वॉलमार्ट मध्ये ९ डॉलर ला मिळाला.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

बेसनलाडू's picture

25 Mar 2010 - 6:02 am | बेसनलाडू

कुठे किती किमतीला मिळेल ते सांगितलेत हे बरे. मोठ्या मिक्सरच्या भांड्यात डाळी, दाण्याचे कूट असे सुके वाटण करण्यात हाल होतात. (त्यामुळे कूट भारतातून घरून आयात करतो ;-) ) मोजकेच कांदा-खोबर्‍याचे वाटण, मसाल्याचे वाटण करायचे झाले तर तीच गत! तेव्हा चॉपर घेऊन येणे उत्तम!
(आयातकार)बेसनलाडू

प्रियाली's picture

25 Mar 2010 - 4:33 pm | प्रियाली

बिनपाण्याचे काही वाटायचे असेल तर फूड प्रोसेसर कामी येतो. माझ्या ऑस्टरायझरच्या मिक्सर सोबत फूड प्रोसेसर आहे, तो मला बिनपाण्याची डाळ वाटण्याच्या कामी येतो पण भरड वाटले जाते.

ऑस्टरायझरच्या मिक्सरवर बसेल असे लहान चटणीचे भांडेही इंडियन स्टोअरमध्ये मिळते. यात ओली-सुकी चटणी, भाजी वगैरेसाठी लागणारा मसाला (आयत्या वेळेचे आणि कमी वाटण) वाटण्यासाठी या भांड्याचा उपयोग होतो.

तसेच, ग्रांईंडरही विकत मिळतात. इडली-डोसे यांची पीठे बेतात पाणी घालून करायची असल्यास कामी येतो. यांत वाटलेले सर्व मुलायम होते मात्र सुके वाटण करण्यास योग्य नाही.

असो.

बाकी, पाककृती मस्तच आहे. कढीबरोबर करून बघायलाच हवी. :)

धनंजय's picture

25 Mar 2010 - 9:45 pm | धनंजय

घरी फूड-प्रोसेसर आहे, पण तो भारी नाही. आता तो वापरून बघतो.
मग (स्वस्त म्हणून) चॉपर विकत आणून प्रयोग करून बघतो.

वाहीदा's picture

25 Mar 2010 - 3:55 pm | वाहीदा

पण घोळीची भाजी म्हणजे कुठली भाजी ??
मुठीया पण असाच असतो ना ?
अवांतर : डाळी खुप महागल्या ग हल्ल्ली अन यात तर तुरीची डाळ, चण्याची डाळ, उडीद डाळ आणि मुगाची डाळ सगळ्याच आल्या #:S

असो पण रेसिपी लई झकास :-)

~ वाहीदा

दिपाली पाटिल's picture

26 Mar 2010 - 1:15 pm | दिपाली पाटिल

वहिदा..इकडे घोळीची भाजी विकत मिळत नाही बहुतेक...मुठीया प्रकार "वाफवणे" सोडता अगदी वेगळा आहे...बाकी महागाई वाढली आहे हे खरे, आम्हीही हे वन्स इन अ ब्ल्यु मून करतो...आता भारतात आल्याने बनवले होते...त्यातल्या त्यात बरेच स्टफी असतात म्हणजे कमी केले तरी चालतील...:)

दिपाली :)

वाहीदा's picture

26 Mar 2010 - 2:12 pm | वाहीदा

त्यातल्या त्यात बरेच स्टफी असतात म्हणजे कमी केले तरी चालतील...
हे बाकी खास !
एवन !
थोडेसेच पण करून नक्क्की बघणार अन खाणारपण एकटी बसून :-)
(अवांतर - चव जमली तरच मैत्रिणींना पण देणार )

~ वाहीदा

दिपाली पाटिल's picture

26 Mar 2010 - 2:24 pm | दिपाली पाटिल

चव जमेलच की...

दिपाली :)

परिकथेतील राजकुमार's picture

25 Mar 2010 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार

फर्मास हो एकदम.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अरुंधती's picture

25 Mar 2010 - 9:35 pm | अरुंधती

मस्त गं बायो! मी मागे एकदा 'फुणके' ह्या नावाने अशीच पा.कृ. वाचली होती [एवढी झणझणीत नव्हती] व करून पाहिली होती. मधल्या वेळी खायला, स्टार्टर म्हणून, जेवणात भजी/वडे ऐवजी हा वाफवून केलेला प्रकार अतिशय टेस्टी, पोटभरणीचा व डायट कॉन्शस लोकांनाही छानच! आता पुनश्च तू दिल्याप्रमाणे ही पा. कृ. करून पाहाण्यात येईल.
प्रश्नः ह्यात आपण पालक, घेवडा, गाजर, स्वीट कॉर्न भाज्या घालू शकतो का? तसे केल्यास आणि चव फारशी बदलणार नसल्यास अजूनच पौष्टिक! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

26 Mar 2010 - 1:18 pm | दिपाली पाटिल

धन्यवाद अरूंधती,
यात मी तरी अजूनपर्यंत या ३ भाज्याच (चिव्वयी, घोळ आणि मेथी आणि कांदा)टाकल्या आहेत...तुम्ही अगदी थोड्या पिठात ट्राय करुन बघा आणि सांगा मला पण... :)

दिपाली :)

मी सुध्धा ही पाककृती मिसळपावर टाकली होती.. फुंदके.... (खांदेशी भाषेत भेंडके) आणि मानमोडे या नावाने.. पण मला एवढा प्रतिसाद नव्हता मिळाला.. :(

लिंकः http://www.misalpav.com/node/6276

धनंजय's picture

31 Mar 2010 - 4:23 am | धनंजय

"आधी डोळ्यांनी, मग जिभेने" आपण पाककृती चाखतो.
सुरेख चित्र असले तर पाककृती चाखल्याचा थोडासा आनंद लगेच होतो.

अशाच चांगल्या पाककृती देत राहावे, आणि त्याची चित्रेसुद्धा द्यावीत, ही विनंती.

मिलिन्द झाल्टे's picture

11 Apr 2010 - 12:54 pm | मिलिन्द झाल्टे

तसा आइट्म झकास आज्च्या घडिला वेळ कुणा कडे आहे. आजचा जमाना ईन्स्ट्चा.

आज्च्या घडिला वेळ कुणा कडे आहे

आवड असली कि, सवड मिळते हो ...

आपल्या दिपाली ला कशी मिळाली ... तश्शीच :-)
~ वाहीदा

भारतात हल्ली अमेरिके मध्ये चालू शकतील अशा वोल्टेज चे मिक्सर ग्राईंडर मिळतात . आमच्याकडे तसाच आहे. त्यात ४ वेगळी भांडी आहेत आणी प्रत्येक भांडयातील ब्लेड वेगळे आहे. ओले / सुके वाटण , जूस आणि इतर पातंळ पदार्थ आणि चटणी साठी अशी ४ भांडी आहेत. त्यात वर धनंजय यांनी विचारल्याप्रमाणे कमी पाणी लागणारे पदार्थ छान वाटले जातात.
मी पुण्यातून भांडेआळी मधून बॉस या कंपनीचा मिक्सर २००९मधे घेतला आहे. किंमत २६०० कि काय अशीच होती. दुकानदाराला मिकसर अमेरिकेला न्यायचा आहे असे सांगायचे .