ज्येष्ठ आषाढ

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
23 Mar 2010 - 12:32 am

ज्येष्ठ आषाढ
.....
कधि बसतो
लगबग उडतो
एक थवा
.
थयथयते
मग ना दिसते
वीज लता
.
दुमदुमतो
कधि गुरगुरतो
ढग काळा
.
थबथबली
अवजड करडी
स्तब्ध हवा
.....

कविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

23 Mar 2010 - 12:42 am | शुचि

मस्त अनुप्रास साधलाय कवितेत प्रत्येक कडव्यात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

विसोबा खेचर's picture

23 Mar 2010 - 12:53 am | विसोबा खेचर

खास धन्याष्टाईल कविता.. लै भारी! :)

तात्या.

sur_nair's picture

23 Mar 2010 - 1:27 am | sur_nair

वा. एवढ्याशा शब्दात किती सुंदर चित्र रंगवलंय.

राजेश घासकडवी's picture

23 Mar 2010 - 1:51 am | राजेश घासकडवी

झाले.

चतुरंग's picture

23 Mar 2010 - 2:08 am | चतुरंग

अल्पाक्षरी, प्रभावी काव्य!!

चतुरंग

प्राजु's picture

23 Mar 2010 - 2:25 am | प्राजु

थयथयते
मग ना दिसते
वीज लता

छान.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

बेसनलाडू's picture

23 Mar 2010 - 3:36 am | बेसनलाडू

हायकूच्या अंगाने जाणारी सुंदर, चित्रदर्शी कविता. आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2010 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हायकूच्या अंगाने जाणारी सुंदर, चित्रदर्शी कविता. आवडली.

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

23 Mar 2010 - 3:49 am | चित्रा

पावसाळी कुंद हवेत काहीतरी अस्पष्ट घडायची वाट पाहिली जात आहे असे वाटले.
घराच्या खिडकीतून बाहेर बघताना वाटावे तसे काही तरी वाटले.

नंदू's picture

23 Mar 2010 - 4:36 am | नंदू

चित्रदर्शी , साक्षात्कारी. असेच म्हणतो.

नंदू

नंदन's picture

23 Mar 2010 - 5:53 am | नंदन

अल्पाक्षरी, नादमय कविता.

थबथबली...ओथंबून खाली आली
जलदाली...मज दिसली सायंकाली
...
मधुमोती... भूवर भरभर ओती

-- या शब्दांची आणि लयीची आठवण करून देणारी.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Mar 2010 - 6:28 am | अक्षय पुर्णपात्रे

'थबथबली...' बालकवींच्या याच ओळी (पाठ्यपुस्तकात ही कविता होती.) आठवल्या होत्या. पुढच्या ओळी तर अजुनही सुंदर.

रंगही ते नच येती वर्णायाते
सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता

कृष्ण कुणी काजळीच्या शिखरावाणी
गोकर्णी मिश्र जांभळे तसे कुणी

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Mar 2010 - 12:05 am | अक्षय पुर्णपात्रे

अतिश सुरेख. स्फुरलेले अतिसंक्षिप्त प्रेरितक खाली देत आहे.

अस्वस्थ
पाखरे
एकत्र

सरपटे
लख्ख
लकीर

धुसफूसे
लवचिक
पोकळ

झरते
गर्भित
दळदार

(पाखरे व दळदार धनंजयकडून साभार)

सुवर्णमयी's picture

23 Mar 2010 - 8:01 pm | सुवर्णमयी

चित्रदर्शी कविता. आवडली. रूपक म्हणूनही कविता चांगली झाली आहे.कविता वाचल्यावर काही मुद्दे मांडावेसे वाटले ते लिहिते आहे.

कवितेत आलेली क्रियापदे लय साधायला मदत करत असली तरी त्यांचे अर्थ अधिक तासून शेवटचे कडवे जास्त प्रभावी होऊ शकेल काय असे मनात आले.

जी वातावरण निर्मीती केली आहे त्यात हवा स्तब्ध असेल असे वाटत नाही.
निव्वळ शब्दार्थाने घेता- वीजेचा गडगडाट, ढगांचा कडकडाट असतांना वारा सुटला असेल असे वाटते.

जे सांगायचे आहे त्याकरता शेवटच्या कडव्यात दोन दोन क्रियापदे आणि नंतर कर्ता अशा क्रम घेता आला असता. असेच करावे असा नियम नाही. एक पॅटर्न तयार करून तो मोडणे ही सुद्धा एक शैली आहे.पण त्याची गरज मला इथे जाणवली नाही..हा क्रम मोडण्यामागचे कारण कळू शकेल का?

करडी हवा म्हणजे सुद्धा ढग असे कवीच्या मनात असेल तरच कवितेचे शेवटचे कडवे योग्य. रूपकाच्या अंगाने मनातले भाव सांगण्याकरता शेवटचे कडवे योग्य असले तरी मला कविता अपूर्ण वाटली. ह्या निराशेचा, अपूर्णतेचा अनुभव वाचकांना देणे हा सुद्धा कवीचा उद्देश असू शकतो. त्यात काही गैर नाही.

कवितेवर अधिक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.
सोनाली

धनंजय's picture

23 Mar 2010 - 11:09 pm | धनंजय

वरील प्रश्न आणि विचार कवितेचा कच्चा मुसुदा समोर असताना माझ्या मनात आले होते.

मात्र त्या प्रश्नांचे उत्तर काय आहे याबद्दल मी अधिक काही सांगितले म्हणजे अर्थाला मर्यादा पडतील.

मात्र कच्च्या मसुद्यात प्रश्न मनात होते, असे तरी मी आता का सांगितो? कवितेच्या प्रकाशित आवृत्तीमध्ये "काही उत्तरे दिलेली असतील, असतील का?", "काही विरोध विरोधाभास असतील, असतील का?" असे विचार वाचकाच्या मनात येणे अभिप्रेत आहे. हे सांगायचे होते.

राजेश घासकडवी's picture

25 Mar 2010 - 12:46 pm | राजेश घासकडवी

मात्र त्या प्रश्नांचे उत्तर काय आहे याबद्दल मी अधिक काही सांगितले म्हणजे अर्थाला मर्यादा पडतील.

एकदा कवीने कविता लिहिली (व इतरांना दाखवली) की तिच्या अर्थावर इतर कोणा रसग्राहकाइतकाच कवीचा अधिकार राहातो. त्यामुळे 'मूळ लेखन करताना कवीच्या मनात काय होतं' याचं उत्तर अर्थाला मर्यादा आणू शकत नाही.

तेव्हा खुशाल उत्तरं द्या. इतर रसग्राहक ती पटतात की नाहीत हे ठरवतील.

राजेश

हा जरा गुंतागुंतीचा मुद्दा आहे. कवीला स्वतःच्या कवितेचे रसग्रहण करण्यात, लोकांकडून रसग्रहण होण्यात खूप ममत्व असणार या अर्थाने "अधिकार जास्त आहे". हेसुद्धा खरे. मात्र कवीला दुसरे कोणाचेही रसग्रहण "चूक" ठरवण्याचा खास अधिकार नाही.

त्या अर्थाने अन्य रसग्राहकाइतकाच अधिकार हे बरोबर.

जर मी रसग्रहण दिले, तर "कवीचा निर्णय प्रमाण" या लोकप्रवादाला भुलून कोण्या वाचकाने दुसरे कुठलेही रसग्रहण बाद करू नये.

वेगळ्या आयडीखाली माझे मत दिले पाहिजे... असा विचार करतो आहे. (अजून तरी वेगळा आयडी घेतलेला नाही, ही गोची आहे.)

त्या आयडीने प्रश्नाचे दिलेले उत्तर म्हणजे "अनेक शक्य उत्तरांपैकी एक पर्याय" असे स्पष्ट होईल.

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Mar 2010 - 11:09 pm | अक्षय पुर्णपात्रे

जी वातावरण निर्मीती केली आहे त्यात हवा स्तब्ध असेल असे वाटत नाही.

पावसाची चाहूल लागून पक्षीही अस्वस्थ झालेले आहेत. सोसाट्याच्या वार्‍यात पक्ष्यांची ऊठबस दिसणे कठिण वाटते. काही क्षण हवा स्तब्ध असल्याचे अशा वातावरणात विरोधी वाटत नाहीत. पाऊसही जोरात कोसळत असल्यासारखा नाही - तर नुकताच सुरू झाला असावा. पावसाची चाहूल ते पाऊस पडू लागणे यातील काही क्षणांवर वरील कविता चिंतन (meditation) करत असल्यासारखे वाटते.
____________________________________
आयुधे येण्यापुर्वी निसर्ग आटलेला वाटला
बायको येण्यापुर्वी स्वातंत्र्य जाचक वाटले

सुवर्णमयी's picture

23 Mar 2010 - 11:28 pm | सुवर्णमयी

सोसाट्याच्या वार्‍यात पक्ष्यांची ऊठबस दिसणे कठिण वाटते
:) बरोबर आहे . वारा त्यांनतर सुटू शकतो..
पावसाची चाहूल ते पाऊस पडू लागणे यातील काही क्षणांवर वरील कविता चिंतन (meditation) करत असल्यासारखे वाटते.
हे मान्य आहे.
असो . या कवितेवर विचार व्यक्त झाले ते महत्त्वाचे. एखादा शब्द, एखादा विचार प्रत्येकाला पटावा अशी अपेक्षा लिहितांना / वाचतांना नसतेच. फक्त त्यावर कसा/किती पद्धतीने विचार होऊ शकतो ते तपासणे मला आवडते.

घाटावरचे भट's picture

23 Mar 2010 - 11:42 pm | घाटावरचे भट

वा!! कवितेतलं काही कळत नसलं तरी लय आवडली. अलगद की कायतरी वाटते बॉ!!

शुचि's picture

24 Mar 2010 - 9:58 pm | शुचि

हा हा तरल : ) म्हणायचय का तुम्हाला? हाऊ स्वीट : )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

चतुरंग's picture

24 Mar 2010 - 10:07 pm | चतुरंग

हे भट घाटावरचे असल्याने तरलचं अलगद झालं असावं! ;)

(हळुवार)चतुरंग

श्रावण मोडक's picture

24 Mar 2010 - 9:49 pm | श्रावण मोडक

कविता आवडली. अल्पचर्चाही चांगली!