मजेशीर वाक्ये

सचिन's picture
सचिन in काथ्याकूट
17 Mar 2008 - 11:12 pm
गाभा: 

"मनस्वी" यांच्या "मजेशीर नावे" मधे खूपच मजा आली...
तशीच काही मजेशीर वाक्ये :

१. नातू, त्या ना. तु. नातूंचा नातू ना तू ?
२. पण जी पणजीला राहाते, ती पणजी माझी पणजी नाही !

किंवा उलटसुलट वाली
१. तो गजानन जागतो
२. तो कवी डालडा विकतो
३. तो कवी सामोसा विकतो
४. भाऊ तळ्यात उभा
५. भाऊ शिपायापाशी उभा
६. रामाला भाला मारा
७. चिमा काय कामाची

अशी अनेक आपल्याला माहीत असतील.
संग्रह करूया का ?

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

17 Mar 2008 - 11:45 pm | देवदत्त

ती होडी जाडी होती...

ठणठणपाळ's picture

18 Mar 2008 - 10:14 pm | ठणठणपाळ

कवींवर डालडा आणि सामोसे विकायची वेळ यावी ना?
नमस्कार मंडळी,
मी नव्यानेच दाखल झालो आहे 'मिसळपाव' वर.
मराठी टायपींग फार अवघड असतं असं दिसतय.

इनोबा म्हणे's picture

18 Mar 2008 - 1:49 am | इनोबा म्हणे

चिमा काय कामाची

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Mar 2008 - 2:51 am | llपुण्याचे पेशवेll

चिमा काय कामाची आहे की रे आधीच वरती.
पुण्याचे पेशवे

इनोबा म्हणे's picture

18 Mar 2008 - 3:11 am | इनोबा म्हणे

च्यायला चिमा लईच कामाची दिसतीय.
असो! ल्हानपणापासून हे डोस्क्यात होतं.पण त्याच्यायला ते आधीच वर लिव्हून ठिवलेलं म्या वाचलंच न्हाय.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

वाक्ये वर आली.

म्ज्जा आली. धन्यवाद.

राजमुद्रा's picture

18 Mar 2008 - 10:14 am | राजमुद्रा

तसंच मलयाळम् चे स्पेलिंग
Malayalam

राजमुद्रा :)

सौरभ's picture

18 Mar 2008 - 4:59 pm | सौरभ

न व जि व न

विजुभाऊ's picture

18 Mar 2008 - 10:18 am | विजुभाऊ

१हे वाक्य वाचू नये. (वाचणारा गाढव आहे )
२वाईट वाटते की या वाक्याची सुरुवात चांगल्या शब्दाने नाही झाली नाही
*****स्वतःसंबंधी माहीती सांगणारी वाक्ये मराठीत काय कोणत्याही भाषेत फार नसतात.

मनस्वी's picture

18 Mar 2008 - 5:54 pm | मनस्वी

ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला.

विसोबा खेचर's picture

18 Mar 2008 - 6:35 pm | विसोबा खेचर

ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला.

हा हा हा! हे वाक्य बाकी लै भारी आहे! :)

आपला,
तात्या ढमढेरे.

मनस्वी's picture

18 Mar 2008 - 5:57 pm | मनस्वी

काणेकाकूनी काणेकाकांच्या काळ्या कपाटातील कोर्टाचे कामाचे कागद काळ्या कात्रीने कचाकचा कापले, कोपर्‍यातल्या कचरापेटीत कोंबले, काका काकूवर कावले.

विवेकवि's picture

19 Mar 2008 - 1:28 pm | विवेकवि

ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला.

विवेक वि.

बन्ड्या's picture

19 Mar 2008 - 2:47 pm | बन्ड्या

मामीने मामाचा मोबाईल मोडला मग मामाने मामीच्या मांडीवर मापटे मारले

..... (मामाचा भाचा ) मानुप्रासित बंड्या

विसोबा खेचर's picture

20 Mar 2008 - 6:19 pm | विसोबा खेचर

मामीने मामाचा मोबाईल मोडला मग मामाने मामीच्या मांडीवर मापटे मारले

हा हा! हे वाक्य लै भारी आहे! :)

आपला,
अनुष्कामामीचा तात्यामामा!

सुधीर कांदळकर's picture

19 Mar 2008 - 10:38 pm | सुधीर कांदळकर

पिस्तुलाच्या पाचपन्नास पचविल्या परंतु परसाकडच्या पाचच पचविण्याची पंचाईत पडली.

पलाला पलाला तो केलीच्या बुंध्यात जाऊन लपला.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

सभ्य इसम's picture

20 Mar 2008 - 10:07 pm | सभ्य इसम

GlaxoSmithKline वरळी HO ला असताना, तळमजल्यावर नेहमी एक पाटी वाचायचो...
इलेक्ट्रीक अर्थ काढू नये.......(Do not remove Electric Earth चे मराठीत भाषांतर)..

लोक कशाचे काय अर्थ काढतील याचा नेम नाही...

प्रा सुरेश खेडकर's picture

20 Mar 2008 - 11:27 pm | प्रा सुरेश खेडकर

मोहित्यांचा केतन यांस, मस्त आहे.

इलेक्ट्रीक अर्थ काढू नये.......नाही तर अनर्थ होईल
आपला
इलेक्ट्रीकल इंजिनिअर

प्रा सुरेश खेडकर's picture

20 Mar 2008 - 11:30 pm | प्रा सुरेश खेडकर

त्याच्या कोटी कडे लक्ष देऊ नकोस.