लोकसत्ता मधील हा लेख मिळेल का कोणाकडे?

भारद्वाज's picture
भारद्वाज in जनातलं, मनातलं
10 Mar 2010 - 4:01 pm

नमस्कार मिपाकरांनो :H :-H :wave:,
माझे, माझ्या मित्रांसोबत, 'हिंदी ही राष्ट्र भाषा आहे की नाही' यावरून वाद चालू आहेत. हिंदी राष्ट्रभाषा नाही असे माझे म्हणणे आहे. मात्र माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ माझ्याकडे काही नाही. त्यामुळे हिरीरीने मत मांडता येत नाहीये.

मला आठवतेय की लोकसत्तेत काही महिन्यांपूर्वी (साधारणतः त्या अबू आझमीचे शपथविधी प्रकरण घडले त्यावेळी) सदर लेख आला होता ज्यात "हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून कुठेही उल्लेख नाही" असा मुद्दा फार व्यवस्थित मांडला होता. दुर्दैवाने मला लेखाचे आणि लेखकाचे नाव आठवत नाहीये. लेखक बहुदा सुनील चावके असावेत. हा लेख/कात्रण कोणाकडे असल्यास कृपया मला मिळेल का? सोबत e-mail id देत आहे.
कळावे.

आपला,
लंबू टांग
(मिपाचा नवसदस्य)
जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी कळवावे |
शहाणे करून सोडावे | सकल जग ||

sagarisai@gmail.com

भाषाचौकशी

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

10 Mar 2010 - 4:18 pm | प्रमोद देव

:)

भारद्वाज's picture

10 Mar 2010 - 7:55 pm | भारद्वाज

इमेल मिळाला. मनःपूर्वक धन्यवाद. आपला आभारी आहे.
कळावे.

आपला,
लंबू टांग
(मिपाचा नवसदस्य)
जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी कळवावे |
शहाणे करून सोडावे | सकल जग ||

चिरोटा's picture

10 Mar 2010 - 5:22 pm | चिरोटा

मिपावर चर्चा झाली होती. घटनेत राष्ट्रीय भाषा असा उल्लेख नाही. 'official language'of correspondence असा उल्लेख आहे.
अवांतर- ९०च्या दशकात मुलायम सिंग यादव यांनी केरळचे तत्कालिन मुख्यमंत्री ई.कें नयनार यांना हिंदीत पत्र पाठवले होतें. नयनार ह्यांनी पत्राला उत्तर मल्याळममध्ये पाठवले होते.!!
भेंडी
P = NP

भारद्वाज's picture

10 Mar 2010 - 8:17 pm | भारद्वाज

चर्चा वाचली. माहितीत भर पडली.
मनःपूर्वक धन्यवाद.

आपला,
लंबू टांग
(मिपाचा नवसदस्य)
जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी कळवावे |
शहाणे करून सोडावे | सकल जग ||

भारद्वाज's picture

10 Mar 2010 - 8:12 pm | भारद्वाज

चर्चा वाचली. माहितीत भर पडली.
मनःपूर्वक धन्यवाद.

आपला,
लंबू टांग
(मिपाचा नवसदस्य)
जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी कळवावे |
शहाणे करून सोडावे | सकल जग ||

प्रकाश घाटपांडे's picture

11 Mar 2010 - 8:27 am | प्रकाश घाटपांडे

आपल्याला अमृतमंथन वर बरीच माहिती मिळेल. तुम्हाला लोकसत्तेतील सलील कुलकर्णी यांचा याविषयावरील हिंदी ही राष्ट्रभाषा- एक चकवा हा लेख पहा. तुम्हाला कदाचित तोच लेख म्हणायचा असावा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

भारद्वाज's picture

17 Mar 2010 - 6:34 pm | भारद्वाज

हो बरोबर. मला आपण म्हणत असलेलाच लेख मिळाला आहे इमेल मधून.

प्रिय श्री० भारद्वाज व इतर मित्रांनो,

सप्रेम नमस्कार.

श्री० भारद्वाज ह्यांना अभिप्रेत असलेला लेख श्री० प्रकाश घाटपांडे ह्यांनी सुचविल्याप्रमाणे श्री० सलील कुळकर्णी ह्यांचा लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेला "हिंदी रा्ष्ट्रभाषा? एक चकवा !!" हा लेख असू शकतो. प्रस्तुत लेख श्री० घाटपांडे ह्यांनी सादर केलेल्या दुव्यावर (सोयीसाठी खाली पुन्हा दिला आहे) उपलब्ध आहे.

त्याच अनुदिनीवर इतरही काही ह्याच विषयासंबंधित इतरही काही असे लेख आहेत की जे आपल्याला आवडतील.

भारताच्या केंद्रसरकारच्या गृह खात्याने माहिती अधिकाराखाली अधिकृतपणे दिलेले "भारताच्या राज्यघटनेमध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याची तरतूद कुठेही नाही" असा दिलेला स्पष्ट लेखी निर्वाळा खालील दुव्यावर वाचता येईल. (त्याच्या प्रती काढून हिंदीचा उपयोग करून मराठीला दडपणार्‍या लोकांना सादर भेट द्या.)

हिंदी राष्ट्रभाषेच्या चकव्यासंबंधीच्या लेखाची इंग्रजीतील भाषांतरित आवृत्ती खालील दुव्यावर उपलब्ध आहे. लेख आवडला व त्यातील मते पटली तर ह्या लेखाच्या प्रती सर्व अमराठी मित्रांना (व मराठी न वाचणार्‍या मराठी मित्रांना) अवश्य अग्रेषित करा.

वरील लेखातील पार्श्वभूमीवर मराठी माणसापुढील विविध क्षेत्रांतील आव्हाने व त्यासाठी आपण सामान्यजन काय करू शकतो याबद्दल विचारांस चालना देणारा (लोकसत्तेत प्रसिद्ध झालेला लेख) खालील दुव्यावर वाचू शकता.

वरीलप्रमाणेच विविध लेखकांचे "मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे" या विषयावरील इतरही लेख या अनुदिनीवर वाचायला मिळतील. नजर घाला. न आवडले तर दुर्लक्ष करा. आवडले तर आपण वाचा व समविचारी, मराठीप्रेमी मित्रमंडळींना अग्रेषित करा.

आभार.

क०लो०अ०

- अमृतयात्री

सप्रेम नमस्कार.

माझ्या वरील टिपणातील सर्वच दुवे गहाळ झालेले दिसून येत आहेत. काय चुकले असावे?

कृपया मदत करावी.

आभारी आहे.

- अमृतयात्री

डावखुरा's picture

17 Mar 2010 - 7:04 pm | डावखुरा

क्रुपया मलाही दुवा पाठ्वावा मी पण तो वाचु ईच्छितो......"राजे!"