रातराणी

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
8 Mar 2010 - 1:42 pm

रातराणी

सूर्य अस्ताला गेल्यावर,
अंधाराच्या साम्राज्यात,
प्राणिमात्र विसावतात
आपापल्या खुराड्यात !
राऊळे होतात रीती,
अस्तित्व नाकारुन परमेशाचे.
तुझ्या लालदिव्याच्या माडीचा
आसमंत मात्र उजळतो लख्ख,
अन रस्ते ओसंडून वाहू लागतात
अंधाराचे साम्राज्य नाकारुन !
रात्र मंदावतांना,
अंधाराच्या साम्राज्यात,
तू घेतला असतो वसा.
अखंड सौभाग्यवतिचा,
रातराणीचा ,
अनुभवण्या बलात्कार हक्कांचे,
टिचभर पोटाच्या खळग्यासाठी !

असहाय्य वृद्ध मायबाप,
अन तान्हुल्याचा आक्रोश,
आदळत असतो कानावर,
करकरत्या खाटेवरच्या
कोंदट सम्भोगात ! ! !

निरंजन वहालेकर
अलीबाग

करुणकविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

8 Mar 2010 - 1:51 pm | विसोबा खेचर

तू घेतला असतो वसा.
अखंड सौभाग्यवतिचा,
रातराणीचा ,
अनुभवन्या बलात्कार हक्कांचे,
टिचभर पोटाच्या खलग्यासाठी !

रौशनीची चाळ आठवली..!

आसहाय वृध्ह मायबाप,
अन तान्हुल्याचा आक्रोश,
आदलत असतो कानावर,
करकरत्या खाटेवरच्या
कोंदट सम्भोगात ! ! !

जबरा कविता..!

तात्या.

निरन्जन वहालेकर's picture

13 Mar 2010 - 6:57 am | निरन्जन वहालेकर

पहिलाच प्रयत्न होता मिपा वर लिहिण्याचा. पण तात्या तुम्ही जी दाद दिली त्यात सर्व काही अभिप्रेत आहे. धन्यवाद् तात्या .
जबरा ! ! !.
फ़क्त तीनच शब्द.पण पानभर अभिप्राय वाचून जे मिळाले नसते त्यापेक्षा जास्त आनंद व समाधान ह्या तीनच अर्थांनी ओतप्रोत भरलेल्या शब्दानी मिळाले. जबरा धन्यवाद् तात्या ! !
ह्या शब्दांची उचलेगिरी करून चारोल्यांचे संपादन करण्याची सम्मति असावी पुन्हा एकदा आभार.
निरन्जन .

मेघवेडा's picture

8 Mar 2010 - 2:59 pm | मेघवेडा

जबरदस्त!!

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

राजेश घासकडवी's picture

8 Mar 2010 - 3:16 pm | राजेश घासकडवी

राउले होतात रीती,
अस्तित्व नाकारुन परमेशाचे.

तू घेतला असतो वसा.
अखंड सौभाग्यवतिचा,

करकरत्या खाटेवरच्या

यातलं परमेश नाकारणं, वसा (स्वीकारणं), आणि करकरत्या खाटेवर (अंधार नाकारणाऱ्याकडून) सहन करणं....सगळे नाकारणारे व हीच सनातन स्वीकारणारी...

प्रभावी आहे.

रातराणीचं रूपक अजून खुलवता आलं असतं असं वाटलं.
रोज रात्री फुलणाऱ्या नववधूच्या बेगडी शृंगाराचा सुगंध वगैरे...

राजेश

sur_nair's picture

9 Mar 2010 - 7:25 am | sur_nair

A poem begins with a lump in the throat. - Robert Frost

तुमची कविता वाचून असाच काहीसा अनुभव आला.

प्राजु's picture

9 Mar 2010 - 7:55 am | प्राजु

बापरे!! जबरदस्त!!

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/