मैत्री

गुपचुप's picture
गुपचुप in जे न देखे रवी...
1 Mar 2010 - 4:01 pm

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!

करुणकविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

1 Mar 2010 - 4:11 pm | शुचि

छान आहे. मस्तच. फार आवडली.

>>गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..>>

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मेघवेडा's picture

1 Mar 2010 - 6:45 pm | मेघवेडा

आवडली कविता. खरंच खूप छान व्यक्त केल्यात भावना!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

पक्या's picture

2 Mar 2010 - 4:33 am | पक्या

छान कविता.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

मदनबाण's picture

2 Mar 2010 - 6:28 am | मदनबाण

सुंदर कविता... :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

मस्तानी's picture

2 Mar 2010 - 10:47 pm | मस्तानी

अगदी आजच एक ढकल ई-पत्रा मध्ये हीच कविता वाचली ... त्यात चार वाक्य आणखीही लिहिली होती शेवटी पण कवीचे नाव मात्र नव्हते ... सहज म्हणून ते इथे देते आहे ...