कसा दिस आला.....{verry sad material}

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in जे न देखे रवी...
20 Feb 2010 - 8:29 pm

कसा दिस आला...............

कसा दिस आला असा माझ्या या नशिबाचा
प्रीतीनेच अंत केला माझ्या या प्रेमाचा

आता माझे जीवन हे विषण्ण विराण हे
मनामध्ये सुडाचे जागले थैमान हे
कुणाला हे सांगू आणि समजाऊ कोणाला
प्रीतीनेच अंत केला ..........
कसा दिस आला ..............

तेव्हा तुझे स्मित हास्य नवखे नवीन से
डोळे दोन्ही माझ्यावर नाव ते मनी असे
कसे तोडीत गेली तू माझ्या या मनाला
प्रीतीनेच अंत केला ..............
कसा दिस आला ...............

आता मी न जागतो न संपते हि रात्र हि
पुन्हा पुन्हा स्वप्नीची माया मनी येत जाई
आता प्रेम मन कधी करेना कुणाला
प्रीतीनेच अंत केला..........
कसा दिस आला.............

दुरुनी आता पाहतो मी आशा काही राहिली
नेहमी अशा प्रीती ची हि भीती मनी जागली
सोडावे हे जीवन आणि संपवावे स्वताला
प्रीतीनेच अंत केला ...............
कस दिस आला
प्रीतीनेच अंत केला .........................

-मंगेश पावसकर

mgcmangeshpaw@gmail.com

करुणकला

प्रतिक्रिया

गजा गाजरे's picture

20 Feb 2010 - 11:29 pm | गजा गाजरे

दुरुनी आता पाहतो मी आशा काही राहिली
नेहमी अशा प्रीती ची हि भीती मनी जागली
सोडावे हे जीवन आणि संपवावे स्वताला
प्रीतीनेच अंत केला ...............
कस दिस आला
प्रीतीनेच अंत केला .........................

मन्गेशा असा उद्विग्न होउ नकोस :''( :''(
छान कविता आहे.

टारझन's picture

21 Feb 2010 - 12:39 am | टारझन

हॅहॅहॅ .. आपण तर एकदम "मंगेशपाडगांवकर"च की ..
कवितांवर कविता पाडताय :)
असो .. चांगल्या आहेत सगळ्या कविता :) अजुन पाडा !

- प्रतिसादपाडगावकर