तुझा दुरावा घायाळ करी
ओढ अनावर माझ्या उरी..
उदासवाण्या सायंकाळी
नकोस छेडू आसावरी
आठवताना स्पर्श तुझा
हृदयामध्ये उठे शिरशिरी
देहामध्ये भिनून राही
नाव तुझे रे रूधिरापरी
दिठीमध्ये भाव तुझे अन
गीत तुझे या ओठावरी
चिंब करती पुन्हा पुन्हा मज
तुझ्या मिठीच्या धुंद सरी
- प्राजु
प्रतिक्रिया
16 Feb 2010 - 8:57 pm | मदनबाण
छान कविता...
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
17 Feb 2010 - 3:38 am | जयेश माधव
खूपच छान कविता..
जयेश माधव
17 Feb 2010 - 12:33 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त
17 Feb 2010 - 12:42 pm | दत्ता काळे
सुंदर कविता.
17 Feb 2010 - 1:19 pm | विसोबा खेचर
छानच आहे प्रेमकविता पण,
आसावरी हा राग सायंकालीन नाहीच मुळी! :)
तात्या.
18 Feb 2010 - 6:18 am | कौंतेय
अहो तात्या किती चिकित्सा करताय? यमक जुळायला कुठलातरी राग घातला आहे. :)
--कौंतेय
17 Feb 2010 - 1:53 pm | getsaurabhj
छानच.
17 Feb 2010 - 3:52 pm | शुचि
मला आवडलेलं कडवं -
दिठीमध्ये भाव तुझे अन
गीत तुझे या ओठावरी
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
17 Feb 2010 - 4:12 pm | मेघवेडा
मस्त कविता आहे प्राजुतै!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
17 Feb 2010 - 7:43 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
18 Feb 2010 - 3:58 am | जयेश माधव
प्राजु,तुझ्या कवीता खुपच छान असतात्,एखादी गझल होउन जाउदेना!
जयेश माधव
18 Feb 2010 - 10:28 am | सुधीर काळे
येस्स्स्स मॅडम! गझल हो जाय!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
18 Feb 2010 - 5:12 pm | कौंतेय
इंग्रजी मिश्रीत हिंदी प्रदिसाद? चक्क तुमच्याकडून?
तिकडे बाँब स्फोटाच्या धाग्यावर यापेक्षा हिंदी मराठीचा वाद उकरुन काढणारे तुम्हीच ना? की लोकासांगे ब्रह्मज्ञान.... :)
--कौंतेय
18 Feb 2010 - 11:44 am | दिपक
___/\___
18 Feb 2010 - 11:58 am | मि माझी
चिंब करती पुन्हा पुन्हा मज
तुझ्या मिठीच्या धुंद सरी..!!
सुंदर.!!
19 Feb 2010 - 8:26 am | प्राजु
पुन्हा एकदा आभार सर्वांचे. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
19 Feb 2010 - 4:23 pm | फ्रॅक्चर बंड्या
चिंब करती पुन्हा पुन्हा मज
तुझ्या मिठीच्या धुंद सरी
फारच छान...
binarybandya™