तुझ्या मिठीच्या धुंद सरी..
लेखनविषय:
काव्यरस
तुझा दुरावा घायाळ करी
ओढ अनावर माझ्या उरी..
उदासवाण्या सायंकाळी
नकोस छेडू आसावरी
आठवताना स्पर्श तुझा
हृदयामध्ये उठे शिरशिरी
देहामध्ये भिनून राही
नाव तुझे रे रूधिरापरी
दिठीमध्ये भाव तुझे अन
गीत तुझे या ओठावरी
चिंब करती पुन्हा पुन्हा मज
तुझ्या मिठीच्या धुंद सरी
- प्राजु
वाचने
3988
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
छान कविता...
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
खूपच छान कविता..
जयेश माधव
मस्त
सुंदर कविता.
छानच आहे प्रेमकविता पण,
उदासवाण्या सायंकाळी नकोस छेडू आसावरीआसावरी हा राग सायंकालीन नाहीच मुळी! :) तात्या.
In reply to छानच आहे by विसोबा खेचर
अहो तात्या किती चिकित्सा करताय? यमक जुळायला कुठलातरी राग घातला आहे. :)
--कौंतेय
छानच.
मला आवडलेलं कडवं -
दिठीमध्ये भाव तुझे अन
गीत तुझे या ओठावरी
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
मस्त कविता आहे प्राजुतै!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
सर्वांचे मनापासून आभार. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
प्राजु,तुझ्या कवीता खुपच छान असतात्,एखादी गझल होउन जाउदेना!
जयेश माधव
In reply to गझल by जयेश माधव
येस्स्स्स मॅडम! गझल हो जाय!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
___/\___
चिंब करती पुन्हा पुन्हा मज
तुझ्या मिठीच्या धुंद सरी..!!
सुंदर.!!
पुन्हा एकदा आभार सर्वांचे. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
चिंब करती पुन्हा पुन्हा मज
तुझ्या मिठीच्या धुंद सरी
फारच छान...
binarybandya™
छान