बेबी बॅक रिब्ज

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
8 Feb 2010 - 5:55 am

आज सुपर बोल. पुन्हा एकदा पार्टी टाइम. आमच्याकडे सुपर बोल पार्टी म्हणजे बेबी बॅक रिब्ज. एरवी सोयिस्करपणे इतर कामे विसरणारा लेक रिब्जचे सोपस्कार मात्र आठवणीने पार पाडतो. एक आठवडा आधी फ्रीज वरच्या ग्रोसरी लिस्ट मधे बोल्ड अक्षरात बेबी बॅक रिब्ज अ‍ॅड होतात. फ्री़जर उघडून आईने रिब्ज आणल्यात याचे खात्री केली जाते. शुक्रवारी सकाळी शाळेला जाताना फ्रीजर मधल्या रिब्ज थॉ करायला फ्रीज मधे ठेव म्हणून परत एकदा आईला आठवण करुन देण्यात येते.
शनिवारी रिब्ज कितपत थॉ झाल्यात हे पुन्हा एकदा बघितल जातं. आता गाडी वळते बार्बेक्यू सॉस कडे. इथे बार्बेक्यू सॉस म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. अंकल टॉड, ग्रॅन्डपा डग अशा कुणा नातेवाइकाची बार्बेक्यू सॉसची रेसिपी एका पिढी कडून दुसर्‍या पिढीकडे सोपवली जाते. सिक्रेट रेसिपी वापरून बार्बेक्यूच्या स्पर्धेत बक्षिस मिळवलं जातं. बढाया तर काही विचारू नका. आमच्याकडे काही पिढीजात रेसिपी नाही. त्यामुळे इंटरनेट, पुस्तकं, कुकिंग शो च्या मदतीने जमवलेल्या, ट्रायल अ‍ॅन्ड एरर ने मनासारख्या बनवलेल्या २-३ रेसिपी किपर म्हणून ठेवल्यात. शनिवारी वेळ असेल तर त्यातली एक रेसिपी वापरून सॉस तयार होते. तुम्हालाही उत्साह असेल तर
बार्बेक्यू सॉस घरी बनवू शकता. Just follow the link http://www.misalpav.com/node/10975 नाहितर सुपर मार्केट आहेच मदतीला. ड्राय रब मात्र घरचीच असते.
शनिवारी रात्री जेवण-खाण आटोपले की फ्रीज मधुन रिब्ज बाहेर येतात. माणशी १ -१ १/२ पौंड अंदाजाने मी रिब्ज घेते. पहिल्या प्रथम काउंटरवर वॅक्स पेपर पसरून घेते म्हणजे नंतरची सफाई झटपट होते. आता पेपर वर ठेऊन रिब्जच्या मागचे मेंबरेन सुरीने एका बाजूने जरा सोडवून घ्यायचे आणि घट्ट पकडून ओढायचे की नीट निघून येते. मग सुरीने रिब्जच्या रॅकचे ४-६ रिब्ज एका भागात येतील असे दोन तुकडे करायचे.
आता ड्राय रब तयार करुन घ्यायची. त्यासाठी १ चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ. अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा भरड मिरे पावडर असे एकत्र करुन घ्यायचे. हा मसाला रिब्जवर दोन्ही बाजुला भुरभुरवायचा. चोळून लावायचा नाही.

मग बार्बेक्यू सॉस दोन्ही बाजूला लावायचे.

आता पार्सल केले तर रिब्जचा तुकडा मावू शकतील अशा लांबी रुंदीच्या फॉइल मधे सॉस लावलेली रिब्ज ठेऊन पाकिट बनवायचे.

तयार झालेली पाकिटे फ्रीज मधे मुरवत ठेवायची.

दुसर्‍या दिवशी दुपारी साधारण ४ ला ओवन ३०० F ला प्री हिट करायचा. बेकिंग ट्रेवर फ्रीज मधली पाकिटे ठेऊन ओवन मधे २ तास बेक करायची. बाहेर काढून काळजीपूर्वक पाकिट उघडायचे. आता ब्रश ने रिब्जना बार्बेक्यू सॉस लावून ३-४ मिनिटे ब्रॉइल करायचे.
यम्मी रिब्ज तय्यार!

प्रतिक्रिया

शुचि's picture

8 Feb 2010 - 6:13 am | शुचि

छायाचित्रं छान
माझा नवरा शेवटचं छायाचित्र वॉल्पेपरच करेल जर त्याला दाखवलं तर =))
त्याला हा पदार्थ खूप आवडतो.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

विंजिनेर's picture

8 Feb 2010 - 6:51 am | विंजिनेर

मेलो.... खल्लास. सिक्रेट सॉस काय वापरता? ;)
बाकी मायक्रोवेव्ह मधे ठीक पण चेरी नाहीतर अ‍ॅपल च्या वुडफायर्ड ओवन मधे जो स्वाद येतो त्याला पर्याय नाही.
शेवटी बार्बेक्यु ते बार्बेक्युच!
गप्पा + बियर अशी मैफल जमली तर माणशी हाफ रॅक सहज उडतात बैठकीला :)

मि.इंडिया's picture

8 Feb 2010 - 7:55 am | मि.इंडिया

झकास ........ बरेच दिवस अशा पाकृच्या शोधात होतो. इकडे बार्बेक्यू सॉस मिळत नाहीत. कृपया तुम्ही ट्रायल अ‍ॅन्ड एरर ने जमवलेल्या रेसिपी द्याव्या ही विनंती.

हाच प्रकार चारकोल /गॅस बार्बेक्यूमधे करतायेइल का ?

प्रदीप

गणपा's picture

8 Feb 2010 - 7:09 pm | गणपा

जबरा स्वातीताई.
तेवढ ते बार्बे़क्यु सॉसच्या सिक्रेट रेसिपीच मानावर घे आणि टाक इथेच..
इकडे बाजारात मिळतो पण घरच्या ताज्या सॉसमुळे लज्जत नक्कीच वाढेल अस वाटतय.
(पहिले दोन फोटु शाकाहार्‍यांसाठी जीवघेणे ठरतील यात श्ण्का न्हाई:) )
एक श्ण्का : याला बेबी बॅक रिब्ज का म्हणतात?

विंजिनेर's picture

8 Feb 2010 - 7:37 pm | विंजिनेर

क श्ण्का : याला बेबी बॅक रिब्ज का म्हणतात?

कारण त्या बाल-वराहाच्या असतात म्हणून :)

कपिल काळे's picture

8 Feb 2010 - 8:13 pm | कपिल काळे

सॉल्लिड!!

विसोबा खेचर's picture

8 Feb 2010 - 8:17 pm | विसोबा खेचर

क्लास!

स्वाती२'s picture

8 Feb 2010 - 8:22 pm | स्वाती२

धन्यवाद! उद्यापर्यंत बार्बेक्यू सॉस ची कृती टाकते.

रिब्ज, पोर्कच्या ज्या भागातून येतात त्यावरुन वेगवेगळी नावे आहेत.
बेबी बॅक रिब्ज : रिब केजच्या वरच्या शेवटचा भाग, बॅक बोनच्या जवळचा
स्पेअर रिब्ज : रिब केजचा खालचा भाग.
कंट्री स्टाईल : रिब केजचा वरचा भाग, खांद्या जवळचा.

शुचि's picture

9 Feb 2010 - 5:39 am | शुचि

मला फक्त ढुंगणाला बेकन म्हणतात ते माहीत होतं. बरीच माहीती मिळाली. धन्यवाद.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)