बार्बेक्यू सॉस म्हटले की जीभेवर येते ती टिपिकल चव. काहिशी आंबट-गोड, काहिशी तिखट. टॉमॅटोचा बेस. आंबट पणा वाढवण्यासाठी विनेगर, गोडीसाठी ब्राऊन शुगर, कॉर्न सिरप, मध, काकवी वगैरे, मसाला म्हणुन कांदा-लसुण, मिरे,पाप्रीका आणि जोडीला तिखट. चव अजून वाढवायला वुस्टरशर सॉस, मोहरी कुट आणि शौकिन असाल तर चक्क थोडी रम किंवा विस्की देखील.
माझ्या फाईलमधल्या दोन कृती देतेय. पहिली आहे फूड नेटवर्कच्या सेराची.
साहित्य
२ टे स्पून तेल
२ कांदे बारिक चिरुन
३-४ पाकळ्या लसूण वाटून
१ चमचा तिखट
१/४ कप वुस्टरशर सॉस(I prefer Lea and Perrins for its complex flavour)
१/२ चमचा मोहरी कुट
१/४ कप ब्राउन शुगर ( नसेल तर साधी साखर आणि थोडी काकवी)
१/४ साधी साखर
३ कप केचप
१ चमचा मिरे भरड पूड करुन
चवी प्रमणे मीठ
कृती
मोठ्या पातेल्यात मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल तापले की त्यात कांदा घालून परता. कांदा मऊ झाला की लसूण घालुन परता. मस्त वास आला की त्यात तिखट, वुस्टरशर सॉस्,मोहरी कुट, दोन्ही प्रकारच्या साखर घाला. आच कमी करुन मंद आचेवर १०-१२ मिनिटे शिजवा. मधुन मधुन मिश्रण ढवळायला विसरू नका. आता त्यात मिरे पूड आणि टोमॅटो केचप घाला. दोन कप पाणी घाला आणि ४०-४५ मिनिटे झाकण न लावता शिजवा. शिजवताना मधे मधे नीट ढवळा नाहितर खाली लागेल. चवी प्रमाणे मीठ घाला.
दुसरी कृती आहे ऑल रेसिपी वरची. खास शौकिनांसाठी. यात वापरलेय थोडी व्हिस्की. तुम्ही रमही वापरू शकता. थॅक्यू स्कॉट. This one rocks!
साहित्य
१/२ टे. स्पून तिखट
२ टे. स्पून तेल
१/२ कप बारिक किसलेला कांदा
५-६ लसूण पाकळ्या वाटून
१ १/२ कप पाणी
१/२ कप टोमॅटो पेस्ट
१/२ कप व्हाईट विनेगर
१/२ कप ब्राऊन शुगर
२ १/२ टे. स्पून मध
२ टे स्पून वुस्टरशर सॉस
१ टी स्पुन मिरे भरड पूड करुन
२ टी स्पून व्हिस्की
१/२ टी स्पुन पाप्रीका
१ टे. स्पून काकवी
१ टी स्पून लिक्वीड स्मोक फ्लेवरिंग(नसला तरी चालेल.)
चवी प्रमाणे मीठ
कृती
वरील प्रमाणेच, फक्त हे सॉस घट्ट व्हायला जरा जास्त वेळ, साधरण एक तास लागतो. हे सॉस ग्रील करताना एकदम शेवट लावायचे. आधी पासुन लावले तर करपते. टोमॅटो पेस्ट नसेल तर केचप वापरू शकता. फक्त पाणी कमी वापरायचे.
दोन्ही सॉसच्या बाबतीत तुमच्या आवडीप्रमाणे त्यातील घटकांचे प्रमाण कमी जास्त करा. There is no fixed formula, so have fun!
प्रतिक्रिया
9 Feb 2010 - 7:21 pm | विसोबा खेचर
केवळ क्लास!
10 Feb 2010 - 6:25 pm | मि.इंडिया
स्वातीताई धन्यवाद. लवकरच करून बघतो. बार्बेक्यू हा माझा एकदम आवडीचा प्रकार.......
प्रदीप
10 Feb 2010 - 7:46 pm | स्वाती२
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.