कोलंबीचे लोणचे
साहित्य
१/४ किलो कोलंबी
१ टी स्पून तिखट
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून मेथी पावडर
१ टी स्पून मोहरीचे कुट
१/४ टी स्पून हिंग
२ टी स्पून आलं, किसून
१/२ टी स्पून मोहरी
२ टी स्पून विनेगर
१ टे. स्पून तेल
मीठ चवी प्रमाणे
कृती
कोलंबी साफ करुन त्याला हळद आणि तिखट लावून अर्धा तास मुरवत ठेवा. कोलंबी मुरली की एका भांड्यात तेल गरम करत ठेवा. तेल चांगले तापले की त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की त्यात आल्याचा किस घालुन १ मिनिट परता. मोहरी कुट, मेथी पावडर, हिंग घाला. विनेगर घालून ढवळा. कोलंबी घालून झाकण ठेवा. ३-४ मिनिटानी ढवळून आचेवरुन खाली उतरवा. चवी प्रमाणे मीठ घाला. गार झाल्यावर कोरड्या बाटलीत भरुन फ्रीज मधे ठेवा. ८-१० दिवस छान टिकते. आमच्या कडे २ दिवसातच संपते.
प्रतिक्रिया
5 Feb 2010 - 1:06 am | बंडू बावळट
प्रकाशचित्र असते तर अधिक बरे झाले असते.
-- बंड्या.
5 Feb 2010 - 1:12 am | लवंगी
सासुबाई करतात.. आता मीपण करुन पाहिन
5 Feb 2010 - 3:14 am | चित्रा
दाट साय-भात आणि कोलंबीचे लोणचे!
5 Feb 2010 - 3:24 am | चिरोटा
पोळीबरोबरही/वरण भाताबरोबर पण हे चांगले लागते.
भेंडी
P = NP
5 Feb 2010 - 3:25 am | टुकुल
कोलंबीचे पण लोणचे असु शकते, हि नवीन माहीती माझ्यासाठी.
बाकी पाक्रु सोप्पी वाटत आहे.
--टुकुल.
5 Feb 2010 - 3:39 pm | गणपा
ऐकुन होतो, पण कधी खाल्ल न्हवत.
पाकृ बद्दल धन्यु.
(करुन पहायला हवे एकदा.)
5 Feb 2010 - 4:37 pm | समंजस
छान. आवडली.
खाउन बघावे लागेल.
6 Feb 2010 - 7:51 am | अक्षय पुर्णपात्रे
स्वातीतै, पाकृ बनवायचीच असे ठरवले होते. (माझ्या एका मल्लू मैत्रिणिने कोलंबीच्या आणि बीफच्या लोणच्याची ओळख करून दिली होती.) सर्व लोणचे मी एकट्यानेच संपवले. (पंधरा मिनिटात) अनेक धन्य्वाद.
.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत
7 Feb 2010 - 6:33 am | स्वाती२
धन्यवाद!