आज अचानक...

नीलांबरी's picture
नीलांबरी in जे न देखे रवी...
1 Feb 2010 - 6:59 pm

आज अचानक कातरवेळी,
मनी दाटती काजळरेषा
वाट चालुनि थकली पाऊले
चल साजणा अपुल्या देशा

गर्भरेशमी यौवन सरले,
शैशव आता स्वप्नचि उरले
आठवणींचा खेळ चालला
संध्याछाया झाकोळती दिशा

सखेसोबती वाट पाहती
समांतर वाटा जरी चालती
मधुर क्षणांची बकुलपुष्पे
अजुनि जागविती मनी आशा

पैलतीरी नेत्र लागले
स्वप्नांचे आभासही नुरले
नको येथले भास मखमली
अन परतीची फसवी भाषा.

करुणकविता

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Feb 2010 - 7:18 pm | बिपिन कार्यकर्ते

:( नकोसे वाटणारे भविष्य. :(

कविता छान.

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

1 Feb 2010 - 7:26 pm | ऋषिकेश

भाव खास उतरले असले तरी कविता म्हणून ठिक वाटली.
तुमचे गद्य यापेक्षा अधिक आवडले

ऋषिकेश
------------------

फ्रॅक्चर बंड्या's picture

1 Feb 2010 - 7:55 pm | फ्रॅक्चर बंड्या

छान कविता

सुधीर काळे's picture

1 Feb 2010 - 8:59 pm | सुधीर काळे

इतक्या तरुण वयातच निरवा-निरव? छे, छे! फार विषण्ण वाटलं. खरंच इतकी निराशा?
------------------------
सुधीर काळे
Parkinson's Laws
1. Work expands to occupy time available.
2. Bureaucrats add subordinates, not rivals.
3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!

प्राजु's picture

1 Feb 2010 - 9:25 pm | प्राजु

हम्म! भविष्य हेच आहे आपले..
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

क्रान्ति's picture

3 Feb 2010 - 9:22 pm | क्रान्ति

चांगली रचना.
भा. रा. तांब्यांचं "मधु मागसी माझ्या सख्या परी" आठवलं.

क्रान्ति
अग्निसखा