सूर्यग्रहणाचे दुष्परिणाम नको असतील तर हे वाचाच

नरेश_'s picture
नरेश_ in जनातलं, मनातलं
13 Jan 2010 - 8:21 pm

सहस्त्रकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण येत्या शुक्रवारी म्हणजे दि. १५.१.२०१० रोजी येत आहे. सदियों के बाद म्हणजे पंधरा हजार चारशे अट्ठावन्न वर्षांनी हा दुर्मिळ अन खतरनाक योग येत आहे! प्रगाढपंडितांच्या मतानुसार, या वर्षीच्या सूर्यग्रहणावर अमावस्येची काळीकभिन्न छाया असणार आहे ;) संपूर्ण जगभरात याचे भयानक परिणाम ( पूर्वलक्ष्यी प्रभावाने) दिसून येणार आहेत.पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर अनुक्रमे पूर व अवर्षण, झालंच तर स्वाइन फ्लू, महागाई, भ्रष्टाचार, चलनवाढीचा वाढता दर, साखरेचे चढते भाव इ.इ. चे थैमान दिसून येणार आहे.
तसेच या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे एका सरळ रेषेत येत असल्याने एकंदरीत सर्व मनुष्यमात्रांच्या दृष्टीने कठीण काळ आहे हे निश्चित!
परंतू घाबरु नका... या सर्वांवर उपाय आहे.
आमच्या पंचमहाज्योतिषांनी पुढील उपाय सुचवीले आहेत, त्याचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच सदर उपाय सर्वाना पत्राद्वारे सुचवून जास्तीत ज्यास्त लोकांना ग्रहणाच्या अनिष्ट परिणामांपासून वाचवा. जो कुणी या पत्राचा अवमान करेल, त्याला राहू-केतूच्या क्रोधाचे धनी व्हावे लागेल :( व जो कुणी हे पत्र आपापल्या मित्रांना पाठवेल , शनी महाराजांची सरळदृष्टी पडेल!
उपाय :
१ साडेसाती असणार्‍यांनी या दिवशी साडेसात नंतर घराबाहेर पडू नये.
२ सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणतेही विधी * करु नयेत असे शास्त्रार्थ सांगतो, सर्वांनी याचे कटाक्षाने पालन करावे.
(*पहिला अर्थ घ्यावा ;) )
३ राहू केतूचा कोप टाळण्यासाथी खास उपाय: सकाळी लवकर उठून ताजे व निर्भेळ गोमय (शेण) आणून त्याचे वाटीएवढे पांच दिवे करुन त्यात एरंडेल टाकून घराबाहेर पाजळावेत.
४ घरातील टाकावू कचरा मॉल मालकांना दान करावा!
५ कोणताही एक अगम्य मंत्र (उदा. ओम र्‍हीं रिम फट स्वाहा छाप) पुट्पुटावा.
६ मांजराचे मुखावलोकन करु नये. ( and vice versa)
अनुभूती
एका गरीब शेतकर्‍याला वरीलप्रमाणे पत्र मिळाले, त्याने ताबडतोब अकरा मित्रांना पत्रे पाठविली, मात्र पोष्टाच्या दफ्तरदिरंगाईमुळे संबंधीतांना
पत्र ग्रहणानंतर मिळाले. दुसर्‍याच दिवशी त्याचा पाय घसरला व टिबिया फ्रॅक्चर झाला. त्यानंतर टपाल खात्याची काय हालत झाली हे आपण पाहत आहातच!
एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याला असेच पत्र मिळाले, त्याने दुर्लक्ष केलं, दुसर्‍याच दिवशी त्याची मलईदार पोस्टींगवरूनतडकाफडकी गडचिरोलीला बदली झाली.
चारवेळा बारावीला नापास झालेल्या एका पुनर्परिक्षार्थी विध्यार्थ्याला हे पत्र मिळाले, त्याने ताबडतोब अकरा मित्रांना हे पत्र पाठवले, अन काय आश्चर्य! बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांच्या घोळामूळे त्याला अवांतर प्रतिसाद नव्हे नव्हे गुण मिळून बर्‍या गुणांनी तो पास झाला!
असो सदर पत्राचा अवमान करु नये. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवावे, ही विनंती ;)

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

13 Jan 2010 - 8:44 pm | अविनाशकुलकर्णी

अर्धवट पुरोगामी विचारांचा व त्यातल्या कुत्सित अर्थाचा आम्हि निषेध करतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jan 2010 - 9:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूर्यग्रहणाचे दुष्परिणाम होतील म्हणून धवसा घालणार्‍या तथाकथीत
विचारांची टींगल होतांना पाहून आम्हाला मनोमन आनंद होत आहे.

-दिलीप बिरुटे

नितिन थत्ते's picture

14 Jan 2010 - 9:38 am | नितिन थत्ते

तुम्ही इकडे दुर्लक्ष करा हो. आणि ब्राह्मणाला (पक्षी - मला ;) ) घसघशीत दान करून पुण्य कमवा आणि सगळ्या दुष्परिणामांपासून सुटका करून घ्या. दान कॅशनेच करावे. कॅश आणून देण्यासाठी माझा पत्ता पुढील प्रमाणे:

=))

नितिन थत्ते

टारझन's picture

13 Jan 2010 - 9:09 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))

ग्रहणाच्या दिवशीचा आमचा प्लान
१ मस्त पैकी भटकंती करून येऊ
२ सुर्यग्रहणाच्या आदल्या दिवशीच २ टक कायमचुर्ण घेऊ :)
३ राहू-केतू च्या नावाने १००० शिव्यांचे मंत्रोच्चारन करू .
४ त्यादिवसापुरते भंगार गोळा करून घरात ठेऊ
५ ओम्न .. श्रीम्न .. क्लिम्न... ओम भगनी भग भुगे भग्मासे भगदाडे भरताने भाडखा* भां** ओम्न फट्ट स्वाहा =)) ह्या मंत्राच्या एम्पी३ वाजवू !
६ अंमळ गल्लीतली सगळी मांजरं गोळा करून त्यांचा एक फोटोशुट आयोजित करीन म्हणतो...

=)) एवढा विनोदी लेख आजवर वाचला नव्हता . लेखकाचे धन्यवाद.

- टस्कराचार्य

Nile's picture

13 Jan 2010 - 10:05 pm | Nile

तुम्ही करु नयेत असे सांगितलेल्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन.

ग्रहणेश_

विजुभाऊ's picture

14 Jan 2010 - 7:45 am | विजुभाऊ

वा वा वा........
इन्टरनेट आस्तित्वात आले म्हणून कित्ती बरे झालेय. अन्यथा कित्तीतरी लोक या अफाट माहिती मिळण्यापासून वंचित राहीले असते.

तसेच या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे एका सरळ रेषेत येत असल्याने एकंदरीत सर्व मनुष्यमात्रांच्या दृष्टीने कठीण काळ आहे हे निश्चित!

प्रत्येक ग्रहणात अशीच भौगोलीक स्थिती असते. त्याशिवाय ग्रहणच होऊ शकत नाही. चौथीच्या पुस्तकात ही माहिती दिलेली असते. पण त्यामुळे काळ कठीण कसा होईल हे जरा समजाऊन सांगता का?
आणि हे ई मेल/ मजकूर इतराना सागितल्यामुळे त्यात कसा फरक पडेल हे कळाले नाहे.
मी अज्ञानी आहे. आपणासारख्या थोर अधीकारी व्यक्तीने आम्हा पामराना हे समजावून सांगावे ही विनन्ती

II विकास II's picture

14 Jan 2010 - 9:26 am | II विकास II

अमंळ मजेशीर धागा.

असले धागे येत असल्यानेच मिपाची विविधता टिकुन आहे. पुन्हा विषय मिळाला कि असले धागे टाकवेत ही विनंती.

पंरतु गुरुवर्य खालील वाक्याबद्दल मनात खुप कुशंका आहेत.

राहू केतूचा कोप टाळण्यासाथी खास उपाय: सकाळी लवकर उठून ताजे व निर्भेळ गोमय (शेण) आणून


म्हणजे नेमके किती वाजता शेण आणावे? गायीना वेळेवर शेणविसर्जन करण्यास कसे सांगावे? निर्भेळ शेणासाठी गायीला आदल्या दिवशी काय काय खायला घातले पाहिजे? ताज्या शेणा करिता गोठ्यात झोपले तर चालेल काय?
वरील काही कुशंका आम्हास पडल्या आहेत त्याचे योग्य निरसन करावे.
वेताळ

सुनील's picture

14 Jan 2010 - 10:13 am | सुनील

मस्त!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

टारझन's picture

14 Jan 2010 - 10:22 am | टारझन

सगळ्यात भारी उपाय :

४ घरातील टाकावू कचरा मॉल मालकांना दान करावा!

मॉलचे अस्तित्व असल्याचा उल्लेख कोणत्या वेदात केला गेलाय ? =))

नितिन थत्ते's picture

14 Jan 2010 - 10:30 am | नितिन थत्ते

टजुर्वेदात आणि टामवेदात दोन्हीत उल्लेख आहे.

नितिन थत्ते

jaypal's picture

14 Jan 2010 - 8:10 pm | jaypal


राज ज्योतिषांचे म्हणणे ऐका आणि सुखी+समाधानी व्हा.
ज्यांनी ज्यांनी ऐकल आहे आज त्यांच्या पायावर ऐहिक सुखं लोळण घेत अहेत.;-)

अणि अवज्ञा करणारांची ...... अशी गत झाली आहे. :-(


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

वेदनयन's picture

15 Jan 2010 - 2:06 am | वेदनयन

आमची नाडीवाल्यांबरोबर याच दिवशी अपाईंटमेंट आहे. त्यामुळे काळजी नसावी.

त्यांना सगळे माहित असते आणी जालिम उपायपण देणार आहेत. तुम्हीपण या...