✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नान्या..!

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 03/11/2008 - 01:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27941 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

पण

प्राजु
Tue, 03/11/2008 - 01:55 नवीन
पण नान्याचा आवडीचा छंद किंवा विरंगुळा मात्र एकच. तो म्हणजे लोकांच्या मर्तिकाला जाणे! :) काय पण छंद...! असतो एकेकाला.. काय करणार? छ्या! या नान्याचं मर्तिकाचं खूळ केव्हा जाणारे कुणास ठाऊक! गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा!" या आरोळीच्या रुपाने ते खूळ नान्याच्या पायात पाय घालायला येतंच तिच्यायला! ते सुद्धा नान्याच्या नकळत! कारण आपण असं काही बोललो हे देखील नान्याच्या गावी नसतं! :) मला तर एखाद् वर्षी "देवा गणपतीराया, या वर्षी लाकडं जरा स्वस्त होऊ देत रे बाबा!" असंही नान्या ओरडेल की काय अशी भिती वाटते! :)) हाहाहा.. तात्या, खरंच मलाही शंका आली ही जेव्हा मी पहिलं वाक्य वाचलं गणपती बसण्याचा उल्लेख आला लेखात तेव्हा... मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :) हे मात्र एकदम भारी... सह्हीच.. नाना नवाथे या व्यक्तिमत्त्वातील साधेपणाचे कंगोरे अतिशय सुंदर वर्णन केले आहेत तुम्ही. नेहमी प्रमाणेच.. सरस व्यक्तिचित्र.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

व्वा! मस्त!

बेसनलाडू
Tue, 03/11/2008 - 02:02 नवीन
खास तात्यांच्या शैलीतील उत्तम व्यक्तिचित्र. काही काही वाक्यं तर निव्वळ लाजवाब. जसे - नुकतीच पोरगी पटलेल्या एखाद्या युवकाने ज्या लगबगीने तिच्याबरोबर सहाचा शो पाहायला जावं, त्याच उत्साहाने नान्या कुणाच्याही मयताला निघतो! :) मर्तिकसम्राट हा शब्द तर भारीच आवडला. हे व्यक्तिचित्र जरा आखडते घेतले आहे का? की मुळातच फक्त तोंडओळखच करून द्यायची होती? (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मस्त रे कांबळे !!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 03/11/2008 - 02:19 नवीन
खल्लास. (मर्तिक सम्राटाचे व्यक्तिचित्र आवडले, म्हणून...) बाकी बे.ला. शी सहमत, जरा आखडते घेतल्यासारखे वाटले आहे.. - सर्किट
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

केशवसुमार
Tue, 03/11/2008 - 08:30 नवीन
बे.ला. शी सहमत.. उत्तम लेख.. केशवसुमार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

अरे वा, तात्या!

चतुरंग
Tue, 03/11/2008 - 02:33 नवीन
तुमच्या व्यक्तिचित्र लिखाणावरची भाईकाकांची सावली अगदी जाणवते! मर्तिकसम्राट नानूचे चित्रणही असेच हटके. (थोडा सफाईचा हात कमी पडला असे मला जाणवले, कुठे-कुठे तेच उल्लेख दोनवेळा आलेले दिसले...) पण एकून तुमचा ह्या लेखनप्रकारावर हात बसलेला आहे ह्यात शंका नाही. जोरदार अभिनंदन! चतुरंग
  • Log in or register to post comments

दर्जेदार

मुक्तसुनीत
Tue, 03/11/2008 - 02:39 नवीन
तात्यांना भाषेची उत्तम जाण असल्याने, थोडे कॅज्युअल असे वाटणारे त्यांचे लिखाणसुद्धा दर्जेदार बनते. माणसांचे बारकावे, त्यांच्या लकबी, त्यांच्यातल्या गमतीदार वाटतील अशा विसंगती आणि या सगळ्याला मैत्रीची , माणुसकीची किनार. अहो, बेत बिर्याणीचा असो की साध्या कोशींबीरीचा , ते करणे जाणत्याचे .... पुलंचा बापू काणे आणि मिरासदारांचा कथानायक यांचा क्रॉस्-ब्रीड म्हणजे तात्यांचा नान्या ! :-)
  • Log in or register to post comments

+१

धनंजय
Tue, 03/11/2008 - 07:40 नवीन
> पुलंचा बापू काणे आणि मिरासदारांचा कथानायक यांचा क्रॉस्-ब्रीड म्हणजे तात्यांचा नान्या ! :-) एकेक वल्ली जमायला लागल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

असेच म्हणतो

आनंदयात्री
Tue, 03/11/2008 - 10:23 नवीन
लेख तात्या स्टाइल मधे आहे ... आवडला हे. सा. न लगे .. आता आमची किरकिर : बरे झाले यात क्रमशः नव्हते ! नाही आम्हा वाचक लोकांना अजुन एका लेखमालेचा ट्रॅक ठेवावा लागला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

चांगल आहे.

व्यंकट
Tue, 03/11/2008 - 03:13 नवीन
सगळ्यात आधी क्रमशः आहे का ते पाहीलं, नव्हतं हे बरं आहे. >> गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा!" हे आवडले. " :) " जरा जास्ती वेळा पडलयं, सहज म्हणून मोजलं तर २२ वेळा भरलं. ऑल्मोस्ट पूर्णविरामाला स्बस्टीट्यूट. बाकी वल्ली उत्तमच रेखाटली गेलीये ! आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नान्या..

कोलबेर
Tue, 03/11/2008 - 05:01 नवीन
..आवडला!
  • Log in or register to post comments

येकदम भारी ना राव..

आपला आभि
Tue, 03/11/2008 - 06:06 नवीन
तात्या एकदम 'काटा 'लेख लिहला आहे.. माझ्या डोळ्या समोर तर आमच्या गावात राहनारे शामादादा आले.. त्यांचा पण हाच छन्द होता... तिरडी कशी बाधावी ? खान्दा कसा आणि कुनी द्यावा ? झटपट अंघोळ कशी उरकावी ? .. लाकडावर झोपवल्यावर आग नीट लागन्यासाठी काय काय करावे ? या विषयात त्यांना आजच्या जमान्यात 'Ph D' सहज मिळाली असती.. स्मशानात भाषणे देण्याचा प्रकार तर औरच !!!!!.... त्यावर काहितरी येवूद्या.. (विनंती आहे हो .. आम्हाला काही उद्योगच नाहित ना लेख वाचन्याशिवाय..) आपला आआआभि
  • Log in or register to post comments

आपली संस्कृति म्हणते...

सृष्टीलावण्या
Tue, 03/11/2008 - 07:20 नवीन
"राजद्वारे श्मशाने च य: तिष्ठति स: बान्धव: ।" तोच खरा बान्धव जो राजाचे किंवा यमाचे बोलावणे आल्यावर आपल्याला दरवाजापर्यंत सोबत करतो. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments

वा!

व्यंकट
Tue, 03/11/2008 - 07:25 नवीन
काय वाक्य आहे! व्यंकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

एकदम भारी

सुवर्णमयी
Tue, 03/11/2008 - 07:58 नवीन
तात्या, व्यक्तीचित्रण अतिशय प्रभावी झाल आहे. सोनाली
  • Log in or register to post comments

सही

सहज
Tue, 03/11/2008 - 08:20 नवीन
तात्यांना भाषेची उत्तम जाण असल्याने, थोडे कॅज्युअल असे वाटणारे त्यांचे लिखाणसुद्धा दर्जेदार बनते. माणसांचे बारकावे, त्यांच्या लकबी, त्यांच्यातल्या गमतीदार वाटतील अशा विसंगती आणि या सगळ्याला मैत्रीची , माणुसकीची किनार. अहो, बेत बिर्याणीचा असो की साध्या कोशींबीरीचा , ते करणे जाणत्याचे .... मुक्तसुनित यांच्याशी सहमत!
  • Log in or register to post comments

छान!

प्रमोद देव
Tue, 03/11/2008 - 08:32 नवीन
नान्या आवडला. तरीही तात्या 'नान्या'कडे तू हवे तितके लक्ष दिलेले दिसत नाहीये असे राहून राहून वाटतेय. एखाद्या खमंग पदार्थात 'मीठ' घालायचे राहून गेले असावे तसे झालेय. शांतचित्ताने पुन्हा एकदा संपादनाचे सोपस्कार करून त्यात सुधारणा करावीस अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

धोंडोपंत
Tue, 03/11/2008 - 08:39 नवीन
तात्या, अप्रतिम व्यक्तिचित्र. मजा आली वाचून. अत्यंत सुंदर. बोलकं, ओघवतं कथन. क्या बात है!! आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

वा, तात्या क्या बात है !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/11/2008 - 09:33 नवीन

तात्या,
तुमच्या नान्या आवडला राव आपल्याला !!!
मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :) हाहाहाहा, हे तर लै भारी !!! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त आहे

सागर७८
Tue, 03/11/2008 - 10:35 नवीन
वाचुन मजा आलि
  • Log in or register to post comments

नान्या...

धमाल मुलगा
Tue, 03/11/2008 - 11:40 नवीन
असा नान्या प्रत्येक गावात एक तरी असतोच का? आमच्या गावातही एक गृहस्थ असेच मर्तिकसम्राट आहेत. बर॑, जे काही "मर्तिकसम्राट" पाहिलेत, ते सगळे असेच साधे सरळ, भोळे-भाबडे, आहे त्यात समाधानी असे असतात. खरी..अस्स्ल माणूसकी पहायची असेल तर एखाद्या 'नान्या' शी फक्त ओळख करुन घ्या...मैत्रीसुद्धा नाही म्हणत मी. ती आपोआप होऊन जाते. बाकी, डोळ्यासमोर चित्र उभे करण्याची एकदम टिपिकल तात्या-इश्टाईल. खास करून गणपतीच्या आरतीचा आणि त्यान॑तरचा गाण्याचा किस्सा आवडला. तरी पण तात्याबा, उरकल्यासारख॑ का वाटत॑य? आपला, एका 'नान्या'चा मित्र -ध मा ल.
  • Log in or register to post comments

अस्सल व्यक्ती-

विसुनाना
Tue, 03/11/2008 - 12:52 नवीन
चित्रण! तात्या, ज्याम आवडला तुमचा 'नाना नवाथे'. (आता इतर लेखनही असेच एकटाकी किंवा एकटंकी संपवा, ही मल्लीनाथी)
  • Log in or register to post comments

अप्रतिम

शेखर
Tue, 03/11/2008 - 12:56 नवीन
तात्यांचे लिखाण एकदम लाजबाब असते. प्रत्यक्ष नान्याला भेटल्या सारखे वाटले ..... शेखर
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Tue, 03/11/2008 - 12:56 नवीन
सही :). नान्याचे चित्रण आवडले. 'नेहमीच्या गिर्‍हाईकाला फसवू नका, मिस्टर' आठवले :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

पुढे जाणे अशक्य...

विसोबा खेचर
Tue, 03/11/2008 - 13:22 नवीन
'नेहमीच्या गिर्‍हाईकाला फसवू नका, मिस्टर' आठवले :) धन्यवाद रे नंदनसायबा, मी तर खूपच लहान आणि कडमड्या लेखक आहे, परंतु माझ्या मते आज परिस्थिती अशी आहे की लहानमोठ्या सर्वच लेखकांना व्यक्तिचित्रण करायचे असेल तर भाईकाकांचे बोट धरल्यशिवाय पुढे जाता येणार नाही! मी फक्त त्यांचा वरदहस्त माझ्यावर रहावा एवढेच चिंतितो आणि माझ्या लेखनावर त्यांची सहज सावली तरी पडवी एवढेच पाहतो. कुठेही नक्कल होऊ न देण्याचा मात्र कसोशिने प्रयत्न करतो. तरीही खूप जड जातं आणि सांभाळावं लागतं! :) आजदेखील माझा एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय जात नाही! स्वप्नातही आंगठा न मागणार्‍या या प्रेमळ गुरूकडे मनोमन माझी एकलव्यासारखी तालिम सुरू आहे, कितपत यश येतं ते पाहायचं! अवांतर - व्यंकटेशतात्या माडगुळकरांच्या व्यक्तिरेखाही मला अतिशय आवडतात. तात्या माडगुळकरांची 'माणदेशी माणसं' वाचून तर मी थक्कच झालो. फारच सुरेख! एकंदरीतच 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात लाडका साहित्यप्रकार आहे! असो, आपला, (भाईकाकांच्या व्यक्तिचित्रांनी सगळं आयुष्यच भारावून गेलेला!) तात्या. -- मात्र जगाच्या दृष्टीने सारी अशुद्धे केलेला हा माणूस माझ्या लेखी मात्र देवटाक्याच्या पाण्याइतकाच शुद्ध होता! -- (रावसाहेब!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

नान्या..!

संजय अभ्यंकर
Fri, 03/14/2008 - 07:22 नवीन
फार सुंदर व्यक्तिचित्र! खास तात्या शैलीत! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तात्या मस्तच..

स्वाती राजेश
Tue, 03/11/2008 - 14:56 नवीन
नान्या चे व्यक्तिचित्र मस्त लिहिले आहे. वाचून मजा आली.
  • Log in or register to post comments

वा !

राजमुद्रा
Tue, 03/11/2008 - 15:08 नवीन
तात्याबा नान्या आवडला! आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आमच्या धीर धरण्याला सीमा आहेत :) फार ताणल्याने तुटतील अशी (प्रेमळ) धमकी मी तुम्हाला देत आहे. राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments

हातखंडा

सुमीत
Tue, 03/11/2008 - 17:24 नवीन
तात्यांचा हातखंडाच आहे प्रभावी व्यक्ती चित्रण करण्याचा. तात्यांना व्यक्तीचित्रण आवडते आणि ती आवड खरे तर त्यांच्या लोकसंग्रह जमवायच्या आवडी मुळेच आहे.
  • Log in or register to post comments

वा वा.. सुंदर.

लिखाळ
Tue, 03/11/2008 - 17:58 नवीन
तात्या, नेहमी प्रमाणेच व्यक्तिचित्रण आवडले. खास. सुरुवातीपासूनच नाना ही व्यक्ती अंगकाठीने कशी असेल याचे मनाशी चित्र रंगवले आणि ते आपण केलेल्या वर्णनाशी जुळले. तुमचा व्यक्तिचित्रणात हातखंडाच आहे. पण या पूर्ण लेखात एकदाही एखद्या पात्राबद्दल 'यावर सुद्धा एक स्वतंत्र लेख लिहावा' असे आपण लिहिले नसल्याने, हा लेख आखडल्यासारख झाला आहे की काय ? असे अनेकांना वाटले असेल :) शिंत्रे गुरुजींची मालिका पूर्ण झाली का? त्याचा दुवा देता का? पुलेशु. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
  • Log in or register to post comments

वरील सर्व प्रतिसादांशी थोडा थोडा सहमत आहे.

सन्जोप राव
Tue, 03/11/2008 - 18:32 नवीन
(हे शीर्षकच गोळेकाकांसारखे पूर्ण वाक्यात झाले. आता प्रतिक्रिया काय लिहिणार कप्पाळ!) सन्जोप राव
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Tue, 03/11/2008 - 18:40 नवीन
आपल्यासारख्या चोखंदळ वाचकाने सर्वांशी थोडी थोडी सहमती दाखवली हेच आमच्याकरता मोप आहे! बाय द वे, गोळेकाकांचा संदर्भ आवडला. बाकी गोळेकाका तसा भला माणूस हो! :) असो, आपला, (गोळेकाकांच्या संतुलीत आहारविषयक नियमांचा शिष्य!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

मस्त!!

किशोरी
Tue, 03/11/2008 - 18:39 नवीन
नान्या तर आवडलेच पण लेख वाचुन त्यांच्या चिऊला पाहण्याची खूप इच्छा झाली मजा आली वाचुन !!
  • Log in or register to post comments

सहाचा शो, ........

सुधीर कांदळकर
Tue, 03/11/2008 - 19:52 नवीन
मर्तिकसम्राट छानच. गणगोतापैकी असण्याचा अभिमान, चिऊचे भुर्रकन येऊन बिलगणे, पुलंचा एकेरी उल्लेख. वाह. .............. वा. वर्णनातील अनौपचारिकता व आपल्या मैत्रीतील जिव्हाळा ठाव घेणारा. अप्रतिम. राजमुद्राताईंना रुसावे लागू देऊ नका. नाहीतर आम्ही लेखणीसंपावर जाऊ. 'पेन डाऊन' ऐवजी 'की बोर्ड ऑफ्फ'. धन्यवाद. रोशनीची वाट पाहात आहे. सुधीर कांदळकर
  • Log in or register to post comments

तात्या

वरदा
Tue, 03/11/2008 - 20:36 नवीन
खूप छान आहे हेही व्यक्तिचित्र एकंदरीतच 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात लाडका साहित्यप्रकार आहे! ते सा. न. ला. आम्हाला दिसतय ते तुमच्या सगळ्या व्यक्तीचित्रातून आणि ह्याचं कारण तुमचं सहज माणसं जोडणं आहे हेही नक्की.. सगळ्या व्यक्तीचित्रात एक सहजता असते तुमच्या सहज गप्पा मारताना, प्रतिसाद देताना तुम्ही जसं लिहिता तिच भाषा व्यक्तिचित्रात असते. त्यामुळे ते एकदम ओरिजिनल बनतं आणि वाचायला खूप मजा येते. अभिनंदन ह्या उत्क्रुष्ठ व्यक्तिचित्राबद्दल!
  • Log in or register to post comments

वा तात्या

सर्वसाक्षी
Tue, 03/11/2008 - 22:58 नवीन
जोरदार! खरेतर अंत्यविधीला जाणे ही एक सामाजिक गरज आहे. अनेकदा गेलेल्याच्या घरचे सगळे मोठ्या वयाचे असतात, मुलेबाळे जवळ नसतात मग धावपळ करायला कुणीतरी हव ना? मी देखिल एकवेळ लग्न चुकवतो पण ओळखीत कुणी गेले तर आवर्जुन जातो. बाकी व्यक्तिचित्र तुझ्या खास शैलितलं, आवडल हो!
  • Log in or register to post comments

बेश्ट

प्रसन्न
Wed, 03/12/2008 - 12:06 नवीन
खरच मजा आली वाचताना, फक्त शेवट लवकर सम्पवल्यासारखा वाटला.
  • Log in or register to post comments

टिल्लूगुरुजी :))

किशोरी
Wed, 03/12/2008 - 17:36 नवीन
लेख तर छानच आहे ,आणी गुरुजीच नाव टिल्लू असत हे वाचुन गुरुजी जीन्स मधे,केस रंगवलेले अस चित्र डोळ्यासमोर उभ राहील :))))
  • Log in or register to post comments

आभार..

विसोबा खेचर
गुरुवार, 03/13/2008 - 07:59 नवीन
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार मानतो... प्रतिसाद न देणार्‍यांचेही अनेकानेक आभार! बघून घेईन तिच्यायला! ---- (स्वगत!) :) काही मंडळींनी लेख संपवतांना जरा घाई झाली आहे किंवा लेख थोडा गुंडाळला गेला आहे असं मोकळेपणाने कळवलं त्यांचे आभार मानतो. परंतु लिहिताना मला तरी व्यक्तिश: तसं जाणवलं नाही. जसं जमेल तसं लिहीत गेलो. असो... लिखाळराव, शिंत्रेगुरुजींची आठवण करून दिल्याबदल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो! साफ विसरूनच गेलो होतो. मनोगतावर शिंत्रेगुरुजींना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. तूर्तास त्याचे पहिले दोन भाग माझ्या ब्लॉगावर प्रसिद्ध करत आहे. ते आपल्याला इथे आणि इथे वाचता येतील. तिसरा भाग लवकरच लिहीन. रौशनीबद्दलही काही मंडळींनी विचारलं आहे, तीही लौकरच पुरी करण्याचा प्रयत्न करतो. रोजच्या कामधंद्यातून थोडा निवांतपणा मिळायला हवा! पुन्हा एकदा सर्वांचे आभार.. नान्याचं व्यक्तिचित्र मी आमच्या भाईकाकांची आयुष्यभर साथ करणार्‍या आणि त्यांना सांभाळणार्‍या सुनिताबाईंच्या चरणी अर्पण करतो... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा