हॉकीचा बोजवारा!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in काथ्याकूट
10 Mar 2008 - 10:16 pm
गाभा: 

आजच्या पेपरातील बातमी:
"भारतीय हॉकी संघ ऑलिंपिकच्या पात्रता फेरीतच पराभूत झाला."

माझा प्रश्नः
जेंव्हा भारतीय क्रिकेट संघावर २०/२० चषक जिंकल्याबद्दल बक्षिसांची खैरात झाली होती तेंव्हा काही (३-४) हॉकीपटूंनी उपोषण वगैरेच्या धमक्या देत सरकारवर दबाव आणत काही रक्कम उपटली होती. आता ती रक्कम व्याजासकट वसूल करून घ्यावी काय?
(खरंतर त्यांना चौकात उभे करून फटके मारावेत काय असे विचारणार होतो, पण आपण पाकिस्तान नाही याची आठवण ठेवत आहे...)

तुमचे काय मत आहे?

संतप्त,
पिवळा डांबिस

प्रतिक्रिया

सचिन's picture

10 Mar 2008 - 11:32 pm | सचिन

हा एक कधीच न सम्पणारा विषय आहे. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असूनही दुर्लक्षित आहे. विचार करा की त्या खेळाडून्ना मोटिव्हेशन काय असेल ? पैसे कोणाला नकोत ? ८-१० देशन्चा "वर्ल्ड कप" जिन्कणे हे खरोखरीच इतके ग्रेट आहे का ? आता तर चक्क लिलाव चलू आहे क्रिकेट मधे ! इतर खेळान्च्या खेळाडून्ना काय मोबदल मिळतो ? मी देखील क्रिकेटचा डाय हार्ड चाहता आहे...पण कुठेतरी कहीतरी चुकते आहे खास !!

आजकाल मी भारताच्या हॉकीच्या बातम्या ह्या " भारत सरकारने अमक्या अमक्या घटनेचा निषेध नोंदवला " या चालीवरच अतिशय निर्वीकारपणे व मुर्दाड मनाने वाचत असतो ... कारण त्याविषयी आता बोलण्यासारखे व करण्यासारखे काहिही राहिले नाही .... सारा कारभार आता " रामभरोसे व गिलसाहेब भरोसे" चालू आहे....

त्यामुळे आजची बातमी "भारतीय हॉकी संघ ऑलिंपिकच्या पात्रता फेरीतच पराभूत झाला." मी वाचली व "के पी एस गिलच्या **** चा घो " म्हणून मनातून थूंकुन टाकली ... त्यापेक्षा जास्त मी काहि करू शकत नाही व करण्याची इच्छा नाही ... आपण येवड्।या पोटतिडकीने लिहलात याबद्दल आपल्याला असलेल्या अपेक्षांचे कौतूक करू वाटते ...
मी तर म्हणेन की "भारतीय हॉकी फेडरेशन , पदाधिकारी व ते निर्लज्ज खेडाळू" हे चौकात फटके मारण्याच्या लायकीचे पण उरले नाहित ...

राहता राहिला प्रश्न दिलेल्या पैशाचा , तर मी असे म्हणेन की "भारताच्या हॉकीच्या सुवर्णयुगाचे श्राद्ध घालणार्‍या खेडाळूंची दक्षिणा म्हणून " हे पैसे दिले असे समजावे ...

कुठे त्यांची तुलना पाकिस्तान , हॉलंड, ऑसीज् , इंग्लंड सारख्या जिगरबाज टीमशी करता ... त्यांना बसूदे कोडगेपणाने आपल्या निर्लज्जपणाचे प्रदर्शन करत ....

बास झाले. मी पण आता "ध्यानचंद च्या" आत्म्याची क्षमा मागून व "भारतीय हॉकी फेडरेशन , पदाधिकारी व ते निर्लज्ज खेडाळू व के पी एस गिलच्या **** चा घो " या विषयाला कायमचा "रामराम ठोकतो" ..........

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Mar 2008 - 12:05 am | llपुण्याचे पेशवेll

भारतीय हॉकीला दरिद्री कळा आली आहे हे ठीक पण त्याची कारणमिमांसा करता असे दिसते की याला खेळाडू, पदाधिकार्‍यांएवढेच 'टर्फ'चे मैदानही कारणीभूत आहे. कारण टर्फवर खेळताना बॉलचा वेग जास्त असल्याकारणाने कौशल्यापेक्षा शारिरीक क्षमता जास्त निर्णायक असते. आणि भारतीय खेळाडू शारिरीक क्षमतेत नक्कीच कमी आहेत.

पूर्वी जेव्हा हिरवळीच्या मैदानावरून हॉकी टर्फच्या मैदानावर खेळवायचा निर्णय झाला तेव्हा ऑस्ट्रेलिया या एकमेव देशाने याला विरोध केला कारण त्यामुळे कारण चेंडू हाताळण्याचा कौशल्यापेक्षा वेगाने पळण्यालाच जास्त महत्व राहीले असते. आणि ऑस्ट्रेलियन महासंघाने भारताला या विरोधात सामिल करून घेण्यासाठी ध्यानचंद यांच्या कौशल्याचाच दाखला दिला होता.
पण भारताने यात सामिल होणे नाकारले.

असो, पण भारतातील खेळाडूंनी स्वतःची शारिरीक क्षमता वाढवणे हा त्याला योग्य पर्याय आहे.

पुण्याचे पेशवे

कोलबेर's picture

11 Mar 2008 - 4:46 am | कोलबेर

छान माहिती दिलीत. हिरवळीच्या मैदानासाठी ऑस्ट्रेलियाला पाठींबा न देणे हे र्‍हस्व दृष्टीचे लक्षण आहे. भारताची हॉकीमधे पीछेहाट का होत असावी ते आता लक्षात आले.

बेसनलाडू's picture

11 Mar 2008 - 4:53 am | बेसनलाडू

म्हणतो. उत्तम माहिती.
(वाचक)बेसनलाडू

सृष्टीलावण्या's picture

11 Mar 2008 - 7:44 am | सृष्टीलावण्या

हा पोलिसातील माणूस खरेतर भारतीय हॉकीला सुधारायला आणला होता पण म्हातारपणामुळे तो भ्रमिष्ट झाला आहे आणि सत्ता सर्व पडद्यामागून ज्योतिकुमार नावाचा माणूस चालवितो (इति इंडिया टीव्ही).

आज सर्वजण गिललाच दोषी ठरवित आहेत पण ज्योतिकुमार मात्र सुरक्षित खेळ्या खेळत आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे अगदी धनराजसुद्धा गिलने पैसे खाल्ले असे म्हणत नाहीये. हा पोलिसी माणूस पैश्याच्या बाबतीत भ्रष्टाचारमुक्त आहे.

आयएचएफ सध्या शासकीय नियंत्रणाखाली आणणे हा एकच इलाज दिसतो आहे.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

मोहन's picture

11 Mar 2008 - 3:41 pm | मोहन

हॉकी काय किंवा क्रिकेट काय. कुठल्याही खेळाच्या महासंघाच्या पदाधिकार्‍यांच्या पदाला काळ मर्यादा घालायला हवी. ती पाच वर्षापेक्ष जास्त नसावी. ( अन्यथा १४ वर्षे पदभार सांभाळलेले गीलसाहेब ईंस्टंट कॉफी चे दाखले देत आहेत! ) सध्याची बापाची जहागीर चालवण्याची पध्दत अमुलाग्र बदलायला हवी.

खेल मंत्रालयाला जास्त अधीकार देवून प्रत्येक महासंघाच्या कार्यपध्धतीचा वार्षिक आढावा घेण्यात यावा. मंत्री पाच वर्षात एकदा बदलण्याची शक्यता असल्याने थोडा फार वचक राहू शकण्याची आशा आहे. मंत्र्यांनी वचक दिल्यास सूधारणा होवू शकते हे रेलमंत्र्यांनी दाखवून दिले आहे.

( खेलप्रेमी ) मोहन

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 9:03 am | विसोबा खेचर

हॉकीपटूंनी उपोषण वगैरेच्या धमक्या देत सरकारवर दबाव आणत काही रक्कम उपटली होती.

अशी उपोषणं वगैरे करून रक्कम उकळणं हेच मुळात मला चुकीचं वाटतं, लाचारीचं वाटतं!

आता ती रक्कम व्याजासकट वसूल करून घ्यावी काय?

१) सरकारने मुळात रक्कम देतांनाच विचार करायला हवा होता.

२) रक्कम बिनाअट दिली गेली होती का? तशी दिली गेली असेल तर आता रक्कम वसूल करणे माझ्या मते अयोग्य होईल...

आपला,
(न्यायमूर्ती) तात्या.

मुकुल१'s picture

12 Mar 2008 - 4:36 pm | मुकुल१

आपल्या पैकी किती जणांनी हॉकीची मॅच पदरचे पैसे खर्चून बघीतली आहे? खरं उत्तर द्या! ही आपली उदासीनताच हॉकीच्या नाशाला जबाबदार आहे. मला सांगा, हॉकी हा राष्ट्रीय खेळ असूनही त्याची लोकप्रियता की ती आहे? आपल्या पैकी प्रत्येक जण क्रिकेट खेळलेला असतो, पण हॉकी.. नो वे!
लोकप्रिय खेळांच्या मागे मिडीया असणार आणि मिडीयेच्या पाठींब्याने तो खेळ अधीक लोकप्रिय होणार. हे एक चक्र आहे. क्रिकेटच्या बाबतीतही हेच झाल आहे. आता हरल्या नंतर सगळ्यांना साक्षात्कार झाला की अरे खरचं की हा आपला राष्ट्रीय खेळ आहे त्याच्या साठी काहीतरी केलं पाहीजे. आता हे सगळेजण करणार काय तर प्रशिक्षकाने राजिनामा द्यावा, गिल यांनी निघुन जावं, ध्यानचंद यांच नाव शंभर वेळा घ्यावं आणि तथाकथीत जाणकार बोलवून एकमेकाना शिव्या घालाव्या. याने काय साध्य होणार? खेळासाठी काही ठोस उपाययोजना होणार आहे का? काही नाही. दोनचार दिवस चौकशीचा फार्स होईल, मिडिया ला दुसरी बातमी मीळेल, क्रिकेटचे सामने चालू झाल्यावर हॉकी हा आपला रष्ट्रिय खेळ आहे हे आपण विसरुन जावू व आपली या खेळाबद्दलची उदासीनता अशीच चढत्या भाजणीत ठेवू.

मुकुल

प्रेमसाई's picture

12 Mar 2008 - 5:29 pm | प्रेमसाई

आपण या वेळि ग्याप घेतलि आहे

सुधीर कांदळकर's picture

12 Mar 2008 - 9:03 pm | सुधीर कांदळकर

करता येत नाही मग चेंडू प्रतिपक्षाचे खेळाडू सहज काढून घेतात, वेग कमी पडतो आणि पास घेता येत नाही. मग काय होणार? स्टॉप वॉच हाती घ्या आणि पाहा
१. आपल्या डी पासून प्रतिपक्षाच्या डी पर्यंत चेंडू पास न देता सरळ न्यायला आपल्या खेळाडूंना किती वेळ लागतो व तेच काम प्रतिपक्ष किती वेळात करतो.

२. ताब्यात असलेला चेंडू आपले खेळाडू आपल्या ताब्यात किती वेळ ठेवू शकतात? आणि प्रतिपक्ष किती वेळ ठेवू शकतो?

मग लक्षात येते की आपल्याकडे मूळ कौशल्यच तोकडे आहे.

पाकिस्तानी व ऑस्ट्रेलियनांकडे सर्वागीण कौशल्य आहे. हॉलंड (नेदरर्लँड) चे खेळाडू अतिशय वेगवान अशा लाकडी पृष्ठावर खेळण्याचा सराव करतात. त्यामुळे अतिशय वेगात देखील ते चेंडूचा ताबा कायम ठेवू शकतात. बाकी सगळे युरोपिअन खेळाडू आपल्या खेळाडूपेक्षा जास्त वेगात धावू शकतात. आपण इतकी वर्षे कसे असेच बाद कसे झालो नाही हे आश्चर्यच आहे.

आणि लबाड युरोपिअन लोकांनी अंडरकटिंगविरोधी नियम आणून आपले दात पाडून टाकले.
या सर्व प्राथमिक त्रुटि ज्या मला समजतात, खेळाडूंना व पदाधिका-यांना ठाऊक असणारच. आण्खी माझासारख्या सामान्याला न कळणा-या पण अनेक गोष्टी असतीलच. त्या त्रूटि का दूर होत नाहीत हे पण कोडेच आहे. आपण फक्त पाहायचे.

एक निराश हॉकीरसिक
सुधीर कांदळकर.

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2008 - 10:27 pm | पिवळा डांबिस

याला खेळाडू, पदाधिकार्‍यांएवढेच 'टर्फ'चे मैदानही कारणीभूत आहे. कारण टर्फवर खेळताना बॉलचा वेग जास्त असल्याकारणाने कौशल्यापेक्षा शारिरीक क्षमता जास्त निर्णायक असते. आणि भारतीय खेळाडू शारिरीक क्षमतेत नक्कीच कमी आहेत.

पटण्या सारखे नाही. टर्फवर शारिरीक क्षमता जास्त लागते कबूल, पण टर्फवर खेळायचा निर्णय होऊन किती वर्षे झाली? का आपले खेळाडू ऍडॅप्ट करू शकले नाहीत? पाकिस्तानचे खेळाडू करू शकतात तर आपले का नाहीत? पाकिस्तानी माणसाची शारिरीक क्षमता भारतीयांपेक्षा सर्रास जास्त आहे काय?

रक्कम बिनाअट दिली गेली होती का? तशी दिली गेली असेल तर आता रक्कम वसूल करणे माझ्या मते अयोग्य होईल...

वा तात्या, तुम्ही तर साहित्यिक! शब्दांचा कीस कसला काढता? त्यातील भावना, उपरोधिकता जाणून घ्या ना!

आपल्या पैकी किती जणांनी हॉकीची मॅच पदरचे पैसे खर्चून बघीतली आहे? खरं उत्तर द्या!

लोक कशाला बघणार? काही चमकदार खेळ दाखवला, मॅच जिंकल्या तर लोकं बघणार! नुसता राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्याने काय होतंय? अजितपाल सिंगच्या टीमने ऑलिंपिक मेडल जिंकलं होतं तेंव्हा लोकांनी कौतुक केलं होतंच ना! त्यावेळी तर गल्लीगल्लीत मुलं हॉकी खेळायला लागली होती. कौतुक करून घ्यायला हातून तसाच पराक्रम घडायला नको?

मग लक्षात येते की आपल्याकडे मूळ कौशल्यच तोकडे आहे.

बरोबर बोललात सुधीरभाऊ! आणि ते वाढवण्याची मुख्य जबाबदारी खेळाडूंची नाही काय?

अरे सेमिफायनलला हरलांत तर आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्हाला क्वालिफाय पण होता येऊ नये? आणि स्वत:ला राष्ट्रीय खेळाडू म्हणवता? आयला, थूत तुमच्या जिंदगानीवर!!!

आपण या वेळि ग्याप घेतलि आहे

आय होप सो! आय रीअली, रीअली होप सो.....

वरील प्रतिकिया देणार्‍यांचा अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही. पण खेळाडूंच्या बाबतीत म्हणाल तर तुमचा तो व्यवसाय आहे ना? आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक न रहाणारी माणसं सन्मानाच्या अपेक्षेत पाहिली की आमचं रक्त खवळतं!
असो!
-डांबिसकाका

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 5:12 pm | धर्मराजमुटके

आयसीसी २०१७ च्या फायनलच्या दिवशी सगळ्या ऑनलाईन पेप्रांत १ ली बातमी क्रिकेटचीच होती. जसजशी भारतीय टीम हरत गेली तसतसे मग भारताने पाकीस्तानला हॉकीत चारी मुंड्या चीत केले याची बातमी पहिल्या पानावर यायला लागली. एकंदरीत उगवत्या सुर्याला नमस्कार कसा करावा हे माध्यमांकडून शिकावे.