वरणफळे अर्थातच चकोल्या

श्रद्धा.'s picture
श्रद्धा. in पाककृती
1 Jan 2010 - 12:48 pm

साहित्य : तुरीची डाळ १ १/२ वाटी, भाजलेले खोबरे आणि लसुण (मिक्सरवरुन काढुन) १/२ वाटी,

कांद्यालसणाचे तिखट, चिंच (आमटीला घालतो त्याप्रमाणे), गुळ, मीठ चवी प्रमाणे,

वरुन घालायला कोथिंबीर आणि तुप. तेल आणि फोडणीचे साहित्य, कणिक - त्यात मीठ,

हळद, हिंग,थोडेसे तिखट घालुन घट्ट मळुन घावी.

कृती : प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या. नंतर तेलामधे राई, जिरे, हिंग, हळद घालुन शिजलेली डाळ

जरा घोटुन घेउन फोडणीत घालावी. मग त्यात पाणी घालुन चिंचेचा कोळ , गुळ, तिखट मीठ

घालावे, चांगली उकळी आली की त्यात मळलेल्या कणकीच्या पोळ्या लाटुन घेउन

शंकरपाळ्याच्या आकारचे तुकडे करुन घालावेत. चांगले शिजले की डीश मधे घालुन त्यावर

तुप आणि कोथिंबीर घालुन खायला द्यावे

प्रतिक्रिया

सहज's picture

1 Jan 2010 - 3:32 pm | सहज

आवडती डिश!

अर्थात मिपावर दोन तीन वेळा येउन गेली आहे.

अजुन नव्या पाकृ येउ द्या!

निमीत्त मात्र's picture

1 Jan 2010 - 11:19 pm | निमीत्त मात्र

आवडत्या डिशच्या इतक्या पाककृत्या..वावावा!!

क्रुपया आधी शोध घ्या आणी जर ती पाकक्रुती आधी टाकली नसेल तरच टाकावी. X(

मला तर स्वप्नातही भुक लागते....

रेवती's picture

4 Mar 2010 - 3:50 am | रेवती

बोका साहेब,
तुमचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी मिपाच्या मेन्युकार्डावर भरपूर पदार्थ आहेत. ते सगळे तपासत बसणे थोडे जिकिरीचे वाटते. आता पाकृ विभागात उपविभाग पाडायची वेळ झाली असे वाटते आहे.:)

रेवती

रेवती's picture

4 Mar 2010 - 3:58 am | रेवती

ही आपल्यापैकी बर्‍याच जणांची आवडती पाकृ आहे. मी आज करते लगेच. नाहीतरी रात्री जेवायला काय करावं ते सुचत नव्हतच....
रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2010 - 2:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वा...मस्तच...!

अशा चकोल्या आई नागपंचमीच्या सणाला करायची पण पद्धत जरा वेगळी होती वाटते.

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

18 Jul 2010 - 9:48 pm | शिल्पा ब

मस्त, सोपा आणि वरण, भात आणि पोळी सगळे एकातच असलेला संपूर्ण आहार...एकदम आवडती डिश.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

बबलु's picture

19 Jul 2010 - 12:31 pm | बबलु

माझा अत्यंत आवडता पदार्थ.
बेश्ट पाकृ.

....बबलु