अवघड वळणावर

स्वाती२'s picture
स्वाती२ in जनातलं, मनातलं
5 Dec 2009 - 12:00 am

अशीच एक फॉल मधली शुक्रवारची दुपार. नेहमी प्रमाणे गाणी ऐकत माझी कामं उरकत होते. फुटबॉल सिझन. त्यातुन होम गेम. शेल्बीविल v/s रशविल. ६ वाजताच हादडून बाप-लेक गेमला जाणार . त्यामुळे संध्याकाळ्च्या जेवणाची तयारी जरा लवकरच करायला घ्यायाला हवी असे स्वतःलाच सांगत असताना स्कूलबसचा आवाज आला. ५ मिनिटांनी गॅरेज बंद केल्याचा, धाडकन दप्तर टाकल्याचा वगैरे नेहमीचे आवाज. पाठोपाठ खिदळतच लेक आत आला.
"मॉम, आज काय झालं माहितेय." त्याला हसणं अनावर होत होते.
मी नुसत्याच भुवया उंचावल्या.
"It's just hilarious" कसबस एवढ म्हणुन स्वारी खुर्चीत लवंडली. पुन्हा हसण्याचा अ‍ॅटॅक.
"हळू. आणि नीट बस नाहितर पडशिल."
"आज ते अ‍ॅबस्टिनन्सवाले आले होते ना. माझ्या शेजारी अ‍ॅन. चक्क झोपली."
"असू दे. त्यात हसण्यासारखं काय आहे?"
"पुढच ऐक ना" लेक परत खिदळायला लागला.
"पटकन सांग रे. मला बरीच कामं आहेत. उद्याची पण तयारी करायचेय." माझा पेशन्स संपायला लागला.
"त्यांची बडबड संपल्यावर मी तिला उठवलं. मग त्या लोकांनी आम्हाला कँडी दिली. तर अ‍ॅन ने मला काय विचारल माहितेय....." पुन्हा अनावर झालेलं हसणं
"......तिनी विचारलं हे लोकं रबर नाही का वाटणार....."
एक मिनिट सगळं घर गर्रकन फिरलं. नकळत आधारासाठी काउंटर गच्च पकडला. लेक त्याच्या नादात अजुनही खिदळत होता.
'stay calm', 'don't over react' संगोपनाचे मंत्र आठवत मी त्याच्याकडे बघत होते.
"देवा! गजानना!"
देवाने बळ दिलं. "अ‍ॅन पण ना..." मनातील खळबळ बाहेर येऊन चालणार नव्हते.
"....आणि मी हसलो तर माझ्यावर चिडली. इडियट. मग मी पण चिडलो. I told her- they are saying 'don't do it' and you are asking for...."
"then she said f*** ."
मला सावरायला वेळ हवा होता.
"जाऊ दे. तू आटप तुझं पटपट. आणि कॉलिनची मेल आलेय. ट्रान्सक्रिप्ट पाठवलय आणि उद्याच्या मिटिंगच कन्फर्म पण करायचय."

लेक वर पळाला आणि मी मटकन खुर्चीत बसले. टेन्शनने मान अवघडायला लागली होती. खरे तर या विषयावर त्याच्याशी संवाद होता पण तरीही त्याच्या आणि अ‍ॅनच्या या जगाची झलक पाहून मी हादरले होते.

दुसरीच्या वर्गात प्रायव्हेट स्कूल मधून हट्टाने बदली घेतलेला माझा लेक आणि रुरल भागातुन बदलून आलेली अ‍ॅन पहिल्या दिवशीच बेस्ट फ्रेंड झाले.अ‍ॅन आणि माझा लेक. खरे तर दोन टोकं. दोघांचे छंद वेगळे, अभ्यासाव्यतिरिक्त अ‍ॅक्टिव्हिटीजही वेगळ्या. शाळेबाहेर फारसे एकत्र नसायचे. पण मैत्री मात्र घट्ट. आणि आज हे असे....

नवर्‍याच्या कानावर घालायला हवे म्हणताना त्याच्या नुसत्या आठवणीनेच पायात बळ आले. सावकाशीने बसुन ठरवू काय ते म्हणत मी पुन्हा कामाला लागले.

थोड्यावेळाने लेक खाली आला. काही न बोलता त्याने पिनटबटर सँडविच बनवायला घेतले, मगाचच्या हसण्याचा मागमुसही नव्हता. सँडविच खाता खाता मधेच थांबून त्याने डिश बाजूला सारली.

"Mom, I don't want Ann doing something stupid" डोळ्यात गोंधळ आणि भीती दाटलेली.
मी गॅस बंद केला.
"मी विचारल तिला कशाला हवय म्हणून तर तिनी मला ढकलून दिलं"
"मी तिच्या डॅडशी...."
"No! Mom! You will ruin everything. Then I will be the snitch." माझं बोलणं तोडत तो जवळ जवळ ओरडलाच.

देवा! 'code of silence' . मी विसरुनच गेले होते.
"Calm down baby! Calm down! I won't say a word. I promise!" त्याने काहीशा अविश्वासानेच माझ्याकडे पाहिलं.
"बाप्पा शप्पत!" मी घाईघाईने गळ्याला हात लावला. तो थोडा शांत झाला.

"अ‍ॅनला बॉयफ्रेंड मिळालाय का?" मी चौकशी सुरु केली.
"शाळेत कुणी नाहिये"
"अरे, मग just curiocity म्ह्नणुन बोलली असेल."
"आणि बाहेर कोणं असलं तर...I just want her to have opportunities"
"सोमवारी बोल तिच्याशी. तिला सांग काहितरी वेडेपणा केला तर अ‍ॅथलेटिक स्कॉलरशिप सोड साधं शाळेच्या टीमवरही खेळता येणार नाही. आणि without double protection nothing doing. "
माझ्याशी बोलून त्याच समाधान झालं पण आता माझ्या डोक्यात किडा गेला होता.
"तू.. तू काय करयच ठरवलयस?" मगाच पासुन मागच्या बर्नरवर खदखद्णारा प्रश्न.
लेकाने डोक्याला हात लावला.
"अग माझे आई! I am going to wait!" लेक परत वर जायला उठला.
"असं सगळेच म्हणतात. उद्या तुझा विचार बदलला तर..."
"तुम्हा दोघांना आधी लेखी नोटीस देइन. झालं समाधान?" लेकाने कोपरापासुन हात जोडले.

रात्री नवर्‍याशी बोलणं झालं. तोही मुलाशी बोलला. या घटनेला वर्ष होऊन गेलं. अ‍ॅनच खेळणं , लेकाच्या उचापती सध्या तरी सर्व काही ठीक चाललय. उद्या शाळेत डान्स आहे. लेकाचा सूट, टाय काढून ठेवताय. आज पुन्हा एकदा लेकाला समोर बसवून 'उजळणी' म्हणायचेय.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

5 Dec 2009 - 12:08 am | चतुरंग

अवघड वळणावर आहात खर्‍या! (कारण त्या वयात मुलांपेक्षा आपण अवघड वळणावर असतो! :SS #:S)
आमचे चिरंजीव अजून लहान आहेत पण घोडा मैदान फार दूर नाही! :W
मानसिक ताकद वाढवणे सुरु आहे! :D

(सरळ वळणाचा)चतुरंग

शाहरुख's picture

5 Dec 2009 - 12:30 am | शाहरुख

ओह बॉय..

(वळण घेऊ न शकल्याने सरळ मार्गाने जाणारा) शाहरुख

रेवती's picture

5 Dec 2009 - 12:33 am | रेवती

अगबाब्बो!
त त प प.....आणि बरेच काही!
आज नाही पण अजून काही वर्षांनी आमच्या कडे येऊ घातलेला प्रश्न.....
स्वातीताई, तू बर्‍यापैकी चांगलं हँडल केलस गं!
या निमित्ताने आठवला मागच्या महिन्यात आमच्याकडे घडलेला किस्सा!
असाच धाडकन दार उघडल्याच्या आवाज, धप्पकन बॅकपॅक टाकल्याचा आवाज्.....अचानक माझ्याकडे येऊन म्हणाला,"तू म्हणत होतीस 'किस' करणं चांगलं कारण तू माझ्यावर खूप प्रेम करतेस."
"होय, मग त्यात शंका? .....अजून थोडा मोठा झालास कि जवळसुद्धा घेऊ देणार नाहीस."
"मग आज मी स्कूलबसमधे अनिशाला म्हटले, आय वाँट टू किस यू, तर चिडून अंगावर धावून आली. आय वील किल यू म्हणाली."
मला अर्ध्या मिनिटात घाम फुटला. काय बोलावे हे कळेना. त्याचे खाणे पिणे झाल्यावर (आणि मी शांत झाल्यावर) त्याला समजावले.....त्याला फार कळले नसले तरी प्रेमाप्रेमातला फरक समजला.....मग बाबांना सांगू नको म्हणाला. का? त्यांना हा फरक समजला नाही तर? माझी हसून मुरकुंडी वळली.

रेवती

भडकमकर मास्तर's picture

1 May 2010 - 12:02 am | भडकमकर मास्तर

त्यांना हा फरक समजला नाही तर ?
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

उदय's picture

5 Dec 2009 - 12:43 am | उदय

अमेरिकेबाहेर राहाण्यार्‍या सदस्यांसाठी खुलासा:
अमेरिकेत condom ला रबर म्हणतात.

संदीप चित्रे's picture

1 May 2010 - 1:12 am | संदीप चित्रे

कटाक्षाने 'इरेझर' म्हणावं लागतं :)

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Dec 2009 - 12:51 am | बिपिन कार्यकर्ते

खरंच अवघड वळण...

आमच्याकडे पण येणार्‍या दिवसांची चाहूल लागत आहे हळूहळू. आजच लायन किंग बघत होतो. त्यातल्या एक एक गोष्टी समजवून सांगत होतो. सिंबा आणि त्याची मैत्रिण यांचा जवळिकीचा शॉट चालू होता.... मी बेता बेताने चाललो होतो... तेवढ्यात

'ती त्याची गर्लफ्रेंड आहे ना?'

'हो'

'तरीच...'

'काय तरीच...'

'त्यांनी किस केले ना?'

मी लगेच हो म्हणून टाकले. आजचा प्रसंग उद्यावर ढकलून काहीच उपयोग नाही. हे होणारच आहे. फक्त तुमच्यासारखे नीट हँडल करता यावे अशीच अपेक्षा.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

5 Dec 2009 - 12:56 am | चतुरंग

.... मी बेता बेताने चाललो होतो... तेवढ्यात

तुम्ही बेताबेतानं जाल हो बिका पण आजकाल पोरं पोरी लई फास्ट जातात त्याचं काय? :?

(मध्यमगती)चतुरंग

चित्रा's picture

5 Dec 2009 - 3:41 am | चित्रा

फक्त तुमच्यासारखे नीट हँडल करता यावे अशीच अपेक्षा.

असेच म्हणते.

इथे (आणि तिथेही!) मुलांना अनेक गोंधळात टाकणारे संदेश मिळत असतात. त्यामुळे मुलांना वाढवणे कठीण झाले आहे. जवळचे मित्रमैत्रिणी जसे वागतात तसे वागण्याचा मोह होणे साहजिक आहे; पण जबाबदारी आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न (लहानपणी संतती, किंवा संतती नाही झाली तरी अभ्यासाकडे दुर्लक्ष, पर्यायाने शिक्षणातली महत्त्वाची वर्षे काळजी करण्यात जाणे, त्यामुळे सगळ्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होणे इ. इ. ) यांची जाणीव मुलांना असली तर त्या दिशेने पाऊल टाकताना विचार करतील.

मध्ये इथली एक इराणी आई मला म्हणाली - की " आपण आपल्या मुलांना इथे लहानपण फार वेळ देऊच शकत नाही, त्यांना सगळ्याची जाणीव करून द्यावी लागते, समाजच असा आहे". ते इथे- तिथे सोडून दिले तरी हल्ली मुलांचे लहानपण लवकर सरते एवढे खरे.

Nile's picture

5 Dec 2009 - 1:11 am | Nile

हा हा. प्रसंग वाचुन हसु आलं. तुमची परिस्थीती समजु शकतो.

नशीबवान हो अमेरीकन पोरं, सगळ्याचं व्यवस्थीत शिक्षण मिळतं, नाही तर देवाच्या कृपेनं जन्माला आलेलो आम्ही! ;)

अक्षय पुर्णपात्रे's picture

5 Dec 2009 - 1:18 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री नाइल यांच्याशी सहमत आहे. एकेकाळी माझ्या एका मित्राने जबरदस्तीच्या अब्स्टिनन्सला कंटाळून 'यातून माझी मुक्ती करणार्‍या व्यक्तिस आयुष्यभर माझ्या उत्पन्नाच्या १% रक्कम देण्यात येईल' अशी जाहीरात काढण्याचा इरादा व्यक्त केला होता. (जाहीरात देण्याइतके पैसे नसल्याने तसेच जाहीरात देण्याइतकी हिम्मत नसल्याने त्याचा इरादा बारगळला.)

Pain's picture

1 May 2010 - 12:20 am | Pain

नुसतच शिक्षण नाही, तर अनुभवही मिळतात ११-१२ व्या वर्षापासून !
पण किम्मतही चुकवावी लागते. Its a pachakge deal...

विकास's picture

5 Dec 2009 - 1:27 am | विकास

(भारतीय) आई-वडलांच्या नजरेतून पाहीले तर काळजी वाटणार अथवा "पॅनिक" होयला झाले तरी आश्चर्य वाटायला नको. मात्र मुलाशी वागतानाची आपली प्रतिक्रिया "स्थल-काल-सापेक्ष" वाटली. मुलाचे वय लक्षात घेता त्याच्याशी आता वडीलकीचे असले तरी मैत्रीचे संबंध ठेवायची वेळ आली आहे... जेव्हढा आई-वडलांकडून विश्वास दाखवला जाऊ शकतो तितकाच मुला/मुलीकडून परतीचा "आदर" आणि त्याला साजेसे वागणे होऊ शकते असे वाटते.

(अर्थात माझी वरील पोपट पंची ही अजून आपल्या भुमिकेत येण्याची वेळ आलेली नाही म्हणून आहे. :-) )

भानस's picture

5 Dec 2009 - 4:10 am | भानस

स्वाती एकदम चांगली हाताळलीस गं वेळ...:) आम्ही आलो तेव्हां लेक सहावीत होता. शाळेत पहिल्याच दिवशी वर्गात एका गरोदर मुलीला पाहून इतका गोंधळून गेला. नेमका त्याच आठवड्यात गर्भ कसा राहतो याचे अगदी डिटेल शिक्षणही मिळाले. सचित्र व चित्रफीतीसकट. सायंटिफि़कली असले तरी अकरा वर्षाला भारीच पडले गं.... :( आपली स्थिती तर आणिकच चमत्कारीक होऊन जातेय. पण मुलांना खूप समजत असते हे नक्की आणि ते विचारही करतात ही जमेची बाजू आहे. मात्र मोकळेपणी बोलायलाच हवे त्यांच्याशी.....म्हणजे आधी आपल्या मनाची तयारी करायला हवी...:) मग काय उजळणीची गरज नाहीये हे जाणवले का?:)

रेवती's picture

5 Dec 2009 - 5:51 am | रेवती

आपली स्थिती तर आणिकच चमत्कारीक होऊन जातेय.
हो ना! माझाही मुलगा ५ वर्षाचा असताना सांगत आला कि त्याच्या मित्राला भावंड झालं (तिसरं) त्यामुळे त्याने सगळी माहिती पुरवली ह्याला आणि उत्तरं देता देता माझ्या नाकी नऊ आले.
रेवती

मीनल's picture

5 Dec 2009 - 4:16 am | मीनल

तूझा मुलगा मोकळेपणे बोलतो आहे हे चांगला आहे.तो इनोसंटली सांगतो सगळ कारण ते वळण अजून यायच आहे अस मला वाटत.
माझा मुलगा आताच १२ झाला. शिंग फुटली आहेत. आईला काय सांगायच आणि काय नाही हे चांगलच समजायला लागलाय.
काही पत्ता लागत नाही बघ काय चाललय मनात.विचारलेल्या प्रश्नांची त्रोटक उत्तर मिळतात. त्यातून काय तो अंदाज बांधायचा.
वळण खरोखरच अवघड वाटतय.ते वळण एकदा सेफली ओलांडल की मी `सुटले` म्हणेन. तेव्हा निट मॅच्यरिटी आलेली असेल.

मीनल.

सुनील's picture

5 Dec 2009 - 6:05 am | सुनील

अवघड वय अधिक सांस्कृतिक धक्का यांचा एकत्र परिणाम तुम्ही फार कुशलतेने हाताळलाय.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पाषाणभेद's picture

5 Dec 2009 - 9:59 am | पाषाणभेद

मैं क्या कैता, जैसा देश वैसा भेस पहनेका, क्या? है क्या अन नै क्या? समजा क्या?
------------------------
The universal symbol for diabetes

पासानभेद बिहारी

श्रावण मोडक's picture

5 Dec 2009 - 11:20 am | श्रावण मोडक

लेख आवडला. सहज नॅरेशन, मध्येच मनोगतं... सुंदर!

विसोबा खेचर's picture

5 Dec 2009 - 6:18 pm | विसोबा खेचर

मोडकांशी सहमत..

तात्या.

प्रभो's picture

5 Dec 2009 - 2:29 pm | प्रभो

ह्म्म...असय तर..
(अजूनही वळणावर असलेला वळवळ्या)प्रभो

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

गणपा's picture

5 Dec 2009 - 3:28 pm | गणपा

स्वाती ताई बर हँडलस गं.
वाढत्या मुलांच्या शंकांच योग्य निरसन करणे हे आजकाल च्या आईबाबां समोर मोठ्ठ आव्हान आहे. टिव्ही-नेट च्या वाढत्या जाळ्या मुळे मुलं नको त्या वयात नको ते पहातात.
२ वर्षांपुर्वी लेक ३ वर्षांची असताना शेजारी राहाणार्‍या, बायकोच्या मैत्रिणीला मुलगा झाला. तिचा बाल सुलभ प्रश्न "बाळ आल कुठुन?"
आता आम्ही पुर्वापार चालत आलेल बाप्पाने दिलं न सांगता हॉस्पिटल मधुन अस सांगीतल.
(लेकीला अगदी १ वर्षांची असल्या पासुन उलट्या करण्याचा छंद आहे. आणि ती तोयाजुन नित्यनेमाने जोपासतेय.)
तर म्हणाली "ओ म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाउन तोंडातुन बाहेर काढल :? मी पण तशीच आले ना? मग आता आपण पण एक बाबु आणु अजुन" हे एकुन माझ्या पोटात गोळा आला.
पण तिला समजावल तोंडातुन नाही ऑपरेशन करुन पोटातुन काढल.

नशीब बाळ पोटात जात कस ते नाही विचारल?
(जीव भांड्यात पडला.)

आम्ही लहान पणी असे काही विचारल असत तर मोठ्यांकडुन अभ्यास कर गपचुप असा ओरडा खाऊन वर बोनस म्हणुन एक धपाटा मिळाला असता..
आता कळल मगाशी मी मुद्दाम आजकालचे आईबाबा का म्हणालो ते.

-माझी खादाडी.

विनायक प्रभू's picture

5 Dec 2009 - 5:51 pm | विनायक प्रभू

ताई,
दाखवलेल्या संयमाबद्दल अभिनंदन.
ह्या वळणावर नेमके काय बोलायचे हे माहीत नसल्यामुळे होणारे घोळ मी रोज बघतो. त्याचे दुरगामी वाईट परिणाम पण बघतो.
मुलाची वा मुलीची मानसिकता बघुन ही उत्तरे द्यावी लागतात.
कुठलीही स्टँडर्ड थिअरी नाही.
असे मोकळे बोलणार्‍या पालकांना ' हे काय थेर' हे पण ऐकावे लागते.

सहज's picture

5 Dec 2009 - 6:07 pm | सहज

लेख उत्तम आहे.

सतत सुसंवाद ठेवला पाहीजे.

स्वाती२'s picture

6 Dec 2009 - 2:56 am | स्वाती२

सर्व प्रतिसादकांचे आभार. आजकाल मुलांचे लहानपण लवकर संपते. इथे तर फारच लवकर. माझा मुलगा ४ वर्षांचा असताना आमच्या लग्नाच्या आल्बम मधे तो नाही म्हणून चिडला होता. कारण जॉनीचा आईवडिलांच्या लग्नात मिरवतानाचा फोटो त्याने पाहिला होता. तेव्हा तू नव्हतास हे उत्तर काही केल्या त्याला पटत नव्हते. शेवटी त्याला समजेल अशा भाषेत सांगितले. जेनच्या आईचा नवा बॉयफ्रेंड वगैरे उल्लेख बोलण्यात यायला लागल्यावर तर संवाद साधणे भागच पडले. तरीही ५ वीत असताना माझा मुलगा बोलायचा बंद झाला होता. विचारल की उडवाउडवी करायचा. तेव्हा मी त्याच्याच शाळेत मदत करायाला जायचे त्यामुळे शेवटी मला कळायचच. मग चिडचिड व्हायची. या काळात आमच्या फॅमिली डॉक्टरने मला धीर दिला. त्याने चार मुलं वाढवली असल्याने सगळे प्रकार अनुभवले होते. मग आम्ही त्याला समजावून सांगितले की तू आम्हाला काही सांगितले नाहिस तर आम्ही तुला प्रॉब्लेम आला तर मदत करु शकणार नाही. तुझ्या हातून चूक झाली असली तरी आम्हाला सांगितलेस तर वेळीच काहीतरी डॅमेज कंट्रोल करता येइल जेव्हढं तुम्ही मुलं लपवून ठेवाल तेवढा नंतर त्रास जास्त. त्याच्या एका मित्राला प्रॉब्लेम झाला तेव्हा माझ्या नवर्‍याने लॉयरचा खर्च करायची तयारी दाखवली. सुदैवाने तशी वेळ आली नाही पण बाबा पाठीशी उभा राहातो हा विश्वास निर्माण झाला. तसेच पार्ट्यांच्या बाबतही 'जर का अनकंफर्टेबल वाटले तर फोन कर आम्ही न्यायला येऊ. काही प्रश्न विचारणार नाही. पुढल्या पार्टीला जायचा निर्णय तुझा राहिल' असे सांगितले. त्याला दोनदा आम्हाला फोन करायला लागला. दोन्ही वेळेला आम्ही त्या बद्दल नंतर काही बोललो नाही. याच काळात आम्ही त्याला इथल्या कायद्यांची माहिती दिली. तुम्हा मुलांना जरी एखादी गोष्ट फन वाटली तरी कायद्याने तो गुन्हा असेल तर परिणाम वाईट होतात हे समजाऊन सांगितले. हळुहळु तो परत पूर्वीसारखा बोलायला लागला. मात्र स्लँगचा वापर्,r-rated comments वगैरे चालवून घ्यावे लागले. गेल्या वर्षीपासून मात्र तो खूपच मोकळा झालाय. तरीही सावध राहावं लागतच. गेल्या महिन्यात त्याच्या शाळेत sexting केलं म्हणून बरीच मुलं पकडली गेली.

स्वातीताई,
बर्‍याच दिवसांनी मिपावर आलोय् त्यामुळे वाचनाचा खूपच बॅकलॉग झालाय्. लॅपटॉप असूनही पुण्यातल्या घरी नेटची सोय नव्हती व जेंव्हा सायबरकॅफेत गेलो तेंव्हा नेमकी वीजच जायची. या वेळी पुण्यात वीज जाणे फारच झाले होते.
लेख सुरेख लिहिला गेलाय्! खरंच खूप आवडला!! विषयही अगदी आगळा-वेगळा. फारच छान हाताळलात तुम्ही हा प्रसंग.....!
सुदैवाने आमची मुलं यातून गेली आधीच गेली आहेत व नात अगदीच लहान, दोन वर्षाची, आहे. त्यामुळे सध्या carefree!
------------------------
सुधीर, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम