नमस्कार मिपाकर्स मित्र मैत्रिणींनो.
खरडफळ्यावर झालेल्या संक्षिप्त चर्चेतून हा धागा काढत आहे. लिखाण विस्कळीत वाटू शकेल याची कल्पना आहे पण भावार्थ समजून घ्यावा ही अपेक्षा आहे.
आपण नवीन वर्षाचे अनेक संकल्प करतो. त्यातले अगदी थोडे पूर्ण होतात तर बरेचसे काही अपूर्ण राहतात. मीही २०२४ नवीन वर्षांचे काही संकल्प केले होते. त्यातील एक उद्दिष्ट म्हणजे -
-: पोटाचा घेर किमान तीन इंचांनी कमी करणे :-
अर्थात हे एक उद्दिष्ट म्हणजे इतर अनेक लहानसहान उद्दिष्टे, नियोजन, अंमलबजावणी इत्यादींचा समुच्चय होता-आहे.
मी सध्या ४६ वर्षीय शहरी, मध्यमवर्गीय, पांढरपेशा, निरोगी, तरुण पुरुष आहे. श्रीकृपेने अजूनतरी तरी रक्तदाब, मधुमेह आदी विकारांचे निदान झालेले नाहीय. पण समवयीन इतर अनेकांसारखंच मलाही (विशेषतः लॉकडाउननंतर) पोट सुटलंय.
आणि मग वर संगीतल्याप्रमाणे नवीन वर्षाचा एक संकल्प म्हणून मी पोट कमी करणे, चेहऱ्यावर तकाकी आणणे, जिम मारून बाइसेप्स्, ट्राइसेप्स्, फोरआर्म्स्, शोल्डर्स्, काव्ज्, ऍब्स्, थाइज् वगैरे बनविणे, पातळ टीशर्ट् घालून बुलेटवर बाहेर निघालो तर इतरांनी वळून पाहायला हवं असं दिसणे वगैरे बाबी ठरविल्या. अर्थात त्या आधीही अनेकदा ठरविल्या होत्या!
सुरुवातीला खूप उत्साह होता पण हळूहळू तो उत्साह थंड पडत गेला. अर्थात अधून मधून थोडी थोडी धुगधुगी येत राहते. पण त्यात काही सातत्य नाहीय; इच्छा अजूनही मेली नाहीय हे नक्की.
सुदैवाने "अरे, चाळीशी उलटली की अनेक पुरुष उतारवयाचे नियोजन करायला लागतात. तू शेहेचाळीशी येऊनही अजून बॉडी बनवून इतरांना(!) दाखविण्याचे किमान टार्गेट तरी ठेवतो आहेस हे काही कमी आहे का? तू प्रयत्न करत राहा." अशी प्रेरणा मला अर्धांगिनीकडून वेळोवेळी मिळते. पण म्हणतात ना, प्रेरणा ही आंघोळ करण्यासारखी असते, रोजची रोज लागते. ती कुठेतरी कमी पडतेय.
आता २०२४ वर्षाचे पहिले सहा महिने उलटलेत; अजून सहा महिने राहिलेत. "शरीर समृद्धी" हा माझा एक संकल्प खूप काही मार्गी लागलेला नाहीय.
कदाचित माझ्यासारखे तुम्हीही एक शरीर-समृद्धीप्रेमी मिपाकर असाल. काही ना काही कारणांमुळे तुमचेही शरीर समृद्धीचे उद्दिष्ट अपेक्षित रीतीने पूर्ण होत असेल-नसेल. काहीजण आपले फिजिक् मस्त मेंटेन् करत असतील, काही जण त्यांचा हेवा करत असतील तर अजून इतर काहीजण त्यांच्याकडे "हे शोभते का या वयात" असे म्हणून दुर्लक्षही करत असतील. कुणाला "आपण चांगले दिसावे" ही प्रेरणा असेल तर अजून कुणाला डॉक्टरांनी सल्ला दिला असेल. पण प्रत्येकाकडे इथे लिहिण्यासारखे (आणि ते इतरांना उपयोगी पडण्यासारखे) नक्कीच काहीतरी असेल!
चला तर मग, आपले शारीरिक समृद्धीचे प्रयत्न, नियोजन, अनुभव, यश-अपयश, सल्लामसलत, व्यायाम, कसरत, जिम, योग, प्राणायाम, ध्यान वगैरे इथे लिहुयात. सर्वांनाच फायदा होईल. मीही प्रतिसादांतून लिहीन.
विषयानुरूप चर्चा व्हावी, थोडेफार अवांतर-सवांतर वगैरे चालेल पण अगदी पातळी सोडून नको ही अपेक्षा.
वाचने
13411
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह. उत्तम.
वाह. उत्तम.
In reply to वाह. उत्तम. by प्रसाद गोडबोले
Do not breathe. Air is
In reply to वाह. उत्तम. by भागो
Do not breath.
In reply to वाह. उत्तम. by भागो
१० दिवसात ३.५ किलो वजन कमी
In reply to वाह. उत्तम. by प्रसाद गोडबोले
आहार >>
In reply to १० दिवसात ३.५ किलो वजन कमी by कांदा लिंबू
चुकीची दुरुस्ती
In reply to आहार >> by प्रसाद गोडबोले
>> १० दिवसात ३.५ किलो वजन कमी
In reply to वाह. उत्तम. by प्रसाद गोडबोले
प्रश्नाचा रोख कळाला नाही.
In reply to >> १० दिवसात ३.५ किलो वजन कमी by अमर विश्वास
>>>तुमच्या प्रश्नाचा रोख
In reply to प्रश्नाचा रोख कळाला नाही. by प्रसाद गोडबोले
"तुम्ही असं समजा की हे
In reply to प्रश्नाचा रोख कळाला नाही. by प्रसाद गोडबोले
ओह!
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
कै. रंगिला रतन....
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
धक्कादायक
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
रंगीला रतन
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
ॐ शांती
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
डॉ.जोत्स्ना पाटील अत्यंत
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
रंगीला रतन ह्यांना
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
फक्त आयुर्वेद किंवा फक्त अलोपथी
In reply to रंगीला रतन ह्यांना by प्रसाद गोडबोले
अभिनंदन!
Burpees २० करा ,mountain
In reply to अभिनंदन! by Bhakti
योग दिवसातून अनेक वेळा करतात
In reply to Burpees २० करा ,mountain by कांदा लिंबू
चाळीशीनंतर आहाराने पोट कमी
+१
In reply to चाळीशीनंतर आहाराने पोट कमी by कंजूस
-१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोटाचा घेराव कमी करण्यास
In reply to -१ by कांदा लिंबू
उत्तम धागा.
बॅडमिंटन
In reply to उत्तम धागा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवांतर-सवांतर-हैदराबादी
In reply to बॅडमिंटन by कांदा लिंबू
वजन
In reply to अवांतर-सवांतर-हैदराबादी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पस्तीशीपर्यंत पयशे आणि शक्ती
In reply to उत्तम धागा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोडसं माझं सांगतो,
Typo!
In reply to थोडसं माझं सांगतो, by कांदा लिंबू
आठवडाभराचे एकदाच जेऊन घेतो व
In reply to थोडसं माझं सांगतो, by कांदा लिंबू
वाचत आहे ...
शक्यतो दर रविवारी दहा ते पंधरा किलोमीटर चालतो आहे.
+१ मस्त ! छान रचना !
In reply to शक्यतो दर रविवारी दहा ते पंधरा किलोमीटर चालतो आहे. by कर्नलतपस्वी
वाह... बहोत खुब कर्नल साहब!
In reply to शक्यतो दर रविवारी दहा ते पंधरा किलोमीटर चालतो आहे. by कर्नलतपस्वी
जीवनातील कुठल्याही क्षेत्रात
In reply to वाह... बहोत खुब कर्नल साहब! by टर्मीनेटर
मी माझे वजन, साखर इ कधी मोजत
+१
In reply to मी माझे वजन, साखर इ कधी मोजत by arunjoshi123
आयुर्वेदात हिरडा, बेहडा आणि
व्वा. कर्नलसाहेब. अगदी नेमके सांगितलेत.
कोणे एकेकाळी मीही नवीन वर्षांचे संकल्प करायचो
HIIT बद्दल खरडफळ्यावर चर्चा
अवांतर : घातक लस
माझ्या मित्राने नाही म्हणजे
In reply to अवांतर : घातक लस by नठ्यारा
घाईघाईत बनवलेल्या लसीचे गिनीपिग
In reply to माझ्या मित्राने नाही म्हणजे by Bhakti
मन हेच मुख्य कारण
आरोग्य-समृद्धी बद्धल माझे विचार -
- रक्तदाब - ७०-१२० च्या मध्ये असणे
- रक्तसाखर - १००-१५० च्या मध्ये असणे
- स्पष्ट आवाज व उच्चार असणे
- स्पष्ट नजर असणे
- स्पष्ट ऐकू येणे
- दोन-पाच मजले चढले तर फारसा दम न लागणे
- तीस किलोचे तांदुळाचे पोते सहज उचलून नेता येणे
- स्त्रीची मासिक पाळी व्यवस्थित होणे
- भरपूर कामेच्छा व शक्ती असणे
- लघवी / शौचास साफ होणे
- पुरेशी भूक लागणे व जेवल्यावर तृप्त वाटणे
- शांत झोप लागणे, सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटणे
- गरज पडल्यास दोनेक किलोमीटर न थांबता धावता येणे
- असे काही श्रम केल्यावर अल्प वेळात श्वास व हृदयगती सामान्य पातळीवर येणे
- एकूणच सुदृढ, सक्षम, उत्साही वाटणे
- इत्यादी
- हे निकष दर वर्षी / दर सहा महिने / दर तीन महिने / दर महिना वगैरे अंतराने पूर्ण करता येणे
ही यादी केवळ मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आहे. तज्ज्ञांनी दुरुस्त करावी. --- रच्याक, एखादी व्यक्ती हे निकष सातत्याने पूर्ण करत असेल तर ती मद्यपान, मांसाशन, तंबाखूसेवन करत असेल तर काय हरकत आहे? इशारा: मद्यपानाने मृत्यू येतो. तंबाखूसेवनाने वेदनादायक मृत्यू येतो.माहिती बद्दल धन्यवाद
In reply to आरोग्य-समृद्धी बद्धल माझे विचार - by वामन देशमुख
आळस हा एक मोठा शत्रू आहे. आपण