वैज्ञानिक घडामोडी - भाग १

arunjoshi123's picture
arunjoshi123 in तंत्रजगत
17 Nov 2017 - 12:54 pm

प्रिय मित्रहो,
आपण विज्ञानशासित जगात राहतो. खालच्या पानावर scientific revolution शास्त्रीय समजुती कशा बदलतात हे कुन या लेखकाने मांडले आहे. वैज्ञानिक ज्ञानाच्या स्वरुपाबद्दल त्यांचं वरच्या लिंकमधे दिलेलं पुस्तक महत्त्वाचं मानलं जातं.

त्यात खालचा उतारा महत्त्वाचा वाटला -

Normal scientific progress was viewed as "development-by-accumulation" of accepted facts and theories. Kuhn argued for an episodic model in which periods of such conceptual continuity in normal science were interrupted by periods of revolutionary science. The discovery of "anomalies" during revolutions in science leads to new paradigms. New paradigms then ask new questions of old data, move beyond the mere "puzzle-solving" of the previous paradigm, change the rules of the game and the "map" directing new research.

त्याचं हे भाषांतर/सार -
- आजवर शात्रीय पद्धतीने स्वीकारलेल्या सत्यांचा आणि तत्वांचा संचय म्हणजे सामान्य विज्ञान. या अशाच सामान्य विज्ञानाने विश्वाकडे पाहण्याची संकल्पना मधेच कधीतरी नविन क्रांतीकारी वैज्ञानिक उदाहरणांमुळे, घडामोडींमुळे मोडीत निघते. याचे कारण असलेल्या ज्ञानात आणि तत्त्वांत या नविन घडामोडींमुळे काही विसंगती आढळून येतात. या घडामोडी जुन्या माहितीबद्दल नवे प्रश्न उभे करतात. मग वैज्ञानिकांचे "मागच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या मदतीने प्रश्न सोडावयचे" हे काम "नविन स्वरुपाचे ज्ञान निर्माण करणे, मागचे ज्ञान दुरुस्त करणे वा त्यागणे" अशा रुपाचे बनून जाते. अशा वेळी संशोधनाची दिशा बदललेली असते.

भाषांतर समाप्त
===================================================
आजच्या वैज्ञानिक जगाचं हे सौंदर्य आहे कि अनेक क्षेत्रांत संशोधनाची दिशा बदलत आहे. विज्ञान आणि विज्ञानेतर शास्त्रे, अशास्त्रे यांचेतील संबंध चित्रविचित्र, नवनवे चेहरे धारण करू लागले आहेत. खासकरून मानवेतिहास नि समाजशास्त्र यांच्यावर होणारे वैज्ञानिक शोधांचे परिणाम फार रोचक निघत आहेत. अगदी विशुद्ध भौतिक विश्वाची , त्याच्या स्वरुपाची संकल्पना देखील वेळोवेळी बदल पावत आहे. आपल्या जीवनकालात हे सगळं चाललं आहे नि कदाचित आपण अहोभाग्यवान आहोत. खिळवून ठेवणार्‍या चित्रपटाचा क्लायमॅक्स अजून जवळ येत असणं हे क्लायमॅक्सची आयडीया आल्यापेक्षा जास्त सुंदर! आपण तशाच अवस्थेत आहोत. आपल्यापैकी अनेक जण अनेक वैज्ञानिक क्षेत्रांत काम करत असणार, किंवा तिथल्या क्लायमॅक्सच्या निगडीत बाबींशी परिचित असणार. किंवा अनेकांना अस्साच रस असणार. त्यांनी या धाग्यावर त्या क्षेत्रातल्या ताज्या घडामोडींची लिंक देणे अपेक्षीत आहे. बातमी, ब्लॉग, लेख, व्हिडिओ, इ इ. शिवाय लिंक देणाराने कोणती सद्यकालीन वैज्ञानिक समजूत डगमगणार आहे वा कोणती नविन समजूत प्रस्थापित होणार आहे याबद्दल किमान २-३ ओळी स्वतःच्या लिहिणे मला अभिप्रेत आहे. यात समाजशास्त्र आणि अन्य तत्सम शास्त्रांतील शोध हे देखिल शुद्ध विज्ञानाशी संबंधित असतील टाकायला हरकत नाही.
========================================================
थोडक्यात - विज्ञानाच्या चित्रपटातला क्लायमॅक्स मला किती चांगल्या प्रकारे सांगता आला आहे ठाऊक नाही, पण तुम्ही कोणीही कोणतीही वैज्ञानिक बातमी मराठी वा अमराठी माध्यमात वाचलीत तर त्यातून तुम्हाला पडलेला प्रश्न वा मनात आलेला विचार या धाग्यावर टाका.
--------------------------
प्रत्यक्ष विज्ञानावर बोलण्यात आपण फार टाळाटाळ करतो. नि खासकरून आपण विज्ञान या क्षेत्रातले नसलो तर आपण त्यावर न बोलणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार मानतो. मनातील प्रश्नांचा, विचारांचा मागोवा आपण उपलब्ध प्रत्येक शास्त्राद्वारे घेतला पाहीजे, नि यात विज्ञान देखील आले.
=========================================================
मी दोन उदाहरणे प्रारंभ म्हणून देत आहे.
http://zeenews.india.com/environment/scientists-find-plastic-in-creature...
या बातमीत प्लास्टीकचा परीणाम कुठपर्यंत पोचला आहे हे सांगीतलं आहे. पृथ्वीवर आता अप्रदूषित काय उरलं आहे असा एक प्रश्न निर्माण होतो. हवा, पाणी, स्पेस, जमिन, ध्रुव, नि आता सर्वात खोल अशा समुद्रातील जागा!
------------------------
https://newatlas.com/geoengineering-climate-chaos-cylcone-drought/52227/
Geoengineering
भूविज्ञान वापरून क्लायमेट चेंज हाताळावा का? ते सगळ्यांवर शेकणार तर नाही? जो एरोसोल वापरून पर्यावरण थंड करायचे आहे त्याचा एखादा "गुणधर्म" नंतर उघडकीस आला तर?

प्रतिक्रिया

लेख विचारांना चालना देणारा आहे.

रोज सकाळी पेपरात ( एक बातमीचे माध्यम धरा) एक नवीन शोधाची बातमी असेल अशी अपेक्षा धरण्याइतक्या वेगाने संशोधन होत आहे. निरनिराळ्या पृथ्वीतलावरच्या क्रियांच्या कार्यक्षमताच शोधणाय्रा प्रणालींचे कौतुक राहील. हासुद्धा प्रत्यक्ष शोधच असणार आणि तो परिणामकारक ठरेल.
१) एखाद्या देशाच्या हवामानाप्रमाणे तिथे अधिकाधिक किती शेतीउत्पन्न येऊ शकेल.
२) ठिकाणाच्या उन्हापासून/ वाय्रापासून किती वीज करता येईल?
३) मोबाइलच्या चिपने ५६-२८-१४नानोमि लेवल गाठली आहेच ,पुढे काय? त्याचा परिणाम काय होईल?

arunjoshi123's picture

17 Nov 2017 - 1:52 pm | arunjoshi123

१) एखाद्या देशाच्या हवामानाप्रमाणे तिथे अधिकाधिक किती शेतीउत्पन्न येऊ शकेल.

आदर्शतः कोणत्याही देशात कदाचित कितीही शेतीचे उत्पन्न घेता यावे. जमीन लागवडीखाली यावी म्हणून अन्य देशातून माती आयात करता येईल. अधिक जमीन उपलब्ध व्हावी म्हणून इमारती अति उंच बांधता येतील वा जिथे पीक येणे असंभव आहे तिथे बांधता येईल. समुद्राचे पाणी शुद्ध करून वापरता येईल. पाणी पुरवठ्यासाठी सौर उर्जा वापरता येईल. पिकांत जनुकीय बदल करता येतील. कोणती पिके घ्यायची ते ठरवता येईल. पिकांचे संरक्षण करायला प्रगत तंत्रज्ञान वापरता येईल.
पण याचे परिणाम काय होतील हे अधिक महत्त्वाचं. हे सातत्यशीलतेनं किती काळ अबाधित ठेवता येईल हे महत्त्वाचं. सध्याला यापैकी कशाचीच गरज नाही कारण आयात परवडते. पण हळूहळू या अवस्थेकडे वाटचाल असेल.
२) ठिकाणाच्या उन्हापासून/ वाय्रापासून किती वीज करता येईल?
वर्षाच्या एकूण सौरप्रपातापैकी आपण केवळ १ तासाचा प्रपात सृष्टीचक्र चालवायला करतो. सौर उर्जा अवकाशातच ग्रहण करून पृथ्वीवर पाठवायची असं तंत्रज्ञान विकसित झालं तर उर्जा नावाची समस्याच उरणार नाही. तरी उर्जाप्रकल्पांना उपलब्ध असलेली जागा, विषुववृत्तापासूनचे अंतर किती सौर सेल्सची क्षमता (एफिशिएंसी), विद्युत साठवण्याचे तंत्रज्ञान, ही वीज जिथे वापरायची आहे तिथपर्यंत नेतानाचा लॉस, त्या उपकरणांतील लॉस असे अनेक लॉसेस हे घटक महत्त्वाचे आहेत. सरकार अशा प्रत्येक ठीकाणचा विदा निर्माण करत आहे आणि प्रकल्प हाती घेत आहे. पुनर्जन्य वीजेचा वाटा वाढावा यासाठी जगात खूप स्तुत्य उपक्रम हाती घेतले जात आहेत.
३) मोबाइलच्या चिपने ५६-२८-१४नानोमि लेवल गाठली आहेच ,पुढे काय? त्याचा परिणाम काय होईल?
https://en.wikipedia.org/wiki/14_nanometer
मला या क्षेत्रात गती नाही, पण हे पेज वाचून १४ एन एम ही चिपची साईज आहे का त्यावरच्या एका "वायरची/लाईनची" असा प्रश्न पडला.

arunjoshi123's picture

17 Nov 2017 - 1:58 pm | arunjoshi123

Gene editing
ही बातमी देखील मला रोचक वाटली. अगदी माणसाचे जीन्स बदलणारे प्रोटीन्स म्हणजे कमाल आहे. शरीराच्या पेशींमधे जे कम्यूनिकेशन होतं त्यामधे इतर पेशीं सर्व पेशींचं एक विशीष्ट कंपोझिशन गृहित धरत असाव्यात. मग हे जनुकांच्या धाग्यावर विशिष्ट भागाला काही पेशींत रिप्लेस करणार की सर्व? आणि हा बदल शरिराच्या सर्व पेशींना कसा कळणार?

विशुमित's picture

17 Nov 2017 - 2:19 pm | विशुमित

अजो जी ..

छान आणि माहितीपूर्ण धागा काढल्याबद्दल आभारी आहे..

गामा पैलवान's picture

17 Nov 2017 - 7:01 pm | गामा पैलवान

माणसाचा डीएने आता कॉपी पेस्ट करता येईल :
http://www.bbc.co.uk/news/health-40802147

आत्तापावेतो प्रयोग केलेले भ्रूण नष्ट केले जात. मात्र एखादा वाढवून गर्भावस्थेत नेणे शक्य आहे. यातून पुढे जनुकारेखित बालके (= डिझायनर बेबीज) जन्मास घालता येतीलसं वाटतं.

-गा.पै.

कार्यप्रणाली सुधारत जाणे म्हणजे त्याची कार्यक्षमता वाढवत जाणे.
वाय्राची/पाण्याची वीज यामध्ये गणिती लोकांना क्षमता शोधली आहे.
चिपचा शोध झाला पण आता कांपोनंट किती वाढवत नेता येतील एका चौ सेंमिला ते किती लहान आणि किती जवळ बसवता येतील यावर ते आता १४ एनएम इतके जवळ आलेत. एक एनएम ही शेवटची मर्यादा असेल.

सुबोध खरे's picture

18 Nov 2017 - 6:25 pm | सुबोध खरे

१० नॅनोमीटर ची चिप ऑलरेडी आली आहे. क्वालकॉमचा स्नॅप ड्रॅगन ८३५ हि चिप १० नॅनोमीटर ची आहे.
https://www.qualcomm.com/products/snapdragon/processors/835
https://www.91mobiles.com/list-of-phones/snapdragon-835-mobiles हे ती चिप बसवलेले फोन भारतात उपलब्ध आहेत
आणि हि प्रक्रिया १ नॅनोमीटर ला थांबण्याचे कारण दिसत नाही.०. १ नॅनोमीटर ( १०० पिको मीटर) का येऊ नये?

गोंधळी's picture

18 Nov 2017 - 11:39 am | गोंधळी

सध्या AI बद्दल खुप चर्चा एकण्यात येत आहे. खुप संशोधन चालु आहे.
कोणी I ROBOT हा चित्रपट पाहिल्यास याची कल्पना येउ शकते.
काहि experts च्या मतानुसार हे तंत्रज्ञान मानवाला धोकादायक आहे तर काही त्याचे खुप फायदे असल्याचे सांगत आहेत.

AI बद्दल काहि अभ्यासु आयडींनी प्रकाश टाकावा.

काही दुवे

https://www.youtube.com/watch?v=qetcWN8iWT0

https://www.youtube.com/watch?v=EVwDWMhTInY

दीपक११७७'s picture

21 Nov 2017 - 12:33 pm | दीपक११७७

छान धागा

वाखुसा.
जमेल तशी भर टाकेन.

गोंडस बाळ's picture

2 Jan 2018 - 11:49 am | गोंडस बाळ

माहितीवर्धक धागा

manguu@mail.com's picture

29 Jan 2018 - 5:52 pm | manguu@mail.com

https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/youth-death-in-na...

वैद्यकीय सुरक्षा नियमांबाबत बेफिकिरी दाखवणाऱ्या सरकारी तसेच पालिका रुग्णालयांतील अनागोंदी जिवावर कशी बेतू शकते, हे नायर रुग्णालयातील दुर्घटनेने रविवारी सर्वांसमोर आले. एमआरआय विभागात कोणतीही धातूची वस्तू नेऊ नये, असा सक्त नियम असताना, एका रुग्णाच्या नातेवाईकाला ऑक्सिजन सिलिंडर नेण्यास कुणीही मनाई केली नाही आणि या मशिनच्या अतितीव्र विद्युत चुंबकीय शक्तीने सिलिंडरसह या तरुणाला मशिनमध्ये ओढून घेतले. त्यानंतर सिलिंडर फुटून वायू शरीरात गेल्याने त्याचा अंत झाला.

MRI म्हणजेच मॅग्नेटिक रेझनन्स इमेजिंग. याला आपण मराठी भाषेत चुंबकीय अनुनाद प्रतिबिंबन देखील म्हणू शकतो. हे मेडिकल इमेजिंग तंत्र आहे. याद्वारे डॉक्टर शरीरातील अंगांचे फोटो मिळवतात.

- शरीराच्या आतील अंगांचे फोटो काढण्यासाठी MRI मशीन अतिशय शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ तरंगांचा वापर करते.

- याच कारणामुळे धातूची कोणतीही वस्तू , मग ती सुई असो, किचनचा किंवा मग ऑक्सिजन सिलेंडर असो, अशा वस्तू चुंबकीय शक्तीमुळे त्वरीत MRI मशीनकडे आकर्षित होतात.

https://m.maharashtratimes.com/india-news/strictly-avoid-these-mistakes-...