व्हेरिएशन-२ फुलवर/ फुलकोबी /कॉलीफ्लॉवर

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in पाककृती
31 Oct 2017 - 10:53 am

साहित्य:
१ मध्यम कॉलीफ्लॉवरचा गड्डा बारीक गुच्छ काढलेला, कांदा (लिंबाएवढा छोटा), लसूण (४ मोठ्या पाकळ्या), आलं (१ इंच),

१ शहाळ्याची मलाई (मॉर्निग वॉक ला जाताना मलईवाला नारळ घ्या, पाणी प्या, नारळवाल्याला मलाई पार्सल करून मागा)

१ टीस्पून धने, १/२ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून मोहोरी, ४ दाणे मिरी, ४ दाणे मेथ्या, १ टीस्पून लाल मिरची पावडर,
थोडी हळद (तुमच्या जजमेंटनुसार ), थोडं मीठ (तुमच्या जजमेंटनुसार ), कोथम्बीर गार्निशसाठी (तुमच्या जजमेंटनुसार )

फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १ कढीपत्त्याची डहाळी
==============================================================

पूर्वकृती : एका उघड्या पातेल्यात (कॉलीफ्लॉवरचे बारीक गुच्छ बुडतील व वर साधारण एक इंच पाणी येईल, एवढे )
पाणी घेऊन त्यात एक टीस्पून मीठ टाकावे व उकळत ठेवावे, पाणी खळखळा उकळू लागले कि त्यात
फ्लॉवर टाकावा, कांद्याची साल काढून फक्त ४ मोठ्या फोडी कराव्या व त्या फोडी सुद्धा फ्लॉवरबरोबर शिजू द्याव्या, **झाकण मारू नका....
साधारण तुम्ही खाता त्याच्या ८०% शिजले असे वाटते तेव्हा, गॅस बंद करा.... दोन तीन मिनिटे त्यात फ्लॉवर राहू देत .. **पातेल्यावर झाकण लावू नका....
मोठ्या जाळीतून सर्व पाणी काढून फ्लॉवर निथळत राहू द्या ....

मिनव्हाईल तुम्ही
माध्यम आचेवर धने भाजा, सतत उलथनं हलवत भाजत राहणे, भाजल्यावर बाजूला ताटात काढा..
माध्यम आचेवर जिरे+मोहोरी+मेथ्या+मिरे भाजा, सतत उलथनं हलवत भाजत राहणे, साधारण सगळी मोहरी तडतडल्यावर, सर्व बाजूला धन्याच्या ताटात काढा..

==================================================================
वाटण :
ताटात काढलेलं कोरडा मसाला व थोडी हळद, लाल मिरची पावडर टाकून मिक्सरमध्ये पावडर होईपर्यंत वाटा... वाटून झाल्यावर ताटात बाजूला काढा...

आता त्याच मिक्सरच्या भांड्यात बारीक कापलेली मलाईखोबरं (गरज भासल्यास चमचा चमचा पाणी टाकून) गंध वाटून घ्या, बाजूला काढून ठेवा....

आता मिक्सरच्या भांड्यात नखभर हळद, शिजलेला कांदा, आलं (साल काढलेलं), लसूण गंध वाटून घ्या....

==================================================================
कृती:
कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता टाकावा, कढीपत्ता परतल्यावर लगेच २-४ सेकंदाच्या अंतराने
कांदा आलं लसणाचे वाटण घालावे (नाही तर कढीपत्ता जळू शकतो) साधारण २-३ मिनिटे परतावे. कांदा आलं लसूण फोडणीचा सुगंध दरवळू लागताच त्यात,
आच मध्यम करावी, मलाई खोबऱ्याचे वाटण घालावे मध्यम आचेवर परतत राहावे. मलाई परतू लागल्यावर तेल सोडायला लागेल... मग गॅस मंद करून, त्यात
कोरडा मसाला घालावा व दोन चमचे पाणी घालावे (पाणी आपण मसाला गुठळ्या राहू नये व चांगला मिळून यावा म्हणून टाकतोय)
तेल सुटायला लागल्यावर निथळेला फ्लॉवर घालून हलक्या हाताने परतत राहा, ३०-४० सेकंदाने गॅस बंद करा.

कोथंबीरीने गार्निश करा.

गरम पोळी / फुलका / मोकळा भात बरोबर सर्व्ह करावी.
==================================================================
*भूक लागल्याने, फोटो काढायचे ध्यानात येईपर्यंत, भाजी सर्व्ह दरम्यान काढलेला फोटो टाकतोय

f2

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

31 Oct 2017 - 10:57 am | पगला गजोधर

कृती:
कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता टाकावा, कढीपत्ता परतल्यावर लगेच २-४ सेकंदाच्या अंतराने
कांदा आलं लसणाचे वाटण घालावे (नाही तर कढीपत्ता जळू शकतो) साधारण २-३ मिनिटे परतावे. कांदा आलं लसूण फोडणीचा सुगंध दरवळू लागताच त्यात,
आच मध्यम करावी, मलाई खोबऱ्याचे वाटण घालावे मध्यम आचेवर परतत राहावे. मलाई परतू लागल्यावर तेल सोडायला लागेल... मग गॅस मंद करून, त्यात
कोरडा मसाला घालावा व दोन चमचे पाणी घालावे (पाणी आपण मसाला गुठळ्या राहू नये व चांगला मिळून यावा म्हणून टाकतोय)
तेल सुटायला लागल्यावर निथळेला फ्लॉवर घालून हलक्या हाताने परतत राहा, ३०-४० सेकंदाने गॅस बंद करा.

कोथंबीरीने गार्निश करा.

गरम पोळी / फुलका / मोकळा भात बरोबर सर्व्ह करावी.

खोबरं घातलेल्या सगळ्याच गोष्टी प्रिय, त्यामळे करून बघेन नक्कीच!

भाजी चांगलीये, पण कढईच्या कडा अंमळ जास्तच काळ्या झाल्यात.

आंबट गोड's picture

31 Oct 2017 - 12:13 pm | आंबट गोड

कृति वाटत्येय. त्यात खोबर्‍याने अजूनच . फ्लॉवर अगदी नावडती भाजी.. त्यामुळे माझा पास.

mayu4u's picture

31 Oct 2017 - 5:50 pm | mayu4u

पांचटच आहे. लेखकासारखी.

श्रीरंग_जोशी's picture

2 Nov 2017 - 10:34 am | श्रीरंग_जोशी

सर्वप्रथम फुलकोबी हा मराठमोळा शब्द शीर्षकात पाहून आनंद झाला. लहानपणीपासून फुलकोबीची भाजी मला खूप आवडते. पानकोबीचीही आवडते पण फुलकोबी अधिक प्रिय. माझ्या लहानपणी संकरित नसलेली फुलकोबी मिळायची. ती चव आता मिळणे जवळपास अशक्य आहे. त्या काळी उन्हाळ्यात फुलकोबी मिळायची नाही. ऑगस्ट महिन्यात जी नवी फुलकोबी यायची तिचा सुगंध अविस्मरणीय आहे.

या पाककृतीसाठी धन्यवाद.

छान आहे पाकृ. शहाळ घालण्याची आयडीया आवडली.