शेजार्‍याच्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in काथ्याकूट
19 Sep 2017 - 6:29 pm
गाभा: 

मित्रहो !

जर आपल्याला शेजार्‍याच्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा अतोनात त्रास होत असेल तर काय करावे ? कुठे तक्रार करावी? पुण्यात कोठे करावी ?
मी असे ऐकले आहे की या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही. हे खरे आहे का? या बाबतीत काय कायदे आहेत ? ते सगळे कुत्री पाळणार्‍यांच्या बाजूनेच आहेत का ?
कोणाला या बाबतीत अनुभव असेल तर जरूर येथे लिहा. मी सध्या या त्रासातून जात आहेत म्हणून हा विषय चर्चेला मांडला आहे. यावर असा धागा पूर्वी आला असेल व त्यावर ही चर्चा झाली असेल तर त्याची लिंक मला दिलीत तर बरं होईल. मग हा धागा उडवता येऊ शकेल.

आमच्या मागे एक बाई राहते. तिच्याकडे दोन कुत्री आहेत. ती बिलकूल शिकवलेली नाहीत. शिवाय ती म्हणते की ती अ‍ॅनिमल वेलफेअर ऑफिसर आहे. सरकारी नेमणूक आहे.

जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Sep 2017 - 6:46 pm | अमरेंद्र बाहुबली

एखाद्याला सुपारी द्या कुत्रे गायब करण्याची. हा प्रभावी ऊपाय! माझ्या हाँस्टेल मध्ये ही कुणीतरी पाळल होत. ते कुत्रं कुणाच्याही रूम मध्ये घुसायचं, घाण करायचं. शेवटी एका काम करनार्याला सुपारी दीली. त्यानंतर कधीच ते कुत्रं पुन्हा दिसलं नाही.

गामा पैलवान's picture

19 Sep 2017 - 6:57 pm | गामा पैलवान

यावरून आठवलं की माझ्या हॉस्टेलवर असंच भटकं कुत्रं पडीक राहायचं. शेवटी त्याला अडगळीच्या खोलीत नेलं आणि तिथेच दोन दिवस कोंडून ठेवलं. तिसऱ्या दिवशी दार उघडल्यावर जी धूम ठोकली त्याने की नंतर परत दिसलंच नाही. मात्र हा उपाय जयंतरावांच्या शेजारच्या कुत्र्याला लागू पडेलसं दिसंत नाही.

-गा.पै.

मार्मिक गोडसे's picture

19 Sep 2017 - 6:52 pm | मार्मिक गोडसे

एकलव्याने केला होता यशस्वी प्रयोग, परंतू त्याला अंगठा गमवावा लागला होता. अंगठा हा मोठा 'आधार 'आहे आपल्यासाठी.

जयंत कुलकर्णी's picture

19 Sep 2017 - 6:53 pm | जयंत कुलकर्णी

कृपया अवांतर नको.

गामा पैलवान's picture

19 Sep 2017 - 6:59 pm | गामा पैलवान

चुकून टाकलं अवांतर. क्षमा असावी.
-गा.पै.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Sep 2017 - 7:19 pm | अमरेंद्र बाहुबली

अवांतर तुम्हाला नाही आहे हो. दोन्ही प्रतिक्रियेतील वेळ पहा. आणी हा सुपारीवाला उपाय एकदम प्रभावी आहे. हा उपाय जरूर लागु पडेल. ह्या विषयात एकतर लोकांची सहानुभूती कुत्र्याला मिळते. मुकं जनावर वैगेरे! त्यामुळे सरळ मार्गाने जाऊन उपयोग नाही. ऊगाच सर्व गावाला माहीत पडेल की जयंत साहेबांना कुत्र्याचा त्रास आहे नंतर कुत्रं नाहीसं झालं तरी सर्व लोकं ह्यांच्यावरच संशय घेतील. त्यामुळे गुपचुप कुत्रं नाहीसं केलं तर कोणालाच समजणारं नाही.वरून नंतर त्या बाईला सहानुभूती द्यायची. "इथे कुत्रे टिकतचं नाही." त्यामुळे ती देखील नंतर कुत्रे पाळणार नाही.

मराठी कथालेखक's picture

19 Sep 2017 - 7:39 pm | मराठी कथालेखक

पाळलेली कुत्री कशी नाहिशी करणार ? घरात जावून चोरावीच लागतील की

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Sep 2017 - 8:23 pm | अमरेंद्र बाहुबली

ते करणारे बरोबर करतील. फक्त योग्य व्यक्ती निवडायचा.बाकी काम त्या व्यक्तीच! आणी अशी व्यक्ती आपल्या अवतीभवती नक्की मिळते. फक्त आपण त्याच्यातले "गुण" ओळखा. हे शक्य नसेल तर वकील, कोर्टकचेरी, नियमअटी, महापालिका वैगेरे आहेच. त्या आधी "ट्राय करणे मे क्या जाता हेै?" हे सगळं मी याकरिता सांगतोय की माझ्या घराकडे ही असचं घडलेलं. त्रास होणार्या व्यक्तीने खुप प्रयत्न केले. पण त्या कुत्र्याचं काहीच वाकडं झालं नाही. शेवटी त्या काकांनी माझ्या मित्राला सुपारी दिली. आणी कधीच जाँगींगला न जाणारा मित्र त्या दिवशी जाँगींग ला गेला......;-)

मराठी कथालेखक's picture

19 Sep 2017 - 7:11 pm | मराठी कथालेखक

तुमची समस्या रास्त आहे. वेगवेगळ्या प्रकारे मार्ग काढता येईल. तुमच्या स्वभावानुसार तुम्ही योग्य वाटेल तो उपाय निवडा.
(तुम्ही त्या बाईशी आधीच बोलला असणार पण तिने दाद दिली नाही असे गृहीत धरुन तो उपाय सांगत नाही. शिवाय तुम्ही सोसायटीत नव्हे तर स्वतंत्र घरात रहात आहेत असे गृहीत धरले आहे कारण सोसायटीत तक्रार केल्याचा उल्लेख नाही.)
१) सरळसोट उपाय - पोलीस काही करतील असं वाटत नाही. तुम्ही थेट वकील गाठून त्या बाईला नोटीस पाठवा. एखादा हुशार आणि शक्यतो वकील बघा , तो निश्चितच योग्य ती कलमं शोधून नोटीस काढून देईल. त्यावर बाई ऐकली नाहीच तर प्रकरण कोर्टात न्या.
२) तांत्रिक उपाय - काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे कुत्र्यांचे भुंकणे थांबवण्याकरिता मिळतात (ऑनलाईन शोधून बघा). पण ती किती अंतरावरुन काम करु शकतात , त्यांची परिणामकारकता ई माहित नाही. तुम्ही थोडे पैसे घालवून प्रयोग करुन बघू शकता.
३) राजकीय मध्यस्थी - नगरसेवक , आमदार ई ची मध्यस्थी करवून बाईंना समजवून बघा
४) आवाजापासून संरक्षण - तुमच्या घराचे कुंपण जास्त उंच करणे , गरजेप्रमाणे काही खोल्या साउंडप्रुफ करणे , खिडक्या बंद ठेवून वातानुकुलन यंत्रणा वापरणे ई काहीसे खर्चिक उपाय करु शकता. यामुळे तुम्हाला इतर आवाजांपासूनही संरक्षण मिळेल (जसे उत्सवातील वाद्ये, स्पीकर्स , मध्यरात्री वाजणारे फटाके ई)

मराठी कथालेखक's picture

19 Sep 2017 - 7:13 pm | मराठी कथालेखक

एखादा हुशार आणि शक्यतो ओळखीचा वकील बघा

एकुलता एक डॉन's picture

14 Feb 2018 - 2:35 am | एकुलता एक डॉन

तुम्ही त्या बाईशी आधीच बोलला असणार पण तिने दाद दिली नाही असे गृहीत धरुन तो उपाय सांगत नाही

नेमके करायचे काय आहे ?

कपिलमुनी's picture

19 Sep 2017 - 7:39 pm | कपिलमुनी

तुम्ही जर सहकारी सोसायटी मधे रहात असाल तर तुम्ही तिथे तक्रार करू शकता.
सोसायटीचे नियम याबद्दल काय सांगतात ?
कोणताही प्राणी पाळायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी लागते.
आमच्या सोसायटीमधे आम्ही प्राणी पाळायचा असेल तर
महापालिकेची परवानगी , प्राण्याच्या वॅक्सिनेशनचे पूर्ण रीपोर्ट, सोसायटीमधे घाण केल्यास ती उचलायची जबाबदारी, प्राण्याने कुणाची गाडी खराब केली तर त्याची भरपाई द्यावी असे नियम केले आहेत व तसे मालकाने लिहून द्यावे लागते.

तुम्ही याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करावी असे सुचवतो.

कपिलमुनी's picture

19 Sep 2017 - 7:43 pm | कपिलमुनी

दुवा

या दुव्यामधे बरेच कायदे , नियम सांगितले आहेत.

औरंगजेब's picture

19 Sep 2017 - 7:55 pm | औरंगजेब

सोसायटी आसेल तर सोसायटीची परमिशन आनिवार्य आहे. पण बंगला असेल तर महापालिकेची परवानगी / कुत्रा पाळिव प्राणी विभागात नोंदणी केल्ये का ते बघा. अर्थात ह्या गोष्टी अंडरकव्हर अॉपरेशन करुन कराव्या लागतील. आमच्या सोसामध्येहे आॉपरेशन सक्सेसफूल्ल केलय आम्ही.

किसन शिंदे's picture

19 Sep 2017 - 7:55 pm | किसन शिंदे

माझ्या ओळखीेतले एक प्रथितयश लेखक आणि चित्रकारही सध्या याच त्रासातून जात आहेत. त्यांना या त्रासामुळे त्यांच्या कलेत काॅन्सन्ट्रेशन करता येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

औरंगजेब's picture

19 Sep 2017 - 8:00 pm | औरंगजेब

https://www.amazon.in/Ortz®-Dog-Whistle-Stop-Barking/dp/B00L016CRS

हे try करा
High frequency whistle आहे.

जयंत कुलकर्णी's picture

19 Sep 2017 - 9:45 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !
मी काय केले हे नंतर त्याचा काही उपयोग झाला तर येथे लिहिन.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Sep 2017 - 9:49 pm | अमरेंद्र बाहुबली

त्या बाई मिपावर नाहीत ना?

जयंत कुलकर्णी's picture

19 Sep 2017 - 9:50 pm | जयंत कुलकर्णी

:-) नाही त्या मराठी नाहीत...

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Sep 2017 - 10:02 pm | अमरेंद्र बाहुबली

मग आपला मराठी बाना दाखवून द्या!:-)

जयंतकाका, पण ती कुत्री नक्की कसा त्रास देतात?
काही कुत्री खूप भुंकतात, काही घाण करतात, काही अंगावर धावून जातात तर काही कुत्री दुसर्‍यांच्या घरात शिरतात.

जवळ एखादा चायनीज किंवा कोरियन राहतोय का बघा. राहिलेली हाडं बाईंना पोस्ट करा.

योगी९००'s picture

20 Sep 2017 - 10:34 am | योगी९००

अवांतर..
एक कुत्री पाळा..आणि तिच्यामुळे त्या दोघा कुत्र्यांमध्ये भांडण लागेल. मग एखादा कुत्रा या भांडणात चचला की कुत्रीला हाकलून द्या. दुसरा कुत्रा मग विरहामुळे जीव देईल.

ह.घ्या.

परिंदा's picture

21 Sep 2017 - 5:43 pm | परिंदा

काय भारी प्रतिसाद आहे. आवडल्या गेला आहे. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Sep 2017 - 11:05 pm | अमरेंद्र बाहुबली

कुत्री मुळे अजुन आठ दहा पिल्ले वाढली मग??

मायला कुत्तरडी लयं म्हणजे लयं त्रास देत्यात, रात्री तर उत येतो साल्यांना... माझ्या सारख्या शिफ्ट करणार्‍या व्यक्तिचे तर पार हाल होतात... डोक्याची पार भॉव भॉव करुन टाकतात ! काही वर्षांन पुर्वी या कुत्तरड्यांमुळे माझी पार सटकली होती आणि खोपडी सटकल्याने भर रस्त्यात जाउन दगड मारण्याचा उध्योग केला होता ! दुर्दैवाने नेम चुकला आणि एका पार्क केलेल्या गाडीवर बसला आणि तिची पॅकपॅक सुरु झाली, साला नशिबच खराब ! बाईक चालवताना हीच कुत्तरडी त्यांच्या जिवाचे रान करुन माझ्या तंगड्यांचा चावा घेण्या करता मॅरॅथॉन धावतात... दैव कॄपेने श्वान दंश होउन लस घेण्याची वेळ अजुन तरी आलेली नाही. रोज पेपर उघडुन वाचलात तर कुत्र्याने चावल्याने बालकाचा मॄत्यू किंवा अशा अशा आशयाच्या बातम्या हमखास नजरेत येतील ! शांततेने जगण्याचे पर्याय हल्ली वेगाने कमी होत चालले आहेत तर खड्डे चुकवुन किंवा खड्ड्यात पडुन आपण गचकलो नाही किंवा हातपाय मोडले नाहीत तर आपण मायबाप सरकारच्या दयाळु वॄतीचे आभार मानले पाहिजेत !

उपाय :-
१} काही मोठा जुगाड / सेटिंग लावुन शिंझो आबे यांना बोलवुन तुमच्या वास्तुत शांती पुजन करुन घ्या ! { आबे यांना मुंबई मधली रेल्वे पावसच्या पाण्यात रुळ बुडलेले असतानाही कशी धावते या बद्धल ४ कौतुकाचे शब्द सांगावयास विसरु नका, ही टेक्नॉलॉजी जगात कुठेच नाही हे देखील अगदी ठासुन सांगा. }
२} बाजारात / ऑनलाईन लेझर गन मिळते का ते पहा ! { मला अजुन सापडली नाही ती गोष्ट वेगळी } तुमच्या मागची कुत्तरडी कोकलायला लागली कि हळुच लपुन लेझर गन ने त्यांच्या पार्श्व भागावर नेम लावुन चटका ध्या ! आपण भुंकलो कि कोणीतरी आपल्या बुडावर डाग देते हे एकदा का त्या दोन कुत्तरड्यांच्या लक्षात आले कि त्रास कमी होइल याची शक्यता वाटते !
३} आपण सांगितले तसे कुत्री शिकलेली नाहीत, मग त्यांना शिकवायला पाठवण्याचा विचार करुन त्याचा आर्थिक भार उचलण्याची तयारी ठेवा !
४} ती कुत्री भुंकत असतील तेव्हा त्यांचे आवाज रेकॉर्ड करुन ठेवा, व जेव्हा ती कुत्तरडी आणि तिची मालकिण गा गा करत असेल नेमक्या त्याच वेळेस रेकॉरडेड आवाज मोठ्याने प्ले करा !
५} तुमच्या आजुबाजुला कुठेले हॉस्टेल असेल आणि त्यात मणीपुर / नागालँड मधले विध्यार्थी असतील तर त्यांच्याशी ओळख वाढवुन एकदा तुमच्या घरी बोलवा, तसेच मागील दोन कुत्तरडी देखील दाखवा... काम तमाम होइल कि नाही ते पहाच !...

असो... तुर्तास इतकचे उपाय आठवले आहेत, अजुन काही आठवल्यास सुचवेन...
जाता जाता :- मेरे करण अर्जुन आयेंगे च्या चालीतच मेरे मनःशांती के दिन आयेंगे असं अधुन मधुन पुटपुटा, तेव्हढेच चित्तास समाधान मिळेल !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गरम गरम चिलका.... ;) :- Rabhasa

खरंय मबा. सर्व कुत्र्यांना (त्यांच्या हरामी श्वानप्रेमींसहित) एकत्रित चिरडून ती (दोन्ही) जमातीच नष्ट करण्याचा उपाय आल्यास वाहवा... नशीबच उघडेल..

सर्व कुत्र्यांना (त्यांच्या हरामी श्वानप्रेमींसहित) एकत्रित चिरडून ती (दोन्ही) जमातीच नष्ट करण्याचा उपाय आल्यास वाहवा...
कुत्र्यांचे मालक झाले कि मगच श्वान प्रेम मिरवता येते असा तुमचा " गैरसमज" दिसतो ! माझ्या सोसायटीत फिरणार परंतु अगदी साधु वॄत्ती असणारा कुत्रा पालिकेने / किंवा कुठलेतरी विष खाउन गेला तेव्हा मी ढसाढसा रडलो होतो... ज्या घरी मी राहतोय त्याच्या वास्तुपुजनाच्या दिवशी तो आमच्या घरी आला होता आणि आणि जिथे यज्ञ कुंडात हवत केले होते तो भाग चाटुन काढला होता कारण त्याला तुपाची चव होती, अनेक वर्ष मी त्याच्याशी खेळलो आणि बागडलो देखील , त्याचा विष खाल्लाने जेव्हा शेवट आला तेव्हाही तो त्या क्षणीही आमच्याच घरी आला... तो एक विलक्षण कुत्रा होता. कधीही तो कोणास चावला नाही,लहान मुले त्यांच्या अंगावर बसत, त्याची शेपटी ओढत तरी सुद्धा साधे नखही त्याने कोणाला कधी लावले नाही.एकदा सोसायटीच्या कचर्‍यावाल्याला घाबरुन तो आमच्या फ्लॅट मधे घुसला आणि घाबरुन बिथरल्याने पलंगावर चढुन त्याने खिडकीतुन सरळ खाली उडी मारली तरी त्याचा जीव घेला नाही फक्त पाय मोडुन भागले ! सोसायटी मधील सर्व लोकांचा लाडका कुत्रा असल्याने त्याच्यासाठी तळ मजल्या ची एक खोली { बहुतेक त्यावेळी भाड्याने घेतली } त्याचा डॉक्टरकडे नेउन उचार केला,मोडलेला पाय ठिक होउन तो परत सोसायटी भर फिरु लागला ! हे माझ्या सकट सोसायटी मधल्या सगळ्याचे त्याच्यावरचे प्रेमच होते, वेळे नुसार कोणाच्या फ्लॅट समोर जाउन कोणत्या वेळी काय खायला मिळेल हे त्याला व्यवस्थित ठावूक होते, माझ्या पाहण्यात असा विलक्षण कुत्रा परत आलाच नाही, जरी तो मोकाट होता तरी सुद्धा माझ्या सकट सोसायटी मधल्या सर्वांचा तो कायमच लाडका होता... शेवटी शेवटी त्याला मोतीबिंदू सुद्धा झाला होता.
जेव्ह्या त्याचा अंतिमकाळ आला तेव्हा मी सोसायटी मधल्या अनेकांना माझ्या घरी बोलवुन आणले त्याला माझ्या हाताने शेवटचे दुध पाजले, नंतर सगळ्यांनी त्याला कपड्यात गुंडाळुन गच्चीतील मोकळ्या जागेत झोपवले... मी सकाळी झोपेतुन उठलो तसे तडक गच्चीत गेलो, रक्ताची उलटी होउन तो आम्हा सर्वांना सोडुन गेला होता, परत सोसायटी मधले लोक जमले त्याला सोसायटी मधल्याच बागेत खड्डा करुन एका कडेला पुरले... माझ्या सकट ढसा ढसा रडणारे अनेक स्त्री आणि पुरुष तिथे मी पाहिले...
एका मोकाट कुत्र्यावर देखील लोक प्रेम करु शकतात... तेही अगदी मनापासुन !

असो... बाकी तुम्ही हरामी श्वानप्रेमींसहित असा उल्लेख केला आहेत म्हणुन सांगतो... अशीही जमात अस्तित्वात आहेच ! उच्च शिक्षण झाल्याची मिजास , मस्ती, घमेंड आणि बुडाखाली असलेला बक्कळ पैसा याच्यावर अशी मंडळी आपले श्वान प्रेम जगजाहिर करत असतात ! त्यांना वाटते त्यांनी श्नान पाळला म्हणजे श्वान प्रेम समजायचा सगळा आयक्यू आभाळातील बापाने त्यांनाच डोनेट करुन ठेवला आहे ! बरं हे हरामी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानांवर प्रेम करतील परंतु आजुबाजुच्या परिचित मनुष्य प्राण्यांशी मात्र विक्षीप्तपणे वागतील असे माझे निरिक्षण आहे !

जाता जाता :- आपण कुत्रे पाळतो म्हणजे आपणासच श्वान प्रेमाचे लायसन्स मिळाले आहे अश्या भ्रमात कधीच कोणी राहु नये !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गरम गरम चिलका.... ;) :- Rabhasa

मबा.. तू माझा व्यक्तिगत दोस्त आहेस, तुला माहीतेय.. तुझा दुसरा प्रतिसाद खुलासा करणारा आणि टचिंग आहे.

पण मग पहिल्या प्रतिसादातली (उदा.) खालील वाक्यं दुस-या प्रतिसादाच्या मानाने खूप सहानुभूतिशून्य वाटल्याने माझी प्रतिक्रिया छद्मी उमटली. त्याबद्दल क्षमस्व.

...
>>>>

मायला कुत्तरडी लयं म्हणजे लयं त्रास देत्यात, रात्री तर उत येतो साल्यांना...

तुमच्या आजुबाजुला कुठेले हॉस्टेल असेल आणि त्यात मणीपुर / नागालँड मधले विध्यार्थी असतील तर त्यांच्याशी ओळख वाढवुन एकदा तुमच्या घरी बोलवा, तसेच मागील दोन कुत्तरडी देखील दाखवा... काम तमाम होइल कि नाही ते पहाच !...

मबा.. तू माझा व्यक्तिगत दोस्त आहेस, तुला माहीतेय.. तुझा दुसरा प्रतिसाद खुलासा करणारा आणि टचिंग आहे.
पहिला प्रतिसाद हा व्यंग / विनोदी आणि वाटल्यास बिभत्स रसाने या विषयाला धरुन इतर विषयावर देखील टिप्पणी करणारा आहे, उगाच कोणी कोणत्याही जनावरास त्रास ध्यावा किंवा त्याचा जीव घ्यावा अशा विचाराचा मी अजिबात नाही...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गरम गरम चिलका.... ;) :- Rabhasa

सिंथेटिक जिनियस's picture

20 Sep 2017 - 12:06 pm | सिंथेटिक जिनियस

पोलिसांना सांगून पहा .समजूत घालतील .

जेम्स वांड's picture

11 Oct 2017 - 1:00 pm | जेम्स वांड

कोणाची? कुत्र्यांची? मालकिणीची? का माझीच समजूत घाला म्हणून गळ घालावी धागालेखकाने पोलिसांना?

गवि's picture

20 Sep 2017 - 12:12 pm | गवि

सर.

१. तुम्हाला कुत्र्यांविषयी ममत्व आहे का?
२. तुमच्या तक्रारीमुळे ती कुत्री बेवारशाप्रमाणे म्युनिसिपालिटीने उचलून नेलेली (आणि बहुधा मारलेली / मरणप्राय जीवन जगणारी) तुम्हाला चालणार आहेत का? (आय वॉन्ट सायलेन्स, बाकी आय गिव्ह अ डॅम, असं आहे का?)
३. भुंकणं हा कुत्र्यांचा "स्व" भाव आहे. तुमची आवाजाविषयीची सेन्सिटीव्हिटी वाजवीपेक्षा जास्त असू शकेल असा किमान थियॉरिटिकल विचार तुम्ही करु शकता का?
४. कुत्र्यांच्या मालकाचीही काही मजबूरी असेल असा विचार तुम्ही करता का?
५. ती कुत्री अनट्रेन्ड (न शिकवलेली) आहेत असं तुम्ही म्हणता. तर ट्रेनरची नेमणूक करुन जितपत आवाज कमी करता येईल (तो शून्यवत् होणार नाही) तो तुम्हाला स्वीकारार्ह आहे का?

एकूण प्रतिक्रिया पाहून डॉग हेटर्सचं प्रमाण दिसून खूप चलबिचल होते आहे.

गार्ड डॉग / वॉच डॉगच्या अनुवंशाच्या जाती आणि कुत्री थोड्याशाही चाहुलीने भुंकतात. ती संरक्षणाची इन्स्टिंक्ट फॉलो करत असतात.

शेवटचा प्रश्न: तुम्हाला अल्टिमेट आऊटकम काय अपेक्षित आहे? कुत्र्याला दयामरण किंवा म्युनिसिपालिटीत रवानगी (एकच अर्थ).

-एकाहून अधिक श्वानांचा पिता (गवि)

मोदक's picture

20 Sep 2017 - 1:24 pm | मोदक

श्रीमान श्री श्री गगनचंद्ररावजी विहारी साहेब,

तुमची भूतदयेची रेघ नक्की कुठे संपते..?

म्हणजे कुत्र्यांना भूतदयेने वागवावे मात्र तो अधिकार कोंबड्यांना नाही असे कांही आहे का..? ..आणि तोच अधिकार वनस्पतींना द्यायचा म्हटला तर खायचे काय..??

(पॉपकॉर्नप्रेमी) मोदक.

जयंत कुलकर्णी's picture

20 Sep 2017 - 1:36 pm | जयंत कुलकर्णी

प्रिय गवि,

१ माझा एक जवळचा मित्र पूर्वी पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे मरण पावला तरीसुद्धा मला सर्व प्राण्यांविषयी ममत्व आहे.
२ असे मुळीच नाही.
३जो माणूस गणपती उत्सवात माणसांचा त्रास सहन करू शकतो त्याच्या सेन्सेटिव्हिटीबद्दल काय बोलणार ?
४ हो मी करतो आणि केला. पण दिवस रात्र कुत्री भुंकत असताना त्यांना शांत करण्याचा प्रयत्न न करणे हे मला समजू शकत नाही. किंवा आज आपल्याकडे कामाला माणसे येणार आहेत तर त्या कुत्र्यांना कुठेतरी बाजूला न ठेवणे हे मी समजू शकत नाही.
५ आमच्या येथे दुसर्‍या बंगल्यातही कुत्री आहेत पण मालक त्यांच्याकडे नीट लक्ष देतात. दोन वेळचे अन्न फेकले की झाले अशी त्यांची अ‍ॅटिट्युड नाही. त्यांचा कोणालाच त्रास होत नाही.

डॉग हेटर्सचे प्रमाण खूप आहे कारण मला वाटते त्रास आहे आणि तो त्रास मालकांच्या निष्काळजीपणामुळे बहुतेक वेळा असतो.
शेवटच्या प्रश्नाला उत्तर : मला कुत्र्यांकडे नीट लक्ष देऊन ती भुंकणार नाहीत ही काळजी त्यांनी घ्यावी हे अपेक्षित आहे. हे जमत नसल्यास त्यांनी त्या कुत्र्यांना कोणालातरी देऊन टाकावीत.

खेडेगावात शेतावर रहात होतो तेव्हा कमीत कमी ७/८ कुत्री पाळलेला,
जयंत कुलकर्णी

हे जमत नसल्यास त्यांनी त्या कुत्र्यांना कोणालातरी देऊन टाकावीत.

धन्यवाद.. तुम्ही कधीच कुत्रा स्वतः पाळलेला नाही हे कळलं.

जरुर तक्रार करा त्या हरामखोर कुत्र्याविरोधात. मरु दे साला..

आपली शांत झोप महत्वाची... अगदी मान्य..

जयंत कुलकर्णी's picture

20 Sep 2017 - 2:40 pm | जयंत कुलकर्णी

गवि,

मी कुत्रा कोणालातरी देऊन टाकावीत असे म्हटल्यामुळे तुमचा असा समज झालेला दिसतो की मी कुत्री पाळलेली नाहीत. पण कुठला छंद कुठे करावा याचे भान मला निश्चितच आहे. शेतावर काहीच प्रश्र्न नव्हता. येथे मी जर ते कुत्रे आणले तर तो माझा मूर्खपणा ठरेल. असो.
मी बघतो आता काय करायचे ते.
आपण आता चिंता करू नये ही विनंती. आपली मते कळली. त्यांचा योग्य तो मान राखला आहे आणि जाईल.
ता.क. त्यांनी असे कुत्रे देऊन टाकलेले मी पाहिले आहेत म्हणूनच मला हे सुचले आहे.

गवि's picture

20 Sep 2017 - 8:52 pm | गवि

ज.कु.काका. पार्श्वभूमी पूर्णतः माहीत नसताना / न जाणता मी श्वानप्रेमापोटी आततायी प्रतिक्रिया दिल्या. त्या नी जर्क रिअॅक्शन होत्या. त्याबद्दल माफ करा.

जयंत कुलकर्णी's picture

20 Sep 2017 - 10:07 pm | जयंत कुलकर्णी

गवि,
काका म्हणता ना मग माफी कसली मागता ? तुम्ही कुत्रे पाळता ना? मग तुम्ही कुत्र्याला किती वेळा जवळ घेता ? मी तरी दिवसातून अनेक वेळा घ्यायचो. या बाईला मी एकदाही कुत्र्याला जवळ घेताना पाहिले नाही. म्हणूनच म्हटले दोन वेळा अन्न फेकले म्हणजे झाले असे नाही. त्याच्यावर माया कोण करणार... असो.
विसरा सगळे... :-) आणि जोपर्यंत मी माणसाला प्रत्यक्ष भेटत नाही तो पर्यंत त्याच्या प्रतिक्रिया मी मनाला लावून घेत नाही कारण माझा चेहर्‍यावर आणि डोळ्यावर जास्त विश्र्वास आहे. :-)
जयंत कुलकर्णी.

गवि, तुमचा मुद्दा मान्य आहे पण आजारी आणि वयस्कर नातलग, तान्हे बाळ असे घरी असताना भूतदयेचे लॉजिक कुठेपर्यंत मान्य करणार..?

माझ्या बुलेटच्या टायरवर सोसायटीमधला एक कुत्रा कधीतरी मूत्रविसर्जन करतो. एक दोनदा गार्डला सांगितले आणि नंतर सोसायटीकडे तक्रार केली. परत ते कुत्रं कार्यक्रमात बिझी असताना सापडले की त्याला हातातले हेल्मेट फेकून मारणार हे नक्की.

अशा वेळी.. चिखलातून गाडी चालवताच की, रस्त्यावरून जाताना रस्ता कुठे स्वच्छ असतो..? असे लॉजिक चालत नाहीत कारण पाळीव कुत्र्यामुळे दुसर्‍याला त्रास होऊ नये ही कुत्रामालकाची जबाबदारी असते. (भटक्या कुत्र्याचा त्रास आपण कंट्रोल करू शकत नाही आणि भटक्या कुत्र्याचा त्रास चालतो म्हणून पाळीव कुत्र्याचा त्रास चालवून घ्यावा असे कुणाचे मत असेल तर कुत्रामालकाने आपल्या पाळीव कुत्र्याला भटक्या कुत्र्याप्रमाणे वागणूक मिळालेली चालवून घेण्याची तयारी ठेवावी)

मागे ईथे कुणी तरी मांजराच्या त्रासाबद्द्ल उपाय विचारला होता . . .विचारणा-याला मांजरा पेक्षा सुचवलेल्या उपायांचा जास्त त्रास झाला असावा :-)

कपिलमुनी's picture

20 Sep 2017 - 1:14 pm | कपिलमुनी

आपल्यामुळे दुसर्‍यांना त्रास होउ नये एवढेच !
रात्री अपराती , भर दुपारी कधीही कुत्री भुन्कतात !
त्यांचा "स्व" भाव आहे पण स्वतच्या घरात विश्रांती घेणे हा हक्क आहे.

आपल्या आवडी निवडी जपताना त्याचा दुसर्‍याला त्रास होउ नये एवढीच ' सुजाण' नागरीका कडून अपेक्षा असते.

काका, एक जालीम उपाय सांगू का..?

तुम्ही जर बंगल्यात रहात असाल तर त्या कुत्रेवाल्या बंगल्याच्या शक्य जितक्या जवळ (पण तुमच्याच हद्दीत) एक एक असे दर दहा मिनीटांनी लवंगी फटाके उडवायला सुरू करा. दर दहा मिनीटांनी फटाका पेटवण्याचा त्रास वाटत असेल तर एका उदबत्तीला फटाक्यांच्या वाती फुटभर लांब जाड दोर्‍याने गुंडाळा आणि ती लड ठेऊन द्या. (सरळ उदबत्तीला बांधलेत तर पहिल्या फटाक्यानंतर उदबत्ती आणि त्याला जोडलेले फटाके विभक्त होतील.

थोडे दिवस दर दहा मिनीटांनी कुत्रा आकाशपाताळ एक करेल आणि लवकरच दमेल. भुंकणे कमी करेल.

हे झाल्यानंतरही तुम्हाला होणार्‍या त्रासाचा वचपा काढायचा असेल / मालकीणीला धडा शिकवायचा असेल तर लवंगी फटाक्यांऐवजी मोठे तोटे वापरा.. किंवा सरळ सुतळी बाँब.

आपली समस्या समजून न घेणार्‍या असंवेदनशील लोकांसाठी आपण संवेदना दाखवून काहीही फायदा नसतो. त्यामुळे "दिवाळीतले कुत्र्यांचे भीतीमुळे झालेले कणवपूर्ण डोळे" वगैरे प्रतिसाद आलेच तर फाट्यावर मारा.

यात मुजोर मालकिणीमुळे कुत्र्यांचे हाल होतील.. ते आपल्यामुळे झालेले कोलॅटरल डॅमेज असेल.

जेडी's picture

20 Sep 2017 - 2:28 pm | जेडी

कुत्रा का भुंकतोय, ह्याला काही कारण असावे. व्हेटर्नरी डाक ह्याबद्दल animal rescue ला कंप्लेंन्ट करु शकतात. ते कुत्र्याला उचलुन घेवुन जातात...

पैसा's picture

20 Sep 2017 - 2:57 pm | पैसा

म्हणजे तिच्याकडेही कुत्री तात्पुरत्या निवाऱ्यासाठी कदाचित आली असावीत. अनोळखी वातावरण, अपुरे खाणे, सतत बांधून ठेवणे यामुळे कुत्री ओरडत असतील.

स्थानिक people for animals वगैरे कोणाला विचारून बघा. मला गोव्यातल्या pfa चा अतिशय वाईट अनुभव आहे पण कदाचित तिकडचे काम करत असतील.

गामा पैलवान's picture

20 Sep 2017 - 5:13 pm | गामा पैलवान

गवि,

जरुर तक्रार करा त्या हरामखोर कुत्र्याविरोधात. मरु दे साला..

या विधानात गडबड आहे. जयंतरावांची मालकाविरुद्ध तक्रार आहे. कुत्र्याविरुद्ध नाही. भले त्रास जरी कुत्र्याकडून होत असला तरी या धाग्यावर केवळ मालकावर वापरायचा उपाय अपेक्षित आहे. काही वाचकांनी कुत्र्यावर वापरायचे अवैध उपाय दिले आहेत खरे, पण त्यांची मूळ हेतूशी सरमिसळ अपेक्षित नाही.

आ.न.,
-गा.पै.

जयंत कुलकर्णी's picture

20 Sep 2017 - 5:28 pm | जयंत कुलकर्णी

लोक समजूनच घेत नाहीत....

शेवटी कारवाई कुत्र्यावरच होते आणि कुत्राच सफर करतो म्हणून सर्व बोलावंसं वाटलं. क्षमस्व.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Sep 2017 - 8:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुत्र्यांशी मैत्री करा. सुरुवातीला कदाचित त्रास होईल. पण नंतर लळा लागतो. तसचं ती बाई त्या कुत्र्यांना कोंडुन ठेवते का ते बघा. कोंडलेली कुत्री भयानक अग्रेसिव होतात आणि दिवस रात्रं ओरडतात. कोंडुन ठेवलं असेल तर अ‍ॅनिमल रेस्क्यु ला फोन करा.

विश्वास ठेवा कुत्र्याला त्रास झाल्याशिवाय तो कधीही आरडाओरडा करत नाही.

विश्वास ठेवा कुत्र्याला त्रास झाल्याशिवाय तो कधीही आरडाओरडा करत नाही

१०० टक्के सत्य !
(कुत्रा नु भ वी) स्नेहा

उपेक्षित's picture

20 Sep 2017 - 8:22 pm | उपेक्षित

आज गवी वेगळ्याच मूड मध्ये वाटत आहेत,

कुठ नेऊन ठेवले आमचे ते प्रगल्भ आणि दिलखुलास गवी ? :)

अभिजीत अवलिया's picture

21 Sep 2017 - 11:54 am | अभिजीत अवलिया

माझा पण एक प्रश्न — पाळीव कुत्र्याला नैसर्गिक विधी रस्त्यावर करायला लावून ती घाण तशीच ठेवून जाणार्या लोकांंची तक्रार करता येते का?

दारात कोणीही पाय ठेवलेला बघितला की बेंबीच्या देठापासनं केकाटणारं शेजार्‍यांचं कुत्रं पाह्यलं आणि या प्राण्याबद्दल कधीही दया वैगरे वाटली नाही. असतील माया लावणारी कुत्री जगात पण अजून पाह्यली नाहीत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Sep 2017 - 6:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

या एकदा घरी.

तुमचा कुत्रा शार्ट टेम्पर आहे म्हणे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Sep 2017 - 7:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

म्हणुनचं बोलावतोय. शॉर्ट टेंपर असला तरी तो बाहेरच्यांसाठी. चुकुन स्वतःहुन जाउन कोणाला त्रास देणार नाही.

कपिलमुनी's picture

22 Sep 2017 - 12:03 pm | कपिलमुनी

चिमण , घरी बोलवून कुत्रा अन्गावर सोडतो !
कालच तो कुत्र्याला उद्या तुझ्यासाठी नवीन खाऊ आणणार असे सान्गत होता :)

विशुमित's picture

25 Sep 2017 - 6:02 pm | विशुमित

hahaha .!!

मी त्याच्या कुत्र्याला एका दिवसाचं खाणं म्हणून तरी पुरेन का अशी शंका आहे.

भटक्या कुत्र्यांच्या आवाज ऐकत झोपायची सवय आहे, आणि कुत्री नसलेल्या ठिकाणी गेलात तर झोप येत नाही तरी पण भुंकणारी कुत्री न बाळगण्याबद्दल मी माझ्या शेजार्‍यांचा आभारी आहे हेही तेवढेच खरे.

मालोजीराव's picture

22 Sep 2017 - 5:25 pm | मालोजीराव

जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात जाऊन तुम्ही संबंधित विभागात तक्रार करू शकता याशिवाय आणखी एक गोष्ट करा ती म्हणजे पोलीस स्टेशन ला आणि मॅजिस्टेट ला अर्ज करून १३३ CRPC नोंदवून त्या महिलेला नोटीस पाठवा.

काकांच्या कथेतील पात्रे खरी होऊन प्रतिसादसुद्धा द्यायला लागली!

ह. घ्या. ;)

हरवलेला's picture

25 Sep 2017 - 12:40 am | हरवलेला

:)

मालोजीराव's picture

25 Sep 2017 - 10:33 am | मालोजीराव

काकांच्या कथेतील पात्रे खरी होऊन प्रतिसादसुद्धा द्यायला लागली!

मिपावर नवीन दिसताय :)

गामा पैलवान's picture

25 Sep 2017 - 12:37 pm | गामा पैलवान

काय सांगताय मालोजीराजे! जयंतराव मिपाकरांवर बेतलेल्या कथा लिहितात की काय? ;-) माझा नंबर केंव्हा लागतोयसं झालंय.
आ.न.,
-गा.पै.

कुत्र्याच्या वरून आठवलं.. गावाकडे अशी कुत्री शोधून ठेवायची न रात्री.. अशी काही दगड मारायची की गाव त्याच्या आवाजाने
( व्हिवळन्याने) जाग व्हायचं ... ..
न मग गुपचुप तिथून फरार व्हायचं.....

पण शहरात risky आहे...

मराठी कथालेखक's picture

24 Sep 2017 - 12:13 am | मराठी कथालेखक

घरातल्या कुत्र्यांना दगड कसा मारणार ?

त्यातल्या त्यात ती बाई एक pet ऑफीसर आहे त्यामुळे असे काही करणे आपल्याला महागात पडू शकते त्यामुळे आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब केलेला कधीही बरा...

मराठी कथालेखक's picture

24 Sep 2017 - 11:39 pm | मराठी कथालेखक

बरोबर आहे. आणि कायदेशीर तोडगा समाजाला दीर्घ काळ उपयोगी पडू शकतो (अशा केसचा पुढेही अनेकजण संदर्भ घेवू शकतात)
कायदेशीर तोडगा निघण्यास वेऴ लागेल पण तोडगा निघू शकतो.

भंकस बाबा's picture

24 Sep 2017 - 8:05 am | भंकस बाबा

भुंकणाऱ्या कुत्र्यपेक्षा भुंकणारे शेजारी जास्त खतरनाक वाटतात.

मराठी_माणूस's picture

6 Oct 2017 - 10:16 am | मराठी_माणूस

भटक्या कुत्र्यांबद्द्ल एक पत्र

http://epaper.loksatta.com/1383793/loksatta-pune/06-10-2017#page/6/2

त्यात एक प्रश्न असा विचारला आहे की " श्वान प्रेमि लोक भटकी कुत्री दत्तक घेउन का पाळत नाहीत ?"

कपिलमुनी's picture

6 Oct 2017 - 2:45 pm | कपिलमुनी

त्रास कमी झाला का ? काय उपाय केलात ?

प्रकाश घाटपांडे's picture

14 Feb 2018 - 12:34 pm | प्रकाश घाटपांडे

तुम्हाला जसा कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास होतो तसा मला इथे मुलांच्या ( विशेषतः मुलींच्या) बेंबीच्या देठापासून किंचाळत खेळण्याचा त्रास होतो. ११ मजली इमारतीत कॉमन रेस्क्यू टेरेस ८ व्या मजल्यावर आहे त्यामुळे खाली ड्क्ट जवळ एक पोकळी तयार होते व तळमजल्यावर लिफ्ट पाशी किंचाळलेले आवाज मल्टिप्लाय होउन मोठे ध्वनीप्रदूषण होते व त्याचा त्रास खालच्या मजल्यावरील शांतताप्रेमी लोकांना होतो. घरात टीव्हि सुद्धा नीट पहाता येत नाही एकाग्रतेची कामे करता येत नाहीत.. सोसायटीत तक्रार करुन झाली. अनेकदा शांतपणे व ओरडून सांगून झाले. कॉम्प्लेक्स ची जनता वसाहत झालीये.
सार्वजनिक स्वच्छता सार्वजनिक शांतता व सार्वजनिक शिस्त बाळगा व आपल्या सोसायटीचे सौंदर्य जपा हे सुसंस्कृतांना सांगूनही काही उपयोग होत नाही.

सोसायतीतल्या जाणत्यांनी एकत्र येऊन कारवाई करुन असा हिसका दाखवा पोरांना की यापुढे मोठ्ठा आवाजच काय, नुसता तोंडातून ब्रही फुटू नये. अभ्यास करत बसतील गपगार.

यथावकाश मोठी होऊन आयुष्याच्या थपडांनी कायमची गपचीप होतीलच ती. :-) उगाच फुकाची बालऊर्जा आहे ती. वेळीच रोखलेली बरी ..

धर्मराजमुटके's picture

14 Feb 2018 - 1:36 pm | धर्मराजमुटके

कुत्र्यांचा विषयावर धागा आला की गवि तिरकस हळवे होतात असे निरिक्षण नोंदवून खाली बसतो :)

लहान पोरांना "कमी आवाज करा" "मर्यादेत ओरडा" अशी शिस्त लावणं म्हणजे काय प्रकार असतो हे खरोखर विवादास्पद आहे.

फक्त तेच वय असतं जेव्हा बिचारा मनुष्यप्राणी "खच्चून" ओरडतो. आता समाजात राहण्याचं शिक्षण किती वयात कंपलसरी करावं याचे त्या त्या सोसायटीचे नियम आपण कोण ठरवणार असा रास्त मुद्दा आहेच. डिपेंडस ऑन टॉलरेंस. असो.

घाटपांडेकाकांना ओळखत असल्याने त्यांचे शंभर नंबरी भूभूप्रेम माहीत आहे. ते त्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचा उपरोक्त लहान मुलांविषयीचा प्रतिसाद हा उपरोधिक किंवा सूचक आहे असं समजून पुढे लिहिलं आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Feb 2018 - 4:22 pm | प्रकाश घाटपांडे

नाही नाही उपरोधिक नाही. खरच इथे असे आहे. मुलांना खेळायला बाग व मोकळी स्पेस आहे इथे. ओपन स्पेस मधे आवाज हवेत जातो. तिथे खेळले तर त्रास होत नाहि. बंदिस्त जागेत तो खूपच मोठा होतो. तसेच किंचाळण्याची फ्रेक्वेन्सी पिच हे हाय असते.
पहिल्या मजल्यावर एक भुभु आहे ते कंटिन्युअस ओरडते. पण भुभुंना माझ्याविषयी व मला भुभुंविषयी प्रेम असल्याने माझा मेंदु ते सहजपणे सहन करतो.

ओपन स्पेस मधे आवाज हवेत जातो. >> नाही जात. आमच्या फ्लॅटसमोरच मोठी पब्लिक बाग आहे. रविवारी पाहटे ६लाच तिथे पोरं येऊन गोंधळ घालायला चालू करतात. तिथली घसरगुंडी रोल होणाऱ्या प्लास्टीकची बनलीय. तिचापण इतका खर्रर्रर्रर्रर आवाज येतो.

मला वाटतं आजकाल बिल्डिंगच्या अकॉस्टिकचाच काहीतरी प्रॉब्लेम असतो. फ्लॅटची उंची कमी (फ्लोअर टू फ्लोअर १० फूट) असल्याने आवाज घुमत असेल का?

प्रकाश घाटपांडे's picture

15 Feb 2018 - 10:07 am | प्रकाश घाटपांडे

मी बंदिस्त जागेत घुमणार्‍या आवाजाच्या तुलनेने म्हणतोय. बाकी तुमचा बिल्डिंग्च्या अ‍ॅकॉस्टिक चा मुद्दा नोंदनीय आहे. हा विचार आर्किटेक्ट बिल्डर लोकांनी केला पाहिजे. आठव्या मजल्यावरील रेस्क्यू टेरेस मुळे इमारतीचे दोन भाग होतात . एक वरचाअ आठव्या मजल्या पुढिल व दुसरा खालील.बरेचसे लोक बहुमजली कॉम्प्लेक्स मधे नवीनच राहायला आले असतात. त्यांची मानसिकता ही जुनीच असते त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. बिल्डर च्या दृष्टीने तळमजल्यावर वा लॉबी मधे मुलांनी असे खेळणे अभिप्रेतच नसते. त्याने त्यासाठी चिल्ड्र्न्स पार्क एरिया दिलेला असतो. ध्वनिप्रदूषण करणार्‍या लोकांना आपण ते करतोय याचे भान नसते. तसेच काही लोक जसे शांतता प्रिय असतात तसे काही गोंगाटप्रिय असतात.

मी बंदिस्त जागेत घुमणार्या आवाजाच्या तुलनेने म्हणतोय. >> हम्म. असेल कदाचित.

बाकी तुमचा बिल्डिंग्च्या अॅकॉस्टिक चा मुद्दा नोंदनीय आहे. हा विचार आर्किटेक्ट बिल्डर लोकांनी केला पाहिजे. >> आमच्याच असे नाही. पुण्यातल्या सगळ्या नवीन इमारतीत हीच उंची असते. त्याऐवजी मी एक बदलापूरचा फ्लॅट बघितलेला त्याची उंची जास्त वाटत होती.

'रेस्क्यू टेरेस' पहिल्यांदाच ऐकलं. कशासाठी असतं ते?

बरेचसे लोक बहुमजली कॉम्प्लेक्स मधे नवीनच राहायला आले असतात. त्यांची मानसिकता ही जुनीच असते त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. बिल्डर च्या दृष्टीने तळमजल्यावर वा लॉबी मधे मुलांनी असे खेळणे अभिप्रेतच नसते. त्याने त्यासाठी चिल्ड्र्न्स पार्क एरिया दिलेला असतो. ध्वनिप्रदूषण करणार्या लोकांना आपण ते करतोय याचे भान नसते. तसेच काही लोक जसे शांतता प्रिय असतात तसे काही गोंगाटप्रिय असतात. >> सहमत आहे.

बिटाकाका's picture

15 Feb 2018 - 11:10 am | बिटाकाका

'रेस्क्यू टेरेस' पहिल्यांदाच ऐकलं. कशासाठी असतं ते?

आठ मजल्यांपेक्षा जास्त माजले असणाऱ्या सगळ्या इमारतींना ८ व्या मजल्यावर एक ठराविक क्षेत्रफळाची (नक्की माहित नाही किती ते पण ४ फ्लॅट च्या मजल्यावर २ फ्लॅट हे पहिले आहे) जागा रिकामी सोडणे (म्हणजे टेरेस सारखी) बंधनकारक आहे. मला वाटतं जनरली "रेफ्युजी एरिया" असं म्हणतात. ८ व्याच्या वरच्या मजल्यावर काही दुर्घटना झाली तर लोकांना जमा होण्यासाठी हि जागा सोडत असावेत बहुतेक जेणेकरून फायर ब्रिगेड वगैरे लोकांना रेस्क्यू करणे सोपे जावे.

एमी's picture

15 Feb 2018 - 1:39 pm | एमी

अच्छा धन्यवाद.

आमच्या एरियात त्याला 8th floor garden flats म्हणून विकत होते. तो आणि त्याच्या वरचे मजले जास्त रेट. फक्त तुमच्यासाठी ही बाग आहे वगैरे :D
ही जुनी माहिती. आता रिअल इस्टेट मार्केट कोसळल्यावरच माहित नाही.

सतिश पाटील's picture

14 Feb 2018 - 2:41 pm | सतिश पाटील

आमच्या मागे एक बाई राहते. तिच्याकडे दोन कुत्री आहेत. ती बिलकूल शिकवलेली नाहीत

त्यांना शाळेत घातले तर प्रश्न सुटेल कदाचित.

सस्नेह's picture

14 Feb 2018 - 4:31 pm | सस्नेह

सध्या आम्हाला आमच्याच कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास होतो आहे.
आम्ही त्याला चार टाईम चमचमीत खायला घालतो. चिकन म्हणू नका अंडी म्हणू नका, डॉग फूड उच्च कंपनीचे (पेडिग्रीला आमचा कुत्रा तोंड लावत नाही. आधी वेंकीज खायचा. ती कंपनी बंद झाल्यावर दुसऱ्या तत्सम कंपनीचे देतो) . आम्ही दिवसभर नसतो तेव्हा शांत असतो. संध्याकाळी मी नि मुलगा आलो की त्याला पाच दहा मिनिट खेळवून गोंजारून मगच आपल्या कामाला लागतो. मुलगा दहा पंधरा मिनिटे मोकळे सोडून खेळवतो.
पण आम्ही घरात पाय टाकला की तो जो भुंकणे चालू करतो ते किमान एक तास थांबत नाही.
या कालावधीत आम्हाला एकमेकांशी बोलणे, फोनवर बोलणे, इतकेच काय, एकाग्र चित्ताने कशाचाही विचार करणेही अशक्य होते.
त्याची खायची वेळ झाली की खाणे समोर ठेवेपर्यंत सुद्धा त्याला दम नसतो. सतत वेगवेगळ्या सुरात भुंकणे.
काय करावे ?

कपिलमुनी's picture

14 Feb 2018 - 11:21 pm | कपिलमुनी

शीर्षासन करून हातावर चालत या !

नाखु's picture

15 Feb 2018 - 10:15 am | नाखु

दम द्या मिपावरच्या नवकविता आणि राजकारणी धागे प्रतिसाद सहीत वाचवून दाखविले जातील म्हणून!!!!

तो भुंकणे सुद्धा मौनात करायला शिकेल.
आणि तुम्ही एखाद्या खुसखुशीत लेख रांधायला घ्याल.

अखिल मिपा हसतं खेळतं ठेवा आणि ठेवण्यासाठी सदोदित प्रयत्न करा या संघाच्या किरकोळ मागणी पत्रातून साभार

सस्नेह's picture

15 Feb 2018 - 3:05 pm | सस्नेह

अखिल मिपा हसतं खेळतं ठेवा

आहेच मिपा हसतं खेळतं :)