निघाला शिकारीला कालीयानाग

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
20 Aug 2017 - 8:26 am

घालून विळखा दोन्ही धृवांना
दाबून शेपटीत हिमालयाला
दहाफणांनी ओकीत विषारी आग

निघालाआहे शिकारीला
कालीयानाग.

अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे
मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे.

कारण

दशेंद्रीयांच्या रथावर स्वार होऊनच
निघाला आहे शिकारीला
कालीयानाग.

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2017 - 12:34 pm | धर्मराजमुटके

मस्त कविता ! आवडली.

अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे
मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे.

शेवटी मानवाला परमेश्वराचाच आधार आहे. त्यानेच तर अशा कालीयाचा वध केला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2017 - 12:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय समजू नै राह्यला राव कवितेचा अर्थ. :(

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2017 - 12:47 pm | धर्मराजमुटके

काय राव तुम्ही ?
जळी स्थळी काष्ठी पाषाणी मोदीच दिसतात काय तुम्हाला :)
कायतरी रसग्रहण करा कि कवितेचे ?

जेम्स वांड's picture

20 Aug 2017 - 12:52 pm | जेम्स वांड

.

विवेकपटाईत's picture

20 Aug 2017 - 7:47 pm | विवेकपटाईत

कालियानाग इंद्रिय सुखासाठी लोलुप माणसाचे प्रतीक आहे। आजचे प्रदूषित वातावरण माणसाच्या करणीचा परिणाम आहे। आता मानवावर त्याच्या कर्माचे फळ भोगण्याची पाळी आली आहे। बाकी यत्र तत्र सर्वत्र कुणाला मोदीजी दिसत असतील तर काय करणार। लवकर उपाय शोधा

जेम्स वांड's picture

20 Aug 2017 - 8:01 pm | जेम्स वांड

ते मोदींबद्दल बिरुटे ह्यांनी विचारले होते, ते सांगतील काय ते, माझा एक प्रश्न, तुम्ही सेवानिवृत्त वगैरे आहात का?

> घालून विळखा दोन्ही धृवांना
दाबून शेपटीत हिमालयाला
दहाफणांनी ओकीत विषारी आग

हा एवढ्या प्रचंड नागाला जायचंय तरी कुठे ? उगाच हिमालयाला विळखा वगैरे कशाला ?

अभ्या..'s picture

23 Aug 2017 - 7:25 pm | अभ्या..

हा ना राव, दोन ध्रुवांना विळखा घालून, हिमालयाला दाबून बिबुन जायचेय कुठे?

अनुप ढेरे's picture

21 Aug 2017 - 5:07 pm | अनुप ढेरे

नावावरुन अश्लील कविता असेल वाटलेलं. निराशा झाली.

विवेकपटाईत's picture

23 Aug 2017 - 7:12 pm | विवेकपटाईत

कालिया नाग हा प्रदूषणचा प्रतिक आहे. बाकी या कवितेची प्रेरणा सुभाष एस नाईक यांची आंग्ल कविता :
Without Hindrance

No passport needed
Nor visa
Nor Security Check
Nor Customs formalities
Travels anywhere without hindrance

Unwanted by all countries
And yet,
None can stop this,
This – Pollution

जेम्स वांड's picture

23 Aug 2017 - 7:49 pm | जेम्स वांड

ऑ!! अहो ही कविता तर प्रदूषणावर आहे न... तुम्ही तर थेट इंद्रियसुख अन काय काय मध्ये शिरलात की हो काका, कॉन्टेक्सट हुकला असं वाटतंय.

विवेकपटाईत's picture

23 Aug 2017 - 7:55 pm | विवेकपटाईत

दहा इंद्रियांचे सुख हे प्रदूषणाचे मूळ आहे। पुन्हा एकदा कविता वाचा । तुमच्या साठी विस्तृत लेख ही लिहिला आहे

विवेकपटाईत's picture

23 Aug 2017 - 7:55 pm | विवेकपटाईत

दहा इंद्रियांचे सुख हे प्रदूषणाचे मूळ आहे। पुन्हा एकदा कविता वाचा । तुमच्या साठी विस्तृत लेख ही लिहिला आहे