आजकाल भारतात राहुन, जळाऊगिरी करीत आणि परदेशात रहाणाऱ्या लोकांना तसेच, तिथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे.
त्यातल्या त्यात, आंतरजालाची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या अनिवासी लोकांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते.
ह्या भारतिय नागरिक असलेल्या, पण व्यवहारात इंग्रजी/ हिन्दी बोलणाऱ्या महाराष्टीयन्स च्या ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची अस्सल मराठी माणसाला खरंच गरज आहे कां?
इथल्या ज्या अनिवासी लोकांची ते खिल्ली उडवतात, त्याच लोकांना निमंत्रित वक्ते म्हणून लेक्चरं द्यायला बोलवतात. इथल्या औद्योगिक क्षेत्राकडून ग्लोबलायझेशन बद्दल शिकण्याचे प्रयत्न करतात... ...
ही गोष्ट साधारणतः एखाद्या डिस्कशन ग्रुप मधे, किंवा नेट वर, एखाद्याच्या ब्लॉगवर दिसून येते..
हिच गोष्ट आज बघितली मिसळपाव या साईटवर..आणि मला खुप इन्सल्टींग वाटलं..
त्यामुळेच ’त्यांना’ म्हणजे त्या इंग्रज महाराष्र्टीयन्सना ना सांगावंस वाटलं..... की तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
हे लेखन कोणाच्या विरुध्द व्यक्तिशः लिहिलेले नाही .. त्यांच्या जनरल टेंडन्सी बद्दल लिहिलंय......
(आम्ही आता मनोरंजक काथ्याकूटाचेही विडंबन करण्याची नवीन प्रथा पाडत आहोत!!!!)
या विडंबनामागची प्रेरणा:
http://www.misalpav.com/node/6149
प्रतिक्रिया
19 Feb 2009 - 1:49 am | संदीप चित्रे
एकदम ब्येस बोललात पिडाकाका.
19 Feb 2009 - 2:00 am | शैलेन्द्र
छान आहे काका,
खरं तरं चुक आणि बरोबर, हेही स्थळकाळ सापेक्ष आहे.
जे चांगले ते वेचावे, चुकीचे(कींवा बरोबर असुनही आपल्याला पटत्/पचतं नाही) ते सोडुन द्यावे.
जे चांगले(म्हणजे आपल्याल वाटतं/पटत्/पचतं) आहे त्याच्याशी आपला बादरायन संबंध असला तरी अभिमान बाळगावा(फुकट ते पौष्टिक), नाही(परत आपल्याल वाटतं/ न पटत्/ न पचतं) त्याला सोडुन द्याव.
डोक्याला काय कमी ताप आहे, फुकट नवीन काथ्या वळुन तो कुटंत बसायचा...
19 Feb 2009 - 2:35 am | प्राजु
याला म्हणतात धोबी पछाड..!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Feb 2009 - 7:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पिडाकाका, लै भारी विडंबन. आजची सकाळची सुरूवातच उत्तम झाली, दिवस भारी जाणारच!
तात्यांचं निवेदनही आवडलं.
अदिती
19 Feb 2009 - 2:37 am | बेसनलाडू
आजकाल भारतात राहुन, जळाऊगिरी करीत आणि परदेशात रहाणाऱ्या लोकांना तसेच, तिथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे.
त्यातल्या त्यात, आंतरजालाची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या अनिवासी लोकांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते.
सहमत आहे अगदी!
लेखन उत्तम! पटले.
(परदेशस्थ)बेसनलाडू
19 Feb 2009 - 2:39 am | खादाड_बोका
म्हणे आम्हीच खुप शहाणे आणी बाकी सर्व अनिवासी मुर्ख... :T :T
ऊठता की लाथ, बसला की बुक्की....
19 Feb 2009 - 3:37 am | प्रियाली
चला आता पाडा इथे १०० प्रतिसाद. ;)
लेको, गमज्या मारता. एक दिवस अमेरिकन सरकार हाकलून देईल ना तेव्हा याल आमच्या भारतात मुकाट्याने. (कधीकाळी अभिमानी भारतीयाकडून ऐकलेले मुक्ताफळ) ;)
जळत नाही हो ते. त्यांच्याकडे लायसन्स असतं म्हणे, परदेशस्थांवर तोंड सोडायचं. ते स्वतः परदेशात पोहोचले की ते आपोआप एक्सपायर होतं. ;)
19 Feb 2009 - 5:59 am | लवंगी
चला.. आता जरा बर वाटल..
19 Feb 2009 - 6:16 am | विसोबा खेचर
हिच गोष्ट आज बघितली मिसळपाव या साईटवर..आणि मला खुप इन्सल्टींग वाटलं..
अरे डांबिसा, कुणी केला तुझा अपमान? दुवा दे पाहू.. माझं कामाच्या गडबडीत अलिकडे वाचन खूप कमी होतं..
आयला! तात्या हयात असतांना डांबिसाचा मिपावर अपमान होईल काय? :)
असो, या बाबतीत मला विचारशील तर माझं निवेदन खालीलप्रमाणे -
आपली मातृभूमी, आपल्या आईवडिलांना सोडून कुणी उगाचच्या उगाच परदेशात जाऊन रहात नसावं असा माझा अंदाज आहे. पोटाची खळगी भरण्याकरता, समृद्ध-सुखासीन आयुष्य जगण्याकरता, कामाचं समाधान मिळवण्याकरता, अश्या अनेक कारणांकरता मंडळी परदेशात जात असतात. तिथे जाऊनदेखील आपली भाषा, आपली संस्कृती, आपली मातृभूमी या सर्वांबद्दल प्रचंड श्रद्धा असलेली माणसं मला इथे मिपावरसुद्धा बघायला मिळाली आहेत.. या कुणाचबद्दल माझा आक्षेप नाही, ना मला यांच्याबद्दल काही टीका-टोमणे मारायचे आहेत..
माझा आक्षेप आहे आणि राहील, तो तिथे जाऊन तीन महिने नाय झाले तोवर भारताविरोधी छद्मी सूर काढणार्यांकरता आणि एव्ह्री अल्टरनेट डे भारताला काही ना काही नावे ठेवणार्यांना! साले इथे जन्मले, जगले, जेवलेखाल्ले, शिकले आणि तिथे गेल्यावर तीन महिन्यातच यांना भारताचा तिटकारा, किळस वाटू लागते अश्या अनिवासींबद्दलच केवळ माझ्या मनात राग आहे. कारण अशीही काही मंडळी मी पाहिली आहेत..
असो..
निवेदन संपले....
तात्या.
19 Feb 2009 - 7:01 am | चतुरंग
बाकी तुम्ही म्हणता तसे भारतद्वेष्ट्यांना आम्हीही नेहेमीच फाट्यावर मारतो निवासी किंवा अनिवासी!
चतुरंग
19 Feb 2009 - 8:28 pm | संदीप चित्रे
पै. उ. बिस्मिला खाँ एक खूप सुरेख वाक्यं बोलून गेले होते --
यू कॅन टेक मी आऊट ऑफ इंडिया बट यू कॅन नॉट टेक इंडिया आऊट ऑफ मी !
संतुलित प्रतिसादासाठी आभार तात्या.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
19 Feb 2009 - 7:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नुकतेच किंवा बरेच दिवस परदेशात राहून भारतियांना शहाणपणा शिकवणार्या लोकांचा आम्हालाही खूप राग. हे आस्सं पाहिजे, ते तस्सं व्हायला पाहिजे. भारत म्हणजे अस्वच्छता, भारत म्हणजे बेकारी, आमचाही भारत म्हणजे ग्रेट, पण काळजी वाटते म्हणून असे बोल्तो..वगैरे. म्हटलं की टाळके फिरते. चार-दोन अनिवासी लोक काही सामाजिक, आर्थिक, किंवा अन्य मदत भारताबद्दल प्रेम म्हणून मदत करत असतीलही ती चांगली गोष्ट. पण भारतात राहणारे तरी देशाच्या प्रगतीसाठी किती धडपडतात? लोकशाहीची प्रचंड विटंबना ? वगैरे वाचले कीव करावीशी वाटते. भारतीय म्हणून आणि मराठी माणूस म्हणून आम्ही विविध अडचणींना सामोरे जात असतो तरी, आहे त्या परिस्थितीत देशाच्या प्रगतीसाठी सिंहाचा नसेल पण खारीचा वाटा एक भारतीय म्हणून आम्ही उचलत असतो. आहे ती लोकशाही आमच्या भल्यासाठीच आहे, तिचा आम्हाला अभिमान आहे. स्वतःचे एक अस्तित्व ठेवून विश्वासाने नजरेत भरतील अशा देशाचे नागरिक म्हणून आम्हाला बॉ जगतांना आनंद वाटतो, हेच सांगण्यासाठी हा प्रपंच.
थोडक्यात काय ! हमे हमारे हाल पे छोड दो ! आणि मराठी अमेरिकन्स (चोथा झालेल्या विषयावर) चर्चा जोरात चालू द्या ! :)
19 Feb 2009 - 8:26 am | पिवळा डांबिस
प्राध्यापकसाहेब.
प्लीज एक लक्षात घ्या....
परदेशात रहाणारी मराठी माणसं म्हणजे फक्त आयटी मधले लोक नव्हेत जे परदेशात जायला प्रामुख्याने नव्वदीपासून सुरवात झाली......
परदेशात मराठी माणसं साठीच्या दशकापासून रहात आहेत. ते ही तिथे विविध अडचणींचा सामना करताहेत (अहो, अडचणी कोणाला सुटल्या आहेत?) तरीही ते भारताबद्दल काही ममत्व बाळगून काही सुधारणा घडवून आणण्यासाठी मनोभावे प्रयत्न करताहेत......
आजवर ते इतकी दशकं हेच वाक्ताडन ऐकत आले. फक्त त्यावेळेस बोलणारे लोकं वडिलधारे असल्याने त्यांच्या वडिलपणाचा मान राखायचा म्हणून या मंडळींनी कधी दुरुत्तरं केली नाहीत.......
जर नारळीकरांनी, अब्दुल कलामांनी चार शब्द ऐकवले तर ही मंडळी अजुनही ऐकून घेतील कारण नारळीकरांची, कलामांची योग्यता ही मंडळी जाणून आहेत.....
पण उगाच कोणी अटक मटक उठून अद्वातद्वा बोलू लागलं तर या मंडळींनी काय म्हणून ऐकून घ्यायचं?
भारत म्हणजे अस्वच्छता....... म्हटलं की टाळके फिरते.
तुमचे टाळके हे ऐकून का फिरते?
ही अस्वच्छता तुम्ही नाकारता काय?
आणि नसेल तर मला सांगा भारतातील अस्वच्छता काय अनिवासी लोक करतात काय?
की आत्मनिरिक्षण करण्यापेक्षा टाळके फिरवून घेणे अधिक सोपे असते?
आहे ती लोकशाही आमच्या भल्यासाठीच आहे, तिचा आम्हाला अभिमान आहे.
अहो तुम्हालाच काय पण इकडच्या लोकांनाही तिचा प्रचंड अभिमान आहे. इथल्या स्थानिक लोकांशी बोलतांना तो दर प्रसंगी व्यक्तही होतो......
पण मला सांगा, ही लोकशाही सुदॄढ करण्यात भारतातील मध्यमवर्गाचे आज कितपत योगदान आहे?
माझ्याकडे आकडेवारी नाही पण तुम्ही तिथे आहांत, तुम्ही मला सांगा आज मध्यमवर्गीयांत मतदानाचे शेकडा प्रमाण किती आहे?
भारतातली लोकशाही जिवंत ठेवली आहे ती तळागाळातल्या खेडूतांनी.....
आजही मतदानकेंद्रावरच्या रांगांचे फोटो बघतांना त्यात खेडूतच का दिसतांत, मध्यमवर्गीय का दिसत नाहीत?
थोडक्यात काय ! हमे हमारे हाल पे छोड दो !
ऐसेही बीचमें कैसे छोड देंगे? एक भाई अपने भाईको ऐसेही भरे बाजार अकेला छोड दे सकता है क्या?
फिर हमारी जिंदगीका मकसदही क्या रहा?
आप चाहो ना चाहो, हम भारतको आबादीके रास्तेपर लेकरही चलेंगे.....
हमारे भारतमाता के प्रती वह हमारा कर्तव्य है.....
चाहे इस प्रोसेस मे आपका टाळका कितनाभी फिर क्यों न जायें....:)
बिरूटेजी, आपल्याविषयी मला केवळ अनन्य आदरच आहे हे तुम्हीपण जाणता.....
इथे इतकी माणसं भारतमातेच्या समॄद्धीसाठी धडपडत असतांना 'कुणीही यावं, टिकली मारून जावं" हे सहन न झाल्यामुळे हा धागा सुरू झाला.......
अशा लोकांना खणखणीत उत्तर मी देणारच....
तुम्ही जेष्ठ आहांत, माझं काय चुकलं असेल तर सांगा......
आपला,
पिडां
19 Feb 2009 - 10:57 am | चित्रा
आजवर ते इतकी दशकं हेच वाक्ताडन ऐकत आले. फक्त त्यावेळेस बोलणारे लोकं वडिलधारे असल्याने त्यांच्या वडिलपणाचा मान राखायचा म्हणून या मंडळींनी कधी दुरुत्तरं केली नाहीत.......
हे विशेष पटत नाही. आधीच्या पिढीतील अनेक वयाने मोठे स्त्री-पुरूष पाहिले आहेत जे येऊन अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांच्या काळात आपले रितीरिवाज टिकवणे कठीण होते, त्यांनी ते नक्की जसे जमेल तसे केले, याबद्दल त्यांचे कौतुकच आहे. पण दुरुत्तरे केली नसतील हे पटत नाही किंवा दिसलेले नाही. उलट जे काही चार-दोन लोक पाहिले आहेत त्यांच्यावरून निष्कर्ष काढण्याचे धाडस केले तर बरोबर उलटेच दिसून येते.
जर नारळीकरांनी, अब्दुल कलामांनी चार शब्द ऐकवले तर ही मंडळी अजुनही ऐकून घेतील कारण नारळीकरांची, कलामांची योग्यता ही मंडळी जाणून आहेत.....
पण उगाच कोणी अटक मटक उठून अद्वातद्वा बोलू लागलं तर या मंडळींनी काय म्हणून ऐकून घ्यायचं?
असे असू नये. कलाम आणि नारळीकर कितीही श्रेष्ठ असले तरी जर तुम्हाला (आणि मला) आपले कोंदण प्रिय असले तर उगाचच कितीही ज्येष्ठ व्यक्ती बोलते आहे म्हणून ऐकून घेण्याचे कारण नाही. तुम्हाला तुमचे मत किंवा निर्णय योग्य वाटत असले/ला तर साध्या माणसाने विचारलेल्या प्रश्नात आणि मोठ्या व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नात भेदभाव करू नये. निर्णयाचा हक्क आणि गरज आपल्यालाच माहिती असते, त्यामुळे ती पटेल अशी समजून देण्याचा प्रयत्न करावा. न पटल्यास लोक काय म्हणतील त्याला सामोरे जावे.
की आत्मनिरिक्षण करण्यापेक्षा टाळके फिरवून घेणे अधिक सोपे असते?
नक्कीच. आत्मनिरीक्षण सर्वांसाठीच आवश्यक आहे.
19 Feb 2009 - 11:56 am | मराठी_माणूस
भारत म्हणजे अस्वच्छता....... म्हटलं की टाळके फिरते.
तुमचे टाळके हे ऐकून का फिरते?
ही अस्वच्छता तुम्ही नाकारता काय?
आणि नसेल तर मला सांगा भारतातील अस्वच्छता काय अनिवासी लोक करतात काय?
की आत्मनिरिक्षण करण्यापेक्षा टाळके फिरवून घेणे अधिक सोपे असते?
'तीकडच्या' सिस्टिम्स बर्याच वर्षा पासुन अस्तीत्वात आहेत , अनिवासी भारतीय फक्त तीचे नीट पालन करत असतात कारण त्यांना तिथे रहायचे असते , पण तुलना करुन इथल्या सिस्टीम्स बद्दल बोलणे म्हणजे 'तिकडच्या' सिस्टीम्स चे उत्तरदायीत्व स्वतः कडे घेण्यासारखे आहे. खरे तर तिकडच्या कोणत्याच सिस्टिम्स मधे ढवळढवळ करण्याचा काहीच अधिकार आपल्या मंडळीना नसतो. कीत्येकाना मतदानाचा देखील नाही.
19 Feb 2009 - 12:13 pm | सुक्या
हे 'तीकडच्या' सिस्टिम्स म्हणजे काय हो?
'तीकडच्या' सिस्टिम्स बर्याच वर्षा पासुन अस्तीत्वात आहेत म्हणजे 'कचरा फक्त कचरापेटीतच टाका' हा नियम 'तीकडे' बर्याच वर्षापासुन आहे असेच ना? अहो हा नियम 'इकडे'पण बर्याच वर्षांपासुन आहे. आम्हाला त्याचे नीट पालनही करता येत नाही. कचरा कचरापेटीतच, लाल दिवा लागला की गाडी थांबलीच पाहीजे, सीट बेल्ट बांधलेच पाहीजे. कायदा हा कायदा आहे. त्यात वळढवळ करण्याचा अधीकार 'तीकडे'ही कुणालाच नाही.
कचरापेटीत कचरा टाकला तर हाताला भोकं नाही पडत. तसे करण्याची मानसिकता हवी. बाकी चालु द्या.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
19 Feb 2009 - 12:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"आमची" संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे ना, मग कचरा कचरापेटीतच टाकायचा, रस्त्यावर, कमीतकमी सार्वजनिक ठिकाणीतरी शिस्त बाळगावी हे प्रकार संस्कृतीमधे मोडत नाहीत का?
कधी विचार येतो, आपलं अधःपतन झालं कसं, कधी?
अदिती
19 Feb 2009 - 2:06 pm | पक्या
>>भारत म्हणजे अस्वच्छता....... म्हटलं की टाळके फिरते. ही अस्वच्छता तुम्ही नाकारता काय?
आणि नसेल तर मला सांगा भारतातील अस्वच्छता काय अनिवासी लोक करतात काय?
की आत्मनिरिक्षण करण्यापेक्षा टाळके फिरवून घेणे अधिक सोपे असते?
भारतातील अस्वच्छता कोणीच नाकारत नाही. सर्वानाच माहितेय त्याबद्द्ल. बेसुमार लोकसंख्या, गरिबी , शिक्षणाची आबाळ (हो अजूनहि अशी कितीतरि खेडी आहेत आणि तिथून अशा अशिक्षित लोकांचे शहरात येणारे लोंढे आहेत). ,बेकारी ,स्वयंशिस्तीचा अभाव वगैरे बेसिक गोष्टी अस्वच्छतेला कारणीभूत आहेत. तुमच्या आमच्या सारखे लोक अस्वच्छता करीत असतील असे मला वाटत नाही.
भारतातील अस्वच्छता असंमज लोक करतात. त्यात निवासी पण आले आणि अनिवासी पण आले.
जे चकाचक स्वच्छ देश आहेत ना तिथे भारताच्या तुलनेत लोकसंख्या फारच कमी आहे .
मागे काही वर्षापूर्वी एलए ला आलो असताना एलए सारख्या मोठ्या शहरात गचाळ भाग पाहिलेला आहे आणि त्या भागात तेथील अरूंद गल्ल्यांमध्ये रस्त्यावर टाकलेला कचरा पाहिला आहे. खरोखर आश्चर्य वाटले होते तेव्हा. शेवटी काय आहे हे माणसाच्या सुसंस्कृतपणावर आणि स्वयंशिस्तीवर अवलंबून आहे. त्यात निवासी अनिवासी असे काही नाही.
19 Feb 2009 - 1:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रिय पिडा...
नव्वदीपासून परदेशी राहणार्या मित्रांचे आणि त्यापूर्वीच्या मित्रांचे योगदान मला माहित नाही. भरल्या पोटाने अनेक गोष्टी कराव्या वाटतात. सूखः समृद्धी आपल्या दारात भरभरुन असली की मग दुसर्याच्या अंगणाबरोबर त्याचा समृद्धीसाठी प्रगतीसाठी प्रयत्न करावे वाटतात.भारताबद्दल ममत्व असणे आणि भारतीयांमधे सुधारणा घडवून आणन्याचे प्रयत्न करणे या मला दोन वेगवेगळ्या गोष्टी वाटतात. ममत्व हे अधिक भावनिक तर, सुधारणा कृतज्ञेच्या भावनेतून दिसते. ( गाव दत्तक घेणे,अनाथमुलांच्या सेवेसाठी काही रक्कम देणे, रुग्णांना मदत करणे, शिक्षण देण्यासाठी निधी देणे वगैरे असे ) भारताची समृद्धी मोजक्या लोकांनी करणे, हेही तितकेसे सोपे काम नाही आणि जरासे न पटणारे आहे.
>>लोकशाही सुदॄढ करण्यात भारतातील मध्यमवर्गाचे आज कितपत योगदान आहे?
लोकशाही शासनव्यवस्था म्हणजे जनतेचे राज्य, जनतेचे राज्य म्हणजे तरी काय ? भांडवलशाहीच्या प्रारंभीच्या काळात 'जनता' या शब्दाला जरा मर्यादा होत्या. समाजातील राजकीयदृष्ट्या जागृत अशा धनिकवर्गालाच 'जनता' मानण्यात येत होते. त्यामुळे सत्तेची सूत्रे जनतेच्या नावाखाली याच वरिष्ठवर्गीयांच्या हाती होत्या. त्यानंतर आर्थिक क्षेत्रातील स्वातंत्र्याच्या कल्पनेमुळे मतदारांचे क्षेत्र वाढत गेले. पुढे मजुरांच्या वाढत्या संघटना वाढल्या, वैचारिक जागृती होत गेली, जन्म, संपत्ती, शिक्षण व प्रतिष्ठा याची बंधने नष्ट झाली. आणि सर्वांनाच मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. हे आपणास माहित आहे, तरी पुन्हा हे का सांगतोय तर..लोकशाही सुदृढ होणे हे अचानकपण होत नसते तर तिचा प्रवास हळुहळु आणि अधिक दमदार होत असतो. समाजात प्रत्येक व्यक्तीस आर्थिक, राजकीय, सामाजिक स्वातंत्र्य आहे, म्हणजे लोकशाही. प्रत्येक व्यक्तीस समान दर्जा, समानाधिकार, त्याच बरोबर प्रत्येक क्षेत्रात न्याय मिळणे, म्हणजेच लोकशाही. मध्यमवर्गीयामधे उदासिनता आलेली आहे ती निष्क्रीय नेतृत्वामुळे..ज्यांच्या भरवशावर काही विकासाची आशा करावी अशा लोकांच्या कडून पदरी पडलेल्या निराशेमुळे. आणि यातलाच एक सुखात रमलेला वर्ग ज्याला लोकशाही (शासनव्यवस्था) बळकट करण्याची गरज वाटत नाही, त्याची सर्वच व्यवस्था झालेली आहे. शासनव्यवस्थेत जो पर्यंत थेट नागरिकांचा सहभाग असत नाही. तो पर्यंत काही प्रश्न 'आ'वासून आपल्यापुढे (सॉरी आमच्यापुढे ) उभे राहणारच आहेत. लोकशाही बळकट होण्यासाठी जागृत लोकमताची आवश्यकता आहे. सामाजिक समस्यांची सोडवणूक आम्हाला आमचीच करायची आहे. सुदैवाने खूप विचारवंत, आजही देशाचा खूप विचार करतात..त्यांची खूप मदत होते. एक सामान्य माणूस म्हणून आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. आप बुरा न लगने दो ! लेकीन वो सब काम हमे हमारे बलबुतेपर ही करना है .
(पिडा, मागे एक तुमचा एक जब्बरदस्त फोटो पाहिला होता. तेव्हा लक्षात आले मी तुमच्यापेक्षा लहान आहे. नावापुढे प्रा.डॉ. लावण्याची हौसेमुळे माझ्याबद्दल अनेकांचे खूप गैरसमज आहेत. तेव्हा मी जेष्ठ वगैरे काही नाही. स्नेह आहेच तो अशाच निमित्ताने वाढवावा लागतो. )
-दिलीप बिरुटे
(आपलाच)
19 Feb 2009 - 7:44 am | पिवळा डांबिस
हिथे तुला कोणीच काय बोलत नाये रे....
तू कशाला उगाच मनाला लावुन घेतो?
:)
तुझ्याशी भांडायचं झालं ना तर मी ठाण्याला येऊन आपल्या दोघांच्या मध्ये एक सिंगल माल्ट ठेऊन भांडेन....
आणि भांडता-भांडता आपण ती सिंगल माल्ट खाली करूयांत.....
:)
नंतर समर्थ मध्ये आपल्याला जेवायला घालायची जबाबदारी मात्र तुझी!!!!
(आम्हाला ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह करायची काकूची परमिशन नाय ना, म्हणून!!!!)
;)
19 Feb 2009 - 8:04 am | सुचेल तसं
>>आम्हाला ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह करायची काकूची परमिशन नाय ना, म्हणून
सायबा, आजकाल ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह करणार्यासोबत जो माणूस असतो त्याला पण आत टाकतात. पोलिसांचा मुद्दा: तुम्हाला जर माहिती आहे की बरोबरची व्यक्ती ड्रिंक घेऊन ड्राईव्ह करत आहे तर तुम्ही सुद्धा कायदा मोडला आहे.
बेस्ट वे: दारु न पिणार्याला सोबत घेऊन त्याला/तिला ड्राईव्ह करायला सांगा :)
तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर
19 Feb 2009 - 8:40 am | पिवळा डांबिस
सायबा, आजकाल ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह करणार्यासोबत जो माणूस असतो त्याला पण आत टाकतात.
मग आम्ही दोघेही आत बसू....
मी एक पत्त्याचा कॅटही बरोबर घेऊन येईन....
आमी दोघे आणि इनिस्पेक्टर, रम्मी लावत बसू.....
:)
19 Feb 2009 - 8:49 am | सुचेल तसं
:D मग काय हरकत नाय...
तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर
19 Feb 2009 - 10:55 am | विनायक प्रभू
तुम्ही या तर खरे. सोबर ड्रायवर घरीच आहे. त्याला एक आइस्क्रीम दीले की पोटातली दारु न हलवता ड्रायवींग करेल. परत घरी आणुन सोडेल.
एन्.आर्.आय भारतियांचा भारताच्या प्रगतीमधे हिस्सा हा एक वेगळा विषय आहे. तो न मानणार्या महाभागांबरोबर चर्चेत वेळ घालवणे मुर्ख पणाचे आहे.
19 Feb 2009 - 9:57 pm | श्रीकृष्ण सामंत
तात्याराव,
असां काय?
"आंवस मरो आणि मावशी जगो"
अशी मालवणीत म्हण आसां.
विसरल्यांत?
"आये मांका तुझी मावशीकडे लंय याद येय गे!"
असां आंवस दिसली की बोलतलोच.
आयशीक आणि मावशिक आपल्या अळवाची खाज माहित नाय असां कधी झालां?
मनुष्याचो स्वभाव खंय गेलो तरी बदलूंचो नाय.
आता काय तरी मचमच करूंक विषय होयो ना मिपावर?
बाकी तुमचा निवेदन ह्यावेळेक कोणाक गाळी न देतां
झकास लिवल्यात तां माका आवाडलां.आता साद आणि प्रतिसाद चलतलेच.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
19 Feb 2009 - 8:08 am | नीधप
सिनीयर डॉग,
त्या लेखाप्रमाणेच एकांगीपणा तुमच्या विडंबनात पण उतरलाय.. ;)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
19 Feb 2009 - 8:36 am | पिवळा डांबिस
त्या लेखाप्रमाणेच एकांगीपणा तुमच्या विडंबनात पण उतरलाय..
त्यालाच विडंबन म्हणतात......
नायतर तो स्वतंत्र लेख नसता का झाला?
:)
19 Feb 2009 - 8:42 am | नीधप
यग्ग्जॅक्ट्ली!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
19 Feb 2009 - 11:25 am | मराठी_माणूस
जळाऊगिरी करीत
हा गोड गैर समज आहे
19 Feb 2009 - 11:27 am | ऍडीजोशी (not verified)
चला सगळे उठू नी जाऊ परदेशात. देश गेला खड्ड्यात, आपल्या तुंबड्या भरल्याशी कारण. मग तिथून आपल्यातले २-३ लोक $$ पठवतील त्यांच्या जीवावर इथल्या लोकांना ऐकवू, तुम्ही काय करता भारतात राहून, आम्हालाही आमच्या देशाविषयी प्रेम आहे, परदेशी राहिल्याने देशप्रेम कमी होत नाही. हाय् काय अन् नाय् काय?
19 Feb 2009 - 12:44 pm | कुंदन
देश खड्ड्यात जाण्यासाठी अनिवासी भारतीयच जबाबदार आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
19 Feb 2009 - 1:19 pm | पर्नल नेने मराठे
कुन्दन थन्द घे... :S
चुचु
19 Feb 2009 - 7:50 pm | टारझन
आले आले कुन्दा .. थन्द घे ... पर्न्ल ने सान्गित्ल ना... तिन्गा कसा आहेस.. तिक्दे फार थ्म्दी आहे कारे ब्रफ पद्तो का ?
- बर्नल घेणे पराठे
19 Feb 2009 - 1:22 pm | सूहास (not verified)
"राष्ट्रध्वजाच्या" चड्ड्या घालणार्या लोका॑च्या संस्कृतीची काय कथा आणी काय गोडवे गायचे!!! तिकडे असे आणी ईकडे असे!!!माझ्या भारताची जगाशीहोऊ शकत नाही!!!भारत हे एक स॑पुर्ण वेगळ विश्व आहे....
सुहास..
"एकदा सानियाला पण शिव्या द्यायच्या आहेत्.. मा॑डीवर ति॑रगा घेउन बसली होती"
19 Feb 2009 - 1:35 pm | नाटक्या
१. उद्या तालीबान्यांनी म्हटले की बुरखा न घालणार्या आणि स्त्रीयांची मते एकून घेणार्या धर्माची आणि त्यांच्या संस्कृतीचे काय गोडवे गायचे तर?
२. अफ्रिकेतल्या कुठल्याश्या जमातीने आपल्याकडे बायका चोळी घालतात म्हणून टिका केली तर?
३. आता आपण बोडक्या डोक्याने रहातो, पुर्वीचे लोक टोपी घातल्या शिवाय बाहेर पडायचे नाहीत.
४. आता बायका जिन्स/टी-शर्ट वापरतात, ६०-७० वर्षापुर्वी फक्त नऊवारी नेसत. त्यांनी आजकालच्या मुलींना नावं ठेवलीत तर ते बरोबरच नाही का?
५. राष्ट्रध्वज जमीनीला लागू द्यायचा नाही. तो अंगावर बाळगायचा नाही ही आपली संस्कृती आहे. तर राष्ट्रध्वज अंगावर बाळगणारा माणूस देशभक्त अशी काही देशांची शिकवण आहे.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या चुक/बरोबर, नैतीक/अनैतीक हे प्रांत/काळ/देश यांच्या प्रमाणे बदलतात. प्रत्येकालाच आपला देश/संस्कृती प्रिय असते मग ती आपल्या दृष्टीने कशी का असेना.
- नाटक्या
20 Feb 2009 - 12:41 am | स्वप्निल..
>>५. राष्ट्रध्वज जमीनीला लागू द्यायचा नाही. तो अंगावर बाळगायचा नाही ही आपली संस्कृती आहे.
ही लिंक बघा..
http://www.youtube.com/watch?v=fnJA3JgsdJk&feature=PlayList&p=AFF2165C15...
बरयाच वेळा राष्ट्रध्वज जमिनीवर दिसेल..सहज तो विषय आला म्हणुन..
स्वप्निल
19 Feb 2009 - 2:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"राष्ट्रध्वजाच्या" चड्ड्या घालणार्या लोका॑च्या संस्कृतीची काय कथा आणी काय गोडवे गायचे!!!
लोकांच्या चड्ड्यांकडे बघणार्यांची संस्कृती असते का विकृती?
तिकडे असे आणी ईकडे असे!!!
आपण जाऊन तिकडे नक्की काय असतं हे पाहिलं आहेत का?
माझ्या भारताची जगाशीहोऊ शकत नाही!!!भारत हे एक स॑पुर्ण वेगळ विश्व आहे....
जरा नीट समजावून सांगाल का, काही 'समांतर विश्व'वगैरे कल्पना आहे का यात?
अदिती
19 Feb 2009 - 1:52 pm | प्रकाश घाटपांडे
या निमित्ताने मुक्त सुनीत ने केलेल्या या चर्चेची आठवण आली. वाचनीय आहे
प्रकाश घाटपांडे
19 Feb 2009 - 2:03 pm | सूहास (not verified)
मला एक चा॑गल कळत...
"YOU HAVE TO BE IN SYSTEM TO CHANGE THE SYSTEM" मिपावर बसुन ताव काढायला काय जातय..(जावे त्याच्या व॑शा..माहीयत आहे ना )
आणी संस्कृतीच्या नावाखाली अती केल की माती होतेच्...वरील सर्व उदाहरणे तीच आहेत...संस्कृतीच पालन हे गरजेचे आहे पण त्याला आधूनिकतेची जोड द्यावी लागते,खाली बाप बसलेला असताना वरच्या खोलीत बॉयफ्रे॑डला घेउन बसणारी मुलीवरती काय सस्का॑र देणार्,तिकडे ५० टक्क्याचा वर लोक हॉटेलमध्ये रहातात ना,बापाला भेटायच तर आधी परवानगी घ्या,आमचा बाप मी एव्हढा मोठा झालो तरी कानाखाली जाळ काढ्तो...मला खाताना लाज वाटत नाही...व्यक्तीस्वात॑त्र्य आणी स्वेराचारात हाच फरक आहे...
नीट लक्ष देउन वाच ..हे विषया॑तर नाही...तुला कळेलच...
सुहास..
भो...माझ्या देशाच्या अस्वच्छतेत वाढुन,अभिमानी असलेला
19 Feb 2009 - 3:05 pm | कुंदन
अभिमान कशाचा :देशाचा की अस्वच्छतेचा?
19 Feb 2009 - 3:08 pm | पक्या
>>अभिमान कशाचा : देशाचा की अस्वच्छतेचा?
अभिमान अर्थात देशाचाच असणार ना. अस्वच्छतेचा अभिमान बाळगतो का कोण?
उगाच शब्दांचा किस नका हो पाडू कुंदन राव. आधीच या चर्चेने वातावरण गरम झालंय .
19 Feb 2009 - 3:09 pm | सूहास (not verified)
सुहास..
19 Feb 2009 - 3:10 pm | नाटक्या
फारच गैरसमज आहेत हो आपले.
तिकडे ५० टक्क्याचा वर लोक हॉटेलमध्ये रहातात ना,बापाला भेटायच तर आधी परवानगी घ्या.>>
खाली बाप बसलेला असताना वरच्या खोलीत बॉयफ्रे॑डला घेउन बसणारी मुलीवरती काय सस्का॑र देणार्>>
कुणी सांगीतलं तुम्हाला? किती देशात गेला आहात आपण? आणि तिथे किती दिवस राहिलात आपण? कुठे पाहीलंत तुम्ही हे? ईंग्रजी सिनेमात? कमाल आहे बुवा तुमची. कसलीही माहीती नसताना काय वाट्टेल ते ठोकताय. यालाच म्हणतात मिपावर बसुन ताव काढणं.
म्हणतात ना शहाणपणाला सीमा असते पण मुर्खपणाला अंत नसतो.
- नाटक्या
19 Feb 2009 - 3:20 pm | पक्या
नाटक्या जी माझा एक अनुभव शेअर करतोय्...कोणाची बाजू घेत नाहिये.
माझा ऑफीसमधील अमेरिकन कलिग...वयाने माझ्यापेक्षा मोठा आहे. १८- १९ वर्षाची मुलगी आहे त्याला. 'आता ती वेगळी रहाणार आहे ...बॉयफ्रेंडबरोबर्..भाड्याच्या अपार्टमेंट मध्ये . वीकएन्ड ला तिचे मुव्हींग आहे . त्या आधी आम्ही या घरात शेवट्चे एकत्र सेलिब्रेशन करणार आहोत' असे मध्यंतरी सांगत होता.
सुहास ला जे काय म्हणायचे ते असंच काहीतरी असावं.
19 Feb 2009 - 3:24 pm | कुंदन
असे कॉलेजवयीन तरुण -तरुणींनी अगदी एकत्र राहण्याचे नाही , पण लग्न करण्यासाठी पळुन जाण्याच्या घटना आपल्याकडेही घडतातच की...
आणि स्वैराचाराचे म्हणाल तर नवरात्रासारख्या उत्सवांनंतर वाढणारा काही विशिष्ट गोळ्यांचा खप सर्वकाही सांगुन जातो.
19 Feb 2009 - 3:29 pm | सूहास (not verified)
अश्या घटना सगळीकडे घडताहेत भारतात त्याच प्रमाण खूप कमी आहे..त्याचा उगम कोठे झाला ह्याचा कधी विचार केला आहेस का?
सुहास..
22 Feb 2009 - 4:46 am | नीधप
>>अश्या घटना सगळीकडे घडताहेत भारतात त्याच प्रमाण खूप कमी आहे..<<
कुठल्या जगात रहाता तुम्ही? असं अजिबात नाहीये.
आणि हो एडस चा प्रसार वेगाने होणार्या देशांपैकी पहिल्या काही देशांच्यात भारताचा क्रमांक लागतो हे माहीत नाहीये का तुम्हाला?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
22 Feb 2009 - 4:46 am | नीधप
>>अश्या घटना सगळीकडे घडताहेत भारतात त्याच प्रमाण खूप कमी आहे..<<
कुठल्या जगात रहाता तुम्ही? असं अजिबात नाहीये.
आणि हो एडस चा प्रसार वेगाने होणार्या देशांपैकी पहिल्या काही देशांच्यात भारताचा क्रमांक लागतो हे माहीत नाहीये का तुम्हाला?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
22 Feb 2009 - 6:05 am | नाटक्या
नी,
तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. ही त्या बद्दलची लिंकः
http://www.indexmundi.com/g/r.aspx?t=10&v=35
या यादी प्रमाणे भारत दुसर्या क्रमांकाचा देश आहे :-(
- नाटक्या
19 Feb 2009 - 3:36 pm | पक्या
>> ... पण लग्न करण्यासाठी पळुन जाण्याच्या घटना आपल्याकडेही घडतातच की... आणि स्वैराचाराचे म्हणाल तर नवरात्रासारख्या उत्सवांनंतर वाढणारा ........
येस बॉस. घडतात ना. अगदी राजरोस, सर्रास म्हटलं तरी चालेल.
नाटक्याने 'गैरसमज ' असं म्हटल्याने तो अनुभव शेअर केला एवढचं.
19 Feb 2009 - 3:37 pm | पक्या
दोनदा आल्याने प्र का टा आ.
19 Feb 2009 - 8:37 pm | संदीप चित्रे
>> खाली बाप बसलेला असताना वरच्या खोलीत बॉयफ्रे॑डला घेउन बसणारी मुलीवरती काय सस्का॑र देणार्
आजकाल पुण्या - मुंबईच्या ज्या चमत्कारिक कथा (अफवा नाही -- प्रत्यक्ष घटना) त्या वाचून / ऐकून तर कधी कधी वाटतं की च्यायला इथली मुलं बरी !
19 Feb 2009 - 9:03 pm | सूहास (not verified)
आपण बहुतेक उच्चभ्रु लो॑काबद्द्ल बोलत असावे.ह्याविषयी आपण सवीस्तर चर्चा करुया..
सुहास..
20 Feb 2009 - 1:32 am | सुक्या
सुहासभौ, काइबी काय लिवता राव.
भारताला सम्रुध्द संस्कृती आहे तशी ती सगळ्या देशांना आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीचा जसा अभिमान असतो तसा तो सगळ्यांनाच असतो. त्याला तुम्ही वाईट का म्हणता? आपल्या संस्कृतीचा बाकीच्यांनी आदर करावा असे तुम्हाला वाटते तर तुम्हीही त्यांच्या संस्कृतीचा करा ना? आमची संस्कृती ती फक्त चांगली बाकीचे सारे वाईट हा काय प्रकार आहे? बापाने कानाखाली आवाज काढला तरी तुम्हाला काही वाटत नाही हा संस्कृतीचा भाग आहे मग बाप घरात असताना बॉयफ्रे॑डला घेउन बसणे ह्यात त्यांना काही वावगं वाटत नसेल तर आपला आ़क्षेप का असावा. तो त्यांच्या संस्कृतीचा / व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग झाला. वरती नाटक्या ने म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टी आहेत की ज्या चुक/बरोबर, नैतीक/अनैतीक हे प्रांत/काळ/देश यांच्या प्रमाणे बदलतात. प्रत्येकालाच आपला देश/संस्कृती प्रिय असते मग ती आपल्या दृष्टीने कशी का असेना.
(आपल्या संस्कृतीप्रमाणे) चांगलं ते घ्या की राव. उगीच दुसरीकडचं सगळं वाईटच आहे, आमचच तेवढ चांगलं म्हणुन काही फायदा आहे का?
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
20 Feb 2009 - 2:29 pm | सूहास (not verified)
>>>>>>आपल्या संस्कृतीचा बाकीच्यांनी आदर करावा असे तुम्हाला वाटते तर तुम्हीही त्यांच्या संस्कृतीचा करा ना>>>>>>>>
माझा त्या संस्कृती ला आक्षेप आहे,होता आणी राहील,ह्याला कारण आपणच आणी आपल्यासारखी टिचभर म॑ड्ळी ती संस्कृती ईथे आणतो,अनुकरण करावयास बघतो...त्याचा उगम्..तेथेच होतो. नाहीतर २० वर्षापुर्वी पबसंस्कृती होती का,तेव्हा ऊरूसात,गणेशउत्सवात,विसर्जनात,लग्नातच नाचत होतो ना...आता काय धाड भरलीय अ॑गात्...तेव्हा रेशन वाण्याकडुनच आणायचे ना..का मॉलमध्ये जात होते...एकतर आपले सस्का॑र/संस्कृती जपायचे नाहीत ..आणी दुसर्याचा संस्कृतीचे निर्लज्जपणे समर्थन करावयाचे...आपण तेथुन परतताना काय बरोबर आणतो.अरे आपले सस्का॑र/संस्कृती तेथे रुजवा...एक अमेरिकन बे॑गलोर मध्ये कोरमग॑लात "फोरम" मॉल समोर "गीता" विकतो.त्याला विचार किती आदर आहे...पुन्हा तेच वाक्य -मला अभिमानी म्हण चालेल्..पण माझे सस्का॑र/संस्कृती जपण्याचा अधिकार आहे, आणी मला त्यासाठी "जनमत्"तयार करण्याचा देखील....
सुहास..
22 Feb 2009 - 4:41 am | सुक्या
सुहासभाउ, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते निटसं समजल नाही. एकत्र जमुन श्रमपरीहारासाठी न्रुत्य करणे हे आपल्याकडेही नवीन नाहीये. आजही आदीवासीबहुल भागात रोज रात्री सगळे एकत्र येउन न्रुत्य करतातच. राहीली पब मधली दारु प्यायची गोष्ट, २० वर्षापुर्वी आपल्याकडे कुणी दारु पित नव्हतं का? सामाण वाण्याकडुन आणले काय किंवा मॉलमधुन आणले काय सारखेच. त्यात फरक तो काय?
तुम्हाल आपले सस्का॑र/संस्कृती जपण्याचा अधिकार आहे, त्याचा अभिमानही असावा. परंतु दुसर्याच्या संस्कृतीला वाईट म्हणुन माझीच ती संस्कृती चांगली हा दुराभिमान झाला. मी वर लिहीलेच आहे. परत सांगतो. (आपल्या संस्कृतीप्रमाणे) चांगले ते घ्या, बाकी सोडुन द्या.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
22 Feb 2009 - 4:43 am | नीधप
>>संस्कृतीच पालन हे गरजेचे आहे पण त्याला आधूनिकतेची जोड द्यावी लागते,खाली बाप बसलेला असताना वरच्या खोलीत बॉयफ्रे॑डला घेउन बसणारी मुलीवरती काय सस्का॑र देणार्,तिकडे ५० टक्क्याचा वर लोक हॉटेलमध्ये रहातात ना,बापाला भेटायच तर आधी परवानगी घ्या,<<
याच्याइतक्या विनोदी संकल्पना खूप वर्षात ऐकल्या नव्हत्या. तुम्ही हे विनोदानेच लिहिले आहे ना? या फॅक्टस नाहीत हे तुम्हाला माहीतीये ना? नसेल तर माहीत करून घ्या. आपल्या संस्कृतीचा जयघोष करताना आपली संस्कृती काय हे ही समजून घ्या हो जरा. दुसर्याला नावं ठेवून स्वत:चं मोठेपण सिद्ध करणं हे कुठल्या संस्कृतीत बसतं?
>>आमचा बाप मी एव्हढा मोठा झालो तरी कानाखाली जाळ काढ्तो...मला खाताना लाज वाटत नाही...व्यक्तीस्वात॑त्र्य आणी स्वेराचारात हाच फरक आहे...<<
अजून एक विनोदी वाक्य. भाउ आपल्या संस्कृतीत एक सुभाषित आहे
'लालयेत पंच वर्षानी
दश वर्षानी ताडयेत
प्राप्ते तु षोडशे वर्षे
पुत्रे मित्रवत आचरेत'
म्हणजे मुलाचे पाच वर्षांपर्यंत लाड करावे दहाव्या वर्षापर्यंत त्याला शिस्त लागण्यासाठी का होईना मारायला हरकत नाही. आणि मुलगा सोळा वर्षाचा झाला की त्याला मित्राप्रमाणे वागवावे.
बापाची चप्पल मुलाच्या पायात बसायला लागली की मुलाशी बरोबरीच्या नात्याने वागावं असाही संकेत आपल्याच संस्कृतीतला आहे.
हे तुमच्यात विसरले गेले आहे काय?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
22 Feb 2009 - 5:55 am | नाटक्या
=D> =D> =D> =D>
22 Feb 2009 - 5:59 am | नीधप
टाळ्या खरंच की उपरोधिक?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
22 Feb 2009 - 6:08 am | नाटक्या
अहो खरंच टाळ्या वाजवतो आहे हो. अजीबात उपरोधिक नाहीत. माझी तुमच्या आधीच्या पोस्ट साठी टाकलेली लिंक बघा:
http://www.indexmundi.com/g/r.aspx?t=10&v=35
- नाटक्या
19 Feb 2009 - 3:01 pm | सूहास (not verified)
>>>>लोकांच्या चड्ड्यांकडे बघणार्यांची संस्कृती असते का विकृती?>>>>
घालण्यार्याना॑ काय आहे ,संस्कृती ,विकृती...अर्धनग्नावस्था/नग्नावस्था ही ओ॑गळच असते....मग ती कशी ही असो....नसती तर मानव सदौदीत नग्न राहीला असता...मी त्याच्याकडे मजा म्हणुन बघत नाही...
>>>>>>तिकडे असे आणी ईकडे असे!!!>>>>
गेली सात वरिसे तेच करतोय्..तिथला कुटु॑ब वकील माझा बॉस आहे...
>>>>>जरा नीट समजावून सांगाल का, काही 'समांतर विश्व'वगैरे कल्पना आहे का यात?>>>>>
हे समजावयासाठी मला वेगळा धागा काढावा लागेल तुर्तास एव्हढच साग॑तो की...smooth road never makes a good driver...त्यामुळे भारत हा केवळ नमस्काराचा देश नसुन्"चमत्काराचा पण देश आहे"ह्या सर्व प्रतिकुलता ह्या देशाच्या अनुकुलतेसाठी आहे. जर प्रगती करावयची असेल तर "comfort zone"मधुन बाहेर याव लागत्,आणी तिच आमची(तुझी आणी माझी) खरी ताकद आहे...आपण कधीच comfort zoneमध्ये नसतो,आणी ह्या अस्वच्छतेतुन आपण चन्द्रावर यान पाठवितो.
सुहास..
मी भारतीय म्हणुन टाळ्या वाजवु नका ..पण परदेशात राहुन त्याचा अपमान करू नका(हे वाक्य सर्वा॑साठी आहे..)
19 Feb 2009 - 3:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एव्हढ लागत असेल्..तर ईथे या...३_१४
कुठे, अमेरिकेत का युरोपात? का हल्ली पुणं भारताबाहेर आहे??
मुलं-मुली रहातात आपापल्या गर्ल-बॉयफ्रेंडबरोबर. पण रस्त्यातून चालताना कोपर्यातल्या टवाळ लोकांचे हीन शेरेतर नाही ना ऐकायची वेळ आणत? भारताच लग्नाचा सोहळा असतो, तिकडे 'मुव्ह इन'चाही असतो.
'लिव्ह इन' ही विकृती असेल तर (अंगभर कपडे घातलेल्याही) मुलीला पाहून अश्लील शेरे मारणं, पांढर्या केसांच्या हिरव्या म्हातार्यांच्या नजरा, ही संस्कृती का? भारतात 'परत' आल्यावर ना पाण्याचा त्रास झाला ना खाण्याचा; त्रास झाला तो या असल्या 'अधाशी' नजरांचा! आणि म्हणे 'त्यांना' संस्कृती नाही!!
अदिती
19 Feb 2009 - 3:44 pm | सूहास (not verified)
पण रस्त्यातून चालताना कोपर्यातल्या टवाळ लोकांचे हीन शेरेतर नाही ना ऐकायची वेळ आणत?
कायतरी सा॑गु नकोस !!!! तु १९८०च्या गोष्टी करते आहेस.हल्ली मुली मुला॑ना छेडतात ,indirect propose करतात.
भारताच लग्नाचा सोहळा असतो, तिकडे 'मुव्ह इन'चाही असतो.
आज ह्याचाबरोबर/हिच्याबरोबर "'मुव्ह इन"" उद्या त्याच्याबरोबर//हिच्याबरोबर "'मुव्ह इन",लग्न कधि करणार !!!
मुलीला पाहून अश्लील शेरे मारणं, पांढर्या केसांच्या हिरव्या म्हातार्यांच्या नजरा,'अधाशी' नजरांचा
बाळ ,हा विषय सविस्तर येईल माझ्याकडुन ,हे natural आहे,तिकडच्या सारख नाही,तिथे मुलीपण मुली॑कडे त्या नजरेने बघतात,
सुहास..
19 Feb 2009 - 3:51 pm | परिकथेतील राजकुमार
>>आज ह्याचाबरोबर/हिच्याबरोबर "'मुव्ह इन"" उद्या त्याच्याबरोबर//हिच्याबरोबर "'मुव्ह इन",लग्न कधि करणार !!!
== बोला ना बोला,ऑ कधी करणार लग्न ? मेव्हण्याचा वाढप्याचा आणी आमचा पत्रीका छापायचा धंदा आहे हो. बोला ना काहीतरी.
प्रसाद.. सदैव रुसनार
मला ओकायची भिती वाटत नाही...मला ओकुन घरी जायची भिती वाटते...
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
19 Feb 2009 - 3:54 pm | पक्या
अदिती अगं जरा दमाने घे. भारतातच रहात आहेस ना तू?
पांढर्या केसांच्या हिरव्या म्हातार्यांच्या नजरा, अधाशी' नजरा ..हसू यायला लागलंय आता. टवाळखोर सगळीकडेच असतात. अगं अमेरिकेत पण आहेत.
19 Feb 2009 - 8:01 pm | टारझन
आमेरिकेत बर्याच पांढर्या केसांच्या आधीशी णजरा असतात म्हणे ... खरं की काय हो ?
एकदा जायला हवं तिकडं .. =))
20 Feb 2009 - 6:21 am | मराठी_माणूस
केसांच्या हिरव्या म्हातार्यांच्या नजरा, ही संस्कृती का?
ह्यात संस्कृती चा काय संबंध , ही पुरुषी वृत्ती आहे ती कुठेही आढळू शकते , हा इथल्या ज्येष्ठ नागरीकांचा अपमान आहे.
बाकी गोर्यांची इथे (त्या गोर्याना हे माहीत ही नाही) फुकट वकीली करणारे इतके जण बघुन गमत वाटली.
20 Feb 2009 - 6:22 am | मराठी_माणूस
केसांच्या हिरव्या म्हातार्यांच्या नजरा, ही संस्कृती का?
ह्यात संस्कृती चा काय संबंध , ही पुरुषी वृत्ती आहे ती कुठेही आढळू शकते , हा इथल्या ज्येष्ठ नागरीकांचा अपमान आहे.
बाकी गोर्यांची इथे (त्या गोर्याना हे माहीत ही नाही) फुकट वकीली करणारे इतके जण बघुन गमत वाटली.
19 Feb 2009 - 3:26 pm | सूहास (not verified)
कुणी सांगीतलं तुम्हाला? किती देशात गेला आहात आपण? आणि तिथे किती दिवस राहिलात आपण? कुठे पाहीलंत तुम्ही हे? ईंग्रजी सिनेमात? कमाल आहे बुवा तुमची. कसलीही माहीती नसताना काय वाट्टेल ते ठोकताय.
मी दिवसातिल १० तास त्याच्याबरोबर घालवितो(webex & webcam)...सल्लागार आहे मी त्या॑चा...पोटाची खळ्गी भरण्यासाठी..नाहीतर असल्या लो॑कावर आणी त्याचा॑शी माझ्या देशाही तुलना करण्यार्यावर थू॑कलो देखील नसतो....
यालाच म्हणतात मिपावर बसुन ताव काढणं
हो, भारताविषयी बोलल्यावर मला हेच कराव लागणार्,हे दहावेळा यु.एस्.पुराण लावण्यार्या॑ना काय समजणार...
म्हणतात ना शहाणपणाला सीमा असते पण मुर्खपणाला अंत नसतो
हे जे शहाणपण आहे ना ते परदेशात गेल्यावर कळले का ?तो पर्यन्त भारत हाच ग्रेट होता का ?तिथली साफसफाई बघुन चालले भारताच्या नावाने खडे फोडायला...तिथे म्हणे कोणीही उगाचच हॉर्न वाजवत नाही..नाचा मग...तरी अपघात होतातच ना...
सुहास..
20 Feb 2009 - 8:29 am | सुचेल तसं
>> दिवसातिल १० तास त्याच्याबरोबर घालवितो(webex & webcam)...सल्लागार आहे मी त्या॑चा. पोटाची खळ्गी भरण्यासाठी..नाहीतर असल्या लो॑कावर आणी त्याचा॑शी माझ्या देशाही तुलना करण्यार्यावर थू॑कलो देखील नसतो..<<
आपली ती संस्कृती आणि दुसर्याची ती विकृती असा समज आहे का तुमचा? पोटाची खळगीच भरायची आहे ना तुम्हाला? मग परदेशी लोकांशी अजिबात संबंध येणार नाही असं काहीतरी काम करा. ज्या लोकांचा तिटकारा आहे त्यांच्यासोबत कशाला १० तास घालवता दिवसातले?
तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर
20 Feb 2009 - 3:49 pm | सूहास (not verified)
>>>.आपली ती संस्कृती आणि दुसर्याची ती विकृती असा समज आहे का तुमचा? पोटाची खळगीच भरायची आहे ना तुम्हाला? मग परदेशी लोकांशी अजिबात संबंध येणार नाही असं काहीतरी काम करा. ज्या लोकांचा तिटकारा आहे त्यांच्यासोबत कशाला १० तास घालवता दिवसातले? >>>.
होय ती एक विकृतीच आहे,आणी त्या विकृतीच समर्थन करा कि॑वा नका करू ....माझ्या देशाशी त्या विकृतीची तुलना करु नका ...आणी हो....मी जे काम करतो ते ही विकृती कमी करण्यासाठीच आहे....
सुहास..
22 Feb 2009 - 8:34 am | पिवळा डांबिस
नुसत्या वेबकॅमवरच्या मुलाखतीतूंन इतकी मतं?
सुहासराव, तुम्ही नुसत्या वेबकॅमवरच्या मिटींगावरून आपली मतं न बनवता खरंच इकडे या.....
तुमची इथे एक्सप्रेस केलेली मतं बघून मी हे तुम्हाला कळकळीने आवाहन करतो आहे.....
खर्चाचाच प्रश्न असेल तर इथे आल्यावर माझ्या घरी रहा, तुम्हाला इथे रहाण्याचा काहीही खर्च पडणार नाही याची जिम्मेदारी मी घेतो....
पण इथे येऊन प्रत्यक्ष बघितल्याशिवाय अशी मूर्खप्रद (मला जर शक्य असतं तर मी याहून अतिशय सौम्य शब्द वापरला असता हो!!!!) मतं मांडली नसती!!!!!!
इथे या, स्वतः बघा, आणि मग काय ते मत मांडा.....
("इथे बहुप्रद माणसं हॉटेलांतून रहातात....." च्यायला, काय एकेक माणसं येतात मिपावर!!!!!!)
22 Feb 2009 - 8:42 am | नीधप
आयला हे बरंय...
हास्यास्पद विधानं केली की यू एस मे रहना खाना फ्री...
क्या बात है.. मी पण करते थोडी अशी विधानं तिकीटाचे पैसे जमले की!!
;)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
19 Feb 2009 - 3:35 pm | प्रभाकर पेठकर
फॉर हिअर, ऑर टू गो? लेखिका : अपर्णा वेलणकर. मेहता पब्लिशिंग हाऊस, किंमत : दोनशे पंचविस रुपये.
हे पुस्तक वाचण्यासारखं आहे. लेखिकेने कौशल्याने लिहीले आहे. निवासी आणि अनिवासी कोणासही वाईट वाटू नये आणि आपल्या पुस्तकाची भारतात आणि भारताबाहेर दोन्ही ठिकाणी भरपूर विक्री व्हावी असा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यासारखे वाटते. पण एक होतं. अमेरिकास्थित अनेक भारतियांची मतं त्यात वाचावयास मिळतात. आपला वेळ बरा जातो.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
19 Feb 2009 - 8:40 pm | मुक्तसुनीत
हे पुस्तक मी वाचले आहे. लेखिकेने कुणालाही न दुखवण्याकरता केवळ विक्रीकरता गुळमुळीत लिहिले आहे असे मला वाटलेले नाही. वेगवेगळ्या थरातल्या , भागातल्या लोकांशी बोलून , त्यांच्या आयुष्यातील काने कंगोरे टिपून , कडु-गोड अशा दोन्ही बाजू लेखिका या पुस्तकात मांडते असे मला वाटले. यामधे अनेकदा लोकांच्या वागण्या-विचारातल्या विसंगतींवरही बोट ठेवलेले आहे. कुठल्याही गुंतागुंतीच्या गोष्टीला जसे अनेक पदर असतात तसे या बाबीला आहेत आणि त्याला साजेशी ट्रीटमेंट पुस्तकात दिली गेली आहे. हां , कुणालाही ठराविक साच्यात बंदिस्त करून न ठोकल्यामुळे कदाचित प्रक्षोभक-मूल्य प्राप्त झालेले नसेल. कुणाची कृतक्-अस्मिता कुरवाळली नसेल आणि "एकच-बाजू-योग्य" हे टाळले असेल. हे "दोष" मानायचे तर या पुस्तकात आहेत.
19 Feb 2009 - 3:46 pm | आनंदयात्री
अरेरे .. भारताची इतकी दुर्दशा झालीये माहितीच नव्हते. काय मुलीबाळींना रस्त्यावर चालता पण नाही येत म्हणे .. रस्त्याच्या एवजी कचर्याचे ढिग असतात म्हणे .. अगदीच नॉन रहाणेबल झाला काय माझा देश ??
चला रे मित्रांनो देश सोडुयात !!
19 Feb 2009 - 3:49 pm | सूहास (not verified)
रस्त्याच्या एवजी कचर्याचे ढिग असतात म्हणे
सत्य आहे...आपणच टाकलेला...आणी वाढवलेला..
सुहास..
19 Feb 2009 - 4:08 pm | आनंदयात्री
खरेय मालक खरेय. आमचे वाक्य तुम्हा फाल्तुच वाटणार !!
असो बाटलेला जास्त कडवा असतो हे काय खोटे नाही.
19 Feb 2009 - 4:45 pm | मराठी_माणूस
असो बाटलेला जास्त कडवा असतो हे काय खोटे नाही.
सही. बर्याच प्रतीसादात हे ठायी ठायी दिसले
19 Feb 2009 - 3:50 pm | अभिज्ञ
हि "अमेरिका" पुण्यात कुठेशिक आहे?
;)
अभिज्ञ.
19 Feb 2009 - 3:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चेवर डोळ्यात तेल घालून पहारा आहे. कोणाचा अनादर होणार नाही.
याची काळजी मात्र घेत राहू !!
19 Feb 2009 - 5:02 pm | विनायक प्रभू
माझ्याकडे सिस्टीम मधे राहुन 'चेंज द सिस्टिम' चा प्रकल्प आहे. सुहास राव सहभाग घेणार काय? दिवसाला किती वेळ द्याल. आर्थीक भाग किती उचलाल?
19 Feb 2009 - 7:36 pm | सूहास (not verified)
नक्की
सुहास..
20 Feb 2009 - 3:57 am | खादाड_बोका
खाली बाप बसलेला असताना वरच्या खोलीत बॉयफ्रे॑डला घेउन बसणारी मुलीवरती काय सस्का॑र देणार्
अमेरीकेत डेटींग ची एक सिस्टीम आहे. पण तुम्ही भारतात तर त्याचेही बाप आहात. आणि भारतात राहणार्यांना खोटे वाटत असेल तर डेबोनेयरर्ब्लॉग ह्या साईटवर जावुन पाहा की भारतातले लोक काय मुक्ताफळ ऊधळुन राहीले आहेत्.(क्रुपया ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की ही एक भारतीय पॉर्न साईट आहे.) तेव्हा तुम्हालातर ह्यावर सुध्धा बोलण्याचा हक्क नाही..... :T :T
आता काय बोलणार....सांगा
20 Feb 2009 - 3:57 pm | सूहास (not verified)
>>>>तुम्ही भारतात तर त्याचेही बाप आहात>>>>>>>
पुन्हा तेच साग॑तो------ह्या सगळ्या गोष्टी॑चा उगम तेथेच आहे...आपल्यासारखी लोक्स त्याच अनुकरण करतात्...आणी बाळा तु (पॉर्न साईट )येथे असतो..सस्कारा॑च्या गोष्टी करु नकोस्....वाद वेयक्तीक होईल....
सुहास..
20 Feb 2009 - 3:57 am | वेलदोडा
धन्य हो मराठी अमेरिकन्स आणि इंग्रज महाराष्ट्रीयन्स .
काय पण लोक एकेक मुद्दयावर भांडत आहेत...डेटींग काय , पॉर्न साईट्स काय्...खरोखर धन्य धन्य वाटले.
संपादक मंडळ - मिपावर पॉर्न साईट्स चा दुवा दिलेला चालतो का हो?
वाद घालण्याच्या नादात आपण कोणकोणत्या गोष्टींचे उदात्तीकरण करत आहोत ह्याचे भान ठेवले पाहिजे असे मला वाटते.
20 Feb 2009 - 4:14 am | खादाड_बोका
केव्हा बदलले बाबा तु ??
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4157741.cms
22 Feb 2009 - 3:07 am | वेलदोडा
बोकेमहाराज , साळसूदपणाचा आव आणू नका. माझा प्रतिसाद आल्यानंतर आपणच आपला मूळ प्रतिसाद संपादित केलेला आहे. आणि मला खात्री होतीच त्याची. म्हणूनच मी माझ्या प्रतिसादात उत्तर देताना आधी तुमचा मूळ प्रतिसाद चिकटवला.
म्हणतात ना सौ चूहे खाके बिल्ली (की बोका?) हज को चली.