निसर्गरम्य खेड

भटकीभिंगरी's picture
भटकीभिंगरी in भटकंती
17 Apr 2017 - 10:21 pm

" निसर्गरम्य खेड "
चौदाला खेडला जाण्याचे नक्की केले..१४,१५,१६ अशि लागुन सुट्टी आल्यामुळे मुलीने आई कुठेतरी जाउया एकत्र असा प्रस्ताव ठेवला . मग इकडे तीकडे करता करता खेडला जायचे नक्की केले ...

कुठे खास फिरण्याचा इरादा नव्हता .. कारण भयंकर उन्हाळा सुरु असल्याने उन्हातान्हात फिरणे त्रासदायकच ठरले असते . बस्स !!सकाळ संध्याकाळ आसपास नद्या, शेते, टेकड्या, मंदीरे असे फिरायचे, दुपारी आराम करायचा असा विचार होता ...

चौदाला ठाण्याहुन सकाळी सव्वापाचला सुटणाऱ्या एसटीचे रिझर्वेशन केले होते त्याप्रमाणे गाडी ठिक सवापाचला ठाण्याहुन निघाली ..

लवकर निघालो तर लवकर पोचु. आणि फार उन्हाचा त्रास होणार नाही असा प्लॅन होता . लवकर निघायचे म्हणुन पहाटेच उठुन सगळे अवरुन निघालो होतो. बस सुरु झाली. शहराबाहेर बस आली. बाहेर अजुन काळोख होता . उन्हाळा असला तरी पहाटेची वेळ असल्याने हवेत आल्हाददायक गारवा होता . खिडकितुन येणारे गार वाऱ्याचे झोत सुखद होते .

सकाळी लवकर उठलेलो, त्यात बसच्या वेगाची लय, सकाळचा गारवा यामुळे लवकरच निद्रादेवीच्या स्वाधीन कधी झालो ते कळलेही नाही . एखाद्या स्टॉपला गाडी थांबली तर तेवढ्यापुरती जाग आली तर आली अन्यथा झोपेने पुरता ताबा घेतला होता .
पनवेलला गाडी वेळेत पोचली.

मधेच गाडी बराच वेळ थांबल्याने जाग आली . मागे पुढे नजर जाइल तीथपर्यंत जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांच्या रांगा असहायपणे उभ्या होत्या. थोड्यावेळानें कळले कि ॲक्सीडेंट झाला असल्यामुळे ट्रॅफिक जॅम झालाय. बराच वेळ मग गाड्या हलल्या नाहित मुंबई गोवा हायवे आधिच अरुंद त्यात ट्रॅफिक भरमसाठ. त्यामुळे ॲक्सीडेंट आणि ट्रॅफिकजॅम हि गोस्ट नेहमीचीच .सुमारे पाउणएक तासाने गाड्या हलल्या वडखळ नाक्यावर पोचेपर्यंत आम्ही तासभर वेळापत्रकानुसार मागे पडलो होतो ..

पोलादपुरला जेवणासाठी गाडी थांबते . परंतू पोलादपुर येण्याअगोदरच पार्लेच्या जवळळपास गाडी परत एकदा थांबली .हळुहळु पुढची मंडळी उतरू लागली गाडी पंकचर झाली होती मग जोपर्यंत मास्तर दुरुस्तीचे काम करित होते तोपर्यंत सगळे सावली पाहुन उभे राहिले .

समोरच अंब्याची झाडे होती आम्ही त्याच्या सावलीला गेलो ... एक चढता येइल असे झाड दिसले . त्यावर चढुन फोटो काढले ...
इतक्यात पॅसेंजर बॅगा घेउन खाली उतरताना दिसले. म्हणुन आम्ही धावत गाडिपाशी आलो . तर समजले की दुरुस्तीसाठी लागाणारी पुरेशी सामग्री नसल्याने गाडी लवकर दुरुस्त होणार नाही. त्यामुळे लोक बॅग्स घेउन उतरत होते .

1
'...याना बस चेक करायला काय झाले होते ? बसमधे पुरेशी हत्यारे ठेवायला काय झाले ? एस्टीचा प्रवास असाच त्रासदायक असतो..यांची कंप्लेंट केली पाहिजे ..' अशा प्रकारच्या कॉमेंट्स करुन .लोक आपला राग व्यक्त करत होते ..?

आता आम्ही दुसरी एखादी खेडकडे जाणारी बस येते का म्हणुन वाट पाहु लागलो . बहुतेक बसेस रत्नांगीरीकडे जाणाऱ्या येत होत्या मास्तर हात करत होते तरीही थांबत नव्हत्या.. थोड्यावेळाने मास्तर परत दुरुस्तीकडे वळले . बसचे काम लवकर होण्याची तसेच दुसरी बस मिळण्याची चिन्हे दिसेनात, तेव्हा मी रोडवर उभी राहुन प्रायव्हेट गाड्याना हात दाखउ लागले . सुदैवाने थोड्याच वेळात एक गाडी आम्हाला मिळाली .अशाप्रकारे आमच्यापैकी चारजणांची सोय झाली ..मग मात्र गाडी वेगात खेडकडे निघाली. मधे एके ठीकाणी ड्रायव्हरचे आई बाबा गाडीत बसले . त्याना भरणानाक्याला एका डिस्पेंसरीत सोडुन आम्ही खेडला गेलो. पेठे यांच्या होटेलात जेउन मुक्कामी पोचलो ..

1
संध्याकाळी सुसरी नदी सुसरी गाव असा फेरफटका मारला. नदीवर आसपास झाडांवर तारांवर विविध पक्षी संचार करीत होते त्याना डोळे भरुन पाहुन घेतले एक मुंगुसही दिसले .. वाटेत एका शेतात शिरलो. जंगलाचा सुगंध मनाला मोहवित होता . शेतात विविध तऱ्हेच्या पालेभाज्या कलिंगडे मुबलक प्रमाणात तायार होते. कणसे आनंदाने वाऱ्यावर डुलत होती वातावरणात त्यामुळे थोडा गारवा आल होता हळुहळु काळोख पडु लागला. आणी आम्ही नाइलाजाने गावात परतलो. गावातुन लाल रसदार कलिंगड, आंबे आणी द्राक्षे खरेदी केली .

1

दुसऱ्या दिवशि सकाळी टेकडीवरिल एकविरादेवीच्या मंदीरात गेलो . येथुन गावचा परिसर खुप छान दिसत होता. .येथुन पुढे नारंगी नदीवर गेलो. तेथुन स्मशानभूमीपर्यंत जाउन आलो. येथेही नदीच्या परीसरात खुप पक्षी होते. भारद्वाजही दिसले .

1

संध्याकाळी सुसरी गावातुन जाताना रस्त्याच्या दुतर्फा तांदुळाच्या पिठीने काढलेल्या रांगोळ्या दिसल्या . या रांगोळ्या बरेच दिवस छान टीकतात. दुतर्फा छान नक्षीकाम केलेली रांगोळी रस्त्यावर मधुन मधून पक्षी,झाड, फुले ,स्वस्तीक अशा मोठ्या रांगोळ्या, सुस्वागतम् अशी अक्षरे काढल्या होत्या. सुसरी गावातुन हायवेला लागल्यावरही या रांगोळ्या दिसत होत्या . शिमग्यात डोंगरावरुन गावात देवी भक्ताना दर्शन द्यायला येत असते, तीच्या स्वागतासाठी या रांगोळ्या काढल्याचे समजले.. या हंगामात कोंकणात गावोगावी देविदेवतांचे उत्चव साजरे होत असतात. नुकताच मी केळशिचा महालक्ष्मीचा उत्चव पाहुन आले . ऱथ, पालख्या, मिरवणुक, गोंधळ, भजन, किर्तन, जत्रा असे या उत्चवाचे स्वरुप असते ...

1
.
1
हायवेवरुन रोळेश्वर मंदीर अशी पाटी दिसेपर्यंत चालत गेलो .. तीथुन टेकडीवर चढुन गेल्यावर रोळेश्वराचे छोटेसे दगडी मंदिर आहे .भोवताली झाडे , वेली वेगवेगळी फुले वसंतोत्सव साजरा करीत होती ..अतीशय निसर्गरम्य परिसरात हे मंदीर आहे . समोर शिवाची पिंडी मागच्या खिडकीच्या झरोक्यातुन निरोप घेणारे सुर्यबिंब वातावरणात एकप्रकारचे भारवलेपण.. मनापासुन भोलेनाथला नमस्कार करुन भारावलेल्या अवस्थेतच परतीची वाटचाल केली ....

तीसऱ्या दिवशी सकाळी बाजारपेठेला लागुन असलेल्या जगबुडी नदीकडे गेलो येथेही करकोचे, भारद्वाज, किंग फिशर , दयाळ ,कोतवाल, बुलबुल इत्यादे पक्षी दिसले .
.
1
आज घरी परतायचे म्हणुन येताना काजुबिया खरेदी केल्या.. आज रविवार असल्याने चढा भाव होता .
जगबुडी सुसरी आणी नारंगी या नद्यानी खेड परिसर समृध्द केला आहे. वस्तुत: उर्वरित दोन्ही नद्या जगबुडी या नदीच्याच उपनद्या होत.
1
.

दोन दीवसाची सुट्टी अशाप्रकारे अतीशय निसर्गरम्य निसर्गसमृध्द वातावरणात मजेत घालउन अतीशय समाधानाने परतीचा रस्ता धरला .

प्रतिक्रिया

इडली डोसा's picture

18 Apr 2017 - 12:39 am | इडली डोसा

निसर्गरम्य परिसरात सफर छान झाली आहे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

18 Apr 2017 - 11:38 am | भ ट क्या खे ड वा ला

गावात जाउन आल्या सारखे वाटले ..
नदी चे नाव सुसेरी व गावाचे ही सुसेरी .
एस्टी प्रवासाचे वर्णन वाचताना पुलंची म्हैस आठवली ,अजुन यश्टी ने आपली खासियत जपल्ये ..
अजुन लेखन घडुदे .. भरपूर अनुभव आहे तुमच्याकडे

पैसा's picture

18 Apr 2017 - 11:42 am | पैसा

यश्टीने खेडला पोचेपर्यंत जाम कंटाळा आलेला असायचा. त्यामुळे की काय, पण आमच्या रत्नागिरीपेक्षा खेड चिपळूणची माळराने फार उजाड वाटायची. कोळसेवाल्यानी असतील नसतील ती जंगले नाहिशी केली असेही ऐकले मधे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

18 Apr 2017 - 9:36 pm | भ ट क्या खे ड वा ला

८० च्या दशकात कोळसे वाल्यानी जंगले साफ केली होती हे सत्य आहे ..
त्यानंतर २० वर्षे कोळसा बंद असल्याने परत बरिच जंगले वाढली अजुनही कोळसा बंदच आहे पण १९९५ नंतर किटा सामान ( मुंबई सारख्या शहराना प्रेतं जाळण्यासाठी लागणारे लाकूड = किटा ) वाल्यानी आधुनिक यंत्रे वापरुन जंगलात तात्पुरते रस्ते तयार केले आहेत . त्यामुळे पुन्हा खेड चिपळूण परिसरातील जंगले नष्ट होत आहेत कोळसेवाले परवडले अशी अवस्था आहे सध्या

छान भटकंती. मुंबई-गोवा महामार्गाचे रडगाणे अजून किती दिवस असेच चालू राहणार आहे कुणाला ठाऊक!

मदनबाण's picture

18 Apr 2017 - 4:23 pm | मदनबाण

छान !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kahe Chhed - Mohe Rang Do :- Dr. Payal Vakharia

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2017 - 5:47 pm | चौथा कोनाडा

वाह, झकास वृतांत !
कुठलाही आव न आणता ओघवती मिपाकराना घडवलेली साधी सिंपल सहल !

पु ले शु

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2017 - 5:47 pm | चौथा कोनाडा

वाह, झकास वृतांत !
कुठलाही आव न आणता ओघवती मिपाकराना घडवलेली साधी सिंपल सहल !

पु ले शु

सतिश गावडे's picture

18 Apr 2017 - 6:06 pm | सतिश गावडे

पोलादपूरहून खेडला जाताना लागणारा अपघात प्रसिद्ध घाट कोणता?

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2017 - 6:11 pm | प्रसाद गोडबोले

कशेडी घाट

२ आठवड्यांपुर्वीच जाऊन आलो कर्देला ! ह्या घाटातला तो एक शार्प यु पिन टर्न अक्षरशः प्रेमात पडावे असा आहे :)

सतिश गावडे's picture

18 Apr 2017 - 9:22 pm | सतिश गावडे

>> ह्या घाटातला तो एक शार्प यु पिन टर्न अक्षरशः प्रेमात पडावे असा आहे :)

हा स्पॉट पावसाळ्यात जाऊन बघा. अक्षरश: वेडे व्हाल.

भ ट क्या खे ड वा ला's picture

18 Apr 2017 - 9:39 pm | भ ट क्या खे ड वा ला

एकदा सायकल ने हा घाट खालून वर व वरुन खाली पार करिन म्हणतो ..
जाम मजा येइल ....

कंजूस's picture

19 Apr 2017 - 12:49 pm | कंजूस

डबलसिट मागे बसेन म्हणतो.

भ ट क्या खे ड वा ला's picture

20 Apr 2017 - 7:47 pm | भ ट क्या खे ड वा ला

tandem cycle ने येणार असाल तर तयारी आहे. विचार करा. तुमची कंपनी असेल तर मस्त होईल प्रवास. खेड ला गेलो कि घ्यायचा विचार आहे,tandem cycle.इथे ठेवायची कुठे ही समस्या व खेड ला चालवायची कशी ही समस्या.

जुइ's picture

19 Apr 2017 - 4:26 am | जुइ

सुंदर भटकंती वृत्तांत!

खेड ठरवण्यामागचे प्रयोजन?

खेडपासून जवळच एकदम सुंदर असे कर्दे, आंजर्ले, केळशी, लाडघर बीच आहेत.

कबीरा's picture

21 Apr 2017 - 10:00 am | कबीरा

लाडघर सोडला तर सगळे बीच खेडपासून साधारण ७०-७५किमी अंतरावर आहेत.

यशोधरा's picture

21 Apr 2017 - 3:07 am | यशोधरा

साधा सुधा वृत्तांत अतिशय आवडला!

येत्या गुरूवारी खेडला जायच ठरवल आहे. चिंचवड वरून खेडला जाण्याचा सोप्पा मार्ग कुणी सुचवू शकेल काय? ट्रेन, बस काहीही चालेल. पहिल्यांदाच जात आहे त्यामुळे तिकडची काहीच माहिती नाही.

हर्मायनी's picture

25 Apr 2017 - 1:27 pm | हर्मायनी

खेड ला जायला चिंचवड वरून सकाळी ५.५० ला ST बस आहे जी ११.३० पर्यंत खेड ला पोचते . रात्री सुध्दा अनेक बसेस आहेत . MSRTC च्या साईट वरून आरक्षण करता येईल . वरंध घाटातून जाणारा मार्ग सर्वात जवळचा आहे..

मन्याटण्या's picture

25 Apr 2017 - 2:39 pm | मन्याटण्या

धन्यवाद, चेक करतो