थाई फ्राईड गार्लिक

केडी's picture
केडी in पाककृती
21 Mar 2017 - 9:09 am

TFG

साहित्य
८ ते १० लसूण पाकळ्या, बारीक चिरून
२ चमचे ऑलिव्ह ऑइल

कृती
हे असे फ्राईड गार्लिक, सूप्स किंवा नूडल्स वर गार्निश म्हणून घेतले जाते. काही हॉटेलात हे चकणा म्हणून देखील दिले जाते. हि देतोय ती अगदी सोपी मायक्रोवेव्ह पाककृती. तो नसेल, तर पळीत तेल घेऊन बारीक आचेवर लसूण खरपूस तळून घेणे.

एका मायक्रोवेव्ह सेफ भांड्यात तेल आणि लसूण मिक्स करा. साधारण ८ ते १० मिनिटे हाय वर मायक्रोवेव्ह करा। (एक एक मिनिटाच्या अंतराने, बाहेर काढून थोडं हलवा) लसणीच्या रंग बद्दलला (तांबूस) कि बाहेर काढा, वाटल्यास एक चिमूट मीठ घाला। गार झाले की लसूण छान कुरकुरीत होतील.

हा असा तळलेला कुरकुरीत लसूण, आणि तळलेला कांदा, पोह्याच्या चिवड्यात सुद्धा छान लागतो. ह्यातच मिक्स्ड हर्ब्स आणि काळीमिरी घातले कि वेगळी चव येईल (गार्लिक टोस्ट साठी). [अर्थात त्यासाठी लसूण तांबूस होईस्तोवर नाही थांबायचं, आणि तेला ऐवजी बटर वापरायचे].

अशीच एक फोडणी आमच्याकडे मुगाच्या खिचडी सोबत करतात. पळीत भरपूर तेल घेऊन त्यात हिंग मोहरीची फोडणी करायची, त्यात अश्या लसूण पाकळ्या (साला सकट) घालून, लसूण मऊ होईस्तोवर तळून, शेवटी एक चमचा लाल तिखट आणि मीठ घालून हि अशी खमंग फोडणी मुगाच्या खिचडी वर घालून खायची! सोबत तोंडी लावायला एखादा पापड!

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

21 Mar 2017 - 11:37 am | सविता००१

अशीच एक फोडणी आमच्याकडे मुगाच्या खिचडी सोबत करतात. पळीत भरपूर तेल घेऊन त्यात हिंग मोहरीची फोडणी करायची, त्यात अश्या लसूण पाकळ्या (साला सकट) घालून, लसूण मऊ होईस्तोवर तळून, शेवटी एक चमचा लाल तिखट आणि मीठ घालून हि अशी खमंग फोडणी मुगाच्या खिचडी वर घालून खायची! सोबत तोंडी लावायला एखादा पापड!

आमच्याकडे पण :)

केदार - हुश्श. ही रेसिपि येते राव मला ;)

बास का राव, करा आता चेष्टा! :-)) :-))
तुझ्या रेसिपी बघत असतो मी चेहेरापुस्तिकेवर.....एक से एक बढकर....!

पैसा's picture

21 Mar 2017 - 4:55 pm | पैसा

ऑलिव्ह ऑईल हे वेगळे. मला डाएटिशियन म्हणाली की ऑलिव्ह तेल तळायला वगैरे वापरू नये.

ऑलिव्ह ऑईल चे ४ प्रकार असतात. ते सगळं नंतर कधीतरी सविस्तर लिहीन, अर्थातच फ्राईड गार्लिक मायक्रोव्हेव पाकृ साठी ऑलिव्ह ऑइल चालून जाईल. बाकी, गॅस वर करताना घरातला नेहेमीच घरातले तेल वापरा.

आनंदी गोपाळ's picture

4 Apr 2017 - 10:16 pm | आनंदी गोपाळ

कधी?

सध्या ऑफिस आणि उन्हाळ्याने बेजार...थोडी सवड मिळाली कि लिहितो ......तेल पुराण.....
_/\_

सविता००१'s picture

6 Apr 2017 - 5:31 pm | सविता००१

विचारायला आले होते. पण चांगलं सणसणीत मोठ्ठं आधीच विचारून ठेवलय तुम्ही. बेस्ट

सविता००१'s picture

6 Apr 2017 - 5:37 pm | सविता००१

विचारायला आले होते. पण चांगलं सणसणीत मोठ्ठं आधीच विचारून ठेवलय तुम्ही. बेस्ट

मदनबाण's picture

6 Apr 2017 - 7:31 pm | मदनबाण

भूक चाळवली गेली आहे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- His Holiness the Dalai Lama Speaks to the Press in Bomdila, AP, India