उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
27 Mar 2017 - 11:04 am
गाभा: 

चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-b...)

माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.

मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 3:10 pm | श्रीगुरुजी

मटा म्हणजे शिवसेना प्रेम, सॉफ्ट कॉर्नर वगैरे आहेच. परंतु जर फिर्यादी, साक्षीदार व आरोपी एकच गोष्ट सांगत असतील तर ते 'मटा'त आलं किंवा अजून दुसर्‍या वृत्तपत्रात आलं तरी फरक पडत नाही कारण फिर्यादीने जे आरोप केले आहेत त्या गुन्ह्यांची कबुली आरोपीने दिली आहे व साक्षीदाराने त्याला दुजोरा दिला आहे. जर तसं झालं नसेल तर गायकवाडांनी पुढे येऊन तसं सागावं. परंतु गायकवाड आपले व्हर्जन बदलायला तयार नाहीत. आपण कर्मचार्‍याला चपलेने मारहाण केली व त्याला ढकलून द्यायचा प्रयत्न केला हे त्यांनी जाहीरपणे मान्य केले आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

31 Mar 2017 - 3:55 pm | हतोळकरांचा प्रसाद

साक्षीदाराने लिंक नीट वाचल्या/बघितल्या का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

31 Mar 2017 - 4:05 pm | हतोळकरांचा प्रसाद

साक्षीदाराने वर्ड चुकून लागला - लिंक्स नीट वाचल्या बघितल्या का असे म्हणायचे होते. खासकरून इअरफोन्स लावून नक्की बघा व्हिडीओज सगळे.

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 6:04 pm | श्रीगुरुजी

पाहिल्यात.

अनुप ढेरे's picture

30 Mar 2017 - 1:43 pm | अनुप ढेरे

a

अप्पा जोगळेकर's picture

30 Mar 2017 - 4:12 pm | अप्पा जोगळेकर

आवरा. गडाबडा लोळत आहे हसून.

वरुण मोहिते's picture

30 Mar 2017 - 1:55 pm | वरुण मोहिते

म्हणजे काय हे कळलं ह्या धाग्यावर .
गायकवाडांच्या मारहाणीचे समर्थन कोणीही केलं नाही . काही प्रतिसाद एअर इंडिया च्या सेवेवरून होते . काही प्रतिसाद दोन्ही बाजू तपासून पाहू म्हणून होते. अभ्या तर तिकडचाच आहे त्यामुळे त्याने पाठिंबा आहे लोकांचा त्यांना असे म्हटले,असे म्हटले . पण सरसकट वाट्टेल त्या शब्दात खिल्ली उडवणे , काहीही बोलणे , दर्जाहीन भाषा वापरणे .
कठीण आहे . येतो राग लोकांना तर येत असेल बुवा ठीक आहे . पण ते चप्पल मारण्यापेक्षा अश्या भाषेत इथे बोलणारे जर त्या जागी असते तर काय मारले असते विचार करतोय . एकंदरीत नेहमीप्रमाणे अजेन्डा कळला.

अनुप ढेरे's picture

30 Mar 2017 - 1:58 pm | अनुप ढेरे

गायकवाडांच्या मारहाणीचे समर्थन कोणीही केलं नाही .

समर्थन केलेलं आहे. वर एका प्रतिसादाची लिंक दिली आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 2:22 pm | श्रीगुरुजी

इथेसुद्धा समर्थन दिसतंय.

पण ते चप्पल मारण्यापेक्षा अश्या भाषेत इथे बोलणारे जर त्या जागी असते तर काय मारले असते विचार करतोय

इंटरनेट जिंदाबाद मोहितेसाहेब! या राजकारणी लोकांच्या गुंडांना घाबरून लोक तोंडावर बोलू शकत नाहीत. इंटरनेट अनामिकता ही सर्व नागरिकांसाठी गुंडांनी पुरवलेल्या संरक्षणासारखीच आहे.

अभ्या..'s picture

30 Mar 2017 - 2:16 pm | अभ्या..

या राजकारणी लोकांच्या गुंडांना घाबरून लोक तोंडावर बोलू शकत नाहीत.

इलेक्शन पण अनामिकच मतांची असते हो. तिथे बरे निवडून दिले लोकांनी. तुम्ही गुंड वगैरे ठरवून कॉईन केलेला शब्दप्रयोग आहे. आधीचे काय पुरावे आहेत तुमच्याकडे त्यांच्या गुंडगिरीचे? ह्या प्रकरणात सुध्दा चप्पल मारण्यापर्यंत मजबूर केलं जातं असं काय घडलं ते लोकांसमोर येऊ द्या मग बोला. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याआधीच सजा टोठावायला इंटरनेट किंवा एअरइंड्या म्हनजे न्यायालय नाही. लाईक्सवरुन सजा द्यायला निघालेत.

अत्रे's picture

30 Mar 2017 - 2:27 pm | अत्रे

आधीचे काय पुरावे आहेत तुमच्याकडे त्यांच्या गुंडगिरीचे?

मी जनरल स्टेटमेंट केले आहे, सर्व गुंड पाळणाऱ्या राजकारण्याविषयी. "यांचे" चरित्र प्रसिद्ध पुढे कधी प्रसिद्ध झाले तर वाचीन.

ह्या प्रकरणात सुध्दा चप्पल मारण्यापर्यंत मजबूर केलं जातं असं काय घडलं ते लोकांसमोर येऊ द्या मग बोला

सगळं लोकांसमोर ऑलरेडी आलेलं आहे. खासदारसाहेब कारने दिल्लीत पोचतील तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रीतसर जबाब नोंदवावा. कार्यवाही लवकर होण्यास हात भार लावावा. उगाच संसदेचा वेळ वाया घालवू नये. आणि हो माफी मागावी.

एअरइंड्या म्हनजे न्यायालय नाही

थोडी फार सजा ऑलरेडी मिळालेलीच आहे! उरलेली ही लवकरच मिळो.

इलेक्शन पण अनामिकच मतांची असते हो. तिथे बरे निवडून दिले लोकांनी.

भारतीय लोकशाही अजून परिपूर्ण नाही.

भारतीय लोकशाही अजून परिपूर्ण नाही.

मग काय इंटरनेट त्यापेक्षा प्रगल्भ आहे असे तुम्हाला म्हणायचेय का?

मग काय इंटरनेट त्यापेक्षा प्रगल्भ आहे असे तुम्हाला म्हणायचेय का?

इंटरनेट हे केवळ व्यक्त होण्याचे माध्यम आहे. खऱ्या लोकशाहीत लोकं कोणालाही न घाबरता मनातले बोलू शकतात. इंटरनेट वे हे थोडे सोपे जाते.

फेसबुकवर लाईक्स ठोकणारे फार दीर्घ विचार करून लाइक करतात असे नाही. पण इतक्या दिवस उद्दाम राजकारणी लोकांबद्दल मनात साठलेला राग या निमित्ताने बाहेर येतो - हे ही नसे थोडके.

म्हणजे एकूणच फक्त मळमळ बाहेर काढली जात आहे म्हणा ना.
चालू द्या...

तुम्ही त्याला मळमळ म्हणा की अजून काही म्हणा! लोकांना काही फरक पडत नाही. शाब्दिक व्यक्त झालं की मनाला समाधान मिळतं. आणि असे व्यक्त होण्याचे अधिकार फक्त गुंड पाळणाऱ्याकडे नसावेत.

अप्पा जोगळेकर's picture

30 Mar 2017 - 4:27 pm | अप्पा जोगळेकर

या राजकारणी लोकांच्या गुंडांना घाबरून लोक तोंडावर बोलू शकत नाहीत.
हे काहीच्या काहीच आहे राव. तुम्हाला स्वातंत्र्य पण पाहिजे अभिव्यक्तीचे आणि घाबरायचे पण आहे.
शिवाय उद्या एखाद्याने ठरवले तर तो आरामात आय्पी ट्रॅक करेल.
उगाच बागुलबुवा केला आहे या राजकारण्यांचे गुंड वगैरे. इतके भिउन जगायचे तर अपघात होतात म्हणून रस्त्यावर गाडी चालवणे पण सोडून द्यावे लागेल.

अत्रे's picture

30 Mar 2017 - 4:40 pm | अत्रे

IP ट्रॅक करेल तर आपण VPN, ToR वापरू शकतो ना भाऊ! मी तरी तुमच्या इतका धाडसी नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Mar 2017 - 1:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

रविण्द्र गायकवाड गाडीने दिल्लीला निघाले आहेत अशी बातमी वाचली.लोकसभेत जर ते व्यवस्थित बोलले वा माफी मागीतली तर विमान कंपन्यांनी त्यांना ताकीद देऊन प्रवासाची परवानगी द्यायला हरकत नाही.
रविंद्रांना काही महिने विमानप्रवास सक्तीने चपला व तत्सम हत्यारे(पट्टा वगैरे) काढूनच करण्यात यावा असे ह्यांचे मत! चपला त्या 'चेक-इन' बॅगेजमध्ये जातील.

कुंदन's picture

30 Mar 2017 - 2:05 pm | कुंदन

एअर इंडिया ला सुध्हा ग्राहक सेवे बद्दल ताकिद दिली जावी.
हे जे कोणी सुकुमार आहेत , ते निवृत्त झाले होते असे वाचले अन मग त्यांना पुन्हा दुसर्या कंपनी मार्फत घेण्यात आले.
त्यांच्या जागी ४ नवयुवकांनाही घेता आले असते का याचा ही विचार व्हावा.

सुबोध खरे's picture

30 Mar 2017 - 8:45 pm | सुबोध खरे

@ माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेबांचे "हे" म्हणजे अगदीच "हे" दिसताहेत.
ते रवींद्र दुसऱ्याच्या चपलेने नाही का हाणू शकणार?
चाकू कात्री इ आयुधे गैरवापर होतील म्हणून सगळ्याच्या सगळ्या प्रवाशांच्या चेक इन बॅगेज मध्ये जातात.
सर्वच प्रवाशांना चपला चेक इन बॅगेज मध्ये टाकायला सांगणार का?

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 2:14 pm | श्रीगुरुजी

Business class does not necessarily give a man class. Seat is temporary, class is permanent.

हे सुंदर वाक्य मोहम्मद कैफ चे आहे. (ट्विटर).

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Mar 2017 - 3:58 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"एअर इंडिया ला सुध्हा ग्राहक सेवे बद्दल ताकिद दिली जावी."
नक्की काय वाईट सेवा होती ह्यावर कोणी प्रकाश टाकेल का ? की खासदार आहे म्हणजे कर्मचार्यानी गायकवाडांना "साहेब साहेब' म्हणून हाक मारावी अशी अपेक्षा होती? की साहेबांना सर्वात आधी विमानातून उतरायचा मान मिळाला नाही ? कारण त्या फ्लाईटमधील प्रवाशानी तसे काहीच म्हंटल्याचे दिसत नाही.
रिक्षावाला,बस कंडक्टर जशी भाषा खपवून घेतात तशी भाषा विमानकंपन्यांतील कर्मचारी ऐकून घेणार नाहीत..हे रविंद्रनाथांना मान्य आहे का ? हे आधी तपासले पाहिजे.

रिक्षावाला,बस कंडक्टर जशी भाषा खपवून घेतात तशी भाषा विमानकंपन्यांतील कर्मचारी ऐकून घेणार नाहीत..हे रविंद्रनाथांना मान्य आहे का ? हे आधी तपासले पाहिजे.

तशी सर्व्हिस पण विमानकंपन्यानी देऊ नये (आणि मुख्य म्हणजे एअरईंडीयाचा लौकिक त्यासाठीच आहे) आणि दिली तर ग्राहक एकून घेणार नाहीत हे विमान कंपन्याकडून मान्य करुन घेतीलच म्हणा माई.

वरुण मोहिते's picture

30 Mar 2017 - 4:24 pm | वरुण मोहिते

कुपन जाऊदे पण एअर इंडिया च्या कित्येक डोमेस्टिक फ्लाईट्स अश्या आहेत कि ज्यात व्यावसायिक श्रेणी ची तिकिटे नाहीत . त्यात काय प्रकार आहे पुढील आसनांच्या दोन रांगा ह्या त्या श्रेणी ला दिल्या जातात . आणि फक्त पडदा असतो मध्ये . आणि काही सीट कंफर्ट . ह्यांनी तिकीट काढल्यावर हे सांगण्यात आलं . म्हणजे माझं कुपन वेस्ट. त्यात हे कर्मचारी हुज्जत घालत बसले हे चूक नाही का?? म्हणजे ऐनवेळी फ्लायिंग ला वेगळं विमान आल्यावर तुम्ही हुज्जत घालताय त्यापेक्षा रीतसर तक्रार नोंदवून घ्या
टीप -मारहाणीचे समर्थन नाही .

त्यात हे कर्मचारी हुज्जत घालत बसले हे चूक नाही का?

हे खरे असल्यास ही चूक आहे. वरती मी एअर इंडिया च्या फ्लाइट फीडबॅक फॉर्म ची लिंक दिली आहे.

तिथे सामान्य माणसाप्रमाणे तक्रार करता येते. आणि ती न करता मारामारी केल्यामुळे प्रकरण वाढले.

राजाभाऊ's picture

30 Mar 2017 - 8:16 pm | राजाभाऊ

>>म्हणजे ऐनवेळी फ्लायिंग ला वेगळं विमान आल्यावर तुम्ही हुज्जत घालताय त्यापेक्षा रीतसर तक्रार नोंदवून घ्या<<

बातम्यांनुसार गायकवाडांनी तक्रारवहि मागवलेली पण त्यांना ती नाकारण्यात आली, वर त्या सुकुमारने उद्दामपणे "तू खासदार होगा तो तेरे घरका" वगैरे डायलॉग मारला, आणि तो टिप्पिंङ पॉइंट ठरुन प्रकरण पुढे चिघळलं. मूळात एयर इंडियात कस्टमर सर्विस हा प्रकार म्हणजे आनंदच आहे...

एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.

वा! असले गुप्तहेर सेनेकडे आहेत म्हणूनच तर देशात अतिरेकी हल्ले होत नाहीत.

http://www.loksatta.com/mumbai-news/sanjay-raut-ravindra-gaikwad-air-ind...

ह्यांना द्या राव एखादा विभाग काढून सेपरेट.
सकाळ संध्याकाळ सेनेला शिव्या घालायला.
लैच कॉमेडी आयटम आहे.

काय करावे, संधीच देतात ते एवढी. असो आता थांबतो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Mar 2017 - 7:54 pm | हतोळकरांचा प्रसाद

बँडविड्थ अवेलेबल झाली दिसतंय, कि काँसंट्रेशन भंग पावलं?;););) (लाईटली घ्या).

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 8:29 pm | श्रीगुरुजी

एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.

या राऊतला कधीच अक्कल येणार नाही का?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Mar 2017 - 11:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.

सेनेचे पुढारी हे असे चौथी 'क' मध्ये असल्यासारखे का बोलतात ते कळयला मार्ग नाही. 'योग्य वेळ' कधी येणार्? डॉनने 'मातोश्री'ला फोन केल्यावर ? आणी राउतांनी माहिती दिलीच नाही तर एयर लाईनने मातोश्रीवर थैल्या पोचवल्या असे समजायचे का?

अनुप ढेरे's picture

31 Mar 2017 - 10:02 am | अनुप ढेरे

माईसाहेब असा धोतरात धोतराला हात नाही घालू =))

धागा थंडावल्यावर सगळी चर्चा वाचली.

हतोळकरांचा प्रसाद यांचे प्रतिसाद आवडले.

विमान कर्मचार्यांकडून आधी प्रोवोकेशन झालं आणि खासदारांचे कृत्य हे त्यावर प्रतिक्षिप्त क्रिया होते असे एकंदर चर्चेवरुन वाटते.

कायद्यात क्राइम ऑफ पैशनला नेहमीच थोडी कमी शिक्षा असते. उदा. एखाद्याने भावनेच्या भरात खून केला आणि दुसर्याने अगदी प्लान वगैरे करुन खून केला तर पहिल्याला कमी शिक्षा होते.

http://www.misalpav.com/comment/reply/39294/929669
http://www.misalpav.com/comment/reply/39294/929697
http://www.misalpav.com/comment/reply/39294/930029 >> हे काही पटले नाही. माझ्या माहितीनुसार सबळ पुरावे 'कोर्टात' साबीत झाल्याखेरीज कोणालाच शिक्षा करता येत नाही. केवळ आरोपीने कबुलीजबाब दिला या एकाच आधारावर तर नाहीच नाही... काहीही काय...

जय२७८१'s picture

31 Mar 2017 - 4:31 pm | जय२७८१

गामा पैलवान's picture

31 Mar 2017 - 5:52 pm | गामा पैलवान

लोकहो,

या प्रकरणात काय घडलं याचा माझा अंदाज सांगतो.

१. एअर इंडियाने व्यवसायवर्ग नसल्याचं खा.गायकवाड यांना वेळेत कळवलं. खासदारांनी तरीही जायचं ठरवलं.

२. चढपत्र (=बोर्डिंग पास) मात्र व्यवसायवर्गच दाखवत होतं. त्यामुळे खासदारांना वाटलं की पहिला बदल रद्द झाला असून व्यवसायवर्ग उपलब्ध आहे.

३. तरीही विमानात केवळ जनतावर्गच आढळला.

४. यावेळेपर्यंत विमानप्रवास सुरू झाला होता. तो चालू असतांना खासदारांनी आपली समस्या कागदावर लिहून काढली आणि हवाई सेविकेकडे सोपवली. प्रवास संपल्यावर खासदारांनी समस्येवर उपाय व स्पष्टीकरण मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवायची विनंती केली. त्यानुसार एअर इंडियाच्या चार लोकांशी बातचीत अगोदरंच झालेली होती.

५. तेव्हढ्यात श्री. सुकुमार नामे कर्मचारी बातचीत करायच्या निमित्ताने आंत घुसला. त्यानं शिवीगाळ चालू केली.

६. शिवीगाळीस प्रत्युत्तर म्हणून खासदारांकडून सुकुमार यांना चपलांचा प्रसाद मिळाला. कोणीतरी खासदारांना हाणून काढूया म्हणून ओरडा केला. त्यानंतरही खासदार तासभर विमानातनं उतरले नाहीत.

७. प्रसारमाध्यमांनी चपलांनी मारलं म्हणून गोंगाट माजवला. खासदारांना शिव्या घातल्यानेच त्यांनी २५ फटके मारले ही बाब इथे स्पष्ट होते : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8

असो.

हे माझं आकलन आहे. जसजशी तथ्ये उजेडात येतील तसतसा आकलनात बदल घडू शकेल.

आ.न.,
-गा.पै.

एअर इंडिया ची सर्व्हिस इतकी ढिसाळ, खराब व भंगार आहे की खासदारसाहेबांना परत परत त्यांच्याच विमानात जायची हौस आहे. यांना एअर इंडिया ने पुढच्या पब्लिसिटी मध्ये वापरायला हवे.

आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देतो की हाकलून दिलेले कस्टमरही परत परत येतात!

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 8:27 pm | श्रीगुरुजी

आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देतो की हाकलून दिलेले कस्टमरही परत परत येतात!

खि खि खि . . .

खासदार महाशयांनी हा मुद्दा आता जास्त प्रतिष्ठेचा न करता स्वतःहून माफी मागून प्रकरण मिटवून टाकावे. स्वतःहून मारहाणीच्या फुशारक्या कॅमेर्‍यासमोर मारल्याने त्यांची बाजू लंगडी झाली आहे व जनमत मोठ्या प्रमाणात त्यांच्याविरूद्ध आहे. हे प्रकरण ते जितके जास्त ताणत राहतील तितकी त्यांची व त्यांच्या पक्षाची बदनामी होत राहील. मूक मोर्चा व्यंगचित्र प्रकरणात उधोजींनी शेवटी सगळा मान, स्वाभिमान, डरकाळ्या, पंजा, वाघनखे, दांडपट्टा वगैरे बाजूला ठेवून माफी मागून प्रकरण संपविले होते. या प्रकरणात तसे केले तर प्रश्न मिटेल.

गॅरी ट्रुमन's picture

31 Mar 2017 - 8:41 pm | गॅरी ट्रुमन

आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देतो की हाकलून दिलेले कस्टमरही परत परत येतात!

पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली आहे का हो कोणाकडे?

एकूणच या प्रकरणात पेंग्विनसेनेचे हिरीरीने समर्थन करणार्‍या सगळ्यांनाच स्वतः गायकवाडांनीच चांगलेच तोंडघशी पाडले आहे. या सगळ्यांच्या म्हणण्याचा डोलारा एअर इंडिया म्हणजे एक नंबरची ढिसाळ एअरलाईन आहे आणि तिला तिच्या कारभाराचा जाब विचारायलाच हवा यावर आधारलेला होता. त्यासाठी गायकवाड मोठ्ठे हिरो ठरले होते त्यांचे. पण कुठचे काय. स्वतः गायकवाडांनीच परत एअर इंडियाचेच तिकिट काढून एअर इंडियानेच प्रवास करायचा प्रयत्न करून चांगलेच थोबाड फोडले सगळ्या पेंग्विनसेना समर्थकांचे (**)

**: थोबाड फोडणे वगैरे भाषा मी सहसा कधी वापरत नाही. पण काय करणार. मिपावरील पेंग्विनसेना समर्थकांच्या संगतीत राहून माझ्यावरही थोडा परिणाम झाला आहे :)

हतोळकरांचा प्रसाद's picture

31 Mar 2017 - 11:12 pm | हतोळकरांचा प्रसाद

मागे एकदा मी भक्त कोणाला म्हणायचे असा प्रश्न विचारला होता, अर्थात उत्तर थातूरमातूरच मिळाले होते. इथे कोणाला पेंग्विनसेना समर्थक म्हणायचे असे विचारून पाहतो. बाकी भक्त म्हणल्यावर वाईट वाटू शकते, मग दुसर्यांना पेंग्विनसेना समर्थक म्हणणे योग्य असू शकते का? खासकरून अभ्यासू आयडींकडून असे आले की जास्तच बेक्कार वाटते हो!

आदरणीय ट्रुमनाला हे अनेकदा सांगितले आहे. पण तो केजरीवाल आणि हल्ली शिवसेना म्हटल्यावर "कोक+मेंटॉस" या मिश्रणापेक्षाही लवकर उसळतो. :(

केजरीवाल आणि हल्ली शिवसेना म्हटल्यावर "कोक+मेंटॉस" या मिश्रणापेक्षाही लवकर उसळतो. :(

जे आहे हे असेच आहे आणि असेच राहणार आहे. एखादी न पटलेली गोष्ट ज्या प्रमाणात पटलेली नाही त्या प्रमाणावर माझी प्रतिक्रिया असते. जर एखादी गोष्ट थोडीशी पटली नाही तर थोडीशी टिका, अजिबात पटली नाही तर प्रचंड टिका, थोडीशी पटली तर थोडेसे समर्थन आणि पूर्ण पटली तर प्रचंड समर्थन!! ओठात एक पोटात दुसरेच, उगीच पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी गुडी गुडी बोलणे इत्यादी ढोंगे मला जमत नाहीत. तसेच इतरांना माझ्याविषयी काय वाटेल या गोष्टीचाही विचार करायची गरज मला वाटत नाही. या बाबतीत बाळासाहेब माझे आदर्श आहेत :) :)

जर का अडवाणींच्या भाजपला मी मिपावरच भाजीप (भारतीय जीना पक्ष) म्हटले असेल (आणि आजही जर अडवाणी पक्षाच्या नेतेपदी आले तर मिपावर माझ्यापेक्षा मोठा भाजपविरोधक बघायला मिळणे कठिण आहे) तर शिवसेनेला पेंग्विनसेना म्हटले तर त्यात मला स्वतःला तरी काही वावगे वाटत नाही.

असो. आता या विषयावर आणखी चर्चा करण्यात मला अजिबात स्वारस्य नाही.

अमोल खरे's picture

1 Apr 2017 - 8:39 pm | अमोल खरे

मी क्लिंटनचा पुर्वीपासुनचा पंखा आहे. मिपावर जी माणसं तटस्थपणे मत देऊ शकतात त्या थोड्या लोकांमध्ये हा आहे. आता झालाय असं की गेल्या काही वर्षांपासुन सामना मध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली जात आहे त्याने माझ्यासारखे लोक, ज्यांना स्व. बाळासाहेब आणि आता मोदींविषयी प्रचंड प्रेम आहे ते दुखावले जातात आणि अशी प्रकरणे बाहेर आली की त्यावर टोकाचे समर्थन किंवा टोकाचा विरोध पाहायला मिळतो. कोणी माना किंवा न माना, आत्ता लोकसभा व बाकी राज्यांमध्ये जी भाजपाला सत्ता मिळाली आहे ती केवळ मोदींवर असलेल्या विश्वासावर मिळाली आहे. "ये अपनेको नही डुबायेगा" असे रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांपासुन कॉर्पोरेट मधील मेजॉरिटी लोक बोलत आहेत. मोदींच्या परदेशातील सभा आजची तरुण पिढी क्रिकेट मॅच पेक्षा आवडीने बघतात. किती पंतप्रधानांच्या नशिबी हे भाग्य आले आहे (लालबहादुर शास्त्री व इंदिरा गांधी वगळता). त्यामुळे भाजपा मधील बाकी लोकं कितीही गोंधळ घालत असली तरी मोदींच्या प्रेमापोटी लोकं त्या सर्वांकडे दुर्लक्ष करत आहेत. शिवसेना इथेच मागे पडतेय असं वाटतं, म्हणुन आत्ता गायकवाडांच्या केस मध्ये पण दुसरी बाजु असु शकते.... एअर इंडिया च्या माणसांनी दादागिरी केली असु शकते ह्याचा विचारही केला जात नाही.

राहता राहिला प्रश्न माध्यमांचा. माध्यमं व दाक्षिणात्य माणसांचा शिवसेनेवर आणि आता भाजपावर राग आहेच, त्यामुळे कदाचित ह्याला व्यापक प्रसिद्धी मिळाली असावी. मागे एकदा फडणविसांच्या अमेरिका दौर्याच्या वेळी मुख्य सचिव पासपोर्ट विसरल्याने विमान डिले झाले होते, तेव्हा माध्यमांनी सर्व बिल फडणविसांवर फाडले होते. त्यामुळे हे होतच राहणार. असल्या प्रसंगांनी आपली मिपावरची किती रिलेशन तोडायची ह्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे.

गॅरी ट्रुमन's picture

1 Apr 2017 - 9:27 am | गॅरी ट्रुमन

प्रसादराव तुम्ही हिंदी चित्रपट बघितले असतीलच. त्यात अनेकदा असे बघायला मिळते--- गोळी एकाला मारली की अगदी जस्ट इन टाईम दुसरा कोणीतरी मध्ये येऊन ती गोळी स्वतःच्या अंगावर घेतो!! तुम्ही त्या गोळी अंगावर घेणार्‍यांसारखे का करत आहात? तुम्ही पेंग्विनसना समर्थक नाही हे तुम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे थोबाड फोडणे वगैरे भाषा तुम्ही कधी वापरलेली नाही. मग तो प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाहीच. तशी भाषा वापरणारे वेगळे आहेत आणि अशा प्रवृत्तींना (ज्यांना मी पेंग्विनसेना समर्थक म्हणतो) उद्देशूनच तर तो वरील प्रतिसाद होता.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Apr 2017 - 11:02 am | हतोळकरांचा प्रसाद

ट्रुमनसाहेब, तुम्ही मला म्हणत आहात म्हणून मला वाईट वाटतेय असे अजिबात नाही. मिपावर वावरत असताना, काही आयडी आणि त्यांचे मुद्देसूद अभ्यासू लिखाण हे रोल मॉडेलसारखे पहिले जाते, कमीत कमी मी तरी पाहतोच. तुम्ही त्यापैकी एक आहातच हे उघड आहे. बरेच वेळेस भाजप समर्थनार्थ मांडलेले मुद्दे "भक्त" ह्या संबोधनाखाली दुर्लक्ष केले जातात. तुम्हीही त्याचा अनुभव घेतला असेलच. तसेच "पेंग्विनसेनासमर्थक" ह्या संबोधनाने होऊ नये म्हणून मी माझे मत व्यक्त केले.

मला उद्देशून काही म्हटले असेल तरच प्रतिक्रिया द्यावी असे मला वाटत नाही. मला पटले नाही म्हणून मी म्हणालो, तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही लिहु शकताच. माझा काहीही आक्षेप नसेल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

31 Mar 2017 - 11:19 pm | हतोळकरांचा प्रसाद

निंदेच्या सोयीसाठी आता कुठल्याही थराला जाऊ शकतात, पुरावे आहेत का याला काही?

बाकी उघड उघड गोष्टींसाठीही पुरावे मागणारे, आपल्या सोयीच्या गोष्टींवर किती सहज विश्वास ठेवतात हे उघड दिसतंय.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Mar 2017 - 7:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"तेव्हढ्यात श्री. सुकुमार नामे कर्मचारी बातचीत करायच्या निमित्ताने आंत घुसला. त्यानं शिवीगाळ चालू केली."

नक्की ? तुला कधी असा अनुभव आलाय काय रे गामा? कुणा मिपाकराला असा अनुभव आलाय ? की उगीच मराठी खासदार आता तोंडावर आपटलाय म्हणून बाजू सावरून घेताय ?
शिवीगाळ,हप्तेवसुली,तोंडाला काळे फासणे,परवानगी न घेता कार्यालयांत घुसून काचा फोडणे.. ह्यात वाकबगार कोण? आधी म्हंटल्याप्रमाणे भविष्यात कुणा बिहारी,तामिळ खासदाराने अशाच कारणांवरून(एयर इंडियाची दर्जा चांगला नाही) मराठी कर्मचार्याला बुकलले तर खासदाराची बाजू घेणार का?

गामा पैलवान's picture

1 Apr 2017 - 2:15 am | गामा पैलवान

माईबाई,

१.

नक्की ? तुला कधी असा अनुभव आलाय काय रे गामा? कुणा मिपाकराला असा अनुभव आलाय ? की उगीच मराठी खासदार आता तोंडावर आपटलाय म्हणून बाजू सावरून घेताय ?

मला अनुभव आलेला नाही. पण विमानातल्या सगळ्या लोकांना आलाय. "Don't do anything silly for the stupid man...." असं हवाई सेविका खासदारांना उद्देशून बोलंत होती. कृपया हे चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=gCRj5FQnohE

हा स्ट्युपिड मॅन म्हणजे सुकुमारच (वा ज्याने खासदारांवर हल्ला केला तोच) आहे.

आणि हो, याचा मराठी वा शिवसेनेशी काहीही संबंध नाही.

२.

शिवीगाळ,हप्तेवसुली,तोंडाला काळे फासणे,परवानगी न घेता कार्यालयांत घुसून काचा फोडणे.. ह्यात वाकबगार कोण? आधी म्हंटल्याप्रमाणे भविष्यात कुणा बिहारी,तामिळ खासदाराने अशाच कारणांवरून(एयर इंडियाची दर्जा चांगला नाही) मराठी कर्मचार्याला बुकलले तर खासदाराची बाजू घेणार का?

विषयांतर.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 2:49 pm | श्रीगुरुजी

मला अनुभव आलेला नाही. पण विमानातल्या सगळ्या लोकांना आलाय. "Don't do anything silly for the stupid man...." असं हवाई सेविका खासदारांना उद्देशून बोलंत होती. कृपया हे चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=gCRj5FQnohE
हा स्ट्युपिड मॅन म्हणजे सुकुमारच (वा ज्याने खासदारांवर हल्ला केला तोच) आहे.

ही चित्रफीत सुद्धा पाहिलेली आहे. सुकुमारने खासदारावर हल्ला केला असे यातून अजिबात दिसत नाहीत. अनेकजण पाठमोरे दिसतात व हवाईसुंदरी 'डोन्ट डू दॅट, डोन्ट डू दॅट' असे दोन वेळा ओरडताना दिसते. याचा संबंध कर्मचार्‍याला विमानातून ढकलण्याशी असावा कारण विमानाच्या दारात सुकुमार पुढे दिसतात व त्यांच्या मागे गायकवाड दिसतात व सुरक्षा कर्मचार्‍याने त्यांचा हात धरलेला दिसतो. सुकुमारने खासदाराला मारहाण केली असे कणभरसुद्धा दिसत नाही. 'कितने बद्तमीज है ये लोग' असे कोणतरी म्हणल्याचे ऐकू येते. हे कोण कोणास म्हणाले हे समजू शकत नाही. संतापलेल्या खासदार महाशयांना शांत करण्यासाठीच हवाईसुंदरी सुकुमारचा स्टुपिड मॅन असा उल्लेख करत असावी. आपल्याच सहकार्‍याला मूर्ख म्हटल्याने खासदारसाहेबांचा उसळलेला क्रोध कमी होईल असा त्यामागचा हेतू असावा. भारतात एखाद्या पक्ष कार्यकर्त्यावर सुद्धा हात उचलण्याची सर्वसामांन्यात हिम्मत नसते. एखाद्या खासदारावर ६० वर्षीय कर्मचारी हात उचलण्याची शक्यता शून्य आहे.

गामा पैलवान's picture

1 Apr 2017 - 2:28 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

१.

खासदार महाशयांनी हा मुद्दा आता जास्त प्रतिष्ठेचा न करता स्वतःहून माफी मागून प्रकरण मिटवून टाकावे.

यावरून एक गोष्ट आठवली. मोदींनाही माध्यममुखंड गुजरात दंगलींवरून सदैव माफी मागायचा आग्रह करीत. एके दिवशी मेघनाद देसाई चर्चेस आलेले असतांना त्यांनी विचारलं की जर मोदींनी माफी मागितली तर इथे बसलेले किती जण माफ करतील? सगळे नाही म्हणाले. देसाई म्हणतात की नेमकं हेच कारण आहे की मोदी माफी मागंत नाहीत.

श्रीगुरुजी, जर खासदारांनी माफी मागितली तर तुम्ही त्यांना अजिबात माफ करणार नाहीत. उलट त्यांच्या माफीचं भांडवल करून गहजब कराल. हे गायकवाड बरोब्बर जाणून आहेत.

२.

स्वतःहून मारहाणीच्या फुशारक्या कॅमेर्‍यासमोर मारल्याने त्यांची बाजू लंगडी झाली आहे व जनमत मोठ्या प्रमाणात त्यांच्याविरूद्ध आहे.

ज्याला तुम्ही फुशारक्या म्हणता त्यात गायकवाडांनी चपलेने का मारलं त्याचं कारण दिलेलं आहे. पण तुम्हाला ऐकायचं नाहीये. चलचित्र इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8

चपलेने मारण्याचे सांगण्यापूर्वी मुलाखतकर्ताच म्हणतोय की उसने (म्हणजे सुकुमारने) हात से मारा. म्हणजे गायकवाडांनी मार खाल्ल्यावरच चप्पल उगारलेली आहे.

आणि हो, जनमत काहीही त्यांच्याविरुद्ध नाहीये. धाराशिवेत लोकांनी व्यवस्थित बंद पाळला (ऐकीव माहिती).

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 2:36 pm | श्रीगुरुजी

यावरून एक गोष्ट आठवली. मोदींनाही माध्यममुखंड गुजरात दंगलींवरून सदैव माफी मागायचा आग्रह करीत. एके दिवशी मेघनाद देसाई चर्चेस आलेले असतांना त्यांनी विचारलं की जर मोदींनी माफी मागितली तर इथे बसलेले किती जण माफ करतील? सगळे नाही म्हणाले. देसाई म्हणतात की नेमकं हेच कारण आहे की मोदी माफी मागंत नाहीत.

श्रीगुरुजी, जर खासदारांनी माफी मागितली तर तुम्ही त्यांना अजिबात माफ करणार नाहीत. उलट त्यांच्या माफीचं भांडवल करून गहजब कराल. हे गायकवाड बरोब्बर जाणून आहेत.

माफी मागायची नसेल तर मग बसा रेल्वेने जात किंवा मग वेगवेगळ्या नावाने बुकिंग करून बुकिंग कॅन्सल होत असलेले बघत बसा. एकतर ज्या विमानात व्यवसाय वर्गच नव्हता, त्या विमानातून प्रवास पूर्ण झाल्यावर व्यवसाय वर्ग का नाही अशी तक्रार करणे हा मूर्खपणा आहे. दुसरं म्हणजे आपण कर्मचार्‍याला मारले हे अत्यंत उन्मत्तपणे कॅमेर्‍यासमोर सांगितल्याने या विशिष्ट व्यक्तीबद्दल जनमत मोठ्या प्रमाणात विरोधात गेले आहे. खासदार शिवसेना या बदनाम पक्षाचे असल्याने जनमताची भावना अजून तीव्र आहे. कॅमेर्‍यासमोर फुशारक्या मारून गायकवाडांनी स्वतःची बाजू लंगडी करून ठेवली आहे. तिसरं म्हणजे सर्व विमान कंपन्यांनी कायदेशीररित्या यांच्या प्रवासावर बंदी घातली आहे व हे त्याबाबतीत बंदी हटवा अशी विनवणी करण्यापलिकडे काहीही करू शकत नाही. यांना बंदी घालण्यामागे विमान कंपन्यांकडे सबळ कारणे आहेत व त्यामुळेच खासदार महाशय बंदीविरूद्ध न्यायालयात गेलेले नाहीत कारण विमान कंपन्यांची कायदेशीर बाजू भक्कम आहे. म्हणूनच शिवसेना सुमित्रा महाजनांनी मध्यस्थी करून बंदी उठवावी यासाठी धडपड करीत आहे. शिवसेनेच्या दुर्दैवाने १-२ वैयक्तिक खासदारांचा अपवाद्द वगळता कोणीही शिवसेनेच्या बाजूने नाही. संसदेत शिवसेनेचे २१ खासदार असताना जेमतेम ७-८ खासदार बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे मंत्रीमंडळातील प्रतिनिधी अनंत गीते मूग गिळून गप्प आहेत. शिवसेना रोज सकाळ संध्याकाळ भाजपच्या नावाने शिमगा करीत असते. त्यामुळे भाजप या प्रकरणात पूर्ण तटस्थ राहून गायकवाडांची मजा बघत आहे.

अशा परिस्थितीत दोनच उपाय शिल्लक आहेत. एक म्हणजे विमान कंपन्यांनी स्वतःच बंदी उठवायची (ही शक्यता अत्यंत धूसर आहे) किंवा गायकवाडांनी माध्यमांसमोर न येता गुपचूप विमानकंपन्यांशी बोलणी करून वेळ पडल्यास दिलगिरी व्यक्त करून बंदी उठविण्याची विनंती करायची. तसे करायचे नसेल तर मग बसा तोंड लपवून आणि रेल्वेतून प्रवास करत.

ज्याला तुम्ही फुशारक्या म्हणता त्यात गायकवाडांनी चपलेने का मारलं त्याचं कारण दिलेलं आहे. पण तुम्हाला ऐकायचं नाहीये. चलचित्र इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8

ही चित्रफीत मी पाहिलेली आहे. या चित्रफितीतील गायकवाडांच्या वाक्यावाक्यातील माज डोक्यात तिडीक उत्पन्न करतो. कोणत्याही परिस्थितीत मारहाणीचे समर्थन होऊच शकत नाही.

चपलेने मारण्याचे सांगण्यापूर्वी मुलाखतकर्ताच म्हणतोय की उसने (म्हणजे सुकुमारने) हात से मारा. म्हणजे गायकवाडांनी मार खाल्ल्यावरच चप्पल उगारलेली आहे.

उसने म्हणजे गायकवाडनेच (सुकुमारने नव्हे) हातानेच मारले का असे मुलाखतकर्त्याने विचारल्यावर गायकवाड मोठ्या माजात सांगतात की हाताने नाही चपलेने मारले.

आणि हो, जनमत काहीही त्यांच्याविरुद्ध नाहीये. धाराशिवेत लोकांनी व्यवस्थित बंद पाळला (ऐकीव माहिती).

बंद पाळणे म्हणजे जनमत बाजूने आहे असा अर्थ नसतो. जनता मारहाणीच्या व तोडफोडीच्या भीतिने अत्यंत नाईलाजाने दुकाने बंद ठेवतात.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Apr 2017 - 10:45 am | हतोळकरांचा प्रसाद

नुसता शिवसेनेचाच नाही गापै, आता माझं मत असं बनलंय कि याचा त्यांच्या विमानसेवेबद्दलच्या तक्रारीशीही काही संबंध नाही. त्यांनी त्यांची तक्रार शांततेनेच (पण विमान खोळंबवुन चुकीच्या मार्गाने) करायचा प्रयत्न केला. भांडण आणि मारामारी हा कर्मचाऱ्यांच्या शुद्ध अरेरावीतून सुरु झालेला प्रयत्न आहे.

तो विडिओ आणि मीडियाला दिलेली स्टेटमेंट्स अनेकवेळा बघितल्यावर उलट माझे मत असे झाले आहे कि खासदारांनी त्यांना फक्त एकाच झापड मारली आहे(अर्थात हाही गुन्हाच आहे). त्यांचे "चप्पलसे २५ मारा" हे उपरोधात्मक वक्त्यव्य स्वतःचा शिवसेनाविरोध कुरवळण्यासाठी वापरण्यात येत आहे, कारण ह्या वाक्याच्या आधीचं उसने क्या बोला कैसे मारा? हातसे, पैरसे, असं विचारानं आणि त्याच वाक्याच्या नंतरचं "बतमीजीसे बात कर रहा था, मारा एक फिर" हे वाक्य सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले. "त्यांनी स्वतःच २५ मारल्याची कबुली दिलीय" याचा वापर करताना (त्यांनी ते स्वतःच्या कृतीबद्दल कबुली दिलीय त्यामुळे त्याला पुरावा लागणार नाही असं लंगडं समर्थन करून) त्यांनी स्वतःच स्वतःबद्दल "चार बार पैर गिरा, आप बुजुर्ग हो बैठके बात करो" हे मात्र सरळ दुर्लक्ष करायचं. एका ६० वर्षाच्या "बुजुर्गला" कपडे फाडून चपलेने मारले असे ओरडून सांगून बुजुर्गपणाचा वापर करून प्रकरणाचे गांभीर्य वाढवताना हे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करायचे कि खासदार स्वतः ५७ वर्षाचे आहेत.

खासदारांच्या बाजूच्या प्रत्येक गोष्टीला पुरावा मागताना त्यांच्या विरोधातल्या गोष्टी मात्र कुठल्याही वर्तमानपत्रात कुठल्याही पुराव्याविना आल्या तरी लगेच विश्वास ठेवायचा. खासदारांनी तिकीट बुक करण्याचा ७ वेळा प्रयत्न केला याला पुरावा काय? त्यांच्या नावाने बुक करण्याचा प्रयत्न कोणी केला याबद्दल काहीही माहिती नसताना त्याबद्दल जणूकाही विमान कंपनीने बरा दणका दिला म्हणून आनंद व्यक्त्य करणे म्हणजे दांभिकता वाटते.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 2:59 pm | श्रीगुरुजी

नुसता शिवसेनेचाच नाही गापै, आता माझं मत असं बनलंय कि याचा त्यांच्या विमानसेवेबद्दलच्या तक्रारीशीही काही संबंध नाही. त्यांनी त्यांची तक्रार शांततेनेच (पण विमान खोळंबवुन चुकीच्या मार्गाने) करायचा प्रयत्न केला. भांडण आणि मारामारी हा कर्मचाऱ्यांच्या शुद्ध अरेरावीतून सुरु झालेला प्रयत्न आहे.

कारण काहीही असले तरी कर्मचार्‍याला मारणे हा गुन्हा आहे. व्यवसायवर्ग नसलेल्या विमानातून प्रवास करून प्रवास पूर्ण झाल्यावर व्यवसाय वर्ग का नाही अशी तक्रार करणे हा मूर्खपणा होता. तक्रारीसाठी विमान खोळंबून ठेवणे व कर्मचार्‍याला चपलेने मारणे हा मोठा गुन्हा आहे. कर्मचार्‍याच्या अरेरावीचे कारण पुढे करून हे गुन्हे झाकता येणार नाहीत.

तो विडिओ आणि मीडियाला दिलेली स्टेटमेंट्स अनेकवेळा बघितल्यावर उलट माझे मत असे झाले आहे कि खासदारांनी त्यांना फक्त एकाच झापड मारली आहे(अर्थात हाही गुन्हाच आहे). त्यांचे "चप्पलसे २५ मारा" हे उपरोधात्मक वक्त्यव्य स्वतःचा शिवसेनाविरोध कुरवळण्यासाठी वापरण्यात येत आहे, कारण ह्या वाक्याच्या आधीचं उसने क्या बोला कैसे मारा? हातसे, पैरसे, असं विचारानं आणि त्याच वाक्याच्या नंतरचं "बतमीजीसे बात कर रहा था, मारा एक फिर" हे वाक्य सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले. "त्यांनी स्वतःच २५ मारल्याची कबुली दिलीय" याचा वापर करताना (त्यांनी ते स्वतःच्या कृतीबद्दल कबुली दिलीय त्यामुळे त्याला पुरावा लागणार नाही असं लंगडं समर्थन करून) त्यांनी स्वतःच स्वतःबद्दल "चार बार पैर गिरा, आप बुजुर्ग हो बैठके बात करो" हे मात्र सरळ दुर्लक्ष करायचं. एका ६० वर्षाच्या "बुजुर्गला" कपडे फाडून चपलेने मारले असे ओरडून सांगून बुजुर्गपणाचा वापर करून प्रकरणाचे गांभीर्य वाढवताना हे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करायचे कि खासदार स्वतः ५७ वर्षाचे आहेत.


आपण २५ वेळा चपलेने मारले हे त्यांनी स्वतःच माध्यमांसमोर सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी फक्त एकच झापड मारली या तुमच्या मताला शून्य महत्त्व आहे. १ असो वा २५, मारहाण हा गुन्हाच आहे. आपण काही चुकीचं केलंय हे त्यांना मान्यच नाही. उलट आपल्या कृत्याच्या अभिमानाने फुशारक्या मारल्यामुळे सर्वांच्या डोक्यात तिडीक गेली आहे. अशा खासदाराचे इथे समर्थन होत आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

खासदारांच्या बाजूच्या प्रत्येक गोष्टीला पुरावा मागताना त्यांच्या विरोधातल्या गोष्टी मात्र कुठल्याही वर्तमानपत्रात कुठल्याही पुराव्याविना आल्या तरी लगेच विश्वास ठेवायचा. खासदारांनी तिकीट बुक करण्याचा ७ वेळा प्रयत्न केला याला पुरावा काय? त्यांच्या नावाने बुक करण्याचा प्रयत्न कोणी केला याबद्दल काहीही माहिती नसताना त्याबद्दल जणूकाही विमान कंपनीने बरा दणका दिला म्हणून आनंद व्यक्त्य करणे म्हणजे दांभिकता वाटते.

बुकिंगबद्दल विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. आग्रह नाही. ७ वेळा वेगवेगळ्या नावाने, स्पेलिंग बदलून बुकिंगचा प्रयत्न केल्याची बातमी अनेक माध्यमातून आली आहे. त्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू.

विमान कंपनीने असल्या माजाला दणका दिला म्हणून खरोखरच आनंद झाला आहे. शिवसेनेच्या फुशारक्या, माज, घाणेरडी भाषा आणि या खासदार महाशयांचा माज अत्यंत डोक्यात जातो. अशांना दणका मिळाल्यामुळे झालेला आनंद व्यक्त करणे म्हणजे दांभिकता नसून खरोखरच आनंद झाला आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Apr 2017 - 5:54 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही इअरफोन्स लावून नीट विडिओ बघा आणि ऐका, खूप गरज आहे त्याची. अर्थात पूर्वग्रह बाजूला ठेवणेही तितकेच गरजेचे आहे नाहीतर काहीही हवे ते ऐकू येते आणि असे दिसते, तसे दिसते असले मुद्दे स्वसोयीसाठी वापरले जातात.

बाकी तुम्ही दर वेळेला २५ मारल्याचे खासदाराने सांगितल्याच्या पुढे सरकत नाही आहात, अगदी वरच्याच प्रतिसादात त्याचा प्रतिवाद असतानाही. यावरून मला असे वाटते की तुमचे मुद्दे परत परत तेच आहेत आणि चर्चा तिथेच फिरते आहे.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 8:36 pm | श्रीगुरुजी

मी सर्व चित्रफिती पाहिल्या आहेत. सुकुमार यांनी गायकवाड यांना शिवीगाळ केल्याचे किंवा मारहाण केल्याचे कोणत्याही चित्रफितीत नाही. इथे पूर्वग्रहाचा संबंधच नाही. जे दिसतंय त्यावरच मी बोलतोय.

खासदाराने २५ वेळा मारल्याच्या पुढे सरकायचं म्हणजे नक्की काय करायचं? आपण २५ वेळा चपलेने कर्मचार्‍याला मारलं हे खासदाराने अभिमानाने सांगितले. त्यानंतर विमान कंपन्यांनी त्यांच्यावर प्रवासबंदी आणली. त्या दिवसापासून खासदार माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी सभापतींची भेट घेऊन बंदी उठविण्याची मागणी केली. परंतु सभापतींनी या प्रकरणात पडण्यास नकार दिला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरूद्ध फिर्याद दाखल केलेली आहे. याव्यतिरिक्त अजून काही घडले असेल तर ते सांगा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Apr 2017 - 6:21 pm | हतोळकरांचा प्रसाद

शिवसेनेच्या फुशारक्या, माज, घाणेरडी भाषा

बाकी हे एकमेव (पूर्वग्रहदूषित) कारण आहे ह्या प्रकरणात विरोधाचा उत्साह उतू जाण्याचं, दुसरं काही नाही. दोनच महिन्यांपूर्वी दवाखान्यातील डॉक्टरांना भाजप खासदाराकडून झालेली मारहाण, मागच्या वर्षी सिद्धिविनायक मंदिरात भाजप खासदाराने पोलिसांना केलेली मारहाण, भंडाऱ्यात भाजप आमदाराने पोलिसांना केलेली मारहाण, भाजप खासदाराने मागच्या वर्षी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण कशी काय दुर्लक्षली गेली असेल बुआ? एवढा सात्विक संताप तिथे निघाला नाही? सगळ्याच पक्षात असे मुजोर लोक होते आणि आहेत. पण असं सगळं बाजूला ठेवून एखाद्या पक्षाचा अंधविरोध हि दांभितकताच होय!

याला कारण म्हणजे शिवसेना अशा ठोकशाहीचे थंड डोक्याने समर्थन करते. त्यांची Ideology च ती आहे. त्यांना मारहाण करून प्रश्न सुटतात असे वाटते.

खालचा लेख वाचा

http://www.rediff.com/news/column/why-the-shiv-sena-wont-say-sorry/20140...

तुम्ही मला सांगा दुसऱ्या किती पक्षात अशा वर्तनाचे

अभिमानाने समर्थन

केले जाते? राडा हा शब्द शिवसेना (आणि मनसे) या पक्षांनबद्दलच का वापरला जातो?

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Apr 2017 - 6:56 pm | हतोळकरांचा प्रसाद

दोन वेगवेगळ्या गोष्टींचा संबंध जोडण्याचे काही एक कारण नसावे. ते पक्ष त्यांचे आंदोलन कसे करतात आणि आंदोलनाचा विषय काय असतो हा स्वतंत्र मुद्दा आहे. ते कुठल्या गोष्टीचं समर्थन करतात हे स्पष्ट न करता हे पक्ष असे आहेत तसे आहेत हे म्हणणं म्हणजेच पूर्वग्रह! सध्या विषय चालू आहे तो एका खासदाराच्या वैयक्तिक गोष्टीचा आणि तिथे पक्ष आणून सरसकट त्या पक्षाच्या इतर गोष्टी आणून टीका करणे म्हणजेच आपला पूर्वग्रह कुरवळाने.

राहता राहिला प्रश्न त्यांच्या कार्यपद्धतीचा तर यासाठी एक वेगळा धागा आला तर विस्तृतात चर्चा करता येईल. हा देश खूप कायद्यानेच चालला असल्याच्या थाटात आणि सामान्य लोकांना उगाचच असल्या आंदोलनांनी त्रास होतो वगैरे दांभिकतेत जगण्यात मला रस नाही. त्यांनी काय आंदोलन केले आहे, त्या विषयाची व्याप्ती काय, त्यामागचा फायदा काय आणि पक्षाचा त्यामागचा उद्देश काय ह्या गोष्टी मला समर्थन देताना महत्वाच्या वाटतात, पक्ष नाही.

आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी माझ्या परीने उत्तर दिले. विस्तृत चर्चा पाहिजे तर बघू कधी वेळ मिळाल्यास.

मला तरी असे वाटते पक्षाची ideology जशी असते तसेच बहुतांश लोक त्या पक्षात राहतात.

तुम्हाला कायद्याची भाषा हा दांभिकपणा वाटतो पण या गोष्टी developed देशात बऱ्या दिसून येत नाहीत! तिथे असल्या पक्षांना काडीचेही महत्व दिले जाते असे मला वाटत नाही.

चूक फक्त पक्षांचीच आहे असे नाही. शेवटी ते पण सामान्य लोकांतूनच वर येतात.

या आणि अशा घटनेतून ठोकशाही चे समर्थन करणाऱ्यांची जितकी सार्वजनिक निंदा होईल, जितके जास्त लोकं यांना शिव्या घालतील - यातूनच पुढे जाऊन समाजामध्ये सकारात्मक बदल होईल असे वाटते. भारताला "सुधारीत" देश बनायचे असेल तर या प्रवृत्तीचा पदोपदी विरोधच केला पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 8:48 pm | श्रीगुरुजी

हा देश खूप कायद्यानेच चालला असल्याच्या थाटात आणि सामान्य लोकांना उगाचच असल्या आंदोलनांनी त्रास होतो वगैरे दांभिकतेत जगण्यात मला रस नाही. त्यांनी काय आंदोलन केले आहे, त्या विषयाची व्याप्ती काय, त्यामागचा फायदा काय आणि पक्षाचा त्यामागचा उद्देश काय ह्या गोष्टी मला समर्थन देताना महत्वाच्या वाटतात, पक्ष नाही.

सामान्य लोकांना आंदोलनांनी त्रास होतो ही दांभिकता!!!!!!!!!!!!

वा! वाचून धन्य झालो.

दोन उदाहरणे सांगतो. पवारांना नोव्हेंबर २०११ मध्ये दिल्लीत एका शीख व्यक्तीने मारले होते. त्यानिमित्त दुसर्‍या दिवशी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बंदचा आदेश दिला. माझ्या एका मित्राचे औषधांचे दुकान आहे. त्यादिवशी राष्ट्रवादीच्या टोळीच्या मारहाणीच्या व तोडफोडीच्या भीतिने बहुतेकांनी दुकाने बंद ठेवली होती. परंतु औषधांची दुकाने उघडी होती. माझ्या मित्राने देखील त्याचे औषधाचे दुकान उघडे ठेवले होते. साधारण ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीच्या टोळीतील ४०-५० जण दुचाकींवरून घोषणा देत आले. याचे औषधाचे दुकान उघडे बघून त्यांचे टाळके सरकले. दुचाकीवरून १०-१२ जण खाली उतरून दुकानात आले व दुकान बंद ठेवण्यासाठी दमदाटी करू लागले. हे औषधांचे दुकान आहे व शहरातील सर्व औषधांची दुकाने उघडी आहेत असे मित्राने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु टोळीतील एका गुंडाने राष्ट्रवादीच्या झेंड्याची काठी उलटी करून एका जाहिरात फलकावर मारून तो खाली पाडला. दुसर्‍याने माझ्या मित्राची गचांडी पकडली. त्यामुळे त्याचा सदरा फाटला व त्याचा चष्मा खाली पडून फुटला. नाईलाजाने निव्वळ भीतिने त्याला दुकान बंद करावे लागले.

दुसरे उदाहरण. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका महिलेचे वडील मुंबईत अत्यवस्थ असल्याचे समजल्यावर ती एशियाडने मुंबईला निघाली. पिंपरीच्या जवळ रस्ता अडविला होता कारण रिपब्लिकन पक्षाच्या कोणाला तरी अटक झाली होती. त्याचा निषेध म्हणून त्याच्या पित्त्यांनी पुणे-मुंबई रस्ता बंद पाडला होता. तब्बल ३-४ तासांच्या खोळंब्यानंतर हळूहळू वाहतूक सुरू झाली. ती महिला खूप उशीरा मुंबईला पोहोचली तेव्हा वडीलांचे निधन होऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील होऊन गेल्याचे तिला समजले. या गुंडांमुळे आपल्याला वडीलांचे अंत्यदर्शन सुद्धा घेता न आल्याने तिला अतिशय दु:ख झाले व संतापही आला.

अर्थात तुमच्या दाव्यानुसार वरील दोन उदाहरणात त्रास वगैरे झालेला नसून ती निव्वळ दांभिकता होती.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Apr 2017 - 10:34 pm | हतोळकरांचा प्रसाद

माझी परत एकदा विनंती आहे, तुम्ही प्रतिसाद नीट वाचत जावा. घाईघाईमध्ये आपल्याला हवा तसा अर्थ काढण्यात काहीही हशील नाही. वरील चर्चा धाग्याला धरून होत नाहीये, पण तुम्ही खेचलाच आहे विषय म्हणून मी उत्तर देतो.

शिवसेनेबद्दलच टीका का?-->त्यांची आंदोलने तशीच असतात--> म्हणून त्यांची इमेज खराब-->त्यांची आंदोलने सर्वसामान्यांना त्रासदायक असतात का?--> असं पक्षसापेक्ष आंदोलनांना त्रासदायक ठरवणं दांभिकता आहे. --- साधारण अशी चर्चा झाली.

बाकी हे बरे झाले की तुम्ही नेमक्या कोणत्या आंदोलनाबद्दल बोलत आहात ते सांगितले. आता एक काम करा, जरा गुगल करा, भाजप + रास्ता रोको, भाजप + बंद. त्या आंदोलनांनी नसेल ना होत त्रास? म्हणजे शिवसेना/मनसे खराब कारण ते लोकांना त्रास होईल अशी आंदोलने करतात. कोणती आंदोलने करतात ज्यामुळे लोकांना त्रास होतो तर रास्ता रोको, बंद वगैरे . मग भाजप करतं अशी आंदोलने करतं तेव्हा भाजप खराब कसं काय नाही? तर उत्तर म्हणजे ते भाजप आहे. हि दांभिकता आहे असे माझे मत आहे.

मी माझी आंदोलनांच्या बाबतीतली भूमिका स्पष्टपणे वर मांडली असतानाही तुम्हाला हवा तसा अर्थ काढण्यात यशस्वी झालात. आता परत एकदा भूमिका वाचा म्हणजे पूर्ण अर्थ लागेल. शिवसेना आणि मनसेच्या कोणत्या आंदोलनांनी लोकांना त्रास झाला म्हणून त्यांना वाईट म्हणायचं हे स्पष्ट करावं आणि मग तशीच आंदोलने दुसऱ्या पक्षांनी केली असतील तर त्याच बेसिसवर त्यांना वाईट न म्हणणे म्हणजे दांभिकता!

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 3:18 pm | श्रीगुरुजी

मी माझी आंदोलनांच्या बाबतीतली भूमिका स्पष्टपणे वर मांडली असतानाही तुम्हाला हवा तसा अर्थ काढण्यात यशस्वी झालात. आता परत एकदा भूमिका वाचा म्हणजे पूर्ण अर्थ लागेल. शिवसेना आणि मनसेच्या कोणत्या आंदोलनांनी लोकांना त्रास झाला म्हणून त्यांना वाईट म्हणायचं हे स्पष्ट करावं आणि मग तशीच आंदोलने दुसऱ्या पक्षांनी केली असतील तर त्याच बेसिसवर त्यांना वाईट न म्हणणे म्हणजे दांभिकता!

ज्या आंदोलनांनी सर्वसामान्य जनतेला त्रास होतो ती आंदोलने कोणत्याही पक्षांनी केली व कोणत्याही कारणासाठी केली तरी वाईटच आहेत. भाजपने केलेले आंदोलन चांगले व इतरांचे वाईट असे काही नसते. ती आंदोलने सारखीच वाईट आहेत.

अत्रे's picture

1 Apr 2017 - 7:24 am | अत्रे

त्या खो-कथेतील पात्रांप्रमाणेच इथे काही जण दुसऱ्या मितीतून येऊन युक्तिवाद करत आहेत असे वाटते :)

असो, सत्यमेव जयते.

गामा पैलवान's picture

1 Apr 2017 - 5:31 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

१.

कोणत्याही परिस्थितीत मारहाणीचे समर्थन होऊच शकत नाही.

होतं. जो अंगावर चाल करून येत असेल त्याला मारहाण करणं समर्थनीय आहे. गायकवाडांनी चारचार वेळा तेच तेच सांगायला लागल्यामुळे आपली समस्या लिहून काढली. सुकुमारला लिहिता वाचता येत नाही काय? बाकी चार लोकांशी काहीच भांडण उद्भवलं नव्हतं. एकट्या सुकुमारने हात उचलला ना? सुकुमारला कोणी अधिकार दिला?

२.

माफी मागायची नसेल तर मग बसा रेल्वेने जात किंवा मग वेगवेगळ्या नावाने बुकिंग करून बुकिंग कॅन्सल होत असलेले बघत बसा.

थोडक्यात काय की बळी तो कान पिळी. आज जनतेला झक मारून एअर इंडियाने जावं लागतं. कोणीही हवाई कर्मचारी प्रवाशाला थोबाडून काढू शकतो. आणि प्रवाशाने फक्त गप्प बसायचं. दाद मागायची सोय नाही.

विजय मल्ल्याने किंगफिशर खड्ड्यात घातली म्हणून तो दोषी ठरला. मात्र ज्या प्रफुल्ल पटेलने एअर इंडिया खड्ड्यात घातली तो आज राजरोसपणे हिंडतो आहे. कारण एअर इंडियाकडे फुकट पैशांचा स्रोत आहे. शेवटी बळी तो कान पिळी हेच खरं, नाहीका?

आ.न.,
-गा.पै.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Apr 2017 - 7:11 pm | हतोळकरांचा प्रसाद

मलाही उत्सुकता लागली आहे की विमान कंपनीचा हा उद्दामपणा किती दिवस चालतो ते पाहण्याची. आज ना उद्या त्यांना हि बंदी मागे घ्यावीच लागणार आहे. असा उद्दामपणा ते कोणाशीही करू शकतात म्हणूनच शिवसेनेचा सभागृहातूनच ह्या गोष्टीचा निकाल लावण्याचा प्रयत्न चालू आहे.यासाठी कायद्यातही योग्य ती तरतूद करण्याचा प्रयत्न दिसतोय.

यूट्यूबवर नुसते या विमान कंपन्यांच्या माजाचे विडिओज शोधून बघा, तिडीक येते डोक्यात.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 8:56 pm | श्रीगुरुजी

मलाही उत्सुकता लागली आहे की विमान कंपनीचा हा उद्दामपणा किती दिवस चालतो ते पाहण्याची. आज ना उद्या त्यांना हि बंदी मागे घ्यावीच लागणार आहे. असा उद्दामपणा ते कोणाशीही करू शकतात म्हणूनच शिवसेनेचा सभागृहातूनच ह्या गोष्टीचा निकाल लावण्याचा प्रयत्न चालू आहे.यासाठी कायद्यातही योग्य ती तरतूद करण्याचा प्रयत्न दिसतोय.

गायकवाडला स्वतःच्या पक्षातूनच फारसे समर्थन नाही. मग इतर पक्ष काय कप्पाळ समर्थन देणार? इतर सर्व पक्ष गायकवाडची मजा बघत आहेत. गायकवाडची सर्व बाजू लंगडी असल्याने तो काहीही करू शकत नाही. गायकवाडने सरकारी कर्मचार्‍याला केलेली मारहाण व विमानाला केलेला खोळंबा हा फौजदारी गुन्हा आहे व तो संसदेच्या बाहेर घडलेला आहे. त्यामुळे संसद त्याबाबतीत हस्तक्षेप करू शकत नाही व खासदार शिवसेनेचा असल्याने तसा हस्तक्षेप करण्याची कोणत्याही पक्षाची इच्छा नाही.

यूट्यूबवर नुसते या विमान कंपन्यांच्या माजाचे विडिओज शोधून बघा, तिडीक येते डोक्यात.

विषयांतर

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Apr 2017 - 10:45 pm | हतोळकरांचा प्रसाद

ते शिवसेनेचे नेमके कशाला समर्थन आहे आणि कशाला नाही ह्याची तुम्हाला माहिती कुठून मिळाली त्याचे सोर्स सांगितले तर बरे होईल. खासदारांवर त्यांनी केलेल्या मारहाणीबद्दल कारवाई होण्यात शिवसेना हस्तक्षेप करत नसेल तर उत्तमच की! शिवसेनेचे कौतुक करायला हवे याबाबतीत. आणि त्यांच्या बंदीबाबत शिवसेना त्यांच्यासोबत नाही अशी तुमची माहिती असेल तर त्याचा खात्रीलायक सोर्स सांगा!

बाकी, शिवसेना खासदारांसोबत राहिली म्हणजे खासदारांची बाजू चांगली नाहीतर लंगडी हे भारी लॉजिक आहे.

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 3:23 pm | श्रीगुरुजी

लोकसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण दाखवितात. शिवसेनेचे लोकसभेत १८ खासदार असले तरी गायकवाडांवरील बंदी रद्द करा अशा घोषणा देऊन अध्यक्षांच्या आसनासमोर उतरलेले फक्त ७ खासदार होते. बाकीचे कोठे होते? सुमित्रा महाजनांनी त्यांना कडक शब्दात झापल्यानंतर ते परत आपल्या आसनावर गेले. मंत्रीमंडळात मंत्री असलेल्या अनंत गीतेंनी तर या विषयावर एक शब्दही बोललेला नाही. अध्यक्षांना भेटायला शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळात फक्त ६-७ खासदार होते. बाकीचे कोठे गेले? संजय राऊत रोज वाहिन्यांना बाईट देऊन पूर्णपणे अतार्किक तारे तोडत असले तरी उधोजी आणि आदूबाळ गप्पच आहेत.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Apr 2017 - 4:22 pm | हतोळकरांचा प्रसाद

कोणी कोणत्या मुद्द्यावर बोलावे याचे पक्षसंकेत त्यांनी पाळले तर त्यावर कोणाला काही प्रॉब्लेम असू शकतो का? २१ च्या २१ खासदारांनी गोंधळ घातला म्हणजे त्या सगळ्यांचा पाठिंबा हे तुमचे अजब तर्कट म्हणजे उगाच विरोधाला विरोध काहीही असे आहे. लोकसभेचे, विधानसभेचे किंवा आणखीही कुठले कामकाज जरा जवळून पहा म्हणजे बाकीचे कोठे होते हा प्रश्न पडणार नाही. कधी विधानसभेत तरी वेलमध्ये 100 आमदार बघितले आहेत का? शिष्टमंडळ हे प्रातिनिधिक असू शकत नाही का? कि अध्यक्ष्यांसमोर जाऊन मतदान करायचे होते पाठिंब्याबद्दल? त्यांचा पक्ष म्हणून त्यांना काय करायचेत ते करू देत कि, शिवसेना म्हणून उगाच प्रत्येक गोष्टीत पक्ष आणण्यात काय फायदा?

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 8:26 pm | श्रीगुरुजी

शिवसेनेचे बहुसंख्य आमदार, खासदार व दस्तुरखुद्द अध्यक्ष या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत. यातूनच काय समजायचं ते समजा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Apr 2017 - 9:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

राष्ट्रीय स्तरावर चर्चा करण्यासारखा विषय नसतानाही तो चर्चिला जावा आणि तोही एकांगी अशी अपेक्षा ठेवली जाते यातुनच काय समजायाचे समजते, तुम्हीही समजायचं ते समजून घ्या!

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Apr 2017 - 10:48 pm | हतोळकरांचा प्रसाद

विषयांतर

बरोबर आहे हे विषयांतरच आहे कारण तुमच्यासाठी विमान कंपन्यांची मुजोरी हा विषयच नसून संबंधित खासदार हा शिवसेनेचा आहे एवढाच विषय आहे. विमान कंपनीचा कर्मचारी मुजोरी करूच शकत नाही हा पूर्वग्रह दूर व्हावा म्हणून तो सल्ला होता.

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 3:26 pm | श्रीगुरुजी

या धाग्याचा विषय गायकवाडांनी मूर्खासारख्या कारणावरून एअर इंडियाच्या कर्मचार्‍याला केलेली मारहाण व मारहाणीचे उन्मत्तपणे केलेले समर्थन हा आहे. विमानकंपन्यांची सेवा हा एक व्यापक विषय आहे व तो या धाग्याचा विषय नसल्याने त्याविषयी बोलणे म्हणजे विषयांतर आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Apr 2017 - 4:24 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही मुळात "कारण" कधी समजावून घेतलेलेच नाही, त्यामुळे त्याला मूर्खासारखे म्हणणे अपेक्षितच आहे. विषय समजावून घेतला नसल्यामुळेच विषयांतर वाटणे साहजिकच आहे.

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 8:28 pm | श्रीगुरुजी

बरं. ठीक आहे. तुम्ही सांगा तक्रारीचे काय कारण होते ते.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 8:52 pm | श्रीगुरुजी

होतं. जो अंगावर चाल करून येत असेल त्याला मारहाण करणं समर्थनीय आहे. गायकवाडांनी चारचार वेळा तेच तेच सांगायला लागल्यामुळे आपली समस्या लिहून काढली. सुकुमारला लिहिता वाचता येत नाही काय? बाकी चार लोकांशी काहीच भांडण उद्भवलं नव्हतं. एकट्या सुकुमारने हात उचलला ना? सुकुमारला कोणी अधिकार दिला?

सुकुमारने हात उचलला? कधी? चित्रफितीत तर तसे काहीच दिसत नाही. सुकुमारवर हात उचलण्याचा गायकवाडला कोणी अधिकार दिला? मुळात समस्या नसतानासुद्धा गायकवाडला तमाशा करण्याचे काय कारण व अधिकार होता?

थोडक्यात काय की बळी तो कान पिळी. आज जनतेला झक मारून एअर इंडियाने जावं लागतं. कोणीही हवाई कर्मचारी प्रवाशाला थोबाडून काढू शकतो. आणि प्रवाशाने फक्त गप्प बसायचं. दाद मागायची सोय नाही.

कोणत्या हवाई कर्मचार्‍याने कोणत्या प्रवाशाला थोबाडले आहे?

विजय मल्ल्याने किंगफिशर खड्ड्यात घातली म्हणून तो दोषी ठरला. मात्र ज्या प्रफुल्ल पटेलने एअर इंडिया खड्ड्यात घातली तो आज राजरोसपणे हिंडतो आहे. कारण एअर इंडियाकडे फुकट पैशांचा स्रोत आहे. शेवटी बळी तो कान पिळी हेच खरं, नाहीका?

विषयांतर

उपेक्षित's picture

1 Apr 2017 - 7:56 pm | उपेक्षित

खासदार गायकवाड यांनी मारहाण केली हे निश्चितच चूक आहे पण म्हणून एयर इंडियाच्या सुकुमार नामक महाभागाची काहीच चूक नाही असेही नाही शिक्षा झाली तर दोघांना झाली पाहिजे तोच खरा न्याय असेल.

उपेक्षित's picture

1 Apr 2017 - 9:45 pm | उपेक्षित

माझी संपादक मंडळाला एक कळकळीची विनंती आहे येथील काही ID वारंवार एखादा मुद्दा भाजप विरुद्ध सेना अशा track वर आणून वाट्टेल तशी चर्चा करतात (अगदी अभ्यासू ID सुद्धा) आता खरच कंटाळा आला आहे या गोष्टींचा.
या असल्या वांझोट्या चर्चा पहिल्या पानावर आणि जयंत काका वगेरे लेखकांचे लेख/ कथा कुठेतरी ३/४ थ्या पानावर जातात.
कृपया थोडातरी चाप लावा या लोकांवर.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Apr 2017 - 10:56 pm | हतोळकरांचा प्रसाद

अत्यंत खेदाने नमूद करतो, हा अत्यंत अकारण आणि हिणकस शेरा वाटला. चर्चा हि चर्चा आहे. ती मिपाच्या धोरणाला धरून नसेल तर संपादक मंडळी नक्कीच लक्ष घालतात. राहता राहिला प्रश्न तुम्हाला आवडते लेख पहिल्या पानावरुन बघण्याचा, तर ते "एक्सट्रा क्लिक" इतकं सोपं आहे.

हे मलाच लिहिलंय असं गृहीत धरून नाही, तर कोणालाही असं का लिहावं म्हणून प्रतिसाद दिला . पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.

उपेक्षित's picture

2 Apr 2017 - 4:50 pm | उपेक्षित

प्रसाद भाऊ इतके मनाला नका लाऊन घेऊ, तीच तीच चर्चा आणि तेच तेच नेहमीचे खेळाडू बघून आता थोडे थांबा असे म्हणावेसे वाटले बाकी काही नाही.
तुम्ही चर्चा निट पाहिली तर असे ध्यानात येईल कि मोजके ४/५ नेहमीचे खेळाडू फ़क़्त खेळत असतात बाकी सदस्य जास्ती सहभागी नसतात so तेच नेहमीचे सदस्य तेच मुद्दे वारंवार उगाळत बसतात (नव्या बाटलीत जुनीच दारू )

असो मला जे वाटले ते स्पष्टपणे लिहिले कुणालाही दुखावण्याचा यात अजिबात हेतू नव्हता, नाहीये आणि नसणारे.

बाकी ज्याचे त्याला कळतेच.

गामा पैलवान's picture

1 Apr 2017 - 9:57 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

सुकुमारने हात उचलला? कधी? चित्रफितीत तर तसे काहीच दिसत नाही.

या चित्रफितीत मुलाखतकार म्हणतोय की 'हात से मारा' : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8

खासदारांचं म्हणणं आहे की सुकुमारने शिवीगाळ केली. खासदारांचा वृत्तांत इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=ssZlfXZC8_8

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 3:47 pm | श्रीगुरुजी

पैलवान मामा,

तुम्हाला चित्रफीत नीट समजली नाही का मुद्दाम वेड पांघरताय?

पहिल्या चित्रफितीत सुकुमारने मारहाण केली असा अजिबात उल्लेख नसून गायकवाडच पत्रकाराला विचारतोय की "मी त्याला कसे मारले असे सुकुमार सांगतोय? हाताने का पायाने?" यावर तो पत्रकार म्हणाला की "तो म्हणतोय हाताने मारले". यावर गायकवाड प्रौढीने सांगतो की "हाताने नाही, मी चपलेने मारलंय." इथे आपण सुकुमारला कसं मारलंय हे अत्यंत अभिमानाने गायकवाड सांगतोय.

दुसर्‍या चित्रफितीत तर गायकवाड स्वतःच अगदी स्पष्टपणे काय घडलंय ते सांगतोय. विमान दिल्लीला पोहोचल्यावर तो हवाईसुंदरीला तक्रारपुस्तक आणायला सांगतो. मला जनता वर्गात बसायला लावल्याची तक्रार लिहायची आहे असे तो सांगतो. त्याला तिने तक्रारपुस्तक दिल्यानंतर तो त्यात आपली तक्रार लिहून देतो (गायकवाडला तक्रारपुस्तक देण्यात आले नव्हते हा काही माध्यमांचा दावा खोटा दिसतो कारण इथे गायकवाड स्वतःच सांगतोय की मला तक्रारपुस्तक मिळाल्यानंतर मी त्यात तक्रार लिहून दिली). तक्रार लिहिल्यानंतरसुद्धा तो आसनावर बसून राहतो. एअर इंडियाच्या सीएमडीला (चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर) इथे बोलवा. त्यांच्या कानावर तक्रार घातल्याशिवाय मी इथून हलणार नाही असा अत्यंत मूर्खासारखा आग्रह धरून तो आसनावरच बसून राहतो. फक्त जनता क्लासचीच आसने असलेल्या विमानात व्यवसाय वर्गाची आसने का नाहीत ही तक्रार याला थेट सीएमडी कडे करायची होती! तो आसनावरून उठत नाही हे पाहून वरीष्ठ कर्मचारी सुकुमार तिथे येतो. तो याला उठायला सांगतो. आपण खासदार आहोत असे गायकवाड सांगतो. मग सुकुमार त्याला ऐकवतो की तू खासदार असलास म्हणून काय झालं. मी तुझी मोदींकडे तक्रार करीन. हे ऐकल्यावर गायकवाडची सटकते. तो रागाने सांगतो की तुझ्याकडून ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही. मी शिवसेनेचा खासदार आहे. असे म्हणून तो पायातले सँडल काढून २५ वेळा सुकुमारला मारतो.

हे सर्व गायकवाडने स्वतःच दुसर्‍या चित्रफितीत सांगितले आहे. एकतर पूर्ण जनता वर्गाची आसने असलेल्या विमानातून प्रवास पूर्ण करून नंतर मला व्यवसाय वर्गाचे आसन का दिले नाही अशी तक्रार करणे हा मूर्खपणा आहे. दुसरं म्हणजे तक्रारपुस्तकात अधिकृतरित्या तक्रार लिहून दिल्यानंतर सुद्धा आसनातच बसून राहून इतरांना खोळंबा करणे हा नालायकपणा आहे. नंतर थेट सीमडीला बोलवा, ते आल्याशिवाय मी बाहेर येणार नाही हा अत्यंत अडेलतट्टूपणा आहे आणि शेवटी मी भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा खासदार आहे अशी बढाई मारून चपलेने कर्मचार्‍याला मारहाण करणे हा अत्यंत उन्मत्तपणा आहे. सुकुमार कदाचित आवाज चढवून बोलला असेल, परंतु खासदरकीचा माज दाखवून अडेलतट्टूप्रमाणे विमानाला खोळंबा करणार्‍याशी असे बोलणे चूक नाही. आणि त्याला उत्तर म्हणून मारहाण करणे हे जातिवंत गुंडगिरीचे लक्षण आहे.

एकंदरीत शिवसेनेचे नेते म्हणजे 'आधीच मर्कट आणि त्यात मद्यप्राशन' अशी अवस्था आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Apr 2017 - 4:33 pm | हतोळकरांचा प्रसाद

शेवटी पत्रकाराला कर्मचाऱ्याने हाताने मारले असे सांगितल्याचे तुम्हाला चित्रफितीत दिसल्याचे पाहून आनंद वाटला (त्याने हातसे मारा म्हटले, हातात चप्पल होती हे कधी नाकारले वगैरे युक्तिवाद येण्याची शक्यता नाकारता येत नाही :):)). गाडी थोडी तरी वास्तविकतेकडे सरकली. बाकी चपलेने मार खाल्ला असता तर कर्मचार्याने हाताने मारले असे का सांगितले असावे असा प्रश्न तुम्हाला पडला नसावा, अपेक्षितच आहे.

साधे उपरोधिक बोलणेही विडिओ अवेलेबाल असतानाही न समजने दुर्दैवी आहे. हिंदी-इंग्रजी माध्यमे असे छोट्या छोट्या वाक्यात विभागून स्वतःला हवा तसा अर्थ काढतात आणि स्वतःची पोळी भाजून घेतात त्यापेक्षा हे काही वेगळे नाही.

संजय पाटिल's picture

2 Apr 2017 - 4:48 pm | संजय पाटिल

सुकूमार्ने स्वतःच सांगीतलय चप्पलने मारलय म्हणून...
https://www.youtube.com/watch?v=6UbLVVL3qxg

संजय पाटिल's picture

2 Apr 2017 - 4:50 pm | संजय पाटिल

*सुकूमारनी

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Apr 2017 - 7:29 pm | हतोळकरांचा प्रसाद

त्यांनी नंतर दिलेल्या प्रतिक्रियेत काय म्हटले हा मुद्दा नाही. त्यांनी पत्रकाराला का सांगितले की हातसे मारा? या विडिओत तरी स्वतः काय बोलल्याने भांडण सुरु झाले हे सांगितल्याचे दिसत नाही. शिवाय घटनेनंतरच्या प्रतिक्रियेत देखील हे साहेब एकेरीतच उल्लेख चालवत आहेत. तिथे विमानात काय वेगळे काय केले असेल याचा अंदाज येऊ शकतो. शिवाय हवाईसुंदरीच्या प्रतिक्रियेत "उन्होने चप्पल हाथ मे ली तो मै बीच मी पडी और उन्हे मारनसे रोका" असेच म्हटले आहे.

पुन्हा अधोरेखित करतो, खासदारांना त्यांनी काय केलेय त्याची शिक्षा मिळायला हवी, काय बोलले त्याची नाही. शिवाय ते करताना विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याचा उद्दामपणा अजिबात दुर्लक्षिला जाऊ नये.

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 8:36 pm | श्रीगुरुजी

खाली संजय पाटील यांनी दिलेली चित्रफीत बघा. आपल्याला चपलेने मारले हे सुकुमार स्वतः सांगत आहे. आणि उपरोध बिपरोध इ. गोष्टी शिवसेनेच्या स्कोपमध्ये नाहीत. जे थेट अंगावर येऊन गचांडी धरून मारहाण सुरू करतात, त्यांच्यासाठी उपरोध त्यांच्या कुवतीपलिकडचा आहे. गायकवाड सांगतोय त्यात उपरोध वगैरे काही नव्हता. त्यात निव्वळ माज आणि आपण काहीतरी प्रचंड पराक्रम गाजवून आलोय हा अभिमान होता.

श्रीगुरुजी,

१.

एअर इंडियाच्या सीएमडीला (चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर) इथे बोलवा. त्यांच्या कानावर तक्रार घातल्याशिवाय मी इथून हलणार नाही असा अत्यंत मूर्खासारखा आग्रह धरून तो आसनावरच बसून राहतो.

नेमक्या याच कारणासाठी माझा रवींद्र गायकवाडांना पाठींबा आहे. गायकवाडांनी तिकीट आगाऊ आरक्षित करूनही एअर इंडियाने त्यांना वेळच्या वेळी सूचन का दिली नाही? गायकवाड दुसऱ्या विमानाने यायला तयार होते. प्रवाशाची गैरसोय करणे कोणत्या तत्त्वांत बसतं? की एअर इंडियाचा तोटा झाल्याखेरीज त्यांना जाग येणार नाहीये?

२.

मग सुकुमार त्याला ऐकवतो की तू खासदार असलास म्हणून काय झालं. मी तुझी मोदींकडे तक्रार करीन. हे ऐकल्यावर गायकवाडची सटकते. तो रागाने सांगतो की तुझ्याकडून ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही. मी शिवसेनेचा खासदार आहे. असे म्हणून तो पायातले सँडल काढून २५ वेळा सुकुमारला मारतो.

लायकीप्रमाणे सुकुमारला वागवाल्याबद्दल प्राध्यापकमहाशयांचं पुनश्च अभिनंदन!

३.

नंतर थेट सीमडीला बोलवा, ते आल्याशिवाय मी बाहेर येणार नाही हा अत्यंत अडेलतट्टूपणा आहे

आहेच मुळी. मात्र असा अडेलतट्टूपणा केल्याशिवाय एअर इंडियाला जाग येत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे.

४.

शेवटी मी भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा खासदार आहे अशी बढाई मारून चपलेने कर्मचार्‍याला मारहाण करणे हा अत्यंत उन्मत्तपणा आहे.

याच्याशी मात्र असहमत. उन्मत्तपणा सुकुमारने दाखवला आहे. मोदींना ओढायची काय गरज होती? शिवीगाळ करायची काय गरज होती? त्याऐवजी पोलिसांना बोलवायचं होतं.

असो.

या प्रकरणातल्या दोन गोष्टी खटकल्या.

१. प्रा. गायकवाडांवर विमानबंदी लादली गेली. परंतु लोकहिताची कामं केल्यावर उलटा प्रसाद मिळणं नवीन नाही.

२. सीएमडी विमानात आला नाही. तो आला असता तर गायकवाडांनी त्यालाही बडवला असता. यातून अधिक चांगली निष्पत्ती झाली असती. पण ठीकाय. ड्यूटी म्यानेजर तर ड्यूटी म्यानेजर! तूर्तास दुधाची तहान ताकावर भागवतो.

जरी गायकवाडांनी केलेल्या हिंसेस माझं समर्थन नसलं तरी सहानुभूती निश्चितच आहे. तसेच विमानबंदीच्या विरोधात माझा त्यांना पूर्ण पाठींबा आहे.

जाताजाता : प्रा.गायकवाडांनी केलेल्या तक्रारीची प्रत दिसली नाही कुठल्याही माध्यमात. कारण उघड आहे. मिळाली तर बरं होईल.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 8:23 pm | श्रीगुरुजी

नेमक्या याच कारणासाठी माझा रवींद्र गायकवाडांना पाठींबा आहे. गायकवाडांनी तिकीट आगाऊ आरक्षित करूनही एअर इंडियाने त्यांना वेळच्या वेळी सूचन का दिली नाही? गायकवाड दुसऱ्या विमानाने यायला तयार होते. प्रवाशाची गैरसोय करणे कोणत्या तत्त्वांत बसतं? की एअर इंडियाचा तोटा झाल्याखेरीज त्यांना जाग येणार नाहीये?

गायकवाड दुसर्‍या विमानाने जायला तयार होते हे कोणी सांगितलं? तयार होते तर का गेले नाहीत?

लायकीप्रमाणे सुकुमारला वागवाल्याबद्दल प्राध्यापकमहाशयांचं पुनश्च अभिनंदन!

अगदी याच उद्दाम वृत्तीमुळे बहुसंख्य राजकारण्यांचा जनता तिरस्कार करते. लायकी नसतानासुद्धा विमानाच्या व्यवसायवर्गाची सवलत दिल्यानंतर हे असेच वागणार.

आहेच मुळी. मात्र असा अडेलतट्टूपणा केल्याशिवाय एअर इंडियाला जाग येत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे.

व्यवसाय वर्ग नसलेल्या विमानात व्यवसाय वर्ग का नाही याबद्दल प्रवास संपल्यानंतर तक्रार करणे हा मूर्खपणा होता व त्यानंतर थेट विमानकंपनीच्या अध्यक्षाला बोलाविल्याशिवाय मी उठणार नाही असा हट्ट धरणे हा महामूर्खपणा होता. अशी मागणी करणे म्हणजे संगणक वापरताना विंडोजमध्ये एखादी समस्या आल्यावर थेट बिल गेट्सला भेटण्याचा हट्ट धरण्यासारखे आहे.

याच्याशी मात्र असहमत. उन्मत्तपणा सुकुमारने दाखवला आहे. मोदींना ओढायची काय गरज होती? शिवीगाळ करायची काय गरज होती? त्याऐवजी पोलिसांना बोलवायचं होतं.

विमानात व्यवसाय वर्ग नाही हे माहित असूनसुद्धा प्रवास पूर्ण करणे व प्रवास पूर्ण झाल्यानंतर तक्रार करणे हाच मूळ उद्दामपणा होता. नंतर थेट सीएमडीला बोलाविण्याचा हट्ट धरणे व इतरांचा खोळंबा करणे हा त्याहून जास्त मोठा उद्दामपणा. सुकुमारने शिवीगाळ केलेली नाही. गायकवाडच मूर्खासारखं वागत होता. मोदींचे नाव घेण्यामागे जे कारण आहे ते मी पूर्वीच सांगितले आहे आणि ते योग्यच होते.

या प्रकरणातल्या दोन गोष्टी खटकल्या.

१. प्रा. गायकवाडांवर विमानबंदी लादली गेली. परंतु लोकहिताची कामं केल्यावर उलटा प्रसाद मिळणं नवीन नाही.

कसली डोंबलाची लोकहिताची कामे? विमान कर्मचार्‍याला चपलेने मारणे, इतर प्रवाशांचा खोळंबा करणे ही लोकहिताची कामे नसून समाजघातक कामे आहेत.

२. सीएमडी विमानात आला नाही. तो आला असता तर गायकवाडांनी त्यालाही बडवला असता. यातून अधिक चांगली निष्पत्ती झाली असती. पण ठीकाय. ड्यूटी म्यानेजर तर ड्यूटी म्यानेजर! तूर्तास दुधाची तहान ताकावर भागवतो.

असल्या फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडी येत नसतात. बाकी बडविण्याचे समर्थन वाचून अजिबात आश्चर्य वाटत नाही. हीच विकृती शिवसेनेने आजवर जोपासली आहे.

जरी गायकवाडांनी केलेल्या हिंसेस माझं समर्थन नसलं तरी सहानुभूती निश्चितच आहे. तसेच विमानबंदीच्या विरोधात माझा त्यांना पूर्ण पाठींबा आहे.

विमानबंदीस माझा पूर्ण पाठिंबा आहे. विमानातून प्रवास करण्याची यांची लायकी नाही. अशांनी फक्त एस टी च्या लाल डब्यातून प्रवास करावा.

जाताजाता : प्रा.गायकवाडांनी केलेल्या तक्रारीची प्रत दिसली नाही कुठल्याही माध्यमात. कारण उघड आहे. मिळाली तर बरं होईल.

कसली डोंबलाची तक्रार? विमानात व्यवसाय वर्गच नसताना मला व्यवसाय वर्गात का बसविले नाही अशी तक्रार करणे तद्दन मूर्खपणा आहे. अशी तक्रार करणे म्हणजे जैन पावभाजी खाल्ल्यानंतर त्यात कांदा का नव्हता अशी तक्रार करून पावभाजीवाल्याला बडविण्यासारखे आहे.

जरी गायकवाडांनी केलेल्या हिंसेस माझं समर्थन नसलं तरी सहानुभूती निश्चितच आहे. तसेच विमानबंदीच्या विरोधात माझा त्यांना पूर्ण पाठींबा आहे.

जाताजाता : प्रा.गायकवाडांनी केलेल्या तक्रारीची प्रत दिसली नाही कुठल्याही माध्यमात. कारण उघड आहे. मिळाली तर बरं होईल.

गामा पैलवान's picture

3 Apr 2017 - 1:57 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

१.

गायकवाड दुसर्‍या विमानाने जायला तयार होते हे कोणी सांगितलं? तयार होते तर का गेले नाहीत?

गायकवाड दुसर्‍या विमानाने जायला तयार होते हे गायकवाडांनी सांगितलं. कृपया इथे पहा : https://www.youtube.com/watch?v=ssZlfXZC8_8

मात्र इतर विमानाची माहिती वेळेत मिळणं अपेक्षित होतं. एक वर्षापासून ही जनताफेरी होती. खासदारांनी व्यवसायवर्गाचं तिकीट वर्षभर आगाऊ आरक्षित केलेलं असतांना हा बदल केल्यानंतर एअर इंडियाने त्यांना ही माहिती पुरवायला हवी होती. ऐन वेळेस बदल कळवल्याने त्यांना निरुपायाने त्याच फेरीने जावं लागलं.

२.

लायकी नसतानासुद्धा विमानाच्या व्यवसायवर्गाची सवलत दिल्यानंतर हे असेच वागणार.

लायक लोकं असं आजीबात वागंत नाहीत. म्हणून तर एअर इंडिया डोक्यावर चढून बसलेत. त्यामुळेच नालायकांना लायकी दाखवून द्यावी लागते.

३.

व्यवसाय वर्ग नसलेल्या विमानात व्यवसाय वर्ग का नाही याबद्दल प्रवास संपल्यानंतर तक्रार करणे हा मूर्खपणा होता व त्यानंतर थेट विमानकंपनीच्या अध्यक्षाला बोलाविल्याशिवाय मी उठणार नाही असा हट्ट धरणे हा महामूर्खपणा होता.

आजिबात नाही. नाक दाबलं की तोंड उघडतं.

४.

अशी मागणी करणे म्हणजे संगणक वापरताना विंडोजमध्ये एखादी समस्या आल्यावर थेट बिल गेट्सला भेटण्याचा हट्ट धरण्यासारखे आहे.

म्हणूनंच विंडोज ह्याक केली जाते. लिनक्समध्ये अशी वेळ कधीच येत नाही.

५.

विमानात व्यवसाय वर्ग नाही हे माहित असूनसुद्धा प्रवास पूर्ण करणे व प्रवास पूर्ण झाल्यानंतर तक्रार करणे हाच मूळ उद्दामपणा होता.

पूर्वसूचना न देता व्यावासाय्वर्ग रद्द करणे हा माझ्या मते उद्दामपणा आहे.

६.

नंतर थेट सीएमडीला बोलाविण्याचा हट्ट धरणे व इतरांचा खोळंबा करणे हा त्याहून जास्त मोठा उद्दामपणा.

एअर इंडियाकडे बक्कळ विमानं आहेत. कोणाचाही खोळंबा व्हायला नको.

७.

सुकुमारने शिवीगाळ केलेली नाही. गायकवाडच मूर्खासारखं वागत होता. मोदींचे नाव घेण्यामागे जे कारण आहे ते मी पूर्वीच सांगितले आहे आणि ते योग्यच होते.

सुकुमारने शिवीगाळ केली नाही हे कशावरून म्हणता तुम्ही?

८.

कसली डोंबलाची लोकहिताची कामे? विमान कर्मचार्‍याला चपलेने मारणे, इतर प्रवाशांचा खोळंबा करणे ही लोकहिताची कामे नसून समाजघातक कामे आहेत.

वरवर पाहता तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीत आपण आपला दृष्टीकोन पालटला पाहिजे. ही अपवादात्मक परिस्थिती उद्भवण्यास सुकुमार आणि एअर इंडिया जबाबदार आहेत.

९.

असल्या फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडी येत नसतात. बाकी बडविण्याचे समर्थन वाचून अजिबात आश्चर्य वाटत नाही. हीच विकृती शिवसेनेने आजवर जोपासली आहे.

माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडीला यायला भाग पाडलं की एअर इंडियाच्या सेवेचा दर्जा आपोआप सुधारेल. बाकी, बडवण्याचं म्हणालात्त तर ती विकृती आहेच. शंकाच नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत आपण आपला दृष्टीकोन पालटला पाहिजे. अशी अपवादात्मक परिस्थिती उद्भवणारच नाही याची काळजी एअर इंडियाने सेवेचा दर्जा उंचावून घेतली पाहिजे.

१०.

विमानातून प्रवास करण्याची यांची लायकी नाही. अशांनी फक्त एस टी च्या लाल डब्यातून प्रवास करावा.

एअर इंडियाची विमानं उडवायची लायकी नाही. त्यांनी फक्त खेळण्यातली विमानं उडववीत. ते तरी त्यांना जमेल का याची शंकाच आहे.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2017 - 1:08 pm | श्रीगुरुजी

आजिबात नाही. नाक दाबलं की तोंड उघडतं.

इथे गायकवाड पक्षपरंपरेला अनुसरून एअर इंडियाचे नाक दाबायला गेले. त्यांना वाटले की नाक दाबले की तोंड उघडेल. प्रत्यक्षात त्यांच्या स्वतःच्याच ** दाबल्या गेल्या व आता त्यांच्यावरच लपून बसायची वेळ आली आहे. दिल्लीला जाण्यासाठी नावाचे स्पेलिंग बदलून, ठिकाण बदलून, विमान कंपनी बदलून तिकीट काढायचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु सर्व विमानकंपन्यांनी एकजूट दाखवून त्यांची मग्रुरी मोडून काढली आहे.

पूर्वसूचना न देता व्यावासाय्वर्ग रद्द करणे हा माझ्या मते उद्दामपणा आहे.

विमानात व्यवसायवर्ग नव्हतात तो रद्द कोटून करणार?

एअर इंडियाकडे बक्कळ विमानं आहेत. कोणाचाही खोळंबा व्हायला नको.

विमानं म्हणजे नाक्यावरच्या रिक्षा नव्हेत. एक गेली तर लगेच दुसरी मिळते असं विमानाचं नसतं. एक विमान एखाद्या प्रवाशाच्या मूर्खपणामुळे खोळंबलं तर लगेच दुसरं विमान उभं करा असं शक्य नसतं. त्यापेक्षा भविष्यात त्या मूर्खाला प्रवासबंदी करून तो परत असा मूर्खपणा करणार नाही याची व्यवस्था करणे सोपे असते.

माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडीला यायला भाग पाडलं की एअर इंडियाच्या सेवेचा दर्जा आपोआप सुधारेल. बाकी, बडवण्याचं म्हणालात्त तर ती विकृती आहेच. शंकाच नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत आपण आपला दृष्टीकोन पालटला पाहिजे. अशी अपवादात्मक परिस्थिती उद्भवणारच नाही याची काळजी एअर इंडियाने सेवेचा दर्जा उंचावून घेतली पाहिजे.

दांडगाई वगैरे करून सेवेचा दर्जा सुधारत नसतो. त्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया वापरावी लागते. दांडगाई केली तर दांडगाई करणार्‍याविरूद्ध जनमत जाते. मुळात ज्या मुद्द्यावरून गायकवाडांनी मारहाण करून दांडगाई केली तो मुद्दाच मूर्खपणाचा होता. मुगायकवाडांनी योग्य त्या कायदेशीर मार्गाने मुद्दा उपस्थित केला असता तर दाद लागू शकली असती. थेट कायदा हातात घेतल्याने जनतेला एअर इंडीयाऐवजी गायकवाडांच्या मग्रूरीचाच संताप आला आहे व त्यांना विमानप्रवास बंदी केल्याचा आनंद झाला आहे.

एअर इंडियाची विमानं उडवायची लायकी नाही. त्यांनी फक्त खेळण्यातली विमानं उडववीत. ते तरी त्यांना जमेल का याची शंकाच आहे.

जर एअर इंडीयाची विमाने उडविण्याची लायकी नसेल तर गायकवाडांनी एअर इंडियाने प्रवास टाळायला हवा होता. बंदी घालूनसुद्धा सुरवातीचे काही दिवस त्यांनी पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानाचेच बुकिंग करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांच्यात कणभर स्वाभिमान असता (त्यांचा पक्ष जातायेता, दिवसरात्र स्वाभिमानाच्या गफ्फा हाणत असतो), तरी त्यांनी आयुष्यात परत एअर इंडियाच्या विमानात पाऊल ठेवले नसते.

गामा पैलवान's picture

3 Apr 2017 - 6:23 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

१.

परंतु सर्व विमानकंपन्यांनी एकजूट दाखवून त्यांची मग्रुरी मोडून काढली आहे.

प्रा. गायकवाडांना त्रास सहन करावा लागेल हे उघड आहे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेकांनी हालापेष्टा सहन केल्या तसाच हा त्याग आहे.

२.

त्यापेक्षा भविष्यात त्या मूर्खाला प्रवासबंदी करून तो परत असा मूर्खपणा करणार नाही याची व्यवस्था करणे सोपे असते.

मान्य. कारण की, त्यापेक्षा भविष्यात एअर इंडियाला उड्डाणबंदी करून ते परत असा मूर्खपणा करणार नाही याची व्यवस्था करणे कठीण असते.

३.

दांडगाई वगैरे करून सेवेचा दर्जा सुधारत नसतो. त्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया वापरावी लागते.

पण सेवेचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष वेधता येतं.

४.

थेट कायदा हातात घेतल्याने जनतेला एअर इंडीयाऐवजी गायकवाडांच्या मग्रूरीचाच संताप आला आहे व त्यांना विमानप्रवास बंदी केल्याचा आनंद झाला आहे.

इच्छा असूनही थेट कायदा हातात घ्यायची हिंमत नसल्याने कित्येक लोकं हात चोळंत बसतात. त्यांना प्रा. गायकवाडांवरील बंदीने आनंद झालेला नाही.

५.

जर एअर इंडीयाची विमाने उडविण्याची लायकी नसेल तर गायकवाडांनी एअर इंडियाने प्रवास टाळायला हवा होता.

मान्य. मात्र तिकीट सरकारी कोट्यातून मिळालेलं होतं. म्हणून एअर इंडियाचा सरकारी पाठींबा काढून घेतला पाहिजे.

६.

त्यांच्यात कणभर स्वाभिमान असता (त्यांचा पक्ष जातायेता, दिवसरात्र स्वाभिमानाच्या गफ्फा हाणत असतो), तरी त्यांनी आयुष्यात परत एअर इंडियाच्या विमानात पाऊल ठेवले नसते.

यांत स्वाभिमानाचा संबंध नसून हा सुविधेचा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे सुविधाहीन प्रवासामुळेच हे प्रकरण उद्भवलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2017 - 9:01 pm | श्रीगुरुजी

सर्वच प्रतिसाद वाचून खूप हसायला आलं.

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 8:42 pm | श्रीगुरुजी

एअर इंडिया व इतर भारतीय विमान कंपन्यांना धडा शिकविण्याची संधी गायकवाडांना अजूनही आहे. त्यांना भारतीय विमान कंपन्यांनी बॅन केलं असलं तरी परदेशी विमान कंपन्यांनी बॅन केलेलं नाही. ते आता दिल्लीला जाण्यासाठी एखाया परदेशी विमान कंपनीतून प्रवास करू शकतात. उदाहरणार्थ, ते मुंबईहून ब्रिटिश एअरवेज च्या विमानाने लंडनला जाऊन तिथून ब्रिटीश एअरवेजची लंडन-दिल्ली ही फ्लाईट घेऊन दिल्लीला येऊ शकतात. असे केले तर भारतीय विमान कंपन्यांची चांगली खोड मोडेल व शिवसेनेला विजयोत्सव साजरा करता येईल. अर्थात लंडनला पोहोचल्यावर ब्रिटिश एअरवेजच्या कर्मचार्‍याला मारहाण वगैरे केली किंवा ब्रिटीश एअरवेजच्या अध्यक्षाला इथे बोलाविल्याशिवाय मी विमानातून खाली उतरणारच नाही असा 'शिव'हट्ट धरला तर पुढची १०-१२ वर्षे लंडनच्या तुरूंगात जाऊन पडावं लागेल.

गामा पैलवान's picture

3 Apr 2017 - 1:57 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

तुमचा हा सल्ला अतीव क्रांतिकारक आहे :

उदाहरणार्थ, ते मुंबईहून ब्रिटिश एअरवेज च्या विमानाने लंडनला जाऊन तिथून ब्रिटीश एअरवेजची लंडन-दिल्ली ही फ्लाईट घेऊन दिल्लीला येऊ शकतात.

यामुळे भरपूर वेळ वाचेल, नाहीका! पण याहून अधिक वेळ वाचवायचा असेल तर एअर इंडियाने बैलगाडीसेवा सुरू करावी म्हणतो मी.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2017 - 1:54 pm | श्रीगुरुजी

गायकवाडांकडे भरपूर वेळ आहे. म्हणून तर दिल्लीला पोहोचल्यानंतर सुद्धा विमानात तासभर बसून होते. तिकीट फुकट असल्याने पैशाचीही चिंता नाही. उद्या एअर इंडियाने बैलगाडी सेवा सुरू केली तर हे त्यात बसून मुक्कामापर्यंत पोहोचल्यावर विचारतील की बैलगाडीला अरबी घोडे का जोडले नव्हते आणि ते कारण दाखवून धिंगाणा घालतील.

गामा पैलवान's picture

3 Apr 2017 - 6:25 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

बरोबर आहे. जर जाहिरात करूनही ऐन वेळेस अरबी घोडे लावले नाहीत तर दाद मागणे क्रमप्राप्त आहे.

आ.न.,
-गा.पै.

आजानुकर्ण's picture

3 Apr 2017 - 9:45 pm | आजानुकर्ण

'शिव'हट्ट धरला तर

लोलियत. तुफान हसलो. गुरुजींचे या धाग्यावरचे प्रतिसाद आवडले.

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 9:17 pm | श्रीगुरुजी

तवलीन सिंह यांचा या विषयावर हा लेख वाचनीय आहे.

गामा पैलवान's picture

3 Apr 2017 - 1:57 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

लेखातलं एक विधान मननीय आहे :

For Lok Sabha MPs, living in the tree-lined, salubrious Lutyens cocoon is especially dangerous because it takes them away from the problems that ordinary Indians face daily.

प्रा. गायकवाडांनी सर्वसामान्यांना तोड द्याव्या लागणाऱ्या समस्येचा खास त्यांच्या शैलीत समाचार घेतला.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2017 - 1:57 pm | श्रीगुरुजी

फक्त जनता वर्ग असणार्‍या विमानात व्यवसाय वर्ग का नाही हा प्रश्न फक्त गायकवाडांनाच पडला, इतरांना नाही. इतरांना सारासार विवेकबुद्धी, पाचपोच, मॅच्युरिटी असते. त्यामुळे त्यांना असले प्रश्न पडले नाहीत. गायकवाडांकडे त्याचा अभाव आहे.

गामा पैलवान's picture

3 Apr 2017 - 6:26 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

वेळच्या वेळी माहिती पुरवणे का जमले नाही हा मूळ प्रश्न आहे.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2017 - 8:58 pm | श्रीगुरुजी

एक वर्षापासून या उड्डाणावर फक्त जनता वर्गाची आसने असलेलेच विमान आहे. गायकवाडा वर्षभर या विमानाने जात आहेत व याची त्यांना पूर्ण कल्पना होती.

कधीही विमानप्रवास न केल्याने मला माहित नाही पण कोणी सांगेल का की नक्की जनता वर्ग आणि व्यवसाय वर्ग या दोहोंत काय फरक असतो? जनता वर्गात बसून प्रवास केल्याने गायकवाडांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं असतं?
गापै,

प्रा. गायकवाडांनी सर्वसामान्यांना तोड द्याव्या लागणाऱ्या समस्येचा खास त्यांच्या शैलीत समाचार घेतला.

जनता वर्गात प्रवास केल्याने जनतेच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजल्या नसत्या का?
आता मारामारीवर माझे मतः कुणाही कर्मचार्‍याने कितीही उद्दामपणा केला तरीही त्याची विधीवत तक्रार करणे, चौकशीला सहकार्य करणे, तपासाचा पाठपुरावा करणे, लोकांना संघटीत करून अहिंसक प्रकारे निषेध प्रकट करणे हाच मार्ग संस्थागत बदल शाश्वत स्वरूपात घडवून आणू शकतात. मारामारी हा उपाय नाही आणि सर्वसामान्य लोकांसाठी तर नाहीच नाही.

मोदक's picture

4 Apr 2017 - 10:18 am | मोदक

काय ठरले मग..?

अशी प्रकरणे बॅट्समन आणि बॉलरमधील भांडणासारखी असतात.

बॅट्समनने (पक्षी:एअर इंडीया) कितीही वेळा बॉलरला धुतले (पक्षी:उद्धवसेना) तरी जेंव्हा बॅट्समन दुसर्‍या बॉलरला किंवा अगदी रन आऊट जरी झाला तरी मूळ बॉलर "ठासून (विकेट) घेतली" म्हणून दंगा करण्यास मोकळा असतो.

म्हणजेच, आज ना उद्या एअर इंडियाला बंदी उठवावी लागणारच आहे, त्यावेळी आतापर्यंत घातलेली बंदी विसरून "एअर इंडीयाचे थोबाड फोडले" असे अग्रलेख नक्की वाचायला मिळतील.

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2017 - 12:16 pm | श्रीगुरुजी

म्हणजेच, आज ना उद्या एअर इंडियाला बंदी उठवावी लागणारच आहे, त्यावेळी आतापर्यंत घातलेली बंदी विसरून "एअर इंडीयाचे थोबाड फोडले" असे अग्रलेख नक्की वाचायला मिळतील.

त्या अग्रलेखात "वाघाला डिवचलं की तो पंजा मारणारच", "जो शिवसेनेला आडवा गेला, तो संपला", "एअर इंडियाच्या छाताडावर नाचून आम्ही बंदी मागे घ्यायला लावली" अशी टाळीखेचक वाक्ये असतील.

बादवे, शूर मर्द मावळा गायकवाड लपून का बसला आहे? पानपताची लढाई जिंकून आल्यासारखा भीमपराक्रम गाजविल्यानंतर तर त्याचे कोपर्‍याकोपर्‍यावर सत्कार व्हायला हवेत.

अत्रे's picture

4 Apr 2017 - 12:51 pm | अत्रे

लपून का बसला आहे?

बहुधा पेटाऱ्यात बसून एअर इंडिया च्या स्टोरेज कंपार्टमेन्टमधून प्रवास करायच्या योजना आखत असावेत.
#आग्र्याहून-सुटका

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2017 - 12:57 pm | श्रीगुरुजी

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . .

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Apr 2017 - 8:59 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही, गायकवाड कोठे आहेत याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला का? केला तर कसा केला? नाही केला तर मग हे वाक्य का टाकावे तुम्ही? पुण्याचे खासदार कुठे आहेत माहिती आहे/असते का तुम्हाला? किती तो आकस, कसलेही बिनबुडाचे मुद्दे पुरतात. खेद वाटतो.

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2017 - 9:11 pm | श्रीगुरुजी

गायकवाड कोठे का जाईनात, त्यांना आपल्या माजाची व गुन्ह्याची शिक्षा मिळतेय याचा आनंद होतोय. केलेल्या कृत्याबद्दल जराही खेद न बाळगता त्यांना त्याबद्दल अभिमान वाटतोय. अशा माणसाची विमान कंपन्यांनी योग्य ती नाकेबंदी केली आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Apr 2017 - 9:31 pm | हतोळकरांचा प्रसाद

ते आनंद बिनंद सोडा हो, ते सगळं वैयक्तीक आहे. काहीतरी मुजोरगिरी करून बंदी लादली म्हणजे नाकेबंदी झाली असे तुम्हाला वैयक्तिरित्या वाटते. बाकी तुम्हाला ते कुठे आहेत याची माहितीच नाही किंवा तशी माहिती घेण्याचा तुम्ही प्रयत्नही केला नाहीत तरीही वरून ते कुठे लपून बसले आहेत असे विचारने म्हणजे आकसच!

चार दिवस का होईना लावली कि नाही बंदी म्हणून आनंद साजरा करणे ही जशी एक बाजू आहे तशी हि मुजोरगिरी कायदेशीररित्या उलथवल्यावर आनंद साजरा करणे दुसरी बाजू असू शकते का मान्य नसावे बरे? आणि मी म्हणतो शिवसेनेने न्यावेच हे तडीस कायदेशीररित्या. हा असला माजुरडेपणा परत होता काम नये. आपला आवडता पक्ष नाही म्हणून वाट्टेल त्याचे समर्थन करण्यात काय कौतुक?

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2017 - 10:57 pm | श्रीगुरुजी

गायकवाडांच्या मुजोरगिरीला कायदेशीर चाप लावण्यात आला आहे.

ते लपून बसल्यामुळेच लोकांसमोर येत नाहीत. आपण समोर आलो तर माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देताना तोंडाला फेस येईल एवढं त्यांना नक्की समजतं.

गायकवाडांची कायदेशीर बाजू लंगडी आहे. त्यामुळे शिवसेना न्यायालयात जाऊ शकत नाही. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याची बिनशर्त क्षमा मागणे हा एकच मार्ग गायकवाडांसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी हे वाचा.

https://www.google.co.in/amp/www.loksatta.com/desh-videsh-news/shiv-sena...

हतोळकरांचा प्रसाद's picture

5 Apr 2017 - 12:25 pm | हतोळकरांचा प्रसाद

ते लपून बसल्यामुळेच लोकांसमोर येत नाहीत.

हे वरच विचारले ना मी! तुमच्याकडे कुठलीच माहिती नसताना हे असे वैयक्तिक कोणीही सहजच मांडू शकतो, काही विशेष नाही त्यात. माध्यमाच्या तोंडाला फेस आणणाऱ्या प्रश्नांचं काय कौतुक? त्यांचे प्रश्न किती गैरलागू आणि कुठल्या लेवलचे असतात हे वेगळे सांगावे लागेल काय? गायकवाडांना हार्ट अटॅक आला आहे म्हणून ते दिसत नाहीत अशी बातमी काहीही कारण नसताना चालवणारे लोक आहेत. असली बातमी बघून खासदारांच्या घरचेही हवालदिल झाले. त्यामुळे अशा लोकांना उत्तर द्यायला अव्हेलेबल नसणे म्हणजे लपून बसने असते होय? तसे तर देशाच्या सर्वोच्च नेत्याला पण बरेच प्रश्न विचारायचे असतात माध्यमांना, पण ते वेळ आणि उत्तरे देत नाहीत असा काही माध्यमांचा सूर आहे, तो खरा मानून तेही लपून बसले आहेत असे म्हणता येऊ शकते का?

शिवसेनेची लंगडी बाजू असण्याचा काय संबंध? शिवसेनेने खासदार वि. कंपनी ह्या भांडणात न पडणे कौतुकास्पदच आहे की. शिवसेना मध्ये येतेय ती कायद्यातील छोट्या तरतुदींचा फायदा घेऊन असा बॅन लावणे आणि तोही खासदारासारख्या लोकप्रतिनिधीला हे अजिबात पटण्यासारखे नाही म्हणून त्यांना लोकसभेतून जे करायचे ते करण्यासाठी. खासदारांनी वैयक्तिकरित्या केस दाखल केलीच आहे. कोर्ट दोन्ही बाजुंना योग्य तो न्याय देईलच. बाकी तुमच्या माहितीसाठी खासदार एक दोन दिवसात आपली बाजू लोकसभेतच मांडतील असे दिसतेय.

श्रीगुरुजी's picture

5 Apr 2017 - 2:50 pm | श्रीगुरुजी

याच्यात वैयक्तिक काहीच नाही हो. सर्व गोष्टी सार्वजनिक आहेत. जिथून तुम्हाला गायकवाडांचं सर्व प्रकरण समजलं तिथूनच इतरांनाही इतर गोष्टी समजतात. गायकवाड माध्यमांना टाळण्यासाठीच लपून आहेत. मी याआधीच्या प्रतिसादात एका वॄत्ताची लिंक दिली आहे ती वाचा.

शिवसेनेची बाजू लंगडीच आहे. म्हणून तर गायकवाडांच्या मारहाणीचं उघड समर्थन करता येत नाहीय्ये. अन्यथा इतक्या दिवसात मुंबई किंवा पुणे विमानतळावर खळखट्याक झालं असतं. शिवसेना या भांडणात पडू शकत नाही कारण इतक्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं अवघड आहे. तसा प्रयत्न ५-६ खासदारांनी लोकसभेच्या वेल मध्ये घुसून केला होता. परंतु सुमित्रा महाजनांनी खडसावल्यावर गुपचुप माघारी येऊन आपल्या आसनावर जाऊन बसले.

गायकवाडांना विमानप्रवासाला बंदी घालणे योग्यच आहे. किंबहुना ही अत्यंत सौम्य शिक्षा आहे. असल्या खासदारांना सक्तमजुरीची शिक्षा योग्य ठरेल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

5 Apr 2017 - 3:40 pm | हतोळकरांचा प्रसाद

गायकवाड माध्यमांना टाळण्यासाठीच लपून आहेत.

वरचा प्रतिसाद नीट वाचा.

म्हणून तर गायकवाडांच्या मारहाणीचं उघड समर्थन करता येत नाहीय्ये.

म्हणजे सगळ्यांनी (शिवसेनेसकट) या मारहाणीचा समर्थन करावं अशी अपेक्षा होती कि काय? अहो मारहाणीचा समर्थन करण्याचा प्रश्नच कुठे येतो, तो गुन्हा आहे आणि त्यावर केस चालू आहे. तसाच गुन्हा समोरच्या बाजूवर हि दाखल आहे. कोर्ट ठरवेल ना पुढचं.

बाकी ते वेलमध्ये घुसणं, अध्यक्ष्यानी खडसावण वगैरे लोकसभेतल्या रोजच्या गोष्टी आहेत. दहा वर्ष भाजप तेच करत होते आणि त्याआधी इतर विरोधीही तेच करत होते, मग मुद्दा कसलाही असो.

खासदारांना सक्तमजुरी व्हावी कि अजून काही हे कोर्ट ठरवतं आणि सुदैवाने कोर्ट कुणाच्या आकसयुक्त भावना लक्षात घेत नाही. त्या तशा घेतल्या गेल्या असत्या तर आकस असणाऱ्या लोकांनी सक्तमजुरीची नाही तर या प्रकरणात फाशीचीही मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

श्रीगुरुजी's picture

5 Apr 2017 - 7:47 pm | श्रीगुरुजी

शिवसेना आपल्या प्रत्येक कृतीचे समर्थन करते. पूर्वी बाळासाहेब ठाकरे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करण्यासाठी संभाजीनगरला गेले असताता एका स्थानिक उर्दू दैनिकाने "बाल ठाकरेका औरंगाबादमे ठंडा स्वागत" अशी बातमी दिली होती. त्यामुळे संतापून दुसर्‍या दिवशी पत्रकार परीषदेत शूर शिवसैनिकांनी त्या वृत्तपत्राच्या बातमीदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून (त्याच्या गुप्तांगावर सुद्धा लाथा मारल्या होत्या) जबर जखमी केले होते. त्या मारहाणीचे बाळासाहेबांसकट सर्वांनी समर्थन केले होते.

या प्रकरणात संपूर्ण चूक गायकवाडांचीच असल्याने शिवसेनेला मारहाणीचे समर्थन करणे अशक्य झाले आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

5 Apr 2017 - 8:34 pm | हतोळकरांचा प्रसाद

विषयांतर. अर्थात तुमच्यासाठी मुळातच विषय शिवसेना असल्याने नसेलही म्हणा विषयांतर!

अनुप ढेरे's picture

4 Apr 2017 - 10:26 am | अनुप ढेरे

उस्मानाबादेत अजून बंद चालू आहे का संपला?

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2017 - 1:05 pm | श्रीगुरुजी

तो बंद कधीच संपला. सध्या गायकवाडांचे सार्वजनिक दर्शन बंद आहे आणि त्यांचा सर्व वर्गातील विमानप्रवास बंद आहे.

देशपांडेमामा's picture

4 Apr 2017 - 10:57 am | देशपांडेमामा

वरुन आठवले आमच्या भागातली अपेयपानाची दुकाने बंद झाली आहेत .. विकांताची सोय कशी करणार ह्या विचारात आहे

देश

गामा पैलवान's picture

4 Apr 2017 - 9:26 pm | गामा पैलवान

मोदक,

काय ठरले मग..?

यासंबंधी माझं आकलन सांगतो.

प्रा. गायकवाडांची प्रमुख चूक म्हणजे त्यांची शक्ती कमी पडली. सध्यातरी एअर इंडिया गायकवाडांहून बलिष्ठ दिसते आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास मारहाण करू नये अशा मताचा मी आहे. मात्र यापुढे जर कोणावर अशी वेळ आली तर एअर इंडियाच्या संदर्भात आपले बलाबल जाणून असणे अत्यंत जरुरीचे आहे.

हे बलाबल कसे जोखावे ते मला थेटपणे ठाऊक नाही. मात्र अंदाज लावता येतो. जर एखाद्या मंत्र्याला थोबाडून काढायची आपली औकात असेल तर एअर इंडियाचे बळ आपल्याहून कमी आहे असे खुशाल धरून चालावे. हा माझा केवळ अंदाज आहे. माझा सल्ला स्वत:च्या जबाबदारीवर वापरावा.

आ.न.,
-गा.पै.

मोदक's picture

5 Apr 2017 - 12:41 am | मोदक

मी माझे आकलन सांगू का..?

गायकवाड किती वेळा पुणे-दिल्ली करतात आणि किती वेळा मुंबई-दिल्ली करतात ते पाहिले पाहिजे. कारण त्या फ्लाईट अटेंडंटचा चेहरा लपवलेला एक व्हिडीओ आहे ज्यात ती सांगत आहे की "फर्स्ट क्लास शीटा पुणे-दिल्ली रूटवर नसतात" त्यामुळे असे असेलच तर हा एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आलेला नाही. (मला तो व्हिडीओ नंतर सापडलेला नाही - मी गंभीरपणे शोधलेलाही नाही, कोणी शोधून देणार असेल तर आगाऊ धन्यवाद देतो)

गायकवाडांनी मुंबई-दिल्ली सारखी पुणे-दिल्ली प्रवासाची अपेक्षा केली असेल. पुणे-दिल्ली फर्स्ट क्लासच्या शीटा नसलेले विमान आहे हे त्यांना आधी कळवले असेल तर त्यातून जाणे आणि नंतर CMD ला बोलवा अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे यात कोणताही संदेह नाही. विमान रोखून धरणे तर निव्वळ वेडेपणा आहे.

एक विमान असे विनाकारण अडकून राहणे - ते पण फालतू कारणांमुळे, याचे किती काय काय प्रमाणात परिणाम होतात आणि किती पटीत नुकसान होते याची माहिती नेते साहेबांना असणे अपेक्षित असले तरी ती माहिती असेलच असे नाही. त्यातून ते पडले खळ्ळ-खट्ट्याक परंपरेतले. त्यामुळे "ठासून सांगण्याच्या नादात" नेहमीप्रमाणे राडा केला गेला.

यात सुकुमार यांच्या वागणुकीची भर पडली असावी. (सुकुमार यांनी उद्धटपणा केला आहे असे त्यांचीच सहकारी म्हणत आहे)

गायकवाडांनी या प्रकरणाला खूपच हलके घेत, "२५ वेळा मारले" "स्लीपरने मारले" वगैरे बढाया मारल्या त्यामुळे हे प्रकरण असेच पेटत राहिले आहे, त्यात सेनेचे विद्वान टीव्हीवर चर्चेमध्ये जाऊन "निदान एअर होस्टेसला तर मारले नाही" असे तारे तोडत आहेत. (देव त्यांचे भले करो)
या भानगडीत सेनेचे नाक चेचण्याची संधी सहज न सोडणार्‍या भाजपाकडे करण्यासारखे फारसे शिल्लक राहिले नाहीये. अर्थात एअर इंडीयाला / स्टाफला भाजपाने मदत केली तरी आता त्याला सेनाविरोधाची झालर नसेल. उलट भाजपा पडद्याआडून सुत्रे हलवत असेल.

यात १००% बरोबर बाजू कुणाचीच नाही. गायकवाडांनी अडेलतट्टूपणा करून सुरूवात केली आणि त्यात त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे आणखी गाळात रूतले आहेत व सुकुमार यांचे उद्धट वागणे साईडलाईन झाले आहे.
..आता तर काय सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे आई भवानी त्यांना आणखी संकटे सोसण्याचे बळ देवो.

एकूण काय... म्हशीला औषधाचा गोळा नळीतून देताना नेमकी म्हशीने दुसरीकडून (ठासून) फुंकर मारलेली आहे. =))

अर्धवटराव's picture

5 Apr 2017 - 6:14 am | अर्धवटराव

=)) =)) =))

गामा पैलवान's picture

5 Apr 2017 - 11:57 am | गामा पैलवान

मोदक,

तुमचं मत सांगितल्याबद्दल धन्यवाद! :-)

तुम्हाला हवं असलेलं चेहरा धूसर केलेलं चलचित्र सापडत नाहीये. मात्र संबंधित बातमी इथे आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/i-dont-think-he-wanted...

प्रा. गायकवाडांचा आक्षेप व्यवसायवर्ग का नव्हता असा नसून त्याची आगाऊ माहिती का दिली गेली नाही असा आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की प्रा. गायकवाडांनी तक्रारपुस्तिकेत लिहिलेली तक्रार नेमकी काय आहे ते माध्यमं का उघड करंत नाहीयेत? शिवाय चेहरा धूसर केलेलं चलचित्रही हटवण्यात असेलं दिसतंय. बहुधा गायकवाडांच्या बदनामीमध्ये जास्त रस आहेसं दिसतंय. भरीस भर म्हणून गायकवाडांवर सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल झालाय. पण तरीही त्यांनी अटकपूर्व जामीन घेतलेला नाहीये. एकंदरीत गोंधळ वाढतोय. माध्यमांचं वर्तन (नेहमीप्रमाणे) शंकास्पद आहेच.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

5 Apr 2017 - 2:56 pm | श्रीगुरुजी


________________________________________________________________

हे पहा खासदारांची मुजोरी मोडून काढून त्यांना थेट शिंगावर घेणारे एअर इंडियाचे प्रमुख अश्वानी लोहानी.

२०१५ मध्ये त्यांनी तिरूपती विमानतळावर विमानतळ व्यवस्थापकाच्या कानाखाली मारणार्‍या काँग्रेसच्या खासदार मिथुन रेड्डींविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायला लावली होती. गायकवाडांच्या प्रकरणात सुद्धा ते खासदारांच्या गुंडगिरीला न घाबरता आपल्या कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे आहेत.

हतोळकरांचा प्रसाद's picture

5 Apr 2017 - 3:44 pm | हतोळकरांचा प्रसाद

करेक्शन पाहिजे वर - गायकवाडांच्या प्रकरणात सुद्धा ते खासदारांच्या गुंडगिरीला न घाबरता आपल्या कर्मचार्‍यांच्या उद्दामपणाच्या पाठीशी उभे आहेत. इथून पुढेही त्यांनी हाच पॅटर्न लागू करावा का? दोनच पर्याय ठेवायचे का? - १. कोणी तक्रार केली कि अरेरावी करायची, शिवीगाळ करायची, मग त्याचे पर्यवसन भांडणात झाले कि मग बंदी घालायची. किंवा २. कोणी तक्रार केली कि खोपच्यात घ्यायचा आणि कोणालाही ना कळू देता तोंड फुटेपर्यंत मारायचा.

सेवा सुधारण्यात लक्ष द्यायला नको का?

श्रीगुरुजी's picture

5 Apr 2017 - 7:43 pm | श्रीगुरुजी

कर्मचार्‍याचा कसला उद्दामपणा? एक माणूस मूर्खपणाची मागणी करत विमानातून उतरायला नकार देऊन विमानात बसून राहतो व इतरांचा खोळंबा करतो. त्याला उतरायला सांगितल्यावर कर्मचार्‍याला चपलेने मारहाण करून विमानातून ढकलून द्यायचा प्रयत्न करतो. नंतर कॅमेर्‍यासमोर अभिमानाने आपले कर्तृत्व सांगतो आणि ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा आहे अशा फुशारक्या मारतो. त्याचे वागणे योग्य आणि कर्मचारी उद्दाम!!!!

सेवा सुधारण्यात जरूर लक्ष द्यायला हवे. परंतु व्यवसाय वर्गाची सुविधा नसलेल्या विमानात व्यवसाय वर्गाची मागणी करणे म्हणजे शुद्ध शाकाहारी भोजनालयात मटण थाळी ची सेवा का नाही अशी तक्रार करून वेटरला बदडण्यासारखे आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

5 Apr 2017 - 8:44 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्हाला हवं ते वाक्य बरोबर गाळता! कर्मचाऱ्याने उतरायला सांगितल्यावर नाही, कर्मचाऱ्याने अरेरावी करून उद्दामपणाने काहीतरी बोलल्याने "मारा एक" असे आहे ते.

बाकी शुद्ध शाकाहारी हॉटेलने मटन थाळी चे कुपन विकायचे कशाला मग? मग विचारल्यावर चलंय तुला वेज खायचे तर खा नाहीतर हो बाहेर, उतरला नाहीस आत नेऊन तोंड फुटेपर्यंत मारेन म्हटल्यावर भांडण होणार नाही का? आणि हो हॉटेलचा विषय काढलाच आहे तर, असं एका हॉटेलच्या वेटरशी भांडण झाल्यावर शहरातल्या सगळ्याच हॉटेल्सनी बंदी घालणं योग्य वाटतं ना?

श्रीगुरुजी's picture

5 Apr 2017 - 10:38 pm | श्रीगुरुजी

इथे फक्त शाकाहारी जेवण मिळत असताना व मटणथाळी पलीकडच्या गल्लीतल्या हाटेलात मिळत असताना, इथे येउन शाकाहारी भोजन चेपल्यानंतर कांगावा करण्यात काय अर्थ आहे?

अशा गुंडावर शहरातल्या सगळ्याच हॉटेल्सनी बंदी घालणं योग्यच आहे.

श्रीगुरुजी's picture

5 Apr 2017 - 7:38 pm | श्रीगुरुजी

गायकवाडांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे हा वाद आता मिटला आहे. गायकवाडांनी स्वाभिमान दाखवून आता स्वतःच एअर इंडियावर बहिष्कार टाकला आहे. यातून एअर इंडियाला चांगलाच धडा मिळेल. इतर आमदार खासदारांनी देखील गायकवाडांचे अनुकरण करावे.

प्रत्येक खासदाराला एक इमान आणि एक हेलीकेप्टर साठी सरकारी अनुदान द्यायला पैजे.
उड़ा म्हणावे स्वखर्चाने.
.
बाकी जाउद्या गुरूजी आता, त्येन्चे ते उडले उगी तुम्ही लिबन्ध लिहित बसलाव. तेवढया शाईत एक विमान रंगले असते आख्खे.

उपेक्षित's picture

6 Apr 2017 - 3:12 pm | उपेक्षित

भारी प्रतिसाद

नाय ओ! कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच!

शिवसेनेचा संसदेत गोंधळ घालण्याचा इशारा

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2017 - 8:33 am | श्रीगुरुजी

कुत्र्याचा अपमान केल्याचा तीव्र निषेध.

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2017 - 3:10 pm | श्रीगुरुजी

अपेक्षेप्रमाणे शिवसेना खासदारांनी लोकसभेत यथेच्छ धुडगूस घातला.

इतके दिवस शांत असलेल्या अनंत गीतेंनी तर कहरच केला. ते चक्क विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर धावून गेले व त्यांची कॉलर धरायचा प्रयत्न केला असे सर्व वाहिन्यांवर (मराठी सुद्धा) सांगत होते. मराठी वृत्तपत्रांच्या आंतरजाल आवृत्तीतही असेच सांगितले आहे. या गीतेंना मंत्रीमंडळातून हाकलून लावावे अशी इच्छा आहे. मुंबई विमानतळावरून एकही विमान उडून देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली. मुंबई विमानतळ यांच्या तीर्थरूपांचा असावा बहुतेक. आपल्या पक्षाच्या खासदाराच्या गुंडगिरीबद्दल व माजाबद्दल एक कणभरही शब्द नाही, खंत नाही आणि इतरांनाच धमक्या देताहेत.

गायकवाडांनी तर एकापाठोपाठ एक षटकार मारले. म्हणे मी शिक्षक असून विनम्र स्वभावाचा आहे. एअर इंडियाच्या कर्मचार्‍याला आपण २५ वेळा चपलेने मारले, भविष्यातही असेच मारू, ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नसून शिवसेनेचा आहे, मी कशाबद्दल माफी मागू अशी उन्मत्त मुक्ताफळे यांनी उधळलेली सर्वांनी पाहिलेली आहेत. ही यांची विनम्रता! म्हणे त्या कर्मचार्‍याने नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला म्हणून मी त्याला मारले. मोदींबद्दल एवढा आदर होता तर उधोजींनी मोदींचा उल्लेख अफझलखान असा करून त्यांचा बाप काढला होता. त्यावेळी उधोजींना यांनी किती चपला मारल्या? अर्थात एका थर्डक्लास पक्षाच्या थर्डक्लास खासदाराकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नाही.

असले गावठी आणि उन्मत्त खासदार मराठी आहेत याची लाज वाटते.

गॅरी ट्रुमन's picture

6 Apr 2017 - 3:59 pm | गॅरी ट्रुमन

ते चक्क विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर धावून गेले व त्यांची कॉलर धरायचा प्रयत्न केला असे सर्व वाहिन्यांवर (मराठी सुद्धा) सांगत होते.

उत्तर प्रदेश विधानसभेत मागे माईक काढून एकमेकांवर फेकणे, खुर्च्या एकमेकांवर फेकणे असे प्रकार झाले होते. तसा प्रकार लोकसभेत झाला नाही आणि नुसते मंत्र्यांच्या अंगावर धावून जाण्यावरच थांबले ही काय कमी महत्वाची गोष्ट आहे का? :(

मुंबई विमानतळावरून एकही विमान उडून देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली.

गायकवाडांवरची बंदी मागे घेतली नाही तर मुंबई विमानतळावरून एकही विमान उडून देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली.

एअर इंडियाच्या एका कर्मचार्‍याबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सर्व विमानकंपन्यांनी बंदी घालणे बरोबर नाही असे म्हणणार्‍यांची यावरील प्रतिक्रिया बघायला हवी. एका शिवसेना खासदाराला उडायला बंदी घातली म्हणून या घटनेशी काहीही संबंध नसलेल्या लाखो प्रवाशांना वेठीस धरणे समर्थनीय आहे का?

बाय द वे, श्रीगुरूजी, आपल्याला शिवसेनेविरूध्द लिहिताना आखडता हात घ्यायला हवा. नाहीतर ते गुंड प्रवृत्तीचे लोक धमकी द्यायचे की मिपावर शिवसेनेविरूध्द लिहून येते म्हणून आम्ही मिपा हे संकेतस्थळच चालू देणार नाही!!

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Apr 2017 - 5:17 pm | हतोळकरांचा प्रसाद

एअर इंडियाच्या एका कर्मचार्‍याबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सर्व विमानकंपन्यांनी बंदी घालणे बरोबर नाही असे म्हणणार्‍यांची यावरील प्रतिक्रिया बघायला हवी.

नाहींचाये ते बरोबर आणि हेच तर सुरुवातीपासून सांगणे आहेना? आता शिवसेना म्हणाली म्हणून अशा बंदीतली चुकीची बाजू समोर आली का?

बाय द वे, श्रीगुरूजी, आपल्याला शिवसेनेविरूध्द लिहिताना आखडता हात घ्यायला हवा. नाहीतर ते गुंड प्रवृत्तीचे लोक धमकी द्यायचे की मिपावर शिवसेनेविरूध्द लिहून येते म्हणून आम्ही मिपा हे संकेतस्थळच चालू देणार नाही!!

बाकी हे मात्र अत्यंत अनपेक्षित आणि अकारण वाटलं! ह्या हिशेबाने साधारण सगळी माध्यमे आणि वृत्तपत्रे बंदच व्हायला हवी होती, नाही का?

प्रसाद_१९८२'s picture

6 Apr 2017 - 4:25 pm | प्रसाद_१९८२

या बातमीत लिहिल्याप्रमाणे, शिवसेनेच्या गायकवाड नावाच्या चप्पलमार खासदाराचा, उंदीर झालेला दिसतोय, "एअर इंडिया आणि विमान कंपन्यांनी माझ्यावर आतापर्यंत अन्याय केला आहे. मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती. मला धक्काबुक्की केल्यानंतर मी फक्त त्या अधिकाऱ्याला ढकललं होतं." २५ वेळा चपलेने मारले असे कॅमेर्‍यासमोर फुशारक्या मारणार्‍या ह्या खासदारांने संसदेत तर सरळ-सरळ घूमजाव केले आहे.

सध्याच्या शिवसेनेची हि सवयच झालेली दिसतेय, कॅमेर्‍यासमोर फुशारक्या मारायला एक बोलायचे व प्रकरण अंगाशी आल्यावर शेपुट घालायचे, पुर्वी बाळासाहेब त्यांनी मांडलेल्या विधानावर ठाम तरी असत पण सध्या फक्त बोलबच्चन लोकच उरलेत शिवसेनेत.

विशुमित's picture

6 Apr 2017 - 4:25 pm | विशुमित

<<<असले गावठी आणि उन्मत्त खासदार मराठी आहेत याची लाज वाटते.>>>
==>> त्या शिवसेनेच्या खासदारांचे जे होयचे ते होवो, मला त्याचे काय देणे घेणे नाही पण तुम्ही "गावठी" शब्द वापरून गाव आणि शहर यांच्यातल्या अमंगळ भेदभावाला खतपाणी घालत आपली वैचारिक दिवाळखरी मात्र सिद्ध केलीत. शहरी लोकांनी किती ही सभ्यपणाचा आव आणला तरी दुसऱ्यांना नीच दाखवण्यात कधीच कसर सोडत नाहीत. काही अपवाद सोडून.
तसे ही शहरात गुंठा आणि फ्लॅट घेऊन राहणारे स्वतःला शहरी समजणारे कधी काळचे गावाकडचे उपरेच (गावठी?) आहेत हे सोयीस्करपणे विसरतात. असो...

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Apr 2017 - 5:00 pm | हतोळकरांचा प्रसाद

शिवसेनेचे खासदार एकत्र नाहीत आणि या गोष्टींवर गायकवाडांसोबत नाहीत हि तुमची अपेक्षा फोल ठरल्याबद्ल खेद वाटला. बाकी शिवसेनेच्या खासदारांना आणि मंत्र्यांना हाकलून द्यावा हा तुमचा आणि भाजपचा मत बर्राबर जुळता :):)

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2017 - 5:29 pm | श्रीगुरुजी

मातोश्रीवरून दट्टया बसलेला दिसतोय, म्हणून तर आता गीते आणि इतर काही जणांनी तोंड उघडलेलं दिसतंय. अर्थात सेना खासदार संसदेत दांडगाई करून कांगावा करणार ही अपेक्षा अजिबात फोल ठरली नाही.

ही बंदी तूर्तास तरी उठविली जाणार नाही असे एअर इंडियाने निर्णय घेतल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवित आहेत. एअर इंडियाचे अभिनंदन!

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Apr 2017 - 9:14 pm | हतोळकरांचा प्रसाद

हाहाहा! चित भी मेरी पट भी मेरी!

बाकी तुम्ही कुठले चॅनेल बघता माहित नाही. पण आताची ब्रेकिंग न्युज अशी दाखवत आहेत की जर हि बंदी १० तारखेच्या एनडीएच्या मिटिंग आधी उठवली नाही तर शिवसेना या मीटिंगमध्ये सहभागी होणार नाही या भूमिकेनंतर बंदी उठवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2017 - 11:17 pm | श्रीगुरुजी

बंदी अजून उठविलेली नाही. मांजर उंदराला जसे खेळविते, तसा भाजप शिवसेनेला खेळवित आहे. संजय राउतांनी भुवया उंचावून गरागरा डोळे फिरवत बैठकीवर बहिष्कार टाकण्याच्या कितीही फुसक्या धमक्या दिल्या, तरी भाजप त्यांना कणभरही किंमत देणार नाही.

अभ्या..'s picture

6 Apr 2017 - 11:30 pm | अभ्या..

च्यामारी ही सगळी भाजपाची प्लान्ड गेम आहे होय?
तरिच म्हणले.......
(संपादित), लगेच कशी एक्टिव्हेट झाली.
चालु दया चालु दया......