वृत्तबद्ध लिहिताना
माझी एक गोची होते
यमक जुळवू जावे तर
अलगद काही निसटून जाते
माझी कविता "जुळत" नाही
टोटलच बघा लागत नाही
(अन जुळलीच बेटी चुकून तर..)
कमावलेली कृत्रिमता
हट्टीपणे हटत नाही
कवितेचे झटपट वर्ग
कुठे कोणी घेतं का?
असल्यास जरा सांगा मला
प्रतिभा विकत मिळते का?
(एक कोडं सुटत नाही ...)
भावना इतक्या तरल कशा?
शब्द इतके रुक्ष कसे ?
मग त्याची कविता वाचता वाचता
डोळ्यात पाणी येतेच कसे?
प्रतिक्रिया
13 Feb 2017 - 11:05 am | चांदणे संदीप
खोल खोल रूतलेल
तसंच सोडून दिलेलं
पुन्हा कधीतरी सललं,
पहिला पाऊस पडल्यावर
जुन्या वाळक्या खोडातून
नवं काहीतरी फुटलं,
कितीही खंबीर होऊन
तटस्थ, व्रतस्थ राहिलो
तरी आत गलबललं,
विसरलेला कप्पा आवरताना
तासनतास खिळवणारं
काहीतरी गवसलं,
जाणिवेत जवळ नसणारं
पण आठवणीत हसणारं
एक कुणी असलं,
मित्रांच्या संगतीत, निवांत
रात्रीच्या रंगल्या गप्पात
तिचं नाव निघालं,
की…
…कविता होते!
नाहीतर... गोची होते! :)
Sandy
13 Feb 2017 - 11:23 am | संजय क्षीरसागर
नाहीतर... गोची होते! :)
हे नसतं तरी चाललं असतं.
13 Feb 2017 - 3:08 pm | चांदणे संदीप
हे फक्त कवीसाठी आहे.... इतरासांठी नाही! :)
Sandy
13 Feb 2017 - 1:12 pm | सस्नेह
संदीप भौ, वाईच मोठ्ठी लिवा की !
13 Feb 2017 - 3:10 pm | चांदणे संदीप
परत केव्हातरी लिहितो... हे आत्ता हायज्याकिंग मोडवर चाललंय... :प
Sandy
13 Feb 2017 - 5:17 pm | अभ्या..
सॅन्डीबाबा, तेरा हायज्याकिंग मेरेकू लैच आवड्या हय.
13 Feb 2017 - 5:19 pm | अभ्या..
इत्ता आवड्या हय, इत्ता आवड्या हय, इत्ता आवड्या हय.....
की विडंबन पाडनेको ........(कवाआली टाळ्या देऊन) जी चाहता हय.
13 Feb 2017 - 7:36 pm | चांदणे संदीप
इर्शाद घ्या!
:प
Sandy
16 Feb 2017 - 6:27 pm | जव्हेरगंज
लय भारी!!
एकदम काळजातली!!
वरची आणि खालची दोन्ही कविता बेस्ट!!
13 Feb 2017 - 11:17 am | अनन्त्_यात्री
स॓दीप, क्या बात है!!
13 Feb 2017 - 3:11 pm | चांदणे संदीप
लिहीत राहा!
Sandy
13 Feb 2017 - 3:43 pm | पैसा
आवड्या. कविता आणि संदीपभौ ची कविता सुद्धा.
16 Feb 2017 - 10:08 am | टवाळ कार्टा
खिक्क....यमके गुर्जींना संपर्क करा
20 Feb 2017 - 8:14 am | दीपा माने
मोजक्या शब्दांत अमाप अर्थ दाखवण्यातली तुमची प्रतिभा आवडली.
20 Feb 2017 - 8:15 am | दीपा माने
मोजक्या शब्दांत अमाप अर्थ दाखवण्यातली तुमची प्रतिभा आवडली.
22 Feb 2017 - 9:59 am | अनन्त्_यात्री
जव्हेरग॑ज, स॑दीप, पैसा, दीपा...धन्यवाद!