कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in काथ्याकूट
1 Dec 2016 - 6:38 pm
गाभा: 

नमस्कार,

गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल.
या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही.

हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

१. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52
आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-(

२. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05
८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील.

सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे.

३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

image

४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54
आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्‍याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.

बरोबर..?

५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15
नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते.
पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते.
आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे.
शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.)

आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्‍या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो.

पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते.
या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत.

६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35
सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे.

पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल.

७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40
काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे).
उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ?
असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता.
८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

8 Dec 2016 - 2:46 pm | अप्पा जोगळेकर

ओके. थँक्यू ढेरे सर. 'बिनव्याजी कर्ज' या विषयावरील प्रदीर्घ मार्गदर्शनासाठी शतशः आभार.
अवांतर- तुम्हालादेखील संक्षी सरांसारखाच २% सरचार्ज पडतो का ?

क्रेडिट कार्डाने पेत्रोल भरलं तर लागतात. डेबिट कार्डाला नाही.

अप्पा जोगळेकर's picture

8 Dec 2016 - 3:41 pm | अप्पा जोगळेकर

ओके. नेक्श्टाईम ४००+ भरुन पाहा. आणि सरचार्ज रिक्रेडिट होतो का ते चेकवा. होईलच.

अनुप ढेरे's picture

8 Dec 2016 - 4:17 pm | अनुप ढेरे

हजार रु.चं भरलं होतं. क्रेडिट कार्डाला लागले चार्जेस. रिक्रेडिट झाले नाहीत. एक समजत नाही, प्रत्येक कार्ड, बँक अकाउंट वेगळे वेगळे प्लान्स ऑफर करतात. प्रत्येक जण आपापल्या कार्डाचेच प्लान्स युनिव्हर्सल आहेत अशा प्रकारे का भांडतोय? मला क्रेडिट कार्डाला चार्जेस पडतात. ते चार्जेस नसलेली क्रेडिट कार्ड देखील असतात.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Dec 2016 - 9:13 pm | हतोळकरांचा प्रसाद

अक्षरशः हेच सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला गेला हो!

अप्पा जोगळेकर's picture

8 Dec 2016 - 11:20 am | अप्पा जोगळेकर

आता दिशाभूल क्रेडिट कार्ड एजंत्स जास्तं करतात. चार्जेस अस्तात पण सांगताना झिरो चार्जेस सांगणे वगैरे.
अगदी अगदी. म्हणूनच डोळसपणे कार्ड घेण्यात हंशील आहे. नंतर आपण न वाचलेली अट म्हणजे 'हिडन चार्ज' असे होऊ नये.

श्रीगुरुजी's picture

7 Dec 2016 - 3:49 pm | श्रीगुरुजी

Paytm launches payment method for non-internet users

http://news.rediff.com/commentary/2016/dec/07/paytm-launches-payment-met...

सुज्ञ's picture

8 Dec 2016 - 1:50 am | सुज्ञ

तर बेंबट्या हे लोक हे असेच. हे असले लोक आमच्यावेळी देखील होते हो. अरे बैलगाडी च्या पुढे मजल नाही गेली यांची. आगगाडी आल्यावर ओरडायला लागले असला प्रवास भीतीदायक , अपघात होणारच , आम्हाला कसे झेपणार वगैरे

अरे कोयना धरण चालू केले तर म्हणू लागले पाण्यातील वीज (ऊर्जा) काढून घेऊन सत्वहीन पाणी शेतीस मिळते तस्मात धरण बंद करा वगैरे .. आहेस कुठे तू ..

त्यामुळे जगातील सर्वच प्रगत देश कमीत कमी रोकड वापरून व्यवहार करत असताना,त्याचे फायदे दाखवून देत असताना, तंत्रज्ञानाचे फायदे घेत असताना हे लोक थुक्क्की लावून नोटा मोजणे कसे व्यवहार्य असे ओरडा करून सांगणारच हो (आम्ही बदलत नसतो आणि इतरांना देखील बदलून देत नसतो हां . ) .
उद्या एखादा कोणी म्हटलाच समज की मशीन वापरून पैसे दिलेत तर बँकेच्या व्यवहारासाठी २% जास्त लागतील पण रोकड दिलीत तर बिल न देता तेवढेच पैसे घेतो,तर हे भामटे २% जास्त लावले म्हणून सरकारलाच शिव्या देतील, रोकड मोजतील आणि मिपावर भ्रष्टाचार संपत कसा नाही याच्या गरम गरम गोष्टी रंगवतील.

सरकार कोणत्याही हेतूने का असेना ढकलत आहे ना कमी रोख व्यवहारांकडे. मग ढकलू द्या की. उत्तमच आहे. किमान आपल्यासारखे शिक्षित लोक तरी सुरवात करू. उत्तम हेतू आहे की . अर्थात "कोणते" सरकार आहे हे बघून मग हेतूचा विचार करायचा असेल तर .. तर बेंबट्या तूच विचार कर ..
.
आकाशात उपग्रह सोडला कि खाली निघणाऱ्या धुराचा आणि धुरळ्याचा लोकांना कसा त्रास होतो असेही बोलू शकणारे आणि तेवढाच विचार करू शकणारे हे ..

तस्मात बेंबट्या , हे लोक हे असेच .. काय समजलेस ?

ट्रेड मार्क's picture

8 Dec 2016 - 2:00 am | ट्रेड मार्क

मस्त प्रतिसाद...

आजानुकर्ण's picture

8 Dec 2016 - 2:42 am | आजानुकर्ण

विनोदी प्रतिसाद....

http://www.german-way.com/germanys-cash-culture-geld-stinkt-nicht/

थुक्की लावून नोटा मोजणे नक्कीच व्यवहार्य आहे. इंटरनेट चालत नाही. कार्ड मशीन बंद पडलंय. कार्ड नेटवर्क बंद पडलंय. आम्ही फक्त विसा घेतो मास्टरकार्ड नाही. तिथं कोल्ड हार्ड कॅश ही नेहमीच कामी येते. सरकार कोणत्याही हेतूने ढकलत आहे हे डोळे (आणि मेंदू) बंद करुन एकदा मान्य करायचे ठरवले की ते उत्तमच हे आपोआपच ठरणार.

कॅश स्वरुपात पैसे वापरले की खर्च आपोआप कमी होतो. इलेक्ट्रॉनिक-प्लॅस्टिक मनी वापरले की जास्त खर्च होतो हे अनेक पर्सनल फायनान्स कन्सल्टंट आवर्जून सांगतात.
http://www.daveramsey.com/blog/good-and-bad-carrying-cash

स्वधर्म's picture

8 Dec 2016 - 11:41 am | स्वधर्म

+१

सुज्ञ's picture

9 Dec 2016 - 1:53 am | सुज्ञ

आपले प्रतिसादात अत्यन्त हास्यास्पद असतात .. त्यामुळे आपण ते टंकण्याचे कष्ट घेतले नाहीत तरी चालेल .आपल्या प्रतिसादांवर प्रतिसाद देण्याची आमची बुद्धी नाही . "कार्ड मशीन बंद पडलंय. कार्ड नेटवर्क बंद पडलंय. आम्ही फक्त विसा घेतो मास्टरकार्ड नाही. तिथं कोल्ड हार्ड कॅश ही नेहमीच कामी येते" हा आपला प्रतिसाद म्हणजे "पाणी संपल्यास दगड नेहेमीच कामी येतो आणि तो कुठेही मिळतो . पाणी दुर्मिळ आहे" छाप आहे . तस्मात आपले लेखनश्रम कमी करा

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 12:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

न्यूटनचा इनर्शियासंबंधीचा नियम फक्त जड वस्तूंनाच नाही तर मानवी मनाला पण लागू होतो. त्यातून, मनात काही गुप्त हितसंबंधांना धोका होण्याचा संशय मनात असला तर अधिकच जास्त लागू होतो ;) :)

ओम शतानन्द's picture

8 Dec 2016 - 12:31 pm | ओम शतानन्द

बरोबर आहे,
ह्या लोकांची वृत्ती अशी असते की स्वत: काही करायचे नाही आणि कोणी दीर्घकालीन चांगल्या परिणामांसाठी बदल करू पाहत असेल तर स्व:चे बुद्धीकौशल्य वापरून जनतेची दिशाभूल आणि बदल करू पाहणार्याचे पाय ओढायचे .

विशुमित's picture

8 Dec 2016 - 12:48 pm | विशुमित

मला वाटते आधार कार्ड च्या वेळेस पण जनतेने असेच समर्थन करायला पाहिजे होते. बुद्धिजीवींनी सामान्य लोकांना मार्गदर्शन करायला हवे होते.
आता पर्यंत सगळी सरकारी अनुदाने प्रत्येकाच्या खात्यावर जमा झाली असती. बँक खाती आपोआप काढली असती लोकांनी आणि जन धन योजनेची गरज पण भासली नसती.

पण नाही ना काँग्रेस होती त्यावेळेस, कसे समर्थन करतील...

(चुकीचे गृहीतक असेल तर जाणकारांनी मार्गदर्शन करावं )

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Dec 2016 - 3:52 pm | हतोळकरांचा प्रसाद

बुद्धिजीवींनी सामान्य लोकांना मार्गदर्शन करायला हवे होते.

हे झाले नाही असं आपण कुठल्या आधारावर म्हणत आहात? कि आपल्याला असं म्हणायचं आहे कि बुद्धिजीवींनी तसं केलं नाही म्हणून आधार कार्ड म्हणावं तितकं यशस्वी होऊ शकलं नाही?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 4:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

बुद्धिजीवींनी सामान्य लोकांना मार्गदर्शन करायला हवे होते.

भारतातले बहुतांश तथाकथित बुद्धिजीवी हातातल्या झेंड्याला आणि स्वतःच्या हितसंबंधाला सोईचे मार्गदर्शन करतात, असा इतिहास आहे, हे काही गुपीत नाही ;) :)

सौन्दर्य's picture

8 Dec 2016 - 5:25 am | सौन्दर्य

विषय चांगला आहे. वर जवळ जवळ ३९५ प्रतिक्रिया आहेत, त्यातील सगळ्या नसल्या तरी खूपशा वाचल्या.

कॅशलेस व्यवहार होण्याने भ्रष्टाचार जरी थांबला नाही तरी अश्या पैशाचा वापर कसा व कुठे करायचा हा प्रश्न उद्भवेलच त्यामुळे भ्रष्टाचारावर थोडाफार अंकुश हा लागणारच.

पण मला पडलेला एक प्रश्न आहे जो मी अश्याच एका पोस्टवर उपस्थित केला होता, ज्यावर फारश्या प्रतिक्रिया किंवा उत्तरे आली नव्हती.

ज्या वेळी एखाद्या गावात जिथे दिवसातले काहीच तास वीज आहे, इंटरनेट नाही किंवा असलेले इंटरनेट फारसे वेगवान नाही, व्यवहार करणारी जनता अशिक्षित आहे अश्या ठिकाणी हे कॅशलेस व्यवहार कसे होणार ? आजही गावातील एखाद्या शेतकर्याच्या बैलगाडीचे चाक दुरुस्त करायचे असेल त्यावेळी तो गावातल्याच एखाद्या लोहाराकडे जातो, आपले काम करून घेतो आणि रोखीने पैसे देतो. ह्या ठिकाणी कॅशलेस व्यवहार कसे होणार ? हाच प्रकार एखाद्या आडवाटेवर असलेल्या हॉटेलबाबत घडू शकतो. जर तेथे वीज, इंटरनेट नसेल तर कॅशलेस व्यवहार कसे होणार ?

मिपाच्या वाचकांनी ह्या बाबतीत काही माहिती दिल्यास आभार.

कॅशलेस होणं हे अंतिम उद्दिष्ट आहे. तिथे पोचेपर्यंत बराच प्रवास करायचा आहे. आत्ताचं हे कदाचित दुसरं किंवा तिसरं पाऊल असावं. पुढे किती पावलं जायला लागेल त्याला किती वेळ लागेल हे नक्की कोणालाच सांगता येणार नाही.

तुम्ही म्हणताय तसं अगदी कोपऱ्यातल्या गावात जिथे अगदीच सगळाच प्रॉब्लेम आहे तिथे शेवटपर्यंत रोख वापरली जाईलच. त्यासाठी नोटा उपलब्ध आहेत. अगदी ३० डिसेंबर पासून १ रुपया ते २००० रुपयांपर्यंत सगळ्या नोटा अवैध ठरणार अशी परिस्थिती नाहीये.

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 10:30 am | संजय क्षीरसागर

सध्या तुम्ही भारतात आहात की परदेशात ?

भरपूर लूज एंडस आहेत सर. त्यात अजुन एक. उत्तर येणार नाही.

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 12:14 pm | संजय क्षीरसागर

इथे कधी एटीएमच्या रांगेत उभे राहिलेत का ? असं मनात आलं, म्हणून विचारलं.

ट्रेड मार्क's picture

8 Dec 2016 - 9:35 pm | ट्रेड मार्क

याचा तसं म्हणलं तर काही संबंध नाही. मी पूर्णपणे भारतीय आहे, भरपूर वर्षे भारतात राहिलेलो आहे. अगदी एटीएम नसल्यापासून बँक सेवा वापरात आहे. एटीएम आल्यावर लाईनीत उभा पण राहिलेलो आहे व एटीएममध्ये पैसे नसण्याचा अनुभव पण घेतला आहे.

खरं तर मी हा प्रश्न विचारायला नको पण तरी तुम्ही मला विचारलाच आहे तर मी पण विचारतो -

तुम्ही कधी परदेशात खूप महिने/ वर्ष राहिला आहात का? नाही म्हणजे तुम्हाला कॅशलेस मधून एकदम फक्त कॅश मध्ये आल्यावर कसं वाटतं याचा अनुभव आहे का एवढंच मनात आलं म्हणून विचारलं.

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 10:54 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला सद्य परिस्थितीची अजिबात झळ पोहोचत नाहीये हे लक्षात आलं.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Dec 2016 - 10:52 am | हतोळकरांचा प्रसाद

वर टाकलेला प्रतिसाद परत एकदा टाकतो - "मला नाही वाटत कि भारत सरकार (कोणत्याही पक्षाचं असो) कधीही पूर्ण कॅशलेससाठी प्रयत्न करेल! कमीतकमी मला तरी "कॅशलेस = कशासाठीही रोख चालणार नाही" असा अर्थ अभिप्रेत नाही तर "कॅशलेस = कशासाठीही रोख नसले तरी चालणार" असा अभिप्रेत आहे."

"सरकार आपण म्हणता ते प्रॉब्लेम्स न सोडवता अचानक एके दिवशी कॅशलेस म्हणजे बाजारातून सगळी रोख रक्कम काढून घेण्याचा निर्णय जाहीर करणार आहे " असा अपप्रचार/बुद्धिभेद करण्याने काय साध्य करायचे असते हे जगजाहीर आहे. आपली सोय होते म्हणून फक्त रोखीने व्यवहार करायचा एवढा एकच हिशेब जमेस धरायचा आणि ते केलेले रोख व्यवहार करप्रणालीत येतात कि नाही हे बघणं वजा करायचं - अजब अर्थशास्त्र आहे. मी कार्डने सामान खरेदी करतो, ऑनलाईन वस्तू खरेदी करतो, पेट्रोल भरतो, जेवणाचे बिल देतो, इतर सर्व बिले भरतो आणि याला चार्ज लागत नाही (या अर्थाने कि मी रोखीत व्यवहार केला असता तर तेवढेच पैसे पडतात) हे कितीही वेळेला सांगितले तर ते असे असूच शकत नाही, चार्जेस छुपे असतील असा महिन्यात काय अर्थ आहे? उलट चार्जेस मला वैयक्तिक पडत नाहीत हे मान्य करून ते कसले कार्ड आहे, असे कार्ड सगळ्यांना घेता येते का आणि येत असेल तर इथे आपण सगळ्यांना ती माहिती पोहोचवणे जास्त संयुक्तिक आणि योग्य नाही का? पण तसे होताना दिसत नाहीये उलट कार्ड वापरणे म्हणजे स्वतःचे २% जास्त देणे हा एकाच हेका दिसत आहे.

तस्मात - म्हणणे एकच आहे - जरी चार्जेस पडत असतील तरी ते कन्विनियन्स चार्जेस आहेत असे मान्य करणार्यांनी कॅशलेस व्यवहार करून लपवालपवी करणाऱ्या व्यावसायिकांना संधी न दिल्याच्या आनंदात रहावे आणि ज्यांना असे कन्विनियन्स चार्जेस म्हणजे आपल्या पैश्यावर डल्ला आहे असे वाटते त्यांनी रोखीने व्यवहार करावा. उगाच नोटबंदीमुळे झालेल्या तात्पुरत्या चलनतुटवड्याला जमेस धरून सरकार जबरदस्ती करतेय वगैरे म्हणणे हा शुद्ध राजकारणी डाव आहे असे मला वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

आणि प्रसंगी, सोईचे असेल तेव्हा, हेच लोक "भारतातली सिस्टीमच लैच खराब अशी चर्चा करायला" सर्वात पुढे असतील आणि स्वीडन कसा कॅशलेस होऊ घातलाय याचे मनसोक्त गुणगान गातील. विनोदी वाटले तरी खरे तर हे वाक्य खूप दुर्दैवी आहे. :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 12:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

जगात कोठेही, या संबंधात सर्वात पुढे असलेल्या स्वीडनमध्येही, १००% कॅशलेसचा आग्रह नाही. शब्दशः अगदी अचूक शब्दप्रयोग "लेस कॅश" असा आहे.

ज्या वेळी एखाद्या गावात जिथे दिवसातले काहीच तास वीज आहे, इंटरनेट नाही किंवा असलेले इंटरनेट फारसे वेगवान नाही, व्यवहार करणारी जनता अशिक्षित आहे अश्या ठिकाणी हे कॅशलेस व्यवहार कसे होणार ?

जेथे अशी अवस्था आहे तेथे फार मोठे कॅशचे व्यवहार होणे जरा कठीणच आहे नाही का ? कालच रिझर्व बँकेनेही "रु२००० च्या खालचे व्यवहार कॅशने करण्यात हरकत नाही असे "टीव्ही९ मराठी" या वाहिनीने बातम्यात सांगितले आहे.

जसे पेपरलेस म्हणजे व्यवहारात कमीत कमी कागदाचा वापर उर्फ "लेस पेपर" अस्ते, तसाच कॅशलेस हा शब्द व्यवहारात वापरला जातो, आणि प्रसंगी चतुर लोक त्याचा स्वतःचा विपर्यासी मुद्दा पुढे ढकलायला उपयोग करतात. तेव्हा काळजी नसावी.

मार्मिक गोडसे's picture

8 Dec 2016 - 8:19 pm | मार्मिक गोडसे

जेथे अशी अवस्था आहे तेथे फार मोठे कॅशचे व्यवहार होणे जरा कठीणच आहे नाही का ? कालच रिझर्व बँकेनेही "रु२००० च्या खालचे व्यवहार कॅशने करण्यात हरकत नाही असे "टीव्ही९ मराठी" या वाहिनीने बातम्यात सांगितले आहे.

२००० हजारात बियाणे, खते, फवारणी औषधे मिळतात का हो ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

अगोदर न केलेल्या अनेक गोष्टी आधुनिक शेतकर्‍यांनी अंगीकाराव्यात व स्वतःची प्रगती करून घ्यावी याला तुमचा विरोध नसावा.

२००० वरचे व्यवहार शेतकर्‍यांनी चेक, कार्ड, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून वापरायला हरकत नाही... ते ट्रॅक्टर, बुलेट किंवा चारचाकी चालविण्यापेक्षा जास्त सोपे किंवा अगदी सायकल चालवण्याइतके सोपे असतात... हे तुम्हाला मान्य व्हायला हरकत नसावी.

मार्मिक गोडसे's picture

8 Dec 2016 - 9:04 pm | मार्मिक गोडसे

२००० वरचे व्यवहार शेतकर्‍यांनी चेक, कार्ड, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून वापरायला हरकत नाही..

हे सर्व वापरण्यासाठी त्या भागात तशा सुविधा नसतील तर ?

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Dec 2016 - 9:22 pm | हतोळकरांचा प्रसाद

सुविधा नसतील तर आता जसं करतात रोखीमध्ये तसं करावं!

अवांतर : १. सरकार ३१ नंतरही रोख पैसा पुरवू शकलं नाही तर त्यांना तेव्हा धारेवर धरता येईल, आताच त्या गृहिताकावर चर्चा करण्यात काहीच फायदा नाही. २. जर सरकार गावोगावी बँकेशी निगडित सुविधा पुरवू शकत नसेल तर सरकारला त्याबद्दलही धारेवर धरून सुविधा पुरविण्यास भाग पाडले गेले पाहिजे.

मार्मिक गोडसे's picture

8 Dec 2016 - 10:02 pm | मार्मिक गोडसे

२००० वरचे व्यवहार शेतकर्‍यांनी चेक, कार्ड, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून वापरायला हरकत नाही... ते ट्रॅक्टर, बुलेट किंवा चारचाकी चालविण्यापेक्षा जास्त सोपे किंवा अगदी सायकल चालवण्याइतके सोपे असतात... हे तुम्हाला मान्य व्हायला हरकत नसावी.

हे विनोदाने लिहिले का? कॅशलेसचा वापर आणि वाहनांचा वापर काही फरक आहे की नाही? अती व्हा.अ‍ॅ. च्या आहारी गेल्याची लक्षणे आहेत ही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

हेच काही महिन्यांपर्यंत स्मार्टफोनबद्दल बोलले जात होते आणि त्यापूर्वी अनेकदा वेळोवेळी आलेल्या नवीन टेक्नॉलॉजीबद्दल बोलले गेले आहे. तेव्हा शुभेच्छा !

कोणत्याही तज्ज्ञांच्या किंवा शंकेखोरांच्या अंदाजापेक्षा जास्त वेगाने जनता नवीन टेक्नॉलॉजीचा स्वीकार करते, हे जगभर वारंवार सिद्ध झालेले सत्य आहे ! तेव्हा आपल्या शेतकरी बंधूंच्या बौद्धीक कुवतीवर अविश्वास दाखविण्याची चूक करू नका. खेडेगावातून येऊन जगात झेंडा फडकवणार्‍या लोकांची उदाहरणे फार कमी नाहीत. आजही खेड्यांतले अनेक जण तुमच्या-माझ्यापेक्षा जास्त वरच्या जागांवर नाहीत याचे कारण बुद्धीमत्तेतला फरक हे नाही तर त्यांना तुमच्या-माझ्यासारखी शिक्षणाची व इतर संधी मिळाली नाही हेच आहे.

मी कोणताच झेंडा हातात न घेतल्याने चांगल्या गोष्टीला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणायला मला काहीच हरकत वाटत नाही. सद्याच्या सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी कारवायांची साखळी देश योग्य दिशेने पुढे नेईल असे मला वाटते व त्यात एक सजग नागरीक या नात्याने माझे शक्य ते योगदान द्यावे या मताचा मी आहे. उद्या याच (किंवा इतर कोणत्याही) सरकारने काही वाईट केले तर त्याला वाईट व चंगले केले तर त्याला चांगले म्हणायला मी विलंब करणार नाही.

तुम्हाला, "जगात काही बदल घडणे शक्य नाही" आणि सर्वात महत्वाचे "सद्य सरकार काहीच चांगले करू शकणार नाही" असे ठरवलेच आहे असे दिसते, कारण ते साधण्यासाठी एक मुद्दा निकालात निघाला की विषय बदलून तुम्ही सतत गोलपोस्ट बदलत आहात. एक चलाख चाल म्हणून ते ठीक असले तरी त्यामुळे पुढे कितीही चर्चा केली तरी ती निष्फळच ठरणार आहे, नाही का ?

तेव्हा, काही काळ वाट पाहू आणि ठरवू कोणाचा अंदाज बरोबर आहे ते ! त्याला फार काळ लागणार नाही. भारतीय अर्थकारणात या कारवाईचे सकारात्मक दृष्य बदल दिसायला तीन ते चार तीमाही (९ ते १२ महिने) लागतील. त्यावेळी, तुम्ही आम्ही इथे असूच विष्लेशण करायला.

तेव्हा काही वेगळा खरा मुद्दा पुढे आला तर बोलू अन्यथा, लेट्स वेट अँड वॉच. धन्यवाद !

मार्मिक गोडसे's picture

8 Dec 2016 - 11:39 pm | मार्मिक गोडसे

थोडावेळ पुर्वग्रह बाजूला ठेवा आणि माझे प्रतिसात पुन्हा एकदा नीट वाचा. मी कुठेही खेड्यातेल जनतेच्या बौद्धीक कुवतीवर अविश्वास दाखविलेला नाही. ज्या भागात विजेची खात्री नाही इंटरनेट नाही अशा भागातील जनता २००० च्या वरील खरेदी कोठलेही कार्ड वापरून कशी करू शकेल असे मी विचारले होते. जेथे अशी अवस्था आहे तेथे फार मोठे कॅशचे व्यवहार होणे जरा कठीणच आहे नाही का ? असे तुमचे म्हणणे होते.

पुढे तुम्ही म्हणता,

२००० वरचे व्यवहार शेतकर्‍यांनी चेक, कार्ड, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून वापरायला हरकत नाही... ते ट्रॅक्टर, बुलेट किंवा चारचाकी चालविण्यापेक्षा जास्त सोपे किंवा अगदी सायकल चालवण्याइतके सोपे असतात... हे तुम्हाला मान्य व्हायला हरकत नसावी.

ट्रॅक्टर, बुलेट किंवा चारचाकी चालवायला विज किंवा इंटरनेट लागते का? कार्ड आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनला विज व इंटरनेट लागते, हे सध्या ज्या भागात नाही अशा जनतेला असे सल्ले देणे चुकीचे वाटते..

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या मनातली समस्या सोडवायला सरकारने अगोदरच खालील सुरुवात केलेली आहे. अजून नवीन काही उपाय पाईपलाईनमध्ये असतीलच.

Rupay Kisan Cards for farmers

The Government through NABARD will also support Rural Regional Banks and Cooperative Banks to issue “Rupay Kisan Cards” to 4.32 crore Kisan Credit Card holders to enable them to make digital transactions at POS machines/Micro ATMs/ATMs.

दुवा : http://timesofindia.indiatimes.com/Governments-digital-push-Top-11-incen...

मार्मिक गोडसे's picture

8 Dec 2016 - 10:16 pm | मार्मिक गोडसे

वीज आणि नेट लागते त्याचे काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 10:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

बँका, पाण्याचे पंप, मोबाईल फोन हवेवर चालतात का ? असे म्हटले तर राग येईल, पण तुमचा वितंडवाद प्रमाणाबाहेर गेला आहे.

खालच्या कायप्पावरच्या विनोदाला तुम्ही सिद्ध करत आहात =))

मार्मिक गोडसे's picture

8 Dec 2016 - 11:57 pm | मार्मिक गोडसे

बँका, पाण्याचे पंप, मोबाईल फोन हवेवर चालतात का ? असे म्हटले तर राग येईल,

अजिबात नाही. किव येते तुमची असे फालतू प्रश्न विचारता म्हणून. बियाणे, औषधे, खतं बँकेत मिळतात का? जिकडे मिळतात तेथे विज व नेट नसते, कुठे कार्ड घासणार? बर्‍याच ठिकाणी दिवसा १२-१२. तास विज नसते, रात्री शेतात पाणी भरायला लागते. मोबाईलही तेव्हाच चार्ज करावे लागतात.

संदीप डांगे's picture

9 Dec 2016 - 2:20 am | संदीप डांगे

मार्मिक,

मला वाटते की काही दिवसांसाठी वाद थांबवावा. इथे आपण जे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहात त्याला सिद्ध करायला तुम्ही पुरावे देऊ शकणार नाही. दिले तरी ते मान्य होणार नाहीत. जे लोक अडचणींतून जातायत ते इथे प्रतिसाद द्यायला येणार नाहीत, आले तरी त्यांना ओवरस्मार्टगिरी दाखवून त्यांच्या अडचणी ह्या अडचणी नसून चोचले - खोटारडेपणा आहे असे म्हटले जाईल. इथे मिसळपाववर गोरगरिबांच्या-अडल्यानडल्यांच्या वतीने बोलून उपयोग नाही व गरज तर अजिबातच नाही. इथले प्रतिसाद वाचून सरकारातली मंडळी देशाची ध्येयधोरणं ठरवत नसावी. हे मी उद्वेगातून म्हणतोय असे नव्हे तर गेल्या चार दिवसात शांत राहून विचार केला आहे. म्हणून ह्या विषयासंबंधी सर्व धाग्यांवर वाचनमात्र राहायचे ठरवले आहे. पण तुम्हा दोघांच्या प्रतिसादाची दिशा बघून ह्या धाग्यावर हा शेवटचा प्रतिसाद देतो आहे.

मे २०१६ ते ऑक्टोबर २०१६ ह्या सहा महिन्यातला सर्व काळ (२४ बाय ७) मी शेतकर्‍यांसोबत काम केले आहे. तेही एका गावातल्या नव्हे तर नाशिक, नगर, पुणे ह्या तीन्ही जिल्ह्यातल्या सुमारे १६ तालुक्यांतल्या अनेक गावांमधल्या. यात अनेक कोट्याधिश ते कफल्लक असे सर्व प्रकारचे शेतकरी बघितले. शेतकर्‍यांपासून मागे जाणारी व पुढे जाणारी सर्व सप्लाय चेन बघितली. बीयाणे, औषधे, अवजारे, मोटारगाड्या, पंप, वीजपुरवठा, मोबाईल-रेंज, बॅन्कांची उपलब्धता, होणारे व्यवहार हे सर्व ८ नोव्हेंबरचा तमाशा सुरु व्हायच्या आधीच बघितले होते. (सुदैवाने ५ नोव्हेंबरपासून ते काम सोडले आणि नाशिकमधे परत आलो)

आपल्या नागरी व्यवस्थेमधे अनेक स्तर आहेत. प्रत्येक स्तर हा दुसर्‍यापेक्षा भयंकर वेगळा, मध्यम वेगळा, किंचित वेगळा ह्या प्रकारात दिसतो. ह्यातल्या कोणत्याही स्तरातल्या व्यक्तिला दुसर्‍याच्या स्थितीकडे दुरुन डोंगर साजरे ह्या उक्तीनुसार बघावे लागते. मजा आणि त्रास हे प्रत्येक स्तरातल्या त्या त्या स्थितीप्रमाणे त्या त्या व्यक्तिला मिळतातच. त्याची तुलना होऊ शकत नसते. त्यामुळे दुसर्‍याची स्थिती प्रत्यक्ष भोगल्याशिवाय, बघितल्याशिवाय समजत नाही हे मागच्या सहा महिन्यात मला कळलेलं आहे. दोन जिल्ह्यातली, दोन शहरातली, दोन गावातली, दोन वस्तीतली, इतकंच काय तर अगदी आजूबाजूला शेत असलेल्या दोन शेतकर्‍यांचीही परिस्थिती जमीन-आसमान असते. जजमेंटल होण्यात अर्थ नाही.

म्हात्रे सर व तुमच्या, दोघांच्याही मुद्द्यात अर्धसत्य आहे. ते पूर्ण चुकीचे किंवा पूर्ण बरोबर नाही. आता कोण कोणत्या अ‍ॅन्गलने बघतो इतकंच तिथे बाकी राहतंय.

ग्रामीण अर्थव्यवस्था (म्हणजे व्यवहाराची पद्धत) शहरी भागापेक्षा कैक बाबतीत वेगळी पडते. तिथे अनेक समस्या आहेत. (त्या समस्या आहेत म्हटले की ७० वर्ष पुढे केली जातात, पण नवीन धक्काव्यवस्था आणतांना सत्य लक्षातच घ्यायचे नाही का हा प्रश्न मला सतत पडत आहे.) पण अनेक सुविधाही आहेत हे सत्यही नाकारले जाऊ शकत नाही. (म्हणजे सत्तर वर्ष झाले तरी सर्वत्र बैलगाड्याच चालू आहेत असे दिसत नाही)

बी बीयाणे औषधे घ्यायला शेतकरी जवळच्या दुकानात जातात. हे जवळचे दुकान १ किमी पासून २०-२५ किमी इतके असू शकते. (ह्यापेक्षाही जास्त दूर असू शकते, पण ती थोडीशी दुर्मिळ बाब आहे, असत्य नव्हे) तर मोठ्या गावात, तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी अत्याधुनिक व्यवस्था असलेली दुकाने आहेत तशीच अगदी टपरीवजा चालणारी दुकानेही आहेत. संगणकिकृत बील मिळते, हे संगणक थेट इन्टरनेटशी जोडलेले असतात, दुकानदार थेट नेटबॅन्किंगही करतात, किंवा बॅन्केत जाऊन आरटीजीएस सुविधांचा वापर करुन कंपन्यांना पेमेंट करतात. काही दुकानदार कच्च्या चिठ्ठ्या लिहून पावती देतात. पण दुकान कसेही असो, शेतकर्‍यांकडून बीलाचे पैसे घेतांना ९९% केसेस मधे 'रोखच' घेतली जाते हे माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार बघितले आहे. अगदी मोठी बीले जी वार्षिक चुकवली जातात - जसे की डाळींब, द्राक्ष, यांचे उत्पादक-शेतकरी - ती चेकने चुकवली जात असावीत असा अंदाज आहे. देणेकर्‍यांने उधार बुडवू नये म्हणून आजकाल दुकानदार संघटना उधारखाते सुरु करण्याआधी अनामत किंवा ब्लॅन्क चेक ठेवून घेते.

नक्की प्रमाण सांगता येणार नाही पण उधार व रोख हे दोन्ही प्रकार दुकानात मजबूत चालतात. बियाणे व खते ह्यासाठी आगावू रोख मोजावी लागते तर वेळोवेळी लागणारी औषधे, दुय्यम खते ह्यासाठी साधारणपणे उधारी दिली जाते. बियाणे व खते ह्यांच्यासाठी दुकानदारालाही आगावू रक्कम भरली तरच माल दुकानात पोचतो. साधारण सर्वांना मार्चाखेर उधारखाती चुकवावी लागतात. शेतकरी पिक विकले जाईल तसे पैसे फेडत जातो.

जिथे पिके थोड्या काळाची व नगदी चटकन पैसा देणारी जास्त प्रमाणात होतात तिथे रोख वर जास्त भर आहे तर जिथे जास्त काळ चालणारी व घुमून फिरुन पैसा देणारी पिके आहेत तिथे उधारी जास्त होते.

तर ह्या व्यवस्थेत मुद्दा आहे की शेतकर्‍याला मोबाईल-कार्ड-चेक वापरुन व्यवहार शक्य आहेत का?

ह्याचे उत्तर नरो वा कुंजरोवा असेच देता येईल. शक्य ही आहेत आणि नाही सुद्धा. सर्वात महत्त्वाची ती सुविधा व क्षमता. काही गोष्टी समर्थक व विरोधक दोन्ही पक्षांनी डोळे उघडे ठेवून पूर्वग्रह बाजूला ठेवून समजून घेतल्याच पाहिजेत. ही आताची चालू परिस्थिती आहे, भविष्यात काय होईल याबद्दल अटकळी बांधणे तूर्तास दोन्ही पक्षांनी सोडले पाहिजे. बॅन्कांचे जाळे पुरेसे नाही, रेंज नाही, साक्षरता नाही, वीज नाही, ह्या गोष्टी आहेतही आणि नाहीपण.

मुख्य गावापासून सुमारे २५-५० किमी दूर असलेल्या गावांमधे लाखोची उलाढाल होत नाही हे सत्य नव्हे. फक्त ती रोज रोज होत नाही हेही सत्य आहे. अशा दुरच्या गावातल्या लोकांना सामान आणायला मुख्य जवळच्या गावात जावे लागते जिथे बॅन्का, रेंज, वीज, सगळं असतं. तिथे ते व्यवहार मोबाईल, कार्डने करु शकतात. गावातल्या गावातले व्यवहार छोट्या रकमेचे रेंज वीज वगैरे असेल तर शक्य आहे किंवा नाही. हे बायनरी आहे. तिथे कॅश लागेल व लोक कॅशच वापरतील. तेव्हा तो कॅशलेसचा बाऊ करण्यात अर्थ नाही असे समर्थक लोक म्हणत आहेत. पण ही भविष्यातली नाही तर आत्ता करंट सिचुएशन बघून म्हणणे योग्य आहे काय हे तपासावे लागेल. बॅन्का तयार नसतांना अचानक हजार स्वाईप मशिनची गरज त्या एखाद्या गावात कशी ताबडतोब पुरवू शकतील? त्यासोबत अचानक लाखभर खातेधारकांना कार्ड-मोबाईल बॅन्किंग शिकवणे कसे शक्य होईल? असे अनेक प्रश्न एका रात्रीतून अचानक सुटतील असे मानणारे इथे कुणी असतील असे वाटत तर नाही. असतील तर गांजाचा अंमल पुरेपुर चढलाय असं समजूया. ठिक आहे, थोडा वेळ लागेल, मग तोवर काय करायचं? उधारी करायची, अमुक तमुक करायचं. किती काळ? महिना, दोन महिने, तीन महिने? सतत नकारात्मक का बोलता असं अनेक जणं इथं विचारतील. 'नुसतं' सकारात्मक 'बोलून'ही उपयोग नाही किंवा जग कुठे चाललंय असं कुत्सितपणे बोलुन अमेझॉन-गो च्या कल्पनेचा (प्रोटोटाईप-कन्सेप्ट) विडियो टाकून उपयोग नाही. ते जग प्रत्यक्षात असेल आणि मग कुणी तक्रार करत असेल तर त्याला जोड्याने मारण्यालायकच समजले पाहिजे. सरकार आता पूर्ण १४ लाख कोटीची करन्सी आणणार नाहीच असे दिसते आहे, म्हणजे लेसकॅश हे वास्तव असणार. आता मी गेला महिनाभर नाशकातच आहे, बाहेर कुठेही गेलो नाहीये, त्यामुळे इतर ठिकाणी नक्की काय स्थिती आहे ह्यावर मत देणं उचित नाही. पण एवढं इमॅजिन करु शकतो की बॅन्क-चेक-कार्ड-मोबाइल-रेंजही नाही आणि रोख पैसाही नाही (देशभरातले ३५% एटीएम चालू आहेत - जे अल्पावधीत कॅशलेस होतात) अशा अवस्थेत काय सकारात्मक विचार करता येईल-बोलता येईल. परंतु अशा अवस्थेतल्या लोकांना प्रत्यक्ष भेटल्या-बोलल्याशिवाय नक्की काय परिस्थिती आहे ह्याबद्दल सकारात्मक-वा-नकारात्मक बोलणे योग्य ठरणार नाही.


चेकद्वारे मोठ्या आकड्यांचे व्यवहार.
मोठ्या आकड्यांचे व्यवहार चेकद्वारेच होत असतात. पण दोन-तीन लाख पर्यंत रकमा साधारण हाताळल्याच जातात. दुसरं असे की व्यापार्‍याने चेक देऊन फसवण्याचे प्रकार घडू शकतात म्हणून चेक-आधारित व्यवस्थेवर विश्वास कमी आहे. (त्याचेही अनुभव ह्या सहा महिन्यात दिसलेच आहेत) चेक बाउन्स झाला तर कोर्टकज्जेगिरि करत बसणे परवडत नाही (ह्यात सरकार काय मदत करु शकणार ते माहित नाही). काही चेक क्लिअर व्हायला १५ दिवस लागलेले हा माझा स्वतःचा अनुभव आहे. घोडेगावात एका लोकल बॅन्केचा इशु केलेला चेक चाळीस किमी दूर नारायणगावात आणून भरावा लागतो कारण ती दुसरी प्रायवेट बॅन्क घोडेगावात नाही. तिथून ती प्रा. बॅन्क पुण्याला (लो बॅन्क सोबत टाय-अप असलेल्या प्रा. बॅन्केला) चेक कुरियर करते. सर्व तपासून तो चेक ती प्रा. बॅन्क तो चेक घोडेगावला कुरियर करते. असे बरेच झोल होतात व १२-१५ दिवसांनी चेक पास होतो व अकाउंटला पैसे शो करतात. (कुणाला विश्वास नसेल तर व्य नि करा. बॅन्केचे नाव व नंबर देतो स्वतः चौकशी करुन खात्री करु शकता.) शेतकरी इतके दिवस नाही थांबू शकत, शेतातलं पीक नाही थांबू शकत, मजूर नाही थांबू शकत, गाडीभाड्यावाला आणि असे अनेक देणेकरी नाही थांबू शकत. गावाखेड्यांमधले व्यवहार असे रेंगाळले तर जीडीपी नक्कीच गटांगळ्या खाईल. दोन चार दिवसांची म्हणून ही अडचण रेटत रेटत लोकांनी महिनाभर काढली. आता पुढे अजून किती शक्य आहे ते कळेलच व त्याचा परिणामही येत्या सहा महिन्यात कळेलच.

असे लॉन्ग-रुट-चेक-क्लिअरिंग सारखे अनेक प्रश्न असतात, आहेत जे आपण इथे लॅपटॉप समोर बसून टिकटिक करत नाही इमॅजिन करु शकत. कुणी मांडले तर त्यावर शहाजोगी ओवरस्मार्टगीरी दाखवणे इतकेच सद्यस्थितीत आपल्या हातात असते. समस्यांवर उपाय आपल्याला दिसतात की अरे हा उपाय आहे, तो उपाय आहे, अमकं करु शकतात, तमकं करु शकतात. हे बोलणे सोपे आहे पण अचानक हातावर न चालता पायावर चालायला लावण्याचा अट्टाहास चुकीचा आहे. कॅशलेस व्यवहारांना माझा विरोध नाही, कधीच नव्हता फक्त अपुरी व्यवस्था असतांना व जनमानसाला काहीच पूर्वसूचना न देता धाडकन तीव्र नोटाटंचाई लादणे व त्याला कॅशलेसचे गोंडस नाव देणे पटलेले नाही. (नोटाबदल आणि बाकीचा सर्व सावळा गोंधळ ह्यावर आता काहीही बोलणे उपयुक्त राहिलेले नाही)

असो.

ह्या सर्व चर्चांमधे एक प्रकारचा प्रचंड मोठा गॅप आला आहे. खूप खोल व लांब दरी आहे. एकाचे बोलणे दुसर्‍याला ऐकु जात नाहीये. त्यामुळे काही काळ गप्प राहिलेलेच बरे असे मला वाटत आहे. कोणीही कोंबडं झाकलं आणि कोणीही बांग दिली तरी सूर्य उगवायचा राहणार नाही व तो कोणत्या दिशेला उगवेल हे समर्थक-विरोधकांना दिसणारच आहे. इथे व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप-अपमान-धुरळा उडवून जमीनी समस्यांवर कोणतीही उपाययोजना होणार नाही. शहरी भागातल्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या गरजेपुरती माहिती मिळाल्याचा उपयोग सोडता सर्व चर्चांचे फलित मला तरी शून्य दिसत आहे.

परत असो.

माझ्यातर्फे विराम. धन्यवाद!

अर्धवटराव's picture

9 Dec 2016 - 2:27 am | अर्धवटराव

हा प्रतिसाद एक नवीन काथ्याकुट म्हणुन आण मिपावर. नजीकच्या काळात या अँगलने चर्चा करणे उत्तम होईल.

सही रे सई's picture

9 Dec 2016 - 2:38 am | सही रे सई

+१११

खरचं याचा वेगळा धागा काढा संदिप भाउ.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2016 - 3:18 am | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम माहितीपूर्ण प्रतिसाद, डांगेसाहेब !

अशी माहिती ही पहिली मजबूत व वास्तव पायरी आहे. आता हे जमिनी ज्ञान वापरून लोकांना काय व कशी मदत करता येईल? स्थानिक स्तरावर काय उपयोगी पडेल आणि काय नाही? यात आमच्यासारखे शहरी लोक काही सकारात्मक वाटा उचलू शकतील काय? यावर एक धागा काढा.

हे एक खूप सकारात्मक काम होइल. ते कराच अशी आग्रहाची विनंती आहे.

मोदक's picture

9 Dec 2016 - 1:42 pm | मोदक

संदिप डांगे,

बाकी प्रतिसादावर वेगळा धागा काढून चर्चा सुरू आहे म्हणून प्रतिसादामध्ये राहिलेल्या भागाचा येथेच प्रतिवाद करतो.

इथे आपण जे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहात त्याला सिद्ध करायला तुम्ही पुरावे देऊ शकणार नाही. दिले तरी ते मान्य होणार नाहीत.

मिसळपावर दिले गेलेले लॉजिकल पुरावे अमान्य कोणी केले आहेत हे जरा समजावून सांगा आणि शक्य असेल तर त्याच्या लिंका द्या.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वांचीच अडचण होत आहे हे सूर्यप्रकाशाइतके उघड आहे. तसेच अंमलबजावणीमध्ये सुधारणा आवश्यक आहेत हे ही येथे दोन्ही बाजूंनी मान्य केले आहे. अर्थात या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत. कारण "गोपनीयता हा मुख्य मुद्दा असल्याने अडचणी होणारच" हे गृहीतक मान्य नसल्याने मतभेद उद्भवत आहेत हे माझे वैयक्तीक मत - यावर कोणाचे अन्य काही मत असल्यास वाचायला आवडेल.

जे लोक अडचणींतून जातायत ते इथे प्रतिसाद द्यायला येणार नाहीत, आले तरी त्यांना ओवरस्मार्टगिरी दाखवून त्यांच्या अडचणी ह्या अडचणी नसून चोचले - खोटारडेपणा आहे असे म्हटले जाईल.

पुन्हा वरचा प्रतिसाद वाचा आणि सरसकटीकरण करून आरोप करणे टाळा.

इथे मिसळपाववर गोरगरिबांच्या-अडल्यानडल्यांच्या वतीने बोलून उपयोग नाही व गरज तर अजिबातच नाही.

येथे कोणाचा कैवार घेऊन बोलण्याची गरज आहे की नाही हा तुमचा वैयक्तीक प्रश्न आहे. मात्र..
"मिसळपाव वर गोरगरिबांच्या-अडल्यानडल्यांच्या वतीने बोलून उपयोग नाही" हे वाक्य कशासाठी लिहिले आहे..? अनेक क्षेत्रात नडलेल्या लोकांच्या मदतीला अनेक मिपाकर जात असतात आणि यथाशक्ती मदतही करत असतात. मग हे सरसकटीकरण कशासाठी..?

"आपण येथे व्यक्त होत असताना संस्थळाचा आणि सदस्यांचा अपमान करत आहोत का..?" याचेही भान राखावे ही नम्र सूचना.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2016 - 2:58 am | डॉ सुहास म्हात्रे

एसेमेसवरून ट्रँझॅक्शन करता येणार्‍या npci च्या *99# Service

याबद्दल पैसाताईंनी अगोदरच लिहीले आहे. त्यासाठी स्मार्टफोनची गरज नसते. साधा टेक्स्टबेस्ड फोन पुरेसा असतो.

शेतकर्यांची खरी काळजी असलेली व्यक्ती असे उपाय शोधेल व मिळाले की लक्षात ठेवेल व ते शिकून शेतकरी शक्य तेवढा आत्मनिर्भर होईल असे बघेल. ज्याला केवळ शेतकर्यामागे लपून केवळ विरोधच करायचा असेल तर तो अश्या पर्यायांकडे दुर्लक्ष करून फाटे फोडून विरोधच करत राहील.

असो. इतरांनी नाही केली तरी शेतकर्यांची काळजी सरकारला करायला लागेलच आणि नवे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत अश्या विरोधाच्या उपस्थितीतही पोचवावे लागेलच.

अनेक आयटी कंपन्या सद्य स्थितीवर मात करणारे नवनवीन तंत्रज्ञान वापरात आणायला सज्ज झाल्यात. कारण त्यांना हे जेवढे आव्हान आहे तितकीच व्यापारी संधीही आहे.

पुढच्या काही दिवसांत शंकासुरांपेक्षा, आहे त्या स्थितीत उपयोगी पडतील असे उपाय देणार्‍या लोकांचा प्रभाव वाढलेला दिसला तर आश्चर्य वाटणार नाही.

असो. शुभरात्री.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

जो इथे काही चर्चा ज्या प्रकारे होत आहे तिला कायप्पावर फिरणारा एक विनोद एकदम फिट्ट आहे. तो इथे देण्याचा मोह झाला आहे...

A Demonetisation Death Story !

Reporter: Sir, a 23 year old boy died as he was run over by a train while walking on the railway track with headphones.
Editor: OK, good, report it as a case of suicide due to lack of money after Demonetisation.

Reporter: But Sir, there was money in his valet. They found over 10,000 rupees.
Editor: OK, in that case report it as suicide due to his inability to get change to eat food.

Reporter: But Sir, he had many 50 and 100 rupee notes in his valet.
Editor: Hmmm, then report that he was in ATM queue for 6 hours without food and lost consciousness on railway track.

Reporter: But Sir, this happened early in the morning. There are no ATMs near railway track.
Editor: Then you can say, he was pushed on the railway track by people who didn't have money after Demonetisation.

Reporter: No Sir, there was nobody anywhere near him when he died.
Editor: You're too stubborn. Why don't you report it as suicide because he lost all his savings due to Demonetisation ?

Reporter: But Sir, he is a 23 year old student. He's still in college doing his Masters.
Editor: Oh, in that case we can report it as a case of inability to pay fees due to Demonetisation.

Reporter: How's that possible Sir ? He had enough money with him...
Editor (Cutting him off): That you can say, was needed for his hostel and daily food.

Reporter: But Sir, he stays at home with family and his house is located close to the place where the accident occurred.
Editor: I don't know. Do what you want, but you MUST report it as a Demonetisation Death.

Reporter: Sir, isn't that wrong and unethical ? There is absolutely no connection to his death and Demonetisation.
Editor: My media is sustained by this reporting. You must connect it. Else I won't have money to pay your salary.

The Reporter reported:

23 year old youth run over by a train while watching Modi's Demonetisation speech on his mobile !

This is real status of #Presstitutes.

हा सगळा काळा विनोद वाटेल, पण वास्तवात दुर्दैवाने तसे घडत आहे. :(

म्हात्रे सर तुमच्या ज्ञानाचा पूर्ण आदर राखून, तुम्ही सुद्दा असल्या फेसबुकी आपटी बॉम्बची भलामण करता आहेत याचा खेद वाटतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 2:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय करणार ? सत्य लिखितापेक्षा जास्त विचित्र असते हे आजूबाजूला वारंवार दिसत आहे ! कलियुग, दुसरे काय :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

सरकार आता छोट्या ट्रान्झॅक्शनमध्ये असल्यानसलेल्या २% चार्ज विरोधातली हवा काढून घेणार आहे =))

Govt to waive service tax on card transactions up to Rs 2,000

२०१२ चे सर्विस टॅक्स नोटिफिकेशनमध्ये वरचा बदल करण्यासाठी सरकार लोकसभेत दुरुस्ती नोटीफिकेशन दाखल करणार आहे.

याच बातमीत पुढे लिहिले आहे...

The government has been taking steps to promote cashless or digital transactions to take India towards a less-cash economy.

या वाक्यातल्या cashless or digital transactionsless-cash economy या शब्दप्रयोगांतील फरक (जर अगोदर खरोखरच समजला नसेल तर), स्वतःचा गैरसमज टाळण्यासाठी व दुसर्‍यांचा गैरसमज न करण्यासाठी समजून घेण्याची, समजून घेणे जरूर आहे.

तो फरक समजला नसल्यास, तो इस्काटून असा आहे...

१. कोणतेही बँक / कार्ड / ऑनलाईन इ प्रकार वापरून केलेला पैशांचा व्यवहार, "कॅश-लेस ट्रान्झॅक्शन" असते.

२. शक्यतो सर्व (सर्व नव्हे) कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स असणारी अर्थव्यवस्था, "लेस-कॅश अर्थव्यवस्था" असते.

पूर्णविराम (पक्षी : पिरियड) !

मी २८ नोव्हेंबरला जे म्हणालो होतो ते बरोबर आहे का मग..?

मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54
सरकार असे मार्ग वापरणार्‍याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.

पैसा's picture

8 Dec 2016 - 2:03 pm | पैसा

एसेमेसवरून ट्रँझॅक्शन करता येणार्‍या npci च्या *99# Service साठीचे एसेमेस चार्जेस सध्या ३१ जानेवारीपर्यंत रद्द केले आहेत. एसेमेस लिहिताना गोंधळ किंवा चुका होऊ नयेत म्हणून बहुतेक बँकानी *99# अ‍ॅप्स आणली आहेत. मी काल वापरले. उत्तम चालत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 2:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतर ठिकाणी लिहिले होते, ते परत...

ही तात्कालीक सबसिडी असू शकेल. कोणत्याही प्रगल्भ अर्थव्यवस्थेत सबसिडी तात्कालीक उपायच असायला हवी, सततचे दुखणे असू नये.

प्रणाली व्यवहारात रुजली व ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण खूप वाढले (क्रिटीकल मास तयार झाले) की, त्यांच्यासाठी लागणार्‍या संसाधनांचा खर्च त्याच प्रमाणात वाढत नसल्याने, दर व्यवहारामागचा खर्च कमी कमी होत जातो (इकॉनॉमी ऑफ स्केल). तो लक्षणिय प्रमाणात कमी झाला की विक्रेत्याला तो व्यवसाय/मार्केटिंग खर्चात सामावून घेणे तोट्याचे वाटत नाही. याशिवाय, विक्रेत्या-विक्रेत्यांमधिल स्पर्धाही त्यांना तसे करण्यास भाग पाडते. याचा परिणाम म्हणुन त्या खर्चाचा भार ग्राहकावर पडणे कमी होते किंवा पूर्णपणे थांबते.

म्हणजे, आता सरकार ऑनलाईन प्रणालीला धक्का देत आहे, तिने वेग पकडल्यावर सरकारच्या हस्तक्षेपाची (सबसिडी) गरज राहणार नाही.

सॉरी हां सर.. मी लिंक उघडून बघितली नाहीये.

या विषयावर गेल्या महिन्याभरात इतके काही वाचले आहे की आता आणखी काही वाचायची इच्छा नाही. त्यामुळे सध्या नुसते प्रतिसाद वाचतो आहे.

तसेच फुलटॉस स्टेडीयमबाहेर भिरकावण्याचाही कंटाळा आला आहे ;)

अप्पा जोगळेकर's picture

8 Dec 2016 - 3:37 pm | अप्पा जोगळेकर

तसेच फुलटॉस स्टेडीयमबाहेर भिरकावण्याचाही कंटाळा आला आहे
माई मोड ऑन
खरे आहे रे मोदका. दर्जेदार खेळाडूंबरोबर खेळण्याचा सराव ठेव. म्हणजे अशी वेळ येणार नाही असे ह्यांचे मत.
:)
माई मोड ऑफ

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 2:37 pm | संजय क्षीरसागर

मथळा दिलायं :

सरकार आता छोट्या ट्रान्झॅक्शनमध्ये असल्यानसलेल्या २% चार्ज विरोधातली हवा काढून घेणार आहे

आणि बातमी देतायं :

Govt to waive service tax on card transactions up to Rs 2,000

सर्विस टॅक्स आणि एमडीआर (कार्ड चार्जेस) मधे फरक आहे.

कार्ड चार्ज २% असेल तर सर्विस टॅक्स त्यावर १४% आहे. त्यामुळे २.२०% पैकी फक्त वरचे ०.२० % कमी होतील.

टाका आता स्मायली !

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 2:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरचा प्रतिसाद वाचा. अर्थकारणावर आहे, त्यामूले सहज समजेल असा समज आहे.

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 2:43 pm | संजय क्षीरसागर

पण हा सर्विस टॅक्स आणि कार्ड चार्जेसचा झोल आधी बघावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 2:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

शिवाय येवू घातलेला GST आणि त्याचा सर्विस टॅक्सवर होणारा सकारात्मक परिणाम यांचा विचार करणेही टॅक्स व अर्थव्यवस्थेबद्दल लिहिण्या-बोलणार्‍याला करणे आवश्यक आहे... हा मुद्दाही ध्यानात यायला हरकत नाही.

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 2:51 pm | संजय क्षीरसागर

आणि सध्या तुमची अडचण होत असेल तर सोडून देऊ, पण

कार्ड चार्ज २% असेल तर सर्विस टॅक्स त्यावर १४% आहे. त्यामुळे २.२०% पैकी फक्त वरचे ०.२० % कमी होतील.

ही वस्तुस्थिती आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 4:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

७० वर्षे अडचण सोसलीच ना ? आता जरा कोणी दूरगामी विचार करून देशाच्या व पर्यायाने आपल्या सर्वांच्या भल्याकरता काही करतआहेत, तर त्याचा निदान विपर्यास न करता, शक्य ते सहकार्य देणे याला मी त्रास म्हणत नाही.

कारण, कोणता हरी कोणा हरीभक्ताला खाटल्यावरी काही पुरवतो; यावर माझा (कलियुग असल्याने असेल, पण) विश्वास नाही. ;)

माझ्या हरीची, "दिसामाजी काही शिकत जा, मिळालेली बुद्धी वापरून चांगल्याची कास धर, चांगले दिसले तर त्यासाठी जरा कळ काढ आणि केवळ एखादा मुद्दा पकडून त्याला फुकाचा विरोध करू नको" अशी शिकवण आहे. :)

नितिन थत्ते's picture

8 Dec 2016 - 4:49 pm | नितिन थत्ते

>>७० वर्षे अडचण सोसलीच ना ?

ही ७० वर्ष सोसलेली कोणती अडचण याविषयी मार्गदर्शन करावे.

गहू तांदूळ वगैरेच्या लाइनी पंचवीसेक वर्षापूर्वी संपल्या. रेल्वेचे बुकिंग वगैरे घरबसल्या मिळायला लागून दहा एक वर्ष तरी झाली.

नितिन थत्ते's picture

8 Dec 2016 - 4:50 pm | नितिन थत्ते

आपलेच पैसे बँकेतून काढायला लाइन लावायची पद्धत मात्र नवीन सुरू झाली आहे.

आजानुकर्ण's picture

8 Dec 2016 - 8:10 pm | आजानुकर्ण

आपलेच पैसे बँकेतून काढायला लाइन लावायची पद्धत मात्र नवीन सुरू झाली आहे.

__/\__

जय हो. हे अगदी खरं. किंवा रिजर्व बँकेच्या गवर्नरने केलेलं प्रॉमिस एका रात्रीत अमान्य करायची पद्धत.

अर्धवटराव's picture

9 Dec 2016 - 2:11 am | अर्धवटराव

रिजर्व बँकेच्या गवर्नरने केलेलं प्रॉमिस एका रात्रीत अमान्य करायची पद्धत.

आर.बी.आय. गव्हर्नरचं नेमकं कुठलं प्रॉमीस एका रात्रीत अमान्य झालय?

मग २०१४ ला धुव्वा का उडाला म्हणे..?

विशुमित's picture

8 Dec 2016 - 5:26 pm | विशुमित

त्या २०१४ च्या धुव्याने तर सगळे बेजार झाले आहेत. राहावा लायनीतच उभा आता.
नाहीतरी सवय आहेच सगळ्यांना लायनीत उभा राहायची. त्यात ७० वर्षातून अवतार झालाच आहे म्हंटल्यावर करंगळीवर गोवर्धन उचलणारा असल्यावर गोपाळांना काय भीती....

सगळे बेजार झाले आहेत..? कुठे NDTV च्या स्टुडीओ मध्ये की राहुल गांधीच्या हाफिसात..?

त्या २०१४ च्या धुव्याने तर सगळे बेजार झाले आहेत.

खरे दुखणे कळाले.

नाहीतरी सवय आहेच सगळ्यांना लायनीत उभा राहायची.

ही ७० वर्षाच्या नाकर्तेपणाची कबुली समजावी का..?

त्यात ७० वर्षातून अवतार झालाच आहे म्हंटल्यावर करंगळीवर गोवर्धन उचलणारा असल्यावर गोपाळांना काय भीती....

गोपाळ म्हणा, भक्त म्हणा किंवा भाट म्हणा, भिती त्यालाच आहे ज्याने काळा पैसा तयार केला आहे. मग कोणीही असो. *सगळीकडून विचार करून पाचर मारली आहे*

*हे मिपावरचेच वाक्य आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 8:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

कायतरी काय ?

एका मोठ्या प्रसिद्ध साहेबांनी ०८ नोव्हेंबरपासून आजपर्यंत फक्त एकदाच सेल्फीसकट रु४००० बँकेतून बदलून घेतले आहेत. त्यानंतर त्यांना परत कधी रांगेत उभे राहण्याची गरज पडल्याचे वाहिन्यांवर पाहिले-ऐकले नाही. आता त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला परत परत पैसे लागत नाही तर सर्वसामान्य माणसांना परत परत रांगेत उभे राहून पैसे काढण्याची गरज का पडावी, असा प्रश्न पडलाय ?!

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Dec 2016 - 9:59 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्हाला खरंच लोकांच्या मनात काय खदखदतंय हे पहायची इच्छा असेल तर खालील विडिओ पहा. उगाच तथ्यहीन चर्चा करण्यापेक्षा हे प्रत्यक्ष लोकांचं मत पाहणं जास्त माहितिकारक नाहीये का?

https://youtu.be/-XtYRZ_Bn4g

https://youtu.be/0bpVIl1P9y8

सर्व्हिस टॅक्स की सर्व्हिस चार्जेस?
https://transformingindia.mygov.in/infographics/demonetization-impact-en...
http://www.business-standard.com/article/economy-policy/no-transaction-c...
https://www.icicibank.com/aboutus/article.page?identifier=news-mdr-waive...
http://www.livemint.com/Industry/Fz3upIYlXxBhRM96t8mcRO/No-transaction-c...
http://www.moneycontrol.com/news/business/card-cos-banks-asked-to-waive-...
या सगळ्या बातम्या डेबिट कार्डवरील सर्व्हिस चार्जेस किंवा एम्डीआर सध्या रद्द केला अशा आहेत.

संजय क्षीरसागर's picture

9 Dec 2016 - 1:31 pm | संजय क्षीरसागर

To encourage widespread usage of digital payments post demonetisation, the government on Wednesday said no transaction charges will be levied on debit cards till December 31.

अप्पा जोगळेकर's picture

8 Dec 2016 - 2:56 pm | अप्पा जोगळेकर

The government has decided to "exempt services by an acquiring bank to any person in relation to settlement of an amount up to Rs 2,000 in a single transaction transacted trough credit, debit card or other payment card service," sources said.

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 3:05 pm | संजय क्षीरसागर

नीट पेस्टींग करा !

ती सर्विस कॅटेगरी, `सर्विस टॅक्समधून' एक्झेम्प्ट करणार आहेत.

मूळ चार्जेस एक्झेम्प्ट करणार नाहीत. ते तसेच राहातील.

अप्पा जोगळेकर's picture

8 Dec 2016 - 3:34 pm | अप्पा जोगळेकर

जिथे तिथे कशाला वीरश्री उधळताय. मी एक बातमी पेस्ट केली फक्त. माझे मत काय वगैरे लिहिले नाही.

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 4:02 pm | संजय क्षीरसागर

त्यात नेमका हा मजकूर सोडला आहे, जो बातमीच्या सुरुवातीलाच आहे.

Government will waive service tax on debit and credit card transactions of up to Rs 2,000 in a bid to promote digital transactions amid cash crunch following withdrawal of old Rs 500 and 1,000 banknotes

त्यामुळे संपूर्ण चार्जेस माफ झालेत असा अर्थ होतो.

मी मुद्दा बघतो, माणूस नाही. त्यामुळे कुणाचाही मुद्दा बरोबर असेल तर मला आनंद होतो. कारण त्यानं मला सुद्धा वॅल्यू अ‍ॅडिशन झालेली असते. `विरश्री उधळणे' वगैरे विचार ही मनात येत नाही. ती पराभूतांची मानसिकता आहे.

मी तुमच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद म्हणून ती लिंक दिली नाही किंवा ती रेफर करा असा सल्ला सुद्धा दिला नाही.

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 4:14 pm | संजय क्षीरसागर

इतक्या उघड गोष्टीवर कशाला वाद घालतायं?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 6:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

हायला, जेटली पण मिपावरची घमासान चर्चा वाचतात आणि त्यावरून निर्णय घेतात हे समजल्याने अंगावर मूठ दोन मूठ मांस चढले =))

बघा त्यांनी मिपाकरांचे ऐकून काय काय निर्णय घेतलेत ते...

१. Petrol/diesel cheaper for those who pay by digital mode, to get 0.75% discount

२. People who will digitally book monthly, seasonal tickets in suburban rails will get 0.5 per cent discount from January 2017

३. There will be two point-of-sale machines in villages with population up to 10 lakh: Arun Jaitley

४. 10% discount on general insurance, 8% discount on life insurance on digital payments

५. Service tax on card transactions up to Rs 2,000 to be waived

एन्जॉय !

दुवा : http://timesofindia.indiatimes.com/govt-demonetisation-move/liveblog/553...

अभिजित - १'s picture

8 Dec 2016 - 6:11 pm | अभिजित - १

चला मला LIC चा हप्ता भरायचा आहे पुढच्या वीक मध्ये . बघूया डिस्काउंट मिळतो का ? नेट बँकिंग वापरले तर . नाहीतर क्रेडिट कार्ड वापरले तर. मला तर बहुतेक हा सगळं जुमला वाटतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 10:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

नवीन गोष्टीचा अनुभव न घेताच विरोध सुरू करून तुम्ही "या सरकारतर्फे काहीही समोर आले तरी प्रथम डोळे मिटून विरोध करणारच" हा तुमचा खरा उद्येश पूर्णपणे उघड केला आहे =)) =)) =))

मार्मिक गोडसे's picture

8 Dec 2016 - 8:00 pm | मार्मिक गोडसे

हायला, जेटली पण मिपावरची घमासान चर्चा वाचतात आणि त्यावरून निर्णय घेतात हे समजल्याने अंगावर मूठ दोन मूठ मांस चढले =))

हे तर अगोदरही करता आले असते. हे सरकार नोटाबंदीआडून कृत्रिम चलन टंचाई निर्माण करून कॅशलेस व्यवहार करण्याची जबरदस्ती करतेय हे सिद्ध होतेय.
कॅशलेस व्यवहाराला विरोध नाही, परंतू सरकार आपले अपयश झाकण्याकरता कॅशलेसचे घोडे दामटतेय ह्याला नकीच विरोध राहील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 10:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो काहीसा उपरोधीक विनोद होता !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

आता सगळा आंधळा विरोध चालला आहे याचा यापेक्षा अजून काय पुरावा हवा ???!!!

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2016 - 3:25 pm | श्रीगुरुजी

आताच माझ्या HDFC बचत खात्याचे ऑनलाईन विवरण पाहिले. ८ नोव्हेंबर नंतर मी मोठ्या प्रमाणात डेबिट कार्ड वापरून लहानमोठे व्यवहार केले आहेत. त्यात रेस्टॉरंटचे बिलिंग, दुचाकीत इंधन भरणे, किराणा माल खरेदी, स्टेशनरी खरेदी, स्वयंपाकाच्या गॅसचे बिलिंग इ. व्यवहार आहेत. एक अपवाद वगळता उर्वरीत व्यवहारांना १ रूपयासुद्धा चार्ज लावलेला नाही. गॅसची किंमत रोख दिली असती तर ५४६ रूपये द्यावे लागले असते. त्याऐवजी ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे ६ रू. ६५ पैसे जास्त गेले. परंतु दरवेळी रोखीने पैसे देताना वरचे ५-१० रूपये सोडून द्यावे लागत होते. ती समस्या यावेळी आली नाही.

नितिन थत्ते's picture

8 Dec 2016 - 4:31 pm | नितिन थत्ते

+१

मलाही ऑन लाइन/डेबिट कार्ड पेमेंटला सहसा चार्ज लागत नाही. क्रेडिट कार्ड पेमेंटलाही लागत नाही. पण सरकारी महावितरण, IRCTC इथे मात्र लागतो. आणि तो मर्चंटच घेतो. (पक्षी- महावितरण/रेल्वे)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 4:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

+११

मी टाकलेल्या अक्सिस बँकेच्या चार्जेसच्या चित्रात अगदी हेच लिहीले आहे !

पण, बॅंकेने दिलेल्या संस्थळावरील/छापील माहितीलाही खोटे म्हणणारे लोक आहेत इथे :O:

नितिन थत्ते's picture

8 Dec 2016 - 4:45 pm | नितिन थत्ते

IRCTC च्या बाबतीत दोघे (IRCTC व बँक) घेतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 5:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या चित्रात माझ्या कार्डालाही बँक IRCTC चार्जेस लावणार असेच म्हणते आहे. मी रेल्वेचा प्रवास क्वचितच करतो. त्यामुळे मला त्याने फार फरक पडत नाही ही गोष्ट वेगळी आणि माझ्या वैयक्तीक निवडीत गौण होती.

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2016 - 8:40 pm | श्रीगुरुजी

एकंदरीत गेल्या ३० दिवसांत असं दिसून आलंय की ज्यांना या निर्णयामुळे किरकोळ त्रास झालेला आहे किंवा अजिबात त्रास झालेला नाही, तेच सर्वाधिक मोठ्या आवाजात या निर्णयाला विरोध करीत आहेत.

वॄत्तपत्रातील वार्तांकनाबद्दल तर बोलायलाच नको. आज एकाने इंडियन एक्स्प्रेसची एक लिंक पाठवली होती. दिल्लीतील २-३ रिक्षावाल्यांबद्दल लिहिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ८ नोव्हेंबरनंतर रिक्षाचा धंदा निम्मा झाला आहे. या वृत्तांतावरून खालील दोनपैकी एक निष्कर्ष काढता येईल.

१) किमान निम्मी जनता कामावर न जाता घरी बसून आहे. त्यामुळे रिक्षाचा धंदा निम्म्यावर आला आहे.

किंवा

२) जनतेने प्रवासासाठी पायी चालणे/सायकल/दुचाकी/चारचाकी असे पर्याय वापरायला सुरूवात केली आहे.

वरील वृत्तांतामध्ये वरील दोनपैकी कोणता पर्याय जनतेने निवडला आहे हे सांगितले असते तर जास्त ज्ञान मिळाले असते.

नितिन थत्ते's picture

8 Dec 2016 - 9:03 pm | नितिन थत्ते

मी रिक्षाने स्टेशनवर जा ये केली तर ६० रुपये पडतात. नोटाबंदीनंतर मी सुट्या नोटा वाचवायला बसने जातो १०-१० रुपये लागतात. योगायोगाने निवडणूक आल्याने आमच्या नगरसेवकांच्या कृपेने नवीन बससेवा चालू झाली आहे.

मी जसा बसने जातो तसे इतरही जात असतील तेव्हा रिक्षाचा धंदा कमी झाला असणे साहजिक आहे. पण त्याचा अर्थ मी कामावर न जाता घरी बसलेलो नाही.

वरील प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल असे वाटते.

मला रिक्षाने जायच्या ऐवजी बसने जायला लागते हा त्रासच आहे. त्याशिवाय रिक्षा वाल्याचा धंदा कमी झाला हे ही खरेच आहे. तेव्हा काही त्रास नसताना लोक उगाच (मोठ्या आवाजात) ओरडत आहेत असे म्हणू नये.

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2016 - 9:10 pm | श्रीगुरुजी

बसेसच्या फेर्‍या वाढविल्याशिवाय किंवा मार्गावर नवीन बस आणल्याशिवाय रिक्षाऐवजी बस हा पर्याय फारच थोड्या लोकांसाठी उपलब्ध असेल. दिल्लीतील वरील बातमीनुसार रिक्षाचा धंदा ५०% कमी झाला असेल तर त्या प्रमाणात बसचा धंदा वाढायला हवा किंवा इतर पर्यायांचा वापर वाढायला हवा. त्याविषयी वृत्तांतात काहीही लिहिलेले नाही.

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2016 - 10:39 pm | श्रीगुरुजी

रिक्षाऐवजी रोज बसने जावे लागते याव्यतिरिक्त नोटा रद्द केल्यामुळे अजून कोणता त्रास होत आहे?

नितिन थत्ते's picture

8 Dec 2016 - 11:25 pm | नितिन थत्ते

मी घरखर्चासाठी सुमारे २० हजार रुपये महिना काढतो. त्याखेरीज सर्व युटिलिटी बिले ऑनलाइन भरतो. म्हणजे मला २० हजार रुपये कॅशचा खर्च असतो. भाजीपाला, किराणासामान (साबण-अंगाचा, कपड्याचा, भांड्यांचा, इतर टॉयलेट्रीज, टूथपेस्ट, खाण्याचे स्नॅक्स नमकीन वगैरे), पेपरवाला, दूधवाला, बूटपॉलीशवाला, स्वयंपाकाच्या बाई, औषधपाणी, तीन माणसांचा प्रवासखर्च इत्यादि खर्च कॅशने करतो. कधी बाहेर असताना भूक लागली तर वडापाव, चहा-कॉफी वगैरे हे ही कॅशने करतो.

होणारे त्रास
१. एटीएममधून फक्त २००० च्याच नोटा मिळतात त्यामुळे २० हजार काढण्यासाठी दहावेळा एटीएमच्या लायनीत २०-३० मिनिटे उभे राहणे (एकदम पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो होतो पण तिथे पैसे मिळाले नाहीत. नंतर दोन वेळा बँकेत गेलो पैसे मिळाले नाहीत).
२. माझ्या इनकमच्या प्रमाणाचा विचार केला असता मनाला येईल तेव्हा वडा पाव खाणे किंवा आइसक्रीम खाणे इत्यादि गोष्टी विचार करून कराव्या लागत नाहीत (नसत). आता त्या विचार करून कराव्या लागतात. यावर हा नोटा टंचाईचा प्रॉब्लेम आहे असे म्हणता येईल पण नोटा टंचाई ही नोटाबंदीमुळेच झालेली आहे.
३. मी जेव्हा वीस हजार रुपये काढून आणतो तेव्हा त्यातले किती खर्च झाले हे व्हिज्युअली पाहता येते. ऑनलाइन व्यवहार करायला लागतात तेव्हा काही ठिकाणी कार्ड, काही ठिकाणी पेटीएम, आता नवीन जुमल्याप्रमाणे इंतरनेटविरहित मोबाइल पेमेंत असा विविध मार्गांनी खर्च केल्याने एकूण खर्च किती झाला याचा ट्रॅक डोक्यात ठेवावा लागतो. कॅशच्या बाबतीत कुणीही खर्च केला तरी बॅलन्स कॅश एका ठिकाणी पाहून कळते. इथे प्रत्येकाच्या खर्चाचा ट्रॅक ठेवावा लागतो. हा त्रास ५० दिवसांचा किंवा दोन क्वार्टरचा नाही. कॅशलेस व्यवस्थेतला कायमचा त्रास आहे.
३. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला कॅश ट्रान्झॅक्शनपेक्षा जास्त वेळ लागतो. मी एक ब्रेड घेतला पंचवीस रुपये दिले की चालू पडतो. आता मोबाईल ऑन करा/कार्ड काढा, दुकानदार ते स्वाइप करणार/पेटीएमचे अ‍ॅप उघडणार, मी पिन नं टाकणार/पेटीएमचा क्यू आर कोड स्कॅन करणार अमाउंट टाकणार आणि गो म्हणणार. नंतर इंटरनेटच्या स्पीडप्रमाणे सक्सेसचा मेसेज येईपर्यंत दुकानात थांबणार.
--------------------------------------------
आज मला टॅक्सीने ऑफीसला जावे लागले. त्यासाठी उबर बुक करायचा प्रयत्न केला. उबरने ९००+ रुपयांचे एस्टिमेट दिले. म्हणून कालीपिलीने गेलो. टॅक्सीवाल्याकडे कार्ड पेमेंटची सुविधा नव्हती, पेटीएम नव्हते आणि २००० चे सुट्टेही नव्हते. त्यामुळे जवळच्या १०० च्या पाच नोटा होत्या त्या सर्व द्याव्या लागल्या. संध्याकाळी घरी जाताना सॅण्डविच घेऊन ये असा बायकोचा फोन आला. पण (सुटे) पैसे नसल्याने सॅण्डविच घेता आले नाही.
हे असे किती काळ चालणार आहे हे ठाऊक नाही याचा मानसिक त्रास झाला.
--------------------------------------------

Pain is real, benefits are imaginary.

आजानुकर्ण's picture

9 Dec 2016 - 1:16 am | आजानुकर्ण

पण देशासाठी थोडा त्रास सहन करण्याची तुमची तयारी नाही का? मला असा कुठेही त्रास झाला नाही. तुम्ही खोटं बोलताय!!!

नितिन थत्ते's picture

9 Dec 2016 - 11:28 am | नितिन थत्ते

तयारी आहे हो.

पण Pain is real; Benefits are imaginary !!!

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2016 - 2:56 pm | श्रीगुरुजी

१. एटीएममधून फक्त २००० च्याच नोटा मिळतात त्यामुळे २० हजार काढण्यासाठी दहावेळा एटीएमच्या लायनीत २०-३० मिनिटे उभे राहणे (एकदम पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो होतो पण तिथे पैसे मिळाले नाहीत. नंतर दोन वेळा बँकेत गेलो पैसे मिळाले नाहीत).

बँकेत स्वतः जाऊन स्वयंधनादेश वापरून आठवड्याला २४००० रूपये काढू शकता. मी स्वतः जाऊन काढलेले आहेत. एटीएमच्या रांगेपेक्षा बँकेत कमी वेळ लागतो. २००० च्या १० व १०० च्या ४० नोटा मिळाल्या होत्या. बहुतेक व्यवहार डेबिट कार्ड/ऑनलाईन पेमेंट/धनादेश इ. च्या माध्यमातून करत असल्याने २४००० मधील बहुसंख्य रक्कम शिल्लक आहे.

२. माझ्या इनकमच्या प्रमाणाचा विचार केला असता मनाला येईल तेव्हा वडा पाव खाणे किंवा आइसक्रीम खाणे इत्यादि गोष्टी विचार करून कराव्या लागत नाहीत (नसत). आता त्या विचार करून कराव्या लागतात. यावर हा नोटा टंचाईचा प्रॉब्लेम आहे असे म्हणता येईल पण नोटा टंचाई ही नोटाबंदीमुळेच झालेली आहे.

वडापाव किंवा आईस्क्रीम खाण्याइतक्या नोटा बहुतेकांकडे असतातच. बहुतेकांच्या बाबतीत वडापाव किंवा आईस्क्रीम हे रोजचे खाणे नसते. तरीसुद्धा ही समस्या वाटत असल्यास नोटाबंदी हेच कारण आहे हे समजण्यास हरकत नाही.

३. मी जेव्हा वीस हजार रुपये काढून आणतो तेव्हा त्यातले किती खर्च झाले हे व्हिज्युअली पाहता येते. ऑनलाइन व्यवहार करायला लागतात तेव्हा काही ठिकाणी कार्ड, काही ठिकाणी पेटीएम, आता नवीन जुमल्याप्रमाणे इंतरनेटविरहित मोबाइल पेमेंत असा विविध मार्गांनी खर्च केल्याने एकूण खर्च किती झाला याचा ट्रॅक डोक्यात ठेवावा लागतो. कॅशच्या बाबतीत कुणीही खर्च केला तरी बॅलन्स कॅश एका ठिकाणी पाहून कळते. इथे प्रत्येकाच्या खर्चाचा ट्रॅक ठेवावा लागतो. हा त्रास ५० दिवसांचा किंवा दोन क्वार्टरचा नाही. कॅशलेस व्यवस्थेतला कायमचा त्रास आहे.
३. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला कॅश ट्रान्झॅक्शनपेक्षा जास्त वेळ लागतो. मी एक ब्रेड घेतला पंचवीस रुपये दिले की चालू पडतो. आता मोबाईल ऑन करा/कार्ड काढा, दुकानदार ते स्वाइप करणार/पेटीएमचे अ‍ॅप उघडणार, मी पिन नं टाकणार/पेटीएमचा क्यू आर कोड स्कॅन करणार अमाउंट टाकणार आणि गो म्हणणार. नंतर इंटरनेटच्या स्पीडप्रमाणे सक्सेसचा मेसेज येईपर्यंत दुकानात थांबणार.

वरील दोन्ही मुद्दे व्यक्तीसापेक्ष आहेत. मला व्यक्तीशः त्यात काहीच समस्या वाटत नाही. तुम्हाला समस्या आहे हे वाटू शकते. नोटा बाळगण्यापेक्षा एक कार्ड कॅरी करणे हे माझ्या दृष्टीने जास्त सोपे आहे.

--------------------------------------------

आज मला टॅक्सीने ऑफीसला जावे लागले. त्यासाठी उबर बुक करायचा प्रयत्न केला. उबरने ९००+ रुपयांचे एस्टिमेट दिले. म्हणून कालीपिलीने गेलो. टॅक्सीवाल्याकडे कार्ड पेमेंटची सुविधा नव्हती, पेटीएम नव्हते आणि २००० चे सुट्टेही नव्हते. त्यामुळे जवळच्या १०० च्या पाच नोटा होत्या त्या सर्व द्याव्या लागल्या. संध्याकाळी घरी जाताना सॅण्डविच घेऊन ये असा बायकोचा फोन आला. पण (सुटे) पैसे नसल्याने सॅण्डविच घेता आले नाही.
हे असे किती काळ चालणार आहे हे ठाऊक नाही याचा मानसिक त्रास झाला.

तुम्हाला इतका प्रचंड त्रास होत असेल तर नोटाबंदीला तुमचा असलेला विरोध समर्थनीय आहे असे म्हणता येईल.

राही's picture

9 Dec 2016 - 1:24 am | राही

मला झाला आणि अजूनही होतो आहे.
खूपच लिहावे लागेल म्हणून टप्प्याटप्प्याने लिहीन.

आणि मी डी क्लास शहरात राहतो (यड्राव फाटा - इचलकरंजी)
पण दारू सकट सर्वठिकाणी मी कार्ड देतो . एखाद दोन वेळेस रांगेत उभारून पैसे काढावे लागले याव्यतिरिक्त मला कसलाही त्रास जहाल नाही . वडापाव चहा कोफी वगैरे देखील सुरळीत चालू आहे ..थट्टा चाचा तुम्ही राहता कोठे ?
बाकी गरीब दारू का पितो वगैरे फालतू प्रश्न विचारू नका..

बाकी. जाता जाता.. बुर्ली अमणापूर जयसिंगपूर कुरुंदवाड नरसोबा वाडी वगैरे सर्व खेडेगावातून माझे मित्र आहेत ( पश्चिम महाराष्ट्र ) आणि सर्वजण २ ३ वेळेस बँकेच्या रांगेत उभे राहून आले आहेत . त्यापैकी कोणीही इथे मिपावर लेख पाडले नाहीत अथवा काही भयंकर झाले असेही सांगितले नाही अथवा मी मुद्धाम विषय काढले तरीही मला बोलले नाहीत. मिपावर देखील अनेक लोकांनी जास्त त्रास झाला नाही हेच सांगितले ..

बाकी जाता जाता अर्थात नगरपलिका निवडनुकांचे निकाल याची साक्ष देतातच .. पण तरीही .. लोकांना भडकवण्याचा व त्यातून राजकीय स्वार्थ साधण्याचा कसला जळफळाट म्हणायचा हा ..

अहो आत्ता सुंदर बागेपाशीसुद्धा भेळ, वडापाव साठी PayTM घेऊ लागले आहेत.

नितिन थत्ते's picture

9 Dec 2016 - 11:05 am | नितिन थत्ते

>>थट्टा चाचा तुम्ही राहता कोठे ?

हे कोणाला विचारले आहे?

मार्मिक गोडसे's picture

9 Dec 2016 - 12:38 am | मार्मिक गोडसे

ज्यांचे फक्त जि.म. बँकेतच खाते आहे आणि त्यांना जुन्या नोटा बदलायच्या आहेत किंवा त्या बँक खात्यातून पैसे काढायचे आहेत त्यांना भेटलात का?

सुज्ञ's picture

9 Dec 2016 - 1:38 am | सुज्ञ

जी म बैंकेत आमचे अनेक सहकारी एफडी या ठेव्हायला आले होते . जुन्या नोटेत . पण जुन्या नोटा घेण्याची त्यांना पॉवर नाय . तरीही मागिल तारखा दाखवूंन(८ नोव्हेंबर च्या आधीच्या ) अनेक जिल्हा व तालुकास्तरीय बॅंकांनी अशा एफडी , आरडी ठेऊन घेतल्या. ओळखी व जोखमी वरती ..

म्हणूनच परत सांगतो . सरकार चा हेतू चांगलाच आहे .. लोक दूरउपयोग करणारच

तर अशा अनेक भ्रष्टाचाराचे मूळ कारण ठरू शकणाऱ्या सहकारी बॅंक व संस्था याना यातून वागळले हे उत्तम .

मुळात आपल्या लोकांना गैरव्यवहार करण्यात च आनंद वाटतो हि दुर्दैवाची गोष्ट आहॆ

नितिन थत्ते's picture

9 Dec 2016 - 10:16 am | नितिन थत्ते

जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असणे म्हणाजे भ्रष्ट असणे हे समीकरण लै भारी आहे.
----------------------
सहकारी गृहनिर्माण संस्थांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असणे कंअल्सरी आहे. मी सेक्रेटरी असलेल्या सोसायटीचे पण खाते ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहे. आमच्या सोसायटीच्या पेटी कॅशमध्ये पाचशे रुपयांच्या काही नोटा ९ नोव्हेंबर रोजी होत्या. त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून बदलून घेता आल्या नाहीत. आमच्या सोसायटीचे दुसर्‍या बँकेतपण खाते असल्याने तेथे बदलून घ्याव्या लागल्या. ते दुसरे खाते नाही अशा अनेक सोसायट्या असू शकतात.

आपल्या मध्यमवर्गीय विहिरीच्या बाहेर खूप मोठे जग असते.

विशुमित's picture

9 Dec 2016 - 11:16 am | विशुमित

<<<<<तर अशा अनेक भ्रष्टाचाराचे मूळ कारण ठरू शकणाऱ्या सहकारी बॅंक व संस्था याना यातून वागळले हे उत्तम .>>>
पतसंस्था आणि जिल्हा बँके बद्दल एवढा आकस ठेवणे बरे वाटत नाही. कारण सांगतो;

-- पाईप लाईन च्या कर्जासाठी मी बडोदा बँकेत गेलो होतो. सर्व कागद पत्रे, पाणी परवानगी, ज़िल्हा बँक आणि पतपेढीचे कर्ज फेडण्याचा असलेला अनुभव असून सुद्धा मला त्यांनी कर्जा देण्यासाठी २ महिने घालवले, कर्ज तर मिळालेच नाही पण माझे पाईप लाईनचे काम रखडले. त्याच कर्जासाठी मी ज़िल्हा बँकेत गेलो तर माझे काम ५-६ दिवसात झाले.
पतसंस्था तर १ तासा भरात कर्ज देते. योग्य पद्धतीने पैसे फेडले तर घरी पण आणून देतील.

- गावाकडे इतर बँकांपेक्षा पतसंस्था आणि ज़िल्हा बँकांचे जाळे विस्तृत आहे. आमच्या घरातील सगळ्यांची खाती ज़िल्हा बँकेत आहेत अजून तरी काही प्रॉब्लेम आला नाही.

पण विशिष्ट चष्मे घातले की फक्त ज़िल्हा बँक आणि सहकारी संस्था च दिसणार.

(ज़िल्हा बँकामध्ये कसे घोटाळे झाले याचे दाखले दिले जातील पण सरकारी बँकांच्या चड्ड्या तश्याच झाकून ठेवल्या जातील)

मार्मिक गोडसे's picture

9 Dec 2016 - 3:13 pm | मार्मिक गोडसे

ज़िल्हा बँकामध्ये कसे घोटाळे झाले याचे दाखले दिले जातील पण सरकारी बँकांच्या चड्ड्या तश्याच झाकून ठेवल्या जातील

काही खाजगी बँकांनी चलनबंदीनंतरही घोटाळे केले ,परंतू त्या बँकांचे व्यवहार सुरळीत चालू आहे.

मार्मिक गोडसे's picture

9 Dec 2016 - 3:24 pm | मार्मिक गोडसे

तर अशा अनेक भ्रष्टाचाराचे मूळ कारण ठरू शकणाऱ्या सहकारी बॅंक व संस्था याना यातून वागळले हे उत्तम .

हा इलाज झाला का? मग ह्या लोकांनी त्यांच्याकडे असलेल्या ५००,१००० च्या नोटांचे काय करायचे?

नितिन थत्ते's picture

9 Dec 2016 - 4:23 pm | नितिन थत्ते

अहो. त्यांनी जिल्हा बँकेखेरीज इतरत्र अकाउंट काढले नाही म्हणजेच ते भ्रष्ट, काळा पैसा धारक, देशाला कुरतडणारे की पोखरणारे देशद्रोही वगैरे आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून तर ही नोटाबंदीची योजना आणली.

अवांतर :

डॉक्टर सुहास म्हात्रे,

३. There will be two point-of-sale machines in villages with population up to 10 lakh: Arun Jaitley

गावाची लोकसंख्या १० लाख? मूळ बातमीत ८००० आहे. श्लेषणदोष (=कटपेस्ट एरर) की काय?

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2016 - 3:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

होय, श्लेषणदोष (=कटपेस्ट एरर) :)

गडबडीत केलेल्या भाषांतरात अर्थ बदलू नयेत म्हणून ऑनलाईन टाईम्स ऑफ इंडियामधली बातमी कॉपीपेस्ट केली होती.

संजय क्षीरसागर's picture

26 Dec 2016 - 2:28 pm | संजय क्षीरसागर

.

क्रेडीट कार्डवर ३०० रुपयांचे पेट्रोल भरल्यावर दोन्ही वेळा ११.५० चार्ज लागला आहे. अर्थात, क्रेडीट कार्डवर सरकारनं का सवलत दिली नव्हती हे नवल आहेच. झक मारली आणि तुमच्याशी वादात पडलो !

एनी वे, हा पेट्रोलपंप चतु:शृंगी मंदीराच्या अलीकडे आहे. तुम्ही मोठी फुशारकी मारुन नांव सांगा, पुरावा द्या करत होतात म्हणून हा प्रतिसाद !

संदीप डांगे's picture

26 Dec 2016 - 2:50 pm | संदीप डांगे

यात काय नवीन आहे? असा चार्ज तर बसतोच, हे जगजाहिर आहे. कोण नाकारत होतं इथे? कित्येकदा मला कार्डवर पेट्रोल भरलं बसलाय, तेव्हा कार्डने पेट्रोल भरने सोडून दिलं. कॅश देतो.

संजय क्षीरसागर's picture

26 Dec 2016 - 5:13 pm | संजय क्षीरसागर

लेखकाला, गुरूजींना आणि म्हात्र्यांना ! इथे निष्कारण किती वाद घातला.

संदीप डांगे's picture

26 Dec 2016 - 5:21 pm | संदीप डांगे

काहींना कम्पलसरी चार्ज बसतोच. बहुतेक क्रेडिट कार्डांना. मी क्रेडिट कार्डने पेट्रोल भरायचो. डेबिटने कधी भरल्याचे आठवत नाही कारण, पेट्रोलसाठी कार्ड वापरणे सोडून चार वर्ष झालीयेत. आताही अनेकांना कार्डवर चार्जेस लागत आहेतच. काहींना लागत नसतील तर ते इंधनकंपन्या व बॅन्कांमधलं साटेलोटं असेल, किंवा जेवढी कमाई त्या खातेधारकाकडून होत असेल त्याच्या बदल्यात असे चार्ज वेव ऑफ होत असतील. पण चार्ज कुठेच कोणालाच लागत नाहीत अशी अगदी ब्लॅण्केट कन्डिशन नाही.

संजय क्षीरसागर's picture

26 Dec 2016 - 5:47 pm | संजय क्षीरसागर

आणि मी तेच सांगत होतो. कुठे होता तेंव्हा तुम्ही?

संदीप डांगे's picture

26 Dec 2016 - 6:41 pm | संदीप डांगे

माझ्याकडे पावत्या किंवा स्टेटमेंट नव्हती काढून दाखवायला. म्हणून गप्प बसलो. =))

संजय क्षीरसागर's picture

26 Dec 2016 - 7:09 pm | संजय क्षीरसागर

(स्मायली)

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Dec 2016 - 5:47 pm | हतोळकरांचा प्रसाद

सर, एवढा गदारोळ घालून अजून मूळ मुद्दा तुमच्या पर्यंत पोहोचला नसेल असे गृहीत (वरचे प्रतिसाद परत एकदा वाचले तरी चालतील) धरून सांगतो - कि सरसकट सगळ्याच कार्डांना चार्जेस लागतात हे खरे नाही. बहुतेक क्रेडिट कार्ड्स ला लागतात. पण सरसकट नाही. बहुतांशी डेबिट कार्ड्सना लागत नाहीत. परत, हेही सरसकट नाही. त्यामुळे वर झालेली हि चर्चा हा निष्कारण वाद नक्कीच नव्हता!

संजय क्षीरसागर's picture

26 Dec 2016 - 6:25 pm | संजय क्षीरसागर

चार्जेस लागतातच ! कधी ते मर्चंट बेअर करतो, कधी कस्टमरला लावतो इतकाच काय तो फरक.

नाही तर प्रोसेसींग काय फुकटात करणार का बँका आणि कार्ड कंपन्या ? आणि कशापायी ?

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Dec 2016 - 8:28 pm | हतोळकरांचा प्रसाद

खरंच हद्द झाली असावी आता! असो...माझ्या खिशातून कुठलेही चार्जेस जात नाहीत(मग ते कोणीही भरो) या आनंदात मी राहतो आणि तुमच्या खिशातून जात आहेत याचा राग तुम्ही व्यक्त करत रहा!

श्रीगुरुजी's picture

26 Dec 2016 - 8:31 pm | श्रीगुरुजी

त्यांच्या खिशातून जातात आणि तुमच्यामाझ्या खिशातून जात नाहीत या भेदभावाचा त्यांना क्रोध आला असावा. त्यांची बँक चार्ज लावते आणि आपली बँक लावत नाही.

बँक बदला, नशीब बदलेल!

हा गैरसमज असू शकेल कारण ते इतर प्रकारे काढले जात असतील. पण आनंदात राहायला काहीच हरकत नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Dec 2016 - 8:37 pm | हतोळकरांचा प्रसाद

हो नक्की! २०० रु.ची वस्तू डेबिट कार्ड ने मला २०० लाच मिळते. याव्यतिरिक्त मला माहित नसलेले कुठलेही चार्जेस जात नाहीत. त्यामुळे मला आनंद मानायला काहीच हरकत नाही!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2016 - 8:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वतः हट्टाने चुकीचे पर्याय वापरून आणि वर दुसर्‍यांनी सुचवलेल्या चांगल्या पर्यायांना हट्टाने विरोध करूनही, परत दोष दुसर्‍यांवर ढकलणे फार विनोदी दिसते, हे सांगायला हवेच का?! =))

चालूद्या !

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2016 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे विषेश स्किल् आहे. आम्हाला या जन्मी जमेल असे वाटत नाही ! :)

संजय क्षीरसागर's picture

26 Dec 2016 - 9:26 pm | संजय क्षीरसागर

यात हट्ट वगैरे कुठे आहे ? आधी ही कॅशनं पेट्रोल भरत होतो तेच चालू ठेवीन. विषय संपला !

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2016 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

बँकेत न ठेवता खिश्यात कॅश ठेवल्याने तिच्यावरचे व्याज (४%) बुडत नाही का ? अरे देवा, म्हणजे असाही तोटा, तसाही तोटाच होतोय ! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2016 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

सेविंगमध्ये असले तर ४%, फिक्स्डमध्ये असते तर अजून जास्त आर्थिक तोटा... आणि हे ध्यानात आले तर अजून जास्त मानसिक त्रास. हे जगच लई क्रूर, वाईट्ट हाय :)

संजय क्षीरसागर's picture

26 Dec 2016 - 9:35 pm | संजय क्षीरसागर

पेट्रोल फक्त ३/४ वेळा भरावं लागतं. लागेल तशी कॅश काढली की झालं !

रॉजरमूर's picture

26 Dec 2016 - 9:08 pm | रॉजरमूर

??????

तीनशे रुपयाला २ % म्हणजे फारतर ६ सव्वा सहा रुपये लागायला पाहिजे त्या सेस बीस च्या शेपट्या धरून .....
पण इथे तुम्हाला ११.५० रु. म्हणजे जवळपास ४ % जास्त लागलेत हे कोणतं गणित ?
कॅशलेस च्या भोंगा लावून नवीन लुटायचा धंदा आरंभलाय काय ?

म्हणजे कार मध्ये जर ३००० चं पेट्रोल टाकलं तर तब्बल ११५ रुपयाला चंदन लागेल
कॅशलेस ची आरती ओवाळायची म्हटली तर ?

संजय क्षीरसागर's picture

26 Dec 2016 - 9:27 pm | संजय क्षीरसागर

बरोबरे ! म्हणून म्हटलं सरकारनं या कॅशलेसचा पूर्णपणे विचार केलेला नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Dec 2016 - 9:48 pm | हतोळकरांचा प्रसाद

नुसतं बरोबर आहे म्हणून थांबण्यापेक्षा ते ११.५ रुपये नेमके कशात गेले हे आपल्या बँकेला विचारून सांगाल तर सगळ्यांनाच कळेल. आत्ता मी माझ्या एक मित्राशी बोललो, त्याच्या कार्डवरून ११.५ रुपयेच गेले आहेत. त्याने कस्टमर केअरला संपर्क केला असता कळले की ते पैसे रिकंसीलीएशन मध्ये परत येतील. परत आले तर इथे टंकतो! जमल्यास आपण बघा संपर्क करून म्हणजे नक्की माहिती तरी कळेल.

संजय क्षीरसागर's picture

26 Dec 2016 - 10:01 pm | संजय क्षीरसागर

.

याबद्दल आज बातमी आली आहे

http://www.loksatta.com/pune-news/additional-charge-on-debit-card-purcha...

काही ठिकाणी डेबिट कार्डच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या खरेदीवर व्यावसायिकांकडमून दोन टक्के अतिरिक्त शुल्क वसूल केले जात आहे. याबाबतच्या विविध तक्रारी सध्या येत आहेत. अतिरिक्त शुल्काच्या मुद्दय़ावरून नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये वादावादीही होत आहे. अतिरिक्त शुल्काबाबत व्यावसायिकांकडे नागरिकांनी विचारणा केल्यास बँकांकडून हे शुल्क आकारले जात असल्याचे सांगण्यात येते. डेबिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने २०१३ मध्येच सूचना प्रसिद्ध केली आहे. डेबिट कार्डच्या व्यवहारावर अतिरिक्त शुल्क लावता येणार नाही. तसे करणे अयोग्य असून, कायद्यात बसणारे नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क लावता येणार नसल्याचे त्यात रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

डेबिट कार्डच्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारल्याबाबत नागरिकांना थेट रिझव्‍‌र्ह बँकेकडे ई-मेलद्वारे तक्रार नोंदविता येते. gov@rbi.in या रिझव्‍‌र्ह बँकेच्या ई-मेलवर तक्रार स्वीकारली जाते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ग्राहक शिक्षण आणि संरक्षण विभागाकडेही याबाबत तक्रार दाखल करता येते. cepdeo@rbi.org.in हा या विभागाचा ई-मेल आहे.