स्वादिष्ट आटा नूडल्स

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
4 Sep 2016 - 11:20 am

काल संध्याकाळी सौ. बाहेर गेलेली होती. आमच्या चिरंजीवांना नूडल्स खाण्याची इच्छा झाली. आईच्या गैर हजेरीत, बाबा त्याच्या अशा खादाडीच्या इच्छा पूर्ण करतात हे त्याला चांगलेच माहित होते. मी म्हणालो नूडल्स करून देईल. पण मैदा वाले नूडल्सच्या जागी कणकीचे नूडल्स मिळतात का कुठे बघ. चिरंजीव उतरले, मला काही प्रोब्लेम नाही. पण नूडल्स स्वदिष्ट झाले पाहिजे आणि तो घरा बाहेर पडला.

घरात कांदे होते, टमाटर हि होते, प्रत्येकी दोन-दोन घेतले. फ्रीज मध्ये फ्रेंच बिन्स हि होत्या. ७-८ शेंगा त्याही घेतला. मनात विचारकेला पाहू शेंगा नूडल्स मध्ये कश्या लागतात. बहुतेक या आधी कुणी नूडल्स मध्ये शेंगा टाकल्या नसतील. एक हिरवी मिरची हि घेतली. सर्व साहित्य बारीक चिरून ठेवले. आमचे चिरंजीव पतंजलीचे दोन पेकेट दहा दहा रुपये वाले आटा नूडल्स ( ६० ग्रॅम प्रत्येकी) घेऊन घरी परतला.

गॅस वर पॅन ठेवले. त्यात दोन चमचे तेल टाकून, तेल गरम झाल्यावर १/२ चमचे जीरा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली. मग कांदे टाकून थोडे परतून घेतले, नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि शेंगा त्यात घातल्या. स्वाद करता मीठ (फक्त भाजी पुरता). तीन ते चार मिनिटात भाजी तैयार झाली.

गॅसच्या दुसर्या शेगडीवर, एका भांड्यात १ लिटर पाणी टाकून, उकळायला ठेवले. पाणी उकळू लागल्यावर, त्यात १/४ चमचे हळद आणि चिमूटभर हिंग, १/२ चमचा चाट मसाला आणि थोडे मीठ (नूडल्सच्या हिशोबाने) आणि नूडल्स सोबत मिळालेला मसाला टाकला. शेवटी त्या पाण्यात नूडल्स टाकले. नूडल्स शिजायला २-३ मिनिटे लागतात. त्यानंतर गॅस मंद करून पॅन मधून भाजी काढून, नूडल्स शिजत असलेल्या भांड्यात घातली. सर्व साहित्य भांड्यात व्यवस्थितपणे ढवळून घेतले.
आटा नूडल्स
गॅस बंद करून गरमा-गरम नूडल्स आम्ही बाप-लेकाने मिळून फस्त केले. नूडल्स खरोखरच स्वादिष्ट झाले होते. शेंगांमुळे स्वाद हि मस्त आला होता.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 12:21 pm | संदीप डांगे

१. माझा खायचा अनुभव सांगतो: पतंजली आटा नूडल्स अतिशय भंगार लागतात.
२. माझं व्यावसायिक अनुभव सांगतो: वरिल लिखाण हे इन्डायरेक्ट मार्केटींगचं उत्तम उदाहरण आहे.

दोन्हीला सहमत. पतंजली नूडल्स भंगार लागतात चवीला. नॉर परवडले.
पटाइत नेहमीच करतात पतंजलीची झैरात. नवीन काय त्यात.
.
बाकी रेसिपी वाचल्यावर दगडाच्या खिरीची गोष्ट आठवली.

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 12:42 pm | संदीप डांगे

पटाईतसर नेहमीच करतात हे माहितीये.

नवीन हे आहे की पतंजलीच्या जाहिरात अलौड आहेत का मिसळपाववर? तसे असेल तर जाहिराती, मार्केटींग अलौड आहे असे समजुया. आपल्या दोघांना बरे पैशे छापता येतील न लगा! मिसळपावला फुकट वापरायचं आणि क्लायंटकडून बिलं काढायची. इथे असे अन्डिस्पुटेड मानमरातब, आदरसन्मान असलेले दहाबारा आयडी आहेत, त्यांचेकडून वेगवेगळ्या प्रॉडक्टचे प्लेसमेंट असलेलं ललित लिहून घेता येईल. किसिको कुछ पता नै चलेगा! क्या बोलता पार्टनर?

अभ्या..'s picture

4 Sep 2016 - 12:52 pm | अभ्या..

चालतंय की.
म्या सीग्राम्/युबी, एफेमसीजीवाले पकडतो. तू पोलिटिकल आणि एनजीओ फ्रंट सांभाळ. ह्यांना सगळ्याना इन्डायरेक्ट पाहिजेच अ‍ॅडव्हर्टायझिंग.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2016 - 5:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

त्यांचेकडून वेगवेगळ्या प्रॉडक्टचे प्लेसमेंट असलेलं ललित लिहून घेता येईल.

म्हणजे,

जळणाला लाकूड
गुरांना चारा
गाठीला पैका घरच्या घरी
सामाजिक वनीकरण येता दारी

असं लेखन का? ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2016 - 5:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

विषय जाहिरातीचा सुरु आहे तर, आमचीही एक धागा जाहिरात

दगडाच्या खिरीवरून आठवलेली, ;)

तुम्ही लोक्स मार्केटिंग करून पैसे कमवणार, तसेच मी ही कमवू शकतो

१. धागा जाहिराती बद्दल शिव्या

किंवा

२. धाग्यातल्या कथेकरिता कौतुक

हायला बापू, ही लिहिली होतीस व्हय गोष्ट.
बाकी कर तुला मार्केटिंग करायचे असेल तर. आजकाल तेच महत्त्वाचे. वाटल्यास मी डिफॉल्ट अनुमोदन द्यायला आहेच.

पगला गजोधर's picture

4 Sep 2016 - 8:05 pm | पगला गजोधर

रशियन लोक कथा आहे नं ती ?

अभ्या..'s picture

4 Sep 2016 - 8:06 pm | अभ्या..

हो, पण खीर आणि दगड भारतीय आहेत. ;)

पगला गजोधर's picture

4 Sep 2016 - 8:12 pm | पगला गजोधर

हागणदारी मुक्त होत नाही, तो पर्यंत कृपया वाटेवरचे दगड कोणी खिरीकरता वापरू नये, हीच विनंती

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2016 - 8:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

अर्रर्रर्रर्रर्रर्र !!! वॅहॅ विही वुहू पग भाऊ

महासंग्राम's picture

7 Sep 2016 - 5:21 pm | महासंग्राम

झैरात झैरात झैरात :p

गणामास्तर's picture

4 Sep 2016 - 7:09 pm | गणामास्तर

तुम्ही पतंजली खाऊन तरी पाहीले, मला तो रामदेव बाबांचा दाढीत घोळवून घोळवून आटा नूडल्स खातानाचा फोटो येतो डोळ्यासमोर.
त्यामुळे आपली तर काय अजून टाप नाय झाली पतंजली खायची.

त्रिवेणी's picture

4 Sep 2016 - 7:37 pm | त्रिवेणी

इक्क,हो गणा भौ.

पगला गजोधर's picture

4 Sep 2016 - 7:58 pm | पगला गजोधर

मला तो रामदेव बाबांचा दाढीत घोळवून घोळवून आटा नूडल्स खातानाचा फोटो येतो डोळ्यासमोर.

तुम्ही गोमूत्र फ्लेवर नूडल्स ट्राय केलाय का ?
बाबा
गोरक्षकांसाठी फ्री गोमूत्र फ्लेवर नूडल्स डिस्ट्रिब्युट करतील काय ?

गणामास्तर's picture

5 Sep 2016 - 1:33 pm | गणामास्तर

च्यायला असला पण फ्लेवर आहे का नूडलसचा?
रच्याकने, कुणी पाण्याऐवजी गोमूत्रात शिजवत असतील काय नूडल्स ?

अभ्या..'s picture

5 Sep 2016 - 1:35 pm | अभ्या..

असतील ना काही यो गाईज.

पगला गजोधर's picture

5 Sep 2016 - 2:03 pm | पगला गजोधर

गो गाईज

भंकस बाबा's picture

4 Sep 2016 - 11:42 pm | भंकस बाबा

भंगार लागतात चविला, 100 टक्के सहमत,
वर ते खाताना रबर चावतो आहे अस् पण वाटते,
चव बघितलेल्यानी खुलासा करावा

अप्पा जोगळेकर's picture

7 Sep 2016 - 5:35 pm | अप्पा जोगळेकर

नूडल्स हा पदार्थच भंगार आहे.
पतंजलीला कशाला शिव् देताय ?

या तुम्ही सूप नूडल्स केल्यात की! एकूण नूडल्स हा प्रकार आवडत नाही त्यामुळे पाकृला पास!

नूडल्सच्या एवजी शेवया चालतील का?

अरे पिंगू दगडाची खीर म्हणून सांगितलेय ना, शेवया टाक, वळवटं टाक(हीहीही), राईस टाक, पास्ता टाक, वरणफळाच्या कशा बोट्या करतो तशा करुन टाक, अगदी चपाती कुस्करुन त्यात टाकले तरी भारी लागेल.

थोडंसं थुपकासारखं वाटतंय फोटोवरून.

पतंजली नुडल बेक्कार आहेतच ..
बाकी नेहमी स्वत:च्या व्यवसायाची इनडायरेक्ट जाहिरात करणार्यांचे इतरांना शिकवण देणारे प्रतिसाद वाचुन निर्वाण पावलो.

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 9:08 pm | संदीप डांगे

जेपी, तुमचा प्रतिसाद माझ्याबद्दल आहे असं दिसतंय, तेव्हा स्पष्ट मलाच बोललात तर बरे होईल, तिरकस टोमणे मारणे ह्याची गरज नाही.

मिपावर माझ्या व्यवसायाची मी इंडिरेक्ट जाहिरात मी कशी करतो व त्याने मला कोणत्याही माध्यमाने आर्थिक वा कसलाही फायदा कसा होतो/झाला आहे ह्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल,

कोणावर कसेही आरोप करण्याआधी ते सिद्ध करण्याची तयारी असेल तुमची अशी माझी अपेक्षा आहे,

अभ्या..'s picture

4 Sep 2016 - 9:11 pm | अभ्या..

ह्या बाबतीत पण सहमत संदीपरावांना.

पगला गजोधर's picture

4 Sep 2016 - 9:14 pm | पगला गजोधर

मी पण शमत

वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!

जयहिंद

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 10:43 pm | संदीप डांगे

एवढं सोपं आहे का जेपीसाहेब?
तुम्ही केलेला आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा.

असंका's picture

4 Sep 2016 - 11:30 pm | असंका

कोण कोणास म्हणाले...

मिपावर माझ्या व्यवसायाची मी इंडिरेक्ट जाहिरात मी कशी करतो व त्याने मला कोणत्याही माध्यमाने आर्थिक वा कसलाही फायदा कसा होतो/झाला आहे ह्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल

कोणावर कसेही आरोप करण्याआधी ते सिद्ध करण्याची तयारी असेल तुमची अशी माझी अपेक्षा आहे,

एवढं सोपं आहे का जेपीसाहेब?
तुम्ही केलेला आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा.

माझं व्यावसायिक अनुभव सांगतो: वरिल लिखाण हे इन्डायरेक्ट मार्केटींगचं उत्तम उदाहरण आहे.

पटाईतसर नेहमीच करतात हे माहितीये.
नवीन हे आहे की पतंजलीच्या जाहिरात अलौड आहेत का मिसळपाववर? तसे असेल तर जाहिराती, मार्केटींग अलौड आहे असे समजुया. आपल्या दोघांना बरे पैशे छापता येतील न लगा! मिसळपावला फुकट वापरायचं आणि क्लायंटकडून बिलं काढायची

=)) =))

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 11:34 pm | संदीप डांगे

असंकासाहेब, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोला, नुसत्या स्माइली टाकून प्रश्न सुटणारा नाही.

नुसती स्मायलीच दिसली काय डांगेसाहेब? बाकी काहीच नाही?
मग खरंच सुटणार नाही प्रश्न....

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 12:15 am | संदीप डांगे

मला सगळं दिसतंय, पण तुम्हाला नक्की काय म्हणायचंय हे माहित झाल्याशिवाय पुढे कसं बोलणार? दूधाचे चटके बसलेत इथेच मिपावर आधी, आता ताकही फुंकून प्यायची सवय लागली आहे. अन्यथा मी एक बोलणार मग तुम्ही त्याचे वेगळेच फाटे फोडायचे. त्यापेक्षा तुम्हाला काय सुचवायचंय ते स्पष्टपणे सुचवा, तर समजेल.

मला काहीच सुचवायचं नाही.
मला पडलेला प्रश्न सोडवायची कसलीही जबाबदारी इतर कुणावरही नाही याची मला जाणीव आहे.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 12:33 am | संदीप डांगे

माझ्या प्रतिसादवर तुम्ही प्रतिसाद दिला. माझेच प्रतिसाद एकामागोमाग एक विचारपूर्वक टाकले आहेत तुम्ही, आणि म्हणता काहीच सुचवायचं नाही?? ग्रेट. इतकंही वेड पांघरुन पेडगावला जायची काय गरज तुम्हाला पडली असावी?

मी पेडगावला पोचलोच आहे. पण बघतो तर काय!! तिथे आपण माझ्या आधीच पोचलेला होतात!!

डांगे साहेब मी आपल्यावर कसलाही आरोप केलेला नाही. मी फक्त विचार करत होतो की या सगळ्या वाक्यांची सुसंगती कशी लावायची.

जेपीसाहेबानी कुणाचेही नाव न घेता जे लिहिलं त्याबद्दल आपण त्यांच्याक्डून आपण माफीची आपेक्षा ठेवता. पण आपण तर थेट नाव घेउन तोच आरोप केला आहे पटाईत साहेबांवर. तेव्हा आपण तो कसा सिद्ध करणार याचा मला प्रश्न पडला आहे.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 2:44 am | संदीप डांगे

जेपीसाहेबानी कुणाचेही नाव न घेता जे लिहिलं त्याबद्दल आपण त्यांच्याक्डून आपण माफीची आपेक्षा ठेवता.

>> हे हे! कोणाचेही नाव न घेता?? वाटच पाहत होतो ह्या वाक्याची. ह्या धाग्यावर इन्डायरेक्ट मार्केंटीगबद्दल लिहिणारा मीच आहे, दुसरं कोणी बोललं का माझ्या आधी?? हास्यास्पद बचाव आहे हा, आणि फार बालीश. गो, फाइन्ड समथिंग बेटर!!

पण आपण तर थेट नाव घेउन तोच आरोप केला आहे पटाईत साहेबांवर. तेव्हा आपण तो कसा सिद्ध करणार याचा मला प्रश्न पडला आहे.

>> कसला आरोप?? जे लिहलंय ते त्यांच्याच आतापर्यंतच्या धाग्यांचा/प्रतिसादांचा आधार घेऊन लिहिलंय. आतापर्यंतच्या अनेक प्रतिसादांत्/धाग्यांमधे त्यांचे पतंजलीकडे 'अ‍ॅब्नॉर्मल इन्क्लिनेशन' आढळले आहे. वरील लेखात पटाइतसाहेब पतंजलीची जाहिरात करत आहेत.

जाहिरातकलेच्या भाषेत त्याला 'प्रॉडक्ट प्लेसमेंट थ्रू इन्डायरेक्ट मार्केटींग' म्हणतात. काही सर्वसामान्य माहितीतली अशी उदाहरणे देतो: बिसलेरीच्या येण्याआधी पेपरमिडियामधे 'रोज ८ ग्लास पाणी पिण्याचे महत्त्व' छापून यायचे. बिसलेरीचा धंदा वेगात होण्यामागे ह्या आर्टिकल्सचा हात जास्त आहे. चहा आरोग्यास हानीकारक असे समजले जायचे, पण दहा-बारा वर्षांपासून चहा आरोग्यास मदत करतो असे संशोधन झाल्याचे लोकल पेपरांतून छापून येत असते. तेच चॉकलेटचा डिप्रेशनवर, वाइनचा हार्टअटॅकवर कसा भारी उपयोग होतो हेही छापून येत असते, अनेक विद्यापिठांची काहीबाही संशोधनगाथा छापून येत असते. एखाद्या इन्डस्ट्रीला चालना देणार्‍या, धंदा वाढवण्यास मदत करणार्‍या अशा अनेक पेड बातम्या असतात, कथानकं, अनुभव असतात. दे आर पर्पजली क्राफ्टेड. बीन देअर डन दॅट!

Indirect marketing reminds the consumers about a product of which they are already aware. It is generic in nature, and no segmentation and targeting is required. The retention of customers is achieved through presenting them with symbolic representation without discriminating within the customers, and the immediate response of the customers cannot be recorded. Indirect marketers attempt to generate sales through online channels, such as blogging, videos and e-books. Manufacturers use indirect marketing when selling through wholesalers and other channels.

According to an article in the Houston Chronicle, examples of indirect marketing include: coupon mailings, trade shows, public relations, blogging, participating in workshops, free e-books and posting on social media.

Product placement, brand integration or embedded marketing, is an advertising technique used by companies to subtly promote their products through a non-traditional advertising technique, usually through appearances in film, television, or other media. Product placement stands out as a marketing strategy because it is the most direct attempt to derive commercial benefit from "the context and environment within which the product is displayed or used".

इथे अनेक सदस्य स्वतः वापरलेल्या प्रॉडक्टस्/सेवा/दुकाने/हॉटेले/पर्यटनाची ठिकाणे ह्यांबद्दल सतत लिहित असतात (काही लोक्स सतत बुलेट्स, ओल्डमंकचा जप करत असतात ते वेगळे) त्यात आणि इन्डायरेक्ट मार्केंटीगच्या कन्टेन्टमधे फरक सहज ओळखू शकतो इतका माझा व्यावसायिक अनुभव व अभ्यास आहे. असा छुपा मार्केंटींगचा प्रयत्न करणारे अनेक धागे-प्रतिसाद इथे मिपावर येतात व असंख्य मिपाकर त्याला पकडतात असाही अनुभव आहे. त्यामुळे मी बोलतोय ते काही मिसळपाववर नविन नाही.

आता मी माझ्या व्यवसायाची जाहिरात करतो का? हा प्रश्न का तर "आपण सांगे लोकाला शेंबुड आपल्या नाकाला" असं माझ्याबाबतीत होतंय असं जेपीसाहेबांना म्हणायचं आहे हे त्यांच्या प्रतिसादातून दिसतंय. म्हणून मी विचारले की मी कधी-कोणती-कशी मार्केंटींग केली ते सिद्ध करावे. आपल्या व्यवसायकौशल्याबद्दल बोलणे आणि ग्राहक मिळवण्यासाठी बोलणे ह्यात फरक असतो. व्यवसायकौशल्याबद्दल सांगावेच लागते कारण एखाद्या विषयावर व्यवसायानिमित्त संबंध आला असल्यास प्रतिसाद देणार्‍याच्या माहितीवर विश्वास ठेवता येतो. इथले डॉक्टर हे त्यांच्या व्यवसायाची माहिती देतात म्हणून अजयाताइंनी दातावर, म्हात्रे-खरेंनी सोनोग्राफीवर-इतर आजारांवर, बाबा पाटलांनी आयुर्वेदावर, आदूबाळांनी अकाउंटन्सीवर काही प्रतिसाद दिले तर ते विश्वासू समजले जातात. त्या व्यवसायासंबंधी इथे सांगणे हे तेवढ्यापुरते असते. त्याचबरोबर त्या प्रतिसादाची खातरजमा करायला दुसरे समव्यवसायिकही मिपावर असतातच.

ग्राहक मिळवण्यासाठी बोलणे: मी गेले दोन वर्ष मिपावर आहे, माझी सर्वप्रकारची माहिती मिपावर आहे, मी मिसळपाव हे ग्राहक मिळवण्याचे साधन समजतच नाही. कारण तशी गरज असणारे इथे नसतात. ज्यांना गरज असते त्यांना माझ्यापर्यंत पोचायला मिसळपावचा पूल वापरायची गरज नसते. गेल्या दोन वर्षात एकही मिपाकर माझा ग्राहक झालेला नाही. मुळात सोशल मिडियातून आम्हा लोकांना काम मिळवण्याची गरज पडत नाही. आमच्याकडे ग्राहक येण्याचा मार्ग वेगळा आहे, तो सोशल मिडियावर आम्हाला शोधत नसतो. मुळात आमचा ग्राहकवर्ग सोशलमिडियावर नसतोच. माझ्या अनेक समव्यवसायिकांमधे कोणालाही अशी सोशलमिडियावरुन कामे मिळाल्याची आठवण नाही. जालावरुन इतर काही वेबसाईट्सवरुन मिळतात, ज्या फक्त कामे मिळवण्यासाठी बनवलेल्या असतात. तिथे पोर्टफोलियो (आधीची कामे) बघून पुढची कामे मिळतात, तुम्ही कुठे किती बडबड केली आहे ते बघून नाही.

मी इथे माझ्या व्यवसायाची माहिती देतो ते मी जे बोलतो त्याला विश्वासार्हता मिळावी म्हणून. त्याला कोणी इन्डायरेक्ट मार्केटींग म्हणत असेल तर त्या व्यक्तिच्या अज्ञानाची किव येईल, बाकी काही नाही.

माझे ना पतंजलीशी काही वाकडे आहे, ना रामदेवबाबाशी ना पटाईतसाहेबांशी. खर्‍याखुर्‍या मेहनतीतून, तळागाळातून येऊन यशस्वी झालेले उद्योजक म्हणून रामदेवबाबा आणि बालकृष्ण यांच्याबद्दल नितांत आदर आहे. मार्केटींगसंदर्भात भविष्यत कधी पुस्तक लिहिले तर ह्या दोघांचा आणि पतंजलीचा आदरपूर्वक समावेश करणारच. पण मिपावर जाहिराती करु नयेत असा एक संकेत आहे असे आम्हाला ठावूक होते. मिसळपाववर अशा तर्‍हेचे कन्टेन्ट आले आहे हे व्यावसायिक अनुभवातून मला जाणवले ते मी सांगितले. मला जे दिसले ते स्पष्ट बोललो. ते चुकले असल्यासतेही कोणीही निश्चित व स्पष्ट सांगावे. टोमणे मारुन प्रश्न सुटत नाहीत, पण आपल्या विधानांची जबाबदारी घ्यायची नसते म्हणून टोमणे मारले जातात.

मिसळपावचे ह्या विषयासंबंधी अधिकृत धोरण जाहिररित्या काय आहे हे संपादक/मालकांनी स्पष्ट केल्यास खूप बरे होईल.

धन्यवाद!

दादा, नेमकेपणा हा एक लिखाणाचा गुण आहे असे निदान मी तरी समजतो.

जेपी साहेबांना आपण नक्की काय सिद्ध करायला सांगितलं होतंत ते एकदा परत मागे जाउन बघून या आणि या वरच्या प्रतिसादातला तेवढाच भाग जरा परत एकदा कोट करा, ज्याने तुमच्या मते तुम्ही ते सगळं पटाईतसाहेबांबद्दल सिद्ध केलेलं आहे. विशेषकरून पटाईतसाहेबांना काय अर्थिक फायदा झाला आहे हे स्पष्ट करणारा आणि ते सिद्ध करणारा भाग.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 9:44 am | संदीप डांगे

तुम्ही प्रतिसाद नीट वाचल्याचं दिसत नाही, पटाईत साहेबांना आर्थिक फायदा होतो असे मी कुठे म्हटलं, पतंजलीला आर्थिक फायदा होतो!ही पतंजलीची जाहिरात आहे, पटाईत काकांची नाही ;)

तसं तर मग जेपीही म्हणले नवते की कुणाला काही आर्थिक फायदा होतोय असं. पण तुम्ही ते त्यांना सिद्ध करायला सांगत होताच ना? नाही जमलं तर त्यांना ते एवढं सोपं नाही, सिद्ध करा नाही तर माफी मागा हे पण म्हणला होतात ना?

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 10:05 am | संदीप डांगे

मी माझ्या व्यवसायाची जाहिरात करतो असे त्यांनी म्हटले ती कशी एवढी सिद्ध करा म्हणलो,
वरील लेख जाहिरात कसा हे मी सांगितले. माझे बोलुन झाले आहे. तुम्ही नीट वाचत नाही यात माझा दोष नाही.
बाकी एक शंका, तुम्ही जेपींचे वकिलपत्र घेतले आहे काय?

असंका's picture

5 Sep 2016 - 10:30 am | असंका

जागा फार लहान होत चालली असल्याने हा संवाद (!) खाली नेतोय.

टवाळ कार्टा's picture

6 Sep 2016 - 9:48 pm | टवाळ कार्टा

एवढं सोपं आहे का जेपीसाहेब?
तुम्ही केलेला आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा.

हे वाचून रहावले नाही म्हणून लिहित आहे...आजच सकाळी कोणत्यातरी धाग्यावरची (बहुतेक पंख लागले असावेत त्या धाग्याला) तुम्ही व्यक्त केलेली "शंका" कोणत्या अंदाजाने केलेली असे कोणीतरी तुम्हाला विचारलेले तेव्हा त्यावरचे तुमचे उत्तर "शंका विचारतानासुध्धा पुरावे द्यायचे का" अश्या टैपचे होते...स्क्रीनशॉट घेणार्यांनी त्या प्रतिसादाचा स्क्रीनशॉट घेतला असेल तर चिकटवा रे ;)

टवाळ कार्टा's picture

6 Sep 2016 - 9:48 pm | टवाळ कार्टा

कोणावर कसेही आरोप करण्याआधी ते सिद्ध करण्याची तयारी असेल तुमची अशी माझी अपेक्षा आहे,

हे वाचून रहावले नाही म्हणून लिहित आहे...आजच सकाळी कोणत्यातरी धाग्यावरची (बहुतेक पंख लागले असावेत त्या धाग्याला) तुम्ही व्यक्त केलेली "शंका" कोणत्या अंदाजाने केलेली असे कोणीतरी तुम्हाला विचारलेले तेव्हा त्यावरचे तुमचे उत्तर "शंका विचारतानासुध्धा पुरावे द्यायचे का" अश्या टैपचे होते...स्क्रीनशॉट घेणार्यांनी त्या प्रतिसादाचा स्क्रीनशॉट घेतला असेल तर चिकटवा रे ;)

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 10:05 pm | संदीप डांगे

ठाम विधान आणि शंका यात फरक असतो का नसतो?
ठाम विधान असेल तर स्पष्टीकरण लागतं, शंका असेल तर गरज नाही.
शंका व्यक्त केली असती तर एवढं मनावर घेतलं नसतं.

देश's picture

4 Sep 2016 - 8:44 pm | देश

मस्त पाक्रु. कांदे टोमॅटो घालुन नेहमीच खातो. एकदा फ्रेंच बिन्स घालुन करुन बघतो.

देश

मनिमौ's picture

5 Sep 2016 - 6:14 am | मनिमौ

पण मिळतात आणी त्या ही तितक्याच भंगार लागतात.
पटाईत साहेबांच्या लेखात नूडल्स कुठल्या ब्रॅण्ड च्या आहेत हे लिहीण्याचा काहीच ऊल्लेख नाही

गणेश उमाजी पाजवे's picture

7 Sep 2016 - 10:41 pm | गणेश उमाजी पाजवे

हे पहा

एक हिरवी मिरची हि घेतली. सर्व साहित्य बारीक चिरून ठेवले. आमचे चिरंजीव पतंजलीचे दोन पेकेट दहा दहा रुपये वाले आटा नूडल्स ( ६० ग्रॅम प्रत्येकी) घेऊन घरी परतला.
इल्यूमिनाटस's picture

5 Sep 2016 - 6:45 am | इल्यूमिनाटस

हल्ली रामदेव बाबा माझ्या स्वप्नात येतात आणि म्हणतात

जैसें ताजे फ़लो को रहे हो चूस
वैसे है पतंजली के शुद्ध फ्रूट ज्युस

श्श्या(-_-;)

पगला गजोधर's picture

5 Sep 2016 - 7:54 am | पगला गजोधर

रामदेवबाबा शीघ्र कवी झाले होते, तेव्हा त्यांनी पोपटी स्पोर्ट्स शूज घातलेले काय ? भगव्या कफणीवर ....

;)
ह घ्या

इल्यूमिनाटस's picture

5 Sep 2016 - 8:23 am | इल्यूमिनाटस

तुम्हास कसे हो ठाऊक!?
आता तर मला फुल डॉट च आला ना भो
त्या दाढी आणि भगव्या कपड्यांमागे आपले साहेबच असतात की काय!?
ʕ•ٹ•ʔ

पगला गजोधर's picture

5 Sep 2016 - 8:59 am | पगला गजोधर

तुम्हास कसे हो ठाऊक!?

सुचतात, आम्हालाही अश्या कल्पना, वेळीअवेळी ।
कारण नाष्ट्यात खातो रोज आम्ही, अंडी अन केळी ।।

इल्यूमिनाटस's picture

5 Sep 2016 - 9:04 am | इल्यूमिनाटस

टीप :खालील कविता जमेल तितक्या खर्जात वाचावी

उद्या पाणी येणार नाही म्हणून मडक्यात पाणी साठवले
तुमची कविता वाचून आम्हाला रामदास आठवले!

अप्पा जोगळेकर's picture

7 Sep 2016 - 5:47 pm | अप्पा जोगळेकर

खल्लास. वारल्या गेलो आ।ए.

इल्यूमिनाटस's picture

7 Sep 2016 - 9:45 pm | इल्यूमिनाटस

(^o^)

चंपाबाई's picture

5 Sep 2016 - 8:46 am | चंपाबाई

बाबांच्या अवतारावर पूर्वी एका अवतारी आयडीने कविता लिहिली होती.

http://www.misalpav.com/node/18199

अभिजीत अवलिया's picture

5 Sep 2016 - 8:37 am | अभिजीत अवलिया

शक्यतो पाककृती विभागात मी जात नाही. ह्या धाग्यावर इतक्या प्रतिक्रिया आहेत म्हणजे मिपाकरांनी खूप वाहवा केलेल्या नूडल्स असतील असे वाटले. असो.
पतंजली नूडल्स भंगार लागतात ह्या बद्दल सहमत. एकदाच खाल्ल्या होत्या. परत कुणी आयुष्यभर फुकट पुरवल्या तरी खाऊ शकणार नाही.

या धाग्यात वर दिलेल्या माझ्या प्रतिसादामुळे जर कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर या ठीकाणी
मी जेपी (बिल्ला क्र.२२२८४) जाहीर माफी मागतो.
पहिला प्रतिसाद कुणा व्यक्तीला उद्देशुन नव्हता त्यामुळे कुणा विशिष्ट व्यक्तीची माफी मागणे शक्य नाही.

********
रच्याकने यामुळे एका तर्राट व्यक्तीमत्वसोबत झालेल्या सुसंवादाच रिपीट टेलीकास्ट चालु आहे अस वाटल.खाली कोट केलाय.
खरडफळ्यातल्या माझ्याविषयीच्या मजकूराबद्दल आपण माफी मागितली पाहिजे.

(इत्यलम)

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 10:59 am | संदीप डांगे

अनेकांची माफी मागायला लागावी असे कृत्य तुमच्याकडून रिपिटेडली घडत असावे असे तुम्हाला कधी वाटले नाही का जेपीसाहेब?

पगला गजोधर's picture

5 Sep 2016 - 11:19 am | पगला गजोधर

M

जेपी's picture

5 Sep 2016 - 11:01 am | जेपी

हाफशेच्युरी निमीत्त

अनेकांची माफी मागायला लागावी असे कृत्य तुमच्याकडून रिपिटेडली घडत असावे असे तुम्हाला कधी वाटले नाही का जेपीसाहेब?

त्याच कस आहे ना डांगे साहेब !
माझ्या वागण्यामुळे जर कोणी दुखावल जात असेल तर त्याची माफी न मागण्या ईतका निर्लज्जपणा माझ्यात अजुन आला नाही.
बाकी माझ्या वागण्यामुळे दुखावल्या गेल्यांची संख्या मिपावर ३ व्यक्ती इअतकी आहे.
काही लोकांना सवय असते स्वत:वर ओढुन घेण्याची..पण नाविलाज का क्या इलाज.
इथेच थांबु चर्चा वाढवण्यात काही अर्थ नाही.

पियुशा's picture

5 Sep 2016 - 11:53 am | पियुशा

धागा काय चाल्लाय काय ;)
असो मला आपले म्यगि नुडल्स च आवडतात य्म्म य्म्म्म य्म्म्म्म्म्म्म.........

असंका's picture

5 Sep 2016 - 12:44 pm | असंका

डांगेसाहेब,

आपण मला म्हणताय की-

तुम्ही नीट वाचत नाही यात माझा दोष नाही.

आणि वर दुसर्‍या एका प्रतिसादातसुद्धा आपण असं म्हणलं होतंत की,

तुम्ही प्रतिसाद नीट वाचल्याचं दिसत नाही

आपले प्रतिसाद जरा परत एकदा बघू या. सोयीसाठी आपण त्यांना नंबर देउ या-

आपण आता म्हणत आहात की-
१.

मी माझ्या व्यवसायाची जाहिरात करतो असे त्यांनी म्हटले ती कशी एवढी सिद्ध करा म्हणलो,

आणि त्याच्या आधी मात्र आपण म्हणला होतात -
२.

मिपावर माझ्या व्यवसायाची मी इंडिरेक्ट जाहिरात मी कशी करतो व त्याने मला कोणत्याही माध्यमाने आर्थिक वा कसलाही फायदा कसा होतो/झाला आहे ह्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल,
कोणावर कसेही आरोप करण्याआधी ते सिद्ध करण्याची तयारी असेल तुमची अशी माझी अपेक्षा आहे,

एवढं सोपं आहे का जेपीसाहेब?
तुम्ही केलेला आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा.

वर मी १. आणि २. असे क्रमा़ंक दिलेल्या आपल्याच दोन प्रतिसादांमध्ये काही फरक दिसतात का डांगेसाहेब? तुमच्या आधीच्या प्रतिसादात(प्रतिसाद क्र. २ मध्ये) आपण भरपूर आपेक्षा केलेल्या होत्या. नंतर मी प्रतिसाद द्यायला लागल्यावर तुम्हाला वाटायला लागलं की आपण फक्त आपल्या व्यवसायाची जाहिरात करतो असं ते जे म्हणतायत ते कसं तेवढंच सिद्ध करा असं म्हणला होतात. प्रत्यक्षात तसं नवतं. दुसर्‍यांकडून आपल्याला अशी आपेक्षा होती की आपल्याला काय फायदा झालाय तेही त्यांनी सिद्ध करून द्यावं. नैतर पार आपली माफी मागितली जावी.

बहुतेक मी नीट वाचत असेन असं आता आपल्याला वाटतं का?

तुमच्य सोयीसाठी अजून एक उजळणी करू-
जेपीं काय म्हणले होते?

बाकी नेहमी स्वत:च्या व्यवसायाची इनडायरेक्ट जाहिरात करणार्यांचे इतरांना शिकवण देणारे प्रतिसाद वाचुन निर्वाण पावलो.

त्यावर आपली आपेक्षा काय होती?

मिपावर माझ्या व्यवसायाची मी इंडिरेक्ट जाहिरात मी कशी करतो व त्याने मला कोणत्याही माध्यमाने आर्थिक वा कसलाही फायदा कसा होतो/झाला आहे ह्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल,

तुम्ही केलेला आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा.

आपण काय म्हणाला होतात?

माझं व्यावसायिक अनुभव सांगतो: वरिल लिखाण हे इन्डायरेक्ट मार्केटींगचं उत्तम उदाहरण आहे.

पटाईतसर नेहमीच करतात हे माहितीये.

नवीन हे आहे की पतंजलीच्या जाहिरात अलौड आहेत का मिसळपाववर? तसे असेल तर जाहिराती, मार्केटींग अलौड आहे असे समजुया. आपल्या दोघांना बरे पैशे छापता येतील न लगा! मिसळपावला फुकट वापरायचं आणि क्लायंटकडून बिलं काढायची.

हे आपण सिद्ध कसे केलेत? सिद्ध करण्याची आपली स्वतःकडून आपेक्षा काय होती?-

वरील लेख जाहिरात कसा हे मी सांगितले. माझे बोलुन झाले आहे.

मंजे तुम्ही इतके मोठे एक्स्पर्ट आहात की तुमचा शब्द हाच पुरावा? आणि इतर कुणी मात्र काही बोलले की पार आर्थिक फायदा वगैरे सिद्ध करून द्यायचा नैतर आपली माफी मागायची?

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 1:05 pm | संदीप डांगे

मंजे तुम्ही इतके मोठे एक्स्पर्ट आहात की तुमचा शब्द हाच पुरावा?

>> एवढाच निष्कर्ष काढायचाय तर एवढ्या मेगाबायटीची गरज नाही. तुमचा रोख समजला. धन्यवाद!

असंका's picture

5 Sep 2016 - 1:07 pm | असंका

हा माझा निष्कर्ष नाही.

आता "सिद्ध करा किंवा माफी मागा" बद्दल आपलं काय मत आहे? तेवढं सोपं नाही ना ते?

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 1:41 pm | संदीप डांगे

म्हणजे??

असंका's picture

5 Sep 2016 - 2:05 pm | असंका

_/\_

आणि मला म्हणताय की वेड पांघरून पेडगावला वगैरे...!!

तुम्ही केलेला आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा

हे तुमचंच वाक्य तुम्हाला लागू होत नाही का? तुम्ही सुद्धा पटाईतसाहेबांवर आरोप केलेत ना?
मग करा की सिद्ध त्यांना काय आर्थिक फायदा झाला ते ; नाहीतर मागा माफी - म्हणजे तुमच्या शब्दाची तुम्हाला चाड असेल तर बरं का.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 3:30 pm | संदीप डांगे

बाद'वे, 'तुम्ही' का मला माफी मागा असा सांगत आहात? मी 'तुम्हाला' दुखावलंय का?

मी खरं तर फक्त विसंगती दाखवून गप्प बसलो होतो. पण तुम्ही मला आव्हान देत गेलात. मी दुर्लक्ष केलं तर माझ्या खरडवहीत पोचलात. तेही दोन वेळा.

जरा मागे जाउन भाषा बघा आपली- "आपण नीट वाचत नाही, यात माझा दोष नाही, वेड पांघरून पेडगावला जाणे, बालिश प्रतिसाद"! ही सभ्य माणसांची भाषा आहे का?

"बादवे", "रोख कळला", वगैरे बोलून विषय संपला असं दाखवायचा प्रयत्न करू नका. एक तर आरोप सिद्ध करा/माफी मागा किंवा तुम्ही जे बोलता तसं वागत नाही- स्वतःला दुहेरी मापदंड लावता हे मान्य करा. जर वाद तडीला लावता येत नसतील तर इतर लोकांना वादाला भरीला घालू नका.

अभिदेश's picture

7 Sep 2016 - 1:05 am | अभिदेश

ते सर्वज्ञ आहेत असा त्यांचा दावा आहेच. आपण दुसऱयांना वापरलेली भाषा ते विसरतात आणि दुसऱयांकडून मात्र माफीची अपेक्षा करतात.

क्षमस्व's picture

7 Sep 2016 - 8:40 pm | क्षमस्व

शिव शिव शिव,
डांगेसाहेब असतांना मेगाबाईटी प्रतिसाद देण्याचे पाप केलेत, तेही त्यांच्याच प्रतिसादाला प्रत्युत्तर म्हणून?
घोर अपराध!!!!प्रायश्चित्त घ्यावे लागेल!!!

टाइम टू लिव्ह धिस प्लॅनेट!!!!
;)

बस का? अहो ते क्रेडीट माझं नै हो... त्या प्रतिसादात माझी स्वतःची अशी वाक्य किती कमी आहेत बघा की ! मी तर फक्त त्यांना त्यांच्याच एक एक वाक्याची आठवण करून देत होतो.

राहु दे ना मी इथे????

सप्तरंगी's picture

5 Sep 2016 - 2:00 pm | सप्तरंगी

पतंजली हा लोकांच्या भावनेवर चालणाऱ्या business चे उत्तम उदाहरण आहे.

माहितीपूर्ण पाकृ आणि प्रतिसाद.

इरसाल's picture

7 Sep 2016 - 12:10 pm | इरसाल

टाक तु अजुन ५ लि. पेट्रोल......;)

क्षमस्व's picture

5 Sep 2016 - 2:28 pm | क्षमस्व

नूडलमुळे पाककृती आली।
पाककृतीमुळे रामदेव बाबा आले।।
बाबामुळे मार्केटिंग आली।
मार्केटिंगमुळे डांगेसाहेब आले।।
त्यामुळे जेपीभाऊ आले।
जेपीमुळे माफी आली।।
आणि मेगाबाईटी प्रतिसाद बनले।।।

इतके अनर्थ एका नूडलने केले।।।।

क्षमस्व's picture

5 Sep 2016 - 2:29 pm | क्षमस्व

नूडलमुळे पाककृती आली।
पाककृतीमुळे रामदेव बाबा आले।।
बाबामुळे मार्केटिंग आली।
मार्केटिंगमुळे डांगेसाहेब आले।।
त्यामुळे जेपीभाऊ आले।
जेपीमुळे माफी आली।।
आणि मेगाबाईटी प्रतिसाद बनले।।।

इतके अनर्थ एका नूडलने केले।।।।

पगला गजोधर's picture

5 Sep 2016 - 2:57 pm | पगला गजोधर

जगी हीं भूमी, लोकसंख्या प्रचंड,
नेस्टले ते हेरी,म्हणे करू व्यापार ।
आणिले त्यांचे प्रॉडक्त, साधेसुटसुटीत चविष्ठ,
स्वस्त ते उपलब्ध आपुळ्याची दारी ।।
जनांमध्ये याचाच बोलबाला,
वाढतावाढे भेदिले नभाला, जवळपास कोणी नसे बा।।
बंद डॉळा बाबाचा, आपोआप उघडे, पाहुनिया राशी धनाचिया ।।
म्हणे तो स्वतःशी, गुंडाळू स्वदेशी,विसरून बोलबच्चन आपुलाची ।।
उघडले दुकान, विके विदेशी जंजाळ,
झाकीं स्वार्थ सारा, भगव्या आवरणी ।

क्षमस्व's picture

5 Sep 2016 - 3:25 pm | क्षमस्व

वा!!
_/\_

नूडल्स दिसतायेत छान, पण पतंजलीच्या असल्याने पास!! हीच पाकृ हातवळणीच्या शेवया, गव्हले, शिरवाळ्या वापरुन करणेत येईल

पगला गजोधर's picture

6 Sep 2016 - 7:23 pm | पगला गजोधर

दी बेश्ट प्रतिक्रिया...

इरसाल's picture

7 Sep 2016 - 12:35 pm | इरसाल

आज सकाळी जेव्हा मी माझ्या कर्लऑनच्या गादीवर अंथरलेल्या रेमंडच्या सुती बेडशीट वरुन उठलो. थोडे आळोखेपिळोखे देत आजु बाजुला पाहिले तर रिलायन्सची उशी, उषाचे शिलाईमशीन, क्रॉम्पटन्चा पंखा, ऑलाऔट्चे मच्छर पळवायचे मशीन फिलीप्स ची इस्त्री नजरेस पडली.
खाली पाय करुन जमिनीला टेकवावे म्हटले तर तिथे अ‍ॅक्शन्च्या रबरी सपाता, त्या पायात चढवुन सेराच्या वॉशबेसीन जवळ गेलो, कोलगेटच्या ब्रशवर पतंजलीची दंतकांती पेस्ट घेवुन, माझे अधिक पटेल डॉ. कडुन रुटकॅनल करुन घेतलेले २, असे सगळे दात खसा खसा घासले. नंतर डीमार्टमधुन आणलेल्या तांब्याच्या (ब्रांड माहित नाही माफी असावी) टंग क्लीनरने जीभ साफ केली. मग कोलगेट कंपनीच्या माउथवॉशने चुळ भरुन बाथरुमचा रस्ता धरला. जाताना टर्किश प्रकारचा टॉवेल ( ब्रांड माहित नाही माफी असावी) घेवुन गेलो. तिथे ठेवलेल्या मेडिमिक्स या साबणाने आंघोळ केली. मग बाहेर येवुन जॉकीचे अंतर्वस्त्र परिशान केले. पुन्हा टॉवेल गुंडाळुन मग चिनीमातीच्या कपात (ब्रांड माहित नाही माफी असावी) ताजमहाल या चहापावडर ने बनवलेला आणी अमुलचे शक्ती दुध टाकलेला चहा अमुलच्याच टोस्ट बरोबर घेतला.(साखर टाकली नाही आणी साखरेचा ब्रांडही माहित नाही माफी असावी).
युनिफॉर्म घालुन (ब्रांड माहित नाही माफी असावी) त्यावर हायटेक कंपनीचे सेफ्टी शुज चढवुन ह्युंदाई च्या गाडीत बसुन स्वतः चालवत कंपनीत आलो. आणी हा प्रतिसाद लेनोव्हो नामक कंपनीच्या थिंकपॅड नामक लॅपटॉप वरुन देत आहे.
बाजुलाच सोनीचा मोबाईल, कॅशिओचे घड्याळ, भिंतीवर कॅरियरचा एसी चालु आहे.

असंका's picture

7 Sep 2016 - 4:41 pm | असंका

=))

संजय पाटिल's picture

7 Sep 2016 - 5:29 pm | संजय पाटिल

नाव सार्थ केलेत...

संदीप डांगे's picture

7 Sep 2016 - 8:30 pm | संदीप डांगे

एक नंबर!!!
ह्याला म्हणतात प्रतिसाद!!!

मनापासून आवडले __/\___

क्षमस्व's picture

7 Sep 2016 - 8:55 pm | क्षमस्व

खट्याक।।।।

रुपी's picture

7 Sep 2016 - 11:51 pm | रुपी

=)

चित्रगुप्त's picture

8 Sep 2016 - 12:33 am | चित्रगुप्त

इरसाल यांचा इरसाल प्रतिसाद प्रचंड आवडला.