सध्या मिपावर आंबा पाकृचा पाऊस पडतोच आहे तर आपण पण थोडे भिजवुया या प्रांजळ विचाराने प्रेरित होउन ही पाकृ देते आहे. ही पारंपारिक सारस्वत पा़कृ आहे. ह्या पाकृसाठी खास रायवळ आंबे उत्तम. कोकणात, गोव्यात ह्या जातीचे आकाराने मोठे आंबे पहावयास मिळतात. मुंबईत मात्र लहान लहान असतात. पण चवीला गोड असले की झाले.
साहित्य -
६ रायवळ आंबे
१ वाटी ओले खोबरे
१/२ वाटी किसलेला गूळ
१/२ चमचा लाल मिरची पावडर
१/४ चमचा मोहरी
१/२ चमचा साजूक तूप
चिमूट्भर मीठ.
कृती -
१. आंब्यांचा रस काढून घ्यायचा. बाटे/कोयी तशाच ठेवा. फेकू नका.
२. साजूक तूपात मोहरी मस्त खमंग भाजून घ्यायची. तडतडण्याची गरज नाही. (मोहरीला हो!)
३. मिक्सर मध्ये खोबरे, भाजलेली मोहरी, तिखट, मीठ आणि आंब्याचा रस एकत्र करुन बारिक वाटून घ्यायचं. पाणी शक्यतो घालू नका.
४. आता गूळ घालुन पुन्हा जरासं वाटायचं.
५. मग हे मिश्रण त्या पिळून उरलेल्या, जीव नसलेल्या बाट्यांवर ओतायचं. थोडंसं प्यायचं पाणी मिक्सर मध्ये घालून मिक्सरला चिकटलेलं काढून घ्या. (बिन्धास्त! आपलच घर असतं. घाबरायची/लाजायची गरज नाही.)
६. आता हाताने सर्व एक्जीव करायचं. हाताने केलं की गूळाचा खडा राहीला नाही ना ह्याची खातर्जमा करता येते. (आणि शिवाय तो हात चाटुन घेतला की आपल्या वाट्याला थोडंसं जास्त येतं. असो!)
झालं की सासम तयार! आता चपाती/पोळी बरोबर ताव मारायला तुम्ही मोकळे.
करून बघा आणि आवडलं का ते मला नक्की कळवा बरं...
सूचना -
ही पारंपारिक कृती आहे. तेव्हा दिलेल्या कृतीत बदल/फेरफार करू नये.
उदा. हळद घालणे, गरम करणे, फोडणी देणे इ.
गेल्या कैक वर्षांत मीदेखील तशी हिम्मत केली नाही. तेव्हा तुम्हीही करु नये ही विनंती. :)
- उल्का कडले.
प्रतिक्रिया
3 Jun 2016 - 12:25 pm | अनिरुद्ध प्रभू
पहिल्यांदा मिपा सैराटमय झाले होते...आता आंबामय...चालु द्या जोरात......
(रचाक्याने:-)मी पहिला)
(आंबाप्रेमी)
आनिरुद्ध
3 Jun 2016 - 12:38 pm | उल्का
मान्य! पण आता नाही दिलं तर मोसम संपून जाइल. म्हणुन म्हंटल 'होऊ दे आंबामय'!
3 Jun 2016 - 1:04 pm | अनिरुद्ध प्रभू
ह्या आंबामय लेखमालीकेत 'आंब्याची भूर्जी' चा नंबर कधी लागतोय याची वाट बघतोय.....
3 Jun 2016 - 12:26 pm | यशोधरा
लिहायची शैली आवडली.
3 Jun 2016 - 12:40 pm | उल्का
पाकृ करुन बघा. नक्की आवडेल. :)
3 Jun 2016 - 12:43 pm | यशोधरा
सारस्वत पाकृवरच जगते आहे मी :)
3 Jun 2016 - 1:29 pm | उल्का
मग सेम पिंच म्हणते :)
3 Jun 2016 - 1:33 pm | यशोधरा
:)
3 Jun 2016 - 12:55 pm | सस्नेह
http://www.misalpav.com/node/21337
इथे पूर्वी वाचली होती.
3 Jun 2016 - 1:44 pm | उल्का
मला माहित नव्हते.
3 Jun 2016 - 1:07 pm | कंजूस
quora dot com वरच्या कोणत्याही मराठी लिखाणाची लिंक हवी आहे.
3 Jun 2016 - 1:39 pm | उल्का
3 Jun 2016 - 1:42 pm | उल्का
लिंक आलीच नाही.
आता लिहुनच देते.
https://jaymaharashtra.quora.com
3 Jun 2016 - 4:50 pm | कंजूस
हा वर्डप्रेससारखा ब्लॅाग क्वोराच्या सर्वरवर चालवला जातोय असं दिसतंय.मेन बोर्डावर एक प्रश्न मराठीत मुद्दमहून विचारला तर " needs editing" आलं.
उल्का,तुम्ही क्वोरा मराठीशी संबंधित आहात असं कळलं म्हणून इथे विचारलं.-सर्वांना दिसेल म्हणून.धन्यवाद.
( अवांतर झालं इथे)
3 Jun 2016 - 6:10 pm | उल्का
हो! मी त्या ब्लॉगची एक संपादक आहे. संस्थापक एक तमिल भाषिक मुलगा आहे ज्याला मराठी नीट बोलता येतं व आवडतंही. :)
तिथे मराठीत कुठेच नाही टाईप करता येत. मी स्वतः गूगल इन्पुट वरुन कॉपी पेस्ट करते. ब्लॉग वर इतर भाषेत लिहिलं तर चालतं म्हणुन आम्ही इथे मराठीत लिहितो. इतर कोणीही 'सब्मिट पोस्ट' करुन लिहु शकतात. ती पोस्ट स्वीकारणे हे संपादकाचे (निदान सध्यातरी) मुख्य काम आहे.
मात्र उतर देताना मराठीत काही लिहिलत तर त्याचे उच्चारण व भाषांतर दोन्ही इंग्रजीतुन द्यावेच लागते.
3 Jun 2016 - 9:43 pm | कंजूस
हे मला अजयाने सांगितलं की तुम्ही मराठीचे संपादक आहात.परंतू मेन बोर्डावर प्रश्न मराठीत विचारून व्यापक पोहोच मिळते/मिळेल तशी ब्लॅागवरती नाही मिळणार.
3 Jun 2016 - 1:31 pm | त्रिवेणी
मी हापुस च करेन.
खुप आहेत घरात.तेच संपवते.
आज शिरा केला पुढच्या आठवड्यात कढ़ी आणि सासव दोन्ही.
3 Jun 2016 - 1:54 pm | उल्का
मी हापूसच कधी नाही खाल्लं आहे. कसं झालं ते जरूर सांग.
3 Jun 2016 - 1:43 pm | सौंदाळा
मस्त
सारस्वत पा़कृ वरुन आठवले - अनसाफणसाची पाककृती मिळेल का?
सध्या दोन्हीचा हंगाम चालु आहे :)
3 Jun 2016 - 1:52 pm | उल्का
काय पण आठवण काढलीत?
मी खाऊन खूप वर्षं लोटली. सासुबाईनी बनवली होती. मी कधी नाही बनवली. त्यांना विचारून पाहते. पण फोटो नाही डकवता येणार. :)
3 Jun 2016 - 3:39 pm | सौंदाळा
नक्की द्या इकडेच किंवा खरड केली तरी चालेल
मी तर कधीच खाल्ली नाही फक्त (म्हातार्या नातेवाईकांकडुन) ख्याती ऐकली आहे. हा पदार्थ नामशेष झाला की काय असेच वाटते.. कोणालाच माहित नाही :(
मागे एकदा पेठकर काकांना विचारले होते त्यांना पण नक्की माहित नव्हते :(
3 Jun 2016 - 4:10 pm | सस्नेह
लिंक अनसा-फणसाच्या भाजीची.
https://www.youtube.com/watch?v=S3kG0CoAl0k इथे अगदी छान दिसतेय.
http://www.marathiworld.com/bhajya6
http://tastee-n-healthee.blogspot.in/2011/04/pineapple-jackfruit-veggie....
3 Jun 2016 - 4:58 pm | सौंदाळा
व्वा मस्तच
अननस बाजारातुन आणता येतील. मंगळवारीच कोकणातुन आणलेले आंबे आणि कापा फणस घरी आहे. फणस उद्या परवाकडे होईलच.
ही लिंक दाखवुन घरी करायला लावतो.
धन्यवाद _/\_
3 Jun 2016 - 6:13 pm | उल्का
फणस खूप मऊ, पिकलेला नाही चालत असे ऐकुन आहे. बहुदा शिजताना विरघळत असावा म्हणुनही असेल.
3 Jun 2016 - 6:11 pm | उल्का
धन्यवाद!
करणार नाही तरी बघते नक्की.
4 Jun 2016 - 8:55 pm | उल्का
दुसरी रेसिपी अगदी बरोबर आहे. यु ट्युबची पारंपारिक नाही आहे.
3 Jun 2016 - 2:33 pm | सूड
वाह वाह, जीव कसा गार्डन गार्डनझाला.
वीकांताला करुन पाहीन.*
*असं म्हणायची हल्ली फ्याशन आली आहे म्हणे.
3 Jun 2016 - 3:21 pm | पद्मावति
फारच मस्तं!
3 Jun 2016 - 3:40 pm | रेवती
छान पाकृ.
जय आंबे!
3 Jun 2016 - 4:31 pm | पिशी अबोली
3 Jun 2016 - 4:31 pm | पिशी अबोली
5 Jun 2016 - 11:08 pm | किसन शिंदे
घाटावरही रायवळ शब्द वापरला जातो.
4 Jun 2016 - 8:52 am | पैसा
आवडता प्रकार. फोटो खूप छान आलाय.
4 Jun 2016 - 9:57 am | सानिकास्वप्निल
छान पाकृ.
4 Jun 2016 - 8:58 pm | उल्का
सर्वांचे आभार. केल्यास फोटो डकवा.
पैसा, मला वाटलेलं तुला माहित आणि आवडत असणार. :)
रेवती, जय आंबे तुला पण. :प :ड
5 Jun 2016 - 10:01 pm | अजया
जय उल्का! छान पाकृ.
6 Jun 2016 - 6:27 pm | अनन्न्या
मस्त मस्त