साहित्यः
पाऊण लिटर ताक,
दोन मोठ्या हापूस आंब्यांचा रस,
जिरं,
मोहरी,
कडीपत्ता,
हिंग,
दोन मिरच्या बारीक चिरून,
साखर मीठ आवडीनुसार
कृती:
ताक , मीठ , साखर आणि आंब्याचा रस एकत्र करायचा.
साजूक तुपात मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, मिरच्यांची फोडणी करून ताक आणि आंब्याच्या मिश्रणात ओतायची.
थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं.
*फेसबुकावर पूर्वप्रकाशित.
प्रतिक्रिया
1 Jun 2016 - 7:40 pm | रेवती
रेसिपी वेगळी, छान आहे. ही पाकृ गारच उपयोगात आणावी लागत असेल.
1 Jun 2016 - 7:54 pm | स्पा
बरीये
1 Jun 2016 - 8:38 pm | प्रचेतस
आंबे हे आंबे म्हणूनच खावेत किंवा रस करून. कढी वगैरे करून असं वाया घालवणं म्हणजे महापाप.
1 Jun 2016 - 9:12 pm | सूड
हा विचार वर घाटावरच येऊ शकतो. कोकणात आंबे मुबलक मिळतात, मग त्याचं काय करु नि काय नको असं होतं. इकडे आंब्यांची कमतरता त्यात कोकणातल्या सुग्रणींपेक्षा घाटावर पाककला अंमळ कमीच, त्यामुळे चालायचंच!! :)
1 Jun 2016 - 9:16 pm | सतिश गावडे
उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषालाही सुगरण म्हणतात का?
1 Jun 2016 - 9:38 pm | प्रचेतस
ते उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषाला विचारावं लागेल.
1 Jun 2016 - 10:18 pm | सूड
अगदी!!
1 Jun 2016 - 9:55 pm | असंका
मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठम् इंधनम् कुरुते।
तसंच काहीसं ना?
1 Jun 2016 - 8:46 pm | पद्मावति
छान आहे. वेगळा प्रकार. करून बघीन नक्की.
1 Jun 2016 - 9:00 pm | सतिश गावडे
छान रेसिपी. या विकांताला करुन पाहीन.
1 Jun 2016 - 9:25 pm | जेपी
अवघड आहे.
आमरस आणी कढी या दोन वेगळे पदार्थ खाण्यासाठी आहेत असा समज आहे..
1 Jun 2016 - 9:28 pm | सतिश गावडे
हा विचार वर घाटावरच येऊ शकतो. कोकणात आंबे मुबलक मिळतात, मग त्याचं काय करु नि काय नको असं होतं. इकडे आंब्यांची कमतरता त्यात कोकणातल्या सुग्रणींपेक्षा घाटावर पाककला अंमळ कमीच, त्यामुळे चालायचंच!! :)
1 Jun 2016 - 9:33 pm | प्रचेतस
उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषालाही सुगरण म्हणतात का?
1 Jun 2016 - 9:36 pm | सतिश गावडे
ते उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषाला विचारुन सांगतो.
1 Jun 2016 - 9:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोण कोणाचा प्रवक्ता आहे ते अगोदर जाहीर करा बघू :) ;) =))
1 Jun 2016 - 9:44 pm | प्रचेतस
=))
2 Jun 2016 - 8:37 am | नाखु
वेगळा (आणि खरच मला माहीत नसलेला )पदार्थ अज्मावून बघायला हरकत नाही. मला करता येईल का ते माहीत नाही.धन्याने केल्यास आस्वाद घ्यायला नक्की येईल.
ता.क. वल्ली (इतरांसाठी प्रचेतस आम्च्या साठी वल्लीच० नक्की कुणाच्या बाजूने आहीत आंब्याच्या की कढीच्या ?
1 Jun 2016 - 9:42 pm | कंजूस
यालाच कोयाडं / सासव म्हणतात. ही पाककृती गुजराती चानेल कलर्स ( इटिव्हि) वर दाखवलेली परवा.त्याला ते लोक फजितो म्हणतात.
1 Jun 2016 - 9:46 pm | रमेश भिडे
धोकलोउंधियोडॉटकॉम वर टाकली गेली असेल ही पाकृ नाई का?
1 Jun 2016 - 10:17 pm | सूड
सासव निराळं. ओलं खोबरं, सुक्या मिरच्या आणि मोहरी हे असतात सासव बनवताना आणि फोडणी नाही.
2 Jun 2016 - 7:01 am | यशोधरा
नै, नै सासव निराळं. त्यासाठी झाडी/ गावठी आंबेच हवेत. त्यांची चवच अलग असते. कोकणातही फारसे मिळत नाहीत :(
2 Jun 2016 - 7:08 am | प्रचेतस
=))
2 Jun 2016 - 10:32 am | यशोधरा
हसायला काय झालं? आँ?
संवेदनाशील मोड संपला काय तुमचा? =))
2 Jun 2016 - 10:42 am | प्रचेतस
आम्ही कधी संवेदनाशील होतो ब्वा?
2 Jun 2016 - 10:52 am | यशोधरा
कातरवेळी.
2 Jun 2016 - 11:01 am | प्रचेतस
छ्या.
अशा रम्य कातरवेळा असता कोण संवेदनशील होणार उगा :)
2 Jun 2016 - 11:05 am | यशोधरा
ब्वॉर्र बरंका ब्वॉर्र्च! =))
2 Jun 2016 - 11:09 am | प्रचेतस
=))
2 Jun 2016 - 7:16 am | मुक्त विहारि
ते कुठल्यातरी गावांत श्रीखंडाच्या पाण्याची थंड कढी करतात तुम्ही पण असेच करा....
अरे,
कुठे नेवून ठेवली आहे आमची खाद्य-संस्कृती????????????????????////
2 Jun 2016 - 8:18 am | चतुरंग
"का त्या हापूसवरती असा 'सूड' उगवतो आहेस?" असा विचार मनात आल्याखेरीज राहिला नाही.. ;)
(आंबा/कढी प्रेमी)रंगा
2 Jun 2016 - 9:39 am | तिमा
हेच्च मनांत आलं होतं!
2 Jun 2016 - 9:32 am | आनन्दा
आंब्याची आमटी पण करतात. आंबट आंबा असेल तर उत्तम, नाहीतर आमसुल घालून पण चालते.
2 Jun 2016 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आंब्याची भजी काय, आंब्याची कढी काय, मला हे सर्व एकमेकांच्या विरुद्ध चवी वाटतात. पण चला पाककृतींची ओळख होते.
छान पुपाशु.
-दिलीप बिरुटे
2 Jun 2016 - 10:43 am | किसन शिंदे
मस्त पाककृती!!
2 Jun 2016 - 11:02 am | सतिश गावडे
विकांताला करुन पाहणार नाही का?
2 Jun 2016 - 11:03 am | प्रचेतस
ते वीकात करतील.
2 Jun 2016 - 11:27 am | सस्नेह
कढीत आंब्याची झलकसुद्धा दिसत नाही. तस्मात आंब्याचा फटू वेगळा टाकावा.
2 Jun 2016 - 11:52 am | अनन्न्या
पण मला ती आवडत नाही, त्यामुळे त्याची रेसिपी नाही देणार!
सूड, मस्त रेसिपी, छान लागते ही कढी.. थोडे नारळाचे दुध मिसळा आणि आंबा थोडा आंबट चवीचा हवा.
हापूसचे गोड प्रकार जास्त चांगले होतात.
अर्थात हे माझे मत!!!!!!!!!!
2 Jun 2016 - 2:33 pm | सूड
आमच्याकडे सहा जण जेवायला असताना पातेलंभर केलेली ही कढी शेवटी बघायलासुद्धा उरली नाही. कढी पिणार्याला सुरुवातीला दोनेक सेकंद कसली कढी आहे ते समजून घेण्यात जातात आणि शेवटी आंब्याची मस्त चव जीभेवर रेंगाळत राहते.
मला एकदा निव्वळ नारळाचं दूध घालून करून बघायची आहे.
@रेवती: हो, थंडच वापरावी लागते.
2 Jun 2016 - 2:42 pm | त्रिवेणी
ही खरी खरी पाककृती आहे का कुणीतरी सांगा राव.
नाहीतर खरच करायला जाईन आणि मग उद्धार होईल ते वेगलच्.
2 Jun 2016 - 2:48 pm | सतिश गावडे
तुम्हाला खरी वाटली??
2 Jun 2016 - 2:51 pm | सूड
ओये, खरी आहे ही पाकृ. खरी वाटली म्हणजे काय?
3 Jun 2016 - 10:36 am | सतिश गावडे
मला माहिती आहे रे खरी आहे ते. तुझ्या सुगरणपणाची माहिती आहे मला. त्यांनी अविश्वास दाखवला तर मी जरा गंम्मत केली.
2 Jun 2016 - 2:53 pm | सूड
करणार असाल तर नुसती प्यायच्या हिशोबात करा. भातावर घ्यायला वैगरे नको. ताक अमूलचं घेतलत तर बरं!!
2 Jun 2016 - 3:31 pm | त्रिवेणी
धन्यवाद.
उद्या दुपारी करते आणि फ़ोटो टाकते इकडे.
डाळीच्या पीठाच आलान नाही लावयचे का?
2 Jun 2016 - 3:34 pm | सूड
नाही नाही, रसाचा घट्टपणा पुरतो. आणि याला उकळी काढायची नाहीये, पीठ लावून कसं चालेल!!
2 Jun 2016 - 5:04 pm | पैसा
पुढच्या वेळी ताकाऐवजी नारळाचे दूध आणि हापूस ऐवजी रायवळ आंबे घेऊन बघ आणि फरक सांग
3 Jun 2016 - 9:43 am | नूतन सावंत
१००% सह्मत.
4 Jun 2016 - 10:09 am | सानिकास्वप्निल
वाह!! कढी छानचं दिसतेय.
मी खरंतर कढीप्रेमी नाही पण या पाकृत डाळीचे पीठ न लावल्यामुळे नक्की करुन बघणार: )
वाखु साठवलिये.