नो आय डोन्ट........

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 4:28 pm

तुला लग्न करायचय का नाही हे मला एकदाच आणि स्पष्ट सांग, म्हणजे मी तुझ्या परत परत मागे लागनार नाही, कळ्ल?

आई पुन्हा एकदा त्याच विषयावर येउन थांबली. आता तर हे रोजच झालं होतं. अजुन किती दिवस मी या सगळ्यापासुन पळणार आहे? कधी ना कधी सत्य सांगावच लागनार ना? कधी ना कधी तर आज का नको? बास झालं आता...... मी आहे अशी तर त्यात माझा काय दोष आहे? मी का लपवू सगळ्यांपासून .......... आज सांगायलाच हव. आज नाही तर कधीच नाही.
ह्म्म...................

'आई मला तुला काही सांगायचय.....माझ्या लग्नाबद्दल........................'

'ह्म्म....बोल कान आहे माझा तुझ्याकडे....ऐकतेय मी..' आई.

'आई मला खरतर लग्न करायचं नाही आहे......मुळात मी कुठल्याही मुलाशी लग्न करुन सुखी होउ शकत नाही....'

'म्हण़जे??????????? नक्की काय म्हणायचय आहे तुला?' आईला संशय आला असावा... बरं आहे एका द्रुष्टिनं म्हणा...

'जगात असा कुणितरी असेल ना जो तुला सुखी ठेउ शकेल?' तु त्याच्याशीतरी लग्न कर्शील ना?'

' नो आय डोन्ट आई...........जस्ट बिकॉज आय अ‍ॅम लिस्बिअन................'
.....................................................................................................................
................. .............................. .....................................

कथा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2016 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ठीक आहे, असं सांगण्याचं धाडस करणे पण आता त्यांचंही एक जग आहे, त्यात वेगळं असं काही, असं वाटतं.

लिहित राहा, चांगला प्रयत्न आहे.

- दिलीप बिरुटे

अनिरुद्ध प्रभू's picture

28 Apr 2016 - 9:24 pm | अनिरुद्ध प्रभू

१६० वाचनानंतर पहिला प्रतिसाद ....... धन्यवाद हां डॉकसाहेब

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 9:40 pm | विजय पुरोहित

सुंदर प्रयत्न...
भले अनेक वाचनानंतर का असेना?...
I support you...

अनिरुद्ध प्रभू's picture

28 Apr 2016 - 9:57 pm | अनिरुद्ध प्रभू

धन्यवाद राजे