मुलांमधे वाचन संस्कृती कशी वाढवावी? (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in लेखमाला
19 Apr 2016 - 5:41 pm

Header

लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. जसा आकार द्यावा तसा घडत जातो. मुलांच्या वाढत्या वयात पालक तसंच शिक्षक या दोघांचा ही त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो. वाचन, श्रवण, निरिक्षण व लेखन अशा विविध माध्यमातून मुलं सतत शिकत असतात. यापै़की 'वाचन' मुलांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा. विविध विषयातील वाचन फक्त आनंदच देत नाही तर त्यामुळे स्वविकासही साधता येतो. मुलांमधे वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी वाचनाची गोडी लहानपणी लागलेली उत्तम. मुलांमधे वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खालील काही गोष्टी करता येतील -

  • अगदी लहान, लिहीता - वाचता न येणार्‍या वयात चित्ररूपी गोष्टींची पुस्तकं आणावीत. अशा पुस्तकांमधे भरपूर चित्रं असतात. मोठी व रंगीबेरंगी चित्रांची पुस्तकं मुलांचं लक्ष पटकन आकर्षून घेतात. चित्रांच्या माध्यमातून सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवणं अधिक सोपं जातं.
  • छोट्या छोट्या गोष्टी असलेली पुस्तकं मुलांना झोपतांना नियमीत वाचून दाखवावीत. गोष्टी वाचतांना पुस्तकातला मजकूर मोठ्याने वाचल्याने शब्दातील चढ-उतार, योग्य उच्चार, शब्दार्थ समजून घेणं सोपं होतं. तसंच, पुस्तक वाचतांना एक-एक शब्दावर बोट ठेऊन वाचावे. पुस्तकातली छोटीशी गोष्ट पुन्हा पुन्हा वाचून मुलांना पाठ होते. अशावेळी गोष्टीचा थोडासा भाग वाचून दाखवून उर्वरीत भाग मुलांना पूर्ण करायला सांगावा.
  • पुस्तकातला एखादा नाट्यप्रसंग, थोरांची चरित्र दमदार आवाजात, साभिनय वाचून दाखवल्यास मुलांनाही उत्सुकता वाटते.
  • घरात मुबलक प्रमाणात पुस्तकं असावीतच पण पुस्तकं मुलांच्या चटकन हाताशी लागतील अशा ठिकाणी ठेवावीत. घरातच मुलांचं स्वतःचं असं वाचनालय तयार करता येईल. यामुळे मुलांचा पुस्तक विकत घेण्याकडे कल वाढेलच परंतु पुस्तकांबाबत आत्मीयताही वाढीला लागेल. सणवार अथवा वाढदिवस अशा प्रसंगी पुस्तकं जरुर विकत घ्यावं.
  • मुलांसाठी पुस्तक विकत घेतांना त्यांची आवड निवड बघून विकत घ्यावं. न कळत्या वयात मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी वयानुरुप पुस्तकं वाचायला द्यावीत. नक्की कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचावीत यावर पालक व शिक्षक योग्य ते मार्गदर्शन मुलांना करावं. आपलं मुलं कशा प्रकारची पुस्तकं वाचत आहे याकडे ही लक्ष असावं.
  • अनेकदा पालकांमधेच वाचनाबाबत औदासिन्य आढळतं. मुलांना वेळ घालवण्यासाठी बरेचदा पुस्तकांऐवजी व्हिडीयो गेम्स, निरनिराळ्या प्रकारचे खेळ आणून देण्यात पालकांचा कल दिसून येतो. नविन खेळण्याच्या जोडीला पुस्तकंही विकत घेऊन देता येईल.
  • शाळेत जाणार्‍या मुलांच्या वयातल्या मुलांना लहान मुलांची पुस्तक असलेलं वाचनालयाच सभासत्व घेऊन देता येईल.
  • जेवणाच्या टेबलावर पुस्तकांबाबत चर्चा करावी. यात मुलांनाही सहभागी करुन घ्यावं. अशा प्रकारच्या चर्चेतून मुलांची आवड समजून घेता येते. आपण वाचलेल्या एखाद्या पुस्तकातला आवडता भाग, प्रसंग यावर मुलांसोबत चर्चा जरूर करावी. मुलांनी वाचलेल्या पुस्तकाबाबत त्यांचं मत जाणून घ्यावं.
  • आपल्या शहरात भरणार्‍या पुस्तक - प्रदर्शनांना मुलांसोबत भेट जरुर भेट द्यावी. पुस्तक प्रदर्शनाद्वारे बाजारात येणारी नविन पुस्तकं, लेखक यांची ओळख होते. अशा प्रदर्शनात बरेचदा सवलतीत पुस्तक उपलब्ध असतात. त्याचाही फायदा घेता येईल.
  • उत्तम संभाषणकला अवगत होण्यासाठी भरपूर वाचनाची गरज असते. मुलांच्या पुस्तक खजिन्यात दंतकथा, सुभाषितांची पुस्तकं, थोरांची चरित्रं विविध प्रकारच्या पुस्तकांचा भरणा असला पाहिजे.
  • रोजच्या वर्तमापरत्र वाचनातून बरंच भरपूर माहिती , सामान्यज्ञान मिळतं. महिनाअखेर वर्तमानपत्रं फक्त रद्दी न बनता क्रिडाजगत, राजकारण, आंतराष्ट्रीय घडामोडी यांचं रोजचं वाचन मुलांनी करावं. वर्तमानपत्रातल्या आवडत्या रकान्याची कात्रणं कापून वहीत चिकटवून छानसा संग्रह करता येईल.
  • सखोल वाचनासाठी मुलांना आवडती वाक्य, उतारे अधोरेखित करायला सांगवेत. अर्थ समजून न घेता वरवर केलेलं वाचन लगेच विसरलंही जातं. अस्थिर मनाने, घाईघाईत केलेल्या वाचनापेक्षा एकाग्रतेने, सावकाश, अर्थ समजून घेत केलेलं वाचन केव्हाही फायद्याचं ठरतं.
  • पुस्तक वाचनासोबतच पुस्तकाची योग्य ती काळजी कशी घ्यावी याबाबत मुलांना लहानपणापासूनच मार्गदर्शन करायला हवं. पुस्तक योग्य रीतीने कसं हाताळावं, वाचून झाल्यावर जागेवर लावणं, पुस्तकाला कव्हर घालणं अशा छोट्या छोट्या सवयी लहानपणापासून अंगी बाणायला हव्या.
  • पुस्तक वाचनासाठी वेळ मिळत नाही ही पालकांची नेहमीची तक्रार. आजच्या धकाधकीच्या युगात वाचनासाठी वेळ काढणं हे थोडं आव्हानच आहे. पण त्याचवेळी आपण टि.व्ही. , इंटरनेट यामागे बराच वेळ वाया घालवतो. रोज दिनक्रमातून दहा-पंधरा मिनीटं फक्त वाचनासाठी बाजूला काढली तरी आठवड्यात एखादं छोटंसं पुस्तक वाचून संपवणं सहज शक्य आहे. दिवसातला अर्धा -एक तास टि.व्ही पूर्णपणे बंद करुन फक्त आणि फक्त पुस्तक वाचनासाठी ठेवावा.
  • आजकाल ऑडीयो बुक्सच्या माध्यमातून अनेक चांगली पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. प्रवासात अशा पुस्तकांचा करमणुकीसाठी चांगला वापर होतो. बाजारात नविन आलेले खास लहान मुलांसाठी बनवलेले 'किंडल' सारखे इ-रीडर प्रवासात नेण्यास व वाचनासाठी उत्तम!
  • मुलांच्या मित्रमैत्रीणींचा ग्रुप बनवून बुक-डेट किंवा बुक क्लबसाराखा एखादा प्रकल्प राबवता येईल. महिन्यातून एकदा सर्व मित्र-मैत्रीणी एकत्र येऊन पुस्तक वाचन करुन शकतात.
  • मुलांनी पुस्तक वाचावीत म्हणून पालक भरपूर पुस्तकं आणून देतात परंतु त्यातली नक्की किती पुस्तकं मुलं वाचतात याकडे बरेचदा लक्ष दिलं जात नाही. काही पानं चाळल्यावर मुलांचं कुतूहल संपतं आणि पुस्तक कोपर्‍यात ढकलली जातात. नविन काहीतरी सुरू करुन अर्धवट सोडणं हा मुलांचा स्वभावधर्मच आहे. मुलांना 'आरंभशूर' बनवू नका. त्यांच्या आवडीचं पुस्तक आणून देऊन वाचनाबाबत मार्गदर्शन करावं. एक पुस्तक वाचून झाल्यवरच दुसरं पुस्तक द्यावं. वाचनाची गोडी हळूहळूच वाढत जाते.

लहान मुलांसाठी वाचनास योग्य अशी काही निवडक मराठी पुस्तकं -

  • इसापनितीच्या ५०१ गोष्टी.
  • शामची आई
  • फास्टर फेणे
  • अकबर-बिरबलाच्या गोष्टी
  • हिंदू सण व उत्सव
  • महाभारतातल्या कथा
  • पंचतंत्र कथा
  • अरेबियन नाईट्स कथा
  • तेनालीरामा
  • सिंहासन बत्तीशी
  • हितोपदेश
  • आकाशाशी जडले नाते.
  • रामायणातल्या गोष्टी
  • अमर चित्रकथा
  • मालगुडी डेज
  • खडकावरला अंकुर
  • चिंगी

मराठी पुस्तकं मिळण्याची मुंबईतील काही निवडक दुकानं -

  • आयडीयल बुक डेपो, छबिलदास शाळेमागे, छाबिलदास रोड, दादर (प) मुंबई ४०००२८)
  • जगदिश बुक डेपो, सर्वोदय सुपर मार्केटच्यामागे, रानडे रोड, दादर (प) मुंबई ४०००२८
  • क्रॉसवर्ड, कॅडेल रोड, शिवाजी पार्क, दादर (प), मुंबई ४०००२८)
  • मॅजेस्टिक बूक डेपो, राममारूती रोड ,ठाणे
  • आझाद बुक डेपो, सर्वोदय सुपर मार्केटच्यामागे, रानडे रोड, दादर (प) मुंबई ४०००२८
  • मनोहर पुस्तक भांडार, दामोदर हॉलजवळ, परेल
  • जनता बुकस्टॉल, सिद्धीविनायक मंदीराजवळ, दादर (प)
  • राजहंस प्रकाशन, गोखले रोड, दादर (प)
  • बागडे बुक स्टोअर, मानपाडा रोड, डोंबिवली (पू)
  • ज्ञानदा ग्रंथसंग्रहालय, मानपाडा रोड, डोंबिवली (पू)

***
(प्रस्तुत लेख माझी आई - हर्षदा राणे हिने पुस्तक दिन विशेष लेखमालिकेसाठी लिहून दिलेला आहे.)

Footer

प्रतिक्रिया

छान लेख आहे.इतकी पुस्तकं घरात असूनही मूल अजिबात वाचत नाही अशी खंत असणाऱ्या मैत्रिणींना हा लेख पाठवते आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Apr 2016 - 7:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लहानपणापासुन हातात गॅजेटं द्यायचीचं नाहित. त्या ऐवजी पुस्तकं वाचायला द्यायची. आधी चित्रं असलेली मग त्याचा/तिचा कल पाहुन. किंबहुना आई वडील, थोरलं भावंड ह्यांनी त्या लहानग्यासमोर बसुन मिटक्या मारत पुस्तकं वाचली तर त्याला वाचनाविषयी कुतुहल निर्माण होतं. अश्या वेळी त्याचा कल असणार्‍या प्रकारची पुस्तकं त्याच्या हातात सोपवायची. अभिनंदन तुमच्या लहानग्याला वाचनाचं व्यसन लागलेलं आहे. स्वानुभव. माझ्या मातोश्री-पिताश्रींनी अशीचं वाचनाची आवड निर्माण केली. आता वाचन सुटता सुटत नाही. वर्क्ड फॉर मी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Apr 2016 - 7:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रच्याकने उत्तम लेख.

सानिकास्वप्निल's picture

26 Apr 2016 - 8:23 am | सानिकास्वप्निल

उपयुक्त माहिती देणारा उत्तम लेख. नव्या पिढित वाचनाची गोडी निर्माण कराण्यासाठी या लेखाची मदतचं होईल सगळ्यांना.

विशेष धन्यवाद श्रीमति हर्षदा राणे यांचे.

इडली डोसा's picture

26 Apr 2016 - 8:36 am | इडली डोसा

यातले ५०% मुद्दे जरी आमलात आणले तरी मुलांना वाचनाची आवड लागायची श्यक्यता कैक पटीने वाढेल...

किसन शिंदे's picture

26 Apr 2016 - 8:39 am | किसन शिंदे

विस्तृत लेख आवडला. इथे तुमचा काही गैरसमज झाला असावा असे वाटते. ठाण्यातले जगदिश बूक डेपो हे शैक्षणिक पुस्तकांसाठी ओळखले जाते आणि त्यातही मुख्यत्वे महाविद्यालयीन शिक्षणसाठीची पुस्तके तिथे प्रामुख्याने मिळतात. मराठी पुस्तकांचा सर्वात मोठा खजिना म्हणजे राममारूती रोडवरचे मॅजेस्टिक बूक डेपो!

हि चूक माझ्याही लक्षात आली नाही. संपादक मंडळाला विनंती वरील लेखात "जगदिश बुक डेपो, शिवा़जी पेठ, ठाणे (प)" या ऐवजी "मॅजेस्टिक बूक डेपो, राममारूती रोड ,ठाणे" असा बदल करता येईल का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Apr 2016 - 6:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बदल केलेला आहे.

सर्व पालकांसाठी उपयुक्त लेख.. ती यादी वाचुन परत ती सगळी पुस्तके वाचावेसे वाटतेय.

NiluMP's picture

26 Apr 2016 - 9:33 pm | NiluMP

Can some1 suggest good english book for Kids to develop reading habbit in them.

सिरुसेरि's picture

27 Apr 2016 - 9:39 am | सिरुसेरि

लहान मुलांसाठी वाचनास योग्य अशी काही निवडक मराठी पुस्तकं -
. आईची देणगी - गो. नी. दांडेकर
. देश विदेशच्या परीकथा - मालती दांडेकर
. जातक कथा

स्मिता श्रीपाद's picture

27 Apr 2016 - 3:27 pm | स्मिता श्रीपाद

छान माहितीपूर्ण लेख

मधुरा देशपांडे's picture

27 Apr 2016 - 3:36 pm | मधुरा देशपांडे

सगळे मुद्दे आवडले आणि पटले. आईला धन्यवाद सांग या लेखासाठी.

सस्नेह's picture

30 Apr 2016 - 1:27 pm | सस्नेह

सगळे मुद्दे छान आहेत. यातील बरचसं करूनसुद्धा माझ्या मुलाला वाचनाची गोडी लावू शकले नाही, याची खंत आहे.

अभिजीत अवलिया's picture

4 May 2016 - 9:06 am | अभिजीत अवलिया

अतिशय उत्तम मुद्दे लिहिले आहेत. पण सगळ्यात महत्वाचे आहे आई वडिलाना स्वताला वाचनाची आवड असणे. नाहीतर आपण मोबाईल घेऊन दिवसभर गेम खेळायचे आणी मुलांवर पुस्तक वाचण्यासाठी डाफरत राहायचे हे चुकीचे आहे. कारण मुले आई वडिलांचे पाहून शिकतात.

मृत्युन्जय's picture

4 May 2016 - 10:47 am | मृत्युन्जय

उत्तम लेख. वाचन्खुणा साठवण्याचा पर्याय गायब झाला आहे का मिपावरुन? दिसत नाही आहे,

अरे बापरे! भलताच डीटेल लेख आहे की!
उगीचच वाचायचा राहिलेला!

अनेक धन्यवाद!

रायनची आई's picture

5 May 2016 - 12:31 pm | रायनची आई

अगदी योग्य वेळी हा लेख वाचला..माझ्या ४ वर्षाच्या मुलाला काय वाचून दाखवाव हाच विचार करत होते.त्यालापण वाचनाची आवड लागावी अस मला वाटत..आम्ही दादरलाच राहत असल्यामुळे वर सान्गितलेली ४-५ दुकान मला जवळच आहेत.आजच जाऊन काही पुस्तके घेते. धन्यवाद : )

जुइ's picture

8 May 2016 - 3:30 am | जुइ

प्रस्तुत यादी मध्ये बखर बिमची सुद्धा असावे.

पद्मावति's picture

8 May 2016 - 5:24 pm | पद्मावति

छान लेख.