सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
22 Jan 2016 - 1:15 pm | विवेक ठाकूर
tripadvisor.
22 Jan 2016 - 2:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>
माथेरान ला कुटुंब सहल काढण्याचा विचार चालू आहे.
अरे वाह ! क्या बात है. विचार फायनल करून टाका.
>>>>>आम्ही 20 ते 25 जण आहोत.
पोरी पोरी आहेत. की पोरं पोरी आहेत. महिला महिला आहेत की महिला आणि पुरुष आहेत ?
महिला महिला जाणार असाल तर मिपावर फोटोसहीत वृत्तांत टाका हं ,
>>>>> खाण्या-पिण्याच्या सोयीबद्दल माहिती हवी आहे. कृपया मदत करा.
सध्या एसटीत आहे. घरी पोहोचलो की कंप्युटरला बसतो जेवढं गुग्लुन माहिती मिळेल तेवढी नक्की टाकतो.
बाग़ की नजर, चीते की चाल और प्रा डॉ की बातो पर संदेह नही करते :)
-दिलीप बिरुटे
(बाजीराव) :)
22 Jan 2016 - 2:36 pm | मोहनराव
यु आर टु मच फनी हं.... ;)
22 Jan 2016 - 3:58 pm | संदीप डांगे
याष्टी बुंगाट हाय आज प्राडॉंची.. ;-)
22 Jan 2016 - 2:50 pm | सतिश पाटील
शनिवार रविवार जाणार असाल तर , गावच्या जत्रेला आल्यासारखे फील येईल.
पिण्याची सोय स्टेशन समोरच्या शिरवाडकर नावाच्या बार मध्ये होईल.एकाच ठिकाणी बसण्याची सोय आहे .
फारच निर्जन ठिकाणी चालला आहात.खायला मिळेल का याची काही शाश्वती नाही. ते तुम्हीच शोधा तिकडे.
22 Jan 2016 - 3:11 pm | पैसा
जमीन खणून कंदमुळे शोधायची का?
22 Jan 2016 - 3:08 pm | ईश्वरसर्वसाक्षी
दिवाडकर आहे ते
आणि दुसरा एक छोटा बार सुद्धा आहे पुढे.
22 Jan 2016 - 4:09 pm | सतिश पाटील
अरे हो बरोबर.दिवाडकर.चुभूद्याघ्या.
पण तो दुसरा छोटा बार फ्यामिल्यीसाठी नाही असे ऐकिवात आहे.
22 Jan 2016 - 3:10 pm | ईश्वरसर्वसाक्षी
फारच निर्जन ठिकाणी चालला आहात.खायला मिळेल का याची काही शाश्वती नाही. ते तुम्हीच शोधा तिकडे.
नाय हो लिनातै बरेच हॉटेल्स आहेत माथेरान ला जेवणासाठि
22 Jan 2016 - 3:33 pm | स न वि वि
कमाल आहे… अर्रे निदान मदत नाही करता येत तर नका करु। हे असले टुक्कार प्रतिसाद का द्यावे. धाग्याचा लेखक बघून तरी प्रतिसाद लिहा. एका महिलेला दारू च्या दुकानं चा पर्याय देताहेत… फार वाईट ….
22 Jan 2016 - 3:45 pm | अनुप ढेरे
खर्र... धर्मबुडवे आहेत सगळे मेले.
22 Jan 2016 - 4:32 pm | यशोधरा
अगदी, अगदी! अशा लोकांमुळेच ती संस्कृती निघून गेली!
22 Jan 2016 - 4:34 pm | सस्नेह
बुडाली, बुडाली....
22 Jan 2016 - 4:36 pm | यशोधरा
बघत काय बसलाय मग? मारा पाण्यात उडी आणि वाचवा! =))
23 Jan 2016 - 10:13 am | नाखु
उड्या माराव्यात अश्या बुडणार्यांना वाचवायची वेगळी व्य्वस्था नाही आणु नुस्कान भरपाई मिळनार नाही.
सचि
22 Jan 2016 - 3:49 pm | ईश्वरसर्वसाक्षी
ह्यांच्या चुकिच्या माहितिला दुरुस्त केल फक्त "एकाच ठिकाणी बसण्याची सोय आहे"
लिनातै ना फक्त हा प्रतिसाद होता "नाय हो लिनातै बरेच हॉटेल्स आहेत माथेरान ला जेवणासाठि"
22 Jan 2016 - 3:54 pm | लीना घोसाळ्कर
:-))))))))))))
22 Jan 2016 - 3:54 pm | लीना घोसाळ्कर
सर्वाना धन्यवाद....
डॉक्टर...शक्यतो हॉटेल नकोत....जर रो हाउस किंवा एखादा एवढ्या माणसांना पुरेल अश्या बंगल्याची माहिती मिळाली तर बेस्ट होईल....
22 Jan 2016 - 3:58 pm | ईश्वरसर्वसाक्षी
:))
22 Jan 2016 - 4:06 pm | सतिश पाटील
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
22 Jan 2016 - 4:35 pm | Savnil
शनिवार रविवार थोड़े महागडे दिवस आहेत एवढं लक्ष देऊन चला .लोकाल घरघुती लोडगेस आहेत आणि माथेरान स्टेशन पासून पुढे गेलात की तितली फेमस खानावळ आहे उत्तम आणि चविष्ट जे1 तिथे तुम्हास उपलब्ध होईल पण त्यांच्या वेळा असतात त्या विचारुं घ्या आणि शेलार उपहार गृह म्हणून आहे तिथे देखील तुम्हाला नाश्ता वगैरेचि सोया आहे आणि आपल् नेहमीच सामान देखील तिथे 5ते१० रु जस्टिन विकतात् जमल्यास तुम्हाला एखादा लोकल नो नक्की पुरवेन मी धन्यवाद
22 Jan 2016 - 4:37 pm | प्रणवजोशी
राहण्यासाठी दिवाडकर बेस्ट आहे. पण माथेरानला जाताना ट्रेनने जाउ नका.२-३ तास घेते.
22 Jan 2016 - 4:51 pm | राजेंद्र मेहेंदळे
http://www.cleartrip.com/hotels/info/preeti-hotel-721319
ही लिंक घ्या. स्टेशन आणि बाजारपेठ जवळ च आहे. ते "बसायची सोय" पण जवळच आहे. ग्रुप साठी मस्त आहे. मी स्वतः २-३ वेळा राहिलोय. १५०० रुपये पर डे पर माणशी जेवण राहण्यासकट घेतले होते.
22 Jan 2016 - 5:10 pm | लीना घोसाळ्कर
धन्यवाद Savnil,प्रणवजोशी,आणी राजेंद्र मेहेंदळे...
दिवाडकर चे फोटो पहिले.... तेवढे खास नाही वाटले हो जोशी... आणखी काही ऑप्षन्स आहेत का?
22 Jan 2016 - 5:27 pm | अजया
उषा अॅस्काॅट ,ब्राइटलॅन्ड्स आहेत खास.पण शनि रविचे दरही खास असतील त्यांचे!
22 Jan 2016 - 6:14 pm | मयुरMK
माथेरान मध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत.
दस्तुरी पॉईंटला लागूनच एम्.टी.डी.सी. ची रेस्ट हाऊसेस आहेत. यांचे बुकिंग मुंबईच्या एम्.टी.डी.सी.च्या कार्यालयातून होते.
इतर देखिल बरीच हॉटेल्स आहेत. कुमार प्लाझा, माणिकलाल टेरेस, रॉयल, प्रेमदीप, सेंट्रल, शिरीन, वुडलँडस् ही काही नवीन झालेली हॉटेल्स आहेत; तर दिवाडकर, लक्ष्मी, गिरीविहार, रिगल, लॉर्डस् ही जुनी आणि चांगली हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समध्ये दिवसाला रु. २०० ते रु. २००० असे दर आहेत. नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. त्याचे दर बरेच कमी आहेत. ट्रेकिंग करून येणाऱ्यांसाठी जेवणासाठी सोय दिवाडकर हॉटेल उत्तम आहे. साभार- विकी.