ज्याच्याशिवाय बाथरूम अपुर्ण आहे अशा आंघोळीच्या साबणाला बाथरूमध्ये मानाचे स्थान असते. बाथरूममध्ये त्याच्या बैठकीची खास व्यवस्था केली जाते. जितक्या प्रकारचे बाजारात साबण आहेत त्याहूनही अधिक प्रमाणात त्याच्या बैठकीचे प्रकार आहेत. टाईल्समधील सोप डिश्,प्लॅस्टिक ते स्टेनलेस स्टीलपर्यंत विवीध आकारच्या आकर्षक सोप डिश मिळतात.
शरीर स्वच्छ ठेवणारा हाच साबण आपल्या अस्तित्वाच्या खुणा सोप डिशवर सोडतो. ही डिश वेळच्यावेळी स्वच्छ केली नाही तर साबणाचे ओघळ व डिशला चिकटलेले साबणाचे तुकडे डिशचे व पर्यायाने बाथरूमचे सौदर्यच खराब करुन टाकते. खासकरून पावसाळ्यात काही साबण हवेतील आर्द्रता खेचून लिबलिबीत होतात व घरातील एखादा तरी सदस्य त्या गोळ्याचा 'मुटका' बनवतोच. अस साबण हाताळायला व बाघयलाही किळसवाणे वाटते.
१० वर्षापूर्वी लोहार चाळीत एका दुकानात सोप डिश बघायला गेलेल्या माझ्या बाबांना त्या दुकानदाराने 'मॅग्नेटीक सोप होल्डर' दाखवले बाबांना ते पसंद पडले व ते त्यांनी खरेदी केले. ह्या सोप होल्डरला मॅग्नेट असते व साबणाला कोल्ड ड्रींकच्या बाटलीचा 'बिल्ला' दाबून बसवायचा, बिल्ल्याकडील साबणाची बाजू ह्या सोप होल्डरला लावली की साबण त्या सोप होल्डरला चिकटून बसतो. साबणाचा कोणताही भाग थेट सोप होल्डरला चिकटत नसल्यामुळे सोप होल्डर खराबही होत नाही व साबण हवेत लटकल्यामुळे चारही बाजूने हवेशी संपर्कात राहिल्यामुळे साबण लवकर वाळतो, पावसाळ्यातही साबण नरम पडत नाही. ह्या मॅग्नेटीक सोप होल्डरमुळे बाथरूमच्या सौदर्यात नक्कीच भर पडते.
परवा त्या दुकानात ह्या मॅग्नेटीक सोप होल्डरची चौकशी केली तेव्हा कळले की मागणी नसल्यामुळे त्या दुकानदाराने हे मॅग्नेटीक सोप होल्डर ठेवणे बंद केले. संपुर्ण लोहार चाळ पालथी घातली तरी कोणत्याच दुकानात हे मॅग्नेटीक सोप होल्डर मिळाले नाही. एका हार्डवेअरच्या दुकानाच्या बाहेरील शोकेसमध्ये मॅग्नेटीक सोप होल्डर सारखी वस्तू दिसली. चौकशी केली असता कळाले की ते मॅग्नेटीक डोअर स्टॉपर होते. विचार केला ह्यालाच मॅग्नेटीक सोप होल्डर म्हणून वापरले तर? जो स्टॉपर दरवाजा पकडून ठेवू शकतो तो साबण नक्कीच पकडू शकेल. फार विचार न करता ५० रुपयाचा PVC चा एक मॅग्नेटीक डोअर स्टॉपर खरेदी केला. घरच्याघरी बाथरूममध्ये फिट केला
सूचना- बाथरूमध्ये नळाची PVC कंसील फिटींग असेल तर ड्रिल मारताना काळजी घ्या, कदाचीत आतील पाईपला छिद्र पडून पाण्याची गळती होउ शकते. ह्यावरही सोपा उपाय आहे, परंतू शक्यतो काळजी घेणे योग्य.
१) चित्रातील मॅग्नेटीक डोअर स्टॉपरचा डाविकडील भाग वापरायचा आहे.
२) पेन्सिलने होल पाडायच्या खुणा करुन घ्या.
३) दोन स्क्रुने भिंतीवर फिट करा.
४) साबणात बिल्ला घट्ट दाबून बसवा.
५) साबणाची बिल्ला लावलेली बाजू मॅग्नेटला लावा. बघा कसा रुबाबात बसतो साबण.
बराच शोध घेवूनही 'हा' सापडला नाही म्हणून वरील जुगाड करावा लागला.
प्रतिक्रिया
12 Jan 2016 - 11:37 am | मृत्युन्जय
मस्त जुगाड.
12 Jan 2016 - 5:39 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्त आणी कल्पक जुगाड.
12 Jan 2016 - 6:50 pm | सुबोध खरे
+१
12 Jan 2016 - 3:21 pm | एस
छानच!
12 Jan 2016 - 4:52 pm | भीमराव
हि बरय पन साबन संपुन दिसेनासा होईपरेंत वापारनारे लोक असले चाळे करतील आसं वाटत नाही
13 Jan 2016 - 5:33 pm | अन्नू
अगदी हेच म्हणायचं होतं मला, त्या पन्नास-साठ रुपयात अणखीन सहा साबण येतील की! ;)
12 Jan 2016 - 5:09 pm | पैसा
झकास आयडिया! आम्ही लहान असताना हे असे साबणाला बुचे लावायचे वगैरे उद्योग करायचो. साबणाचे उरलेसुरले लहानसहान तुकडे एकत्र करून बेसिनवर हात धुवायला वापरता येतात. तसे फुकट घालवायची गरज नाही.
12 Jan 2016 - 6:52 pm | सुबोध खरे
साबणाचे उरलेसुरले लहानसहान तुकडेमी वॉशिंग मशिनच्या धागे गोळा करण्याच्या जाळीत ठेवतो. त्यामुळे त्यातून पाणी जाते आणी धुवून झालेल्या कपड्याला एक मंद सुगंध येतो.
13 Jan 2016 - 7:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आम्ही धुवायच्या साबणाचे तुकडे जुन्या मोज्यात भरायचो =)).
14 Jan 2016 - 6:20 pm | मार्मिक गोडसे
मागे 'रिन' कपडे धुवायच्या साबणावर दोरी असलेली पिशवी मिळायची, तीची एक बाजू नायलॉनच्या कापडाची व दुसरी बाजू नायलॉनच्या जाळीची असे. त्यात कपडे धुवायचा साबण ठेवून दोरी खेचली की पिशवीचे तोंड बंद व्हायचे. ह्यात साबण शेवटच्या कणापर्यंत वापरता यायचा. ही साबणाची पिशवी नळाच्या गळ्यात लटकवता येत असल्यामुळे त्याला ठेवण्यासाठी खास जागा लागत नसे.
12 Jan 2016 - 6:02 pm | कंजूस
आम्ही हात टेकले कोपरापासून.असं सर्टीफिकेट लगेच कुणाला मिळत नाही आमच्याकडून याची नोंद घ्यावी.
13 Jan 2016 - 12:16 am | श्रीरंग_जोशी
कल्पकता आवडली.
यावरून आठवले - रिकामपणचे उद्योग - खिशाला फ्लॅप शिवणे.
13 Jan 2016 - 3:53 am | रेवती
छान जुगाड. बाथरुमच्या टाईल्सही आवडल्या.
13 Jan 2016 - 4:45 am | कंजूस
एक सूचना करावीशी वाटते "कोल्ड ड्रींकच्या बाटलीचा 'बिल्ला' ऐवजी पुर्वीची निकेलची नाणी विपरता येतील.एक उभ्या दातांचा साबण होल्डर मिळतो त्यात साबण उभाठेवला की लगेच वाळतो.
६४ सालानंतर कॅालेजेज मध्ये असलेले सक्तीचे आर्मी ट्रेनिंग बंद केले.त्या अगोदर मुलांना कँपात शिबिर होत असे.तिथे सार्जट येऊन तुमच्या प्रत्येक वस्तू तपासत असे.गळका थपथपलेला साबणाला उणे मार्कस पडायचे.आमच्या शोजारच्या मुलाकडून ही गोष्ट कळली.तो आंघोळ झाली की उभा ठेवलेला साबण झटकून लगेच वेष्टनात ठेवू लागला.शेवटपर्यंत सुगंधही टिकतो.
13 Jan 2016 - 3:16 pm | मुक्त विहारि
आवडला....
13 Jan 2016 - 4:50 pm | खेडूत
ठीके.
एक कुशंका: ही साबणवडी चपटी झाल्यावर साबणाचे दोन तुकडे होऊन हातात येतील कारण चुंबकाची शक्ती
बुचाला घट्ट धरून ठेवेल...
13 Jan 2016 - 5:54 pm | बबन ताम्बे
साबणाला धरून ओढण्यापेक्षा दोराला धरून ओढायचे. नो तुकडा ऑफ साबण :-)
13 Jan 2016 - 7:06 pm | पैसा
आमच्याकडे गोल्डफिश सोप ऑन अ रोप मिळतो. माशाच्या आकाराचा मोठा साबण दोरीला लटकवलेला असतो. तो मोठा असतानाच दोरी सोडून हातात येतो.
13 Jan 2016 - 7:21 pm | बबन ताम्बे
माझी आयडीया अशी आहे की बुचाला साईडला भोक पाडून दोरी बांधायची.
13 Jan 2016 - 7:27 pm | राजेंद्र मेहेंदळे
आंघोळीसाठी??? आम्ही तर....
13 Jan 2016 - 7:31 pm | पैसा
आंघोळीसाठी नै ओ! वॉशबेसिनवर जास्तीचा म्हणून लटकवलेला असतो. एकुणात दोरीचा फार उपयोग होत नै हे सांगायचं आहे.
13 Jan 2016 - 8:25 pm | मार्मिक गोडसे
गोव्याला गेलो असताना आणला होता. हा साधासुधा मासा नाही देवमासा आहे, संपता संपत नाही.
14 Jan 2016 - 1:06 pm | सस्नेह
अक्षय मासा आहे तो !
13 Jan 2016 - 6:01 pm | मार्मिक गोडसे
रास्त शंका. साबण ओढून काढला तर साबणाचे दोन तुकडे होतात, साबण चुंबकापासून सरकावून (slide) काढल्यास ताकदही कमी लागते व साबणाचे तुकडेही होत नाहीत.
झिजलेला साबण वाया जाऊ नये ह्या करता काय करावे ह्याची सचित्र माहीती नंतर देतो.
13 Jan 2016 - 6:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
काय एकेक टॅलेन्टेड लोक्स आहेत इथे...पण एव्ह्ढा खटाटोप न करतासुद्धा माझ्याकडचा साबण होल्डर साबण स्वच्छ ठेवतो, साबण लवकर वाळतो वगैरे वगैरे
बाकी ते शेवटचे तुकडे वापरायच्या विविध पद्धती आवडल्या.
13 Jan 2016 - 6:37 pm | राजेंद्र मेहेंदळे
13 Jan 2016 - 6:33 pm | प्रसाद१९७१
आयडीया मस्त आहे, मुख्य म्हणजे दिसते चांगली. साबण थोडा वाया गेला तरी हरकत नाही.
13 Jan 2016 - 6:48 pm | मार्मिक गोडसे
तुमच्याकडील सोप होल्डरचा फोटो द्या ना इथे. तेवढीच आमच्या संग्रहात भर पडेल व साबणाशी 'untouchability' पाळणार्या ह्या मॅग्नेटीक सोप होल्डरची छुट्टी करता येइल.
13 Jan 2016 - 7:04 pm | मार्मिक गोडसे
@ राजेंद्र मेहेंदळे
माफ करा.नेटच्या समस्येमुळे प्रतिसाद जात नव्हता व तुम्ही दिलेला फोटो बघता आला नाही.
ही SS ची तळाला होल असलेली सोप डिश वापरली आहे. ही डिश साबण स्वच्छ ठेवते परंतू साबण डिशला स्वच्छ ठेवत नाही.
13 Jan 2016 - 7:18 pm | माहितगार
ऐन साबण वापरताना काही वेळा साबण हातातून सुळ्ळकन सुटून धावतो. असा साबण पुन्हा वापरावयासही नकोसे होते. शिवाय ज्येष्ठ व्यक्ती घसरून पडण्याची भिती वाढते. हि मॅग्नेटीक खाली फरशीतच पट्टीच्या स्वरुआत बसवून किंवा इतर काही उपायाने काही मार्ग काढता येऊ शकतात का? - किडा. बाकी एक उपाय असा की छोटे छोटे साबणच वापरायचे खाली पडले म्हणून बाद करावयाचे झाल्यास सोपे जाऊ शकते आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळा साबण वापरण्याचाही आनंद देता येऊ शकेल.
13 Jan 2016 - 7:29 pm | राजेंद्र मेहेंदळे
लिक्विड सोप आंघोळीसाठी मिळतो का? त्याने हि समस्या आणि ईतरही काही समस्या सुटतील
13 Jan 2016 - 7:33 pm | राघवेंद्र
BodyWash मिळतो ना. तो वापरायचा.
13 Jan 2016 - 7:38 pm | माहितगार
हां तेही आताशा वापरात आले आहे पण साबणाची सवय एवढी कि सर्व वापरून झाले की मी साबण वापरतो म्हणजे केसांना आधी शांपू आणि मग कंडीशनर झाले तरी त्यानंतर साबण वापरतोच काही काही सवयी माहित असूनही सुटत नाहीत ;)
13 Jan 2016 - 7:58 pm | खेडूत
होय..हम तो लिक्विड सोपच वापरते हैं...!
14 Jan 2016 - 12:35 pm | प्रसाद१९७१
खेड्यातली माणसे काय पुढे गेलीयत :-)
14 Jan 2016 - 6:48 pm | अजया
=))
13 Jan 2016 - 8:11 pm | उपयोजक
अशाच जुगाड आयडियांचा नवीन धागा चालू केला तर?कशी वाटते आयडिया?
14 Jan 2016 - 10:43 am | कंजूस
#अशाच जुगाड आयडियांचा नवीन धागा चालू केला तर#
-- रिकामपणचे उद्योग---
अमुक****अमुक कसे आहेच.
हसू नका आजचा टाइम्सचा लेख आहे.मंडी आइआइटी ची मुले इलेक्ट्रानिक्स भंगार गोळा करताहेत.
14 Jan 2016 - 10:46 am | कंजूस
these iit engineers work as kabadiwal as their mission and part time job - Maharashtra Times http://maharashtratimes.indiatimes.com/nation/these-iit-engineers-work-a...
15 Jan 2016 - 11:24 am | खटपट्या
चांगलंय..
19 Jan 2016 - 7:56 pm | मदनबाण
आधीचा अनुभव परत घेण्यासाठीची धडपड आवडली ! :)
असा प्रकार आधी वापरला आहे, कोल्ड ड्रिंक ची बुचे वापरली होती,पण नंतर त्याला गंज चढतो. तसेच काही काळ साबण वापरल्या नंतर लावलेले बुच /झाकण/ बिल्ला इं इंइं... पटकन साबणातुन निघतात.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हम तेरे बिन कही रह नहीं पाते ... :- Sadak
20 Jan 2016 - 1:20 pm | गामा पैलवान
मागो,
बाथरूमचं सौंदर्य हे शीर्षकात वाचून वेगळ्याच अपेक्षेने धागा उघडला. ;-) म्हंटलं कुणी साबणसुंदरी दिसेल. पण इथे आंबटशौकीन नसून चिकटशौकीन आहेत हे पाहून भ्रमनिरास झाला.
आ.न.,
-गा.पै.