जगावं की मरावं हा एकच सवाल... कराव्या या वैद्यकीय चाचण्या, की फेकुन द्यावं हे........

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
9 Jan 2016 - 2:05 pm
गाभा: 

माझा थोडेफार आकलन आणि अनुभवाचा विषय सोडुन येथे लिहिण्याची ही पहिलीच वेळ, सहाजिकच येथे भर माहिती 'शेअर' करण्याऐवजी माहिती गोळा करणे, शंका निरसन करुन घेणे यावर आहे ( कोण रे ते तिकडे हुश्श्श...म्हणाले??)

समजायला लागल्यापासुन मी दरवर्षी सर्वसामन्य स्वरुपाच्या वैद्यकीय चाचण्या करुन घेत आलो आहे. याशिवाय कुटुंबातील अनेक सद्स्याच्या आवश्यक चाचण्यांही वेळप्रसंगी होतच असतात. चाचण्याचे बाकीचे स्वरुप काहीसे तेच असले तरीही गेले काही वर्षे व्हीटॅमिन B12 वा D3 या चाचण्या करुन घेण्यावर भर आहे असे दिसते...संशयास जागा महणजे नेमक्या याच चाचण्या अन्य नियमित चाचण्यांच्या तुलनेने महागही आहेत.

गेले अनेक वर्षांत आमच्या कोणातही न आढळ्लेल्या ही B12 वा D3 ची कमतरता हल्ली वारंवार अधोरेखित होते. एवढेच काय मी केलेल्या चर्चे अंती अनेक लोकांना हाच अनुभव आला आहे असे समजते. माझ्या परिचित एक डॉक्टरांच्या मते ह्या तपासणीऐवजी सरळ B12 वा D3 कमतरतेव्र्रेल गोळ्या घेतलेल्या उत्तम, तसेही ही व्हिटॅमिन्स अतिरिक्त स्वरुपांत शरिरात साठुन रहात नाहीत मग एकदा ही 'टेंडन्सी' माहित झाल्यावर या टेस्ट्वारी अनावश्य्क पैसे का घालवावे?? असा त्यांचा दृष्टिकोण आहे.

एकीकेदे सर्वसामान्य तपासण्यांच्या यादीत ही 'घुसखोरी' म्हणावी तो दुसरीकडे अनेक डायग्नोस्टीक सेंटर्सनी प्रचंड जाहिरातबाजी करुन व अगदी MLM सारख्या पद्धती वापरुन 'Preventive Checkup' ची अनेक पॅकेजेस विकण्याचा तडाखा लावला आहे. टोमोग्राफी, ॲजिओग्राफी, M.R.I, कॅरोटिड आर्ट्रीलरी सारखी नावे ( काही चुकले असल्यास माफी असावी) तोंडावर फेकुन हे मार्केटिग एजंटस (जे बहुतेकदा नॉन मेडीको असतात) समोरच्याला आधी गांगरवतात, नंतर घाबरवतात आनि मग आम्ही हे सारे ईतरांपेक्षा कसे स्वस्त देतो असे सागुंन 30/35 हजाराचे 'Preventive Checkup' पॅकेज त्याच्या गळ्यात मारतात..

ठराविक काळाने आपले मेडिकल चेक-अप करायलाच हवे यात अजिबात दुमत नाही मात्र एखाद्या विषयातील कोणतीही प्राथमिक तपासणी (उदा ECG) न करता थेट डॉप्लर वा ॲजियोग्राफी करणे कितपत आवश्यक आहे??

मागे एकदा मी या वैद्यकिय चाचण्यांसंदर्भात एक लेख ( बहुधा पुण्यातील डॉ. अनंत फडके यांचा, पण खात्री नाही) वाचला होता ज्यांत यतील कोणतीच चाचणी 100% अचुक नसते व अगदी ठणठणीत, निरोगी अशा 100 लोकांच्या ह्या चाचण्या केल्यास त्यातील काही निरोगी लोकांच्या reports मध्येही अनियमितता दिसुन येतील.... असा काहीसा युक्तीवाद होता.

असो. येथील डॉ खरे आणि वैद्यकिय विषयांतील अन्य तज्ज्ञ् (हा शब्द असाच का लिहितात??) माझे गैरसमज दुर करतील आशी आशा बाळगतो.

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

9 Jan 2016 - 4:06 pm | मार्मिक गोडसे

बरे झाले आपण हा विषय चर्चेला घेतला. माझ्या जवळच्या नातलगांना त्यांच्या डॉ.नी बी१२ व विटामीन डी च्या तपासण्या करायला सांगितल्या होत्या त्या सर्वांमध्ये बी१२ व विटामीन डी ची कमतरता आढळली. ओळखितल्या अनेक जणांच्या रक्तचाचणीत बी१२ व विटामीन डी ची कमतरता आढळली. ह्या चाचण्यांचे पेव गेल्या २-३ वर्षापासून जास्त फुटले आहे. आयोडीनयुक्त मीठ खावूनही गेल्या ८-१० वर्षांपासून बर्‍याच लोकांच्या थायरॉईडच्या चाचण्यांमध्ये थायरॉईडची कमतरता आढळायला लागली आहे त्यामुळे ह्या चाचण्यांच्याबाबतीत शंका येवू लागली आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jan 2016 - 2:26 pm | प्रकाश घाटपांडे

अनेक आरोग्य पुरवण्या जागरुकतेच्या नावाखाली भय पसरवुन लोकांना अनावश्यक चाचण्या वा उपचार करण्यास भाग पाडतात हा अनेकांचा आक्षेप आहे. त्यात काही तथ्यही आहे. प्रकृती ठीक तर सगळे ठीक. सर सलामत तो पगडी पचास. हे खरे देखील आहे. बी १२ व डी याची कमतरता अनेकात ( विशेषतः शाकाहारी) आढळते.
थोडी कमी असेल तर तशी टेंडन्सी शरीराची असते असे समजण्यास हरकत नाही. तपासण्यांच्या चक्रात माणूस अडकतो त्यावेळी तो त्रस्त झालेला असतो. काय करावे करु नये याचे फार तारतम्य रहात नाही. शेवटी विश्वासु डॉकटर असणे महत्वाचे असते.

विवेक ठाकूर's picture

10 Jan 2016 - 3:50 pm | विवेक ठाकूर

समजायला लागल्यापासुन मी दरवर्षी सर्वसामन्य स्वरुपाच्या वैद्यकीय चाचण्या करुन घेत आलो आहे. याशिवाय कुटुंबातील अनेक सद्स्याच्या आवश्यक चाचण्यांही वेळप्रसंगी होतच असतात

निष्कारण रेग्युलर टेस्टींगची गरज नाही. जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत कोणतीही टेस्ट करु नये. तद्वत कारण नसतांना कोणतेही औषध घेऊ नये. अन्न हेच खरं औषध आहे. त्यामुळे रुचीनं आणि केवळ भूक लागल्यावरच भोजन केल्यास काय खावं ते सुद्धा आपसूक कळतं. आणि केंव्हा काहीही खाऊ नये हे देखिल कळतं.

मोगा's picture

10 Jan 2016 - 4:32 pm | मोगा

आम्ही सर्कारी डॉक्टर ... गरिबांचे डॉक्टर ...

रुटीन तपासण्याच बर्‍याचदा उपलब्ध नसतात . तिथे या टेस्ट कोण करणार ?

तपासणीपेक्षा व्हिटॅमिन व क्याल्शियम उपचार स्वस्त असतात

"निष्कारण रेग्युलर टेस्टींगची गरज नाही. जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत कोणतीही टेस्ट करु नये. "
++१

#अमुक एक रकमेचा मेडिक्लेम असल्यास चाचण्या फुकट हे एक आमिष असते. त्यातून काही बागुलबोवाची भिती दाखवतात.

भंपकगिरी ओढवलेली दुसरं काय?

मार्मिक गोडसे's picture

10 Jan 2016 - 7:46 pm | मार्मिक गोडसे

जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत कोणतीही टेस्ट करु नये.

हे ही चुकीचे आहे. ठरावीक वयानंतर रुटीन चेकअप केलेच पाहिजे. रक्त, लघवी व संडासच्या रुटीन टेस्टमुळे मधूमेह, किडनी व पोटाच्या आजारांची कोणतीही लक्षणं दिसत नसतानाही पुर्वसूचना मिळते. लक्षण दिसेपर्यंत वाट बघितल्यास तो आजार आटोक्यात आणने कठीण होते.

अजया's picture

10 Jan 2016 - 7:57 pm | अजया

सहमत आहे.A stitch in time saves nine!
मलाच सगळं कळतं या भ्रमाचा भोपळा सायलेंट आजार फोडतातच नाहीतर!

व्हिटॅमिन डि हे कॅल्शिअमच्या शोषणासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.त्याचे बरेचसे संशोधन हे गेल्या काही वर्षात झाले आहे.त्यामुळे या टेस्ट पूर्वी इतक्या फ्रिक्वेंटली केल्या जात नसत.आता व्हिटॅमिन डि च्या कमतरतेने पण हाडांची झीज ,दातांचे आजार इ.होतात हे सिद्ध झाले आहे.आमच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ठिसूळ दात दिसल्यास ,दात वारंवार किडणे,तुटणे इ साठी व्हिटॅमिन डि तपासले असता मोठ्या प्रमाणात याची कमतरता आढळलेली दिसते.जी वेळेवर सप्लिमेंट दिल्यास कमी करता येते.
वेळेवर केल्या जाणाऱ्या टेस्ट या कधीकधी जीव वाचवणार्या असतात.
'काही गरज नाही टेस्टची.काही झाल्यावरच डाॅक्टरकडे जाणाऱ्या' एका ओळखीच्या व्यक्तीचे पूर्ण किडनी प्रोफाईल वाईट होते.त्यामुळे नंतर हाय ब्लड प्रेशर होऊन किडनी फेल होऊन तीन वर्ष डायलिसीसवर राहून नुकतेच गेले.
रक्तात साखर आहे की नाही हे टेस्ट नाही केली तर चाळीशीनंतर येऊ शकणारा डायबेटिस कसा कळेल?
शरीराच्या बाबतीत आगाऊपणा नडतो हे माझे मत आहे.त्यामुळे विश्वासू डाॅक्टरकडून दरवर्षी कोणत्या टेस्ट कराव्या हे समजावून घेऊन जरुर कराव्या.

सुबोध खरे's picture

10 Jan 2016 - 8:35 pm | सुबोध खरे

समाजात इतर सर्व गोष्टींचे बाजारीकरण झाले तसे वैद्यकीय सेवेचेही झाले आहे. एके काळी उद्योग धंदे सामाजिक जाणीव म्हणून धर्मार्थ रुग्णालये चालवीत असत. तेथील वैद्यकीय संचालक हे डॉक्टर असत. त्यांचे काम हे उत्तम रुग्ण सेवा असे.
आता त्यांची जागा सी ई ओ , मार्केटिंग आणि एम बी ए लोकांनी घेतली. त्यांना रुग्णाकडून मिळणारा फीडबैकशी काही घेणे देणे नसते. त्यांना या वर्षी नफा किती मिळाला आणि YOY तो किती वाढला यात स्वारस्य आहे. कीर्ती सुकीर्ती कि अपकीर्ती याच्याशी पण काही घेणे देणे नाही. ANY PUBLICITY IS GOOD.
त्यामुळे सामाजिक सेवा हि गोष्ट वैद्यकीय व्यवसायातून हद्दपार होणार आहे हे दुर्दैवी सत्य आहे.
आज खरोखर समाजसेवा करू इच्छीणाऱ्या डॉक्टरना ना सरकारचा पाठींबा आहे ना कॉर्पोरेट रुग्णालयांचा.
शासकीय महाविद्यालयात तीन आकडी फी देऊन शिकलेले डॉक्टर आणी तेथे रुपये १५००/- महिना या मानधनावर शिकवणारे वरिष्ठ मानद प्राध्यापक हे इतिहास जमा झालेले आहेतच. मानद प्राध्यापक हि गोष्ट सरकारनेच काढून टाकली आहे.
शिवाय सहा आकड्यात फी घेणारी खाजगी महाविद्यालये आणी त्यात शिकणारे विद्यार्थी यांच्या कडून समाजसेवेची अपेक्षा करणे हे आता शक्य नाही.
असे झाल्यावर वाजवी दरात रुग्णसेवा हे अरण्यरुदन ठरेल.
राहिली गोष्ट चाचण्यांची -- सत्य सगळ्या चाचण्या कराव्यात आणी कोणतीच चाचणी करू नये या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे. विमा कंपन्या, कॉर्पोरेट रुग्णालये आणी सामान्य जनता यातील साटेलोटे हा एक डझन भर पी एच ड्य़ा न पुरेल असा विषय आहे.
असो. लष्करात असताना (रुग्ण किंवा डॉक्टर दोघांना आर्थिक दृष्ट्या घेणे देणे नसताना) ज्या चाचण्या दरवर्षी सुचवल्या जातात( याच्या मागे एक शास्त्रीय बैठक आहे) त्या अशा आहेत.
वयाच्या चाळीशीपर्यंत वर्षात एकदा रक्ताची( CBC complete blood count) आणी मुत्राची (urine routine) तपासणी केली जाते. याचा आज खर्च साधारण २०० ते ३०० रुपये येईल.
चाळीस वयाला-- इ सी जी, छातीचा एक्स रे, CBC, urine routine, रक्तातील साखर जेवणा पूर्वी आणि नंतर, पोटाची सोनोग्राफी, रक्त तपासणी -- लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्ट,थायरोईड टेस्ट T ३, T ४, TSH आणी लिपीड प्रोफाईल -- या केल्या जातात.स्त्रियांना mammographi आणी स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी
याचे कारण एक आपल्याला किडनी चा विकार मधुमेह हृदयविकार इ रोग सुरुवात होतानाच निदान व्हावे हा हेतू
४५ वयाला आणि त्यानंतर दर ५ वर्षांनी --वरील सर्व चाचण्या आणि स्ट्रेस टेस्ट केली जाते.
स्त्रियांना mammografi आणी स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी
या व्यतिरिक्त जर आपल्याला काही आजार झाला तर त्यावेळेस जरुरीप्रमाणे चाचण्या केल्या जातात
यात काही राहून गेले असेल तर आठवेल तसे लिहीन.

एका टोकाला लोक दरवर्षी हौसेने वेगवेगळ्या चाचण्या करून घेतात. संशयग्रस्त लोकांना सर्व काही "नॉर्मल" आले कि त्यातून प्रचंड मानसिक समाधान मिळते हि एक वस्तुस्थिती आहे. परंतु किती चाचण्या कराव्यात याचे तारतम्य असायला हवे.
माझ्या कडे आलेल्या अशा एका रुग्णाला आपल्याला जंत झाले आहेत असा संशय होता त्यामुळे डॉक्टर मी शौचाची तपासणी करू का? या प्रश्नाला मी एक उत्तर दिले कि शौचाची तपासणी साठी तुम्हाला २०० रुपये खर्च होतील त्यापेक्षा जवळच्या केमिस्ट कडे जा आणि १० रुपयाला मिळणारी जंताची बेन्डेकस गोळी घ्या आणि मोकळे व्हा . जंत असतील तर पडून जातील नसतील तर उत्तमच.
काही डॉक्टर कट मिळतो म्हणून वेगवेगळ्या सुरस आणि चमत्कारिक अशा महागड्या चाचण्या करायला सांगतात हे काही गुपित नाही. असे डॉक्टर शोधून कसे काढायचे हा एक यक्षप्रश्न आहे. चांगला वकील किंवा चांगला बायकांचा शिंपी कसा शोधायचा इतकाच हा गहन प्रश्न आहे. ( ९० % बायकांचा एक तरी ड्रेस किंवा ब्लाउज त्यांच्या शिंप्याने बिघडवलेला असतो आणि साडी जितकी महाग तितका ब्लाउज जास्त बिघडतो असा अनुभव आहे. शिंपी कितीही वेळा बदला. अनुभव हाच.
असो.
दुसर्या टोकाला डॉक्टर ने स्पष्टपणे सांगितले असताना चाचण्या न केल्याने कर्करोग किंवा हृदयविकार बळावला अशी डझनांनी उदाहरणे माझ्या स्वतःच्या व्यवसायात मी पाहिली आहेत.
दुसर्याच कारणासाठी सोनोग्राफी करताना किडनी खराब होते आहे किंवा हृदयविकार किंवा कर्करोगाची सुरुवात झाली आहे हे तर रोजच्या वाय्व्सायातील उदाहरण आहे.
जाता जाता -- पूर्वीचे डॉक्टर फारशा तपासण्या करत नसत नुसता हात लावून निदान करीत असत हे एक मिथक आहे.
पूर्वीचे डॉक्टर चाचण्या करत नसत हि वस्तुस्थिती आहे परंतु कर्करोग चौथ्या थराला गेल्यावर त्याचे निदान होत असे कित्येक रुग्ण मी पाहत आलो आहे. पोटात गोळा ४-५ सेमी होईपर्यंत हाताला लागत नाही आणि ती वेळ येईपर्यंत रोग टोकाला पोहोचला आहे अशी बहुसंख्य उदाहरणे मी गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. एशियन हार्ट रुग्णालयात दोन वर्षे काम करत असताना कम्प्लीट हेल्थ चेक अप करताना १०-१२ रुग्णांच्या किडनीला रोग चालू झाला आहे हे सोनोग्राफीत निदान मी स्वतः केले आहे. रक्ताच्या चाचण्या (क्रीअटीन ) जोवर ६० % किडनी खराब होत नाही तोवर वाढलेले दिसत नाही.
असेच १३ -१४ रुग्णांचा कर्करोग काहीही नक्की लक्षणे नसताना निदान झाले आहे. बर्याच वेळेस रुग्ण स्वतःला काहीतरी होत आहे असे सुचवत असतात त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिल्यामुळे रोगाचे अचूक निदान मला करता आले हे मला शिकता आले म्हणून मी त्यांचा ऋणी आणि यातून रुग्ण बडबड करीत असेल तरी ऐकून घ्यावे हा धडा मी शिकलो. आपले शरीर आपल्याला सूचना देत असते दुर्दैवाने त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आजार वाढत जातो. दोन दिवसापूर्वी एक सी ए बाई माझ्या कडे आल्या होत्या सतत आम्ल पित्त होते म्हणून. हे त्यांना ६ महिन्यापासून होत होते आणि त्या रोज ANTACID घेत असत.सकाळी घाईत नाश्ता न करणे, दुपारचे जेवण तीन साडे तीन वाजता वाजता आणी रात्री बारा वाजता परत आल्यावर एक ग्लास दुध. उच्च शिक्षित असून हि स्थिती.
शरीर तुम्हाला सूचना देते आहे कि तुमची जीवन पद्धती चुकीची आहे ती सुधारणे आवश्यक आहे. मग यातून चाचण्या करा त्यात काही आले नाही म्हणून परत येरे माझ्या मागल्या आणी ANTACID चालू. मी त्यांना शांत पणे म्हणालो ज्या कंपनी साठी तुम्ही इतकी मरमर करत आहात ती कंपनी तुम्हाला जठराचा कर्करोग झाला तर तुमचे बिल भरण्याच्या पलीकडे काहीही करणार नाही. पुढे काय करायचे आहे ते तुम्ही ठरवा.
असो
अगदीच चाचण्या करू नये हे विमा उतरवू नये असे म्हणण्यासारखे आहे.
शेवटी इतका काथ्याकुट करून निष्पन्न काय?
अति सर्वत्र वर्जयेत. आणी तारतम्य बाळगा

विवेक ठाकूर's picture

10 Jan 2016 - 10:58 pm | विवेक ठाकूर

आपले शरीर आपल्याला सूचना देत असते दुर्दैवाने त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आजार वाढत जातो.

त्यामुळेच मी म्हटलंय की तुमची जाणीव हा शारीरिक स्वास्थ्याचा सर्वात निकटतम निदर्शक आहे, चाचणी दुय्यम आहे. जर तुम्हाला काही होतंय असं वाटलं तर निश्चित चाचणी करा पण सगळं व्यवस्थित चालू असेल तर उगीच रुटीन म्हणून चाचण्या करण्यात काही अर्थ नाही आणि लेखक तर चाचण्यांनीच बेजार झालायं !

वैद्यकीय सेवा हेल्प म्हणून वापरली पाहिजे धसका म्हणून नाही.

दुसरी गोष्ट, शरीर ही वापरायची आणि नाशवंत वस्तू आहे ही पक्की खूणगाठ मनाशी असू द्या. कितीही आणि कोणत्याही चाचण्या केल्या तरी शरीर हे इतकं डायनॅमिक मेकॅनिझम आहे की कालानुरुप काहीना काही, कधीना कधी बिघडणार किंवा झिजणार. तस्मात, शरीराची काळजी आपण आपल्या गाडीची घेतो तितपत काळजी घ्या, त्याचा मोह ठेवू नका मग भयग्रस्ततेनं भलत्या भलत्या चाचण्या कराव्या लागणार नाहीत.

त्यामुळेच मी म्हटलंय की तुमची जाणीव हा शारीरिक स्वास्थ्याचा सर्वात निकटतम निदर्शक आहे, चाचणी दुय्यम आहे.

हे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. पण प्रत्येकाची जाणीव तेव्हढी प्रगत (? योग्य शब्द सुचत नाहीये) असेलच असे नाही. त्यामुळे एका विशिष्ट वयानंतर रेग्युलर चाचण्या करणे हे अधिक योग्य.

भंकस बाबा's picture

11 Jan 2016 - 6:36 pm | भंकस बाबा

नेहमीप्रमाणे अचूक सल्ला.
वयाच्या ५०साव्या वर्षापासून डेक्सा स्कैन हाडासाठी, पुष्कळदा साठीची माणसे पाय घसरून पडतात व् सरळ गुंतागुंतीचे फ्रैक्चर होते. हाडे ठिसुळ झाली आहेत हे बहुतेक तेव्हाच कळते.

पिलीयन रायडर's picture

10 Jan 2016 - 10:51 pm | पिलीयन रायडर

I also have this same question.
My kid is ३.५ years old. His cardiologist insists that when he comes to routine check up once in a year, we should get his blood tests done for D3, iron (feretine?) Etc.
D3 level is never satisfactory. She keep us telling to take him in sunlight and give him nonveg food etc. When supplements are given, levels go up for sometime.

I understand importance of D3 but it seems difficult to constantly maintain it. Also getting a child's blood test done is a painful task.

His pediatrician also agrees that these levels are low in all Indians. We can just keep healthy eating habits.

What is to be done in this case?

पिलीयन रायडर's picture

10 Jan 2016 - 10:53 pm | पिलीयन रायडर

One important point here is, I am sure that there is no personal benifite to the doctor suggesting these tests as she does not suggest any particular lab.

डि ३ कमी आहे तर सप्लिमेंट घेण्यात प्राॅब्लेम काय आहे? कमी डी ३ बर्याच गोष्टींवर परिणाम करतं.दात ,हाडाची बळकटी,,मानसिक आरोग्य ते ब्लड प्रेशर पण.
(या विषयावर काही कारणाने अभ्यास केला असल्याने जाणीवपूर्वक लिहिते आहे.)
डि ३ चे सोर्सेस कमी आहेत.सूर्यप्रकाशात आपण किती वेळ नेऊ शकणार ? बरं कमी आहे म्हणून सप्लिमेंटवर असताना ते फार जास्त तर झाले नाही ना या काळजीने नंतर परत टेस्ट कराव्या लागतात.
आयर्नचे देखील तेच आहे.ही जीवनसत्त्व फार महत्त्वाचे परिणाम करत असतात शरीरावर.जर स्पेसिफिक मेडिकल कंडिशन माहित आहे तर डाॅ या टेस्ट सांगणारच.

पिलीयन रायडर's picture

11 Jan 2016 - 11:25 am | पिलीयन रायडर

अगं हो.. सप्लिमेंट्स घ्यायला मला काहीच हरकत नाही. पण डॉक म्हणतात की असे किती दिवस तुम्ही देणार सप्लिमेंट्स? हे ही बरोबरच आहे. पण रोज उन्हात बसवलं (जे की खरं तर शक्य नाहीये आता.. पण तो लहान असताना शाळा / पाळणाघरात जात नव्हता तेव्हा बसवत होतो) तरीही ह्या लेव्हल्स नाही वर आणता येत. आहारातुन घेण्या सारखे पदार्थ कमी आहेत फारच. त्यामुळे फार गोंधळ उडतो की मग नक्की करावे काय?

आयर्न मात्र खान्यापिण्यातुन बर्‍यापैकी वर आणता आले.

@ खरे काका,
हो, अंतिम सल्ला तर त्या कार्डिओलॉजिस्टचाच मानणार. पण बर्‍याच प्रयत्नांनी सुद्धा ह्या व्हिट. डी लेव्हल्स ताळ्यावर आणणे काही जमत नाहीये म्हणुन जमेल तिथुन माहिती मिळवत आहे. आणि अगदी खरं खरं सांगायचं तर मला त्या डॉक्टरांची फार भीती वाटते. त्यामुळे पुढच्या चेकपच्या आधी बरे रिपोर्ट्स आले तर कमी शिव्या खाव्या लागतील. :)

सुबोध खरे's picture

11 Jan 2016 - 9:05 am | सुबोध खरे

पि रा ताई
तुमच्या मुलाच्या हृदयावर (जन्मजात असलेल्या रोगावर) काहीतरी शल्यक्रिया झाली आहे असे वाचल्याचे आठवते तेंव्हा त्यासाठी असे जालावर काहीही सल्ला देणे किंवा घेणे हे चुकीचे ठरेल. आपण ज्या सर्जन ने शल्यक्रिया केली आहे त्याचा किंवा त्यानंतर ज्या हृदय रोग तज्ञा कडे दाखवत आहात त्याचा सल्ला घेणे हेच बरोबर आहे. तुटपुंज्या माहितीवर आणि ज्ञानावर सल्ला देणे बरोबर नाही असे मला वाटते.

योगायोगाने आत्ताच बाजारातून डी३ व बी १२ घेऊन आले आहे. हे आम्हाला घ्यावे लागण्याचे कारण शाकाहारी असणे व हिवाळ्यात सूर्यप्रकाश न मिळणे असे डॉ. कडून सांगण्यात आले आहे. बाकीही कारणे सांगितली आहेत. २०१५मध्ये थोडा अशक्तपणा वाटायला लागल्यानंतर पंधरा एक दिवसात 'आता बसूनच राहते की काय' अशी परिस्थिती आल्यावर तपासण्या करून मग हा निर्णय घेतला गेला आहे. तरीही दरवर्षी इन्शुरन्स कंपनी ज्या चाचण्या मोफत करू देते (मोफत कसले म्हणा! आपण पैसे देतच असतो.) त्या आम्ही करून घेतो. मुलांना तर शाळेत दाखवाव्या लागतात म्हणून करून घ्याव्याच लागतात. इंन्शु. कं. डोळे व दंतारोग्यासाठीही तपासण्या करवून घेण्यास सांगते त्या अजिबात न चुकता करून घेतल्या जातात पण त्यामुळेच दात वेळच्यावेळी दाखवून घेतले जातात व डोळेही तपासले जातात. २०१५च्या तपासणीत डोळ्याच्या क्र. मध्ये अगदी किंचित फरक होता तर नेत्रतज्ञांनी आपणहोऊनच नवा चष्मा न करण्याबद्दल सल्ला दिला. आम्हाला तेच हवे होते. ;) नैतर महागाच्या फ्रेमा गळ्यात मारतात. आम्ही नाही म्हणूनच साम्गतो पण मुलांना आकर्षण वाटेल असे प्रकार सतत बाजारात येत असतात. त्यांना सारखे समजावत रहावे लागते. बाजाराचे गणित कळण्यास काहीवेळ जाऊ द्यावा लागतो. सुदैवाने आमचे डॉ. औषधे व तपासण्या यांच्या फार मागे नाहीत पण मागील वर्षी त्यांनी आम्हाला संशय घेण्यास जागा मिळेल अशा तपासण्या सांगितल्या होत्या. उपाय हाच की तब्येत चाम्गल्यात चांगली राहील यासाठी प्रयत्न करणे. हेल्थ ईज वेल्थ हे अगदी पटले आहे. २०१५ मध्ये जितका को पे आम्ही दिला तितका याआधी कधीही दिला नव्हता.

बाजारीकरण इथेही झालं आहे तेव्हा तारतम्य बाळगा हा मुद्दा पटला.
डॅक्टर नसेल तिथे हे फार उपयोगी पडणारं पुस्तक घरी ठेवा.मूळ इंग्रजी पुस्तकाचं भारतासाठी खास भाषांतर करवून घेतलं आहे.सचित्र आहे.सर्व सामान्य आजारांची सविस्तर माहिती ,लक्षणे,आणि औषधेही जेनेरिक ड्रगजच्या नावाने दिली आहेत.

मुक्त विहारि's picture

11 Jan 2016 - 9:34 am | मुक्त विहारि

अजया ताई आणि सुबोध खरे, ह्यांच्या प्रतिक्रिया आवडल्या....

कंजूस म्हणतात त्याप्रमाणे, डॉ.नसेल तिथे, हे पुस्तक संग्रही असावेच.

असो,

उत्तम आरोग्यासाठी काही स्वानुभवाच्या टिप्स....

१. सकाळी लवकर उठणे.

२. खायच्या वेळा सांभाळणे.

३. दुपारी माफक झोप.

४. संध्याकाळी २ तास फिरणे.

५. रात्री लवकर झोपणे.

६. जेवणात सगळी जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ योग्य त्या प्रमाणात घेणे.किमान एक लिंबू अथवा एखादा आवळा दिवसभरात घ्यावा.उकडलेले अंडे, बीट आणि ताक अत्यावश्यक....

आणि सगळ्यात महत्वाचे....

७. दुरदर्शन नावाच्या राक्षसाला घराबाहेर ठेवणे....

ह्या सप्तपदीमुळे बर्‍याच प्रमाणात अनारोग्य टाळले जाते.

राहता राहिला प्रश्र्न तपासण्यांचा....

१. चाळीशी नंतर दर सहा महिन्यांनी रक्त आणि मुत्र ह्यांची तपासणी करून घ्यावी. फक्त मधूमेहासाठी.

२. पन्नाशी नंतर किडनी आणि स्ट्रेस टेस्ट दर वर्षी करुन घ्यावी.दोन किडन्या, हृदय आणि रक्त पुरवठा करणार्‍या नसा जर उत्तम असतील तर, शरीराचा रासायनिक कारखाना उत्तम चालतो.

थोडे अवांतर ---- तेलकट आणि मसालेदार पदार्थ पंचेचाळीसी नंतर जास्त खावू नयेत.रात्री तर शक्यतो नकोच. वर्षातून किमान दोनवेळा एखादा गड चढावा.

पन्नाशी नंतर १५ दिवसातून एकदा लंघन करावे.

साठी नंतर सर्व प्रकारची व्यसने कमी करावीत.

आहार,आचार आणि विहार जर व्यवस्थित असेल तर, रोग-आजारपण आपल्याजवळ फिरकत नाहीत.

डिस्क्लेमर : मी वैद्य किंवा डॉक्टर नाही.मालती कारवारकर ह्यांच्या पुस्तकातून मिळालेले ज्ञान आणि स्वानुभवाचे बोल लिहिले आहेत.

चौकटराजा's picture

11 Jan 2016 - 5:43 pm | चौकटराजा

. संध्याकाळी २ तास फिरणे.

फडके रोड वर फिरल्यास( ते सुद्धा २ तास ) या वयात तीव्र मत्सराची भावना निर्माण होऊन हृद्रोग बळावतो. आपल्या काय आणभाव आहे ?

संध्याकाळी २ तास फिरणे.>> ते कुठ फिरायचे तेवढ सांगा बुवा!! सध्या पुण्यात म्हणजे आम्ही तिथेच असल्याने संध्याकाळी फिरणे हे पाप आहे. एक जागा नाहीये जिथून तुम्ही धड चालू शकाल. कुठून कुठली गाडी अंगावर येईल काही सांगता येत नाही. बर २ तास वेळ मिळायला माणूस घरी तरी आला पाहिजेल लवकर. कारण मुदलात दिवसातले ३ तास हापिस ते घर ह्यातच जातात मग कुठे जायचे सायेब

प्रसाद भागवत's picture

11 Jan 2016 - 9:56 am | प्रसाद भागवत

सर्वाचेच त्यातही डॉ. खरे व अजया यांचे उपयुक्त प्रतिसादाबद्दल आभार.

@डॉ. खरे - B12 व D3 ह्या चाचण्यांची (वा त्या वारंवार करण्याची) आवश्यकता ह्या मुद्यावर आपली प्रतिक्रिया दिल्यास हवी आहे.

@अजया - डि ३ चे सोर्सेस कमी आहेत.... सूर्यप्रकाशात आपण किती वेळ नेऊ शकणार?/ ( मग भारतासारख्या देशांत हा एकच सोर्स मुबलक नाही का??)... कमी आहे म्हणून सप्लिमेंटवर असताना ते फार जास्त तर झाले नाही ना या काळजीने नंतर परत टेस्ट कराव्या लागतात.(मग सप्लिमेंट घ्यावी की नाही??)..एकुणात आपल्या प्रतिक्रियाने निदान माझ्या मनांतील गोधळ वाढलाय

अजया's picture

11 Jan 2016 - 11:25 am | अजया

कोणत्याही वेळातल्या सूर्यप्रकाशाने डि ३ मिळत नाही.त्यासाठी नेमके आपल्या कामाच्या वेळातले ऊन लागते जेव्हा आपण सर्व काचा बंद करुन एसीत काम करत असतो! (मीही याला अपवाद नाहीच.)
बाकी सोर्सेस फॅटी फिश जे माझ्यासारखे शाकाहारी खात नाहीत.दुग्धजन्य पदार्थातून मिळणारे प्रमाण आणि आवश्यक प्रमाण यात बराच फरक आहे.आणि आपली टेस्ट डि३ कमतरता दाखवते आहे .मग सप्लिमेंट घ्यावी लागणार.
आपण पूरक व्हिटॅमिन घेत असतो तेव्हा एक वर्षाने आपल्या लेव्हल्स बघणे आवश्यक आहे.जर यात जास्त लेव्हल आढळल्या तर तसा डोस कमी करावा लागेल.

पिलीयन रायडर's picture

11 Jan 2016 - 11:31 am | पिलीयन रायडर

माझं निरीक्षण असे आहे की सप्लिमेंट्स घेतले की लेव्हल्स वर जातात आणि म्हणुन थांबवले की खाली येतात. मग परत सप्लिमेंटस.. चक्र सुरु रहाते..

ह्यावर उपाय काय नक्की?

nakki kuthali wel palawi? mhanje sakali 10 chya aat ka dupari 5 nantar karawe? dupari unhat chalun fayada hot nahi ase mhantat tyat kitpat tathya ahe?

पिलीयन रायडर's picture

11 Jan 2016 - 11:29 am | पिलीयन रायडर

ह्या निमित्ताने कुणी D3 and B12 ह्याविषयी अधिक माहिती देईल का? की नक्की काय खाल्ल्याने हे घटक मिळतील. शाकाहारी लोकांसाठी पर्याय कोणते? सप्लिमेंट्स घ्याव्या की घेऊ नयेत?

अजया's picture

11 Jan 2016 - 12:39 pm | अजया

Most of the natural sources of vitamin D are animal-based, including fish and fish oils, egg yolks, cheese, milk and liver. If your diet does not include these items, you are prone to vitamin D deficiency. After a hectic day at work, most people prefer spending time indoors, thus reducing their exposure to sunlight. The body makes vitamin D when your skin is exposed to sunlight. When your kidneys are unable to convert vitamin D to its active form,the risk of deficiency also increases. This holds true for older people as their kidneys' ability to convert the vitamin to its active form reduces with age. Age is not always the reason. If your digestive tract has problems like Crohn's Disease and cystic fibrosis, it can affect the intestine's ability to absorb vitamin D from the food you eat. Last, but not the least, if you are obese, you are bound to have low blood levels of vitamin D. People with a body mass index of 30 or greater often have low blood levels of vitamin D.

(Times of India मधल्या एका लेखावरुन साभार)
साधारण आपल्याकडचे दहाच्या आसपासचे ऊन.उन्हाळ्यात जरा लवकरचे.याबाबत अनेक विवाद आहेत.सकाळचे दहा ही एक सरासरी वेळ म्हणता येईल.साधारण वीस मिनीटे तरी सनस्क्रिनशिवाय शरीराच्या जास्तीत जास्त भागाला ऊन मिळायला हवे.

पिलीयन रायडर's picture

11 Jan 2016 - 1:26 pm | पिलीयन रायडर

लहानपणी दुधात टाकायचे एक शार्कोफेरोल की काही तरी नावाचे एक मधासारखे लिक्विड मिळायचे, आमच्या मावशीकडे ते टाकायचे. ते बहुदा मासे न खाणार्‍यांसाठी होते जेणेकरुन त्यांना आवश्यक घटक मिळावेत.

असे काही आपण घेउ शकतो का जर मासे खात नसु तर?

उन्हाबाबतीत आमच्या त्या डॉकने दिलेला सल्ला :- "जेव्हा कुत्रे उन्हात शेकत बसलेले दिसतात तेव्हा आपणही उन्हात जावे.. जर ते सावलीत गेले असतील तर ते उन टाळावे".

आनंदी गोपाळ's picture

11 May 2016 - 9:28 pm | आनंदी गोपाळ

शार्कोफेरॉल = शार्क लिव्हर ऑईल. शार्क माश्याच्या लिव्हरचे तेल. ;)

पिलीयन रायडर's picture

12 May 2016 - 4:33 pm | पिलीयन रायडर

हो, पण मग ते खावं की खाउ नये?? म्हणजे ते दुधातुन मी आणि मुलाने घेतलं तर चालेल का?

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 11:29 pm | आनंदी गोपाळ

इतकंच.
खायला अजिब्बातच हरकत नाही.

चौकटराजा's picture

11 Jan 2016 - 5:55 pm | चौकटराजा

मी गेले वर्षी मायक्रोअब्ल्युमिन ची चाचणी करून घेतली ती ३२ हा अंक दाखवीत होती. २० हा आकडा साधारण रेंजमधला वरचा आकडा आहे. किडनी ओ के असेल तर हा आकडा २० चा आत इन्व्हेरीबली असतो. तो वाढल्याने कार्डेस ( रामि प्रिल ) हे औषध वर्ष्॑भर घेतले आता आकडा १६ आहे पण डोक्टरान्चे म्हणणे असे की हे औषध जन्मभर घ्यावे लागणार. किडनी स्टोन, गाल स्टोन हे अत्यंत छुपेपणाने वावरत असतात . त्यासाठी कमीत्॑कमी त्याचा इतिहास आहे त्यानी चाचणी करणे आवश्यकच. लक्शात ठेवा ब्रेन किडनी हार्ट लिव्हर व फुफुसे हे शरीराची हाय कमान्ड आहे ती मधील एक रूसला की बाकी गळा काढतात.

डँबिस००७'s picture

11 Jan 2016 - 6:49 pm | डँबिस००७

मनुष्याला एकुण ९१ इसेंशीयल न्युट्रीयंटस लागतात त्यात,
१. ६० मिनीरल्स,
२. १६ ईसेंशीयल व्हीटामिंस,
३. १२ एमिनो अ‍ॅसिड्स,
४. ३ फॅटी अ‍ॅसिड्स,

१९७० च्या दरम्यान व्हीटामिन डी वर शोध कार्य सुरु झाले, त्या पुर्वी डी व्हिटामिनला बोन वीटामिन म्हणत आणी त्याची महती कोणालाही माहीती नव्हती, मायकेल हॉलिकच्या शोध कार्यातुन असे पुढे आले की, व्हीटामिन डी३ हे शरीरातील बर्याच कार्यप्रणालीत महत्वाची भुमिका निभावत असते. डी व्हिटामिन चे दोन प्रकार आहेत, डी२ आणी डी३ त्यातल्या त्यात डी३ महत्वाचे आहे असे पुढे आले. शरीरातील सर्व पेशींना डी व्हीटामिन लागते, डाय बेटीसचे मुळ कारण हेच डी व्हिटामिन आहे. त्या शिवाय यकृत, किडनी, ब्लड प्रशर चे सुरळीत काम चालते डी३ मुळेच,

ह्या ९१ ईसेंशीयल न्युट्रीयंट्सचे सोर्सेस खाण्यातुन येत असतात, त्यात फक्त डी३ विटामिन हे सुर्य प्रकाशातुन मिळते,
माणसाला दिवसाला व्हिटामिन डी३ चे १२००० युनिट लागतात, डि३ व्हिटामिन्सच्या पुरवठ्यासाठी दिवसाला जर १५
२० मिनीट सुर्य प्रकाश पुरतो, शरीर स्वतःच डी व्हिटामिन बनवते.

जर व्हिटामिन डी३ खाद्य पदार्थातुन घ्यायचा प्रयत्न केला तर दिवसाला ८ ते १० मोठे मासे प्रत्येकाने खावे लागतील,
व्हिटामिन्सच्या गोळ्या खायच्या म्हंटल्या तर दिवसाला २० गोळ्या लागतील, त्या गोळ्या घेण्यात जास्त डी३ जाउन
पॉयझनींग होण्याची शक्यता सुद्धा असते, त्या विरुद्ध सुर्य प्रकाशात २० मिनीटात शरीराला लागणारे व्हीटामिन डी३ आवश्यकतेनुसार बनवले जाते, एकदा शरीरात डी३ ची गरज भागली मग व्हीटामीन डी३ बनवण्याचे काम आपसुक बंद होते,

व्हीटामिन डी३ बनवायला सकाळ ११ ते दुपारच्या १ दरम्यानचे सुर्य किरण चांगले समजतात. व्हिटामिन डी३
बनवायला शरीरात कॅलॉस्ट्रोल असावे लागते, शरीरात त्वचेजवळ असलेल्या कॅलॉस्ट्रोलचे रुपातंर व्हिटामिन डी३ मध्ये होत असते, ह्या शिवाय डी३ चे सोर्स घरात बनवलेले लोणी, तुप हे ही आहे. जर शरीरात कॅलॉस्ट्रोल नसेल तर
व्हीटामिन डी बनणार नाही. म्हणुन डायेट मध्ये फॅट असणे महत्वाचे आहे.

व्हीटामिन डी३ बनवायला जर १५ मिनीटे पुरत असतील मग सुर्य नमस्कारालाही तितकीच पुरतात फक्त सुर्याची १२ नाव म्हणत सुर्य नमस्कार घालायचा, पण तो बंद घरात ना घालता सुर्य प्रकाशात घाला, जेवताना गरम भातावर
साजुक तुपाची धार घालायला मागे पुढे पाहु नका ! जर ऑफिसमध्ये असाल तर १५ मिनीटासाठी लंचब्रेक मध्ये
सुर्य प्रकाशात एखादा फेरफटका मारा,

अजया's picture

11 Jan 2016 - 7:35 pm | अजया

व्हिटॅमिन डी हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. त्यामुळे फॅट असेल तर ते वापरले जाईल!

प्रसाद भागवत's picture

11 Jan 2016 - 8:31 pm | प्रसाद भागवत

व्वा...अतिशय अभ्यासपुर्ण प्रतिक्रिया.धन्यवाद

सुबोध खरे's picture

11 Jan 2016 - 8:40 pm | सुबोध खरे

काही मिथकं --
१)व्हिटामिन्सच्या गोळ्या खायच्या म्हंटल्या तर दिवसाला २० गोळ्या लागतील
व्हिटामिनच्या गोळ्या खायच्या झाल्या तर दिवसात एक किंवा दोन गोळ्या खाव्या लागतील २० नव्हे ( मानक गोळ्या मध्ये ४०० ते १००० युनिट D ३ असतं) आणी रोजची गरज ५०० ते १००० युनिट च आहे)
२) त्या गोळ्या घेण्यात जास्त डी३ जाउन पॉयझनींग होण्याची शक्यता सुद्धा असते.व्हिटामिन D ३ चे अतिशय जास्त मात्रा फारच क्वचित होते. बरेच "आहार तज्ञ" त्याचा जितका बाऊ करतात त्याला काही अर्थ नाही. बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही कॅलशियम आणी व्हिटामिन D ३ च्या दिवसात दोन गोळ्या आपण निः शंकपणे घेऊ शकता. उदा ऑस्टो कॅलशियम,कॅलशियम संडोझ ई. पहा
The Institute of Medicine in 2010 recommended a maximum uptake of 4,000 IU/day, finding that the dose for lowest observed adverse effect level is 40,000 IU daily for at least 12 weeks,[9] and that there was a single case of toxicity above 10,000 IU after more than 7 years of daily intake; this case of toxicity occurred in circumstances that have led other researchers to dispute it as a credible case to consider when making vitamin D intake recommendations.[9] The Institute of Medicine did not find evidence of toxicity between 4,000 IU and 10,000 IU, so the 4,000-IU figure is more of an estimate than a number based on evidence of toxicity above 4,000 IU . Also, there is a therapy for rickets utilizing a single dose, called stoss therapy in Europe, taking from 300,000 IU (7,500 µg) to 500,000 IU (12,500 µg = 12.5 mg), in a single dose
दक्षिण भारतात ( महाराष्ट्रात धरून) सकाळी १० ते १ च्या उन्हात ३० ते ३५ मिनिटे राहिल्यास आपल्या शरीरात पुरेसे व्हिटामिन D ३ तयार होते. http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3897581/
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3897581/table/T1/
पहा विकी https://en.wikipedia.org/wiki/Cholecalciferol
बाकी सविस्तर प्रतिसाद नंतर

मार्मिक गोडसे's picture

11 Jan 2016 - 7:27 pm | मार्मिक गोडसे

कोवळ्या ऊन्हात बसल्यास शरिरात विटामीन डी तयार होते असे शाळेत शिकलो होतो. निदान भारतात तरी ११ ते १ च्या दरम्यान कोवळे ऊन नसते.
२० मिनिटांसाठी शरीराच किती टक्के भाग उघडा ठेवावा?
कपड्यांंमुळे व्हीटामिन डी३ बनण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो का?

डँबिस००७'s picture

11 Jan 2016 - 10:02 pm | डँबिस००७

डॉ खरे,

प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !

वेगवेगळ्या तज्ञांमार्फत डी विटॅमिनची शरीरातील दररोजची गरजेची मात्रा वेगवेगळी प्रतिपादीत केलेली आहे,
पण डी विटॅमिनच्या महत्वाविषयी आणी त्याच्या शरीरातील कार्याविषयी सर्वांत एकमत आहे.
सर्व साधारणपणे प्रत्येक शरीराची डी विटॅमिनची गरज वेगवेगळी असु शकेल, जर शरीर स्वतः डी विटॅमिन
सुर्यापासुन बनवत असेल तर स्वतःच्या शरीराची गरज स्वतः शरीरच भागवेल. मग वेगळ डी विटॅमिनची मात्रा
तोंडावाटे घेण्याच प्रयोजन नाही आणि डी विटॅमिनची किती मात्रा पाहीजे हे ही महत्वाच नाही.

डँबिस००७'s picture

11 Jan 2016 - 10:22 pm | डँबिस००७

मार्मिक,

शरीरात विटॅमिनची डी तयार होण्यासाठी डायरेक्ट सुर्य किरण शरीरावर पडणे आवश्यक असावे जसे हिरव्या वनस्पतींना सुर्य प्रकाश लागतो !!

शरीराच्या वरच्या (कंबरेपासुन)भागाची सरफेस एरीया ही शरीराच्या खालच्या भागापेक्षा जास्त असते म्हणुन शर्ट बनियन काढुन उन्हात बसल्यास फायदा होतो.

प्रसाद भागवत's picture

12 Jan 2016 - 9:30 am | प्रसाद भागवत

चला...म्हणजे कधीकाळी शेअरबाजारांत शर्ट किंवा चड्डी गमावलीच तरीही हा एक फायदा आहे की निदान 'विटॅमिनची डी' ची कमतरता भासणार नाही... गंभीर विषयावरील चर्चेत पाचकळपणा केल्याबद्दल क्षमस्व.

डायबेटीस आणी क्रोमियम !

क्रोमियम नावाचा धातु शरीरात पुरेसा नसल्याने डायबेटीस (ईंशुलिन रेसिस्टंस) उद्भवतो अस शोधकार्यात पुढे आलेल आहे.

ईंशुलिन हे एक संप्रेरक आहे. खाल्लेल्या अन्नाचे शर्करेत रुपांतर होताना ती शर्करा रक्तात पोहोचते आणी
त्या शर्करेची गरज स्नायुंना व रक्तातील लाल रक्त पेशीना असते. जेंव्हा अशी शर्करा रक्तात वाढते, (म्हणजे कार्ब खाल्यावर) लगेच रक्तात ईंशुलिन सोडले जाते. ह्या ईंशुलिन संप्रेरकाच काम असत एका चावी प्रमाणे. ह्या चावीने
लाल पेशीचे दार उघडले जाते व शर्करा पेशीच्या आत घेतली जाते. रक्तात किती शर्करा आहे ह्यावर शरीर लक्ष ठेवुन असते, पण किती इंशुलिन आलेल आहे ह्यावर कंट्रोल नसतो. काही कारणाने ईंशुलिनने पेशीची दारे उघडली गेली नाहीत तर, रक्तातील शर्करा तशीच रहाते, परीणामी शरीराला (स्वादुपिंडाला) पुन्हा ईंशुलिन पाठवण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे रक्तात ईंशुलिन व शर्करा दोन्ही वाढु लागतात.

चावी न उघडण्याच कारण पेशीचे कम्युनिकेशन फेल्युअर ! ईंशुलिन संप्रेरके पेशीवर असलेल्या रिसेप्टर्सवर जाऊन बसतात, त्यामुळे पेशीची दारे उघडण्याच काम होणार असते पण क्रोमियमच्या कमतरते मुळे हे काम नीट होत नाही.

क्रोमियमचे सोर्स म्हणजे ब्रोकोली ५४%, सर्वात कमी व भारतात मिळणारे काळी मिरी ३%. टॉमेटो मध्ये ४% आणी हिरव्या शेंगा (फरसबी वै) ६%

क्रोमियम सारख्या ६० एलिमेंटची गरज मानव शरीराला असते, ही गरज खाद्य पदार्थातुन (वनस्पती खाद्य पदार्थातुन) पुरवली जाते. हे ६० एलिमेंटस शरीराला दररोज मिळाले तर शरीर निरोगी रहाते. तसेच असे एलिमेंटस वनस्पतीला मिळाले तर वनस्पती सुद्धा निरोगी रहाते. वनस्पतींना ह्या ६० एलिमेंटस जमिनीतुन मिळतात पण त्या एलिमेंटस वनस्पती शुद्धरुपात घेऊ शकत नाहीत तर त्यासाठी बॅक्टेरीयाची गरज असते. कृत्रीम रासायनीक खते घातलेल्या जमिनीत गांडुळासारखे जीव राहु शकत नाहीत तर बॅक्टेरीया काय रहाणार ?

म्हणुनच जग आज सेंद्रिय वनस्पती उत्पादनाकडे वळलेल आहे.

सुबोध खरे's picture

11 Jan 2016 - 11:28 pm | सुबोध खरे

I WOULD RATHER BE A PRAGMATIST THAN PURIST.
हजार रुपयाची B १२ ची चाचणी करण्यापेक्षा मी २५ रुपयाची न्युरोबायोन ची तीन इंजेक्शने देणे श्रेयस्कर समजतो. कारण कमतरता असेल तर उपाय हाच आहे तुमचे यकृत तीन वर्षे पुरेल एवढा साठा ठेवू शकते आणी B १२ हे पाण्यात विद्राव्य जीवनसत्त्व असल्याने त्यचा ओव्हर डोस होऊन अपाय होण्याची शक्यता नाही,
आजता गायत मी कोणत्याच रुग्णाला B १२ ची चाचणी करण्यास सांगितलेले नाही.
आमच्या वडिलांची B १२ ची चाचणी केली त्यात त्यंची पातळी ४००० आढळली. साधारण हि ५०० च्या आसपास असते. हा त्यांना दिलेल्या न्युरोबायोन चा परिणाम होता यानंतर मी त्यांची चाचणी परत केली नाही.
हीच गोष्ट D ३ ची आहे . जर रुग्णाला त्याची कमतरता आहे असे वाटले तर मी सरळ २५ रुपयांची एक गोळी ६०,००० युनिट आठवड्याला एक अशा आठ गोळ्या देतो त्यानंतर रोज दोन कॅलशियम संडोझ च्या गोळ्या वर्षभर घेण्यास सांगतो. चाचणी करून ५०० रुपये फुकट घालवण्यात फायदा नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.
वर लिहिल्याप्रमाणे अति डोस काही कुणाचा इतका सहज दिसून येत नाही

प्रसाद भागवत's picture

12 Jan 2016 - 9:26 am | प्रसाद भागवत

धन्यवाद डॉक्टर, अशाच आशयाच्या (म्हणजे चाचण्या करु नयेत अशा नव्हे, परंतु स्पष्ट मतप्रदर्शन करणार्या) प्रतिसादाची मला अपेक्षा होती, आणि आपण या विषयाशी संबंधित व जाणकार असल्याने आपल्या मताला माझ्या दृष्टिने महत्व आहे.

सुबोध खरे's picture

12 Jan 2016 - 9:42 am | सुबोध खरे

भागवत साहेब
जेथे उपचार चाचणी पेक्षा स्वस्त आणि कमी कटकटीचे आहेत तेथे चाचणी करण्यात काय हशील आहे?
या उलट मधुमेह सारखा आजार असेल तर नियत कालिक तपासणी आणि त्यानुसार उपचार हे आपल्या भविष्यकालीन (long term) आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. छातीत दुखत असेल तर उगाच तर्क वितर्क करत बसण्यापेक्षा डॉक्टर कडे जाऊन इ सी जी करून घेणे चांगले. तसेच तपासणी न करता औषध घेणे हे चुकीचेच ठरेल.
वर लिहिल्या प्रमाणे जंतांचे औषध १० रुपयाला घेणे हे २०० रुपये देऊन शौचाची तपासणी करण्यापेक्षा जास्त फायद्याचे आहे. किंवा जीवनसत्त्वाची रक्त तपासणी करण्यापेक्षा ती औषधातून घेणे हे जास्त स्वस्त आणि मस्त आहे.
त्यातून तुम्हाला कुणी विचारले कि अशी जीवनसत्त्वे कशी घेता? सरळ माझे नाव सांगा. डॉक्टर खरे एम डी यांनी सुचविले आहे म्हणून घेतो.

एस's picture

12 Jan 2016 - 9:54 am | एस

खरे साहेब, तुमच्याकडे एकदा यायला पाहिजे. आजवर मी पाहिलेल्या इतर दोन निस्पृह डॉक्टरांनंतर आता तुमचं तिसरं नाव घेत जाईन. खूप छान प्रतिसाद व माहिती देताहात.

सुबोध खरे's picture

12 Jan 2016 - 10:08 am | सुबोध खरे

केंव्हाही या. मी रिकामाच असतो.
एक कट्टा करून टाकू. हा का ना का

प्रसाद भागवत's picture

12 Jan 2016 - 10:19 am | प्रसाद भागवत

धन्यवाद...आपला दृष्टिकोण नेहमीच निस्रुहपणाचा राहिला आहे आणि आपण वावगा सल्ला देणार नाही अशी मला खात्री आहे. अशा चर्चेच्या माध्यमांतुनतरी काही गोष्टी कळतात अन्यथा दुर्दैवाने आपण देत असलेल्यासारखे सल्ले बहुतकांना उपलब्ध नसतात.

याच बरोबर सल्ले देणार्यांची व दिलेल्या सल्ल्यांची गुणवत्ता न तपासता ते आंधळेपणाने अंमलात आणणारे (आणि अनेकदा दुषित पुर्वग्रहामुळे योग्य लोकाम्ना फाट्यावर मारणारे) लोकही तितकेच दोषी असतात.

श्रीगुरुजी's picture

12 Jan 2016 - 1:11 pm | श्रीगुरुजी

छातीत दुखत असेल तर उगाच तर्क वितर्क करत बसण्यापेक्षा डॉक्टर कडे जाऊन इ सी जी करून घेणे चांगले.

डॉक्टरसाहेब,

+१

अत्यंत योग्य सल्ला! स्वानुभवामुळे हा सल्ला जास्तच भावला.

विवेक ठाकूर's picture

12 Jan 2016 - 10:42 am | विवेक ठाकूर

एकदम प्रॅक्टीकल सल्ला डॉक्टर!

जेथे उपचार चाचणीपेक्षा स्वस्त आणि कमी कटकटीचे आहेत तेथे चाचणी करण्यात काय हशील आहे?

छातीत दुखत असेल तर उगाच तर्क वितर्क करत बसण्यापेक्षा डॉक्टर कडे जाऊन इ सी जी करून घेणे चांगले. तसेच तपासणी न करता औषध घेणे हे चुकीचेच ठरेल.

माझा आशय तोच होता पण तुम्ही तो योग्य शब्दात मांडलाय. थँक्स !

पिलीयन रायडर's picture

12 Jan 2016 - 2:33 pm | पिलीयन रायडर

तर सारांश असा की

१. रोज ११-१ च्या उन्हात १५-३० मिनिट बसायला हवे. (माझ्या माहिती प्रमाणे १/३ त्वचा सुर्यप्रकाशात असायला हवी.)

प्रश्नः- रोज नाही जमणार, पण वीकेंडला तासभर उन्हात व्यायाम वगैरे केला तर जमु शकेल का?

२. सप्लिमेंट्स घेऊनही फार अपाय होत नाही.

प्रश्न :- मग तशा आरोग्याच्या बारिक सारिक कुरबुरी करिता कॅलशियम, डि३ आणि बी१२ च्या गोळ्या घेतल्या तर चालतील का? चालत असतील तर प्रमाण काय असावे?

३. एका घटकाला शरीरात काम करायला अजुन २५ घटक लागतात. ही फारच तारेवरची कसरत आहे.

प्रश्नः- आहारात नक्की काय असणे आवश्यक"च" आहे?

सुबोध खरे's picture

12 Jan 2016 - 6:45 pm | सुबोध खरे

आठवड्यात तीन वेळेस तरी आपल्याला ३०-३५ मिनिटे उन्हात फिरणे आवश्यक आहे. चेहर्याला आणि हाताला सन स्क्रीन न लावता. हे शक्य नसेल तर D ३ च्या गोळ्या चालू करा.
शरीराच्या कुरबुरी त्यामुळेच आहेत हे नक्की करून घ्या
अन्यथा कुर्बुरींचे कारण वेगळेच असेल तर D ३ आणी B १२ घेऊन कुरबुरित सुधारणा होणार नाही.
चौरस आहार घ्या. आणी बाकी शरीरावर सोडून द्या. आपला टी व्ही बिघडला तर त्यातला कुठला आय सी बिघडला आहे याचा डोक्याला त्रास करून घेता का? तसेच या गोष्टी तुमच्या फामिली डॉक्टर वर सोडा.
महत्त्वाची गोष्ट-- जो माणूस जालावर आहे तो काही निम्न वर्गीय नाही निदान मध्यम वर्गीय आहे. आणी मध्यम वर्गीयाला जर एवढ्या अन्न घटकांची कमतरता पडली तर गरीब आणी रस्त्यावर राहणारी माणसे रोगीष्टच व्हायला पाहिजेत. तसे होत नाही. याचा अर्थ काय निसर्ग आपले काम करीत असतोच. आपण फक्त आपल्या आहारात सर्व तर्हेचे अन्न घटक आहेत एवढे बघून घ्या.
मी माझ्या कडे येणाऱ्या गरोदर स्त्रियांना ज्यांना आपल्या बाळाचे पोषण नीट होत आहे कि नाही अशी शंका असते त्यांना एक उदाहरण नेहमी देतो
असे नाही कि अंबानींच्या घरात ५ किलोची मुले जन्म घेतात( नंतर त्यांचे अति पोषण होऊन विशालता येते ते वेगळे) आणी गरीबाच्या घरी दीड किलोची मुले जन्माला येतात. तेंव्हा आपण फक्त आपल्या आहारात सर्व तर्हेचे अन्न घटक आहेत एवढे बघून घ्या.बाकी सर्व निसर्गावर सोपवा.

प्रसाद१९७१'s picture

13 Jan 2016 - 5:19 pm | प्रसाद१९७१

डॉक्टर साहेब - तुमच्या एथिक्स मधे बसत बसत असेल तर D ३ च्या गोळ्यांचे नाव इथे सांगाल का?

अजुन १-२ प्रश्न

-------------------

तसेच पिराताईंनी विचारल्या प्रमाणे काही कुरबुर असो वा नसो, D ३ आणी B १२ च्या सप्लिमेंट घेतच राहीले तर चालेल का? आणि अश्या अजुन काही सप्लिमेंट गोळ्या आहेत का की ज्या कायम घेतच रहावे.

जर ह्या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर गोळ्यांची नावे आणि ४० वर्षाच्या स्त्री / पुरुषाला काय डोस घ्यावा लागेल.

-------------------

११ ते दुपारी १ चे उन भारतात तरी बर्‍यापैकी त्रीव्र असते., हे ११ ते १ चे टायमिंग युरोप साठी आहे का?

सुबोध खरे's picture

13 Jan 2016 - 9:03 pm | सुबोध खरे

D SOL ६० K, CALCIROL GRANULES, TORFLASH TABLETS यातील कोणतीही चालेल.
११ ते १ हा हिवाळ्यातील( सध्या आहे म्हणून ती वेळ दिली आहे) कालावधी आहे. उन्हाळ्यातील वेळ ९ ते ११ अशी आहे. या काळात आपण एका जागी उभे राहिलात तर शरीर गरम होईल. चालत राहा म्हणजे शरीर थंड होईल पण अतिनील किरण मात्र शरीरात आत पर्यंत जातात ज्याचेमुळे ड जीवनसत्त्व तयार होते.
बाकी आपला आहार चौरस असला पाहिजे. त्यात कमी पद्फ्ले तरच वरून औषध घेणे बरोबर राहील.

प्रसाद भागवत's picture

13 Jan 2016 - 9:51 pm | प्रसाद भागवत

डॉ. मनःपुर्वक धन्यवाद...

एस's picture

14 Jan 2016 - 11:49 pm | एस

काही लोकांना अतिनील किरणांची अ‍ॅलर्जी असते. अशांना त्वचेवर गांध्या आल्यासारखे व्रण उठतात. त्यांना डॉक्टर लोक हे 'लिवोसेट-एम' प्रिस्क्राईब करतात असे पाहिले आहे. मग अशा रुग्णांनी ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय करावे? उन्हात जावे तर अ‍ॅलर्जी, न जावे तर ड जीवनसत्त्वाची कमतरता.

मला स्वतःलाच सूर्यप्रकाशाची(अतीनील किरण) अॅलर्जी आहे! सप्लिमेंट वर्षातून एकदा करत राहावे लागते.

डि३-प्राॅब्लेम नसेल तर दरवर्षी
Tab DV 60k
Once in week for 8 weeks
डेफिशियन्सी जास्त असल्यास १०००ची गोळी रोज.या कोर्सनंतर पुढे. तीन महिने.
कॅल्शिअम -
Tab supracal 1gm

B12-
Tab methycobal ५००mcg
रोज (शाकाहारी असाल तर)

प्रसाद भागवत's picture

13 Jan 2016 - 9:50 pm | प्रसाद भागवत

डॉ., मनःपुर्वक धन्यवाद...

प्रसाद१९७१'s picture

14 Jan 2016 - 10:11 am | प्रसाद१९७१

दोन्ही डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार.

रात्रपाळी करणाऱ्या लोकानी आपल्या आहारासंबधीत कोणत्याप्रकारची काळजी घ्यायला हवी

वेळच्या वेळी व्यवस्थीत जेवावे.
भरपूर पाणी प्यावे.
भरपूर झोप घ्यावी - घरी जाड पडदे लावून किंवा एखादा आय मास्क (ब्लाईंडर) वापरून किमान ८ तास झोप काढावी.

नमस्कार.
जुलै महिन्याच्या आसपास माझ्या एका परिचितांना खूपशा मेडिकल टेस्ट्स / वैद्यकीय चाचण्या करण्यास सांगण्यात आल्या होत्या काही कारणाने. त्या सर्व टेस्ट्सची यादी घेउन आम्ही तीन चार ठिकाणी फिरलो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर होते. आणि ह्यांच्या किमतीतील तफावत फार मोठी वाटत होती. ( किमान दर सुमारे चार हजार ते कमाल तब्बल साडे दहा हजार रुपये; इतका फरक. चाचण्या त्याच . )
ही खाली यादी आहे त्या ठिकाणांची आणि त्यांच्या दरांची . ( एकूण - टोटल रकमेसाठी शेवटची ओळ पहा )
अष्टुरकर लॅब वाकडमध्ये आहे. पी एच डायग्नोस्टिक्स ची एक ब्रांच चिंचवड चाफेकर चौकात आहे. आदित्य बिरला हॉस्पिटल चिंचवड शेजारी थेरगाव मध्ये आहे. अष्टुरकरकडे दर कमी असण्याचे एक कारण म्हणजे त्यांच्याकडे ह्यातल्या जवळजवळ सर्व चाचण्या एकाच प्याकेज मध्ये होत्या . इतरत्र तसे प्याकेज नव्हते.
चिंचवडमधलं बरचसं मिडलक्लास पब्लिक पी एच डायग्नोस्टिकक्सकडे जातं. ( ते जवळही पडतं आणि इथल्या डॉक्टरांनाही तिथल्या तपासण्या चालतात. इथले बहुतांश डॉक्टर रुग्णाने स्वतःहून विचारल्याशिवाय लॅब सुचवत नाहित. कोणत्याही रेप्युटेड ठिकाणी केली तर चालेल म्हणतात. )
.
.
थेरगाव बाजूचे लोक हल्ली अष्टुरकरकडे जाताना दिसले.
आदित्य बिरला मध्ये फार मोठ्या कॉर्पोरेट क्लायंट जातात.
ह्यात कोणतंही एक चाम्गलं किंवा वाईट असं मी काहीही सुचवत नाहिये.
ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या सुविधा, कम्फर्ट्स असणार आणि त्या हिशेबाने दर ठरलेले असणार ; ;हे मान्य आहे.
शिवाय दरांसाठी इतरही काही गुणात्मक निकष असू शकतात.
फक्त मोठी तफावत दिसली म्हणून म्हटलं मांडावं.
( टक्क्यांच्या भाषेत सांगायचं तर किमान व कमाल दरात दहा-वीस नव्हे तर तब्बल अडीचशे टक्क्यांचा फरक होता. )

tests suggested by doctorprice at ashturkar labprice at P.H. diagnosticsprice at aditya birla hospitalblood sugar fasting and PPpart of package120290HbA1C400400580Lipid profilepart of package600865Haemogrampart of package200325vitamin B12part of package7001665vitamin D3part of package20003475Liver function testspart of package600575kidney function testspart of package6001240thyroid function testspart of package5501300Urine routinepart of package100140TOTALpackage price 3500 + 400 = 3900587010455body div * { font-family: Verdana; font-weight: normal; font-size: 12px; } body { background-color: #E6E6FF; } .tableContainer table { border: 1px solid #000040; } .tblHeader { font-weight: bold; text-align: center; background-color: #000040; color: white; } .oddRow, .evenRow { vertical-align: top; } .tblHeader td, .oddRow td, .evenRow td { border-left: 1px solid #000040; border-bottom: 1px solid #000040; } .lastCol { border-right: 1px solid #000040; } .oddRow { background-color: #C6C6FF; } .evenRow { background-color: #8C8CFF; }

अवांतर :-

ह्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष टेस्ट करुन घेतली ती थायरोकेअर लॅबकडून. तिथे दोन हजारात काम झाले. शिवाय सॅम्पल घरी येउन कलेक्ट केले गेले. अर्थात स्वतः डॉक्टरचा त्यांच्याशी टाय अप असावा आणि आमच्या डॉक्टारच्या रुग्णांना तिथे सवलत असावी असा अंदाज. किम्वा डॉक्टरच्या ओळखीमुळे सवलत मिळाली असावी. अर्थात डॉक्टर म्हणाले की तुम्ही वरीलपैकी कुणाही कडून आणलं तरी मला चालेलच; पण ह्या ठिकाणी त्याहून कमी दरात हूउ शकते; विचारुन पहा. तुम्हाला स्वतःला जे काय ठीक वाटेल तसे करा.

सुबोध खरे's picture

13 Jan 2016 - 9:05 pm | सुबोध खरे

बुफे मध्ये जेवण आणी अ ला कार्टे मधील जेवण यातील फरक प्याकेज आणी इतर चाचण्या यात आहे.
बाकी ५ तारांकित हॉटेलात आणी इतर ठिकाणी असलेल्या दरातील फरक आपल्याला रुग्णालय आणी इतर LAB मध्ये दिसेल.

अभिजीत अवलिया's picture

16 Jan 2016 - 6:49 pm | अभिजीत अवलिया

डॉ. खरे
तुमच्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. एकदा भेटायलाच हवे तुम्हाला.

चौकटराजा's picture

17 Jan 2016 - 7:31 pm | चौकटराजा

पुण्याच्या राम कृष्ण मठ येथे 40 ते 60, 60 चे वर व डाय बेटिक प्रोफाईल अशी तीन पैकेजेस प्रत्येकी 1100 रू त करून मिळतात

स्थितप्रज्ञ's picture

11 May 2016 - 11:49 am | स्थितप्रज्ञ

हल्ली कुठल्याही चाचण्या केल्या तरी आपण खरेच पेशंट आहोत कि नाही याचा संभ्रम कायम राहतो. त्यात विनाकारण चाचण्या करायला लावण्याचे प्रमाण अतिशय बोकाळले आहे. अचानक सगळ्यांना विटामिन ब आणि ड ची कमतरता कशी काय येऊ शकते? आपण आपला आहार तर नाही बदलला. सगळी मार्केटिंग gimmick आहे.
तज्ञांच्या साल्ल्याशिवाय तर कुठली हि गोळी अजिबात घेऊ नका (जरी water soluble vitamins असतील तरी) कारण प्रत्येक गोळी थोड्या थोड्या फरकाने lever damage करत असते. जितके शक्य तितके natural nutrients मिळवा.
१९व्या शतकात माणसाच्या जिवापेक्षा पैसा मोठा झालाय. त्यामुळे medical industry फक्त पेशंटच्या भीतीवर चालू आहे. आपल्याला स्वतःला जर तंदुरुस्त वाटत असेल तर कुठल्याही औशाधाचि आवशकता नाही.
राहिला प्रश्न चाचण्यांचा, तर कुठले हि ठोकताळे हे rigid नसतात. एखाद्याला १२०/८० ब्लड प्रेशर suit होते तर एखाद्याला ९०/६० suit होते. सरासरी १२०/८० जरी असले तरी ९०/६० वाला लगेच BP पेशंट होत नाही पण डॉक्टर घाबरवून गोळ्या चालू करतात. विटामिन, शुगर, इत्यादी च्या बाबतीतही हेच चालू आहे.

टीप: वरील माहिती हे माझ्या पदरची सांगितलेली नाही तर खालील video लिंक चे सार आहे.
https://www.youtube.com/watch?v=TH1y3MYWkP8

सदर video पद्मभूषण डॉ बी एम हेगडे यांचा आहे. अतिशय माहितीपूर्ण आहे. वरील मुद्यांव्यतीरिक्त आणखी बरीच उपयुक्त माहिती आहे. त्यामुळे सर्वांनी आवर्जून वेळ काढून ऐकाच!!!

आणखी एक टीप: जर कुठला त्रास होत असेल किवा आपल्या फमिली डॉ ने सांगितले असेल तर कुठीलीही टेस्ट टाळू नका. त्या tests जरूर करा पण confuse होऊ नका आणि घाबरून जाऊ नका. आपण एवढे हि आजारी नसतो जेवढे डॉक्टर भासवतात. आणि शक्य तितक्या artificial sources (उदा. गोळ्या) पासून लांब रहा.

सुबोध खरे's picture

11 May 2016 - 1:28 pm | सुबोध खरे

कारण प्रत्येक गोळी थोड्या थोड्या फरकाने lever damage करत असते.
एखाद्याला १२०/८० ब्लड प्रेशर suit होते तर एखाद्याला ९०/६० suit होते.
याला शास्त्राधार नाही.
अचानक सगळ्यांना विटामिन ब आणि ड ची कमतरता कशी काय येऊ शकते? आपण आपला आहार तर नाही बदलला.
आपला आहार आणी जीवन पद्धती "बदललेली" आहे.
माणसांचा व्यायाम संगणकावर बोटे बडवणे एवढाच आहे आणी चौरस आहार घेण्य ऐवजी प्रक्रिया केलेले जलद अन्न (फास्ट फूड) सेवन फार वाढले आहे यामुळे हि परिस्थिती आहे. रोज अर्धा तास उन्हात फिरणारी माणसे शहरात किती असतील? पुण्यात तर डोळे सोडून सर्व अवयव झाकणार्या दहशतवादी मुली सर्रास दिसतात.
ब १२ जीवनसत्वाच्या धाग्यात माझा प्रतिसाद पहा.
राहली गोष्ट डॉ हेगडेंची. त्यानी सांगीतालेल्या बर्याच गोष्टी सत्य आहेत परंतु काही गोष्टी पुर्वग्रह दुषित आहेत एवढेच मी सांगेन.

आनंदी गोपाळ's picture

11 May 2016 - 9:52 pm | आनंदी गोपाळ

मिपावर (किंवा कुठेही) स्वयंसंपादनाची सोय असणे गरजेचे का आहे?
एक उदाहरण. "lever damage"
प्रत्येक गोळीने थोडेफार लिवर डॅमेज होते, हे बरोबर आहे. पण इथला लिव्हर दारू पीने से खराब होनेवाला नसून विंजिनेरवाला (बहुदा ऑटोकरेक्टमुळे) झालाय, अन तो मा. संपादकांच्या कृपेशिवाय बदलणार नाही.
*
रच्याकने. प्रत्येक गोळीने जसे लिव्हर डॅमेज होते, तसेच ते आपण खात असलेल्या प्रत्येक पदार्थामुळेही होऊ शकते. बेसिकली लिव्हर इज "डी-टॉक्स" लॅब. आतड्यांतून रक्तात घेतलेले घटक आधी लिव्हरमधे जातात, तिथे वाईट केमिकल्सची वाट लावून मगच शरीरात येतात, अशी काहीशी त्याची रचना आहे..
*

स्थितप्रज्ञ's picture

13 May 2016 - 12:59 pm | स्थितप्रज्ञ

असो.
सांगण्याचा मुद्दा असा कि जसे काही वर्षांपूर्वी Fat म्हणजे काहीतरी भयंकर, नंतर काही वर्षांनी Fat नाही तर Cholesterol घातक असते आणि आता ते मागे पडून साखर घातक असते असा प्रचार हेल्थ इंडस्ट्री मध्ये होताना दिसतो. थोडक्यात दर काही वर्षांनी नवीन संशोधानांच्या आधारे हेल्थ इंडस्ट्रीला एक नवीन सुपर बग सापडतो, तसेच विटामिन, calcium, खनिज इत्यादी बाबतीतही एखादी नवीन कमतरता आढळते. ती अगदी सर्रास असते. म्हणजेच एखाद्या software engineer ला हि असते, एखाद्या field work करणार्या कामगाराला ही असते आणि एखाद्या गृहिणीलाही असते. काही वर्षांपूर्वी सर्रास calcium च्या गोळ्या घ्यायचा सल्ला दिला जायचा. आता तो विटामिन ब करिता दिला जातो इतकच.
विशेष म्हणजे एक नटीला साईझ झीरो बनवणार्या तिच्या dietitian चे असे मत आहे कि "सर्व जीवन्सात्वी मिळवण्यासाठी कृत्रिम स्त्रोत आवश्यकच आहेत. नैसर्गिक स्त्रोतांमधून सर्व जीवनसत्त्व मिळवणे अशक्यच आहे!" त्यामुळे तिने तिच्या पुस्तकात सर्रास विटामिन आणि मिनरल्सच्या गोळ्या घायला सांगितले आहे (चिकन शिवाय प्रोटीन मिळताच नाही हा आणखी एक जावैशोध त्याच पुस्तकातला आहे).
खरच अशी कंडीशन असेल तर आपण सगळेच आजारी आहोत.
थोडक्यात चौरस आहार असेल तर कुठल्याही जीवनसत्वाची कमतरता असायचे कारण नाही आणि कुठल्याही औषधाची गरज भासू नये. आहार बरोबर नसेल आणि व्यायाम नसेल तर घेऊ तितकी औषधं कमीच आहेत.