मिपावर मोबाइलवरून फोटोज कसे प्रकाशित करावेत?

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
14 Nov 2015 - 8:18 pm

मोबाइलवरून फोटो अपलोड करणे---

A) गाभा

आता अधिकाधिक लोक स्मार्टफोन्स वापरत आहेत आणि त्यातल्या कॅम्र्याने फोटो चांगले येऊ लागल्याने तेच फोटो सोशल साइट्सवर टाकू लागले आहेत.घरातल्या कंम्प्युटरला केबलनेट असली तरी मोबाइल बाहेर नेल्यावर त्याचा वाइफाइ वापरता येत नाही.वाट्सपच्या प्रसारामुळे मोबाइलमध्ये नेट असतेच.फेसबुक अथवा वाट्सपवर आपण फोनच्या मेमरीमधले फोटो थेटच अपलोड करतो.मिसळपाव वगैरे वेबसाइटवर फोटो असे अपलोड करता येत नाहीत. ते दुसय्रा एखाद्या फ्लिकर / गुगल फोटोज / पिकासा इत्यादी फोटो शेअरिंग साइट्सवर फोटो चढवून त्याची लिंक द्यावी लागते. हे काम कम्प्युटरमधून करताना काहीच अडचण येत नाही कारण खूप मोठी मेमरी आणि ब्रॅाडबँड स्पीड मिळतो.

मोबाइलची फ्लोटिंग/random access मेमरी कमी असते आणि सिमकार्डावरचा 3G स्पीडसुद्धा केविलवाणा असतो शिवाय मोबाइल साठीचे वेबपेज हे फुल डेस्कटॉप पेजपेक्षा काटछाट केलेले असते या तीन कारणांमुळे वर दिलेल्या साइट्सवर मोबाइलमधून फोटो अपलोड करून त्याची लिंक मिळवता येत नाही.प्रत्येक क्लिकवर नेट पुन्हा सुरू होते आणि ते स्लो असले तर काम वेळखाऊ होते. याला एक चांगले उत्तर म्हणजे मोबाइलवर चालणाय्रा फोटो शेअरिंग साइट्स वापरणे. दुसरी एक युक्ती अशी की फोनमध्ये दिलेले नोट्स अॅप्लिकेशन वापरून तिथे सर्व लेखन offline लिहिणे आणि नंतर थेट कॅापी पेस्ट करणे. आणखी एक HTML EDITOR अॅप डाउनलोड करावे. यामध्ये लिखाण टाकून offline पुर्वदृष्य बघता येते व चुका सुधारता येतात.

B) काय आणि कसे करावे?

B1) फोटो शेअरिंग वेबसाइटस

B1-a) http://postimage.org/
इथे रेजिस्ट्रेशन न करताही फोटो अपलोड करून लिंक मिळवता येते.
रेजिस्टर करून (कितीही अकाउंट उघडा) अॅल्बम बनवता येतात. इथे फोटो अपलोड झाला की त्याच्याखाली लिंक्स येतात त्यापैकी "Direct link" या चौकोनातली लिंक वापरणे.
ती टेम्प्लेटात *** च्या जागी पेस्ट करा.
Postimg चा स्क्रीन शॅाट

B1-b) tinypic.com

ही आणखी एक साइट मोबाइलमधून चालते.
photobucket या साइटने आता विकत घेतली आहे. photobucket ही चांगली साइट आहे परंतू ती मोबाइलला पूर्ण पेज उघडत नाही. tinypic आता त्याहूनही सोप्पी आहे. इथे रेजिस्ट्रेशन केल्यावर अॅल्बम बनवता येतात.

फोटो अपलोड केल्यावर फोटो दिसेल आणि खाली चार लिंक्स दिसतील त्यापैकी "Direct link for layouts" मधली लिंक घ्या.ती टेम्प्लेटात *** च्या जागी पेस्ट करा.
Tinypic चा स्क्रीन शॅाट

B2) टेम्प्लेट तयार करणे

खालील टेम्प्लेट्स तयार करून तुमच्या फोनच्या नोट्समध्ये साठवून ठेवा.
१) <img src="***" width="500" />
२) <img src="***" width="500" />
३) <img src="***" width="500" />
४) <img src="***" width="500" />
इत्यादी.

B3) वरील टेम्प्लेट्स योग्य त्या कॅापी केलेल्या direct links टाकून संपूर्ण प्रतिसाद नोट्समध्ये लिहून तयार करा.हा कॅापी करून लेखनाची चौकट उघडून "पूर्वपरीक्षण" चे बटण दाबा अथवा खरडफळ्याची चौकट असेल तर वरचे डोळा असलेले बटण दाबा. ठीक वाटले तर "प्रकाशित करा"/ "पाठवा" वर क्लिक केले की झाले काम.

C: प्रश्न

C1) या साइट्सवरचे फोटो किती वर्षं राहतील?
- बरीच वर्ष साइट्स चालू रहातील याची काहीच गॅरंटी देता येत नाही.

C2) फोटो सुरक्षित असतात का?
- नाही. तरी शक्यतो अॅल्बमची नावे मराठीमधून पण रोमन लिपीत द्यावी जसे kala / baag / udyan / shala म्हणजे गुगल सर्च मध्ये सापडणार नाहीत.

C3) अॅल्बममधले फोटो डिलीट केला / केले तर इतर फोटोंच्या लिंकस गंडतात का?
- photobucket मध्ये बाकीच्या खालच्या फोटोंच्या लिंक्स गंडतात. त्यातले फोटो डिलिट करू नये तसेच अॅल्बमचे नाव बदलू नये. postimg, tinypic मध्ये फोटो डिलिट केला तरी चालतो.

C4) फोटोची width किती ठेवावी ?

- 600 {pixels} पेक्षा अधिक नको. सरळ धोपटमार्ग म्हणजे सर्व फोटोंस 500 ठेवा.

C5) फोटोची वेबसाइटवरची लिंक देता येइल का?
- हो.
-तुमचा तीन एमबीचा फोटो शेअरिंग साइटवर असला तरी इकडे जास्तीत जास्त आडवा 600 x 480. Pixel ,आणि उभा 480 x 600 चा येतो आणि न्याय देऊ शकत नाही. अशावेळी मूळ वेबसाइटवरचा फोटो पहाण्याचा पर्यायही लिंक देऊन उपलब्ध करून देता येतो.

फोटोची लिंक देण्यासाठी टेम्प्लेट-

<a href="***" target="_blank" > मोठा फोटो इथे </a >
वरची डिरेक्ट लिंक *** इथे पेस्ट करा.

C6) वाट्सपवर याचा वापर करता येईल का?
- हो. परंतू tinypic ची लिंक नको.जाहिराती येतात.
postimg ची प्रत्येक फोटोची लिंक (टेम्प्लेट नको) दिली तर चालते. फेसबुकवरही चालेल. परंतू फोटो उमटत नाही फक्त लिंक दिसेल.

C7) खरडफळ्यावर "पूर्वपरीक्षण" नाही तर काय करावे?
-वरती डोळ्याचं चित्र असलेलं बटण दाबले की पूर्वदृष्य दिसते.

C8) "प्रकाशित करा" वर क्लिक केल्यावर प्रतिसाद उमटलेला दिसला नाही तर काय करावे?
- तुमचे नेट स्लो असेल.घाई करून पुन्हा क्लिक करू नका अथवा "रिफ्रेश पेज" करू नका.डबल पोस्ट होऊ शकते.प्रथम धागा बंद करून तो पुन्हा उघडून पहा प्रतिसाद आला आहे का.त्यानंतरच प्रयत्न करा.

C9)नेट स्लो झाले असेल तर काय करावे?
- मोबाइल हनुवटीवर टेकवावा.शरीराची अँटिना होऊन स्पीड वाढतो आणि इतरांस वाटेल काय विचार करताहेत.
- ओपेरा मिनि ब्राउजर /युसी ब्राउजर असेल तर keep images off / keep bandwidth low वगैरे पर्याय ठेवा. चित्रे बंद केल्याने स्पीड दुप्पट होतो.

C10) या साइट्सच्या अॅप्स असतात का? आणि अँड्रॉईड तसेच विंडोज दोन्हीवर फोटो शेअरिंग अॅप्स आहेत का?
-या दोन साइट्सच्या अॅप्स आता तर नाहीत. Photobucket चे अॅप (२ MB) आहे परंतू चांगले चालत नाही. इतर अॅप्स असली तरी त्यातून "share on Twitter, Facebook, email" वगैरे पर्याय असतात पण आपल्याला हवी असलेली डिरेक्ट लिंक मिळत नाही.

C11) फोटो प्रोसेसिंग साठी पिक्स आर्ट हे अॅप आहे तशी काही उपयुक्त अॅप्स आहेत का?
-खूप आहेत आणि त्यात भर पडणार आहे.मोबाइलसाठी कमीतकमी मेमरी खाणारी, offline चालणारी, फास्ट आणि बदललेला फोटो मेमरी कार्डावर सेव करणारी अॅप्स निवडावी लागतात (आणि फ्री हे राहिलं).

दोन प्रकारची अॅप्स फोटोंत बदल करण्यासाठी सुचवतो.
१) फोटोचा sharpness, brightness इत्यादी बदलण्यासाठी. याप्रकारची खूप आहेत.
PHOTO EDITOR MASTER (GoTiles कडून)
4MB, offline चालते.

२) तीन चार फोटो एकत्र मांडण्यासाठी. कोलाझ "collage"type
PhotoCollage (Tap plex यांचे)
7 MB, offline चालते.

या अॅपने जोडलेले फोटो चा स्क्रीन शॅाट

D: सूचना

D1) या साइट्स आपण वापरणार आहोत त्या गुगल प्लस/ड्राइव ( Google) आणि फ्लिकर ( Yahoo ), फेसबुक ( facebook) यांच्यासारख्या फार सुरक्षित नसतात त्यामुळे फार खासगी फोटोंसाठी अथवा ज्यांचा गैरवापर होऊ शकेल असे फोटो टाकू नयेत.

D2) या साइट्स फ्री सर्वीस देतात आणि त्यांचा सर्वर चालवण्यासाठी उत्पन्न मिळण्यासाठी बरेचदा "त्या" जाहिराती येतात. त्या येऊ नये यासाठी फोटोची लिंक दिलेल्या टेंम्प्लेटमध्येच बंदिस्त करून कोणास द्यावी. अॅल्बमची लिंक कधीच देऊ नये.

D3) इंटरनेट आणि मोबाइल यांचे विश्व झपाट्याने बदलत आहे.आज असणाय्रा साइट्स उद्या असतीलच असे नाही अथवा त्या वापरण्यात अडचण येऊ शकते. वेळोवेळी बदल करणे अपेक्षित आहे.
मोबाइल हे MFD Multi function Device आहे शिवाय घेऊन जाता येते त्यामुळे मोबाइलचे तंत्र आत्मसात करणे आगामी काळाची गरज आहे.

Correction
2021 _january 1
१) https://postimages.org हे नवीन नाव आहे.

२) postimg.org ही साईट आता https://postimg.cc झाली आहे.

३)http://tinypic.com ही साईट photobucket.com या साईटने विकत घेतली आहे. आता बंद झाली.
४) photobucket.com ही साईट चांगली होती आणि आहे परंतू ती आता फ्री अकाउंटला शेअरिंग देत नाही.

प्रतिक्रिया

एस's picture

14 Nov 2015 - 8:49 pm | एस

वाखुसाआ!

पैसा's picture

14 Nov 2015 - 8:52 pm | पैसा

अतिशय उपयोगी आणि परिपूर्ण लेख! मिपाच्या मदत पान मधे कायमचा घ्यावा असे सुचवते.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Nov 2015 - 5:02 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

वैभव पवार's picture

2 Nov 2016 - 9:23 pm | वैभव पवार

सहमत!

बाबा योगिराज's picture

15 Nov 2015 - 7:04 pm | बाबा योगिराज

कंजुस भौ. धनबाद वो तुमाले.

पियुशा's picture

15 Nov 2015 - 10:30 pm | पियुशा

अतिशय उपयुक्त माहिती

श्रीरंग_जोशी's picture

16 Nov 2015 - 11:52 am | श्रीरंग_जोशी

चतुरभ्रमणध्वनीवरून मिपावर सक्रीय राहणार्‍यांसाठी अतिशय मोलाची माहिती. या लेखनासाठी धन्यवाद.

बोका-ए-आझम's picture

16 Nov 2015 - 4:00 pm | बोका-ए-आझम

.

मधुरा देशपांडे's picture

16 Nov 2015 - 4:03 pm | मधुरा देशपांडे

धन्यवाद. वाखुसा.

संदीप डांगे's picture

16 Nov 2015 - 4:28 pm | संदीप डांगे

कंजूसकाका, लेख अप्रतिम. माहितीसाठी खूप आभार.

पैसाताईंना फुल्ल्ल अनुमोदन!!!

पैसा's picture

16 Nov 2015 - 4:33 pm | पैसा

मदत पानात लिंक घेतली आहे.

मदनबाण's picture

17 Nov 2015 - 4:45 pm | मदनबाण

माहिती आवडली...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हाय रे हाय तेरा घुंगटा... :- ढोंगी

मांत्रिक's picture

18 Nov 2015 - 1:15 pm | मांत्रिक

धन्यवाद! कंजूसकाका! अतिशय उपयुक्त माहिती!!!

भीडस्त's picture

29 Sep 2016 - 11:18 am | भीडस्त

सहा वर्षांपासूनची अडचण पाचच मिनिटात सुटली ..

आभारी आहे

कैवल्यसिंह's picture

1 Nov 2016 - 11:10 pm | कैवल्यसिंह

मोबाईलवरुन फेसबुक वापरुन फोटो आपलोड कसा करायचा? व तो फोटो मिपावर दिसतो का??

कंजूस's picture

2 Nov 2016 - 4:08 pm | कंजूस

@KaivalyaDj, फेसबुकवरून इकडे काहीजण फोटो टाकतात.उदा० आत्मबंध यांनी टाकलेले फोटो ( http://www.misalpav.com/guestbook?page=25 , या पानावरचे चकलीचा फोटो). परंतू मोबाइलमधून फेसबुक फोटोखाली share link मिळते ती इथे चालत नाही. लिंकमध्ये fbcdn अक्षरे असतील तर ती लिंक चालते.

कैवल्यसिंह's picture

2 Nov 2016 - 5:37 pm | कैवल्यसिंह

समजा fbcdn आक्षरे आसतील लिंक मध्ये व फोटो पोस्ट केला तर त्याची लिंकच मिपा वर दिसते का डायरेक्ट फोटोच मिपा वर दिसतो??

fbcdn अक्षरे लिंकमध्ये असतील ती लिंक घेऊन
असं करा-
फोटोची लिंक या खालच्या template मध्ये # च्याजागी पेस्ट करा .

<img src="#" width="550"/>

मग कॅापी करून थेट इकडेच पेस्ट करा.
पूर्वपरीक्षण करून पाहा फोटो येतो का.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2016 - 8:44 pm | अत्रुप्त आत्मा

फेसबुकवरून इकडे फोटो कसे घ्यावेत?

यु सी ब्राउजर वरून फे. बु. वर जा. तिथे आवडतं फोटू एकदा क्लिकवा. फोटू खाली येणाय्रा सुचना-त "View Full Size" ला क्लिका. फोटू पूर्ण उघडेल. मग त्यावर जरा बोट दाबून धरा . मग ४/५ सूचना येतील. त्यात ह्व्यू पेज इन्फो ला क्लिका. तिथे कॉपी इमेज युआरअल येईल. तिथनं युआरअल उचला. आऩी चिपकवा हिकडं, हिकडल्या रिती परमानं.

कंजूस's picture

5 Nov 2016 - 12:35 pm | कंजूस

Facebook वर फोटो अपलोड करून त्यातून फोटोची-लिंक कशी काढायची ते आत्मबंध यांनी सोपे करून दिलं आहे.

Facebook वापरण्याचे फायदे :-
१) ही सिक्युअर साइट आहे.
२ ) स्टोरिज लिमिट नाही.
३ ) फ्री आहे.
४ ) छोट्या मोबाइलातूनही चालवता आणि लिंक काढता येतात.
५ ) ओपरा मिनि ब्राउजरमधूनही लिंक काढण्यासाठी पद्धत आत्मबंधनी दिलेली तीच आहे.

तोटे :-फेसबुकवर फोटो अपलोड केला की तो सर्व फ्रेंड्सना दिसतो आणि लाइक्स येत राहातात. शिवाय बय्राच महिला फेसबुक खाते ओनली फ्रेंड्स ठेवतात. त्यांना आपले फोटो सर्वांना दिसतील अशी भिती वाटते त्यावर हा क्लोझ्ट ग्रुपचा पर्याय वापरता येईल.

उपाय:- मेनू उघडून >>ग्रुप्स>>create groups करावे. ग्रुपचं नाव उदाहरणार्थ KaivalyaDj ठेवा, क्लोज्ड ग्रुप ?ओप्शन तसाच ठेवा,एका फ्रेंडला अॅड करून submit करा. इथले फोटो इतर सर्वांना दिसत नाहीत तसेच नोटिफिकेशनही जात नाही. यातल्या फोटोची लिंक वापरता येईल मिपा लेखांसाठी.

मोठा फोटो येण्यासाठी template
( FULL ) FULL photo TEMPLATE

<img src="#" width ="550"/>

उदाहरणार्थ

फक्त एका बाजूस छोटा फोटो देऊन लेखन करायचे असल्यास हे FLOAT-TEMPLATE वापरा.
# च्या जागी लिंक टाका.
( L )LEFT PHOTO FLOAT-TEMPLATE डाव्याबाजूस फोटो येण्यासाठी
<p>
<img width="100" height="120" style="float: left; margin:15px 35px 5px 5px;;" alt="1" src="#" ></p>
<p> इथे लिहा दोनचार ओळी मजकूर </p>
<p> इथे लिहा बाकीचा मजकूर</p>

( R )RIGHT PHOTO FLOAT-TEMPLATE उजव्याबाजूस फोटो येण्यासाठी
<p>
<img width="100" height="120" style="float: right; margin:15px 5px 5px 35px;" alt="1" src="#" ></p>
<p> इथे लिहा दोनचार ओळी मजकूर </p>
<p> इथे लिहा बाकीचा मजकूर</p>

उदाहरणार्थ

1
फक्त एका बाजूस छोटा फोटो देऊन लेखन करायचे असल्यास हे एक उदाहरण आहे
पेपरात,मासिकांत असे कॅालम आणि चित्रे असतात.कधीकधी असे लिहावं असं वाटतं. इथे तुमचा कोणताही फोटो देऊ शकता. फोटो डावीकडे/उजवीकडे हवा असल्यास L/R template वापरा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Nov 2016 - 4:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी मोबाईलवर फ्लिकर ऍप उतरवून घेतले आहे, मोबाईल वरून पहिला ऍप मार्फत फ्लिकरवर फोटो चढवतो, नंतर ब्राउझर मध्ये फ्लिकर उघडून ओपन इमेज पर्याय वापरून लिंक कॉपी करतो अन मग ती प्रस्थापित विधी प्रमाणे पब्लिश करतो मस्त दिसतात चित्रे, ह्यात म्हात्रेकाकांनी सांगितलेली टीप म्हणजे हाईट कॉलम रिकामा सोडायची आयडिया फारच भारी रिझल्ट देते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Nov 2016 - 4:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

रच्याकने, कोणी मोबाईल वर युट्यूब एम्बेड कोड मिळवून मोबाईलवरूनच विडिओ मिपावर चिकत्वाचे कसे ह्यावर संथा दिल्यास उपकृत असेल मंडळ आपले

कंजूस's picture

2 Nov 2016 - 10:26 pm | कंजूस

embed code मिळवण्याकरता युट्युबचे योग्य पान उघडून तो व्हिडिओ दिसु लागल्यावर इम्बेड कोड लिंक कॅापी करून घ्या.
अथवा व्हिडिओची युआरएल कोणी दिलेली असेल तर युट्युबची साइट न उघडताही प्लेअर बनवता येईल .
असा--

आपल्याकडे समजा ठोसेघर धबधब्याची युट्युब युआरएल आहे
https://youtube.com/watch?v=6NDQeCSYZfk
अशी . तर त्याला थोडी रिपेर करून
https://youtube.com/embed/6NDQeCSYZfk
अशी बनवा. नंतर या खालच्या template मधल्या # च्या जागी पेस्ट करा.

TEMPLATE

<iframe width="560" height="315" src="#" frameborder="0" allowfullscreen=""></iframe>

तयार झाल्यावर संपूर्ण कॅापी करून खरडफळ्यावर पेस्ट करा . व्हिडिओ प्लेअर दिसेल.

पाटीलभाऊ's picture

2 Nov 2016 - 4:31 pm | पाटीलभाऊ

धन्यवाद...कंजूसभाऊ...!

सोन्याबापु, मोबाइलवरून सिमवरचेच स्लो नेट वापरून फोटो चढवायचा आहे. त्यामुळे दोन चालू साइट द्याव्या लागल्या. एचटीटिपीएस सिक्युअर साइट्स - फ्लिकर,गुगल ड्राइव वगैरे उघडायला गेल्यास फक्त सिमवरचे नेटकनेक्शन वापरून लिंक काढणे फारच दुरापास्त असते. शिवाय मोबाइलची रॅम कमी असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यांचे अॅप फक्त फोटो तिकडे चढवण्यापुरतेच असतात ,योग्य शेअरिंग लिंक मिळण्याचा ओप्शनच नसतो.मग पुन्हा नेटिव ब्राउजरला शरण जावे लागते.या सर्व खटाटोपात एका तीन एमबी फोटोसाठी पंधरा एमबी डेटा लागतो. घरच्या वाइफाइवर मोबाइल वापरून काम करणे उद्देश ठेवला नाहिये. ओपेरा मिनीवरच्या फ्लिकर वेबसाइटितूनही फोटो अपलोड होतो फ्लिकरवर पण लिंक मिळत नाही.

# युट्युब व्हिडिओच्या युआरएलवरून प्लेअर देणे फारच सोपे आहे. त्याचे टेम्प्लेट तयार आहे ते पण देतो नंतर.

उपयोजक's picture

2 Nov 2016 - 7:18 pm | उपयोजक

फुल

उपयोजक's picture

2 Nov 2016 - 7:20 pm | उपयोजक

आनंद गगनात मावेना!!

वैभव पवार's picture

2 Nov 2016 - 9:24 pm | वैभव पवार

धन्यवाद!

अजया's picture

2 Nov 2016 - 10:38 pm | अजया

postimage.org बंद होतंय म्हणे.मग माझं तर मोबाइलवरुन फोटो टाकायचे दुकानच बंद होणार :(

कंजूस's picture

2 Nov 2016 - 11:22 pm | कंजूस

tinypic dot com वापरा. असेही क्रोमवाल्यांना postimg चे फोटो दिसत नाहीत.

कंजूस's picture

2 Nov 2016 - 11:25 pm | कंजूस

फ्लिकरही veriozon ने घेतलय तर काय करतात बघू.( तसं अग्रीमेंट वादात आहे म्हणा)

कंजूस's picture

3 Nov 2016 - 10:07 am | कंजूस

ओडिओ प्लेअर कसा द्यावा?

काहीजण युट्युबवरचा व्हिडिओ प्लेअरच ओडिओसाठी देतात परंतू त्यामधल्या व्हिडिओचा/ डेटाचा उगाच भु्र्दंड बसतो.
फक्त ओडिओ शेअर करण्यासाठी या वेबसाइट्स वापरता येतात-
१)-http- vocaroo dot com
२)-https- clyp dot it
३)-https- soundcloud dot com

यांपैकी clyp dot it चे उदाहरण बघू.
* साइट ओपन करा
* अपलोड बटणावर क्लिक करून फोनमधल्या मेमरीतील गाण्याची फाइल ( MP3 अथवा WAV ) निवडा.
?-- थोडावेळ हिरवं चक्र फिरून तुमची फाइल वाजायला सुरुवात होईल.
* नाव द्या, युआरएलआणि इम्बेड कोड कॅापी करून कुठेही वाटसप/फेसबुक ला लिंक पोस्ट करा.

सेव करा ( अकाउंट बनवल्यास तुमच्या फाइल एका ठिकाणी राहातात. लॅागिन करून कोणत्याही फोनात ऐकता येतील/मिळतील.

*ओडिओ प्लेअर वेबसाइटवर /मिपावर देणे--

उदाहरणार्थ -
एका बँडची युआरएल :
https://clyp.it/akgbnyyv

आणि इम्बेड कोड :
https://clyp.it/akgbnyyv/widget

असे दिसतय. म्हणजे widget शब्दाचाच फरक आहे.
आता खालील TEMPLATE FOR AUDIO PLAYER मध्ये # च्या जागी वरची इम्बेड लिंक पेस्ट करा. सर्व कॅापी करून लिखाणात/ लेखन चौकटीत पेस्ट करा. हा प्लेअर PLAY बटण क्लिक केल्यावरच चालू होतो.
आपलं गाणे/ फाइल साइझ किती एमबी ते अवश्य द्या.

TEMPLATE FOR AUDIO PLAYER

नाव :
फाइल साइझ: -- MB

<html>
<body>
<object width="500" height="400" data="#">
<param name="
controller" value="true">
<param name="autoplay"
value="false">
</object>
</body>
</html>

कैवल्यसिंह's picture

4 Nov 2016 - 4:44 pm | कैवल्यसिंह

मला माझेच लेख व प्रतिसाद एडिट करायचे आहे.. तर ते कसे एडिट करावे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2016 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादकर्त्यांना प्रतिसाद संपादित करण्याची सोय सध्या नाही. आपणास प्रतिसाद संपादित करायचा असल्यास संपादकाशी संपर्क करावा.

-दिलीप बिरुटे

प्रतिसाद संपादन सोय ( बटण) होती दोन वर्षांपूर्वी ती आता नाहीये.
लेख जर कलादालन/भटकंती/तंत्रज्ञान साहित्य प्रकारांत असतील तर संपादन करता येतात अजूनही.कारण त्यात अचूक माहिती अपेक्षित असते ती लेखकाला स्वत:ला दुरुस्त करता यावी.

कैवल्यसिंह's picture

6 Nov 2016 - 12:31 pm | कैवल्यसिंह

एखादा लेख मिपा वर शोधायचा आसेल तर तो कसा शोधावा? कारण मला शोधा हा पर्याय दिसलाच नाही कुठेच?

इथे डेटाबेस फाइल नाही परंतू
१)गुगल सर्च मधून बरेचजण शोधतात.
उदाहरणार्थ
misalpav site: हैदराबाद
misalpav site: समोसा

२) microsoftच्या bing मधूनही शोधता येते
> bing dot com उघडा
> तिथे हवा असलेला एखादा शब्द टाका आणि शोधा
उदाहरणार्थ
misalpav web / हैदराबाद
misalpav web / समोसा

दोन्हींतला फरक पाहा.

कैवल्यसिंह's picture

6 Nov 2016 - 8:02 pm | कैवल्यसिंह

पण सर्वच लेख शोधता येत नाहीत.. २ ते ३ लेखच या सर्व साइटसवर दाखवतात..

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

26 Dec 2016 - 1:02 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

brain

गुल्लू दादा's picture

12 Aug 2017 - 6:24 am | गुल्लू दादा

इलेक्ट्रॉनिक्स's picture

8 Sep 2017 - 8:37 pm | इलेक्ट्रॉनिक्स

सहमत