आरत्यांचे आणि स्तोत्रांचे रिंग्टोन
नमस्कार,
नुकताच गणेशोत्सव येऊन गेला. त्या काळात तसेच ईतरही वेळी, अनेकांच्या मोबाईलवर गनेशस्तवन, आरती आणि इतर पवित्र स्तोत्रांचे रिंगटोन ऐकण्यात आले. अनेक लोक अमक्या देवाचे नांव असणाररेरिंगटोन आपल्या मोबाईलला लावतात.
ती व्यक्ती चौघांत बोलत असतांना अचानक कुठल्यातरी देवाची आरती सुरु होते आणि ती व्यक्ती मोबाईल घेउन कानाला लावते. बरे देवाची आरती ऐकल्याने त्यात काही फरक पडत नाही. मोबाईल कानांला लावुन ते धडधडीत खोटे बोलत असते. ' नाही, मी येई शकत नाही मी ऑउट ऑफ स्टेशन आहे...' वगैरे .
मला या विषयी असे वाटते :
१. देवादिकांची स्तोत्रे आणि आरत्या एका विशेष्ट वेळी आणि मानसिक अवस्थेत असतांना म्हणायची / ऐकायची असतात. बरेचदा आपण शूचिर्भूत होऊन मग ही कामें करतो.
२. हे रिंगटोन कधीही/कुठेही वाजतात. उदा: पानर्ट्टीवर अग्निकांडीचा आस्वाद घेत असतांना , पान तंबाखु खात असतांना, मदिरालयांत असतांना, पाकिस्तानला गेलो असतांना ई.
तर मग अश्या रिंगटोन्स आपल्या मोबाईलवपावापरणे योग्य आहे का ? अश्याने त्या देवादिकांचा अपमान होत नाही का ?
मला वाटते योग्य धार्मिक संघटनांनी हा प्रश्नं हातात घ्यावा. अश्या रिंगटोन्स वरती बंदी आणण्यात यावी.
जाणकार मिपाकरांनी या आपली मते व्यक्त करावेत.
वर्गीकरण
वाचने
5932
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
एक
पाकिस्तानला गेलो असतांना!!!
घरात आरती, पुजा, स्त्रोत्र
खिक्क....गणपती विसर्जनात
In reply to खिक्क....गणपती विसर्जनात by टवाळ कार्टा
सार्वजनीक गणेशोत्सव हा
In reply to सार्वजनीक गणेशोत्सव हा by द-बाहुबली
प्रतिसाद आवडला...
सानांचे
चकवा लागल्यानं पुन्हा त्याच
अश्याने त्या देवादिकांचा