शनी महादशा- दशा की दुर्दशा? महाशंका आणि कुशंका!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
1 Oct 2015 - 2:35 pm
गाभा: 

तमाम ज्योतिष जाणकार आणि प्रवीण मंडळींना मी काही प्रश्न, शंका आणि कुशंका विचारू इच्छितो. ते सगळे प्रश्न शनीच्या महादशेसंदर्भात आहेत.

१. शनीची महादशा नेहेमी दुर्दशाच करते का?

२. राशीनुसार आणि जन्मलग्नानुसार शनीच्या महादशेचे फळ कमी जास्त तीव्र किंवा कमी जास्त चांगले आणि वाईट असते का? करिअर आणि कुटुंबावर वर काय परिणाम होतो?

३. मित्र ग्रहांच्या राशींना शनी हा त्याच्या महादशेत त्रास देत नाही असे आहे का?

४. शनी महादशेत शनीची साडेसाती आली तर दुप्पट त्रास होतो का? शनी महादशेच्या दरम्यान शनीची अंतर्दशा आली तर काय होते? आणि त्यात शनीची साडेसाती सुरु असेल तर काय होते?

५. शनीच्या राशी कुंडलीच्या ज्या घरात असतील आणि शनी ज्या घरात असेल त्या घरांचे फळ शनी महादशेच्या काळात मिळते का? ते फळ शनी उच्चीचा असेल तर चांगले आणि निचीचा असेल तर वाईट मिळते का? किंवा शनी महादशेत त्या घरांचे नेहेमी वाईटच फळ मिळते?

६. महादाशेचे पूर्ण १९ वर्षे फक्त आणि फक्त त्रासच होतो काय?

७. एखाद्या लहान बाळाच्या जन्माच्या वेळेपासून त्याला शनी महादशा सुरु होत असली तर त्यालाही त्रास होतो का?

८. महादशेत त्रास असलेल्या काळात तीव्रता कमी करण्यासाठी कशाची उपासना करावी? काही उपाय तोडगे? वागण्या बोलण्यात काही बदल करावेत का?

९. एका कुंडलीत मीन लग्न आहे. रास वृषभ असून चंद्र तृतीय स्थानी आहे. अकराव्या आणि बाराव्या स्थानात शनीच्या राशी आहेत आणि शनी कर्केत पाचव्या स्थानात आहे. आणि शनीची महादशा ३०/१०/२०१६ पासून सुरु होत आहे तर त्याचे फळ काय?

(इतर ग्रह स्थिती -
प्रथम स्थान - मीन रास - शुक्र (उच्चीचा)
द्वितीय स्थान - मेष रास - केतू / अष्टम स्थान - तूळ रास - राहू, हर्शल
तृतीय स्थान - वृषभ रास - चंद्र , गुरु
चतुर्थ स्थान - मिथुन रास
पंचम स्थान - कर्क रास - शनी (कर्केचा शनी उच्च कि नीच ?)
षष्ठ स्थान - सिंह रास
सप्तम स्थान - कन्या रास - प्लुटो)
नवम स्थान - वृश्चिक रास - नेपच्यून
दशम स्थान - धनु रास
एकादश स्थान - मकर रास - मंगळ (उच्चीचा)
द्वादश स्थान - कुंभ रास - सूर्य आणि बुध )

प्रतिक्रिया

एस's picture

1 Oct 2015 - 2:38 pm | एस

पॉपकॉर्न घेऊन बसलो आहे. १०० वा प्रतिसाद आला की येतो.

निमिष सोनार's picture

1 Oct 2015 - 2:41 pm | निमिष सोनार

प्रत्येक प्रतिसादकर्त्याला एकेक बाउल भारूप चीज फ्लेवर पॉपकॉर्न देण्याचे काम आता तुमच्याकडे बरं का स्वॅप्स!!
एकेकटेपणाने नाही खायचे पॉपकॉर्न, पॉप लागेल सॉरी पाप लागेल!

निमिष सोनार's picture

1 Oct 2015 - 2:42 pm | निमिष सोनार

नक्की देणार ना?

चैतन्य ईन्या's picture

1 Oct 2015 - 2:59 pm | चैतन्य ईन्या

जास्त विचार करू नका शनीचा वगैरे. मी ह्यातून गेलोय म्हणून सांगतो. जरा नीट विचार करा आणि तुम्हाला लक्षात येईल कि आपलेच निर्णय असतात ते पुढे जावून गंडतात किंवा बरोबर येतात. उदाहरणार्थ तुम्हाला लहानपणी सगळ्यांनी भारावलेले असते कि तू इंजिनियर झालास म्हणून एकदम हुशार. तुझी जिंदगी बनली. आपल्याला वाटत राहते आपण लई हुशार आहोत. आता तुम्ही खरोखर हुशार असाल तर तुम्ही परिस्थितीशी झुंज देवून पुढे जाता. तुम्ही सर्वसाधारण असाल तर जरी इंजिनियर वा सिए वगैरे झालात तरी काहीही करू शकत नाही. तुमच्या हातात अनेक गोष्टी नसतात. त्याला तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यापेक्षा आपली स्किल्स वाढवा आणि हातात आहेत त्या गोष्टी करा.

.. प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहे!!

मुख्य मुद्दा असा आहे की ज्योतिष वगैरे खरे आहे का ?

..ज्योतिष शास्त्र खरे आहे का असे विचारले तर त्याचा अर्थ म्हणजे समुद्रात पोहतांना शार्क मासे खरेच अस्तित्वात असतात का असे विचारण्यासारखे झाले!! :-)

vishal jawale's picture

1 Oct 2015 - 4:21 pm | vishal jawale

असहमत

ओहो, म्हणजे शक्तिमानबद्दल चर्चा सुरू असताना तो हवेत खरेच उडू शकतो का असे विचारण्यासारखे ना?

अद्द्या's picture

1 Oct 2015 - 4:43 pm | अद्द्या

किंवा मग गंगाधर विद्याधर मायाधार ओमकारनाथ शास्त्री खरच शक्तिमान आहे का
यावर हि होऊ शकेल .

नाही का

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2015 - 5:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

मधुरा देशपांडे's picture

1 Oct 2015 - 3:13 pm | मधुरा देशपांडे

इथे मिपावर एकाच दिवसात, एका तासात एवढे धागे काढले, तेही नेहमी चघळल्या गेलेल्या विषयांचे, तर लेखक कुठल्याही राशीचा असु द्या, शनीची महादशा वगैरे जे काय असेल ते, पण दुर्दशा सुरु झालीच म्हणुन समजा.

पैसा's picture

1 Oct 2015 - 5:32 pm | पैसा

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2015 - 5:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

"इतिहास वारंवार पुनरावृत्ती करेल" असे पृथ्वीच्या भविष्यात सांगितलेले आहे ! ;) :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2015 - 7:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

...आणि मिपाच्याही ! :)

कपिलमुनी's picture

1 Oct 2015 - 3:23 pm | कपिलमुनी

ज्योतिषाला ट्यारपी मिळायचे दिवस संपले ओ !

मास्टरमाईन्ड's picture

1 Oct 2015 - 3:33 pm | मास्टरमाईन्ड

आपल्याला वाटत राहते आपण लई हुशार आहोत. आता तुम्ही खरोखर हुशार असाल तर तुम्ही परिस्थितीशी झुंज देवून पुढे जाता. तुम्ही सर्वसाधारण असाल तर जरी इंजिनियर वा सिए वगैरे झालात तरी काहीही करू शकत नाही.

परफेक्ट

मम्बाजी सर्वज्ञ's picture

1 Oct 2015 - 4:45 pm | मम्बाजी सर्वज्ञ

बीजिंग (चीन)- पत्नीने फोन उचलला नाही म्हणून चिडलेल्या पतीने पत्नीचे नाक तोडून खाऊन टाकल्याची घटना येथे घडली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी आज (गुरुवार) दिले.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘चीनमधील डेझऔ येथे ही घटना घडली आहे. पती कामावर गेला असताना त्याने पत्नीला फोन केला. मात्र, तिने फोन उचलला नव्हता. यामुळे तो चिडला होता. घरी आल्यानंतर त्याने पत्नीसोबत भांडण सुरू केले. भांडणात त्याने पत्नीचा चावा घेऊन नाक तोडून काढले. रक्ताभंभाळ अवस्थेत असलेल्या पत्नीसमोरच त्याने नाक चावून खाल्ले. यांग असे महिलेचे नाव आहे. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.‘

दोघांचेही यापूर्वी घटस्फोट झाले आहेत. दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांनी विवाह केला होता. पतीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

वगिश's picture

1 Oct 2015 - 5:02 pm | वगिश

उत्तम माहिती

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2015 - 5:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या दोघांच्या कुंडल्या टाका इथे !

मम्बाजी सर्वज्ञ's picture

1 Oct 2015 - 6:03 pm | मम्बाजी सर्वज्ञ

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पोलिसांनी कुंडल्या शोधण्याचे काम एका वाईट मुहूर्तावर हाती घेतल्याने सगळा तपास परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालय पितृपंधरव्ड्या दरम्यान बंद असल्याने (चायनीज क्यालेनडर नुसार) २ आठवड्यांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

1 Oct 2015 - 5:24 pm | मम्बाजी सर्वज्ञ

कुठाय माझा एक बाउल भारूप चीज फ्लेवर पॉपकॉर्न?

प्रसाद गोडबोले's picture

1 Oct 2015 - 5:51 pm | प्रसाद गोडबोले

आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिल्यास किमान १०० प्रतिसादांची ग्यॅरंटी !

याॅर्कर's picture

1 Oct 2015 - 6:32 pm | याॅर्कर

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम|
छायामार्तंडं संभतू तं नमामि शनैश्वरम||

ॐ शं शनैश्वराय नमः

सुर्यपुत्रो दिर्घदेही:विशालाक्षःशिवप्रियःमंदचारःप्रसन्नात्माःपीडां हरतु मे शनीः

वरील मंत्राचा दर शनिवारी 21 वेळा जाप करा,महादशेचे चांगले फळ मिळेल.

प्रसाद गोडबोले's picture

1 Oct 2015 - 6:39 pm | प्रसाद गोडबोले

ॐ शं शनैश्वराय नमः

शनैश्वर हा शब्दच चुकीचा आहे !

मुळ शब्द शनैश्चर = शनै: + चर अर्थात हळु हळु च्लालणरा असा आहे !

याॅर्कर's picture

1 Oct 2015 - 7:40 pm | याॅर्कर

अगदी प्रामाणिकपणे सांगतो मी सुरूवातीला 'श्च' टाईप केलं होतं,पण नंतर मला काय वाटले कुणास ठाऊक?मी ते पुसून श्व टाईप केलं.
बाकी, याचा अर्थ मला माहित नव्हता,त्याबद्दल धन्यवाद!

(अर्थाविण पाठांतर कासया करावे,व्यर्थचि मरावे घोकुनिया)

बॅटमॅन's picture

8 Oct 2015 - 2:24 pm | बॅटमॅन

आठवीनौवीच्या संस्कृताचे पुस्तक अठवले.

कुठल्या महादशेत माणूस पहिल्या फेरीत निवडून येऊन सुधा दुसऱ्या फेरीत कच खातो?

तर्राट जोकर's picture

1 Oct 2015 - 7:00 pm | तर्राट जोकर

सर्वांचं सर्वकाळ सर्व चांगलंच चाललेलं असतं असं कधीच कुठेच केव्हाही घडलेलं नाही, घडणार नाही.

वाइटकाळाचा दोष ग्रहतार्‍यांवर ठेवणारे सुखाचा काळ कोणत्या ग्रहफलाने प्राप्त होतो ते कधीच सांगू शकत नाहीत.

क्युंकी...

'सुखाच्या काळात कोणीच ज्योतिषाकडे जाऊन हा काळ कधी संपणार याची विचारपूस करत नाही.'

तर्राट जोकर's picture

1 Oct 2015 - 7:10 pm | तर्राट जोकर

शनीची महादशा प्रचंड यशाची, सुखाची, समाधानाची असते. कोणत्या वयात ही महादशा येते यावर व्यक्तीच्या आयुष्याची भरभराट ठरते.

रच्याकने, तुम्हाला कुनी साम्गीतले की शनीची महादशा इज एन्लार्ज्ड वर्जन ऑफ साडेसाती? साडेसातीची कोणतीतरी अडीच वर्षे भयंकर दु:खाची व कोणतीतरी भरभराटीची असतात. साडेसाती टळून गेल्यावर माणसाचा पुनर्जन्म होतो, आपले-परके कळून येतात, स्वतःतल्या शक्ती-सामर्थ्याचा परिचय होतो. बट शनी-महादशा इज नंदनवन पीरीयड ऑफ हुमन लाइफ.

दुसरं असं की असले आडून आडून प्रश्न विचारन्याएवजी डायरेक कोणी थोर ज्योतीशी गाठा. चव्हाट्यावर बायकोच्या बाळंतपणाची चर्चा करू नये असे बुजुर्ग सांगत असत.

दिवाकर कुलकर्णी's picture

1 Oct 2015 - 7:54 pm | दिवाकर कुलकर्णी

माझ्या कांही शंका
शनी देव आहे कि दानव,तो लोकाना का छलतो,
शनी महात्म वाचल्यास तो छलत नाही काय,
मराठी लोकानी सोडून इतराना ते कसे वाचावे
उदा. रशियन,चायनास, जपानिस,इ.इ.,
साडेसातीमुले नेमका काय त्रास होतो,
शनी त्रास देतो त्यावेली इतर ग्रह बघत बसतात काय
तेल घातलेयाने शनाचा आत्मा शात होतो काय
एका वेली किती मिली लिटर घालावे
त्या तेलाचे पुढे काय होते
भुइमुगाचे, करडइचे सरकाचे सोयाचे,सूर्यफूलाचे कोणते जास्त प्रभावी
रांकेतून घालणे अथवा पुजार्याच्या ओलखीने लवकर नबर लावणे दोन्हीहि चालोल नं

नाव आडनाव's picture

1 Oct 2015 - 9:26 pm | नाव आडनाव

सर, तुम्हांला पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आवडत नाहीत का?
"ळ" साठी L लिहा म्हणजे वेली, मुले, छलणे, ओलखीने असं होणार नाही.

अभिजीत अवलिया's picture

1 Oct 2015 - 7:59 pm | अभिजीत अवलिया

ज्योतिष, शनीची महादशा, राहु, केतु हे सर्व फॅड आहे. ह्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्या मनगटावर विश्वास ठेवला आणी प्रयत्न केले तर उत्तम.

प्रसाद गोडबोले's picture

1 Oct 2015 - 8:30 pm | प्रसाद गोडबोले

हेच म्हणतो

आपल्या मनगटावर विश्वास ठेवला आणी प्रयत्न केले तर उत्तम.

आपला हात जगन्नाथ !!

श्रीगुरुजी's picture

1 Oct 2015 - 8:09 pm | श्रीगुरुजी

माझ्या ज्योतिषशास्त्राच्या उपलब्ध ज्ञानानुसार व अनुभवावरून उत्तर देतो.

१. शनीची महादशा नेहेमी दुर्दशाच करते का?

कोणत्याही ग्रहाच्या महादशेपेक्षा त्या ग्रहाच्या वर्तमान स्थितीवर आयुष्यातील चांगल्या-वाईट घटना अवलंबून असतात. वर्तमानात शनी तुमच्या जन्मराशीपासून ३, ६ किंवा ११ या राशीत असतो, तेव्हा तुलनेने नक्कीच चांगल्या घटना घडतात. साडेसातीत (शनी १२, १ व २ या राशीत) तुलनेने वाईट घटना घडतात. शनी ४ व ८ स्थानात असतानाही तुलनेने वाईट घटना घडतात. इतर राशीत असताना संमिश्र अनुभव असतो. त्यामुळे माझ्या मते महादशेपेक्षा ग्रहाचे वर्तमान स्थान बघणे जास्त महत्त्वाचे आहे.

९. एका कुंडलीत मीन लग्न आहे. रास वृषभ असून चंद्र तृतीय स्थानी आहे. अकराव्या आणि बाराव्या स्थानात शनीच्या राशी आहेत आणि शनी कर्केत पाचव्या स्थानात आहे. आणि शनीची महादशा ३०/१०/२०१६ पासून सुरु होत आहे तर त्याचे फळ काय?

(इतर ग्रह स्थिती -
प्रथम स्थान - मीन रास - शुक्र (उच्चीचा)
द्वितीय स्थान - मेष रास - केतू / अष्टम स्थान - तूळ रास - राहू, हर्शल
तृतीय स्थान - वृषभ रास - चंद्र , गुरु
चतुर्थ स्थान - मिथुन रास
पंचम स्थान - कर्क रास - शनी (कर्केचा शनी उच्च कि नीच ?)
षष्ठ स्थान - सिंह रास
सप्तम स्थान - कन्या रास - प्लुटो)
नवम स्थान - वृश्चिक रास - नेपच्यून
दशम स्थान - धनु रास
एकादश स्थान - मकर रास - मंगळ (उच्चीचा)
द्वादश स्थान - कुंभ रास - सूर्य आणि बुध )

शनी तूळ राशीत उच्च असतो व मेष राशीत नीच असतो. वरील पत्रिकेनुसार शनी सध्या ७ व्या राशीत आहे. २०१७ मध्ये शनी ८ व्या राशीत जाईल. त्यामुळे पुढील काही वर्षे फारश्या चांगल्या घटना घडणार नाहीत असे वाटते. परंतु सध्या ४ था असलेला गुरू प्रत्येक एक वर्षाआड ५, ६, ७, ८, ९ इ. राशीत असेल तेव्हा विशेषतः गुरू ५, ७,९ आणि ११ या चांगल्या स्थानात जाईल तेव्हा शनीच्या वाईट परीणामांची तीव्रता कमी होईल.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Oct 2015 - 9:05 pm | अत्रुप्त आत्मा

चला , ट्यार्पी ट्यार्पी खेळ सुरू!

दिवाकर कुलकर्णी's picture

1 Oct 2015 - 10:29 pm | दिवाकर कुलकर्णी

सरल सरल आवडते पण काय करू ?
हिदीचा कि बोर्ड आहे हो,तरीहि मार्गदर्षना बद्दल आभार,
योग्य टंकनाबद्दल प्रयत्न चालू आहे ।
हे बघा साधा पूर्णविरामहि इथं नाही त्याऐवजी दंड आहे ,पूरणविरामासाठी,
गांवभर हिंडाव लागतं, हुश्श ! सापडला.

नाव आडनाव's picture

2 Oct 2015 - 8:12 am | नाव आडनाव

गमभन (मिसळपाव वर असलेला एक एडिटर) वापरून बघा. सुरवातिला थोडा वेळ लागतो टाईप करायला पण गूगल पेक्षा चांगला आहे. क्रोम ब्राउजर मधे लिहिलेलं खोडतांना बॅकस्पेस नंतर नवं लिहिण्याआधी स्पेस की दाबा, नाही तर उल्ल्ल्ल्लूऊउल्ल्लूऊ असं काही तरीच दिसतं. http://www.misalpav.com/node/1312 इथं अजून माहिती आहे गमभन वापरून टाईप करण्याची.

दिवाकर कुलकर्णी's picture

2 Oct 2015 - 11:14 am | दिवाकर कुलकर्णी

धन्यवाद प्रयत्न करतो ,खोडल्या नंतर येणा रं उलूलूलू तून बहुधा सुटका झालीय,तुमच्या मार्ग दर्श नामुलं
अनेक धन्यवाद!!

दिवाकर कुलकर्णी's picture

2 Oct 2015 - 12:01 pm | दिवाकर कुलकर्णी

अक्कल,बिक्कल बक्कल आहे हो,अगदी अक्कल दाढ येण्यापूर्वीपासून,
पण सध्या मी एकलव्याच्या भूमिकेत आहे,गुरुवीन वाट शोधणं चालू आहे,
द्रोणाचार्यानी अंगठा मागू ने एव्हडीच अपेक्शा, कारण लिटरली मी अंगठयानंच
टंकित आहे,
"ळ"लिहिला कि नाही?आपलं अनेक द्रोणाचार्यांच मार्गदर्शन!
आता या पुढं बोबल नाही लिहीणार,हे शेवटचंच !

मांत्रिक's picture

2 Oct 2015 - 12:05 pm | मांत्रिक

शनीमहाराज या देवतेला कुणी फारसे ओळखू शकत नाही. मी त्यांच्या मंत्राचा मोठ्या प्रमाणात जपही केला होता. पण फार विचित्र अनुभव आले. एक मात्र नक्की शनीमहाराज परोपकार या एका गोष्टीलाच महत्व देतात. ज्यांना समाजानं लाथाडलंय अशा अत्यंत दुःखी लोकांना शक्य तशी मदत करत चला. फरक पडेल.

मांत्रिक's picture

2 Oct 2015 - 12:09 pm | मांत्रिक

शनी फक्त तूळ(४,५ चा स्वामी) आणि वृषभला (९,१०चा स्वामी) असल्याने उत्तम फळे देतो. अन्य सर्व राशींना मिश्र देतो. कारण त्याच्या मकर व कुंभ या लागोपाठ येणार्या राशी असल्याने त्याचे एक घर शुभ पडते तर दुसरे अशुभ पडते.

नितीनचंद्र's picture

7 Oct 2015 - 12:04 pm | नितीनचंद्र

शनी हा ग्रह न्यायाधीश आहे. आपल्या वाईट किंवा चांगल्या कर्माच्या फळाचा तो न्याय कर्ता आहे. शनीच्या महादशेत सर्वच वाईट होते असे नाही. माझा वैय्क्तीक अनुभव असा की याच काळात माझे स्वतःचा पहिला व दुसरा फ्लॅट मी विकत घेतला. याच काळात माझे लग्न झाले आणि कन्येचा जन्म ही याच काळातला.

काही वाईट अनुभव ही आले जसे अपघात आणि त्या पाठोपाठ वाहन चालविण्याची भिती. नोकरीत संकट, आजारपण इ.

मला स्वतः ला आता पुढची साडेसाती २/११/२०१४ पासुन सुरु झाली आहे. मी दर शनिवारी मारुतीचे दर्शन घेतो. शनीला काळे तीळ, मीठ, तेल, रुईचा हार अर्पण करुन दर्शन घेतो.

सुर्यपुत्रो दिर्घदेही:विशालाक्षःशिवप्रियःमंदचारःप्रसन्नात्माःपीडां हरतु मे शनीः हा मंत्र दररोज ११ वेळा अंघोळीनंतर म्हणतो. मला आत्मविश्वास आहे की साडेसातीचा त्रास झाला तरी माझा आत्मविश्वास मजबुत राहील.

अनुभव घेऊन पहा

निमिष सोनार's picture

11 Oct 2015 - 6:19 pm | निमिष सोनार

आभारी आहे.

मी जेव्हढे वाचले/ अनुभवले आहे त्यानुसार, शनीचा प्रभाव बुद्धीवर पडतो, त्यामुळे शनीच्या प्रभावाखाली असताना निर्णय चुकणे आणि त्यातून भयंकर मनस्ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे किमान साडेसातीमध्ये तरी कोणतेही निर्णय घाईघाईत घेऊ नयेत असे म्हणतात.

सामान्यपणे तुम्हाला मिळणारी वाईट फळे तुमच्या चुकलेल्या निर्णयांचीच असतात, फक्त सर्व बाजूंचा विचार न करता निर्णय घेण्याचे प्रमाण या काळात वाढते इतकेच.

शनी देव आहे कि दानव,तो लोकाना का छलतो,

शनि कोणालाही छळत नाही . शनि हि कर्मफळ देणारी देवता असल्याने लोकांना त्याची भीती वाटते . कारण आपण काय लायकीचे आहोत हे ज्याला त्याला माहित असतं . शनि महाराजांना , फसवाफसवी , अहंकार , विश्वासघात , व्यभिचार, उपकाराची परतफेड अपकाराने करणं , विनाकारण लोकांना त्रास देणं अजिबात आवडत नाही . त्यामुळे अशी पापं करणार्यांना कडक शिक्षा होते . म्हणून लोक त्यांना दानव वगेरे म्हणतात . शनि महादाशेचं माहित नाही पण साडेसातीबद्दल थोडी माहिती आहे . साडेसातीत फक्त त्रास होतो हा फार मोठा गैरसमज आहे .माणसाच्या आयुष्यात एकापेक्षा जास्त साडेसाती असतात .एका साडेसातीत चांगल्या पुर्वकर्मांची भरभरून फलं मिळतात . सर्व प्रकारचा उत्कर्ष होतो . भरभराट सुख , समाधान लाभतं . पण ह्या काळात माणसाने माजून जावून अपराध केले तर पुढच्या साडेसातीत त्याची किंमत चुकती करावी लागते . तर्राट जोकरने म्हणल्याप्रमाणे साडेसाती टळून गेल्यावर माणसाचा पुनर्जन्म होतो, आपले-परके कळून येतात, स्वतःतल्या शक्ती-सामर्थ्याचा परिचय होतो. हे अगदी खरं आहे . साडेसाती त्रासदायक असेल तर दर शनिवारी संध्याकाळी (मुख्यत: प्रदोष असताना ) शिवपूजा , शिवउपासना करावी . शिव हे शानि म्हाराजांचे गुरु असल्याने शिवोपासनेने शनि प्रसन्न होतात आणि पापं जळून जायला मदत होते

प्रसाद गोडबोले's picture

8 Oct 2015 - 4:48 pm | प्रसाद गोडबोले

म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव ।
अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥

असोच्च

निमिष सोनार's picture

11 Oct 2015 - 6:18 pm | निमिष सोनार

आभारी आहे.