ती एक स्वप्नाळू, स्वप्नांच्या दुनियेत रमणारी सामान्य मुलगी. करिअर, अभ्यास यापेक्षाही चारचौघांसारखा घर, संसार, आपण आणि आपली माणसं यातच आपला आनंद मानणारी.
एक दिवस तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या आयुष्यात येतो. पण... अगदी तिच्या विरुद्ध स्वभावाचा. शांत, भिडस्त आणि अभ्यासू. फक्त अभ्यास आणि करियर यांचा विचार करणारा. आपल्या मनातल्या भावना, विचार कधीही बोलून व्यक्त न करणारा. प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायालाच हवी का? असा प्रतिप्रश्न करणारा. पण मनातले विचार, भावना,प्रेम त्याने बोलून दाखवावे असा तिचा वेडा अट्टहास.
काळानुसार आता दोघही एकमेकांसाठी बदलतायत, तो आता बोलू लागलाय आणि ती सुद्धा समजून घेतेय.
भावना व्यक्त न करताही दोघही एकमेकांचे मन जपायचा प्रयत्न करतायत.
प्रतिक्रिया
15 Aug 2015 - 10:03 am | राघवेंद्र
+१
15 Aug 2015 - 10:21 am | पैसा
+१
शीर्षकामुळे जरा मोठी कथा असावी असे वाटले.
15 Aug 2015 - 11:12 am | नाव आडनाव
+१
15 Aug 2015 - 10:07 pm | नूतन सावंत
+१
15 Aug 2015 - 11:16 pm | प्यारे१
कथा कुठे आहे यात?
मुक्तक म्हणून छान लिहिलंय. यात अजून भरपूर गोष्टी मांडता येतील त्यावर पुरुष 'काय म्हणायचंय नक्की' वगैरे म्हणतील....
ते शुक्र आणि मंगळ प्रकरण आहे ना त्यामुळे असं होतं भौतेक. मार्स व्हीनस वगैरे वगैरे
15 Aug 2015 - 11:26 pm | संदीप डांगे
सहमत...
15 Aug 2015 - 11:19 pm | इशा१२३
+१