गेले कित्येक महिने नीट झोप लागली नव्हती, विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. शेवटी आज रात्रीच काम तमाम करण्याचा निश्चय केला तेव्हा जरा बरं वाटलं.
हिच्या एकूण वागणुकीवरून तिचे बाहेर काहीतरी लफडं चालू असल्याची दाट शक्यता होती. फोनवर हळू आवाजात बोलणं, मी दिसल्याबरोबर बोलणं थांबवणं, फोन पासवर्ड घालून लॉक ठेवणं. ‘त्याच्याशी’ सतत हसत बोलणं आणि माझ्याशी बोलताना कपाळाला आठ्या……!
रात्री ती झोपायला गेली त्यावेळी हॉलमध्ये सर्व तयारीनिशी टीव्ही बघत बसून होतो, लक्ष मात्र बेडरूमकडेच होतं. मध्यरात्री धीर करून बेडरूममध्ये जाऊन काम फत्ते करूनच बाहेर पडलो.
सकाळी, मी रात्री ठेवलेले घटस्फोटाचे कागद, सही करून तिने टेबलावर ठेवले होते.
प्रतिक्रिया
14 Aug 2015 - 1:42 am | राघवेंद्र
:) अमोल पालेकरच्या चित्रपटा सारखे वाटले.
14 Aug 2015 - 9:52 am | नीलमोहर
+१
14 Aug 2015 - 10:40 am | एक एकटा एकटाच
+१
एकदम बाहुबली चित्रपटासारखा END केलाय तुम्ही.
मला ह्या गोष्टीचा दूसरा भाग वाचायचाच आहे
14 Aug 2015 - 10:54 am | gogglya
+१ सही कशी मिळवली ह्याचे कुतुहुल आहे! सीक्वेल ची प्रतिक्षा...
14 Aug 2015 - 2:31 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टू गोगल्या.
आणि पुढचा भाग चांगला पडेल या आशेवर या भागाला प्लस वण!
14 Aug 2015 - 3:05 pm | नाखु
आणी कथेला +१
14 Aug 2015 - 11:06 am | विवेक्पूजा
+१
14 Aug 2015 - 11:12 am | पैसा
+१
14 Aug 2015 - 11:22 am | जडभरत
+१
14 Aug 2015 - 12:04 pm | खटपट्या
+१
14 Aug 2015 - 12:12 pm | संदीप डांगे
+१
छान गम्मत आहे बुवा..
14 Aug 2015 - 12:19 pm | चौथा कोनाडा
आवडली. या कहाणीचा प्रि-क्वेल वाचायला आवडेल.
14 Aug 2015 - 12:24 pm | प्यारे१
+१
14 Aug 2015 - 12:39 pm | निमिष सोनार
सस्पेन्स
14 Aug 2015 - 1:04 pm | चिगो
+१
14 Aug 2015 - 2:07 pm | शलभ
+१
14 Aug 2015 - 2:15 pm | मधुरा देशपांडे
+१
14 Aug 2015 - 2:23 pm | नाव आडनाव
+१
14 Aug 2015 - 4:34 pm | अविनाश पांढरकर
+१
14 Aug 2015 - 4:40 pm | द-बाहुबली
14 Aug 2015 - 5:28 pm | तुषार काळभोर
पुभाप्र
14 Aug 2015 - 6:36 pm | मृत्युन्जय
नीट कळाली नाही.
14 Aug 2015 - 7:41 pm | किसन शिंदे
हेच म्हणतो.
या वाक्यामुळे गोंधळ वाढतोय.
14 Aug 2015 - 9:36 pm | सौन्दर्य
स्पर्धेतील कथेवर प्रतिसाद किंवा स्पष्टीकरण द्यायला परवानगी आहे की नाही ते माहित नसल्यामुळे तुम्हाला व्यनी केला आहे.
14 Aug 2015 - 7:37 pm | सौंदाळा
+१
सहीच. मगापासुन झपाटल्या सारख्या नविन शशक वाचतोय. मधे ३/४ दिवस जास्त कथा आल्या नाहीत. पण आता अनेक उत्तम कथा शेवटचे २ दिवस असुन येतायत.
14 Aug 2015 - 7:46 pm | सौन्दर्य
शशक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. फक्त १०० शब्दांत एक अर्थपूर्ण कथानक उलगडून सांगणे ही एक कसोटीच आहे असे मला वाटते. मराठीत हा कथाप्रकार रुजवणार्यांचे आणि मिपावर त्याची स्पर्धा योजणार्यांचे हार्दिक अभिनंदन.