गणेश विसर्जन सकाळीच करून झालं होतं . दुपारी जेवण झाल्यावर तो निघणार होता त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जायला .रात्रीच्या जागरणाचा त्रास व्हायचा म्हणून तो दिवसाच प्रवास करायचा .
पण अनेक वेळा होतं तसं आजहि नवरा बायकोचं भांडण झालं. भांडणाच्या नादात त्याची गाडी चुकली. मग पुन्हा दिवसभर धुसफूस. बायकोने जाऊच दिलं नाही . त्याने मनातल्या मनात बायकोला शिव्या घातल्या . (तोंडावर घालता येत नव्हत्या ;-) ) जावूदे २ दिवसांची राजा टाकता येईल . तोपर्यंत होईल शांत . मग जावू. असा विचार करत तो रात्रीचा बिछान्यावर पडला .
सकाळी चहा पिताना हातात वर्तमानपत्र घेतलं .पहिल्याच ठळक मुख्य बातमीवर नजर गेली . अन काळजात चर्र झालं .
'पहाटे झालेल्या किल्लारी भूकंपामध्ये शेकडो जणांचा बळी '
मनात आलं , आज सकाळी मी किल्लारीत असलो असतो. कालच्या भांडणाबद्दल त्याने बायकोला मनोमन माफ केलं .
प्रतिक्रिया
4 Aug 2015 - 3:18 pm | जेपी
-1.
अवांतर-लॉजीक पटल नाही.भुकंप पहाटे झालता.लगेच सकाळी पेप्रात बातमी कुठुन येणार? पुभाप्र.
(लॉजीकल)-जेपी
7 Aug 2015 - 10:26 pm | उगा काहितरीच
सहमत...
4 Aug 2015 - 3:36 pm | तुडतुडी
पहाटेच्या बातम्या पेपरात येतात . तुम्हाला आठवत असेल दुसर्या दिवशीच्या पेपर मध्ये बातमी आली होती
4 Aug 2015 - 3:49 pm | चिगो
जमलीय..
कृपा करुन 'पूर्वपरीक्षण' सुविधेचा लाभ घ्यावा, ही विनंती.. आणि विरामचिन्हांकडे पण जरा लक्ष द्यावे..
4 Aug 2015 - 4:00 pm | खेडूत
ते आम्हीपण आधी म्हटलं पण लोकं तपासायचा कंटाळा करतात-
लई घाई करतात टाकायची.
4 Aug 2015 - 4:16 pm | तुडतुडी
अर्र्र्र्र्र्र . आवडली असेल तर +१ नाहीतर -१
4 Aug 2015 - 4:20 pm | संचित
+१
4 Aug 2015 - 4:28 pm | खेडूत
अबब!!
११४ शब्द!
4 Aug 2015 - 4:32 pm | जडभरत
+१
4 Aug 2015 - 4:36 pm | प्रचेतस
-१
4 Aug 2015 - 4:43 pm | अन्या दातार
बरंच ओढून ताणून जुळवल्यासारखी वाटली.
4 Aug 2015 - 4:56 pm | तुडतुडी
खि:क . ओढून ताणून नै ओ जुळवलं . सत्यकथा आहे हि . खरोखर असं घडलं होतं
4 Aug 2015 - 7:41 pm | विवेकपटाईत
+१ आवडली
4 Aug 2015 - 11:04 pm | प्यारे१
+0-0=0
;)
4 Aug 2015 - 11:26 pm | लाल टोपी
+१
7 Aug 2015 - 8:20 am | कोमल
-१
7 Aug 2015 - 9:30 pm | बहिरुपी
+१
7 Aug 2015 - 9:33 pm | राघवेंद्र
+१