सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
1 Dec 2008 - 12:28 pm | प्रमोद देव
आबांनी राजीनामा दिलाय! आता पाठोपाठ विलासरावही चालले.
1 Dec 2008 - 2:36 pm | घनवट एच के
फक्त नाटक आहेत. लोकांना दाखवणे वेगळे आणि करणे वेगळे. आता तुमचा शेवट लोकच करतील देशमुख साहेब तुमचीही हीच परिस्तिती आहे.
लोक आता संतापलेले आहेत
1 Dec 2008 - 12:41 pm | वेताळ
संध्याकाळी नाच्याही राजीनामा देण्याची शक्यता.
वेताळ
1 Dec 2008 - 1:02 pm | विनायक प्रभू
आरारा
1 Dec 2008 - 4:06 pm | नीलकांत
आर. आर. आबांसारखे मंत्री पोलीसखात्यासाठी खुपच दुर्मीळ आहेत. त्यांच्या राजीनाम्या पेक्षा त्यांना अधीक मोकळीक दिली असती तर त्यामुळे पोलीसांना अधीक बळ मिळाले असते.
असो, शेवटी सेनापती म्हणून यश - अपयशाचे धनी त्यांना व्हावंच लागेल.
नीलकांत
2 Dec 2008 - 6:15 am | सूर्य
नीलकांत, तुम्ही पोलीस खात्यात असल्याने तुम्हालाच जास्त माहीती असेल परंतु माझ्यासारख्यांना डान्स बार बंद करण्यापलिकडे आबांचे काहीच कर्तुत्व दिसत नाही. गेल्या काही वर्षात पोलिसांची परिस्थीती सुधारली आहे की अजुनच वाईट झाली आहे ? केवळ स्वच्छ प्रतिमा एवढेच पुरेसे आहे का मंत्रीपदासाठी ?
- सूर्य.
2 Dec 2008 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीलकांत पोलिसात असल्यामुळे अधिक माहिती मिळेलच, पण पोलिसांना आधुनिक करण्याचा त्यातल्या त्यात त्यांनी प्रयत्न केला असे म्हटल्या जाते. ते जाऊ द्या ! संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात लोकांना स्वयंस्फुर्तीने म्हणा किंवा काही म्हणा गाव स्वच्छ करायला लावले, गाव हागणदारी मुक्त झाले पाहिजे यासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एन्.एस.एस ( राष्ट्रीय सेवा योजना ) च्या माध्यमातून जिल्हा परिषदांच्या अधिकार्यांच्या समन्वयाने ग्रामपंचायत सदस्य, गावकरी यांच्या वतीने, गावाची स्वच्छता, प्रबोधन, याचे उपक्रम आबांनी राबवले, तंटामुक्त गाव झाले की नाही माहित नाही पण आबांनी प्रयोग केला, सावकार राइट केले. अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणले खूप सांगता येईल रे ! आबा एक राजकारणातला,समाजकारणातला, माणसांमधला एक हळवा माणूस होता आणि राजकारणात अशी माणसं दुर्दैवाने टीकत नाहीत.
-दिलीप बिरुटे
2 Dec 2008 - 9:53 am | विकास
बिरूटेसर,
आपण म्हणता ते आबांनी केले पण ते गृहमंत्री म्हणून केले नाही तर नगरविकास का ग्रामविकास मंत्री म्हणून... गृहमंत्री म्हणून ठोस काय केले?
आबांबद्दल मलापण आदर आहे. तरी देखील काहीही कारणे असूनदेत गृहमंत्री म्हणून ते काम करू शकले नाहीत, कदाचीत त्यांचे साधेपण मधे आले असावे.
2 Dec 2008 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गृहमंत्री म्हणून ते काम करू शकले नाहीत,
हम्म, गृहमंत्री म्हणून नजरेत भरणारं काम मात्र दिसत नाही :(
2 Dec 2008 - 7:31 pm | विकास
हम्म, गृहमंत्री म्हणून नजरेत भरणारं काम मात्र दिसत नाही
त्याचे उत्तर कदाचीत निलकांतने म्हणल्याप्रमाणे राष्ट्रवादीतील "महाराष्ट्रवादी" अर्थात अंतर्गत स्पर्धा असावे.
घालीन आडवी टांग, पाडीन उताणा, असाच अमुचा मराठी बाणा...
2 Dec 2008 - 4:26 pm | सूर्य
माहीतीबद्दल धन्यवाद सर व नीलकांत. आबांची प्रतिमा चांगली आहे. तसेच त्यांची वरील कामे मला माहीत नव्हती. गृहमंत्री म्हणुन काही उठुन दिसणारी कामे करायला पाहीजे होती असे मला वाटते. परंतु आज ज्या नावांचा विचार होतोय त्यापेक्षा आबा चांगले होते या मताशी सहमत आहे.
- सूर्य.
2 Dec 2008 - 2:39 pm | नीलकांत
मी पोलीसात नाहीये... माझी निवड झाली होती आणि एमपीएससीच्या गौरवाला शाबूत राखत याही निकालावर मुंबईच्या उच्च न्यायालयात आव्हाण दिले गेले आहे. त्यामुळे मी पोलीसात नाही हे आज खरंच आहे. असो हा मुद्दा नाही.
आर. आर. आबा हे फार थोड्या राजकारण्यांपैकी आहेत की ज्यांच्या जवळ संवेदनशील मन आहे. मी आबांना जवळून पाहिलेलं नाही मात्र त्यांच्या बाबत अनेक लोकांकडून ऐकलेले आहे. तुम्ही थोडा शोध घ्याल तर आबांचं वेगळेपण नक्कीच जा़णवेल.
इतर राजकारण्यांसारखं त्यांना सुध्दा भाषणात फटाके फोडायला आवडतात हे खरं आहे मात्र पोलीस खात्यात उत्तम काम करणार्या लोकांना सोबत करणे आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम आबांनी खुप उत्तम केले आहे. गृहखातं आणि पोलीस विभाग यांच्यातील नात्याला थोडा गोडवा आणण्याचे काम आबांनी केले.
अजूनही करण्यासारखे खुप आहे. मात्र राष्ट्रवादीतील इतरांच्या महत्वाकांक्षा आता आड येताहेत हे खरं आहे.
नीलकांत
1 Dec 2008 - 4:20 pm | अप्पासाहेब
कोणी काहीही म्हणोत, आबा मागच्या ८-१० गृहमंत्र्यां पेक्षा जास्त कर्तबगार होते यात मला तरी शंका नाही. आठवा ती छगन व गोपिनाथांची कारकिर्द.
माझे काही मित्र व नातेवाईक पोलिस खात्यात आहेत, त्यांचे आबां बद्द्लाचे मत 'कणखर, स्वच्छ, डाऊन टु अर्थ' असेच आहे.
आबांचा वाचाळपणा (किंवा 'स्लिप ऑफ टंग ') नडला एव्ह्ढेच.
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
1 Dec 2008 - 5:51 pm | विजुभाऊ
प्रतिसाद देताना आपण कोणाला काय म्हणतो आहोत याचा पाचपोच ठेवावा.
एकदम भडक प्रतिसाद आहेत येथे काही.
मिपा वर सम्तुलीत संयमाने लिखाण होत असते. मिपावरील काही लेखांची दखल मिडीयाकडून यापूर्वी घेतली गेली आहे. कृपया बुळ्या वगैरे भाषा वापरु नये . ते वैयक्तीक मत असु शकते.
आबा एक चांगले अभ्यासु मन्त्री आहेत. निलकान्तशी सहमत.
( भडक प्रतिसाद्/विषय यासाठी मिपाचे काही धोरण आहे काय? काही विधानांचा त्रास होऊ शकतो)
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
1 Dec 2008 - 6:20 pm | ऋषिकेश
आबांसारख्या (मोजक्या) कार्यक्षम नेत्यांना राजीनामा द्यायला लावणे कितपत योग्य आहे (त्यांचा तोंडाळपणा वाईट होता याबद्दल दुमत नाहि.)
अजून एक विचार डोक्यात येतो (आबांबद्दल नाहि पण इन जनरल)
तो असा की अश्या राजिनाम्याने यापुढचे काम करण्याऐवजी फक्त जबाबदारीतून मोकळे झाल्यासारखे नाहि का वाटत?.. एखादे पद वर्षानुवर्ष उबवायचे आणि अंगाशी आलं की राजीनामा द्यायचा? हे आग लागल्यावर जबाबदारी झटकणे नाहि का झालं?
आता पूर्णपणे नवी व्यक्ती येईल जिला त्या पदाबद्द्ल काहि माहित नाहि ती व्यक्ती या संकटाच्या वेळी इतकं मह्त्त्वाचे पद कितपत कार्यक्षमतेने सांभाळू शकेल?
-(गोंधळलेला) ऋषिकेश
1 Dec 2008 - 6:35 pm | परिकथेतील राजकुमार
विषयांतरा बद्दल आधी माफी मागतो पण आत्ताच आमचे याहूवरील एक सन्माननीय मित्र म्हणाले कि म्हणे , "बरे झाले आता पनवेल वाशी मध्ये दिवाळी चालु होइल."
जरा एक वेगळी प्रतिक्रिया वाटली म्हणुन इथे देत आहे. चु.भु.द्या.घ्या.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
1 Dec 2008 - 8:36 pm | विकास
आबांकडून राजीनामा वगैरे घेणे अथवा देणे हे योग्य वाटत नाही. आबांचे "अशा लहानसहान गोष्टी होतात" हे वाक्य मात्र मला खटकले.
अर्थात त्याला सन्मान्य अपवाद (आता माजी) केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा आहे. इतके वर्ष काही न करता त्यांची त्यांच्या सहकारी साखर कारखान्यात एक पगारी व्यवस्थापक म्हणूनपण नोकरी टिकली नसती. म्हणूनच त्यांच्याकडून नैतिकता म्हणून नाही तर ते आजपर्यंत पदाबरोबरचे कर्तव्य पार पाडण्यासंबंधात "अनैतिक" वागले म्हणून राजीनामा घेणे योग्य वाटते.
तरी देखील आता आबांनी आजता गायत गृहमंत्री म्हणून नक्की काय केले?
सकाळ मधे जेंव्हा वाचले तेंव्हा खालील वाक्ये गृहमंत्रीपदी असतानाच्या संदर्भात दिसली. (ठळक शब्द मी केले आहेत):
त्यानंतर ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. आणि नंतर गृहमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली.
ही जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयांपैकी डान्स बार बंदीचा निर्णय सर्वांत जास्त गाजला.
त्यांनी पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठीही प्रयत्न केले.
म्हणजे नक्की त्यांचे गृहमंत्री म्हणून लक्षात ठेवण्याजोगे कर्तुत्व काय तर बारबालांच्या नृत्यावर बंदी इतकेच?
वरील प्रश्न ही कृपया "कॉमेंट" म्हणून घेऊ नका, अधिक माहीती असल्यास तशी येथे अवश्य लिहा.
1 Dec 2008 - 9:16 pm | रेवती
आबा चालले ह्याचं वाईट वाटतय.
रेवती
1 Dec 2008 - 10:18 pm | विकास
सकाळ मधील बातमी प्रमाणे:
...
मुंबईवरील हल्ल्यानंतरही त्यांच्या राजिनाम्याची मागणी खूप क्षीण होती. कोणत्याही पक्षाने अशी मागणी तीव्रतेने केली नव्हती. मात्र, आर. आर. यांचे हे विधान सर्वच दूरचित्रवाणी वाहिन्यांनी उचलून धरले आणि आर. आर. यांना झोडपण्यास सुरूवात केली. मुंबईतील हल्ला किरकोळ होता, असे आर. आर. यांना वाटणे अशक्य आहे, हे कोणीही सामान्य माणूस सांगू शकेल. त्यांच्या निकटवर्तीयांचेही तेच मत आहे. तथापि, सातत्याने माध्यमांसमोर आर. आर. यांचे वाक्य "घसरले' आणि त्यांचे गृहमंत्रीपद हिरावून घेऊन गेले. "असं होऊ शकतं आणि आम्ही त्याचा मुकाबला केला आहे...,' इतकेच आर. आर. यांना म्हणावयाचे होते, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यातून "महाराष्ट्राचे मनोबल भक्कम आहे...अशा हल्ल्यांचा आमच्यावर फरक पडणार नाही...' असा संदेश त्यांना द्यायचा होता. प्रत्यक्षात ""ऐसे बडे शहरोंमे हादसे होते रहतें है...' असे वाक्य आर. आर. बोलून गेले.
....
तात्पर्य, राष्ट्रीय राजकारणात एकतर हिंदी येणे महत्वाचे, अथवा इंग्रजी येणे महत्वाचे अथवा भिड न बाळगता मातृभाषेत (या संदर्भात मराठीत) बोलणे महत्वाचे. मराठीत बोलले असते तर काय बिघडले? राज्यभाषा आहे ना ती?
1 Dec 2008 - 10:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आबांच्या जाण्याचे कारण - हिंदीच आहे.
नाही तर आबांची प्रतिमा जरा बरी आहे. चतुर राजकारण्यांपेक्षा सामान्य माणूस ही प्रतिमा त्यांच्या समाजकारण आणि राजकारणात सतत डोकावते, पण दैवच असेल तर रोखणार कोण ?
-दिलीप बिरुटे
(आबांच्या राजिनाम्याचे वाइट वाटलेला)
2 Dec 2008 - 10:04 am | प्रदीप
वाटते आहे. राहूल राजच्या हत्येनंतर आबांनी जी सरळ व बिनचूक प्रतिक्रिया नोंदवली होती, तेव्हापासून उत्तरेतील नेते त्यांच्या मुळावर असावेत. आता त्यांना आबांच्या ह्या चुकिच्या हिंदीत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे संधि मिळाली.
1 Dec 2008 - 10:50 pm | लिखाळ
अक्षरशः .. हेच लिहिण्यासाठी आत्ता मी कळफलक सरसावत होतो...
आपल्या अनेक नेत्यांचा आवाज हिंदी बोलताना घशात जातो आणि मग राजकीय दृष्ट्या सैल अशी विधाने ते करतात. इंग्रजी बद्दल तर विचारायलाच नको. त्यापेक्षा मराठीत बोलावे आणि दुभाषा नेमावे. काय हरकत आहे !
या प्रसंगी 'वजीर' या चित्रपटातील मुख्यमंत्री (अशोक सराफ) यांची भेट घ्यायला परदेशी पाहुणे येतात तेव्हाचा प्रसंग आठवला.
-- लिखाळ.
2 Dec 2008 - 6:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
भाषाच आड आली असणार.
किंचीत वेगळं: माझ्या तीन अमराठी सहकार्यांनी याच शब्दांत त्यांचे विचार व्यक्त करुन, आबा चांगले मंत्री होते असं म्हटलं. मराठी-अमराठी वादात राज ठाकरेंविरुद्ध रागाने क्वचित अनुदार उद्गार काढणार्या अमराठी महाराष्ट्रीय लोकांनाही आबांबद्दल प्रेम असावं.
1 Dec 2008 - 10:29 pm | चतुरंग
'त्यांनी प्रतिक्रिया मराठीत द्यायला काहीच हरकत नव्हती' वगैरे सल्ले देणे पश्चातबुद्धी आहे! जबरदस्त ताणाच्या परिस्थितीत प्रसिद्धीमाध्यमांसमोर काय फे फे उडते ते तिथे गेल्याशिवाय समजणार नाही, दुर्दैवाने आबा बळी ठरले.
एक स्वच्छ आणि मनापासून काम करणारा राजकारणी म्हणून माझ्या मनात अजूनही त्यांच्याबद्दल आत्मियता आहे.
असो. झाले ते झाले आणी त्याची जबाबदारी घेऊन ते चाललेले आहेत. ते पुन्हा लवकरच येवोत आणि चांगले काम पुढे चालू ठेवण्याची संधी त्यांना मिळो ही सदिच्छा!
चतुरंग
1 Dec 2008 - 10:51 pm | विसोबा खेचर
गृहखात्याची जबाबदारी नीट न पार पाडल्यामुळे भडकून जाऊन मी आबांना बोल लावला आहे व तो मला योग्यच वाटतो..
परंतु एक व्यक्ति म्हणून आबा हे अत्यंत निरलस व प्रामाणिक व्यक्तित्व आहे हेही तितकंच खरं! खास करून आजकाल जे गेंड्याच्या कातडीचे राजकारणी आहेत तसे आबा नक्कीच नव्हते हेही आवर्जून सांगावेसे वाटते..
तात्या.
1 Dec 2008 - 10:53 pm | विकास
बिरुटेसर, चतुरंग आणि तात्यांच्या आबांच्या मताविषयी सहमत.
लिखाळ म्हणतात त्याप्रमाणे मराठीत बोलण्याची लाज अथवा भिड वाटायचे कारण नाही.
1 Dec 2008 - 10:56 pm | शितल
आबा बद्दल माझे ही मत चांगले आहे,
बाकींच्या राजकारणां पेक्षा आबा नक्कीच चांगले आहेत.
2 Dec 2008 - 7:29 am | बहुगुणी
तोही राजीनामा सादर केल्यानंतर दोनच तासात! राजीनामा अद्याप स्वीकारला गेलेला नसला तरीही. हे वागणं देखील या स्वच्छ मनाच्या माणसाचं बोलकं चित्र उभं करतं. मला वाटतं हा माणूस राजकारणी कमी आणि चांगला शासनकर्ता जास्त आहे, तो परत यायला हवा.
2 Dec 2008 - 9:20 am | अमोल केळकर
सहमत
आजच्या स्वार्थी राजकारर्ण्यांच्यात राजिनामा दिल्यावर तातडीने सरकारी निवास्थान सोडलेला मंत्री ही दुर्मीळ गोष्ट आहे.
एक दिवस आबा नक्किच 'वर्षा' वर रहावयास जातील.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
2 Dec 2008 - 9:57 am | विकास
सकाळमधील बातमी प्रमाणे:
४ जुलै १९७० रोजी तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईतील शासकीय निवासस्थान सोडून लगेच खासगी मोटारीतून प्रयाण केले. डिसेंबर १९९१ मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपद गेल्यानंतर मनोहर जोशी यांनी तत्काळ शासकीय मोटार परत केली होती. ३० जानेवारी १९९९ रोजी मनोहर जोशी यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी वर्षा बंगला सोडून शिवाजी पार्कनजीक आपल्या निवासस्थानी मुक्काम हलविला होता.
2 Dec 2008 - 8:11 am | मराठी_माणूस
अजुन एक मत
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3781856.cms
2 Dec 2008 - 9:41 am | मैत्र
एक बेजबाबदार विधान फार महागात पडलं. आत्ताच्या राजकारणात याहून बरा माणूस नाही. आता छगन चा विचार चालू आहे. कुठे ते आणि कुठे हे. काल एका मराठी चॅनेल वर शूटिंग पाहिलं की आबा लाल दिव्याची गाडी आणि बंगला संध्याकाळच्या आत परत करून एका साध्या तवेरा ने घरी परतले. कुठेही गाजावाजा नाही. वरची म टा ची बातमी पटली नाही.
देशमुख ही काही महान नसले तरी आता राणे वगैरे मंडळींपेक्षा नक्किच बरे होते.
कोण येणार आणि काय करणार देव जाणे.
जसं शिवराज पाटील फार उशीरा गेले पदावरून तसे आबा फार लवकर गेले. वसंत पुरके म्हणतात त्याप्रमाणे हिंदी आणि इंग्रजी अतिशय गरजेचं आहे.
अवांतरः कोणतेही मुख्यमंत्री / गृहमंत्री आणि कोणताही पक्ष असता - राज्यात किंवा केंद्रात -- भा ज पा / इतर आघाडी तरी हे टाळता आलं असतं असं नाही. तटरक्षक/गुप्तचर्/राज्य पोलिस आदी सर्वांचे अपयश आहे. ते त्या यंत्रणेच्या रचनेमुळे आणि वर्षानु वर्षाच्या कार्य पद्धती आणि कमालीच्या भ्रष्टाचारामुळे त्याला कोण काय करणार काही थोड्या काळात आणि तेवढी कोणाची इच्छा तरी आहे का?
2 Dec 2008 - 4:28 pm | मराठी_माणूस
वसंत पुरके म्हणतात त्याप्रमाणे हिंदी आणि इंग्रजी अतिशय गरजेचं आहे.
ह्याच्यापेक्षा मराठीत सगळ्या जनते समोर मिडीआ समोर अभिमानाने बोलणे सर्वात जास्त गरजेचे आहे
2 Dec 2008 - 4:36 pm | मैत्र
सी एन एन / बी बी सी / आय बी एन / एन डि टी व्ही / झी / आज तक इत्यादी इत्यादी समोर बळंच मराठीतून बोलण्याचा अट्टाहास कशाला? या कुठलाही आधार नसलेल्या भाषेच्या आग्रहाचं कारण काय ?
कोणी पत्रकाराने त्यांना हिंदीतून काही विचारले व त्यांनी उत्तर देताना हे विधान केले.
किती ही हिंदी येत नसलं तरी - " मुंबइ जैसे बडे शहरे मे ऐसे छोटे हादसे होते रहते है " यासाठी हिंदी येत नाही हे कारण नसावं हाही मुद्दा आहेच. पण आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मोठ्या मिडियाला सामोरे जाताना हिंदि व इंग्रजीचे ज्ञान असणे काहीच वाइट अथवा चुकीचे नाही.
2 Dec 2008 - 4:56 pm | मराठी_माणूस
या कुठलाही आधार नसलेल्या भाषेच्या आग्रहाचं कारण काय
ह्याचा अर्थ समजला नाही
4 Dec 2008 - 10:48 am | मैत्र
कुठल्याही कारणाशिवाय आधाराशिवाय मराठीचा आग्रह .. कदाचित ते शब्द भाषेच्या एवजी भाषेचा असे हवे होते.
बळंच हिंदी प्रश्नांना मराठीत उत्तर देण्याचं कारण नाही.
5 Dec 2008 - 8:22 am | मराठी_माणूस
बळंच हिंदी प्रश्नांना मराठीत उत्तर देण्याचं कारण नाही.
पुर्वी एक राष्ट्रपती होते जे देशाला उद्देशुन ईंग्रजीत भाषण करयाचे , देशातल्या कीती जनतेला ते कळायचे ? दाक्षीणात्य पेहराव करणारे केंद्रात मंत्री आहेत. आपल्याला मात्र चार लोकात मराटी बोलायला का अभीमान वाटत नाही.
5 Dec 2008 - 2:54 pm | मैत्र
आत्ताचे पंतप्रधानही इंग्रजीतूनच बोलतात. आणि मद्रासी पांढरी लुंगी घालून अर्थसंकल्प मांडणारे हार्वर्ड पदवी धारक चिदंबरम ही इंग्रजीतूनच बोलतात. संसदेत किंवा एन डी टी व्ही प्रॉफिट वर तमीळ बोलत नाहीत.
कशाचा संबंध कशाशी? आर आर स्वतः शक्यतो मराठीत बोलतात. पत्रकार परिषदेत हिंदी वर्तमानपत्र / वाहिनिच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. तिथे कारण नसताना मराठिचा अभिमान कशाला. मूळ मुद्दा काय? आणि मध्येच भाषा. आणि मग कशाला देशाची एकता वगैरे. सरळ भाषावार प्रांतरचनेप्रमाणे देश करून टाका.
नंतर येतीलच कोकणी, अहिराणी, वगैरे वेगळा सुभा मांडायला, अभिमान पुढे करून.
मुद्दा काय आणि गेला कुठे?
5 Dec 2008 - 3:35 pm | मराठी_माणूस
आत्ताचे पंतप्रधानही इंग्रजीतूनच बोलतात. आणि मद्रासी पांढरी लुंगी घालून अर्थसंकल्प मांडणारे हार्वर्ड पदवी धारक चिदंबरम ही इंग्रजीतूनच बोलतात. संसदेत किंवा एन डी टी व्ही प्रॉफिट वर तमीळ बोलत नाहीत.
म्हणजे ते ईंग्रजीत बोलतात म्हणून कपडे प्रादेशीक चालु शकतात असेच ना ? ते बेंचमार्क आहेत का ?
कशाचा संबंध कशाशी?
मराठीत बोलायचा अट्टाहास कशाला , बळच कशाला ईत्यादीने तो संबंध प्रस्थापीत झाला.
माझा मुद्दा एवढाच आहे की दुसर्या भाषेत बोलुन जर अर्था चा अनर्थ होत असेल तर मराठीतच का नाही.
5 Dec 2008 - 4:35 pm | मैत्र
ते ईंग्रजीत बोलतात म्हणून कपडे प्रादेशीक चालु शकतात असेच ना ? ते बेंचमार्क आहेत का ?
कशाचे बेंचमार्क. दाक्षिणात्य पेहराव करणार्या मंत्र्यांबद्दल ते उत्तर होतं. लुंगी घालणं हा त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे. आणि अशा वेगळ्या पेहरावात इतकं मोठं पद सांभाळताना त्यांची जी कमालीची सहजता आहे ती विशेष आहे.
माझा मुद्दा एवढाच आहे की दुसर्या भाषेत बोलुन जर अर्था चा अनर्थ होत असेल तर मराठीतच का नाही.
बरोबर आहे. पण प्रश्न हिंदीत असल्याने आणि बहुसंख्य हिंदीभाषिक लोक व वाहिन्या असल्याने आबांनी नाइलाजाने राष्ट्रभाषेचा आधार घेतला असावा.
असो कारण काही का असेना. ते महाराष्ट्राचे दुर्दैव ठरले. कारण त्यामुळे खुपच बरा असलेला मनुष्य या मोठ्या पदावरुन जाउन त्या विदुषकाची नेमणूक झाली...
2 Dec 2008 - 10:32 am | अवलिया
महाराष्ट्रातील जनतेबरोबरच नेत्यांना पण मराठी बोलायची लाज वाटते त्याचा अजुन एक बळी.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
5 Dec 2008 - 2:31 pm | रुपेश सातारकर
अवलियाची अनुदिनी
हिंदि चॅनलवाल्यांना आवरा.........
आणि हो कठीण प्रसंगात आपल्या लोकांसोबत रहा......
(आपला महाराष्ट्र....आपले आबा)
5 Dec 2008 - 12:47 pm | रुपेश सातारकर
प्रशिद्धिमाध्यमांचा उतावळेपणा........
सद्या उद्भवलेली परीस्थिती शांत करण महत्वाच आहे. आबासारखा साध्या व निष्कलंक माणसाला बदनाम करु नका.....
तमाम वाचकांसाठी खालील उतारा साभार
आबांच्या सान्निध्यात!
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २००८
अगदी ग्रासरुटपासून राज्याच्या मंत्रिपदापर्यंत वाटचाल केलेले अनेक मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत. त्यापैकी एक नाव आर. आर. पाटील. या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या निरलस, निगर्वी आणि आपुलकीच्या वागण्यानं जनमानसात इतकं भक्कम स्थान मिळवलंय की सारेच त्यांना `आबा` म्हणतात. त्यांनाही `सर` म्हटलं की तितकंसं रुचत नाही. आबांच्या दिलदारपणाचा अनुभव मला गेल्या एप्रिलमध्ये आला.
लोकराज्यचा मेचा अंक `महाराष्ट्र दिन` विशेष होता. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी, पुढील वाटचालीविषयी मनोगतं समाविष्ट करायची होती. आबांच्या नावाचाही त्यात समावेश होताच. महासंचालकांनी त्यांची मुलाखत घेण्यासाठी मला जायला सांगितलं. त्यानुसार त्यांचे पीआरओ श्री. करंजवकर आणि श्री. पिटके यांच्याशी बोलून वेळ ठरवली. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यानं आबांनी संध्याकाळी कामकाज संपल्यानंतर बंगल्यावरचीच वेळ दिली. करंजवकर साहेबांबरोबर मी आणि रेकॉर्डीस्ट बंगल्यावर पोहोचलो. त्या दिवसाचं कामकाज लांबल्यानं आबांच्या पूर्वनियोजित बैठकाही लांबल्या.
त्यांनी आल्याबरोबर नियोजनानुसार भेटी सुरू केल्या. मुलाखत घ्यायची असल्यानं मला सर्वात शेवटची वेळ दिलेली. मुलाखत संपायला साधारण सव्वादहा वाजले. खुर्चीतून उठता- उठता आबा म्हणाले, `चला, जेवण करून घेऊ.` आणि ते आत गेले. आम्ही बाहेर द्विधा मन:स्थितीत उभेच. सर्वसामान्यांचे आबा असले तरी ते आम्हा शासकीय अधिकार्यांचे प्रमुख होते. थोडंसं दडपण आलंच. आत जावं की न जावं, अशीच मन:स्थिती. त्यात आता इथून पुढं सीएसटीला पोहोचून कुठलीतरी स्लो ट्रेन पकडून घरी पोहोचायलाही साडेबारा-एक वाजतील, असं वाटलं. आपण निघून गेल्यानं आबांना असा काय फरक पडणार आहे? असंही वाटलं. आम्ही गाडीत बसून निघालोही.
राजभवनकडे जाणार्या चौकात पोहोचलो असू, इतक्यात करंजवकरांच्या मोबाईलवर बंगल्यावरुन फोन आला. `अहो, कुठे आहात? आबा जेवणासाठी वाट बघत आहेत.` करंजवकरांनी बंगल्याच्या जवळच असल्याचं सांगितलं. आम्हाला टेन्शन आलं. आता आपली काही खैर नाही, असं वाटलं. आम्ही गाडी परत फिरवली. बंगल्याच्या आवारात शिरलो. तिथल्या सिक्युरिटीच्या पोलिसांनीही `अहो, पळा लवकर. किती वेळ झाला?` असं म्हणून टेन्शन आणखीच वाढवलं. मग तर बिचकत-घाबरतच आत गेलो. वाट बघून आबांनी जेवायला सुरवात केलेली. आम्हाला बघताच म्हणाले, `अरे, काय तुम्ही? मी `जेवायला चला` म्हटलं तरी कसे काय गेलात?` यावर `सॉरी सर` म्हणण्यापलिकडं काहीच बोलू शकलो नाही. तेव्हा आबाच हसून म्हणाले, `आता माझ्याशिवाय एकटंच जेवायची शिक्षा तुम्हाला!` आम्हीही मग हसून त्यांच्या पंगतीत सामील झालो. जेवणाचा बेत एकदम साधा-अगदी गावाकडचा. छान भरलेली वांगी, बटाट्याची भाजी, आमटी आणि गरम चपात्या. भुकेल्या पोटाला या गावाकडच्या जेवणाच्या वासानं अगदी खेचून घेतलं. करंजवकर साहेबांबरोबरच मी, रेकॉर्डिस्ट आणि ड्रायव्हरही आबांच्या पंक्तीला बसून जेवलो. सर्वांचीच त्यांनी आपुलकीनं ओळख करून घेतली. आबांचं जेवण झालं तरी ते आमच्यासाठी बसून राहिले. जेवण झालं. आबांना विचारलं, `निघावं का?` त्यावर हसून म्हणाले, `आता माझी काहीच हरकत नाही.` आम्हीही मनमोकळं हसलो. त्यांना `गुडनाइट` म्हणून बाहेर पडलो.
सार्यांच्याच मनावर आबांच्या आपुलकीनं छाप टाकली होती. तसं पाह्यला गेलं तर, ना आम्ही आबांचे कार्यकर्ते होतो, ना मतदार! आणि आमची नेमणूक त्यांच्या प्रसिद्धीसाठीच केली असल्यानं त्यांनी आम्हाला जेवायला दिलं असतं काय अन् नसतं काय, त्या प्रसिद्धीत काही कमी-जास्त होणार नव्हतं. पण आर. आर. पाटील या व्यक्तीमधल्या गृहमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी नव्हे तर त्यांच्यातील सहृदय आबांनी आम्हाला जेवू घातलं होतं. पदाची शाश्वती कधीच नसते, पण आबांची माणुसकी, चांगुलपणा मात्र अगदी चिरकाळ स्मरणात राहील असाच!
'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल
आबांबद्दल बोलताना योग्य कि अयोग्य याच भान नक्कि ठेवा.............
रुपेश
5 Dec 2008 - 4:40 pm | मैत्र
हा वैयक्तिक अनुभव इथे मांडल्याबद्दल. इतका मोकळेपणा, दुसर्याबद्दल आस्था साध्या नगरसेवकांनाही अजिबात नसते.
अतिशय अनपेक्षित साधेपणा असलेला मनुष्य.
जरी मुंबईत जे घडलं ते खूप वाईट असलं तरी आबा विनाकारण एका वाक्यामुळे पदावरून गेले.
नवीन नाव पाहून त्या पदाची उरलं सुरलं महत्त्व संपल्यासारखं वाटलं
अवांतरः फक्त महाराष्ट्रातच उपमुख्यमंत्री पद आहे का? काही विशेष कारण? जाणकारांनी प्रकाश टाकावा.
5 Dec 2008 - 1:32 pm | वेताळ
आबा ह्या व्यक्ती विषयी इथे जर कोणी बोलले असेल तरी त्याना अजुन ते एक वाईट होते असे कोणीच बोलले नसावे. त्याचे व्यक्तीमत्व खुपच साधे आणि सरळ आहे. मी आबांचे बंधु आमचे आर आर साहेब जे पोलिस खात्यात कामाला आहेत त्याच्या संपर्कात काहीकाळ होतो. त्यावेळी ते आमच्या गावचे पोलिस अधिकारी होते. आबा त्यावेळी एक आमदार होते.परंतु साहेबांच्या वागणुकीत त्याचा लवलेश ही नव्हता. दोन्ही भाऊ इतके साधे आहेत की त्याना भेटणारा त्याचा फॅन होऊन जातो. आर आर साहेब लता मंगेशकरांच्या सेवेत एक वर्ष होते त्यामुळे लता दिदिचा त्याच्यावर विशेष लोभ आहे.लता दिदि कधी पन्हाळ्याला आल्या तर त्या एक दोन तासाकरिता आर आर साहेबाच्या घरी थांबत. आबांच्या कामाविषयी किंवा त्याच्या सच्चेपणा विषयी कोणाच्याही मनात शंका नाही.परंतु मुंबई बॉम्बस्फोटामुळे ते हिंदीवृतवाहिनींच्या हिटलिस्ट वर होते व त्यानी त्याचा पदाचा बळी घेतला. मुंबई पोलिसांच्या तपासकामाविषयी देखिल माझ्या मनात काही शंका नाही. माझ्या एका पोलिसमित्राने त्या सर्व शंका दुर केल्या आहेत.पोलिसांचे स्पष्ट मत आहे की टीव्ही चॅनेल्सना आता वेळीच आवर घातला पाहिजे त्यानी मुंबईचे खुप नुकसान केले आहे.
वेताळ
5 Dec 2008 - 2:34 pm | रुपेश सातारकर
वेताळजी
आपल्या प्रतिक्रियेबाबत आभार
वेळ आली आहे......ब्रेकिंग न्युजवाल्यांना आपर घालन्याची (मुसक्या बांधण्याची)
रुपेश
5 Dec 2008 - 3:46 pm | सुनील
आबा एक माणूस म्हणून किती साधे होते हे वर अनेकांनी सांगितले आहेच. परंतु, गृहमंत्री म्हणून त्यांनी काही चमकदार कामगिरी केली असे दिसत नाही. अर्थात, डान्सबार बंदी निग्रहाने अमलात आणली (म्हणूनच की काय पण त्यांनी राजिनामा दिल्याचे कळताच वाशी-पनवेलीस दिवाळी साजरी झाली, असे ऐकिवात आहे!)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Dec 2008 - 4:11 pm | मराठी_माणूस
(म्हणूनच की काय पण त्यांनी राजिनामा दिल्याचे कळताच वाशी-पनवेलीस दिवाळी साजरी झाली, असे ऐकिवात आहे!)
हो , हे वाचले होते. वाचुन अतिशय चीड आली.
16 Dec 2008 - 2:35 pm | सुनील
अगदी आबांच्या राज्यातही नव्या मुंबईत किमान दोन ठिकाणी तरी डान्सबार चालू होते (नेरूळ आणि सानपाडा). आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मुलुंड (प) येथे आणखी दोन ठिकाणी तरी (चेक नाका आणि स्टेशनजवळ) पुन्हा डान्स बार सुरू झाल्याचे समजते.
नव्या गृहमंत्र्यांपर्यंत हे वृत्त नेण्यासाठी काही उपाय आहे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Dec 2008 - 3:59 pm | अनंत छंदी
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वेबसाईटवर जाऊन त्यांना ई मेल करा, त्या मेलच्या सीसी वर्तमानपत्रांना पाठवा. पेपरात छापून यायच्या आधी कारवाई होईल.