मित्रांनो,
सामीश भोजनासाठी [त्यातल्या त्यात मासे] पुणे आणि मुंबईत अनेक "खव्वयी" हॉटेले आहेत, समर्थ भोजनालयासारखी.
माझी अश्या हॉटेलांना भेट देण्याची जाम ईच्छा आहे [नुसती नव्हे ;)].
तुम्हाला अशी कुठली हॉटेलं माहीत असतील तर सांगा ना!
अशी एक मस्त यादी बनवायची आणि मग जमेल तसे एकेका हॉटेलचा आस्वाद घ्यायचा. कशी वाटली कल्पना?
सुरुवातः
१. समर्थ भोजनालयः गिरगाव, मुंबई
बसने ठाकुरद्वार बसस्टॉपला उतरा आणि "मिरबत लेन"ची चौकशी करा. बस रुट पासुन दोन मिनिटाच्या अंतरावर आहे हॉटेल. जरा शोधावे लागते.
हं करा सुरु :)
-संताजी धनाजी
प्रतिक्रिया
20 Nov 2008 - 5:48 pm | वल्लरी
कोकण्यांची खानावळ
HOTEL HIGHWAY GOMANTAK
44/2179, Gandhi Nagar, Behind Maratha Store, Highway Service Road, Bandra (E), Mumbai
Timings: 11:00 pm to 3:30pm and 7:00pm to 10:30pm
Thursday Closed
21 Nov 2008 - 12:41 am | खादाड_बोका
मला तर स्वप्नातही भुक लागते....
22 Nov 2008 - 12:06 am | प्रभाकर पेठकर
Timings: 11:00 pm to 3:30pm
मला वाटतं वेळ ११:०० AM ते ३:३० PM असणार. 11:00 pm (म्हणजे रात्री ११) to 3:30pm (दूसर्या दिवशी) दुपारी ३:३० पर्यंत असा अर्थ होतो. पुढे 7:00pm to 10:30pm रात्री पुन्हा साडेतीन तास सुरू राहील. असे विचित्र टायमिंग का असावे?
20 Nov 2008 - 5:51 pm | वल्लरी
.....
20 Nov 2008 - 5:55 pm | धमाल मुलगा
सुगरण्स कोल्हापुरी - पुणे-३०
झक्कास कोल्हापुरी थाळी मिळण्याचे ठिकाण.
मटण्/चिकन सोबत तांबडा पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी एकदम टकाटक चव :)
सदाशीवपेठेत, भरत नाट्य मंदीरावरुन टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदीराकडे येताना लागणार्या शेडगेवाडीत हे सुगरण्स कोल्हापुरी आहे.
==================
आवारे लंच होम - पुणे ३०
चिकन/मटण थाळी.
सन १९०१ पासुन सातत्याने गर्दी खेचणारी ही मांसाहारी खानावळ केवळ अप्रतिम चवीचे चिकन मटण देते. एका हाताने नाक डोळे पुसत आणि दुसर्या हाताने रस्सा भुरकत जेवण्याची इथली मजा औरच.
अलका टॉकिजच्या चौकातून कुमठेकर रस्त्यावर आल्यानंतर काहीसं पुढे येऊन उजव्या हाताला पहात जावं, कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या पुढे आल्यावर ताबडतोब दिसेल.
----------------------------------------------------
सध्यातरी इतकीच आठवत आहेत. उरलेली सवडीने सांगेन.
(पेठकर काकांचं यज्ञकर्म नुकतंच चालु झालं आहे. तिथे मांसाहारी भोजनाची सोय आहे की नाही ते अजुन ठाऊक नाही, अन्यथा, केवळ पेठकरकाकांच्या नावावर विश्वास टाकून डोळे झाकुन तिथे जायचा सल्ला दिला असता :) )
20 Nov 2008 - 5:57 pm | धमाल मुलगा
पुनःप्रकाशन झाल्याकारणे प्रतिसाद काढून टाकण्यात आला.
22 Nov 2008 - 12:13 am | प्रभाकर पेठकर
पेठकर काकांचं यज्ञकर्म नुकतंच चालु झालं आहे. तिथे मांसाहारी भोजनाची सोय आहे की नाही ते अजुन ठाऊक नाही, अन्यथा, केवळ पेठकरकाकांच्या नावावर विश्वास टाकून डोळे झाकुन तिथे जायचा सल्ला दिला असता )
जरूर भेट द्या. पस्तावणार नाही कोणी. चमचमीत नीरामिष आणि चटकदार सामिष पदार्थांची रेलचेल म्हणजेच 'यज्ञकर्म उपहारगृह'.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
20 Nov 2008 - 6:08 pm | सुनील
ठाण्यातील चालत असतील तर ती अशी -
१) मालवण (पांच पाखाडी)
२) फिशलॅन्ड (खोपट)
३) कोंकण दरबार (के विला)
४) दर्यासारंग (एलबीएस मार्ग, चेकनाका)
५) विजयदुर्ग (गोल्डन डाइज जंक्शन)
६) सिंधूदुर्ग - बहुधा, नक्की नाव आता आठवत नाही (वागळे इस्टेट, चेकनाका)
...बाकी आठवतील तशी देईनच..
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Nov 2008 - 7:10 pm | संताजी धनाजी
अरे का नाही चालणार? पळतील.
परंतु कसे जायचे आणि स्पेशियालिटि पण लिहा की!
- संताजी धनाजी
20 Nov 2008 - 6:28 pm | अनंत छंदी
वामन गेस्ट हाऊस
शाहूपुरी, ऍम्बेसेडर लॉजवळ
मालवणी पद्धतीचे जेवण, मोरी मटण मिळते
जरूर चव घेऊन पहा
20 Nov 2008 - 8:10 pm | संताजी धनाजी
मोरी मटण म्हणजे रे काय भाऊ?
-[वार्यावरची वरात आवडणारा] संताजी धनाजी
21 Nov 2008 - 9:11 pm | अनंत छंदी
संताजीराव धनाजीराव
मोरी मटण म्हणजे शॊर्क माशाची एक जात असते त्यापासून तयार केली जाणारी डीश. ही मालवणी खासियत आहे. ज्याने मोरी मटण खाल्लेले नाही त्याने खरे मालवणी मत्य्स्याहारी भोजन केलेलेच नाही असे म्हणता येईल. एकदा चव घेऊन बघा. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल!
20 Nov 2008 - 6:40 pm | ब्रिटिश टिंग्या
इथे पहा बरं!
नाहीतर आम्हाला भेटा एकदा! पुण्यातल्या एक सो एक फंडु जागा दाखवीन (खाण्याच्या)!
- (खादाड) टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
20 Nov 2008 - 7:16 pm | संताजी धनाजी
का नाही? जरुर भेटुयात!
पुण्यातल्या एक सो एक फंडु जागा [खाण्याच्या!] इथे पण दाखवा की मग! तोच तर उद्देश आहे लेखाचा ;)
:)
- संताजी धनाजी
20 Nov 2008 - 7:04 pm | पांथस्थ
पुणे:
१) निसर्गः कर्वे रस्त्यावर नळस्टॉप ला डावीकडे वळाल्यावर एक सर्कल लागते तिथे उजव्या हाताला.
२) गोमंतकः डेक्कन जिमखाना परिसर. पुनम हॉटेल च्या लगतच्या (उजव्या हाताला) इमारती मधे एकदम वरच्या मजल्यावर
३) निगडि प्राधिकरणात एक मालवणी हॉटेल आहे आता नाव आठ्वत नाहि...
(मासेखाउ) पांथस्थ...
20 Nov 2008 - 7:16 pm | आजानुकर्ण
मालवण समुद्र म्हणताहात का?
ते प्राधिकरणात नाही पिंपरी चिंचवड नाट्यगृहाच्या शेजारी आहे.
आपला
(मालवणी) आजानुकर्ण चिंचवडे
20 Nov 2008 - 7:18 pm | संताजी धनाजी
हो हो, बरोबर! मी पण एकदा गेलो होतो. काय दणदणीत हाणले होते ते विचारु नका!
- संताजी धनाजी
20 Nov 2008 - 10:32 pm | आजानुकर्ण
कोणाला? (बिल दिले नाही का?) ह. घ्या.
तिथला मोरी मसाला आणि भरलेले पापलेट खाल्लेत का?
आपला,
(मत्स्यप्रेमी) आजानुकर्ण
21 Nov 2008 - 11:09 am | संताजी धनाजी
:D दिले दिले; बिल दिले होते.
- संताजी धनाजी
20 Nov 2008 - 11:27 pm | अभिज्ञ
ते प्राधिकरणात नाही पिंपरी चिंचवड नाट्यगृहाच्या शेजारी आहे.
हे पिं.चि. मनपा चिंचवडला आहे.
;)
मालवण समुद्र -चिंचवड टेल्को समोर. (टाटा मोटर्स)
(चिंचवडकर) अभिज्ञ.
20 Nov 2008 - 8:08 pm | संताजी धनाजी
हॉटेल आशिर्वाद, पुणे
डेक्कन वरुन कुमठेकर रस्त्यावर या. सिटि प्राईड शुजच्या चौकात उजवीकडे वळा. उजवीकडची दुसरी इमारत.
गुरुवार बंद.
मासे आणि कोळंबी थाळी साठी चांगलेच प्रसिद्ध आहे. आम्ही फर्ग्युसन महाविद्यालयात असताना बर्याच वेळा जायचो. "फेवरेट" हॉटेल म्हटले तरी हरकत नाही.
- संताजी धनाजी
20 Nov 2008 - 10:28 pm | संदीप चित्रे
टिळक रोड वरून, एसपी कॉलेजच्या चौकात, निलायम टॉकीजच्या दिशेने वळा.
निलायम टॉकीजच्या चौकात कुणालाही विचारा.
मालवणी जेवण खासच :)
22 Nov 2008 - 8:07 pm | संताजी धनाजी
संदिप,
मी आजच जावुन आलो स्वराज्य मध्ये. अतिशय उत्तम जेवण होते. आपण फैन झालो :)
आभारी आहे.
- संताजी धनाजी
20 Nov 2008 - 11:16 pm | अनामिका
सायबिण'- दादर .सेनाभवनच्या बाजुला
जयहिंद-पोर्तुगि़ज चर्च च्या बरेच पुढे.
योगी -सायन
वैशाली-चेंबुर
निलम हॉटेल( सर्व प्रकारच्या मांसाहारी जेवणासाठी)- विजयनगरी च्या जवळच घोडबंदर् रोड ठाणे.
समर हारवेस्ट् व गजाली , दर्या-विलेपार्ले पुर्व.
दाराज चा धाबा- दहिसर चेकनाक्याजवळ.
जनसेवा, जयश्री .(माझी पुण्यातली आवडती)
संताजी पण कशाला आठवण करुन दिलीत ?इथे आता वरील सगळ्यांच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलय?
""अनामिका"
20 Nov 2008 - 11:29 pm | नंदन
समर्थखालोखाल दादरला प्लाझासमोरचे गोमांतक, दहिसर हायवेजवळचे कोकणरत्न आणि शिवाजी पार्कजवळचे सिंधुदुर्ग ही हाटेलेही बरी आहेत. ऐन लालबागमध्ये एक उत्तम कोंबडी-वडे आणि सागुती पुरवणारे घरगुती उपाहारगृह आहे. नाव आठवत नाही आता, पण आठवले की प्रतिसादात लिहीनच :).
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Nov 2008 - 7:58 am | रामदास
जवळचे क्षीरसागर असावे.
21 Nov 2008 - 12:52 am | पक्या
पुण्यातील 'दुर्गा' बिर्याणि साठी प्रसिध्द. सदाशिव पेठेत आहे...टिस्मा च्या समोरील बोळात. दुसरे दुर्गा पुणे मंडई जवळ कुठेतरी आहे.
21 Nov 2008 - 9:17 am | विजुभाऊ
पुण्यातील 'दुर्गा' बिर्याणि साठी प्रसिध्द
तद्दन असहमत. इतकी तेलकट आणि तिखटजाळ बिर्याणी असते तेथे. पुण्यात बिर्याणी त्यातल्यात्यात बरी असते ती तिरंगा ची. पण हैद्राबाद हाऊस ची सार नाही
पुण्यात मासे खायला जंगली महाराज रोडवर कलकत्ता बोर्डिंग हाउस चांगले आहे
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
21 Nov 2008 - 9:45 am | घाटावरचे भट
>>पुण्यात मासे खायला जंगली महाराज रोडवर कलकत्ता बोर्डिंग हाउस चांगले आहे
सहमत. पण एवढ्यात दर्जा जरा खालावलाय म्हणतात. मी मागच्या २-३ वर्षांत तिथे गेलेलो नाही.
22 Nov 2008 - 3:50 am | llपुण्याचे पेशवेll
तसा मी मासे खात नसल्याने मला नक्की माहीत नाही पण ऐकले मात्र आहे खूप.
पुण्याचे पेशवे
21 Nov 2008 - 11:14 am | संताजी धनाजी
एकदम सहमत! दुर्गामध्ये मी तरी कधी चांगली बिर्याणी [आमच्या घरच्यापेक्षा :)] खाल्ली नाही :(
- संताजी धनाजी
21 Nov 2008 - 12:12 pm | मैत्र
जर तुम्ही हैद्राबाद शहरातील जी हॉटेल चेन आहे - म्हणजे दिसेल तिथे एक या प्रमाणात.
तर ते अतिशय बकवास आहे. आंबट असते बिर्याणी.
हैद्राबाद ला सर्वोत्तम म्हणजे आर टी सी क्रॉस रोड येथे बावर्ची.
नंतर कॅफे बहार आणि शेवटी पॅराडाइज..
22 Nov 2008 - 12:17 am | प्रभाकर पेठकर
विजुभाऊंशी १००% सहमत.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
21 Nov 2008 - 8:01 am | रामदास
महेश लंच होम.-मासळी
संदीप गोमांतक मासळी
प्रदीप गोमांतक-मासळी
अपूर्व लंच होम .-मासळी
21 Nov 2008 - 11:14 am | संताजी धनाजी
जायचे कसे ते पण सांगा की राव!
- संताजी धनाजी
21 Nov 2008 - 9:01 am | मैत्र
मत्स्यावतारांसाठी बेष्ट... लाल करी अप्पम किंवा नीर डोसा याबरोबर झकास लागते.
नळस्टॉप चौकाच्या मागच्या बाजूला.
जुने टेक महिंद्रा - शारदा सेंटर च्या समोर किंवा नवीन पर्सिस्टंट च्या बाजूला.
21 Nov 2008 - 9:15 am | नंदन
विसरलोच की. पार्ल्याला हनुमान रोडवर आहे. महाग असली (~८००-८५० रू.), तरी तंदुरी क्रॅब ही डिश आवर्जून खाण्यासारखी.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Nov 2008 - 9:41 am | विसोबा खेचर
आमच्या लक्षुमणशेठचं ग्रॅन्ट हाऊस कॅन्टीन, क्रॉफर्ड मार्केट, मुबई...
तात्या.
22 Nov 2008 - 7:30 am | संताजी धनाजी
अहो क्रॉफर्ड मार्केट किती मोठे आहे. नक्की कसे जायचे ते पण सांगा ना.
- संताजी धनाजी
21 Nov 2008 - 10:18 am | दिपक
खास मालवणी
निलदुर्ग चेंबुर-गोवंडी रोड
काहीही म्हणा पण चिपळूण मधल्या अभिषेक ची बातच निराळी.. :)
दिपक
22 Nov 2008 - 12:22 am | प्रभाकर पेठकर
काहीही म्हणा पण चिपळूण मधल्या अभिषेक ची बातच निराळी
माजले आहेत मालकवर्ग भयंकर. पदार्थांची चव मस्त आहे यात वाद नाही. पण मालकवर्गाचे ढोंगी आदरातिथ्य, पदार्थ उशीरा आल्यावर, तुम्ही काही तक्रार केलीत तर लगेच गळून पडते आणि त्यांचा भयंकर माज लखलखीत उघडा पडतो.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
23 Nov 2008 - 10:54 am | अनंत छंदी
चिपळुणात अभिषेकमध्ये मालवणी जेवणारा माणूस हा नेहमीच हायवेवरून ये-जा करणारा असतो. त्याला खरा कोकणातल्या जेवणाचा (मालवणी नव्हे, ती चव वेगळी!)स्वाद माहीतच नसतो. तो स्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल दीपकला भेट द्या , तहसीलदार कचेरीसमोर हायवेला लागून जरा आत हे हॉटेल आहे. तळलेले मासे, मच्छी करी, चिकन मसाला आणि मटण फ्राय ही देखिल येथील खासियत आहे. साधी खाणावळ वाटावी असे हे हॉटेल चवीमुळे ग्राहक राखून आहे. तांदळाची गरमागरम भाकरी आणि झणझणीत मटण एकदा चापलेत की तुम्ही तिथे जातायेता कायम थांबाल.
आणि आदरातिथ्याचे म्हणाल तर तिथे असलेला टोपीवाला वाढपी मामा तुमच्या पानातल्या वाटीमधला रस्सा तुम्ही जरा मनापासून चापताय असे वाटले तर सढळ हाताने पुन्हा आणून वाढतो. त्यासाठी टीप मिळावी अशी बिचार्याची अपेक्षाही नसते. आणि बिल घेताना तुमच्या चेहर्यावरचे समाधान टीपत मालक हसर्या चेहर्याने बिल घेतात. ज्यांची घरात सामिष भोजनाबाबत उपासमार होते असे स्थानिक ग्राहक कित्येकदा दुपारच्यावेळी येथे मटण भाकरीवर आडवा हात मारताना दिसतात.
ता.क. स्थानिक ग्राहक अभिषेकपेक्षा दीपकमध्ये जास्त असतात! सार लक्षात आले असेलच!
21 Nov 2008 - 11:27 am | केवळ_विशेष
१. हॉटेल सौंदर्य
डेक्कनवर रानडे इन्स्टिट्युट समोर
ओरिजिनल, लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावरील
मटण केशरी बिर्याणी,
पुणेरी मटण (पुणेरी मटण म्हणजे गावरान हिरवे मटण. लाल तिखटाऐवजी मिरची आणि इतर हिरव्या पदार्थांचा वापर करून हे मटण तयार केले जाते. हिरवी मिरची, ओला नारळ, खसखस, धने व तीळ यापासून तयार केलेल्या मसाल्याच्या जोडीला कोथिंबीर व पुदिना यांचे वाटण वापरले जाते. लाल तिखट कमी आणि सांगितले तर तेलाचा वापरही कमी, या गोष्टी ध्यानात ठेवून हे मटण घरगुती पद्धतीने तयार करतात. )
२. हॉटेल सर्जा
"सर्जा रेस्तरॉं',
127-2 सानेवाडी,
आयटीआय रस्ता,
औंध,पुणे - 411007
हे लता मंगेशकरांचे आहे.
चिकन थाई, चिकन मंगोलियन, चिकन कॅश्यू, चिकन व्होल्कॅनो, "प्रॉन्स विथ मिक्स व्हेजिटेबल्स हॉंगकॉंग स्टाईल', गोल्डन फ्राईड फिश, पुदीन मच्छी, फिश अमृतसरी, बोल्हाईच्या मटणाचे चायनीज पद्धतीने केलेले पदार्थ व कबाबच्या पंचवीसहून अधिक "व्हरायटी' येथे आहेत.
"स्टार्टर्स'मध्ये "फिश तवा' अनेकांना आवडतो. तव्यावर करीमध्ये मासा टाकून ती करी माशामध्ये पूर्णपणे मिसळून तवा कोरडा होईपर्यंत मासा शिजवितात.
(औंधसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये असल्यामुळे येथील पदार्थांचे दर साहजिकपणे इतर ठिकाणपेक्षा थोडे अधिक आहेत)
३. समुद्रा रेस्तरॉं,
म्हात्रे पुलाजवळ,
कर्वेनगर, पुणे - 411052.
09422943742 (म्हात्रे पूल संपला, की डावीकडे वळून डीपी रोड)
गोवन तसेच मालवणी पद्धतीने बनविलेले मासे व कोल्हापुरी पद्धतीने बनविलेले पदार्थ.
मत्स्यप्रेमींसाठी इथे गोवन आणि मालवणी अशा दोन्ही पद्धतीने तयार केलेले मासे.
फिश प्लॅटर
फिश करी
खिमा गोली पुलाव
४. वाघोली गावातील हॉटेल कावेरी
एकूण पाच शाखा आहेत. मार्केट यार्ड (कृषी उद्योग भवन), पुणे-सोलापूर रस्ता (शेवाळेवाडी), कोथरूड (चांदणी चौक), देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग (बालेवाडी जकात नाक्याजवळ) येथेही "कावेरी'चे बस्तान बसले आहे.
बोल्हाईचे मटण
५. दोराबजी अँड सन्स
845, दस्तूर मेहेर मार्ग,
सरबतवाला चौकाजवळ,
पुणे 411001.
020-26145955
020-26834595
दालगोश, चिकन किंवा मटण सालीगोश, मटण किंवा चिकन धनसाक, पात्रा फिश, शामी कबाब आणि "कस्टर्ड' हे पारशी पदार्थ
६. सिगरी रेस्तरॉ,
"सिटी टॉवर्स' इमारत,
ढोले-पाटील रस्ता,पुणे - 411001.
वेळ- सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० आणि सायंकाळी ७.३० ते रात्री ११
कबाब
उत्तर भारतीय पदार्थ- अमृतसरी मछली, दक्षिणी मुर्ग, बुऱ्हा कबाब, रान-ए-सिगरी यांच्यासह जवळपास पंधरा "नॉनव्हेज' कबाब
७. "बोरावकेज बिर्याणी हाउस'
254, चिरंजीव अपार्टमेंट,
शॉप न. 7, कर्वे रोड,
कोथरूड, पुणे-411029
020-25442279
पाया सूप, मटण दालचा व राइस, चिकन खिचडा, चिकन दम बिर्याणी, रमजान स्पेशल चिकन, खिचडा, व्हाइट गोश, जंगबादी गोश, चिकन-मटण हंडी, चिकन-मटण मसाला, खिमा पराठा, चुल्हा मटण
८. हॉटेल वाझवान
बाणेर रस्त्यावर "पॅनकार्ड' क्लबकडे जाणारा फाटा सोडला, की थोडेसे पुढे गेलात की वाझवान.
'ऑर्डर' दिल्यानंतरच पदार्थ तयार करण्याची पद्धत.
तबकमाझ, गुश्ताबा, मुर्ग याखनी, रवा, सर्वांत शेवटी- दूध, केशर आणि सुकामेव्यापासून बनविलेला "फिरनी' ही खास काश्मिरी खीर.
(आम्ही व आमचे परममित्र श्री. आशिष चांदोरकर यांच्या जॉइंट वेंचर मधून)
९. म्हात्रे पूलाकडून संत गुळवणी महाराज चौकातून स्वप्नशिल्प सोसायटीकडे जाणारा रस्ता.
हॉटेल अभिषेक.
१०. चायनीज साठी, कर्वे रस्त्यावरील चायनीज रूम
११. कर्वे रस्त्यावरून झाला कॉम्प्लेक्स च्या चौकात डावीकडे पिज्झा हट कडे वळालं (स्वप्नशिल्प सोसायटीच्या रस्त्याला/कोथरूड सिटिप्राईड थिएटर कडे) की उजव्या बाजूस 'ऑफ बीट' आहे १ल्या मजल्यावर.
१२. त्याआधी कर्वे रस्त्यावरचं मॅक्डोनल्ड च्या आधी हॉटेल सदानंद आहे, यांचचं पुणे-मुंबई बाह्यवळण मार्गावर बाणेरपाशी दुसरं आहे.
१३. हॉटेल गुडलक, डेक्कन
१४. हॉटेल खैबर, हॉटेल पूनम २ही डेक्कन
१५. बिबवेवाडी रस्त्यावरचं, पुष्पमंगल कार्यालयाजवळचं हॉटेल निमंत्रण
१६. नीलायम थिएटर जवळचं, स्वराज्य मालवणी
१७. सदाशिव पेठेतलं, हॉटेल सृष्टी- मासे खाणार्यांसाठी
१८. अलका टॉकिज जवळ, जोंधळे चौकात आवारे मराठा खानावळ- बोलाईचं मटण
१९. कर्वे रस्ता, हॉटेल निसर्ग
२०. कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रोड, हॉटेल कोयला- हैदराबादी बिर्याणी
कॅम्पातलंच हॉटेल ब्लु नाईल, पण सध्या लैच बोर झालीये त्याची टेस्ट आणि सर्विस दोन्ही
22 Nov 2008 - 7:28 am | संताजी धनाजी
झकास!
- संताजी धनाजी
21 Nov 2008 - 11:43 am | मनीषा
कोकण एक्स्प्रेस - कोथरुड
मिर्च मसाला -- कोथरुड
इथली सोलकढी पण चांगली असते
21 Nov 2008 - 11:57 am | केवळ_विशेष
रत्नागिरीतलं एस. टी स्टँडाजवळचं हॉटेल आमंत्रण...(कदाचित नावात गफलत होईल, कारण मी एकदाच जेवलोय तुडूंब. बहुधा रत्नागिरीतून हातखंब्याला जाणार्या रस्त्यावर डाव्या बाजूला आहे...माहीती चुकीची असल्यास दुरुस्त करावी ही विनंती)
कोकण एक्स्प्रेस - कोथरुड
मिर्च मसाला -- कोथरुड
इथली सोलकढी पण चांगली असते
च्यायला... ही हाटेलं विसरलो कसा काय
21 Nov 2008 - 12:01 pm | टारझन
माहीत नाही का ...
पण या जागांची नावं वाचून आज लै लै लैच्च उचंबळून आलं ... च्यायला येता जाता कधी मधी पडिक असायचो ...
आज फक्त वाचनमात्र उरलो आम्ही ... च्छ्या ...
- टारझन
21 Nov 2008 - 12:13 pm | पांथस्थ
१) न्यु मराठा कोल्हापुर दरबार
यांच्या पुण्यात दोन शाखा आहेत. एक सदाशिव पेठेत, ज्ञानप्रबोधिनी च्या समोरच्या बोळात आणि दुसरी मोरे विद्यालय बस-स्टॉप च्या थोड आधी. एकदम झकास मटण थाळी. सोलकढ खलास असते.
२) शीश महल
ए.बी.सी. फार्म्स, कोरेगाव पार्क. इथे इराणी पध्दतीचे खाद्यपदार्थ मिळतात. चेलो कबाब विशेष छान. हवा असल्यास हुक्का पण मिळतो (निरनिराळ्या स्वादांमधे)
३) पुण्यातील विविध इराणी हॉटेल्स
- खासकरुन कॅफे गुडलक, डेक्कन जिमखाना
- बंडगार्ड्नचा पुल संपतो तिथे एक इराणी हॉटेल आहे - यांची खासियत चिकन करी आणि इराणी रोटि
४) सिंहगडावर जवळपास सगळे ढाबे (विशेष करुन बाळुचा ढाबा)
इथे मस्त पैकी गावरान चिकन आणि भाकरी हाणायची
जसे आठवेल तसे तसे इथे देत जाईन....
(मटणमोळा) पांथस्थ....
21 Nov 2008 - 1:27 pm | झकासराव
वरच्या लिस्टात पुरेपुर कोल्हापुर राहिलय की काय??
पेरुगेट पोलिस चौकीजवळ आहे हे.
कोल्हापुरी पद्धतीने बनवलेल मटण मिळत तिथे.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
21 Nov 2008 - 1:52 pm | मैत्र
चार दिवसापूर्वीच गेलो होतो पेरुगेट जवळ पुरेपुर मध्ये. इतकं काही आवडलं नाही. तांबडा पांढरा रस्सा छान होता पण तेवढी मजा आली नाही. तिखट अजिबात नाही आणि खारट होतं थोडं. जाणकारांनी अजून माहिती द्यावी. कोल्हापुरी असंच असल्यास ठीक आहे.
21 Nov 2008 - 2:45 pm | संताजी धनाजी
अजुन एक मेहेंदळे गैरेज समोर पण आहे कोथरुड मध्ये. मला चांगलेच आवडले ते.
- संताजी धनाजी
21 Nov 2008 - 2:50 pm | पांथस्थ
मला पण 'पुरेपूर...' विशेष आवडले नव्हते. त्यापेक्षा हे छान आहे -
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
8 Apr 2009 - 11:28 am | सालोमालो
न्यु मराठा कोल्हापुर दरबारचे मटण लोणचं अप्रतीम आहे. जरूर खा.
सालो
21 Nov 2008 - 1:46 pm | केवळ_विशेष
त्याची एक शाखा अभिषेक हॉटेल समोर आहे, एरंडवण्यात.
(अवांतरः- ते अवधूत गुप्तेचच म्हणायचय ना?!)
21 Nov 2008 - 3:41 pm | सुनील मोहन
शेतकरी नॉनव्हेज.
निलय कॉम्लेक्स शेजारील गल्ली, सन्तोष हॉल जवळ,
आनन्दनगर, नरवीर तानाजी रस्ता,(सिन्हगड रोड)
पुणे.
सुक्क मटण , कडक भाकरी, खिमा फ्राय, पान्ढरा आणि ताम्बडा रस्सा
हवे असेल तर जोडीला सुरमई फ्राय.
ताम्बड्या रस्श्यात कडक भाकरी चुरून वरून सुक्के मटण हाणा इथे.
21 Nov 2008 - 3:54 pm | ब्रिटिश टिंग्या
बर्यापैकी नांव ऐकण्यात येतयं सध्या!
आल्या आल्या धाड घालावी म्हणतो! ;)
- (शिंगडरोडचा) टिंग्या
नॉनव्हेज खाणं चांगलं.....पण ते सारखं खाणं वाईट!
22 Nov 2008 - 8:28 am | अभिजीत
याची एक खासियत -
लता मंगेशकर, आशा भोसले, श्रीकांत मोघे वगैरे सारखे मोठे लोक्स इथे जेवायला आले त्याचा एक छोटासा अल्बमही बघायला मिळेल.
आशा भोसलेंचा एक छानसा अभिप्राय सुद्धा वाचल्याचा आठवतोय.
खास कोल्हापुरी जेवणासाठी एकदम सही आहे. तांबडा-पांढरा रस्सा तर जबरा ..
तसेच, 'यहां शराब पीना मना है' सारख्या टिपिकल ढाब्याच्या सुचना ही .. :)
- अभिजीत
21 Nov 2008 - 4:49 pm | तृप्ती
हे चाफेकर चौकाजवल जो जकात नाका आहे , तिथुन सरल गेल्यावर जो कच्च रस्ता लागतो ,तिथे आहे.....गरम गरम चुलि वरचे non veg मिलते.....khup sahi asate.....
21 Nov 2008 - 5:11 pm | सागर
मुंबईला ऐरोलीत (भांडूपच्या अलिकडे ) वैभव नावाचे एक झकास हॉटेल आहे.
तिथे सगळ्या प्रकारचे नॉनव्हेज एकदम मस्त मिळते.... एवढे चविष्ट नॉनव्हेज खूप कमी ठिकाणी मी चाखले आहे.
मासे ऑर्डर करताना वेटरच विचारतो की मालवणी पद्धतीचा मासा करुन हवा आहे की दुसर्या?
तिथे मनसेचे ऑफीसपण आहे जवळच...
नक्की पत्ता नाही माहीत, विचारुन सांगतो
पण मुंबईत असलेल्यांनी तर जरुर तेथे भेट द्यावी
वेळ आणि पैसा दोन्ही सत्कारणी लागेल
घेणार्यांची सोय पण चांगली आहे तिथे
(मासाप्रेमी) सागर
21 Nov 2008 - 5:16 pm | धमाल मुलगा
मुख्य रस्त्यावर? ऐरोलीचा पुल संपल्यानंतर (भांडूपकडून येताना)?
मनसे कार्यालय (ऐरोलीगड) अशी पाटी असलेल्या इमारतीजवळचं वैभव??
आयला, हे नव्हतं राव ठाऊक. मारायला पायजे चक्कर
21 Nov 2008 - 6:57 pm | रामदास
शुक्रवारी खावे. भांडूपहून पुण्याला जाण्यापूर्वी.
21 Nov 2008 - 7:10 pm | सागर
सेक्टर पाच मधे येते ते
भांडूपकडून येताना पुलावरुन आला की सर्कल लागते, दुसर्या सिग्नल वरुन उजवीकडे गेला की मनसेचे ऐरोलीगड लागते
त्याच्या जवळच आहे ते....
साला काय टेस्ट आहे तिथली.... एकदम झकास....
तुम्ही अनुभव घ्या व मला नक्की सांगा...
आपल्या तात्यांनी पण तिथले जेवण घेतले तर भक्त होतील"वैभव"चे
सागर
21 Nov 2008 - 7:36 pm | सागर
सेक्टर पाच मधे येते ते
भांडूपकडून येताना पुलावरुन आला की सर्कल लागते, दुसर्या सिग्नल वरुन उजवीकडे गेला की मनसेचे ऐरोलीगड लागते
त्याच्या जवळच आहे ते....
साला काय टेस्ट आहे तिथली.... एकदम झकास....
तुम्ही अनुभव घ्या व मला नक्की सांगा...
आपल्या तात्यांनी पण तिथले जेवण घेतले तर भक्त होतील"वैभव"चे
सागर
21 Nov 2008 - 7:38 pm | सागर
अशी एक मस्त यादी बनवायची आणि मग जमेल तसे एकेका हॉटेलचा आस्वाद घ्यायचा. कशी वाटली कल्पना?
संताजी धनाजी यादी कधी प्रकाशित करताय?
सगळ्यांचे कष्ट वाचवा की राव....
(मासा गटवण्यात आनंद मानणारा ) सागर
21 Nov 2008 - 8:57 pm | संताजी धनाजी
दमा की जरा राव. एक दोन दिवस थांबतो आणि मग प्रकाशित करतो कारण अजुन प्रतिक्रिया येत आहेत :)
अजुन एक हॉटेल आठवले मला.
हॉटेल नागपुरी, पुणे
टिळक स्मारक मंदिराच्या समोरच्या बोळात गेले की डावीकडे कुठेतरी आहे. मी कधी गेलो नाही पण बरेच ऐकले आहे.
(मासा गटवण्यात आनंद मानणारा ) सागर
म्हणुनच तुझे नाव सागर ठेवले आहे वाटते ;)
- संताजी धनाजी
22 Nov 2008 - 1:36 pm | सुनील मोहन
हॉटेल नागपूर.
टिळक स्मारक मन्दिराकडून पेरुगेट पोलिस चौकीकडे जावे.
साधारण शन्भर कदम चालल्यावर (पन्चनामा) डावीकडे हे हॉटेल आहे.
हॉटेल ओळखायची खूण म्हणजे इथे भिन्तीकडे तोन्ड करुन जेवणारे लोक
दिसतील. आणि बाहेर किमान १०-१५ जण आशाळभूत नजरेने त्यान्च्याकडे
पहात असलेले असतील!!!!!
पण इथले मटण रस्सा, पुलाव, अ प्र ति म. बिर्याणी अनेक ठिकाणी मिळते पण
मटण पुलाव मात्र इथे सुरेख मिळतो. अजून एक खासियत म्हणजे इथला भेजा फ्राय.
हे लिहून झाल्यावर तडक हॉटेल नागपूर गाठणार आहे कारण लिहितानाच तोन्डाला
पाणी सुटले आहे.
22 Nov 2008 - 11:00 pm | सागर
:) :) :)
(मासा गटवण्यात आनंद मानणारा ) सागर
म्हणुनच तुझे नाव सागर ठेवले आहे वाटते
हा हा ... ते तर आहेच म्हणूनच तर मला मासे सर्वात प्रिय आहेत :)
हरकत नाही.... पण यादी मात्र फक्कड झाली पाहिजे....
मला अजून एक माशाचे प्रसिद्ध ठिकाण आठवले....
फर्ग्युसन कॉलेजजवळ ज्ञानेश्वर पादुका चौकातून पुणे युनिव्हर्सिटीकडे जाताना एका चौकाच्या कॉर्नरलाच एक छोटेसे हॉटेल आहे
मला नीटसे आठवत नाही पण बहुतेक जोशी नावाच्या बाईंचे हॉटेल आहे. तिथे मासे एकदम फक्कड बनवतात. रस्सा असा सुंदर मिळतो ... वा वा अजून पण पाणी सुटते.. अलिकडे मी गेलो नाहिये, पण एवढे सुंदर मासे मिळणारे हॉटेल काही बंद नाही होणार.
जोशीबाईं बनवतात तसा मासा पुण्यात मिळत नाही अशी त्या ठिकाणची ख्याती बर्याच वर्षांपासून आहे.
बहुतेक फ्रेंड्स नाव आहे हॉटेलचे... त्याच्या पलिकडच्या बाजूलाच भाजीवाल्यांचे गाळे आहेत, ही ओळखायची खूण
दुसरे एक आठवले पण माशाचे नाही, जंगली महाराज ला मॉडर्न कॅफे च्या मागेच बांबू हाऊस आहे तिथले जंगली चिकन एकदम बेस्ट... जंगली चिकन खावे तर तिथलेच, काय मस्त चविष्ट मिळते तिथे... वा वा...
अजुन एक हॉटेल आठवले मला.
हॉटेल नागपुरी, पुणे
हो तेच ते, ते पण एकदम भारी आहे,
सुनील मोहन यांनी एकदम बरोबर खूण सांगितली आहे , भिंतीकडे तोंड करुन खायची लज्जत तिथेच मिळते... :)
(मासाप्रेमी) सागर
21 Nov 2008 - 10:25 pm | अविनाशकुलकर्णी
जंजिरा हे पण एक मासे खाण्या साठी चांगले हॉटेल आहे..
अलका टॉकिज वरुन खाली गांजवे चौकात आला कि हे हॉटेल लागते....
अविनाश
22 Nov 2008 - 12:40 am | प्रभाकर पेठकर
चमचमीत निरामिष आणि चटकदार सामिष पदार्थांची रेलचेल म्हणजेच पुण्यातील 'यज्ञकर्म उपहारगृह'.
पत्यासाठी पाहा: http://www.misalpav.com/node/4521#comment-65209
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
7 Apr 2009 - 12:23 pm | विसुनाना
दुजोरा.
मासे, प्रॉन्स, सोलकढी... उत्तम.
स्वानुभवाचे बोल आहेत.
22 Nov 2008 - 8:18 am | अभिजीत
मालवणी सोलकढी - कर्वे नगर मधे, 'मातोश्री' वृद्धाश्रमाच्या पुढे
शेतकरी नॉन्-व्हेज - सिंहगड रोडवर, संतोष हॉल शेजारी (कोल्हापुरी)
मल्लाका स्पाइस - कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी (थाइ )
बाँबे ब्राझरी - बोट क्लब रोडवर
मेन लँड चायना - बोट क्लब रोडवर
प्रेम्स - कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी
दोराबजी - वेस्ट साइड शेजारचं आणि जुनं इस्ट स्ट्रीट वरचं (इथे चिकन बिर्याणि जबरा)
ल मेरिडियन - इथलं 'अंगारे' (बहुतेक) हे भारतिय रेस्तराँ फारच जबरी आहे ... तंदुर प्रॉन्स तर एकदम जबरी ..
आर्थर्स थिम - कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी (फ्रेंच )
कोयला (द हैद्राबाद हाउस) - मेन रोड कोरेगाव पार्क (एकदम निजामी थाटाचं )
चिंगारी - ए बी सी फार्म शेजारी, कोरगाव पार्क जवळ
सिझलर्स साठी -
योको - ढोले पाटील रोड वर
झामुज - ढोले पाटील रोड वर
याना - फर्गुसन कॉलेज रोडवर
द प्लेस - कॅंपात वेस्ट साइड शेजारचं (मी स्वःत कधी गेलो नाही पण ऐकलय ..)
कोबे - लॉ कॉलेज रोडवर
द चार्कोल पीट - कॅंपात वेस्ट साइड शेजारचं (मी स्वःत कधी गेलो नाही पण ऐकलय ..)
- अभिजीत
24 Nov 2008 - 2:31 pm | सन्केत
मित्रहो,
पुण्यातील होटेल्सची सविस्तर माहिती तुम्हाला www.foodinpune.com या संकेत स्थळावर मिळू शकेल. यावर तुम्ही तुमचे अनुभवही इतरांना सांगू शकता. आणि तुमच्या आवडीच्या होटेलचा समावेशही करु शकता.
7 Apr 2009 - 12:07 pm | सुनील
ऱोटेसरी पद्धतीने भाजलेले मसालामिश्रित मांस हे भूमध्यसागरीय खानपानाचा एक प्रसिद्ध प्रकार. मोरोक्कोतील मराकेश ह्या शहराच्या नावाने एक नवीन हॉटेल ठाण्यात उघडले आहे. परवाच तिथे जाण्याचा योग आला.
कापूरबावडीहून घोडबंदर रोडने निघाल्यास, मानपाडा जंक्शनच्या थोडे अलिकडे एक रस्ता डावीकडे जातो. त्याने गेल्यास अगदी पाचच मिनिटात, उजवीकडे हॉटेल मराकेशची पाटी दिसेल.
नेहेमीपेक्षा वेगळे असे पदार्थ (विशेषतः मांसाहारी) चाखायचे असतील तर हे एक उत्तम ठिकाण आहे, असे माझे मत झाले आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
7 Apr 2009 - 12:42 pm | चिरोटा
गोरेगाव पस्चिम-एम्.जी. रोड वरुन लिन्क रोड ला जाताना कोपर्यावर एक आहे.कोकण स्वाद बहुतेक्.ऑर्डर दिल्यावर तुम्हाला मासे दाखवतात.तुम्ही मासे निवडायचे. अतिशय स्वादिष्ट आणि रूचकर्.साधरण १२५ रुपये माणशी असे जेवण आहे.
गिरगावात पुर्वि- अनन्ताश्रम्/माधवाश्रम ही कोकणी मान्साहाराची होटेल्स होती.ती अजुन आहेत का?कोणी मुम्बई मिपाकर प्रकाश टाकेल का?
दादर्-सेनाभवन येथुन दादर पुर्व /स्टेशन्च्या दिशेने गेल्यास २/३ मालवणी पध्धतीची चान्गली हॉटेल्स आहेत.लेडी जमशेदजी मार्गवरच दादरहून माहिम दिशेने जाताना 'सचिन' पण आहे.एके काळी हे चान्गले होते.विलेपार्ले(पूर्व) हनुमान रोड येथील गजाली.प्रचन्ड महाग आहे.चव यथा तथाच्. आधी हे कोकणी माणसाचे होते. नन्तर एका प्रख्यात सर्जन आणि उडुपी माणसाने विकत घेतले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
7 Apr 2009 - 1:23 pm | पर्नल नेने मराठे
मी स्वत शाकाहारी आहे पण बान्द्र्याला विकी का लकी आणी सायन सर्कल ला पेनिन्सुला ला जाउन पहा ;)
चुचु
7 Apr 2009 - 1:50 pm | चिरोटा
लकी मत्स्याहारासाठी तेवढे प्रसिध्ध नाही.त्यान्ची बिर्याणी चान्गली असते.वान्द्रे पस्चिम स्थानकावरुन महम्मद रफी चौकाच्या दिशेने जायचे.
क्ष्^न + य्^न = झ्^न
7 Apr 2009 - 2:12 pm | रश्मी
गोरेगाव ईस्ट ला स्टेशनचा बाजुला सत्कार म्हनुन नॉनव्हेज साठी खूप प्रसिद्ध चांगले हॉटेल आहे.
7 Apr 2009 - 8:22 pm | संजय अभ्यंकर
डेक्कन डेपोच्या समोर, हाँगकाँग बाजारात.
तसेच डेक्कन वरचे गुडलक. येथे इराणी पद्धतीचे कासमखाना, तवा चिकन, खिमा घोटाला अजमावा!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
8 Apr 2009 - 7:41 am | मितालि
हॉटेल मध्ये मिळणारे मालवणी जेवण आणि मालवण मधील घरी बनलेले जेवण यात खुप फरक आहे.. अजुन पर्यन्त ती चव मला कोणत्याही हॉटेल मध्ये नाही मिळाली.. खरे मालवणी जेवण हवे असेल तर एखादा मालवणी नातेवाइक / मित्र शोधा.. आणि चागंला ८ दिवस पाहुणचार घ्या...

...
आम्ही परदेशी मासेही मालवणी बनवुन खातो...( तिलापिया मालवणी...)
8 Apr 2009 - 11:18 am | सालोमालो
नवचं चालू झालय म्हणून क्वालीटी चांगली आहे. नव आहे तो पर्यंत खाऊन या. खरच सुंदर मटण मिळते.
सालो